गाभा:
मी लहान पणा पासून पाठ्यपुस्तकमधून वाचत आलो आहोत की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके म्हणून, परंतु मी मागे जेजुरी येथे गेलो असता त्या ठिकाणी मला ऊमाजी नाईक यांचा पुतळा दिसला व त्या खाली त्यांचा जन्म दिनांक हा 7 सेप्टेंबर 1791 व मृत्यू दिनांक 3 फेब्रुवरी 1832 असा दाखवलेला होता व इंग्रंजासोबत त्यानी केलेला संघर्ष सांगितला होता. आता मुद्दा हा आहे की वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म हा 4 नोवेम्बेर 1845 साली झाला. इंग्रजानी ऊमाजी नाईक याना 3 फेब्रुवरी 1832 रोजी फासावर चढवले असेल तर मग फडके आद्य क्रांतिकारक कसे?
प्रतिक्रिया
5 May 2013 - 6:16 pm | ढालगज भवानी
बॉर्र!! बदला इतिहास. बी/सी-ग्रेडी धागा वाटतोय.
6 May 2013 - 12:29 pm | DAGDU
कोणालाही काहीही लेबल चिकटवताना थोडासा विचार का नाही करत तुम्ही, माझ्या प्रश्ना मध्ये तुम्हाला काय वावगे दिसले? मला जो प्रश्न पडला होता तो मी इथे मांडला, मला काहीतरी योग्य उत्तर मिळेल ही अपेक्षा होती, परंतु बहुतेक सदस्य काहीबाही प्रतिसाद देत आहेत.
बाकी विकास यांचा प्रतिसाद समतोल वाटला.
6 May 2013 - 8:09 pm | ढालगज भवानी
माफ करा :(
धागा वाचल्यावाचल्या तशी शंका आली. जेन्युइन शंका असेल तर स्वागतच आहे.
यापुढे सुधारणा केली जाईल.
5 May 2013 - 6:19 pm | परिकथेतील राजकुमार
'त्या' नाहीतर 'ह्या' आयडीने, पण धाग्यांचा रतीब घातलाच पाहिजे नाही का? :)
5 May 2013 - 6:23 pm | पक पक पक
मी लहान पणा पासून पाठ्यपुस्तकमधून वाचत आलो आहोत
मग आत्ता देखील वाचुन सोडुन द्या ;)तसही आत्ता काही कोणती परीक्षा देणार आहात काय.. ?
5 May 2013 - 6:26 pm | विसोबा खेचर
ना नाईक, ना फडके. माझ्या मते शिवराय हेच आद्यक्रांतिकारक होते...
6 May 2013 - 12:55 am | टिवटिव
तात्यांशि सहमत
5 May 2013 - 7:04 pm | मुक्त विहारि
तुम्हाला व्हायचे असेल तर तुम्ही पण व्हा.
माझे काही म्हणणे नाही.
5 May 2013 - 7:38 pm | अमोल खरे
>तुम्हाला व्हायचे असेल तर तुम्ही पण व्हा.
फिस्सकन हसायला आलं. सही आहे =))
5 May 2013 - 11:47 pm | सूड
>>तुम्हाला व्हायचे असेल तर तुम्ही पण व्हा.
अगदी अगदी !!
5 May 2013 - 7:25 pm | प्यारे१
ओके. मान्य, उमाजी नाईक होते आद्य क्रांतिकारक.
पुढं?
5 May 2013 - 7:27 pm | प्यारे१
बाकी आता हे
आद्य क्रांतिकारक कोण? DAGDU
असं दिसतंय.
5 May 2013 - 7:33 pm | आशु जोग
ज्याने चाकाचा शोध लावला तो खरा क्रांतिकारक.
The man who discovered wheel, really created revolution.
बा द वे
ते नंतर
5 May 2013 - 7:55 pm | इनिगोय
भारीच!
5 May 2013 - 8:04 pm | तर्री
भगीरथ आणि साबीर भाटिया हे खरे क्रांतिकारक ! (कै च्या कै धागा मग कै च्या कै प्रतिसाद )
5 May 2013 - 8:26 pm | विसोबा खेचर
लै भारी... :-)
5 May 2013 - 9:45 pm | आशु जोग
साबीर भाटिया म्हणजे गरमागरम टपालवाला का !
आय अॅम डॅम सिरीयस !
