नेपोलियन, दासबोध आणि स्त्री-आयडींची त्सुनामी

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
3 May 2013 - 11:58 pm
गाभा: 

नेपोलियनच्या इजिप्त आणि अन्य देशांच्या स्वार्‍यांमधून त्याला अगणित सोनेनाणे, जडजवाहिर, अमूल्य कलाकृती आणि दुर्मिळ ग्रंथसंपदा लाभली, हे सर्वविदित आहेच. पॅरीसच्या लूव्र संग्रहात यापैकी बहुतांश वस्तू संग्रहित आहेत. छत्रपती शिवाजी महारांजांचे डच चित्रकाराने रंगवलेले चित्र, हे त्यापैकीच एक.
नेपोलियनच्या पाडावानंतर काही कलाकृती व इतर वस्तू अन्य लोकांच्या हाती लागून त्या आजतागायत पॅरिसमधील विविध पुराणवस्तू विक्रेत्यांकडे उपलब्ध असतात. गल्ल्या-बोळातील लहान लहान दुकानातूनही केंव्हा कोणती अमूल्य वस्तू आढळेल, हे सांगता येत नाही. त्या विकत घेणे शक्य नसले, तरी त्यांचा शोध घेत फिरणे हा माझा आवडता उद्योग. अश्याच एक भटकंतीत एका दुकानात फ्रेम केलेली देवनागरी लिपीतील जुनाट पोथ्यांची काही पृष्ठे नजरेस पडली. जवळ जाउन बघताच मी चाटच पडलो, कारण त्या चक्क मराठीतील ओव्या होत्या. वाचताक्षणीच त्यांचे दासबोधाशी असणारे साम्य उमगले, पण त्यातील शब्द- रचनेमुळे मी बुचकळ्यात पडलो. त्या ओव्या खालील प्रमाणे होत्या:

१. असो जाले ते जाले..नेणतेपणे होवोन गेले..स्त्रीनामे वावरले..पाहिजे आता.
२. असो ऐसा प्रसंग जाला..जाला तो होवोन गेला..आतातरी आपणाला..स्त्रीनामे भूषवावे.

यातील 'स्त्रीनाम' याचा काही केल्या उलगडा होइना. मग मला वाटले, की चुकीने 'श्रीराम' ऐवजी 'स्त्रीनाम' लिहिले गेले असावे.

त्या दुकानदाराशी बोलण्याचा प्रयत्न फ्रेंच भाषेच्या माझ्या अज्ञानामुळे विफल झाला, परंतु त्याने त्याच्या रजिस्टरमधील जी नोंद दाखवली, त्यावरून या वस्तू १९२८ पर्यंत पॅरिस मधील 'शातो द होल्कार' मध्ये, अर्थात इंदुरचे संस्थानिक तुकोजीराव होळकर यांच्या भव्य प्रासादात होत्या असे कळले. याखेरीज मात्र तो दुकानदार काहीच सांगू शकला नाही.

हा प्रसंग उलटून वर्षभर झाले आणि तो माझ्या विस्मृतीत गेला. परंतु परवा एका पाठोपाठ घडलेल्या तीन घटनांमधून अचानक मला वेगळाच साक्षात्कार झाला आणि त्या ओव्या जर समर्थ लिखित असल्या, तर समर्थांची भविष्यात डोकावण्याची कुवत आणि त्यांचे द्रष्टेपण, यांच्या प्रचीतीने अक्षरश: भारावून गेलो. या तीनही घटना म्हणजे मला माझ्या मित्रांचे आलेले खालील फ़ोन:

१. माझ्या 'अगदी सोपी फिटनेस टेस्ट' वर आलेले प्रतिसाद वाचत असता खिशातले चल-दूरध्वनी यंत्र निशब्दपणे थरथरले. बघतो, तो माआखामिझामि क्र.७ (माझ्या आग्रहाखातर मिपाकर झालेला मित्र क्र.७) चा फोन.

