गाभा:
खुप दिवसापासुन मराठी इतिहासाचा पुर्ण फडशा पाडावा असा ईच्चार सुरु आहे. रणजित देसाईच्या "श्रीमान योगी "ने सुरुवात केली. नंतर सावंतांचे "छावा " पण वाचुन झालेय. "स्वामी" "द्रोहपर्व" पण वाचलेत. पण शिवशाहीतुन थेट पेशवाईत उडी घेतल्यासारखे वाटले . आम्हा मधला इतिहास अजून अन्धारमय आहे. मधल्या खुप दुवा तुटल्यासारखा वाटताहेत.
कुणी वाचनाचा योग्य क्रम व त्यानूसार पुस्तके सांगू शकेल का ? कुपया योग्य लेखक सांगा हो…म्हणजे बघा जी वातावरण निर्मिती श्रीमान योगी वाचतांना होते, ती द्रोहपर्व वाचतांना वाटली नाही. थोडे धडे वाचत असल्यासारखे वाटले ते…
प्रतिक्रिया
27 Jun 2013 - 11:20 am | प्रचेतस
कादंबरी वाचत इतिहासाचा मागोवा, कमाल आहे बुवा.
27 Jun 2013 - 11:39 am | बॅटमॅन
+१११११११११११११११११.
27 Jun 2013 - 11:41 am | ब़जरबट्टू
मंग अजून कसा घ्यायचा राव ? कादंबरी वाचुन काही तरी समजेल, का एकता कपूर ची जोधा अकबर पाहू म्हणता. ईव्हढा स्टायलीस इतिहास ?? नकू
27 Jun 2013 - 11:50 am | सौंदाळा
ऐतिहासीक कादंबरी ( अचूक इतिहास वाचण्याची अपेक्षा नसेल तर) खालील क्रमानुसार वाचल्यास व्यवस्थित संगती लागेल असे वाटते: (जाणकार अधिक भर घालतीलच)
शहेनशहा (औरंगजेब)
श्रीमान योगी (छत्रपती शिवाजी)
छावा (छत्रपती संभाजी)
पुनश्च हरी ओम् (बाळाजी विश्वनाथ) लेखकः कॅ. वासुदेव बेलवलकर (इतिहास थोडा, कल्पना जास्त)
राऊ (पहिले बाजीराव)
पानिपत
स्वामी (माधवराव पेशवे)
शिकस्त (शिकस्त सदशिवराव भाऊंवर असुन कादंबरीचा आवाका पानिपत युद्ध, माधवराव म्रुत्यु, नारायणराव पेश्व्याचा खुन, सवाई माधवराव जन्म इतका आहे.)
शर्थीने राज्य राखिले (बारभाई कारस्थान, नाना फडणीसांची मुत्सद्देगिरी सवाई माधवराव जन्म-म्रुत्यु, यातही इतिहास थोडा, कल्पना जास्त)
मंत्रावेगळा (दुसरा बाजीराव) (केवळ कादंबरी, इतिहास अत्यंत कमी)
याखेरीज झेप, झुंज वगैरे अनेक कादंबर्या आहेत.
या विषयांवर रोचक भाषेत आणि भरपुर इतिहास सांगणार्या कादंबर्या कोणाला माहिती असतील तर क्रुपया सांगावे.
27 Jun 2013 - 12:25 pm | ब़जरबट्टू
धन्यवाद !
या विषयांवर रोचक भाषेत आणि भरपुर इतिहास सांगणार्या कादंबर्या कोणाला माहिती असतील तर क्रुपया सांगावे.
हेच म्हणतो...
