आर्ट ऑफ लिविंग चा अनुभव अथवा माहिती पाहिजे .

rain6100's picture
rain6100 in काथ्याकूट
18 Jul 2013 - 7:04 pm
गाभा: 

मि. पा. पैकी कुणी हा कोर्स केलेला असल्यास मला माहिती हवी होती . मला साधारण दहा दिवस कोणत्याही ठिकाणी असलेल्या योग शिबीर अथवा ध्यान धारणा शिकवली जाते असे ठिकाण सुचवा. बंगलोर आश्रमात असलेल्या कोर्स बद्दल माहिती पाहिजे किवां महाराष्ट्रा मध्ये चांगले ठिकाण सुचवा कि तेथे राहूनच हा कोर्स करता येईल. नाशिक जवळ असण्याऱ्या आश्रमा बद्दल मागे वाचले होते पण आता आठवत नाही त्यामुळे त्याबद्दल पण माहिती हवी होती . आर्ट ऑफ लिविंग चा फायदा आपल्या व्यक्तिगत जीवना मध्ये कसा होतो कुणाला अनुभव असल्यास जरूर सांगा

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

18 Jul 2013 - 7:26 pm | चित्रगुप्त

सविस्तर प्रतिसाद लवकरच देईन, तुम्हीला (सुटी इ. मुळे) केंव्हा जायचे याबद्दल बंधन आहे का?
मी आर्ट ऑफ लिविंग आणि विपश्यना दोन्ही केलेले आहे, त्यात विपश्यना उजवे आहे, असे म्हणेन.
यातून काय अपेक्षित आहे, याचा विचार करणेही उपयोगी ठरेल. तसेच तुमचे वय, अनुभव, वाचन व विचार हे सर्व विचारत घेऊन ठरवणे योग्य.

हे असे " कोर्स" कशासाठी करायचे असतात ? मी काय बा एकच एक गुरू वगैरे केला नाही आयुष्यात . कसला कोर्स पण केला नाही . हाउ टू विन फ्रेंडस वगैरे पुस्तके वाचली नाहीत. तरीही माझ्याकडे सुख्री माणसाचा सदरा आहे . मला बीपी व
मधुमेह आहे हाच एकमेव डाग ! ( त्यानाही १० वर्षे रोखून ठेवले आहे) . जीवन सुंदर आहे !

सामान्य वाचक's picture

18 Jul 2013 - 8:58 pm | सामान्य वाचक

मी केला आहे. आणि तुम्ही करू नका, असे सांगणे आहे.

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2013 - 9:04 pm | प्रभाकर पेठकर

'आर्ट ऑफ लिव्हिंग' पेक्षा 'आर्ट ऑफ लव्हींग' महत्त्वाचे. एकदा ते जमले की सर्व ताणतणाव विरून जातात. त्याला वय, वाचन इ.इ.ची जरूरत भासत नाही. संवेदनशील आणि मोठ्ठ मन असलं की झालं काम.

श्रीरंग_जोशी's picture

18 Jul 2013 - 9:18 pm | श्रीरंग_जोशी

'आर्ट ऑफ लिव्हिंग' पेक्षा 'आर्ट ऑफ लव्हींग' महत्त्वाचे. एकदा ते जमले की सर्व ताणतणाव विरून जातात. त्याला वय, वाचन इ.इ.ची जरूरत भासत नाही. संवेदनशील आणि मोठ्ठ मन असलं की झालं काम.

संपूर्णपणे सहमत.

अवांतर -
मला आजवर कुठल्याही अम्मा, बाबा, गुरू, महाराज यांच्याकडे जाण्याची किंवा त्यांना फॉलो करण्याची जराही गरज वाटली नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात समस्या येतात त्याच्याशी स्वत्तः दोन हात करायला हवेत. मदत, मार्गदर्शनासाठी जीवाभावाची माणसे भोवती असतातच त्यांना जपता आले म्हणजे मिळवली.

वरील सर्व प्रकार म्हणजे सामान्य जनांच्या साध्या सरळ समस्या कॄत्रिमरित्या फुगवून मग त्यांचा तोडगा दाखवून आपल्या जाळ्यात ओढणे असावे असा अंदाज आहे. खात्रीशीर सांगू शकत नाही कारण मी किंवा जवळचे कुणीही या मार्गाला लागलेले नाही.

