गाभा:
गृह कर्जाविषयी सल्ला व माहिती हवी आहे
मित्र हो , मी पुण्यात सध्या घर ( Resale Flat , १३ वर्षे जुना ) घेण्याच्या विचारात आहे , त्या संदर्भात सल्ला / माहिती हवी आहे ..........
गृह कर्ज कोणते घ्यावे ......?.
जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?
जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?
ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...
धन्यवाद ........
प्रतिक्रिया
10 Jul 2013 - 2:17 pm | स्पा
बराच जिव्हाळ्याचा विषय आहे
सध्या आघाडीच्या ब्याकांमध्ये SBI, IDBI, HDFC, ICICIC या ब्यांका आहेत. व्याज दर पडताळून तसेच ब्यान्कांची कर्ज देण्याची क्षमता पाहून निवड करावी .
रिसेल घेताय म्हणजे साधारण ब्यांक ६५-७५% पर्यंत लोन देऊ शकेल . ( सगळी कागदपत्र असल्यासच )
फ्लोटिंग रेट : १०.१५ ते १०.५० पर्यंत आहेत
फिक्स रेट : ११ ते १२.५ % एवढं आहे .
रिसेल चे घर घेताय , तर आधी सोसायटीची कागदपत्रे पूर्ण आहेत कि नाहीत ते पहा .
OC/CC( occupation certificate/ completion certificate ) अत्यावश्यक. सोसायटीचे structurel audit ची कागदपत्रे , ती वेळेवर होतात कि नाही ते बघणे गरजेचे .
सध्या त्या जागेचे मालक असतील तर त्यांची आवश्यक ती कागदपत्रे, शिवाय maintenance च्या पावत्या , काही dues नाहीयेत न ते बघून घेणे.
इलेक्ट्रिक मीटर त्याच्याच नावावर आहे कि नाही ते बघणे ,
त्याची वीजबिल थकबाकी नाहीये न ते बघणे .
घर घेताना ब्यांकेला वरील कागदपत्रे द्यावी लागतात , शिवाय त्याने जेंव्हा हे घर घेतले तेंव्हा जी stamp duty भरलेली त्याची रीसिप्त लागेल .
सोसायटीचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक .
घर बघताना अगदी दरवाजा पासून सुरुवात करावी . भिंती नीट तपासून घ्यावात , कुठे काही लिकेज किंवा damage नाहीये न ते पाहून घ्यावे . सगळ्यात वरचा मजला असेल तर सिलिंग मधून गळती चा खूप मोठा धोका असतो.
संडास /बाथरूम तपासून बघणे/, इथेही बर्याचदा लिकेज असते . किचन मध्ये ओटा, त्याखालची जागा
घरातले वायरिंग , फ्लोरिंग . भाव ठरवताना या गोष्टी महत्वाच्या ठरतात . खोली कंडीशन मध्ये नसेल तर भाव खाली उतरवायचा बिनधास्त .
एकदा घराचे सगळे फायनल झाले कि कागदपत्रांची एक कॉपी ब्यांकेला पाठवून द्यावी , त्यावरून ब्यान्केचा एक माणूस घराचे परीक्षण करून जातो . मग ब्यांक किती % लोन द्यायचे हे ठरवते .
ब्यान्केकडून अपृवल आले कि घराचे करारपत्र करावे . त्याचाही एक कच्चा ड्राफ्ट ब्यांकेला द्यावा लागतो .
त्यात ब्यांक काही बदल सुचवू शकते , ते फायनल झाले कि अंतिम करारपत्र करावे .
यात सोसायटीला साधारण घराच्या एकूण रकमेच्या १% ट्रान्स्फर चार्गेस द्यावे लागतात . ती रक्कम चेकनेच द्यावी .
शक्यतो व्यवहार चेकनेच करावा .
टोकन कधीही नगद देऊ नये .