..."आय जस्ट डोंट अंडरस्टँड व्हाय दीज मिपाकर्स डोंट अंडरस्टँड"… कशाचाही जाम वैताग आला, की या मित्राला वाघिणीच्या दुधाचा पान्हा फुटतो.
"अरे काय, झालं तरी काय? …मी.
...काय म्हणजे? तुझ्या परवाच्या त्या फिटनेसवाल्या धाग्याची दोन दिवसात दोन हजार वाचनं, आणि साठ प्रतिसाद, आणि माझ्या कोणत्याच धाग्याची पन्नासावर वाचनं नाहीत, आणि प्रतिसाद किती, तर सात, बारा, फार तर फार बावीस. त्यातलेही अर्धे माझेच, 'धन्यवाद' वाले!"
"अरे वैतागू नकोस, जमेल हळूहळू..."
..."ते काही नाही, मला आता काहीतरी इलाज करावाच लागेल" म्हणून त्यानं फोन ठेवला.
संध्याकाळी पुन्हा त्याचाच फोन.
..."अरे, काहीतरी झकास, पॉवरफुल, सहा-सात अक्षरांचं, संस्कृत स्त्री-नाम सुचव ना"...
का रे बाबा, काय झालं?" मी.
... अरे सकाळी मी तुला फोन केला, ते ऐकून माझे शेजारी भाटियाजी म्हणाले की तुम्ही थर्मल बाबांना का भेटत नाही? ते सांगतील तुमच्या समस्येवर तोडगा. असं म्हणून ते मला तिथे घेऊनच गेले. माझा नंबर त्यांच्या वशिल्यानं लवकरच लागला, आणि मी बाबांना माझी समस्या सांगितली.
"क्या नाम बताया आपने? … बाबाजी.
..."जी बाबाजी, मिसळपाव डॉट कॉम"
नही भैय्या, इससे बात नही बनेगी, कोई फाइव्ह स्टार रेसिपी का नाम रखो, फिर किरपा होगी"
मग मी त्यांना सांगितले, की मिपाचे नाव बदलणे माझ्या हातात नाही, मी तिथे फक्त एकादा आयडी घेऊन लिहू शकतो, वगैरे..
"अच्छा, फिर आप जिस नाम से लिखते हो, उसमे कितने अल्फाज है?
..."जी बाबाजी, दो अक्षर है "
"इसीलिये ऐसा हो रहा है, अब आप कोइ छह-सात अक्षरोंवाला, तगडा, पॉवरफुल संस्क्रित नाम लेकर लिखो, फिर किरपा बरसनी शुरू हो जायेगी... और हां, ये नाम जनानी होना चाहिये, जनानियोंपर ज्यादा किरपा बरसती है"
"जी बाबाजी, अब ऐसाइच करुंगा", म्हणून मी बाहेर आलो, आणि लगेच तुला फोन लावलाय...
बरं, मग? … मी.
...तर तू मला आता असा एकादा स्त्री-आयडी सुचव... मित्र.
अरे सोपे आहे, तू 'मिपासुर-मर्दिनी' 'फुत्कार-सर्पिंणी' किंवा 'विक्षिप्त-विध्वंसिनी' असा काहीतरी सहा-सात अक्षरांचा, पॉवरफुल नवीन आयडी घेउन टाक... मी.
छान, छान. आताच लागतो कामाला, म्हणून मित्रानं फोन ठेवला.
+++
यातून मोकळा होतो, तो पुन्हा एक फोन, यावेळी माआखामिझामि क्र.११ चा.

..."हॅलो, अरे तू म्हणालास त्याप्रमाणे मी मिपाकर झालो खरा, पण काही मजा नाही राव त्यात. मी ऐकलंय की ज्यांनी स्त्री-आयडी घेतलेला आहे, त्यांना म्हणे "माज्याशी मयतरी करशील का" वगैरे व्यनि येतात... मला तर बुवा असलं काहीतरी रोमँटिक घडावं, असं फार वाटतंय, मला जर असा व्यनि आला ना, तर मी मस्त ऑफिसच्या एसीत बसून त्या व्यनिवाल्याला बाहेर भर उन्हात भेटायला बोलावून ताटकळत ठेवीन, आणि मग सर्व ऑफिसातले मित्र खिडकीतून त्याला बघत खिदळत बसू... आणखी असे काय काय गंमतीदार बेत आहेत माझ्याकडे. तर आता तू मला एखादं छान गुलगुलीत नाव सांग बरं स्त्री-आयडी साठी ...
...खिक्क...मला तर त्या उन्हात घामाघूम झालेल्या व्यनिवाल्याचा चेहरा डोळ्यासमोर येउन हसुच आलं...असले वात्रटपणाचे प्रकार आम्ही पूर्वी फार करत असू.
... "अरे, मग 'प्रेमप्रणयिनी' 'प्रेमविरहिणी' 'कामाक्षी' 'कामबाला' 'कामज्वाला' 'चंचला' 'कमाल मुलगी' 'सजणी' 'तुझीच रे सख्या' असा काहीतरी रोमेंटिक आयडी घे".
आणखी सुचव ना काही …
... "मग 'मधुबाला' 'मृदुबाला' 'मुग्धबाला' 'दुग्धबाला'...किंवा 'सिल्कस्मिता' 'मिल्कस्मिता' 'मधुस्मिता' 'चिकनी चमेली' असं एखादं गुलछबु नाव, किंवा 'फूलवाली, भाजीवाली, दूधवाली, असं अगदी डाउन टु अर्थ नाव घे.
"मग असं करतो, यातल्या दोन-तीन नावाचे घेतो आयडी. बघुया कुणाला प्रतिसाद मिळतो" म्हणून फोन मूक झाला.
+++

मी जरा हुश्श… करतो, तोच पुन्हा फ़ोन. हा माआखामिझामि क्र.४ चा.