चिगो's picture

18 Jul 2013 - 9:51 pm | चिगो

जबरदस्त, काका.. 'आश्रम' कधी सुरु करताय ?:-)

चेतनकुलकर्णी_85's picture

18 Jul 2013 - 9:28 pm | चेतनकुलकर्णी_85

काय पण दिवस अलेत।कसे जगावे हे पण दुसर्यांकडून शिकावे लागते आणि ते हि खिशाला चाट देऊन ….
अवांतर : ह्या गुरूंचे एजेंट (विक्रेते ? कि आणखी काही ) बहुतेक सर्व आस्थापनात सापडतील !!

विजुभाऊ's picture

18 Jul 2013 - 10:13 pm | विजुभाऊ

आर्ट ऑफ लिव्हिंग चा कोर्स केल्यास होणारे काही फायदे.
१)श्वसनाच्या व्यायामामुळे सिगरेट वगैरे चे व्यसन सुटू शकते.
२)श्वसनाच्या व्यायामामुळे सुरवातीचे काही दिवस तरी उत्साही वाटते.
३)नव्या वेगळ्या सर्कलमधील लोकांच्या ओळखी होतील.
४) बोलायला नवे विषय सापडतील
आर्ट ऑफ लिव्हिंग हे साधे सरळ कपालभाती/भ्रामरी वगैरे योगीक क्रीया आहेत. यात बाबागिरी वगैरे काही नाही.
कोण्ताही व्यायाम नियमीत केला तर त्याचे फायदे दिसतात. श्वसनाच्या व्यायामाचे ही तसेच आहे. आर्ट ऑफ लिव्हींग मुळॅ कोणी आजार बरे होतात असे म्हंटले तर त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे तुम्ही ठरवा. (हे म्हणजे सूर्य नमस्कार घातल्याने स्पॉन्ड्युलायटीस बरा होतो असे म्हणण्यासारखे आहे )
श्वसनविषयक कोणतेही आजार असतील तर आर्ट ऑफ लिव्हिंग टाळा.

अर्धवटराव's picture

18 Jul 2013 - 10:40 pm | अर्धवटराव

आर्ट ऑफ लिव्हींग चा द्वितीय कोर्स रवीशंकरजींना गुरुस्थानी मानुन आध्यात्मीक प्रगती वगैरे करायचा रस्ता पकडतो. प्रथम लेव्हलचा कोर्स करुन तिथेच थांबायचा ऑप्शन आहेच. श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानाचा अभ्यास या दोन गोष्टींची चांगली तोंडओळख आणि प्रॅक्टीस होईल प्रथम कोर्स मधे.

ध्यानाची प्रॅक्टीस विपश्यना केल्याने देखील होईल... पण तिथे गुरुमहात्म्य वगैरे नाहि. शिबीरात काहि दिवस राहावं लागतं मात्र. ऑफीस, घर-संसाराला तेव्हढे दिवस सुट्टी.

एक अनुभव घ्यायचा म्हणुन करायचं असेल तर आर्ट ऑफ लिव्हींग आणि विपश्यना दोन्ही करा :)...पण सवडीने. मनाची शांती आवाक्याबाहेर गेली आहे, काहि बाह्य उपायांची अत्यंत गरज आहे असं वगैरे वाटत असेल तर मग जे लवकर शक्य होईल ते नक्की करा.