अजून आठवेल तसे मुद्दे नंतर टाकतोच
क्रमश: :)
11 Jul 2013 - 12:56 pm | कवितानागेश
महत्त्वाची कगद्पत्र म्हणजे अगदी जमिनीची कागदपत्र सुद्धा वकिलाकडून तपासून घ्या. त्याच बिल्डिन्गमधल्या कुणाचे लोन झालेले आहे का?, असल्यस कुठल्या बॅन्केचे, हे तपासुन पहा.
LIC, GIC यान्च्या भानगडीत पडू नका. HDFC, SBI, BOB, BOM ... अश्या बॅन्का बर्या.
तुमच्या आधी त्य घराचे व्यवहार झाले आहेत का? किती?
त्या सगळ्यांनी registration करुन stamp duty भरली आहे का हे पहा.
नसेल तर तुमच्या registrationच्या वेळेस तुम्ही अडकाल.
काही वेळेस फक्त MOU करुन लोक कॅशवर डील करुन मोकळे होतात. म्हणून ही कागदपत्रांची कालजी घ्यायची.
जमीन जर लीजवर घेउन सोसायटीनी बिल्डिन्ग बान्धली असेल तर ती लीज अजून किती वर्षे व्हॅलिड आहे तेही पहा.
10 Jul 2013 - 2:22 pm | देशपांडे विनायक
ज्या कोणाला मानत असाल त्याचे मनोमन स्मरण करा . त्याचे आशीर्वाद मागा .
ज्या व्यक्तीशी व्यवहार करत आहात ती व्यक्ती खरी - जनाची ,मनाची लाज बाळगणारी ,ज्या SPIRIT ने व्यवहार झाला ते SPIRIT मानणारी आणि तसेच वागणारी -आहे याची खात्री पटल्यावर व्यवहार करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घ्या .
जागेचा ताबा हा कळीचा मुद्दा आहे .
व्यवहार करताना दोघांचे हेतू प्रामाणिक असले तरच तो दोघांना सुखावह होतो
वर वर पाहता हा गृह कर्ज सल्ला वाटत नाही . पण मला वाटते मी योग्य सल्ला दिला आहे
10 Jul 2013 - 2:50 pm | कपिलमुनी
10 Jul 2013 - 6:43 pm | देशपांडे विनायक
कपिलमुनी '' ज्या कोणाला मानत असाल त्याचे मनोमन स्मरण करा . त्याचे आशीर्वाद मागा ''
असे पहिले वाक्य आहे . अनुभवातून आलेले आहे ,अनुभव नकारात्मक असल्याने फक्त सार
लिहिले ,
घर तर घ्यावे लागतेच पण माणूस वाईट भेटला की फार काळ घरघर लागते . खरा माणूस आशिर्वादाने ,पुण्याईने मिळणार . दुसरा मार्ग अजून मला दिसला नाही . तुम्हाला ?
10 Jul 2013 - 2:32 pm | प्रकाश घाटपांडे
मिपावरील घरघर या धाग्यात तुम्हाला हवी असलेली काही माहिती मिळेल.
10 Jul 2013 - 2:36 pm | मी_आहे_ना
१)गृह कर्ज कोणते घ्यावे - एसबीआय (सगळ्यात लवकर व्याजदर कमी करणारी म्हणून) (अर्थात घाई असेल तर एचडीएफसी-माझेही हेच आहे आणि कार्यपद्धती सोयीची आहे, आयसीआयसीआयचा फार वाईट अनुभव आहे,कागदपत्रे पूराच्या पाण्यात भिजली म्हणून सांगणे,दुसरी प्रत मिळवून देताना कटकट इ.) रिसेलसाठी साधारण ८०% पर्यंत मिळते.