27 Jun 2013 - 3:38 pm | लॉरी टांगटूंगकर
शहेनशहा (औरंगजेब)
श्रीमान योगी (छत्रपती शिवाजी)
छावा (छत्रपती संभाजी)
पुनश्च हरी ओम् (बाळाजी विश्वनाथ) लेखकः कॅ. वासुदेव बेलवलकर (इतिहास थोडा, कल्पना जास्त)
राऊ (पहिले बाजीराव)
पानिपत
स्वामी (माधवराव पेशवे)
शिकस्त (शिकस्त सदशिवराव भाऊंवर असुन कादंबरीचा आवाका पानिपत युद्ध, माधवराव म्रुत्यु, नारायणराव पेश्व्याचा खुन, सवाई माधवराव जन्म इतका आहे.)
शर्थीने राज्य राखिले (बारभाई कारस्थान, नाना फडणीसांची मुत्सद्देगिरी सवाई माधवराव जन्म-म्रुत्यु, यातही इतिहास थोडा, कल्पना जास्त)
मंत्रावेगळा (दुसरा बाजीराव) (केवळ कादंबरी, इतिहास अत्यंत कमी)
झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, राजेश्री, शिकस्त, शहेनशहा या सगळ्या ना सं इनामदारांच्या कादंबर्या आहेत. इतिहास कमी असला तरी वाचायला मजा येण्याइतपत रोचक नक्कीच आहेत. मंत्रावेगळा, शहेनशहा वगैरे वेगळा विचार करायला लावतात. पुनश्च हरी ओम् आणि अजून कोणती तरी कॅ. बेलवलकरांची वाचली होती. मोठ्ठे ठोकळे एक तर लै कॉस्ट्ली होते आणि नुसती वर्णने... कंटेंट खूप कमी. या विषयातल्या चांगल्या एडिटरनं कादंबरी आर्धी करून ठेवली असती.
कादंबरी मधून इतिहास मिळणे किंबहुना अशी अपेक्षा ठेवणेच चुकीचे आहे. एक ऐतिहासिक प्लॉट समोर ठेवून केलेलं कल्पनारंजन बऱ्याचदा कादंबरीतून दिसते. अन् या कादंबऱ्या एकच बाजू अर्धवट मांडतात. उदा. पानिपतमध्येच म्हणलं तर त्या आधीच्या दहा वर्षात राजपुतान्यात झालेल्या घडामोडी, बंगाल आणि माळवाप्रांतातील राजकारणे, नागपूरकर भोसले बरोबरचे वांधे, निजाम, कर्नाटककडे हैदरने केलेले लोचे या सगळ्या (आणि अजून बऱ्याच) गोष्टी परिणाम करतात त्या कादंबरी मध्ये आलेल्या नाहीयेत.
मराठा रियासत वाचा. उत्तम आहेत पण भाषा थोडी जड आहे. समग्र सेतू माधव पगडी पुनः प्रकाशित करण्यात आले होते ते मिळाल्यास बघा. मराठ्यांचा इतिहास खंड ( संपादक :- अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खरे) लै लै माहिती मिळेल. ग्रांट डफ, एलफिन्सटन, मेल्सोन जालावर संपूर्ण आणि चकटफू उपलब्ध आहेत. अजून उत्साह असला तर पेशवे दफ्तरातील रुमाल पण जालावर कुठंतरी उपलब्ध केले आहेत असं एका मुलखतीत पहिलं होतं. बाकी तज्ञ लोक्स सांगतीलच.
म्हणताय त्या प्रमाणे लौकरात लौकर फडशा पाडावा !! अन् काहीतरी झकास लिहावे. बऱ्याच गोष्टीन् वर काहीच लिहिलं गेलेलं नाहीये.
वल्ल्या, बॅट्या, मालोजीराव, लेकांनु कसं करायचं नीट सांगा की. सांगितल्याशिवाय कसं कळायचं ?? नॉन पुणेकर्सना इतिहास संशोधक मंडळ कसं भेटणार ?
30 Jun 2013 - 11:23 pm | प्यारे१
>>>वल्ल्या, बॅट्या, मालोजीराव, लेकांनु कसं करायचं नीट सांगा की. सांगितल्याशिवाय कसं कळायचं ?? नॉन पुणेकर्सना इतिहास संशोधक मंडळ कसं भेटणार ?
