एकुलती एक.....

मृणालिनी's picture
मृणालिनी in काथ्याकूट
25 May 2013 - 9:21 pm
गाभा: 

जर एखाद्या बिकनी घालणाऱ्या मुलीला नव्वारीत पाहिलं तर कस वाटेल? तसच काहीस होत....
या सिनेमाचे प्रोमो पाहताना जे चित्रपटाबद्दलचे पूर्वग्रह मनात तयार होतात, ते सगळे प्रत्यक्ष चित्रपट पाहताना पुसून जातात.

सिनेमाची सुरवातच विमान उडण्यापासून सुरु होते. सचिनची (अरुण देशपांडे) आणि सुप्रियाची (नंदिनी देशपांडे) यांची एकुलती एक कन्या श्रीया (स्वरा) विमानाने मुंबईत तिच्या वडिलांना भेटायला १८ वर्षांनंतर येते.

{पार्श्वभूमी :
कथेतील अरुण देशपांडे प्ले बॅक सिंगर बनण्याकरता परिवार सोडून मुंबईत येतो. त्याची पत्नी चिडून त्याला डिव्होर्स पेपर्स पाठवते. (अर्थात तो त्याच्यावर साईन न करता ते फाडून टाकतो.) आणि १८ वर्ष दोघेही विरहात घालवतात. (खरतर तिघे.....त्याची त्यावेळी दोन वर्षाची असलेली मुलगी सुद्धा!)}

स्वरा तिला अभिनेत्री व्हायचंय असं तिच्या वडिलांना सांगते. आणि अरुण त्या गोष्टीला विरोध करतो. पण तिचे प्रयत्न आपले सुरूच असतात.
स्वराच्या वागण्यामुळे त्याला तिचा लळा लागतो....बाप आजारी पडल्यावर काळजी घेण, जीवनात हरल्याची भावना आल्यावर उभारी देण, जीवनात बदलाला सामोरी जायला शिकवण....वगैरे वगैरे.
एक मुलाखत द्यायला म्हणून अरुण आकाशवाणीवर जातो. ओळखा पाहू तिथे मुलाखत घ्यायला कोण असेल ?....... नंदिनी देशपांडे !!!
तिथे प्रोफेशनल प्रश्न इमोशनल बनतात आणि अरुण चिडून उत्तर देतो. नंदिनी कार्यक्रम तसाच संपवते.
आणि जाताना मुलीसाठी देतीये अस म्हणत फराळ देते. पण स्वरा ला फराळाचे पदार्थ आवडत नाहीत असे ती म्हणते. (अस कस शक्यय?) अर्थात, अरुणच्या लक्षात येत कि हा फराळ नंदिनीने आपल्या करिताच पाठवला.
अरुण स्वराला मुलगी म्हणून स्वीकारतो...आणि दुसऱ्याच सकाळी स्वरा लग्न करायला म्हणून आईच्या घरी जायला निघते.
अभिनय करण्याची तिला आवड नव्हती आणि त्याला चिडलेल, रुसलेल बघायला तिने ते सोंग रचलेलं होत अस ती सांगते आणि निघते. (या सोंगाची काय गरज होती हे मात्र मला अजुन कळलेलं नाही.)
मग अरुणचे डोळे भरून येतात. (...कि उघडतात???) तो तिच्या लग्नात कन्यादान करायला म्हणून येतो...आणि नंदिनीचीही माफी मागतो. तो विमानात जाऊन बसतो तसं नंदिनी त्याच्या शेजारी येऊन बसते. आणि मग त्याला कळत कि स्वरा एअरहोस्टेस आहे. आणि तिचा नवरा हा बिझनेसमन आहे. आणि काय मग? नेहमी प्रमाणे हॅपी एंडिंग !!!!

का पाहावा?

१. टायटल सॉंग
२. स्वप्नील जोशी, किशोरी शहाणे, निर्मिती सावंत यांची छोटी का होईना पण भूमिका पाहण्यासाठी.
३. टाईमपास म्हणून पैसा वसूल.

का पाहू नये?

१. कथेत दम नाही.
२. काही डायलॉग इतर सिनेमांमधील घेतलेले आहेत.
३. मुख्य अभिनेत्रीचा अभिनय.
४. अपेक्षाभंग करणारा सिनेमा.