अर्धवटराव

कवितानागेश's picture

18 Jul 2013 - 11:33 pm | कवितानागेश

आर्ट ऑफ लिव्हिन्गमध्ये प्राणायाम, सुदर्शन क्रिया... याशिवाय नक्की काय शिकवतात हे माहित नाही. पण अनेक लोकांकडून याबद्दल भरभरुन ऐकलं आहे. मला वाटते पहिला कोर्स ३/४ दिवसाचा आहे.
नीट केलेल्या प्राणायामाचा फायदा नक्कीच होतो.
पण त्यांची कोर्स फी रग्गड आहे!
विपश्यना १० दिवसाचा कोर्स आहे. तिथेच राहून पूर्ण मौन पाळायचे.dhamma.org वर माहिती मिळेल.
या कोर्सची फी काहिही नाही. मनापासून केला तर तो 'लाईफटाईम एक्स्पेरिअन्स' ठरेल.
त्यात योगद्प्राणायम इत्यादी शिकवत नाहीत. नेहमीची औषधे देखिल शक्यतो बंद ठेवायला सांगतात.
रात्रीचं जेवण नसतं. पहाटे ४ ला उठावतात. :)
केवळ स्वतःबरोबर रहायचं असतं. पण हे सगळं सहज जमतंंअसा अनुभव अहे.
अजून एक 'सिद्धसमाधी योग' म्हणून शिबीर आहे. त्यात मुद्रा आणि प्राणायामाचे प्रकार खूपच छान शिकवतात. बहुतेक १५ दिवसांचा कोर्स आहे. पण कुठे कधी असतो ते मला माहित नाही.
बाकी योगविद्यानिकेतन, अंबिका योग्कुटीर यांचे कोर्स मात्र आठवड्यातून १-१ दिवस जाण्याचे असतात.

प्रणायमाचा मी पाहिलेला फायदा म्हणजे दिवसभर पुष्कळ एनेर्जी राहते आणि मूडदेखिल चांगला राहतो.

एक अनाहूत सल्ला: ध्यानाचा अथवा योगिक क्रियांचा, प्राणायामाचा कुठलाही प्रकार शिकताना नीट शिकून घ्यावा. समजला नसेल तर शंका राहू देउ नयेत. पुन्हा पुन्हा विचारुन नीट शिकावा. आणि नंतर तो प्रकार फक्त त्याच प्रकारे करावा. त्यात व्हेरिएशन्स करु नयेत.
श्वसनप्रक्रियेत तर कधीच प्रयोग करुन बघू नयेत अथवा घाईघाईनी ते प्रकार उरकू नयेत.

तुम्हाला शुभेच्छा! :)

हा अथवा इतर कोर्स करण्याचा उद्देश फक्त प्राणायाम आणि ध्यान धारणा आणि साधना करताना उपयोग हाच आहे त्याला पूरक म्हणून पंचकर्म जर असले तर उत्तम ,बाकी विपश्यना च्या तारखा ( इगतपुरी येथील ) दोन ते तीन महिने पूर्ण बुक आहे .गुरु वैगरे करण्याचा उद्देश नाही

त्यांच्या साईट वर बरीच ठिकाण आहेत. तुमच्या जवळच शोधा अथवा धिर धरा.
माउ= आग रात्रीच जेवण असत. तुम्हाला जमल्यास / शक्य असल्यास ते घेऊ नका असा सल्ला असतो.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2013 - 4:11 am | चित्रगुप्त

आर्ट ऑफ लिव्हिंग हा एक चलाखीने केला जाणारा कार्पोरेट धंदा आहे, असे मला तरी वाटले. (वर श्रीरंग जोशींनी लिहिल्याप्रमाणे ..."सामान्य जनांच्या साध्या सरळ समस्या कॄत्रिमरित्या फुगवून मग त्यांचा तोडगा दाखवून आपल्या जाळ्यात ओढणे ... वगैरे) ऑफिसातील सहकार्‍याने मागे लागून लागून आम्हा ३-४ जणांना राजी केले, (असे नवे गडी नेणार्‍या जुन्या गड्यांना कमिशन मिळते असे ऐकून आहे, खरे खोटे ठाऊक नाही). यातील सुदर्शन क्रिया हा एक प्राणायामाचा प्रकार असून त्याचे साधर्म्य संभोगक्रियेच्या वेळी घडून येणार्‍या श्वसनाशी आहे. बहुतेक त्यामुळे तात्पुरते बरे वाटते. त्यापेक्षा रामदेव बाबा फुकट शिकवतात्, ते प्राणायम उत्तम. तसेच आर्ट ऑफ वाले जे 'बौद्धिक' घेतात, त्यापेक्षा आपला दासबोध कैक पट उत्तम.
विपश्यना मात्र खरोखर उपयोगी विद्या आहे. काही शारीरिक व्याधी असेल, तर ती आश्चर्यकारक रीत्या बरी होते, हा स्वानुभव आहे. माझे अनेक वर्षांचे पाठीचे दुखणे कायमचे बरे झाले, तेही ज्या विवक्षित क्षणी बरे झाले, तो क्षण मला स्वच्छ समजला सुद्धा. मी विपश्यना शिबिर निव्वळ कुतुहलापोटी केले होते. त्या दहा दिवसात खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, हा आणखी फायदा.