२) कागदपत्रे - रिसेलच्या बाबतीत हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे, एखदा चांगला वकील गाठणेच चांगले. आधीची सर्व कागदपत्रे (बिल्डर कडून मूळ मालकाला देताना, सोसायटी बनताना इ. तसेच आधीचे सर्व मालमत्ता कर भरल्याच्या पावत्या) तपासणे तसेच नवीन 'टायटल-सर्च' बनवणे इ.साठी कायदेतज्ञ असणे चांगले
३) घराविषयी माहिती - ही बाब व्यक्तीसापेक्ष असते. मी पहिल्यांदा घेतलेलं घर सगळ्या बाजूनी (बजेट, लोकेशन, कन्वेयन्स,शांतता,लोकॅलिटी,दुकानांची उपलब्धता) उजवे असूनही फक्त त्याच्या दक्षिणमुखी असण्याने घेऊ नये असे सांगणारेही होते, पण सारासार विचार करून ते घेणेच मला फायद्याचेच ठरले. शिवाय मूळ ढाच्यात काही बदल केले असल्यास (जसे जास्ती पाणी साठवण्यासाठी केलेली टाकी गळत असल्यास इ.) त्याने काही बाकीचे प्रश्न उपस्थित राहत नाहीत ना, मालक घर का विकतायेत, पार्किंगचे काय इ. इ.
10 Jul 2013 - 2:43 pm | पिलीयन रायडर
आता कर्ज हा विषय निघालाच आहे तर मी पण एक प्रश्न (नाही..दोन..)विचारुन घेऊ का? (उगाच कशाला नवा धागा !! )
१. कर्ज SBI ला ट्रान्सफर करायला काय काय कागदपत्रे लागतात?
२. आता हा प्रश्न ग्रुहकर्जा बद्दल नाहीये.. तरीही..
माझ्या दिराला शैक्षणिक कर्ज हवे होते ८ लाख. पैकी माझ्या आणि नवर्याच्या पगाराची माहिती घेऊन HDFC ने ४ लाख कर्ज दिले. आणि पुढच्या वर्षी उरलेले ४ टॉप अप करुन देऊ म्हणे. आता १ महिना टाळाटाळ करुन त्यांनी आधी फोन केला की कर्ज मंजुर झाले आहे. आणि आठवड्याने म्हणाले की तो चुकीचा कॉल होता. कर्ज मंजुर होणार नाही. आता असे अर्धवट लोन दुसरी कोणतीही बँक मंजुर करायला तयार नाही. किंवा ट्रान्सफरही करायला तयार नाही. अशा परिस्थिती मध्ये काय करता येईल? आणि HDFC विरुद्ध ग्राहक मंचात जाऊन तक्रार करता येईल का?
सॉरी हा कुलकर्णी साहेब.. तुमच्या धाग्यावर घुसखोरी केली...
तुमचा व्यवहार मनासारखा होवो ही शुभेच्छा!! स्पा भाऊंनी सगळच लिहीलय.. मी अजुन काय लिहीणार.. !!
10 Jul 2013 - 2:57 pm | सौंदाळा
लोन अॅप्लिकेशन फोर्म.
१२/२४ पोस्ट डेटेड ब्लँक चेक
एस्.बी.आय च्या फॉर्मॅट मध्ये बिल्डरचे एन्.ओ.सी.
मागील वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न.
मागील ६ महिन्याच्या पगाराच्या पावत्या.
मागील १ वर्षाचे सॅलरी अकाउंट स्टेट्मेंट
एक अफेडेव्हिट (वकीलासाठी का काय लक्षात नाही.)
तुमच्या नावाचा चेक निघाला की आधीच्या बँकेकडुन मिळालेली सर्व ओरिजनल कागदपत्रे
हल्ली एस्.बी.आयची विमा पॉलिसी सुद्धा घ्यायला लावतात असे ऐकले आहे.
एस्.बी.आय मॅक्स गेन होम लोन खाते खुपच चांगले वाटले.
ही लिंक पाहा
11 Jul 2013 - 11:04 pm | जे.जे.
होम लोन स्किम तुमच्या गरजेप्रमाणे घ्या. प्रत्येक स्किम मध्ये काहि फायदे आहेत तर काहि उणिवा.
एस्.बी.आय मॅक्स गेन मध्ये तुम्हि होम लोन फोर-क्लोज करु शकत नाही आणि टेन्योर (टर्म) कमी होत नाही अस ऐकलय.