सचिनचा चित्रपट म्हणून पाहायला जात असाल तर खुशाल जा.....पैसा नक्कीच वसूल होतो.
रेटिंग: **

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

25 May 2013 - 9:38 pm | सौंदाळा

छान (प्रोफेशनल) समीक्षण..
मला तर सचिनचे जुने सिनेमेच आवडतात.
कालच कोण होइल मराठी करोडपती मध्ये सचिनकन्येचे मराठी ऐकुन अंदाज आला होता.

छान (प्रोफेशनल) समीक्षण..

+११११

बादवे - हा चित्रपट महागुरूंचा आहे की सचिनचा..?

lakhu risbud's picture

26 May 2013 - 12:26 am | lakhu risbud

म्हाग्रूंचा पिक्चर ना ? त्ये आपल्या मायमराठीतील शारूक हायेत viral advertising च्या साटी
पिक्चारात एक बी चानस सोडत नै झैरात कर्नेचा.
तो "आमी सातपुते" नावाचा दिव्य पिक्चुर आटवत न्हायी का, त्येत त्या टाटांच्या ACE नावाच्या गाडीची आणि brook Bond च्या ची कसली झैरात केली व्हती राव !
आता या पिक्चुर मधी
कथेतील अरुण देशपांडे प्ले बॅक सिंगर बनण्याकरता परिवार सोडून मुंबईत येतो.
या मधी एकाद्या गाण्याच्या कंपनीची झैरात असनार .

नंतर एक मुलाखत द्यायला म्हणून अरुण आकाशवाणीवर जातो.
यामधी एकाद्या Radio ठेसन ची झैरात असनार
नाय मी तर म्हन्तो झैरात करण्यासाटीच त्यो Radio ठेसनात मुलाकतीचा भाग टाकला असनार.

तो विमानात जाऊन बसतो तसं नंदिनी त्याच्या शेजारी येऊन बसते
या मंदी एकाद्या इमान कंपनी ची झैरात नसली म्हंजी मिळवली.

नै झैरात करायची तर करा ना राव पार त्या पाई पघणाऱ्या लोकाच्या डोक्याला काहून शॉक देता ?

कथे मदी दम असल तर झैरातीच कै वाटत नायी राव पर झैरात करता यावी म्हून पिक्चुरच्या कथेतच बदल करणेचा परकार डोस्क्यात जातो .

इरसाल's picture

27 May 2013 - 2:28 pm | इरसाल

अंबारी मसाला विसरताय!!!!!!

किसन शिंदे's picture

26 May 2013 - 12:33 am | किसन शिंदे

आताशा सचिनच्या सिनेमांचा कंटाळा येऊ लागला आहे. आणि लखुबांनी लिहलेल्या वरील सर्व मुद्द्यांशी सहमत!!

(आम्ही सातपुते पाहून सचिनच्या सिनेमांचा धसका घेतलेला) किसन

आदूबाळ's picture

26 May 2013 - 12:41 am | आदूबाळ

परीक्षण छान आहे. :)

पण हा चित्रपट पहाण्यात एकंदरीतच काही राम दिसत नाही.

अवांतरः येत्या दीड महिन्यात बरेच (वरकरणी) चांगले (वाटणारे) मराठी चित्रपट येताहेत. केदार शिंदेंचा "खोखो", महेश कोठारेंचा "झपाटलेला २" आणि ईस्टमन कलरमधला सुशिंच्या मॅग्नम ओपसवरचा "दुनियादारी".

केदार शिंदेंचा "खोखो" ? जाहिराती बघूनच तो वय वर्षे ५-१० वयोगटासाठी बनवला आहे का अशी शंका येते. किंबहूना मराठी प्रेक्षकाचे मानसिक वय वाढलेच नाही अशा भ्रमात राहून तर हे चित्रपट बनविले जात नाहित ना ?

सौंदाळा's picture

26 May 2013 - 11:56 am | सौंदाळा

+१
खोखो...आदीमानवाच्या वेशातील सिद्धार्थ जाधवच्या माकड्चेष्टा बघुन डोक्यात तिडीक गेली.

प्रभाकर पेठकर's picture

26 May 2013 - 12:09 pm | प्रभाकर पेठकर

मला तर नुसत्या सिद्धार्थ जाधवला पाहून सुद्धा डोक्यात तिडीक जाते.