चिगो's picture

19 Jul 2013 - 1:09 pm | चिगो

'इंटरकोर्स'च्या फायद्यांसाठी कोर्स? हवेच असल्यास श्वासांची गती वाढवण्यासाठी भारतात विविध भाषांमधे विपुल 'साहित्य' उपलब्ध आहे.. ;-)

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 1:23 pm | बाळ सप्रे

< गडाबडा लोळून हसणारा स्मायली > हवाय इथे...

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 1:25 pm | बाळ सप्रे

अरेच्चा.. स्मायली आलाच नाही..
गडाबडा लोळून हसणारा स्मायली दिसला होता..पूर्व परीक्षणात!!

चौकटराजा's picture

19 Jul 2013 - 2:10 pm | चौकटराजा

स्माईलीला लेकाच्याला कसे जगावे हे कळत नाही त्याला पाठवा ह्या कोर्स ला !

बाळ सप्रे's picture

19 Jul 2013 - 10:09 am | बाळ सप्रे

"अनुभव" घेतला नसल्याने पास..
अर्थात अनुभव घेण्याची गरजही पडली नाही..
काही जण मी कोर्स करावा म्हणून मागे लागले पण "इतके पैसे घालून कोर्स मी का करावा?" याचे कोणीही समाधानकारक उत्तर देउ शकला नाही..
प्राणायाम वगैरे शिकण्यासाठी फार मोठा कोर्स करण्याची गरज नसते असा मात्र माझा अनुभव आहे..

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 12:09 pm | पिलीयन रायडर

नाशिक जवळ.. १० दिवसांच्या कोर्स म्हणताय म्हणाजे तो विपश्यना..आणि तो उत्तमच आहे.. तो योग, प्राणायाम ह्या वर केंद्रित नसुन "ध्यान" ह्या विषयाला वाहीलेला आहे. माऊ म्हणतेय त्या प्रमाणे एनर्जी खुप वाढते.. मला फार आवडाला.. मुख्य म्हणजे कोणी गुरू बिरू नसतो.. कुणा समोर हात जोडायची गरज नाही..

आर्ट ओफ लिविंग.. बकवास वाटला मला तरी.. काही निष्पन्न झालं असं वाटलं नाही. उलट श्री श्री कसे महान हे ऐकुन ऐकुन तिडीक बसली डोक्यात. पैसा मोजुन घेतात. जो काही चांगल्या कारणासाठी वापरला जात असेल ह्यावर माझा मुळीच विश्वास नाही.

माझ्या ओळखीत योगायोगाने आर्ट ऑफ लिव्हींग केलेली माणसे थोडीशी विचित्र आहेत.. सतत मागे लागतात की कोर्स करा.. सतत गुरुदेव गुरुदेव करत बसतात.. जळी स्थ्ळी काष्ठी त्यांना गुरुजी दिसतात. त्याम्चे फोटो, त्याला हार, त्यांची पुजा, त्यांच्या सीडीज, त्यांची गाणी, त्यांची औषध.... अरेरेरे.. ताप असतो नुसता.. आणि त्यावर वाद/ चर्चा/मतभेद.. काहीही करायचं नाही.. अन्यथा ते चवताळतात..

चित्रगुप्त's picture

19 Jul 2013 - 12:45 pm | चित्रगुप्त

पिलियन रायडर यांचेशी विपश्यना आणि आर्ट ऑफ लिविंग बद्दल पूर्णपणे सहमत. आर्ट ऑफ लिव्हिंग खूप गवगवा केला जाणारा नुस्ता धंदा, तर याउलट विपश्यना ही अतिशय उपयोगी विद्या आहे.
प्राणायाम शिकायचा, तर रामदेव बाबांची एक सीडी आणून त्यावरून करणे बरे.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2013 - 12:54 pm | सामान्य वाचक

कुणाच्या भावना दुखावल्यास क्षमा करा, पण श्री श्री ची एक CD दाखवतात त्या कोर्स मधे. त्यात ते नाचत गात असतात. & सगळे भक्ती भावाने बघत असतत. मला पु. लं . चे असामी असामी आठवले