10 Jul 2013 - 2:53 pm | स्पा
१. मागील 3 महिन्याच्या पगाराच्या पावत्या
२. मागील एका वर्षाचे बँक स्टेटमेंट
3. total outstanding of loan with exsisting bank
४. NOC सध्याच्या ब्यांकेकडून
५. वयक्तिक ओळखपत्रे
10 Jul 2013 - 2:57 pm | पिलीयन रायडर
हे तर फारच सरळ सोपं दिसतय.. मग लोक असं का म्हणतात की SBI ला कागदपत्र फारच लागतात.
ह्यात मागील ३ वर्षांचे Form 16 लागत नाहीत का? कारण लोन मागितलं तेव्हा त्यांनी मागितले होते. पण माझ्या नोकरीला ३ वर्ष झाले नव्हते (अजुनही झालेले नाहीत)..
10 Jul 2013 - 2:59 pm | स्पा
माझ्यामते नवीन लोन देताना SBI जास्त झीकझिक करते
ट्रान्स्फर करताना नसावी
10 Jul 2013 - 3:01 pm | मैत्र
फ्लॅट घेऊन काही वर्षे झाली आहेत त्यामुळे आत्ताचे व्याजदर सांगू शकत नाही. वैयक्तिक चांगल्या आणि वाईट अनुभवाने दोन गोष्टी नक्कीच स्पष्ट आहेत --
१) एचडीएफसी - (बँक नव्हे - गृहकर्ज संस्था) हा जास्त चांगला पर्याय आहे. आयसीआयसीआय गळेपडू आहे. काही मित्रांचे तिथे कर्ज आहे आणि फार काही वाईट अनुभव नाही त्यांचा. पण मला तिथल्या एजंटचा अनुभव पटला नाही.
एचडीएफसी - जर कागदपत्रे व्यवस्थित असतील आणि तुमची कर्जपात्रतेची स्थिती आणि एकूण प्लॅन चांगला असेल तर खूप सहकार्य करतात. व्हॅल्युअर बर्यापैकी विश्वासार्ह आहेत असा दोनदा अनुभव आहे. नवा फ्लॅट घेताना बिल्डरने आगाऊ रक्कम मागितली तेव्हा मला भेटायला बोलावून मॅनेजरने कल्पना दिली की त्यांच्या साईट व्हिजिटप्रमाणे तेवढे बांधकाम झालेले नाही. बिल्डरने तगादा लावेपर्यंत दिले नाहीत तर तो एचडीएफसीला दडपण आणून घेऊ शकत नाही.
पण व्याजदर नजीकच्या भविष्यात वाढू शकतात तेव्हा आत्ता उचल (disbursement) घ्या. (माझे फिक्स्ड रेटचे कर्ज होते). त्याचा मला नंतर फायदा झाला. उरलेली रक्कम उचलेपर्यंत .७५ ते १ टक्का दर वाढला होता.
तीन दिवसात मंजूरी आणि एका आठवड्यात पहिला चेक मिळाला होता. -- पण हे नवे घर होते रिसेल नव्हे. त्यामुळे बर्याच गोष्टी सोप्या होतात. रिसेलचा इथला अनुभव नाही. त्यानंतर आजवरचा कर्जफेड चालू असतानाचा अनुभव जसे टॅक्स डॉक्युमेंट, त्याच मालमत्तेवर सेकंड चार्ज मॉर्टगेज साठी मंजूरी अशा गोष्टींमध्ये अनुभव चांगला आहे.
२) दोन वेळा रिसेल फ्लॅट घेताना फसगत झाली. अतिशय विश्वासार्ह व्यक्तीचा फ्लॅट असूनही, आगाऊ रक्कम दिल्यावर सोसायटीने अडचणी आणल्या, कागदपत्रे दिली नाहीत, जास्त पैसे मागितले ट्रान्स्फर साठी, बँकेला हवी असलेली कागदपत्रे द्यायला नकार दिला. एका ठिकाणी अतिशय उर्मट / उद्धट अनुभवही आला सोसायटीकडून.
