ग्रीन टी

स्मिता चौगुले's picture
स्मिता चौगुले in काथ्याकूट
30 May 2013 - 12:34 pm
गाभा: 

काही महिन्यापासून वाढत्या वजनाने आणि त्याच्या दुष्परिणामाने(गुढगेदुखी) त्रस्त झाल्यावर वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . गुगलून काही माहिती मिळवली त्यात ग्रीन टी चे सेवन हा देखील एक मुद्दा आहे

ग्रीन टी हे आरोग्यास आणि परिणामी वजन कमी करण्यास(part of balanced/healthy diet) लाभदायक असते असे आढळले

त्याचे पुढील उपयोग देखील जालावर मिळाले

ग्रीन टीच्या सेवनाने कॅलरी (मराठी शब्द?) जळण्याचा वेग वाढतो

ग्रीन टी पचन क्रियेला मदत करतो आणि शरीराचा मैटाबॉलिज्म रेट वाढवतो

ग्रीन टी सेवन केल्याने शरीरातली चरबी जळून वजन वजन कमी होण्यास मदत होते / शरीराची चरबी जाळण्याची क्षमता वाढते

यातले antioxidants कर्करोगाच्या पेशी (cells)वाढू देत नाहीत

त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त असे एक न अनेक उपयोग तेथे मिळतात

हे वाचून मी सध्या ग्रीन टीचे सेवन करण्याच्या विचारात आहे

कृपया जाणकारांनी वरील माहितीत किती तथ्य आहे/ ग्रीन टी चे फायदे जे आपणास माहित आहेत/ कोणी याचे सेवन करत असेल तर आपले अनुभव आणि कोणता ब्रांड वापरावा याबद्दल मार्गदर्शन करावे

चु.भु.दे.घे.

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

30 May 2013 - 12:44 pm | पिलीयन रायडर

रुजुता दिवेकरचा एक व्हिडीओ आहे तु नळी वर..
हापिसात बॅन आहे तु नळी म्हणुन लिंक देऊ शकत नाही. (कदाचित ही असेल http://www.youtube.com/watch?v=reX59MogfR8) पण एक्दा पाहण्या सारखा नक्की आहे..

स्मिता चौगुले's picture

30 May 2013 - 12:51 pm | स्मिता चौगुले

इथेही बॅन आहे,घरी जरुर बघेन
धन्यवाद पिलीयन रायडर

इनिगोय's picture

30 May 2013 - 2:30 pm | इनिगोय

पिरा, व्हिडिओत काय आहे ते थोडक्यात लिहिता येईल का? दिवेकर बाईंचं काय मत?

पिलीयन रायडर's picture

30 May 2013 - 2:46 pm | पिलीयन रायडर

खुप पुर्वी पाहिलाय...
घरी जाऊन मग लिहेन आठवुन...

वेल्लाभट's picture

31 May 2013 - 12:04 pm | वेल्लाभट

तू नळी काय ! हाह्हाहाहाअहाहाहाहाह :डःडःडःडःडःड

प्रभाकर पेठकर's picture

30 May 2013 - 12:46 pm | प्रभाकर पेठकर

कॅलरी = उष्मांक
मैटाबॉलिज्म (मेटॅबॉलिझम) = चयापचय क्रिया
antioxidants = ??

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात व्यायाम आणि संतुलीत तसेच संयमित आहार ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या. दोन पैकी एक नसेल तरी वजन कमी होत नाही.

बाकी हरीत चहा मजेखातीर सोडल्यास त्याचे कधी गांभिर्याने सेवन केले नाही. त्यामुळे अनुभव नाही.