रामपुरी's picture

29 May 2013 - 12:50 am | रामपुरी

"आदीमानवाच्या वेशातील सिद्धार्थ जाधवच्या माकड्चेष्टा"

'त्रि' रुक्ति झाल्यासारखी वाटतीये.

बॅटमॅन's picture

29 May 2013 - 2:10 am | बॅटमॅन

हेहेहे भारीच =)) =)) =))

परिकथेतील राजकुमार's picture

26 May 2013 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

मराठी चित्रपट अजून प्रदर्शीत होतात ?

अवघड आहे बॉ !

त्रिवेणी's picture

26 May 2013 - 1:08 pm | त्रिवेणी

सचिन असा ही कधिच आवड्ला नाही. आणि एका पेक्शा एक नतर तर पारच तिडीक यायला लागली त्याची. स्वःत्च्याच शोम्धे स्वःतलाच महागुरु म्हणवून घेतो.

पैसा's picture

26 May 2013 - 4:02 pm | पैसा

नेमक्या शब्दात सिनेमाची ओळख करून दिली आहे. सिनेमाची गोष्ट ओळखीची वाटतेय. किंवा २/३ स्टोर्‍या एकत्र केल्यासारखी. तरी फुकटात बघायला मिळेल तेव्हा बघू.

गवि's picture

27 May 2013 - 10:27 am | गवि

पाह्यला..

चित्रपटाविषयी:

सचिनने सुरुवातीला नर्मविनोदी सिनेमे सुरु केले तेव्हा पाटीलअत्याचार किंवा थांबलक्ष्मी टाईपच्या सिनेमांमधे त्याने एक नवा ट्रेंड सेट केला असं म्हणून आवडले होते. त्या त्या वेळी ते बरे वाटले तरी भलते टॅलंटेड त्यात काही नाही असंच वाटतं. काही वर्षांपूर्वी नवरा माझा नवसाचा हाही त्याचा एक सिनेमा आला होता.(निर्माता दिग्दर्शक होता की फक्त काम केलं होतं आठवत नाही) या न.मा.न. सिनेमातही दर दोन वाक्यांनी जोक नाही मारला तर काँट्रॅक्ट रद्द होणार असल्याप्रमाणे अशोक सराफ आणि अन्य पात्रं संवाद आणि कोलांट्याउड्या, आरडाओरडा, लाफे लावणे वगैरे करत होती. हे केविलवाणं आहे.

एकुलती एक या सिनेमात असा न जमलेला फार्स नक्कीच नाही. विषय चांगला आहे. पण पुन्हा तेच. नर्मविनोदीच्च झाला पाहिजे सचिनचा सिनेमा या अलिखित नियमानुसार खरं तर गंभीर असणं आवश्यक असतानाचेही खूप प्रसंग उगीच "हलकेफुलके" ऐवजी पोकळ झाले.

उदा.

१. मुलगी जेव्हा १८ की वीस वर्षांनी बापाला भेटायला येते तेव्हा ती अगदीच अल्लड आणि आगाऊ वाटते. इनफॅक्ट ती ज्या काही उद्देशांनी बापाकडे आली असेल ते उद्देश लपवले हेही ठीक, पण त्यांची भेट ही विनोदी करुन टाकली आहे.

२. अठरा वर्षांच्या गॅपनंतर त्यांच्यात जे संवाद होतात ते अगदीच कॅज्युअल वाटतात.
३. नंतर ही मुलगी २४ X ७ फिलॉसॉफरचा रोल घेते. त्यामुळे कागदाचं विमान बनवण्यापासून ते बागेला पाणी घालण्यापर्यंत सर्व गोष्टीत ती बापालाच "बाबा रे... " करुन काहीतरी लाईफ जीने का तरीका ऐकवत असते. आणि बाप अगदीच बावळट आहे असं वाटायला लागतं. नंतर या फिलॉसॉफर लीगमधे तिचा अत्यंत पांड्या दिसणारा बॉयफ्रेंडही जॉईन होतो.. तोही गिटार हातात धरुन जो काही येतो तो पाव खाताना, चहा पिताना सगळ्या सगळ्या बाबतीत या बापाची शाळा घेतो.

