डलहौसी
डलहौसी
साच पास जवळून
साच पास जवळून
छतराडी देवीच्या वाटेवर
भारमौर ला जातांना....
भारमौर ला जातांना....
भारमौर
भरमाणी देवी चा रस्ता (भारमौर)
भारमौर गाव भरमाणी देवीवरून.
हडसर ला जातांना
क्रुपया जास्त लिहायला सांगू नका........:)
राघव पण बरोबर होता....उरलेले त्याने लिहावे......
प्रतिक्रिया
21 Jun 2013 - 9:59 am | लाल टोपी
फोटो अप्रतिम आहेत. निसर्गाचे लोभस आणि रौर्द दोन्ही रुपे पहायला मिळाली.
फोटो मात्र मिपाच्या हक्काच्या जागेत अतिक्रमण करीत आहेत
21 Jun 2013 - 10:11 am | किल्लेदार
म्हंजे काय बुवा ?
21 Jun 2013 - 10:14 am | यशोधरा
सुरेख फोटो. निदान कोणता ट्रेक केलात, किती दिवस, मार्ग कोणता हे तरी लिहा.
21 Jun 2013 - 10:37 am | चित्रगुप्त
छानच आहेत सर्व फोटो.
'मिपाच्या हक्काच्या जागेत अतिक्रमण' म्हणजे फोटोंची रुंदी जास्त ठेवल्यामुळे ते उजवीकडील मिपाच्या 'मिसळपाववर स्वागत' पासून 'भाषा बदला' पर्यंतच्या कॉलम वर ओव्हरलॅप होत आहेत.
हे टाळण्यासाठी फोटो चढवताना त्यांची रुंदी साधारणतः ६५० पिक्सल पर्यंतच ठेवावी. उंची आपोआप येइल.
21 Jun 2013 - 10:55 am | चित्रगुप्त
६५० पिक्सल रुंदी ठेवल्यावर फोटो असा दिसेलः
21 Jun 2013 - 11:22 am | इनिगोय
फोटो सुरेख आलेत!
हिमालयात गेले असताना एकदा दिवसभराचा प्रवास होता. त्या दिवशी कॅमेऱ्याचं बटण दाबत बर्फाचे, दऱ्यांचे, नद्यांचे, झऱ्यांचे, डोंगराचे, ढगांचे, झाडांचे, फुलांचे, पुलांचे, रस्त्यांचे, खडकांचे, माणसांचे, शेतांचे, घरांचे... फोटो काढत राहिले होते, त्याची आठवण आली. तेव्हाही असंच बोलावसं वाटत नव्हतं काही.
23 Jun 2013 - 7:07 pm | चौकटराजा
मनाली ते डलहौसी व्हाया मंडी पालनपूर धर्मशाला असणार बहुदा !!
21 Jun 2013 - 10:55 pm | पैसा
जरा वर्णनात्मक काही लिहायचं होतं, फोटोची गोडी अजून वाढली असती!
22 Jun 2013 - 6:21 pm | सुहास झेले
यप्प... अगदी ह्येच बोलतो... :) :)
फोटो आवडले हेवेसांनल... :)
22 Jun 2013 - 12:30 am | संजय क्षीरसागर
तुमच्या रसिकतेला दाद देतो.
22 Jun 2013 - 12:40 am | श्रीरंग_जोशी
छायाचित्रे आवडली. टंकाळा समजू शकतो पण ती कसर सविस्तर प्रतिसादाद्वारे भरून काढावी ही विनंती.
22 Jun 2013 - 4:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
डलहौसी आणि भारमौर ची चित्रे फारच सुंदर आहेत ! मात्र ती सोडून इतर चित्रे दिसत नाहीत.
22 Jun 2013 - 7:21 pm | कंजूस
फोटो झकास आणि स्पष्ट .कैनन एस ९५ ?कोणतातरी मोठा सेंसर असणारा अथवा लो लाईट घेणारा वाटतोय .डलहौसी ,खज्जीयार ,चंबा ,कांग्रा पेक्षा शिमला कुलु मनाली कडे जाणारे फार असतात .फार ललित नाही तरी थोडक्यात कसे गेलात आणि किती दिवस काय पाहिले एवढे जरूर लिहा .
23 Jun 2013 - 11:33 pm | किल्लेदार
कॅमेरा-- कॅनन ४५० डी. १८-५५ लेन्स आणि सीपीएल फिल्टर.
23 Jun 2013 - 7:14 pm | चौकटराजा
आपले फोटो नेहमीच मस्त येतात. आपल्यामुळे येथील छांदिष्टाना फिल्टरचे महत्व कळेल. पण राव फटू आणखी टाका की ! खजियारला गेला की नाही ?
23 Jun 2013 - 11:25 pm | किल्लेदार
खज्जीयार मधे बघण्यासारखे काहीच वाटले नाही... :(.
प्रवासमार्ग खालील-प्रमाणे...
पठाणकोट-> डलहौसी-> कालाटॉप-> चंबा-> साच पास->भरमौर->चंबा->डलहौसी->मॅक्लिऑडगंज-> जम्मू
महिना- डिसेंबर
यापैकी भरमौर वगळता सर्व ठिकाणी हिमाचल पर्यटनाची हॉटेल्स आहेत.
डिसेंबर मधे जायचे असल्यास सर्व प्लॅन फ्लेक्सिबल् ठेवावा. मात्र रस्ते बंद असले तरी हॉटेल्स मिळण्याची १००% हमी :):):)
23 Jun 2013 - 11:36 pm | किसन शिंदे
मस्त आले आहेत सगळेच फोटो.
24 Jun 2013 - 8:10 am | कंजूस
धन्यवाद किल्लेदार .
25 Jun 2013 - 11:32 am | garava
अप्रतिम फोटो.
26 Jun 2013 - 5:42 am | स्पंदना
सुरेख!
26 Jun 2013 - 6:29 pm | किल्लेदार
धन्यवाद....
9 Aug 2013 - 3:20 pm | निनाद मुक्काम प...
डोळ्याचे पारणे फिटले , फोटो पाहून
अबुधाबीत वास्तव्य होते तेव्हा पत्नीस सांगितले की येथे नुसते वाळवंट आहे , पण वाळवंटात किल्ले व महाल तर आमच्या राजस्थानात आहेत ,
मग राजस्थान दौरा झाला.त्यानंतर आता आल्पस भटकणे झाले तेव्हा सुद्धा हिमशिखरे पाहून आमच्याकडे सुद्धा अशीच गगनचुंबी हिमशिखरे आहेत असे तिला सांगितले.
पुढील भारत भेटीत हिमाचल ला भेट देऊन माझ्या विधानाची सत्यता दिला पटवून देतो.
आपल्या लेखाचा त्यावेळी नक्कीच मला फायदा होईल
22 Aug 2013 - 9:20 pm | किल्लेदार
काही लागले तर नक्की विचारा. अजुन माहीती पुरविन....
10 Aug 2013 - 11:21 am | तिमा
भारमौर चा तिसरा फोटो अप्रतिम. बाकीचे फोटोही छान. आधी जाऊन आल्यामुळे पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला.