What's App अत्याधुनिक उपयुक्त एस.एम.एस द्योतक

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
6 Mar 2013 - 11:01 pm
गाभा: 

What's App उपयुक्त अत्याधुनिक एस.एम.एस द्योतक     अत्याधुनिक  उपयुक्त एस.एम.एस द्योतक

 

'' आज महत्वाच्या कामाला जायचे असल्याकारणामुळे क्लासला सुट्टी आहे, उद्याचा क्लास नेहेमीप्रमाणे होईल'' असा सरांनी What's App वरच्या क्लासच्या ग्रुप मध्ये एस.एम.एस केला आणी ८० जणांच्या चम्मुला एकदमच आनंद झाला. सरांच्या त्या मेसेज खालोखाल अतिउत्साही विद्यार्थ्यांचे यीप्पी, वुहू तत्सम संदेश वेग-वेगळ्या स्मायलींसकट रिप्लाय झळकु लागले. 'आजचा प्लॅन काय?' किंवा 'दुपारी मंगलाला कोणता लागलं रे?' असे संदेश मात्र What's App वर वैयक्तिक चर्चेत सुरु होते.

 

हा परिच्छेद लिहिण्याचा उद्देश ८० मुलांचे शैक्षणिक नुकसान, किंवा आजकालच्या पिढीबद्दल असणारे वैश्विक प्रबोधनात्मक दृष्टीकोन असा बिलकुल नसुन वाचकांना What's App च्या उपयुक्ततेबद्दल बद्दल माहिती देणे असा आहे. What's App एक मोफत एस.एम.एस सुविधा देणारे टूल आहे (इंटरनेट प्लॅन आवश्यक) काही वर्षांपुर्वी किंवा महिन्यांपुर्वी देखील एस.एम.एस अस्तित्वात होते पण ते जर १० जणांना पाठवायचे झाले तर ग्रुप मध्ये पाठवले असता पहिले एकाला, मग दुसऱ्याला, मग तिसऱ्याला अशा पद्धतीने जात पण What's App वर मात्र इकडे 'सेंड' या बटणावर टिचकी दिली की क्षणार्धात तो संदेश अमर्यादित (ग्रुप मध्ये जितके असतील तितक्या) लोकांना जातो. तुम्ही What's App वर अमर्यादित एस.एम.एस पाठवु शकता. तुम्हाला What's App वापरायचे असल्यास काही प्रमुख अटी आहेत त्या खालील प्रमाणे.

 

१) तुमच्या भ्रमणध्वनीची ऑपरेटिंग सिस्टीम ही अन्द्रोईड, ब्लॅकबेरी, नोकियाची काही निवडक सिरीस किंवा विंडोज असावी. ह्या व्यतिरिक्त भ्रमणध्वनींवर What's App वापरता येत नाही.

२) तुमचे जी.पी.आर.एस कनेक्शन चालु हवे. (इंटरनेट) जर तुमचा भ्रमणध्वनी या प्रमुख अटींमध्ये बसत असेल तर उत्तमच आहे.

 

आजच या दुव्यावरून What's App डाऊनलोड करून घ्या आणी तुमच्या मित्र-मैत्रिणींना ग्रुप मध्ये सामील व्हा. What's App ची काही प्रमुख वैशिष्ठे खालीलप्रमाणे

 

१) What's App फक्त एस.एम.एस पुरतेच मर्यादित नसुन तुम्ही यावर छायाचित्रे, चलचित्रे आणी इतर बर्याच गोष्टींचे आदान-प्रदान करू शकता.

२) एकाच वेळी अमर्यादित लोकांना एस.एम.एस सह कोणत्याही फाईल्स शेयर करू शकता.

 

तुमच्या भ्रमणध्वनी मध्ये What's App चालु शकेल की नाही हे जाणुन घेण्यासाठी ह्या दुव्यावर टिचकी द्या. जर तुमच्या भ्रमणध्वनीवर What's App चालु शकणार नसेल तरी चिंता करू नका. तुमच्या संगणकावरूनही तुम्ही What's App चा वापर करू शकता. आणी जरी तुमचा संपुर्ण ग्रुप भ्रमणध्वनीवरून What's App वापरत असेल तरी तुम्हीदेखील संगणकावरून What's App वापरून त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू शकता.

 

अधिक माहितीसाठी भेट द्या .. काही अडचण उद्भवली तर त्याखाली मांडायला विसरू नका.

 

laugh संगणकावर What's App कसे वापराल ?  laugh

इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे

आमच्याबद्दल प्रश्नोत्तरे गुप्तता धोरण

प्रतिक्रिया

विकास's picture

6 Mar 2013 - 11:05 pm | विकास

Whats app चांगले आहेच पण Viber मधे एस एम एस व्यतिरीक्त ज्याच्याकडे viber app आहे त्याला जगभरात कुठेही फोन फुकटात करता येतो!

Viber

दादा कोंडके's picture

7 Mar 2013 - 1:47 am | दादा कोंडके

इंटरनेट कनेक्टीविटीपर्यंत ठिक आहे पण त्यापुढे पिएसटीएनच्या ब्यांडविड्थचे पैसे खिशाला खार लावून कुणी भरत असतील असं वाटत नाही. ज्याला फोन करायचा आहे त्याकडे इंटरनेट असणं गरजेचं असेल तर अशी वॉइप बेस्ड अ‍ॅप्स स्मार्टवॉइप पासून ते फ्रीकॉल्स पर्यंत शेकडॉ प्रुवन ‍ॅप्स अधिपासूनच मार्केटमध्ये आहेत.

हे अगदी खरे आहे... त्यामुळे मी पण आता भारतात जास्त करुन सगळ्यांशी Viber वरच बोलते.

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2013 - 11:16 pm | श्रीरंग_जोशी

या अ‍ॅपबद्दल ऐकले आहे पण आळशीपणामुळे डाउनलोड करून वापर केलेला नाही. तसाही एस एम एस चा शुन्य वापर करत असल्यानेही फारशी गरज वाटली नाही म्हणा...

बाकी, वरील लेखात भ्रमणध्वनीऐवजी चतुरभ्रमणध्वनी हे नाम वापरावे असे सुचवतो. अजुनही बरेच लोक जुन्या प्रकारचे भ्रमणध्वनि वापरतात ज्यामध्ये नव्याने अ‍ॅप डाउनलोड करून वापरण्याचा पर्याय नसतो.

बाकी तुमच्या अ‍ॅन्ड्रॉईडसाठी... धाग्यावर भर घालावी हि विनंती.

अवांतर - ब्लॅकबेरी झेड१० लौकर ये रे एटिटि वर....

माझ्या माहितीप्रमाणे व्हाॅट्स अॅपवर ३० पेक्षा जास्त लोकांचा चमू बनवता येत नाही.

बाकी व्हाॅट्स अॅप हे एक उत्तम अॅप आहे यात शंकाच नाही.

सूड's picture

8 Mar 2013 - 8:08 pm | सूड

जास्त लोकांचा चमू बनवता येत नाही

यशोधन वाळिंबे's picture

7 Mar 2013 - 10:30 am | यशोधन वाळिंबे

@ विकास,

Viber ला Whats app पेक्षा जास्त ब्यांडविड्थ लागते असे काही तज्ञांचे म्हणणे आहे. परंतु Viber भारतात Whats app इतके लोकप्रिय नाही. हे म्हणजे फेसबुक आणी ट्विटर सारखे झाले.

@ दादा कोंडके,

अहो आत्ता तर अनेक संकेतस्थळे देखील मोफत वी.ओ.आय.पी फोन लावण्याची सुविधा देतात आणी तेही थेट नंबर वर ज्याला फोन करायचा आहे त्याकडे इंटरनेट असणं देखील गरजेचे नाही. (छोटेसे उदाहरण) काही अंशी मोफत आहे. परंतु यासारखी इतर संकेतस्थळे देखील मोफत सुविधा देण्याची सुविधा नाकारता येत नाही.

@ श्रीरंग_जोशी,

आपल्या 'चतुर' प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद. आपली सुचना नोंदवली गेली.

@ किसन शिंदे,

इतके लोकप्रिय झाल्यानंतर व्हाॅट्स अॅप हळु हळु मर्यादा वाढवत आहे. नवीनतम निश्चित मर्यादा ठाऊक नाही.

अमोल केळकर's picture

7 Mar 2013 - 11:35 am | अमोल केळकर

हे सगळे समजायला वेळ लागणार असे दिसते. तरी अभ्यास चालू केला आहे :)

अमोल केळकर

आधीच हाफिसातून १२ तास जालावर रहा आणि परत तेच तेच मोबाईलवरही! नक्को रे बाबा!
त्यापेक्षा हाफिस बंद की जाल बंद हेच उत्तम ;)

इथे हिंदुस्थानात २जीवर Whats app उत्तम चालते,पण व्हाबर नाही.वायफायवर व्हाबर चालते,तसेच ३जीवर सुद्धा चालत असावे.व्हाबर वापरुन पाहिले,ठीक वाटले. बाकी चॅटमचॅटी Whats appवरच करतो. ;)

यशोधन वाळिंबे's picture

8 Mar 2013 - 4:14 pm | यशोधन वाळिंबे

@ अमोल केळकर,
हार्दिक शुभेच्छा..!! वरून क्लिष्ट दिसत असले तरी प्रत्यक्षात इतके क्लिष्ट नाही. लवकर शिकाल..!!

@ ऋषिकेश,
:-)

@ मदनबाण,
Whats app कमी डेटा वापरते म्हणुनच वेगवान चालते वायबर पेक्षा..!!

आदिजोशी's picture

8 Mar 2013 - 5:41 pm | आदिजोशी

थोडा गॄहपाठ केला असता तर बरं झालं असतं. वातावरण निर्मीतीसाठी लिहिलेल्या पहिल्या काल्पनिक परिच्छेदात मुदलातली चूक आहे. वॉट्सअ‍ॅप गॄपमधे जास्तीतजास्त ३० लोकांना अ‍ॅड करता येतं. सरांनी ८० चा चम्मू कसा जमवला कोण जाणे. ३० चा आकडा पार करता येत नाही हा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि तसं त्यांच्याच सायटीवर लिहिलेलंही आहे.

How many contacts can I add to a group chat?

You can add up to 30 contacts in a group chat. At this time, it is not possible to increase this limit.

http://www.whatsapp.com/faq/en/general/21073373

बाकी लेख वॉट्सअ‍ॅपची तोंडओळख करून देण्याइतपत इतपत ठीक आहे.

इनिगोय's picture

8 Mar 2013 - 7:21 pm | इनिगोय

८० जणांच्या बॅचला एका what's app ग्रुपमध्ये सामावणे अशक्य आहे. कारण आजही ग्रुपसाठी ३० जणांची मर्यादा आहे.

वाॅटस् अॅपचं एक उपयुक्त फीचर असं, की अमूक एका ग्रुपला किंवा काँटॅक्ट नंबरला ठराविक काळासाठी 'म्यूट' करण्याची यात सोय आहे. त्यामुळे कामाच्या वेळात इतर कनेक्टेड अॅप्स सुरू ठेवून फक्त या अॅपला गप्प बसवता येतं.

शिवाय समोरच्या व्यक्तीची 'last seen at so & so time' ही माहितीही हे अॅप देतं. (याचा वापर कसा कसा होईल, त्यावर बरेच जोक्सही वाॅटस् अॅपवरच शेअर होत असतात ;-) )

नव्या व्हर्जनमध्ये आणखी एक माहिती उपलब्ध आहे ती अॅपच्या नेटवर्क युसेजची. मेसेजेस आणि मीडिया फाईल्सचं till date stats यात पाहता येतं.

मात्र हे अॅप पहिलं एकच वर्ष फुकट असल्याची अधिकृत सूचना आता अॅप डाउनलोड करताना येत आहे.

खादाड_बोका's picture

8 Mar 2013 - 9:46 pm | खादाड_बोका

मागच्या आठवड्यात डॉलर देवुन वीकत घेतली.....आयफोन करीता :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2013 - 2:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संगणकावर उतरवून घेतल्यानंतर A Cellular data network is required To activate whatsapp messenger. ओके च्या बटनावर क्लिक केल्यावर पुढे काहीच प्रोसेस होत नाहीहे. पुढे काय करायचं ? जरा मदत करा.

-दिलीप बिरुटे

यशोधन वाळिंबे's picture

9 Mar 2013 - 3:10 pm | यशोधन वाळिंबे

@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

युवेव सुरु करण्याआधी इंटरनेट सुरु असल्याची खात्री करून घ्या आणी तरी देखील होत नसेल तर कंट्रोल पँनल मध्ये जाऊन फायरवॉल मध्ये युवेवला इंटरनेट वापरण्याची परवानगी देण्याची पुष्टी करा.!!

@ इनिगोय,
अधिकच्या माहितीसाठी आभार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2013 - 4:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> कंट्रोल पँनल मध्ये जाऊन फायरवॉल मध्ये युवेवला इंटरनेट वापरण्याची परवानगी देण्याची पुष्टी करा.!!
फायरवॉल मधे जाऊन युवेवला इंटरनेट वापरण्याची परवानगी दिली आणि सुरु झाले.
धन्स....!!!

अडचण एक अशी दिसते वॉट्स अप एकावेळी एका नंबरवरुन एकालाच चॅटची सोय देते असे वाटते. संगणकावर टाकल्यानंतर मोबाईलवर मला व्हेरीफाय नंबरचा संदेश दिसत आहे. वॉट्स अ‍ॅप संगणकावर उतरवल्यानंतर तिथे मराठीतून लिहिताही येत नाही वाटतं. ?