5 May 2013 - 8:56 pm | परिकथेतील राजकुमार
आमच्या मते, आंतरजालावरील खरा क्रांतिकारक म्हणजे आमचा तात्याबा. :)
काय तात्या ?
5 May 2013 - 10:54 pm | पक पक पक
अरे आम्ही तुम्हाला समजत होतो पराण्णा.. ;)
5 May 2013 - 9:12 pm | आनन्दा
१८५७ पूर्वी भारतात इंग्रजांचा एकछत्री अंमल नव्हता.. त्यापूर्वी ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य होते. १८५७ नंतर राणीचे राज्य आले. त्यानंतरचा हा पहिला उठाव.
तुम्ही म्हणता तो न्याय लावयचा झाला तर १८५७ म्ह्ध्ये लढलेले सर्वच क्रांतिकारक होतील.
5 May 2013 - 9:15 pm | शैलेन्द्र
"फडके आद्य क्रांतिकारक कसे?"
तसं म्हणायची पद्धत आहे म्हणून, बाकी आद्य वगैरे काही नसतं..
5 May 2013 - 9:38 pm | अत्रुप्त आत्मा
@आद्य क्रांतिकारक कोण?>>> हा धागा! :-b
5 May 2013 - 9:49 pm | प्यारे१
त्यांनी 'कर्ता' विचारलाय, तुम्ही 'कर्म' सांगताय ;)
5 May 2013 - 10:55 pm | पक पक पक
बरं ! धागाकर्ता म्हणा..
5 May 2013 - 11:28 pm | अत्रुप्त आत्मा
@त्यांनी 'कर्ता' विचारलाय, तुम्ही 'कर्म' सांगताय smiley>>> कर्म'तुमचं!!! मी त्याच'कर्ता सांगितलं ;-)
5 May 2013 - 11:20 pm | आदूबाळ
बर्मंग??
6 May 2013 - 12:58 am | बॅटमॅन
सगळी उत्तरे चूक. जगात पहिल्यांदा आपल्या मुलीचे नाव क्रांती असे ठेवणारा बाप हाच खरा आद्य क्रांतिकारक आहे.
6 May 2013 - 1:11 am | विकास
श्री. बॅटमॅन यांच्या भुमिकेशी सहमत. पण तरी देखील प्रश्न पडतो: जर पहील्यांदा क्रांती असे नाव ठेवल्या गेलेल्या मुलीचे, ते नाव हे वडीलांच्या ऐवजी, आई, आत्या, काका, मामा, मावशी, आजी, आजोबा यांच्यापैकी कोणी ठेवले असेल तर? मग अजून एक धागा काढावा लागेल. ;)
6 May 2013 - 1:17 am | बॅटमॅन
नाव कोणीही ठेवले असले तरी बापच क्रांतिकारक ठरतो हो, क्रांतीचे कारक नैतरी कोण ;)
6 May 2013 - 1:26 am | मुक्त विहारि
आद्य "क्रान्ति-कारक" = मनोज कुमार... त्याने एक छान सिनेमा काढला होता... क्रांती... नावाचा..
आणि
हे सिनेमे वाले नेहमी म्हणातात....की ये मेरा प्रॉडक्शन है....
6 May 2013 - 7:03 am | श्रीरंग_जोशी
यावरून ऑटोरिक्षावर लिहिलेले एक बोधवाक्य आठवले.
एक में शांति, दो में क्रांति!!
6 May 2013 - 12:40 pm | संजय क्षीरसागर
और तीनमे उत्क्रांती.
6 May 2013 - 10:30 pm | मुक्त विहारि
और चार में संक्रांती....
6 May 2013 - 10:39 pm | श्रीरंग_जोशी
एक किंवा दोन, बस्स!! हि परिवार कल्याण मंत्रालयाची '३ टोमॅटो - १ बरणी'वाली जाहिरात आठवली.
माझ्या एका मित्राकडे (३ भावंडे असल्याने) दर वेळी आमची बरणीच मोठी आहे असे वाक्य सदर जाहिरात लागल्यावर म्हंटले जायचे.
6 May 2013 - 11:25 pm | संजय क्षीरसागर
और फिर नो एंट्री!
6 May 2013 - 7:42 am | विकास
उमाजी नाईक खोमणे ह्यांच्याबद्दल जे काही जालावर वाचले त्यावरून त्यांनी किमान महाराष्ट्रात तरी ब्रिटीशांच्या विरोधात प्रथम लढा दिल्याचे दिसते. त्यांच्यावर १९६० साली गजानन जहागिरदार यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट देखील आहे. असेच मी मध्यंतरी एका कार्यक्रमात उत्तर भारतातील एका क्रांतिकारकाबद्दलही ऐकले होते. आत्ता नाव लक्षात नाही. त्यामुळे ब्रिटीशांच्या आगमनानंतर अनेकांनी मागेपुढे त्यांच्याशी लढे दिले असल्याचे लक्षात येते. त्यात १८५७ चे तमाम स्वातंत्र्यसैनिक देखील येतात. पण ते सर्व इस्ट इंडीया कंपनीच्या विरोधात होते हा एक भाग झाला.
ब्रिटीशराज अस्तित्वात आल्यानंतर वासुदेव बळवंत फडक्यांनी एके ठिकाणी वाचल्याप्रमाणे, उमाजी नाईकांमधून प्रेरणा घेऊनच विविध जातींमधील लढवय्यांना एकत्र करून ब्रिटीश राज्याच्या (ईस्ट इंडीया कंपनिच्या नाही) विरोधात सशस्त्र लढा दिला. त्यातून पुढील अनेक क्रांतिकारकांनी प्रेरणा घेतली, केवळ महाराष्ट्रातीलच नाही. असे म्हणतात की आनंदमठ कांडंबरीत देखील काही प्रसंग हे फडक्यांच्या जीवनातील प्रसांगावर आधारीत होते. त्यामुळे त्यांना ब्रिटीश राज्याच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणारा आद्यक्रांतिकारक समजले जाऊ लागले. तेव्हढ्यापुरतेच त्याचे महत्व आहे आणि द्यावे. नाहीतर असेच वाद घालायचे झाले तर स्वतःपेक्षा हजारो वर्षांनी मोठ्या असलेल्या देशाचे गांधी राष्ट्रपिता कसे आणि कस्तुरबांना राष्ट्रमाता का म्हणले जात नाही असे म्हणून पण वाद घालू लागाल आणि ते कुठल्या प्रेरणेतून म्हणले गेले या कडे दुर्लक्ष करू लागाल. असो.
6 May 2013 - 9:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उमाजी नाईक यांच्याबद्दल अधिक माहिती (मराठी विकि)
-दिलीप बिरुटे
6 May 2013 - 12:06 pm | बॅटमॅन
लहुजी वस्ताद हे उमाजी नाईक यांच्या जरा अगोदर असल्याचे वाचले आहे आणि त्यांनीही ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला होता असे वाचण्यात आले होते. आत्ता अधिक आठवत नाही.
6 May 2013 - 9:41 pm | शैलेन्द्र
उमाजी नाईक की जोतीबा फुले?
10 May 2013 - 10:55 am | चिंतामणी
इथे चांगली माहिती आहे.
10 May 2013 - 12:15 pm | बॅटमॅन
वा चांगली माहिती आहे. धन्यवाद!
10 May 2013 - 10:51 pm | फारएन्ड
धन्यवाद. चांगली माहिती मिळाली.
(फक्त ते शालेय शिक्षणापासून वंचित कळाले नाही. साधारण १८०० साल असेल - तेव्हा आतासारख्या शाळा मुळातच नसतील ना?)
6 May 2013 - 3:29 pm | ज्ञानोबाचे पैजार
गुललोबाला विचारल्यावर उमाजी नाईक व वासुदेव बळवंत फडके, शिवाजी महाराज सोडुन खालील उत्तरे देखिल मिळाली
मंगल पांडे
स्वा. सावरकर
राघोजी रामजी भांगरे
संगोळी रायन्ना
मदनलाल धिंग्रा
राजाभाऊ पाटील पर्यटन व्यवसायातील आद्य क्रांतिकारक
या सगळ्यांचा पण एकदा फैसला व्हायला हवा.
त्यांनी कार्य बिर्य काय केले ते नंतर पाहू. त्या कार्या पासुन प्रेरणा घेणे तर नक्कीच महत्वाचे नाही.
6 May 2013 - 3:38 pm | तर्री
या सगळ्यांचा पण एकदा फैसला व्हायला हवा.
त्यांनी कार्य बिर्य काय केले ते नंतर पाहू. त्या कार्या पासुन प्रेरणा घेणे तर नक्कीच महत्वाचे नाही.
शिवाय त्यांनी काय काम केले त्यापेक्षा ते कोणत्या जातीचे आहेत तेच काहीना महत्वाचे वाटते.