आनन्दिता's picture

19 Jul 2013 - 10:15 pm | आनन्दिता

माझ्या ओळखीत योगायोगाने आर्ट ऑफ लिव्हींग केलेली माणसे थोडीशी विचित्र आहेत.. सतत मागे लागतात की कोर्स करा.. सतत गुरुदेव गुरुदेव करत बसतात

अगदी अगदी.... माझ्या ओळखीत असे बरेच प्राणी आहेत.. त्यांना त्या श्री श्री आणि त्यांच्या विविध कोर्सेसचं अगदी व्यसन लागल्या सारखे वागतात. सतत त्यातच गुरफटून घेतलेलं पाहतेय मी. वरुन आजुबाजुच्या सर्वांना ही त्यांच्याच गोष्टी सांगुन वीट आणतात...

पद्मश्री चित्रे's picture

21 Jul 2013 - 2:53 pm | पद्मश्री चित्रे

हाच अनुभव. आमच्या ऑफिसमध्ये एक ग्रुप जेवण्याच्या सुट्टीत आर्ट ऑफ लिव्हींग चे धडे गिरवीत असे आणि जेवण्याच्या वेळेनंतर कामे बाजूला ठेवून जेवत बसत असे. त्या ग्रुप ला "आर्ट ऑफ leaving " म्हणत बाकी सारे. श्री श्री च्या फ़ोटो ला रोज हार , नमस्कार काय विचारू नका…

सामान्य वाचक's picture

19 Jul 2013 - 12:50 pm | सामान्य वाचक

त्यांचे बौद्धिक अगदी बाळबोध असते.

आणि सुदर्शन क्रिया हा hyper ventilation चा प्रकार आहे अतिरिक्त प्राणवायू पुरवठा झाल्याने हलके वाटते.

त्यापेक्षा खरेच, रामदेव बाबा शिकवतात तो प्राणायाम साधा सोपा सरळ & सेफ अहे.

सुदर्शन क्रिये ने खूप जणांना खूप काही त्रास होऊ शकतात.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 1:30 pm | पिलीयन रायडर

सामान्य वाचक..
काही भावनांची कदर करायची गरज नाही.. मी खुप्दा पाहिलय की हे लोक आपल्या वेळेची कदर करत नाहीत आणि प्रचंड गळेपडु पणा करतात..

आणि सुदर्शन क्रियेबद्दल १०० वेळा सहमत..
खुप जोर जोरात श्वास घेतला तरी नाकाला आणि डोक्याला झिणझिणल्या सारखं होतं.. तर एका लयीत श्वास घेतं गेलं आणि ती लय वाढवत नेली की "काहीतरी" वेगळं किमान वाटणारच.. तर लोक मग खाली पडतात.. त्यांना वाटत हीच अनुभुती आहे.. पण ती ३-४ थ्या दिवशी गायब होते..
आणि व्यायम तर निव्वळ बाळबोध.. ते त्या "टिचर" कडुन शिकण्यापेक्षा चांगल्या योगासने शिकवणार्‍या प्रशिक्षित व्यक्तीकडुन शिकावेत.
आणि "आयुष्य कसे व्यतित करावे" ह्या बद्दलचे मौलिक विचार चे.पु वर फिरत असतातच.. त्याहुन हे काही वेगळं सांगत नाहीत..

मला राग ह्याचा आहे की जर कुणाला खरच "आर्ट ऑफ लिव्हींग" समजलं असेल तर त्याने ते सांगावं.. ज्याला समजलय तो कसा भारी आहे हे कशाला पटवताय.. बर काही लय भारी पण रहस्य सांगत नाहीयेत की खरच तो माणुस ग्रेट वाटावा.. लोक मग त्याचा देव बनवुन टाकतात..मग त्याची पुजा अर्चा.. आणि "विचार" राहतो मागे..
हे विपश्यनेत होत नाही करण तिथे मी "गोयंका" ही वान किंवा फोटो काहीही पाहिलं नाही.. आपल्याला हे स्गलं कसं सुरु झालं, का, कुणी , कधी , कुठे.. आणि मग ते कसे भारि... अशी काहीही अनावश्यक माहिती मिळत नाही. ध्यान शिकायला आलात, ध्यान करा आणि जा...