एनओसी मिळवणे, शेअर सर्टिफिकेट (सोसायटी मेंबर शेअर) किंवा तत्सम गोष्टींमध्ये अडवणूक झाली आणि त्यामुळे कर्जमंजूरी न झाल्यामुळे पूर्ण व्यवहार बारगळला. विकणार्या वयस्क आणि प्रतिष्ठीत गृहस्थांना अतिशय अवघडल्यासारखे काहिसे गिल्टी वाटावे असा व्यवहार झाला. त्यांनी सर्व आगाऊ रक्कम एकहाती परत करून त्यांच्या वयाचा / मानाचा विचार न करता एकूण यातायात आणि त्रासाबद्दल माफी मागितली.
पण सोसायटिने अजिबात सहकार्य केले नाही.
जर रजिस्टर्ड सोसायटी नसेल - नुसते अपार्ट्मेंट रजिस्ट्रेशन असेल तर इतका त्रास होत नाही कारण त्यांचे अधिकार मर्यादित असतात. चांगल्या पद्धतीने बोलणी करून अपार्ट्मेंटसाठी अंतर्गत नियमांप्रमाणे काही सिंक फंड मध्ये रक्कम देऊन अथवा न देताही व्यवहार सहज होऊ शकतो. इतकी अडवणूक करता येऊ शकत नाही.
10 Jul 2013 - 4:34 pm | पिलीयन रायडर
अजुन एक.. अजुन एक...HDFC कडुन
मी २०१२ मार्च मध्ये कर्ज घेतलं - १०.६५ आज व्याजदर आहे..
मैत्रिणीने मार्च २०१३ मध्ये कर्ज घेतलं - १०.४० व्याजदर आहे..
असं असु शकतं का?
10 Jul 2013 - 5:04 pm | पैसा
कर्जाची मुदत, रक्कम आणि काही विशिष्ट कालावधीत एखाद्या स्कीममधे मंजूर कर्ज, शिवाय ते फिक्स्ड व्याजदर आहे की बदलता यावर वेगले दर असू शकतात.
12 Jul 2013 - 8:58 am | ब़जरबट्टू
HDFC मध्ये या बाबतित मार्जिन आहे. म्हणजे प्रत्येक ग्राहकास कर्ज घेतले त्या वेळेचे मार्जिन लागते. सध्या वाटते ६.२५ % सुरु आहे. त्यानुसार सध्या HDFC चा Retail Prime Lending Rate (RPLR) आहे 16.40% वजा ६.२५ म्हणजे व्याज दर १०.१५ % सुरु आहे. तुम्हाला चालु असलेल्या लोनवर मार्जिन वाढवता येते, अर्थात त्याला फी आहेच..
10 Jul 2013 - 5:03 pm | स्पा
हो , त्यालाच फ्लोटिंग रेट असे म्हणतात
RBI च्या धोरणांनुसार त्यात बदल होत असतात
10 Jul 2013 - 5:58 pm | पिलीयन रायडर
तिचे आणि माझे फ्लोटिंगच रेट्स आहेत. मग ते सर्वांसाठी सारखे नसतात का?
10 Jul 2013 - 6:05 pm | पैसा
वेगवेगळ्या वेळी घेतलेली कर्जे वेगळ्या दरांची असू शकतात.
10 Jul 2013 - 5:36 pm | सुखी
SBI बँकेकडून मी रीसेल साठी २ वेळा (२ स्वतंत्रा सदनिकासाठी) घेतले आहे.
गवर्नमेंट बॅंक असल्यामुळे,
१. कर्ज फेड करताना चुकुन एखादा हफ्ता भरवयाचा राहिल्यास फारसा त्रास होत नाही.