४. मुलीच्या काही दिवसांच्या मुक्कामात तो पोरगा नोकरी लागल्याचं सांगतो.. लगेच आठवड्याच्या आत येऊन प्रमोशन झालं असं म्हणून लक्झरी कार आणि सूटबूट घालून येतो.. तुम्ही माझ्या कंपनीच्या सीएफओशी बोलताय इ इ. म्हणतो... हे सर्व खोटं आणि प्लॅनचा भाग असलं तरी सचिन कित्ती कित्ती मूर्ख आहे हे अधोरेखित का केलं जातं बुवा?

५. मुळात ज्या पायावर सगळी कथा आहे ते आईबाबांचं ते सेपरेशनच फुसकं वाटतं. "तू तुझ्या तत्वांना महत्व दिलंस आणि मी माझ्या करियरला" असं सचिन एकदा पत्नीला म्हणतो.. शिवाय आई अजून राष्ट्र सेवादलात जाते का? असं सचिन मुलीला विचारतो.. असे अनेक संदर्भ येतात. आता गायक बनण्यासाठी मुंबईला येणं यात तत्वात न बसण्यासारखं काय आहे? सचिन तर अगदी कर्मठ म्हणावे इतका तात्विक दाखवला आहे. तेव्हा त्याने केलेलं बायकोच्या तत्वांना काळिमा फासणारं कृत्य = गायक बनण्याचं स्वप्न पाहणं हे काही पटत नाही. अशी काय तत्वं असतात बायकोची नागपुरात? मुंबईला येणं हाच प्रॉब्लेम असतो की गायकीतली अनस्टॅबिलिटी? त्यांच्यातल्या सेपरेशनचं अजून ताकदीचं कारण दाखवायला हवं होतं.

६. एक केवळ मराठीत पार्श्वगायन करणारा, तेही अमुकसाठी गात नाही अन तमुकला माझा आवाज शोभणार नाही अशी तत्वं असलेला.. हा गायक मुंबईत सी व्यू असलेला उंच टेकडीवरचा (अर्थातच मलबार किंवा तत्सम हिलवरचा) बंगला, प्रचंड आवार अन बाग असलेली जागा.. आणि मर्सिडीज गाडी वगैरे अशा थाटात फिरण्याइतका पैसा कमवत असेल हे मानणं जड गेलं. हे सर्व निर्माता किंवा हिंदीतल्या नंबर एक सुपरस्टारलाच शक्य आहे. (किंवा मुळातच मलबार हिलवर वडिलोपार्जित बंगला असणार्‍याला.. पण इथे तर तो नागपूरहून मुंबईत येऊन स्ट्रगल करुन स्थिरावलेला आहे)

असे अनेक मुद्दे आहेत.. पण त्या मुलीची फिलॉसॉफरगिरी डोक्यात जाते. येता जाता ते कृत्रिम हास्य.. तेही टिपिकल फिलॉसॉफरसारखं टाईम डीलेड हास्य.. सर्वोदयी हास्य यालाच म्हणतात का?

चित्रपट अगदी टाकाऊ आहे असं नव्हे.. पण काही विशेष दमही नाहीच.

परीक्षणाविषयी: परीक्षण चांगले आहे. पण एक अलिखित कन्व्हेन्शन असं आहे की अगदी ए टू झेड लास्ट सीनपर्यंतची स्टोरी परीक्षणात सांगून टाकायची नसते.. अन्यथा वाचकाला सिनेमा पाहण्यात मजाच राहात नाही.

बाकी चांगले लिहीले आहे.

उदय के'सागर's picture

27 May 2013 - 2:22 pm | उदय के'सागर

एक नंबर परीक्षण गवि'दा ..आवडलं. त्या मराठी न्युज चॅनल आणि पेपर वाल्यांना काय सचिन साहेबांनी पैसे चारले आहेत का???... जो तो ह्या सिनेमाचं कौतूक करतो आहे ते.. म्हणजे त्यातल्या त्यात त्या 'इरीटेटींग' मुलीचा फारच उदो उदो चालू आहे सगळीकडे. ती ट्रेलरमधे एकाही शॉट मधे बिल्कूल चांगली दिसली नाहीये (अभिनयाने देखील) तरीही सिनेमात असे काय दिवे लावले आहेत देव जाणे...
कालच तेंडुलकरांच्या सचिन ने आय.पी.एल. मधून निवृत्त होत असल्याचं घोषित केलं. तसं आता पिळगांवकरांच्या सचिननेही अशी काही घोषणा करावी (ज्याची गरज खरंतर फार आधीच होती- किती ते ताणायचं की वो आणि प्रेक्षकांना छळायचं ... )

ती ट्रेलरमधे एकाही शॉट मधे बिल्कूल चांगली दिसली नाहीये (अभिनयाने देखील) तरीही सिनेमात असे काय दिवे लावले आहेत देव जाणे...