कवितानागेश's picture

19 Jul 2013 - 2:04 pm | कवितानागेश

पटतय... हे शिकलेल्या लोकांकडून भरभरुन कौतुक ऐअकलय. पण त्यांच्यात कुठेतरी superiority complex दिसतो, हे सगळं शिकल्याबद्दल! त्यामुळे मी घाबरुन लाम्ब राहिलेय.
रामदेवबाबांच्या बाबतीत सहमत. व्यवस्थित शिकवतात आणि फुकट शिकवतात.

सामान्य वाचक's picture

19 Jul 2013 - 5:59 pm | सामान्य वाचक

मला विपश्यनेचा अनुभव नाही. पण घेण्याची इच्छा आहे

दहा दिवस सलग वेळ काढणे जमेल असे वाटले नाही, म्हणून आर्ट ऑफ लिविंग चा कोर्स केल. आणि कानाला खडा लावला.

काहीतरी साध्य करायचे आहे, म्हणून दिसेल तो मार्ग घ्यायचा नहि. त्याने फक्त वेळ आणि पैसे वाया जातात. वैचारिक गोंधळ होण्याची शक्यता असते, ती वेगळीच.

सस्नेह's picture

19 Jul 2013 - 2:10 pm | सस्नेह

आर्ट ऑफ लिव्हिंग हा ५ दिवसांचा कार्यक्रम मी अनुभवला आहे. वरती चित्रगुप्त, माऊ अन पिरा म्हणतात ते खरे आहे. त्यात अनावश्यक जाहिरातबाजी अन कारणआठवा तर्कविरहित शिकवणीचा भाग मोठा आहे. सुदर्शन क्रिया ही पूर्णपाने अनैसर्गिक प्रक्रिया आहे असे माझे मत झाले. कारण शरीराच्या इतर कोणत्याही अवयवाच्या हालचालीशिवाय श्वासांची गती कृत्रिम अत्यंत कमी वेळात अति वाढवणे अन तितक्याच गतीने कमी करत आणणे यामुळे फुफुसे व श्वसनसंस्थेवर अवाजवी ताण पडतो. त्यापेक्षा सावकाश धावण्यास सुरुवात करून गती वाढवणे व पुन्हा कमी करणे हे उत्तम.
तसेच प्राणायामाचे इतर सर्व प्रकार, अगदी कपालभातीसुद्धा सुदर्शन क्रियेपेक्षा सुरक्षित व लाभकारक आहे असे मत झाले. ध्यान या विषयातही फारसे परिणामकारक असे काही 'आर्ट..' मध्ये शिकवले जात नाही. मुळात ध्यान ही शिकवण्याची गोष्ट नसून करवून घेण्याची गोष्ट आहे.
मी सिद्ध समाधी योगसुद्धा अटेंड केला आहे. तो 'आर्ट..' पेक्षा जास्त स्वच्छ, निरपेक्ष व परिणामकारक वाटला.

पिलीयन रायडर's picture

19 Jul 2013 - 2:20 pm | पिलीयन रायडर

श्वासांच भरतनाट्यम करण्यापेक्षा नीट शास्त्रशुद्ध शिकुन घेणेच योग्य...

कवितानागेश's picture

19 Jul 2013 - 2:41 pm | कवितानागेश

सिद्ध समाधी योग कुठे कुठे शिकवतात? काही पत्ता, लिन्क असेल तर इथेच द्या.

सस्नेह's picture

19 Jul 2013 - 5:33 pm | सस्नेह

थोडी शोधाशोध करावी लागेल. त्यानंतर देते.
थोडक्यात माहिती.
१) वैज्ञानिक पद्धतीने ध्यान.
२) सरळ व निर्दोष विचारपद्धती आचरणे. सोदाहरण व प्रत्यक्षिकासह मार्गदर्शन.
३) जीवनशैली सहजपणे बदलता येण्यासाठी सोपी व प्रॅक्टिकल पद्धत.
४) रोजच्याच आहारात थोडा बदल करुन बनणारी अचूक अन समतोल आहार पद्धत.
५) शरीरिक क्षमतांना व मर्यादांना ओळखणे.
६) क्षमाशील व जीवनाभिमुख दृष्टीकोन.
आणखीही खूप काही शिकायला मिळाले. तेही अनावश्यक लेक्चरबाजी न देता.