२. आगाउ कर्ज फेडिस कोणताही दंड नाही
३. कर्ज ज्या सदनिकेसाठी घेत आहात त्याची बँकेकडून स्वतन्त्र चौकशी होते. (या मुळे आपल्याला सदनिकेच्या व्यवहारात फसवले जाण्याची शक्यता कमी होते)
४. वेळ ३ ते ४ महिने लागतो. जर तेवढा चिवटपणा असेल तर SBI सारखी दूसरी चांगली बॅंक नाही.
५. बॅंक सदनिकेसाठी प्रॉपर्टी इन्षुरेन्स व पर्सनल इन्षुरेन्स करते, त्या घेताना थोड्याश्या डोळसपणे घ्याव्यात.
६. व्याज दर च्या गाइड्लाइन्स वरच ठरवलेला असतो.
७. प्राइवेट बॅंक थोडासा जास्त दर आकारतात पण प्रोसेसिंग टाइम खूप कमी घेतात.
अधिक माहिती साठी व्यनी करा. :)
नवीन (तुमच्यासाठी) घरासाठी आगाउ शुभेच्छा.
12 Jul 2013 - 10:38 am | आदूबाळ
अगदी सेम अनुभव "महाराष्ट्र बँक" (जिव्हाळ्याची) यांचा आहे. कर्ज मंजूर करताना थोडे "लकीर के फकीर" असल्यासारखे वागतात, पण नंतर ते मवाळतात. इन्शुरन्स, मोरॅटोरियम अशा गोष्टी ते न विचारता देतात. या वेगळ्या विकल्या जातात याचं भान त्यांना नसावं.
एक लक्षात घेतलं पाहिजे - गृहकर्ज हा आपल्या घरात पंधरा-वीस वर्षं नांदणारा सभासद आहे. कर्ज घेताना कितीही कटकट झाली तरी चालेल, पण एकदा घेतलं की सगळी घडी नीट बसली पाहिजे. गृहकर्जासाठी वर्षातून एकदाच ब्यांकेत जावं लागलं पाहिजे - आयकरासाठी स्टेटमेंट आणायला.
10 Jul 2013 - 8:09 pm | मोदक
गृह कर्ज कोणते घ्यावे ......?
खूप वेळ आणि पेशन्स असतील तर स्टेट बँक ऑफ इंडीया, बँक ऑफ महाराष्ट्र किंवा कोणतीही नॅशनलाईज्ड बँक. पण हे लोक लोन एलिजिबलिटी कमी काढतात. मग अगदीच वरील प्रकाराबाहेरच्या बँका ट्राय करणार असलात तर आयडीबीआय. एलआयसी हाऊसिंग वगैरे वगैरे.
ICICI व HDFC बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. लोकांना वाईट अनुभव आलेले असतीलही मात्र तुम्हाला तसा अनुभव येईलच असे गृहीत धरू नका. (हा थोडा विवादास्पद मुद्दा आहे - यावर इतकेच!)
जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?
स्पावड्याचे उत्तर पहा.
तसेच - वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात द्या. साधारणपणे ८ ते १२ हजार रूपये खर्च येतो पण नंतर डोक्याला त्रास नसतो (असे माझ्या वकीलाने सांगीतले आणि मी ते फॉलो केले)
जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?
बाहेरच्या दरवाज्यापासून पाहणी सुरू करा..
फरशी कशी आहे..?
स्कर्टींग ठीक आहे का..?
भिंतीचा रंग (शक्यतो रंग देवून घ्या- रंगाची निवड आवड आणि उपयुक्तता यांनुसार ठरवा.)
वायरींग कसे आहे? कन्सील्ड आहे की बाहेरूनच आहे? बदल करावयाचे असल्यास कितपत शक्य आहे? उदा - तुम्हाला एकाच ठिकाणी दोन तीन मोठी उपकरणे चालू करणार असल्यास जास्त क्षमतेची वायर व मोठा प्लग लागतो. त्याची सोय आहे का ते पहा.
छताला कोठे लिकेज वगैरे आहे का ते पहा.