अरे, वाचलंस का? मिपावर नवीन बंदिस्त महिला-विभाग सुरु झाला आहे, आणि तिथे फक्त स्त्री-आयडीनाच प्रवेश आहे म्हणे. हे म्हणजे भलतंच झालं…
.."अरे बरंय की मग ते. 'फ़ाटक्या पायपुसण्यापासुन क्रिएटिव वॉल- हँगिंग' "चला, मंगळागौरीची गाणी आठवूया" वगैरे धागे तिकडल्यातिकडेच रहातील"... मी.
"अरे कसलं, हे सगळे धागे जनरल वॉर्ड मधेच येत राहणार, आणि तिकडे स्पेशल बंदिस्त रूम मध्ये काहीतरी अगदी स्पेशल, गरमागरम, जबरदस्त मेतकुट शिजत असणार...तिकडे चंचुप्रवेश मिळवायला आता एकादा स्त्री-आयडी घेतलाच पाहिजे... मित्र.
..."मग घे तसा आयडी आणि मिळव प्रवेश"... मी.

अरे देवा, तुम्हीने दर्द दिया है, तुम्ही दवा देना...आता तूच सुचव त्यासाठी आयडी.

बरं, बरं, कळवतो मी तुला व्यनितून. पण एक लक्षात ठेव. एकदम महिला विभागात जाऊ नकोस. आधी जनरल वॉर्डमध्ये 'अंदमानच्या स्त्रियांचे प्रश्न' 'स्त्री-सबलीकरणातील संभाव्य अडचणी आणि त्यावरील उपाययोजना' 'उपासाच्या कोथिंबिरीच्या वड्या' असले धागे टाक, आणि त्यातही "ह्यांना आणि नातवंडांना फार आवडतात, म्हणून मी ह्या वड्या नेहमी करत असते"...अशी सुरुवात करायला विसरू नकोस.
+++

बघितलंत ? मला आलेले हे तीन फोन म्हणजे लवकरच येऊ घातलेल्या स्त्री-आयडीच्या त्सुनामीची नांदीच नाही काय?
धन्य धन्य ते समर्थ ज्यांना या गोष्टीचा सुगावा चार शतकांपूर्वीच लागला होता.

मिपावरील महिला विभागाची वार्ता वाचून 'हा हंत हंत, कुठून पु-आयडी घेण्याची कुबुद्धी झाली' असे वाटणार्‍यांनो, तुमच्या मदतीसाठी आम्ही इथे आता एक 'स्त्रैण-आयडी कोश' निर्माण करत आहोत: '
+++

अध्यात्मिक वगैरे आयडी:
विरागिनी , तत्वमसि, ध्यानधारिणी, तुर्यावस्थिनी, कपालभाति, कपालमोक्षिनी, कुंडलिनी इ.इ.

सोज्वळ आयडी:
आश्रमहरिणी, ब्रजबाला, लज्जागौरी , नऊवारी, पैठणी इ.

चटोर आयडी: बिकिनी, काचोळी, सिल्कस्मिता, वस्त्रविरहिता, चिकणीचमेली, इ.इ.

सुवासिक आयडी: पुष्पगंधा, कुसुमगंधा, गुलाबगंधा, केतकीगंधा, मदनगंधा, मत्स्यगंधा, कुक्कुटगंधा, अश्वगंधा, श्वानगंधा, योजनगंधा, फर्लांगगंधा, मीटरगंधा, इ.इ.

धडकीभराऊ आयडी:
'फुत्कार सर्पिणी', 'गरळ ओकिनी, 'फाशीवाली मर्दानी', 'हंटरवाली', 'भैताड भवानी', 'हडळ भवानी', 'विक्राळ विध्वंसिनी', रणचंडिका इ.

सुप्रसिद्ध आयडीवरून बेतलेले आयडी: विसूबाई खेचर, परीकथेतील राजकुमारी, प्रक्षिप्त_आदिती, कुत्सित_ आदिती, खाष्ट_आदिती, कमाल मुलगी, श्रावण मोदिका, इस्पिक राणी, चौकट छक्की, इ.इ.