सस्नेह's picture

21 Jul 2013 - 7:44 pm | सस्नेह

ऋषी प्रभाकर यांनी ऋषी संस्कृती विद्या केंद्र ही संस्था पस्तीस वर्षांपूर्वी स्थापन केली. या संस्थेद्वारे सिद्ध समाधी योग शिबिरांचे आयोजन करण्यात येते.
पुणे येथील काँटॅक्ट :
ऋषी प्रभाकर ऋषी संस्कृती विद्या केंद्र, पुणे
०२०-२५५३६१७, ८०८७७९२४९८

मी_आहे_ना's picture

19 Jul 2013 - 2:11 pm | मी_आहे_ना

कोणीतरी वर म्हणल्याप्रमाणे 'जगायचं कसं ह्याचा कोर्स'?? अहो, निवांत जगा, मजेत जगा, तुम्हाला आवडेल आणि (सहजा)इतरांना इजा होणार नाही असे जगा. (अर्थात 'नाठाळांचे माथी..' विसरू नकाच.) निसर्ग, ग्रंथ,(तुम्हाला आवडतील ते) आप्त-स्वकीय अश्या खूप चांगल्या गोष्टी आहेत आयुष्यात, ह्यांना वेळ द्या. ह्यातूनही जर राहिलाच वेळ तर ज्यांना तुमच्या वेळेची (पैश्यांची नव्हे) गरज आहे अश्यांना वेळ द्या. (अर्थात, हा आपला माझा फुकटचा सल्ला. कोणी कोणाला कसं जगायचं हे पैसे घेऊन शिकवायला तयार आहे म्हणजे तसे शिकणारेही आहेत म्हणूनच.)

मैत्र's picture

19 Jul 2013 - 5:05 pm | मैत्र

आर्ट ऑफ लिव्हिंगचा पार्ट १ कोर्स मी केला आहे आणि कोर्सच्या शेवटच्या दिवशी बंगलोर आश्रमात जाऊन श्री श्री समोर असताना इतर शेकडो जणांसह सुदर्शन क्रिया आणि ध्यान केले आहे.
चांगल्या बाबी :
१. श्वासोच्छवासाच्या पद्धतीमुळे खूप फ्रेश वाटते. ताजेतवाने वाटते. दिवसभरात एनर्जी चांगली राहते. - हा वैयक्तिक अनुभव आहे. श्वसनसंस्थेवर आणि फुफ्फुसांवर ताण येतो हे विधान जरा अतिशयोक्त आहे.
२. एक ध्यान आहे - https://www.youtube.com/watch?v=NEPzjZt2EGU
याची सीडी मिळाली होती. याचा अनुभव चांगला आहे. योगायोगाने मी रविशंकर स्वतः एक एक पायरी सांगत असताना ध्यान केले आहे. मी इतर कोणी बाबा / गुरु वगैरेंच्या मागे गेलो नाहीये किंवा कधी भजने केली नाहियेत त्यामुळे तुलनेसाठी माहिती नाही. पण अनुभव नक्कीच चांगला होता.
३. अवघड काहीच नाही. मला वज्रासनात बसता येत नव्हते. पण कोर्सचा आठवडा होईपर्यंत सवय झाली. पुढे महिना दोन महिन्यात पायाखाली उशी घेऊन सहज ४०-५० मिनिटे बसता येऊ लागले.
४. क्रियेने आणि कोर्सने मन शांत आणि प्रसन्न व्हायला मदत होते. त्यांचा आवाजही soothing आहे.
५. काही दुष्परिणाम नाहीत.

न पटलेल्या गोष्टी:
१. खूप बाळबोध प्रवचने.
२. श्री गुरुदेव आणि आर्ट ऑफ लिव्हिंग चा मारा करणे -- काहीसे प्रचारकी थाटाचे आणि कुठेही गळेपडू विक्री आली की मला अजिबात आवडत नाही.
३. एक दोन सीडीज वगळता बाकी त्यांचे संगीत / भजने / प्रवचने फार काही ग्रेट वाटली नाहीत.
४. आश्रम हा बराचसा असाच विकण्याचा बाजार वाटला.
५. पार्ट १ नंतरचे कोर्सेस बद्दल फार उत्सुकता वाटली नाही. परत आश्रमात आवर्जुन जावेसेही वाटले नाही.