खिडक्या कशा आहेत..? खूप मोठ्या / खूप लहान आहेत का..? त्यांना भक्कम जाळ्या आहेत का..? डास / माशा येवू नयेत म्हणून एक छोटी जाळीवाले खिडकीचे दार असते, ते दार आहे का..?
हव्या त्या ठिकाणी सेफ्टी डोअर / ग्रिल आहे का..? सर्व साधारणपणे ग्रिल २४०-३०० रू स्क्वेअर फूट असते. एखाद्या ठिकाणी ग्रिल करून घेणार असल्यास ८ ते १० हजारांपर्यंत खर्च जातो. सेफ्टी डोअर १२ ते १५ हजार रू.
किचन ट्रॉली आहेत का..? असल्यास कशा परिस्थितीमध्ये आहेत? नवीन करावयाच्या असल्यास येणारा खर्च ३.५ ते ४.५ हजार रूपये रनींग फूट असतो. (स्टील / पावडर कोटींग मटेरीयल, हायड्रॉलीक चॅनेल, दरवाज्याच्या लाकडाचा प्रकार यांनुसार दर बदलतो.)
*घराची आधिची वास्तुशांत झाली असल्यास आधिच्या मालकाला वास्तुपुरूषाची प्रतिमा सोबत नेण्याचा आग्रह करा. त्याने न मानल्यास त्या वास्तुपुरूषाचे यथोचित विसर्जन करा.
*घराचा ट्रॅक रेकॉर्ड. आधीचा मालक ते घर का सोडतोय..? नक्की का विकतोय..? शेजारी पाजारी लोकांकडून माहिती घ्या.
*तुमच्या भावनांचा पूर्णपणे आदर ठेवून एक सुचवतो - त्या घराकडे "वास्तू" या दृष्टीनेही एकदा पहा. कलहाचा इतिहास असल्यास, अन्य कोणत्या भावनेने घरमालक घर विकत असल्यास पुन्हा एकदा विचार करा.
ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...
आणखी काही शंका असल्यास येथे विचारल्यास / व्यनी केलात तरी चालेल.
***वरील तारा़ंकित मुद्दे व्यक्तीसापेक्ष बदलू शकतात - उपयुक्तता आणि अवलंब आपापल्या विचारधारेनुसार करावा.
11 Jul 2013 - 11:40 am | झकासराव
सर्व साधारणपणे ग्रिल २४०-३०० रू स्क्वेअर फूट असते.>>> एम एस मधलं पेन्टेड इतकं महाग नाहिये रे मोदका.
८०-१२० रु च्या रेन्ज मध्ये आहे.
11 Jul 2013 - 10:34 pm | मोदक
बरोबर. पण मला कोलॅप्सेबल ग्रिल म्हणायचे आहे. ;-)
11 Jul 2013 - 9:29 am | चंबु गबाळे
भरपूर माहिती मिळाली... धन्यवाद :)
11 Jul 2013 - 11:50 am | संजय क्षीरसागर
>जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?
= फक्त एकच गोष्ट - घरात गेल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं का ते पाहा! घरात स्वच्छ प्रकाश, खेळती हवा आणि पाण्याची विनासायास उपलब्धता अत्यावश्यक.
>गृह कर्ज कोणते घ्यावे ......?.
= तुमच्या सध्याच्या बँकेकडून कर्ज घेणं सर्वात सोपं.
>जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?
= फक्त दोन गोष्टी : इंडेक्स टू विथ लास्ट प्रॉपर्टी टॅक्स बील आणि सोसायटीचं एनोसी
> ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...
= तीन गोष्टी :
घरात कोणताही स्ट्रक्चरल चेंज करू नका
शेजारी चांगले असतील तर तुम्ही लकी ठराल
पत्नी घराच्या निर्णयाशी संपूर्ण सहमत असेल तर यू आर डन!
11 Jul 2013 - 11:55 am | संजय क्षीरसागर
>जुने घर घेताना त्या घराविषयी कोणत्या गोष्टींची माहिती घ्यावी .........?