6 May 2013 - 6:01 pm | मुक्त विहारि
असेल, असे पण असेल....
शक्यता नाकारता येत नाही....
7 May 2013 - 8:53 am | अजातशत्रु
कि फाजीलपणाचा कळस ?
संपादित
तुमचा प्रश्न आणि तुम्हाला माहित झालेले उत्तर योग्यच आहे .
(कुणाचाहि निषेध करुन कि-बोर्ड खराब करायचा नाहि)
त्यामुळे
बाकी चालू द्या
7 May 2013 - 10:02 am | मैत्र
कुठल्याही विधानांबद्दल कसलाही आधार नसताना आणि कुठल्याही मुद्द्यांना उत्तरे न देणारे
एका धाग्यावर समर्थन करायला आले जिथे धागा मुळात एका माहीतीवर आधारित आहे. त्यावर नीट उत्तरही दिले गेले आहे. धागाकर्ताही व्यवस्थित मुद्दा मांडतो आहे.
पण लगेच आपली टिमकी वाजवायला पुढे. "तुम्हाला माहित झालेले उत्तर योग्यच आहे -- म्हणजे तुम्हाला स्वतःला जे हवे असेल तेच उत्तर योग्य आहे."
7 May 2013 - 3:55 pm | अजातशत्रु
कुणी नीट उत्तर दिलेय?
तुम्हाला स्वतःला जे हवे असेल तेच उत्तर योग्य आहे.
मला कशाला हवे?
वर जन्म आणि मरण तारखा दिलेल्या आहेत
त्यावरून अनुमान काढणे हा साधारण माणसाचा साधा नियम आहे
तो इथे इथल्या असामान्य माणसांकडून कसा मान्य केल्या जाईल?
श्री छत्रपतिंच्या जन्मतारखेत गोंधळ घालणार्यां त्याना उपलब्ध करुन दिलेल्या तारखेवर विश्वास ठेवणे हे अशक्यप्रायच आहे
7 May 2013 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
मिपावरील आद्य क्रांतिकारक म्हणून 'अ-जात शत्रुंना' घोषीत करा आणि वाद मिटवा.
7 May 2013 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार
वरती 'अजातशत्रु' असे वाचावे.
संपादनाची सोय नसली की असे घोळ होतात.
क्षमाप्रार्थी
परा
7 May 2013 - 5:26 pm | अजातशत्रु
तुम्ही कितीही डिवचले तरी,
माझे प्रतिसाद मात्र तुमच्या वर्मी का लागतात बुवा :-)?
जरा खेळीमेळीने घ्या की .. घ्या की
रडीचा डाव कशाला?
(भाकडकथेतील सू-कुमार)
7 May 2013 - 6:19 pm | मैत्र
यापूर्वी अनेकदा तुम्हाला उत्तरे दिल्यावर किंवा मुद्देसूद प्रश्न विचारल्यावर तुम्ही गायब झाला आहात तरीही --
http://www.misalpav.com/comment/484814#comment-484814
यावर धागाकर्ते DAGDU यांनी http://www.misalpav.com/comment/484894#comment-484894
हा प्रतिसादही दिला होता.
पण नसलेली खरूज खाजवून निर्माण करण्याची तुमची जुनी सवय मात्र जात नाही.
चर्चा चालू आहे उमाजी नाईक आधी जन्म मृत्यू झाला म्हणून आद्य का वासुदेव बळवंत प्रत्यक्ष ब्रिटिश राज्याविरुद्ध लढले म्हणून आद्य याची. तुम्हाला यात विनासंदर्भ मध्येच १८३२-१९१० याहून २०० - २५० वर्ष मागे जाऊन छत्रपती आणि त्यांच्या जन्माचा वाद आठवतो ही तुमची वृत्ती..
अनुल्लेखाने सोडून काही होत नाही. बळंच उकरलेला मुद्दा बंद करावा लागतो म्हणून नाईलाजाने हा प्रतिसाद..
7 May 2013 - 11:21 am | मन१
एक उपप्रतिसाद वगळता श्री DAGDU पुन्हा धाग्याकडं फिरकलेलेही दिसत नाहित.
मिपाकर आपले नरडे ताणून निषेध, टोमणे, सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न वगैरे करताना पाहून त्यामुळेच मजा वाटली.