काहीच विशेष नाही. दिसणे एकवेळ आपल्या हातात नाही हे ठीक पण कृत्रिम अभिनयाने आहे तेही बेक्कार का करायचे?

शिवाय "फेअर अँड लव्हली" या उत्पादनाची ठिगळे लावल्यासारखी जाहिरात सिनेमात आलेली आहेच..(ब्यूटी पार्लर आणि ब्यूटी ट्रीटमेंट इ इ लाभ मला घरच्याघरीच या नवीन फेअर अँड लव्हलीने मिळतात" अशा अर्थाचे ट्यूब दाखवत संवाद इत्यादि)

स्पॉन्सरशिप असावी बहुधा..पण कसेतरीच वाटते.

उदय के'सागर's picture

27 May 2013 - 2:36 pm | उदय के'सागर

@फेअर अँड लवली - अगदी अगदी सहमत, वरती "लखोबांनी" त्यांच्या प्रतिसादात अश्या बर्‍याच शक्यता वर्तवलेल्याच होत्या :P

फारएन्ड's picture

28 May 2013 - 9:37 pm | फारएन्ड

जबरी लिहीले आहे गवि :)
अनेक मराठी चित्रपटात हे विनोद करण्याची जबरदस्ती असल्याप्रमाणे ओढूनताणून हास्य निर्माण करण्याचे केविलवाणे प्रयत्न का करतात ते कधीच कळालेले नाही. नुकताच पाहिलेला "आजचा दिवस माझा" तसाच.
सर्वोदयी हास्य चेक करायला हवे :)

मी-सौरभ's picture

28 May 2013 - 11:20 pm | मी-सौरभ

एक केवळ मराठीत पार्श्वगायन करणारा, तेही अमुकसाठी गात नाही अन तमुकला माझा आवाज शोभणार नाही अशी तत्वं असलेला.. हा गायक मुंबईत सी व्यू असलेला उंच टेकडीवरचा (अर्थातच मलबार किंवा तत्सम हिलवरचा) बंगला, प्रचंड आवार अन बाग असलेली जागा.. आणि मर्सिडीज गाडी वगैरे अशा थाटात फिरण्याइतका पैसा कमवत असेल हे मानणं जड गेलं. हे सर्व निर्माता किंवा हिंदीतल्या नंबर एक सुपरस्टारलाच शक्य आहे.

स्पॉट फिक्षिन्ग करत असतील महागुरु फावल्या वेळात ;)

आदूबाळ's picture

29 May 2013 - 11:30 am | आदूबाळ

स्पॉट फिक्षिन्ग कशाचं? एकापेक्षा एकचं? :)) :))

..
बायको पुण्याची असेल. :)

"सचिनचा चित्रपट म्हणून पाहायला जात असाल तर खुशाल जा.....पैसा नक्कीच वसूल होतो..." म्हणजे नक्की कसा?

(एकुलता एक) पुणेकर

चंबु गबाळे's picture

27 May 2013 - 2:26 pm | चंबु गबाळे

माफ करा पण मला परीक्षण कुठेही दिसले नाही. असे वाटले की कुणीतरी मला चित्रपटाची कथा सांगतय आणि मी कंफ्युझ्ड होतोय. बाकी वाचकांना 'परीक्षण' आवडले हेच मला खटकले. परीक्षणात "का पाहावा?" आणि "का पाहू नये?" आवडले.
गविंचे परीक्षण मार्मिक वाटले. वाचताना मजा आली.

वेल्लाभट's picture

27 May 2013 - 3:30 pm | वेल्लाभट

हाहाअहाहाहाहाह! छान आहे परीक्षण... बघणार नव्हतोच... आता नाहीच.

मीउमेश's picture

28 May 2013 - 11:02 am | मीउमेश

सचिन,
सचिन क्रिकेट खेळाचा माहागुरू, समजूतदारपणा दाखवून निवृत्ती घेतोय वयाच्या 40व्या वर्षी
सचिन पिळगावकर कधी घेतील कोण जाणे.... अजुन किती दिवस ह्यांना टी व्ही वर बघावे लागणार??