स्मिता चौगुले's picture

30 May 2013 - 1:44 pm | स्मिता चौगुले

दुरुस्तीबद्द्ल आणि सल्ल्याबद्द्ल धन्यवाद पेठकर काका

ब़जरबट्टू's picture

30 May 2013 - 1:08 pm | ब़जरबट्टू

हिरवा चहा नक्की चांगला असतो, पण खरच वजन कमी करायचे असेल तर तो काही खास मदत करत नाही. म्हणजे नुकतेच १० किलो कमी केलेत म्हणून सांगायास धजावतोय. त्यापेक्षा व्यायाम सुरु करायच्या पाच मिनिटांआधी काळी क्वाफी घ्यावी. तहान लागत नाही, दमल्यासारखे होत नाही, व चयापचय चांगले होउन जास्त चरबी जाळण्यास मदत होते. चरबी जाळायची असेल तर जेवढे जोरात पाळता येईल तेव्हडे पळा (Jogging नाही) , २० सेकंद पण पुरे, थांबा… परत जोरात (देव दिसला पाहिजे )… नक्की मदत होईल। आमचा कमरा ३८ चा ३४ वर आलाय.. :)

कपिलमुनी's picture

30 May 2013 - 1:43 pm | कपिलमुनी

कशे काय जमते तुमा लोकास्नी !!

जरा डीतेल मंदी लिवा ना..

विजुभाऊ's picture

27 Jun 2013 - 7:31 pm | विजुभाऊ

व्यायाम सुरु करायच्या पाच मिनिटांआधी काळी क्वाफी घ्यावी
काळ्या क्वाफ्फी मुळे बद्धकोष्ठ होतो.
वजन कमी करण्याचा सर्वात सोप्पा मार्ग बंद होतो

आमच्या एका परम मित्राला " सिक्स प्याक्स अब्स " बनवायच्या आहेत
याच्या सेवनाने त्या बनतील काय ?

स्पंदना's picture

31 May 2013 - 7:04 am | स्पंदना

श्या!
काय हे कंजुस विचार लोकांचे तरी?
अरे बनवायचेच असतील तर सिक्सच कशाला घवघवीत फॅमिली पॅक बनवा राव.

अनुप ढेरे's picture

30 May 2013 - 2:00 pm | अनुप ढेरे

फक्त जोरात धावणे ( स्प्रिंटिंग) हे वजन कमी करण्यचा उपाय म्हणून वापरू नये अस वाचलय. हळू धावणे आणि जोरात धावणे हे दोन्ही करावे थोडा थोडा वेळ.

कपिलमुनी's picture

30 May 2013 - 2:24 pm | कपिलमुनी

वजन जास्त आहे आणि गुडघे दुखत आहेत.
१. धावू नका
२. भरपूर चाला , वेगात चाला आणि २० मिनिटांनंतर कॅलरी जळायला सुरुवात होते
३. व्यायामाचे चालताना डांबरी रस्त्यावरून चालण्यापेक्षा मातीचा रस्ता किंवा बागेत चालणे उत्तम ..
४. जॉगिंगचे हलके आणि मऊ तळव्याचे बूट घ्या ..
५. वॉकर वर चालू किंवा धावू नका
६. चढावर सतत चालणे टाळा

>> अति वजना मुळे गुडघ्यामधले स्नायू कमकुवत झालेले असतात.. क्वचित प्रसंगी झीज झालेली असते ..
धावण्यामुळे स्नायूंना धोका संभवतो..

ग्रीन टी

ग्रीन टी दिवसातून किति वेळा घेणार आहात ?
जेवणापुर्वी कि जेवणानंतर ?
त्याच्या साईड ईफेक्ट बद्दल काही माहिती गोळा केली आहे का ?

स्मिता चौगुले's picture

30 May 2013 - 2:47 pm | स्मिता चौगुले

ग्रीन टी दिवसातून किति वेळा घेणार आहात ? - साधारण २ वेळा
जेवणापुर्वी कि जेवणानंतर ? - चहाच्यावेलेस्..म्हणजे सकाळी नश्त्यावेळी आणि दुपारी जेवनानन्तर साधारण ४ च्या दरम्यान
त्याच्या साईड ईफेक्ट बद्दल काही माहिती गोळा केली आहे का - जालावर या बद्दल फारशी माहिती नाही पण दिवसभरात ५ कप पेक्शा जास्त सेवन करु नये असा इशारा आहे कारण यात caffeine असते

ब़जरबट्टू's picture

30 May 2013 - 2:47 pm | ब़जरबट्टू

कपिलमुनीशी सहमत. वजन जास्त आहे आणि गुडघे दुखत आहेत हे विसरलोच. सध्या धावू नकाच.