7 May 2013 - 4:32 pm | DAGDU
मजा वगैरे वाटण्याचा काही प्रश्नच नाही, उलट उद्वेग वाटत आहे हा धागा पोस्ट केल्या नंतर, "परीकथेतील राजकुमार", "पकपकपक", "मुक्त विहारी", "अमोल खरे", "प्यारे1" यांनी जी उत्तरे दिली आहेत ते पाहता मिपा वर विद्वान मराठी बांधव असतील हा भ्रम दूर झाला, माझ्या प्रश्नामध्ये वावगे काय आहे हेच मला कळत नाहीये, एक क्रांतिकारक व्यक्ती इंग्राजासोबत लढून फासावर गेल्यानंतर दुसरी क्रांतिकारक व्यक्ती जन्मते, पण दुसर्या व्यक्तीला आद्य क्रांतिकारक का म्हणतात हा प्रश्न पडल्यामुळे हा धागा काढला होता, बाकी काही म्हणा मूळ प्रश्नाचे योग्य उत्तर न देता काही बाही खरडनारे लोकच येथे तोरा मिरवत असताना मला खरेच येथे फिरकायची इच्छाच झाली नाही.
7 May 2013 - 7:47 pm | क्लिंटन
म्हणूनच म्हणतो: आद्य क्रांतिकारक कोण या प्रश्नाचे उत्तर: आई शप्पथ सांगतो मी नाही.
7 May 2013 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
DAGDU
सदस्यकाळ
2 years 2 months
DAGDU
Primary tabs
द्रश्य
वाचनखुणा
Track(active tab)
प्रकार लेख लेखक प्रतिसाद शेवटचे अद्यतन
काथ्याकूट आद्य क्रांतिकारक कोण? DAGDU 49 2 min 46 sec ago
तुम्ही ह्या आधी इथे ह्या सदस्यनामाने किती फिरकला आहात, ते दिसते आहेच. :)
बदकाला पोहायला आणि बापला ...... शिकवू नये म्हणतात. उद्वेग आला असेल, तर मी उजव्या हाताचे 'गमन' हे बटन दाबतो.
7 May 2013 - 5:22 pm | अजातशत्रु
हा प्रतिसाद साजेसाच म्हणावा लागेल
बदकाला पोहायला आणि बापला ...... शिकवू नये म्हणतात. उद्वेग आला असेल, तर मी उजव्या हाताचे 'गमन' हे बट
7 May 2013 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
माझे प्रतिसाद मात्र तुमच्या वर्मी का लागतात बुवा :) ?
जरा खेळीमेळीने घ्या की .. घ्या की
8 May 2013 - 1:51 am | विश्वनाथ मेहेंदळे
जाऊ द्या हो पराभाऊ, त्यांच्या बदकाला पोहायला येत नसेल, म्हणून वर्मी लागला असेल घाव.
7 May 2013 - 5:31 pm | अजातशत्रु
असो,
तुमचे भले होवो
संपादित
7 May 2013 - 7:19 pm | चेतनकुलकर्णी_85
चला म्हणजे आता कुठे वासुदेव फडक्यांच्या पुतळा जर महाराष्ट्र असला तर तो पण रातोरात गायब केला जाऊ शकतो…
दादोजी नंतर आता हे ब्रिगेडी पोवेरफुल (??)रडार वर आलेले दिसत आहेत.
7 May 2013 - 10:24 pm | मुक्त विहारि
चालायचेच, असे म्हणून सोडून द्या...
8 May 2013 - 3:08 pm | निश
ब्रिगेडी पोवेरफुल (??) कसले?, हल्लीच ऐका साहित्य संमेलना आधि साहित्य संमेलन होऊ देणार नाही म्हणून बोंब बोंब बोबलले व मग योग्य त्या लोकांकडुन योग्य ती समज मिळताच परत शेपुट घालुन बिळात जाउन लपले. शांत लोकांना उगाच डिवचतात व मग त्या लोकांनी दम दिला कि बिळात घुसतात लपुन बसायला. हे कसले ब्रिगेडी ब्रिगेडी पोवेरफुल हे बिळलपु शेपुटफूल..
8 May 2013 - 3:24 pm | मुक्त विहारि
हिंदूस्थानाचा खरा शत्रू कोण , हेच त्यांना माहित नाही.
8 May 2013 - 9:07 pm | अजातशत्रु
ह मों.चा बहुतेक?
12 May 2013 - 4:09 pm | संजय क्षीरसागर
(स्मायली सौजन्य अ. आ.)