अवांतर : सचिन पिळगावकर काही दिवसापूर्वी म्हणाले होते की ते अभिनयात अमिताभ बच्चन हून सुधा जेष्ट आहेत... कारण ते वयानी जरी अमितजी पेक्षा लहान असले तरी त्यांचा वावर चित्रपट क्षेत्रात जास्त काळापासून आहे.

काय म्हणावे

अवांतर : सचिन पिळगावकर काही दिवसापूर्वी म्हणाले होते की ते अभिनयात अमिताभ बच्चन हून सुधा जेष्ट आहेत... कारण ते वयानी जरी अमितजी पेक्षा लहान असले तरी त्यांचा वावर चित्रपट क्षेत्रात जास्त काळापासून आहे.

व्वाह!! :-))

सोर्स आहे का..? एखादी लिंक..?

नै तुमच्यावर अविश्वास नै.. पण हा विनोद चेपूवर शेअर करायला लै लै आवडेल.

पैसा's picture

28 May 2013 - 11:40 pm | पैसा

हा माझा मार्ग एकला मधे (१९६३) सचिन बालकलाकार होता. कदाचित त्यापूर्वीपासून काम करत असावा.

खटपट्या's picture

29 May 2013 - 12:33 am | खटपट्या

बरोबर, सचिन पिळ्गावकर असे मानतात की तेव्हापासून (१९६३) ते चित्रपट स्रुष्टीमध्ये आहेत. आणि हा काळ जवळजवळ पन्नास वर्षान्चा आहे. न्हणून ते अमिताभ पेक्षा जेष्ठ !!!!!

शिल्पा ब's picture

29 May 2013 - 12:57 am | शिल्पा ब

फक्त चित्रपटसृष्टीत असल्याबद्दलच स्वत:ला जेष्ठ समजताहेत तोपर्यंत ठीक आहे...अभिनयाच्या बाबतीत असलं कै बोलले हे म्हाग्रु तर सगळीकडं हसं करवुन घेतील.

मोदक राव , आमच्या ठाण्यात एकदा सचिन पिळगावकर याची मुलाखत होती. ती चुकुन बघण्याचा योग आला, तेव्हा हे महाशय स्वताहा ला अमिताभ पेक्षा जेष्ट अभिनेता असल्याच म्हणले.

त्या नंतर सर्व्वांच्या भुवाया उंचावल्या... उत्तर देताना तेच म्हणाले जे पैसा ताई म्हणाल्या तेच उत्तर मिळाले... त्यांची अभिनयाची सुरूवात ज़ाली तेव्हा अमितजी फिल्म एंडस्ट्री मधे नवते.

रेवती's picture

28 May 2013 - 7:28 pm | रेवती

हा शिनेमा पहाणार नाही.

इरसाल's picture

30 May 2013 - 9:24 am | इरसाल

हा शिनेमा पहाणार नाही

बघा बघा एक मराठी माणुस(बाई)च जर अस म्हणु लागला/ली तर का नाही मराठी निर्माते बोंबलत फिरणार की मराठी सिनेमाला वैट दिवस आलेत म्हणुन.
अरे आपण लोक त्याचे सिनेमे बघतो म्हणुनच त्याच्या डोईवरच्या विगातला एक एक केस आपला आभारी आहे.

कवितानागेश's picture

28 May 2013 - 9:09 pm | कवितानागेश

ही अशीच ष्टोरी असलेले एक मराठी नाटक होतं का पूर्वी?
स्वाती चिटणीस आणि मोहन जोशीनी काम केलेलं...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

29 May 2013 - 12:14 pm | निनाद मुक्काम प...

अगदी बरोबर

पूर्वी कार्टी श्रीदेवी ह्या नावाने व पुढे
कार्टी काळजात घुसली ह्या नावाने स्वाती व मोहन ह्यांचे नाटक होते.
त्या दोघांचा सहजसुंदर अभिनय पाहता ह्या सिनेमांचे प्रोमोज पहिले तेव्हा ह्या नाटकाची ती भ्रष्ट आवृत्ती असावी असा कयास होता , दुर्दैवाने तो खरा ठरला.
रंजना सोबत काम केलेला अशोक आठवला की सचिन ने त्याच्या कारकिर्दीची पुरती वाट आपल्या पांचट शिनेमातून लावली हे स्पष्ट दिसून येते.
सचिनच्या ५० वर्ष सिनेसृष्टीतले सो कोल्ड यश काही मराठी वाहिन्यांवर साजरे करत असल्याचे दृश्य पहिले त्यात चुकुनही एकही बॉलीवूड वाला आला नव्हता ह्यावरूनच काय ते समजून घ्यावे.