अनुप :- जोरात धावणॅ वजन कमी करण्यापेक्शा चरबी जाळण्यास जास्त मदत करते असे म्हणतोया.

कवितानागेश's picture

30 May 2013 - 3:08 pm | कवितानागेश

मी ३ वेळा ट्राय केला. भयंकर अ‍ॅसिडिटी झाली. बाकी माहित नाही. माझी बहीण मात्र नियमित घेते. वेगवेगळ्या प्रकृतीप्रमाणे वेग्वेगळे इफेक्ट्स असावेत कदाचित.

अनिरुद्ध प's picture

30 May 2013 - 6:12 pm | अनिरुद्ध प

ग्रीन टी,सोबत पाव आणि बटर सुद्धा खाल्ले असतिल,ते सुद्धा एक्ट्याने म्हणुन भयंकर अ‍ॅसिडिटी झाली असेल.

आदूबाळ's picture

30 May 2013 - 11:11 pm | आदूबाळ

ग्रीन पाव आणि ग्रीन बटर का?

अनिरुद्ध प's picture

31 May 2013 - 12:29 pm | अनिरुद्ध प

याचे योग्य उत्तर माऊ च देउ शकेल्,कारण तीच म्हणते कि,
"देवा मला पाव,
देवा मला बटर सुद्धा"

कवितानागेश's picture

31 May 2013 - 8:05 am | कवितानागेश

ते तुरत कडू पेय रिकम्या पोटी घ्यावं म्हणतात. तसंच केलं...पण आता पाव-बटर मिळालं की सोबत घेइन. :)

वजन कमी करण्याचे २ मार्ग : योग्य आणि नियमित आहार व व्यायाम हेच २ मार्ग आहेत .
बाकी गफ्फा !

यशोधरा's picture

30 May 2013 - 11:13 pm | यशोधरा

ग्रीन टी घेताना सावधगिरी बाळगा. खास करुन लो ब्लडप्रेशरवाल्यांनी ग्रीन टी घेऊ नये असे वाचले आहे. बीपीचा अजूनही त्रास होऊ शकतो.

अत्रन्गि पाउस's picture

31 May 2013 - 10:42 am | अत्रन्गि पाउस

कमी वजन आणि उत्तम आरोग्य असा प्रवास नसून उत्तम आरोग्य राखले तर तदनुषंगिक वजन राखले जातेच असे नुकतेच वाचले आहे (म टा/ सकाळ / किंवा लोकसत्ता ) !!
अर्थात ह्या विषयात कुतूहल पलीकडे फार ज्ञान नाही मला...
पण संपूर्ण(बहुतांश) पाश्चात्य अभ्यासावर आधारित माहितीवर दीड कप ब्रोकोलीचा रस, एक्स्ट्रा वर्जिन ओलीव तेल, सेलेरीतील anti-ओक्सिदांत, कोर्न / wheat फ्लाकेस, ओट्स चा शिरा हे सगळे वाचनी पडते पण पचनी नाही..
सर्व तेले हि घातकच असे हि मध्यंतरी वाचले
दही दुध भात, मेतकुट, डांगर, तूप, कढी, भाकरी, फणस/फणसाचे गरे, इथल्या फळ/पालेभाज्या,इथले मासे व अन्य देशी पदार्थ ह्या वर बराच्यदा फक्त 'नका खाऊ'किंवा तत्सम उदासीन / माहीत नाही/ प्रमाणात (म्हणजे ? ) खा ...असेच ऐकू येते...
रोजचे अन्न हे स्थळ काल सापेक्ष असावे असे आपले एक वाटते..
असो...आपला विषय नाही ...तज्ञांनी खुलासा केल्यास बरे होईल...