-दिलीप बिरुटे

यशोधन वाळिंबे's picture

9 Mar 2013 - 4:55 pm | यशोधन वाळिंबे

हो आधी वेरीफिकेशन नंबर टाकुन तुमचा नंबर वेरीफाय करून घ्या. आणी मराठीतुन लिहिण्यासाठी अजुन संशोधन चालु आहे परंतु मराठी संदेश वाचण्यासाठी काही अडचण येत नाही. आणी जोपर्यंत तुमचे मित्र-मंडळी तुम्हाला एखाद्या ग्रुप मध्ये सामावुन घेत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रुप चँट करू शकत नाही. यावर उपाय म्हणजे स्वतः ग्रुप तयार करून तुमच्या मित्र परिवाराला सामावुन घ्या..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2013 - 5:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> मराठीतुन लिहिण्यासाठी अजुन संशोधन चालु आहे
बरं....!!! संशोधनाचं काम झाल्यावर इथे लिहायला विसरु नका.

>>> आणी जोपर्यंत तुमचे मित्र-मंडळी तुम्हाला एखाद्या ग्रुप मध्ये सामावुन घेत नाही तोपर्यंत तुम्ही ग्रुप चँट करू शकत नाही.

आमचा तिकडेही वाट्सपवर एक गृप आहे. आणि आम्ही अँड्रॉइडफोनवरुन वॉट्स अ‍ॅप वर मस्त मराठीत चॅटा मारतो. म्हणजे आम्हाला तिकडून चांगला लिहिता येतं. मला वाटलं होतं वॉट्सप संगणकावर उतरवल्यावर जरा भर भर टायपीन. पण, ते काही शक्य दिसत नाही. असो, मदतीबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

कि त्याचा अमर्याद कालासाठी वापर करु शकतो?

कि त्याचा अमर्याद कालासाठी वापर करु शकतो?

प्रत्येकवेळी निरोप पाठवतांना तुम्ही दिवसभरात पाहिलेल्या वेबसाइटची यादी त्या कंपनीला तुमच्या चतुरभ्रमण पाठवत असतो . ती माहिती जाहिरातदारांना देऊन त्यांच्याकडून अॅपस् बनवणाऱ्‍यांना उत्पन्न मिळते व त्यातला काही वाटा ऑपरेटिंग सिस्टिँमला मिळतो .धंध्यासाठी वापरायच्या फोनमधून याचा वापर जपूनच करावा .

यशोधन वाळिंबे's picture

9 Mar 2013 - 8:14 pm | यशोधन वाळिंबे

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,

नक्की लिहु..

@ कंजूस,
होय, तुमचा मुद्दा पटला पण तरी देखील जर अॅपस् बनवणारे जर शेर असतील तर जगात त्यांच्या तुलनेत कित्येक पटीने सव्वाशेर बसलेत..!! अशी हेरगिरी रोखण्यासाठीदेखील अनेक अॅपस् कंबर कसुन तयार आहेत.. फक्त इन्स्टाल करण्याची खोटी..!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2013 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाट्सपची फूकट व्हर्जनची एक महिना मूदत राहीली आहे. विकतचा पर्याय माझ्यासाठी तितका सोपा दिसत नाही.
काही पर्याय आहे का ? दुसरा भ्रमनध्वनी क्रमांकाने रजिष्टर केले की पुन्हा एक वर्ष मिळेल. पण पूर्वीच्याच नंबरला हे जमलं असतं तर बरं राहीलं असतं ?

-दिलीप बिरुटे

यशोधन वाळिंबे's picture

18 May 2013 - 1:04 am | यशोधन वाळिंबे

दिलेला उपाय काम करतोय का बघा..!! (स्वतः तपासलेला नाही)

सर्वात आधी वाट्सपची सुरु करा..

आणी

Option > About > Account Info > Option > Delete Account

मग Delete All Your Whatsapp Service Payment Information असे निवडा..

आता उरलेल्या किरकोळ गोष्टी पूर्ण करा.. त्यानंतर पुन्हा वाट्सपची इंस्टाल करा.. परत एक वर्ष चकटफू ..!!

गणामास्तर's picture

18 May 2013 - 10:36 am | गणामास्तर

बिरुटे सर, मला सुद्धा काही दिवसांपुर्वी हाचं प्रश्न पडला होता..पण एक वर्ष पुर्ण होऊन आता ३ महिने
झाले तरी माझे फूकट व्हर्जन चालूचं आहे (त्याच क्रमांकावर). बघा, जर आपोआप नाही झाले तर
वरील उपाय करुन बघा..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 May 2013 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाळिंबे आणि गणामास्तर, माहितीबद्दल धन्स. अजून एक महिन्यांनी प्रयोग करुन पाहीन.

-दिलीप बिरुटे

कंजूस's picture

18 May 2013 - 11:35 am | कंजूस

मला वाटते पूर्ण कळपट असणाऱ्या फोनवर साधारणपणे हे अॅप चालते . नोकिआ आशा ३०२ च्या स्पेसिफिकेशन मध्ये व्हिओआईपी आहे ते कसे चालते ?

कळपट? अच्छा.. कीबोर्ड होय. मी खरंच चकले.