आदूबाळ's picture

30 May 2013 - 11:55 am | आदूबाळ

हिंदी चित्रपटसृष्टी थारा देईनाशी झाली की हे सितारे मराठीकडे वळतात. सचिन, महेश मांजरेकर ही उदाहरणं आहेतच. आता उर्मिला मातोंडकरही येतीये म्हणे.

सन्माननीय अपवाद म्हणजे जे कलावंत प्रामुख्याने मराठीत राहिले आणि हिंदीत कारणापरत्वे गेले, पण रमले नाहीत. उदा. नीना कुळकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे.

नव्या पिढीच्या कलावंतांचं काय होतं ते पहायचं (श्रेयस तळपदे, विद्या माळवदे, ओमी वैद्य वगैरे)

मराठी कथालेखक's picture

5 Jul 2014 - 10:36 am | मराठी कथालेखक

डॉ श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर यांनी हिंदीत छान ठसा उमटवला.
हिंदीत टूकार भूमिका केलेल्या लक्ष्याचा मात्र राग येतो आणि कीवही वाटते.

अमोल केळकर's picture

30 May 2013 - 12:14 pm | अमोल केळकर

छान परिक्षण ....

अमोल केळकर

सुधीर मुतालीक's picture

31 May 2013 - 6:36 pm | सुधीर मुतालीक

पन्नास वर्षे वेग्रे हे फारच केविलवाणे आहे कारण सचिन त्यातून आपले मोठे पण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आश्चर्य वाटते ते त्याच्या पन्नास वर्षाच्या मार्केटिंगला माध्यमांनी दिलेल्या प्रसिद्धीचे !! कै च्या कैच !!!! पिच्चर फार तर टिवीवर पाऊ !!

अवतार's picture

31 May 2013 - 7:13 pm | अवतार

त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बच्चन यांच्या आधी झाली असली तरी अभिनयाची सुरुवात नेमकी कधी झाली याबद्दल ऐतिहासिक संशोधनाची गरज आहे.

आदूबाळ's picture

31 May 2013 - 10:50 pm | आदूबाळ

अभिनय? कुठाय? कुठाय?

ज्यांना परीक्षण आवडले त्यांचे मनापासून आभार.... :) :) "प्रोफेशनल" परीक्षण म्हणणाऱ्यांचे विशेष आभार.. :) :) :)
'गवि'ना अनुमोदन....छान लिहिले आहेत....अगदीच सत्य. :

@आदुबाळ: दुनियादारी खुणावतोय...पण झपाटलेला-२ पुरताच "आपटलेला" आहे..."३डी शिवाय काहीच विशेष नाही त्यात";अस परीक्षण वाचल्याने मी तो पाहणार नाही. पण दुनियादारी पाहेन कदाचित. (विशेषत: त्यातली गाणी आणि कलाकार यांसाठी.) :)

मराठी कथालेखक's picture

4 Jul 2014 - 3:59 pm | मराठी कथालेखक

एकूलती एक थोडासा पाहूनच कंटाळलो.
अलीकडच्या काळातील दूनियादारी, झपाटलेला-२, टाईमपास, काकस्पर्श ,कुटूंब ,फँड्री ई सिनेमांनी माझी निराशा केली
मग त्यापेक्षा गजर , टाईमप्लीज ,पिपाणी उजवे वाटले. गजर आणि पिपाणीचे संगीतही खूप चांगले आहे.
बाकी सुंबरान ,कदाचित आणि श्वास (काही प्रमाणात) खेरीज अलीकडच्या काही वर्षातील इतर कोणत्या मराठी चित्रपटाने दीर्घकाळ मनात घर केल्याचे आठवत नाही.
सुंबरान सगळ्यांत अप्रतिम ....अगदी गुलजारजींच्या शैलीतली प्रेमकहाणी वाटते.