वेताळ's picture

31 May 2013 - 11:12 am | वेताळ

मी गेली ५/६ महिने घेत आहे.ग्रीन टी भरपुर व्हरायटी प्रमाणे बाजारात मिळतात.
तुम्ही तुम्हाला परवडणारा ग्रीन टी तुम्ही वापरु शकता.ग्रीनटी साधा,आलेवाला,मध असणारा अश्या मिश्रणात देखिल मिळतो.मी फक्त ग्रीन टी घेतो. त्यात क्वचित मध वापरतो. पण आता फक्त हिरवा चहाच घेतो. चव एकदम कडवट असते.मी सकाळी एकदाच हिरवा चहा घेतो.
फायदे:हिरव्या चहामुळे तुम्हाला दिवसभर कामासाठी उत्साह मिळत राहतो. थकवा खुप कमी जाणवतो. कारण हिरवा चहा रक्तातील अ‍ॅण्टीऑक्सीडन्ट घटक कमी करतो.त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित चालु राहते व ह्रद्यविकार होण्याची शक्यता कमी होते.चयापचय क्रियेचा वेग वाढवण्याचे काम पण हिरवा चहा करतो.पण वजन कमी करण्याबाबत मी ठामपणे सांगु शकत नाही.दुसरी एक गोष्ट हिरव्या चहाच्या सेवनाने तुमचा चेहरा तजेलदार होतो,डोळ्याखालील काळी वर्तुळे खुपच कमी होतात.जर तुम्हाला दिवसभर अनुत्साह वाढत असेल्,काम करताना थकवा जाणवत असेल तर हिरवा चहा घेणे चांगले आहे.

मी फक्त हिरव्याचहाची पत्ती पाण्यात टाकुन तिला चांगली उकळी आणतो. नंतर गाळुन डोळे झाकुन पितो.
तुम्ही त्यात आले,मध मिक्स करुन थोडी सुसह्य चव करुन देखिल पिउ शकता. साखर किंवा गुळ वापरत नाहीत.

स्मिता चौगुले's picture

31 May 2013 - 11:25 am | स्मिता चौगुले

धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल

हरकत नसेल तर कोणत्या ब्रान्डचा हिरवा चहा वापरता ते सांगाल काय?

ब्रण्डनी आपाआपले हिरव्या चहाची उत्पादने वाजारात आणली आहेत्.मी टी बॅग्ज न वापरता टाटा टेटली हिरवा चहाची पत्ती वापरतो.तुम्ही तुम्हाला जे सोयिस्कर आहे ते बघुन वापरा.सुरुवातीला मध व आले मिक्स करुन प्या.

हे पहा, त्याचं असं आहे की लठठपणावर उपाय = जितक्या व्यक्ती तितक्या सूचना..

व्यायाम आणि खाण्यावर नियंत्रण हा आणि हाच मार्ग आहे बाकी सर्व मनाला उगीच समाधान म्हणून.

खाण्याविषयी म्हणाल तर एकच नियम पाळला तर डाएटिशियन आणि सर्व पुस्तकं बंद करता येतीलः

समोर पदार्थ आला की एकच कसोटी लावायची:

हे खाऊन मला आनंद, समाधान, तृप्ती मिळेल का?..

"हो" उत्तर येणारा पदार्थ टाळायचा .. की झालं. ;)

-(वजनदार) गवि

बाळ सप्रे's picture

31 May 2013 - 12:42 pm | बाळ सप्रे

लठठपणावर उपाय = जितक्या व्यक्ती तितक्या सूचना

बटाट्याच्या चाळीतला पंतांचा उपास आठवला !!

प्रभाकर पेठकर's picture

31 May 2013 - 1:30 pm | प्रभाकर पेठकर

प्रसिद्ध गायक अदनान सामीने स्वतःचे वजन खुपच कमी केले (जवळ जवळ ३० की ४० किलो) त्याला मुलाखतकर्त्याने विचारले 'हे कसे जमले तुला?'
त्यावर तो म्हणाला 'फक्त सी-फूडमुळे.'
आपल्या डोळ्यांकडे अंगुलीनिर्देश करून पुढे म्हणाला ' फक्त सी फूड' (डोंट इट).