= फक्त एकच गोष्ट - घरात गेल्यावर शांत आणि प्रसन्न वाटतं का ते पाहा! घरात स्वच्छ प्रकाश, खेळती हवा आणि पाण्याची विनासायास उपलब्धता अत्यावश्यक.
>गृह कर्ज कोणते घ्यावे ......?.
= तुमच्या सध्याच्या बँकेकडून कर्ज घेणं सर्वात सोपं.
>जुन्या घराविषयी कागदपत्रे कोणती तपासून घ्यावीत .........?
= फक्त दोन गोष्टी : इंडेक्स टू विथ लास्ट प्रॉपर्टी टॅक्स बील आणि सोसायटीचं एनोसी
> ह्या व्यतिरिक्त आणखी माहिती आपणा जवळ असल्यास कृपया शेअर करा ...
= तीन गोष्टी :
घरात कोणताही स्ट्रक्चरल चेंज करू नका
शेजारी चांगले असतील तर तुम्ही लकी ठराल
पत्नी घराच्या निर्णयाशी संपूर्ण सहमत असेल तर यू आर डन!
11 Jul 2013 - 1:58 pm | मन१
बरेच अनुभव ताजे आहेत.
व्य नि पहाणे.
11 Jul 2013 - 5:16 pm | चौकटराजा
धागा गृहकर्जाचा आहे. घराचा नाही. तरीही प्रथेप्रमाणे तो भरकटत चालला आहे. असो. मी ही मग तो धागा यथाशक्ती भरकटवू म्हणतो-
चल शू हो जा चौ रा-- खरे वास्तू शास्त्र - येणारी हवा, पाणी पुरवठा. डेनेज, उजेड. लीकेज, फरशीचा गारपणा, जिन्याच्या
पायर्या (ट्रेड व रायझर) एकूण चढायला लागणार्या पायर्या, गाळ्या अंतर्गत व बाहेरच्या पासून तुम्हाला मिळणारी प्रायव्हसी, इतर ईमारती पासून येणारा परावर्तित प्रकाश , खिडक्यात वापरलेल्या फ्रेम्स प्रकार. संरक्षक जाळ्या फ्रंटेज, कॉर्नर विचार ईईईई.......
मानसिक समाधान मुद्दे- तुमचीच मायभाषा असलेला शेजार, त्याची सहकारी वृत्ती, धर्म, सोसायटीची संस्कृति , सोसायटी कडे असलेली शिलल्ल्क, कॉमन एरियाची निगा.
वरील प्रत्येक मुदद्द्याला बेरीज व वजा मार्क द्या. लिफ्ट नसल्यास खालच्या मजल्याला जास्त मूल्या द्या.
जाउदे थांबतो आता मंड़ळी !!
जाता जाता वास्तू चा विचार करताना-- उत्तर अधगोल व दक्षिण अर्धगोल याचा विचार करा.कारण त्यानुसार सावली व उन्हाचा खेळ चालतो. हे पूर्व दिशेला मुख्य दरवाजा असावा उत्तर दिशेला धान्याची कोठी असावी असले भंपक वास्तू शास्त्र आजमावूच नये. निसर्गात दिशा वगैरे काही नसते. को ओर्डीनेट जिओमेट्री हा माणसाचा सोयीचा शोध आहे. वास्तू निसर्गाचा भाग आहे.
11 Jul 2013 - 6:56 pm | उपास
बरेच मुद्दे आले आहेतच पण एक अतिशय महत्त्वाचं. घर नवं असो की जुनं, गृह कर्ज घेताना आयुर्विमा जोडलेला असायलाच हवा. घरावर कर्ज घेतलेल्या माणसाच्या अकाली मृत्युच्या दु:खातून बाहेर पडतानाच केवळ विमा नसल्याने घरातील सगळे रस्त्यावर आल्याच्या घटना पाहाण्यात आहेत. तस्मात, ह्या रिस्क मॅनेजमेंटचा विचार हवाच हवा.