आता परत कधी काही करावेसे वाटले तर स्वतः ती सिडी वापरून ध्यान करावे कधी क्रिया करावी असे वाटते. त्यापलिकडे खूपशी आवड वा अटॅचमेंट वाटली नाही. पण एक अनुभव म्हणून पार्ट १ करण्यात काहीही हरकत नाही. कदाचित आवडू शकते / उपयोग होऊ शकतो. फक्त या सगळ्याला आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणणे हेच जरा अतिशयोक्त आहे.

विपश्यनेबद्दल कुतूहल आहे. नात्यात / ओळखीत काही जणांनी केला आहे कोर्स अगदी थेट इगतपुरीला जाऊन. पण त्याला पूर्ण १० दिवस वेगळे काढायला पाहिजेत. त्यांचे इंग्रजीतले साहित्य आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अगदी उलट म्हणजे जड आणि शब्दबंबाळ वाटले. बहुतेकांचा अनुभव चांगला आहे. कधी १० दिवसांचा वेळ मिळाला तर अनुभव घ्यायची इच्छा आहे.

सिद्ध समाधी योग (SSY) कोर्स पुण्याजवळ मरकळा गाव इथे असतो पुण्याजवळ. तिथेही गुरुजींचे थोडे प्रस्थ आहे असे ऐकले आहे.

विजुभाऊ's picture

20 Jul 2013 - 12:10 am | विजुभाऊ

सिद्ध समाधी योग.
हे एक वेगळेच प्रकरण आहे. त्यातील आहार वगैरे तर अगदीच आयुर्वेदात सांगितल्याच्या विरुद्ध आहे.
त्याचे अनुयायी मात्र इतरांवर केवळ आपली मतेच नव्हे तर आहाराचा देखील मारा करतात.
एकदम बाळबोध विवारसरणी हा बहुतेक दोन्ही चा एक समान धागा असावा

आमची एक गांवढळ शंका : तुमच्या आवडीने आनंदी जगण्यासाठी पैशे खर्चुन कोर्स करायची वेळ का यावी याचा विचार न करता कुठेतरी ऐकुन अशा स्वघोषीत गुरुंच्या मागे का जायचं?

चांगलं चुंगलं खावं, फिरावं, छंद जोपासावेत, आनंदी लोकांशी मैत्रीने रहावं ते सोडुन जगणं शिकायला जायचं अन दुकानातला एखादा कोर्स नै आवडला तर पैसे गेले, वेळ गेला अन आपल्याला मुर्ख बनवलं याचंच दु:ख विकत घ्यायचं ते का?

अभ्या..'s picture

21 Jul 2013 - 2:25 am | अभ्या..

मग नायतर काय.
इथं मिपावर येताय ना मग कशाला पायजे कोर्स न फोर्स?
इथे सग्गळं मिळतं हो. :)

चौकटराजा's picture

21 Jul 2013 - 7:23 am | चौकटराजा

आदर्नीय नीलकांत महाराज की जय हो !
( मधुन मधुन मिपा देखील " मौन" पाळायला शिकले आहे ! )

चित्रगुप्त's picture

21 Jul 2013 - 11:08 am | चित्रगुप्त

@ शिल्पा ब :
....तुमच्या आवडीने आनंदी जगण्यासाठी पैशे खर्चुन कोर्स करायची वेळ का यावी याचा विचार न करता कुठेतरी ऐकुन अशा स्वघोषीत गुरुंच्या मागे का जायचं? ...
खरे आहे. माझ्यामते यात तीन प्रकारची कारणे असू शकतातः
१. आपल्यात काहीतरी उणीव आहे ही भावना, आणि अमूक गुरुकडून, अमूक पुस्तकातून, अमूक कोर्समधून त्यावरील उपाय सापडेल, ही आशा.
२. प्रचाराला बळी पडणे. विशेषतः आपल्या जवळच्या, स्नेहातल्या लोकांनी केलेल्या प्रचाराला.
३. कुणी सांगितले वा स्वतःत काही कमी आहे म्हणून नव्हे, तर जीवनाच्या, ज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याच्या अनेकविध प्रयत्नांपैकी हा एक प्रयत्न.
माझ्या बाबतीत बोलायचे, तर 'आर्ट ऑफ लिव्हिंग' मी सहकार्‍याच्या प्रचाराला बळी पडून केले, तर 'विपश्यना' तिसर्‍या प्रकारच्या जिज्ञासेतून.