अतिशयोक्ती वगळता तोंडावर ताबा अतिशय महत्त्वाचा. अर्थात, जोडीला व्यायामही.

बाळ सप्रे's picture

31 May 2013 - 1:38 pm | बाळ सप्रे

हा हा हा.. मस्त उत्तर.. सी फूडमुळे..
आत्म्याप्रमाणे जमलं असतं तर एक स्मायली टाकायचा होता "सी फूड" वर !!

मिपावरचे 'पाकृ' आणि 'अन्न हे पूर्णब्रम्ह' हे विभाग चुकुनही उघडायचे नाहीत.

आदूबाळ's picture

1 Jun 2013 - 12:00 pm | आदूबाळ

उलट आवर्जून उघडायचंच. वर सांगितल्याप्रमाणे सी फूड करायचं. प्रचंड जळजळ होऊन जठराग्नी प्रदीप्त होतो आणि खाल्लेलं पचतं. :)

काळा पहाड's picture

27 Jun 2013 - 6:01 pm | काळा पहाड

मी फक्त हिरव्याचहाची पत्ती पाण्यात टाकुन तिला चांगली उकळी आणतो.

हिरवा चा उकळू नये. तो बनवण्याची कृती खालील प्रमाणे.
१. पाणी उकळा.
२. दोन मिनिटे थांबा
३. चहापत्ती घाला. नेहमीच्या चहाच्या निम्म्या प्रमाणात घाला.
४. एक मिनिट थांबा
५. गाळा, साखर घाला. हे मिश्रण हलक्या सोनेरी कलरचे झाले पाहीजे (पांढर्या शुभ्र कप मध्ये तसे दिसेल. तपकीरी कलर म्हणजे जास्त दाट झाला आहे). साखर न घालण्याचा पर्याय आहे. पण मला तर चालत नाही. चहा जर कडू लागत असेल तर पायरी क्र. ४ मध्ये ४५ सेकंद थांबा.

रॉजरमूर's picture

28 Jun 2014 - 11:53 pm | रॉजरमूर

आम्ही हा घेतो
Green Tea

सध्या महिन्या भरापासून घरातील सर्व जण ग्रीन टी सेवन करीत आहोत परिणाम उत्साहवर्धक आहेत फायदे अधिकच आहेत त्यामुळे सुरु करण्यास हरकत नाही
यशोधरा ताई आपण जी माहिती वाचलीत त्यात तथ्यांश नाही .
तरीही शंका असल्यास ही लिंक बघा http://youtu.be/X79sWZ2o3SM
http://youtu.be/HDWdDe5mCao

बऱ्याच कंपन्यांचा ग्रीन टी उपलब्ध आहे आपण त्यातील निवडू शकता .

सरळमार्गी's picture

29 Jun 2014 - 1:49 am | सरळमार्गी

हिरवा चहा लोह (आयर्न) ब्लॉकर आहे, जर जेवणानंतर लगेचच हा चहा घेतला तर जेवलेल्या पदार्थातले लोह खनिज रक्तात शोषून घेण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध होतो. हाच चहा जेवणा नंतर साधारण पणे तास- दिड तासाने घेतला तर त्यावेळे पर्यंत खाल्लेल्य पदार्थातले लोह खनिज रक्तात शोषून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्याने कोणतेही नुकसान होणार नाही. ओघानेच आले की हिरवा चहा घेतल्या नंतर साधारण पणे तास-दिड तास तरी जेवण / जास्त लोहयुक्त पदार्थ घेण्याचे टाळावे. ( जेवणा नंतर / आधी लगेचच हा चहा घेतला तर काही फार मोठा अपाय होणार नाही फक्त अन्नातले लोह शरीराला मिळणार नाही ईतकेच)

कवितानागेश's picture

29 Jun 2014 - 6:35 pm | कवितानागेश

हे माहित नव्हतं. चांगली माहिती सांगितलीत.