त्यालाच एकाधिकारशाही असा विंग्रजी नि मोनोपॉली असा मर्हाटी शब्द आहे. ;)
ह. घ्या. रे पोरांनो नायतर बॅटॅ तोंडाने संस्कृत श्या (तो तसा अहिंसक आहे) , वल्ल्या एका हातात गदा नि दुसर्या हातात दगड फोडायचा घण (हा महाभारत्कालीन नि सातवाहन्कालीन असा दोन्ही आहे), मालोजीराव दोन्ही हातात दांडपट्टे फिरवत (मीच तो मीच तो) अंगावर यायचे. ;)
27 Jun 2013 - 4:32 pm | राही
कर्नल मनोहर माळगांवकरांनी कान्होजी आंगरेवर इंग्रजीत लिहिलेल्या कादंबरीचा पु.ल.देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवादही मनोरंजक आहे. जमल्यास मूळ पुस्तक मिळवून वाचावे. गेल्या वर्षीपर्यंत ते दुकानात मिळत नव्हते. ग्रंथालयात सापडेल. श्रीनिवास सामंत यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आठवत नाही. ते वरील यादीत आले आहे काय? गजानन मेहेंदळे यांनी सिद्ध केलेले शिवचरित्र संग्रही ठेवावे असे आहे.
27 Jun 2013 - 4:46 pm | राही
लिलिअनची बखर ही इतिहासाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कादंबरी वाचनीय आहे. लेखक मला वाटते अनंत सामंत असावेत.
27 Jun 2013 - 5:27 pm | रंगोजी
शिवाजी महाराजांवरील पुस्तकांमध्ये आवडणारी-
१) राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे
२) कादंबरीमय शिवकाल - गो नी दांडेकर
शिवाय नाथ माधवांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संचही आहे.
पण खरोखर अभ्यास करायचा असेल तर सरदेसाईंच्या रियासतीला पर्याय नाही.
पेशवाई काळावर उपहासात्मक टीका करणारे 'अंताजीची बखर' हे ही उत्तम.
30 Jun 2013 - 9:33 pm | रमेश आठवले
भाउसाहेबांची बखर
http://www.sahyadribooks.org/books/BhausahebanchiBakhar.aspx?bid=193
नाना फडणवीस यांचे आत्मचरित्र इंग्लिश भाषांतर
http://books.google.co.in/books?id=KYLpvaKJIMEC&pg=PA378&lpg=PA378&dq=na...फाल्से
30 Jun 2013 - 10:11 pm | उद्दाम
हायला, इतिहास समजून घ्यायला कादंबर्या वाचायच्या!
मंग रामायण, म्हाभारत, गीता समजून घ्यायला बी आर चोप्रा आणि रामानंद सागर यान्ना गुरु करणार का :)
1 Jul 2013 - 8:12 am | ब़जरबट्टू
वल्ली यांनी पहिल्यांदा टोला हाणला, तेव्हा तरी मला यामधील खोच लक्षात आली नव्हती. पण सौंदाळा यांचे उत्तर बघितल्यावर बोध झाला. कदाचित कादम्बरीमधून खरा ईतिहास माहित करणे कठिण असेल, म्हणजे रंजकता नक्किच असेल त्यात, पण त्याशिवाय पुढे नक्की खरे काय आहे हे माहित करायचा किडा कसा जन्म घेनार… ? काही तर समजेल ना राव. मग बघूया, अजून वाचायला काय जातय.
आणि उद्दामराव नक्किच, मला तरी वाटते लहानपणी बी आर चोप्रा आणि रामानंद सागरच ग्रेट होते बघा आपल्यासाठी :) तेव्हा तर देवघरात अगरबत्ती लावून त्या सिरियल बघणारे पाहिलेत. तुम्ही डायरेक्ट संस्कृत गीता वाचली का काय ?