पाकृ. आयडी: फलुदा कुल्फी, रंगेल-रबडी, जलेबीवाली, रसमलाई इ.इ.

संस्कृतप्रचुर आयडी: द्रुमदलशोभिनी, सुमधुरभाषिणी, दुर्गेशनंदिनी, शृंगारहारावली इ.

खरेखुरे वाटणारे आयडी: कुंदा कुलकर्णी, चंपा चावरे, अनिता आपटे, बिंदु बिल्लोरे, ज्योतिका जोशी, पुष्पा पाखरे, चंचला चाटे इ.इ.

साहित्यिक आयडी: पाषाणपालवी, काजळमाया, मोरूची मावशी इ.इ.

... तर मित्रहो, 'एकमेका सहाय्य करू, अवघे स्त्रीपंथचि धरू' म्हणून आता या कोशात तुम्हीही आपापली भर टाकाल काय ?
इति.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

4 May 2013 - 12:17 am | पिवळा डांबिस

च्यायला, नेपोलियन वगैरे पाहून त्याबद्दल काही असेल म्हणून धागा उघडला तर त्यात हा भलताच माकिविलियन!!
परीशियन शोभलात खरे!!!
:)

स्त्रीआयड्यांना भाव देणारे (आणि काव आणणारे) पण पुरुष आयडी.
नि त्यांना भाव मिळतो म्हणून जळणारे पण पुरुष आयडीच. मजाय नि काय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2013 - 12:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या ऐकलेली खबर अशी की ज्यात अनुप्रास आहे असे आयडी खोटे समजतात म्हणे! या हिशोबाने खरेखुरे वाटणारे आयडी म्हणून जे तुम्ही दिलेले आहेत ते खोटे वाटणार. त्यापेक्षा कुंदा जोशी, सुलोचना देव, वैजयंती साठे, पुष्पलता वेंगुर्लेकर अशी नावं निवृत्त स्त्रियांची नावं म्हणून अधिक शोभतील.

लज्जागौरी हे नाव सोज्ज्वळ पाहून अंमळ मौज वाटली. ढेरेंनी लावलेला अर्थ साधारण तसाच असला तरी लज्जागौरीचे फोटो पाहून मला वेगळंच काही वाटलं होतं.

आशु जोग's picture

4 May 2013 - 11:33 am | आशु जोग

लज्जागौरी हे नाव सोज्ज्वळ पाहून अंमळ मौज वाटली. ढेरेंनी लावलेला अर्थ साधारण तसाच असला तरी लज्जागौरीचे फोटो पाहून मला वेगळंच काही वाटलं होतं.

त्यांना विद्यागौरी तसं लज्जागौरी वाटलं असावं.
अभ्यास कमी पडला.

प्रकाश घाटपांडे's picture

4 May 2013 - 1:42 pm | प्रकाश घाटपांडे

हॅहॅहॅ अगदी अग्दी!

चित्रगुप्त's picture

4 May 2013 - 2:28 pm | चित्रगुप्त

ठाउक आहे हो ते लज्जगौरी वगैरे सर्व. ढेरेंची पुस्तके पण वाचली आहेत.
पण आम्ही चित्रकार, आम्हाला नग्नतेचे वावडे नाही, आणि कसलेच नाही.
आम्हाला तर ते सगळे सोज्वळच वाटते, काय करावे?

अभ्या..'s picture

4 May 2013 - 2:30 pm | अभ्या..

:)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 May 2013 - 9:36 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपल्या विशेषणांच्या आवडीमधे परस्परविरोध असला तरी मतांमधे फार नसावा. पाशवी शक्तींना एकंदरच सोज्वळ प्रकारांची अ‍ॅलर्जी. जीवाला आनंद देणार्‍या सगळ्या गोष्टी आपल्या आवडीच्या! पॅरीसला जाऊन तुम्ही मात्र कोरडेच राहिलात का काय अशी भीती वाटते आहे. ;-)

(अवांतरः पॅरीसवरून आठवलं, वुडी अ‍ॅलनचा 'मिडनाईट इन पॅरीस' पाहिला आहेत का? मला आवडला. पॅरीस, ओवेन विल्सन आणि नॉस्टॅल्जियाची टर उडवणं हे सगळंच फार मस्त आहे. तुम्ही लिहिता त्या प्रकारचा विनोदही त्यात आहे असं वाटतं.)

-- हेडॉनिस्ट पाशवी

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 4:52 pm | चित्रगुप्त

लज्जागौरी याचा ढेरेनियन संदर्भ बाजूला ठेऊन या शब्दाकडे बघितले, तर लज्जा आणि गौरी अशी फोड दिसते. गौरी पार्वतीचे एक नाव, पण त्याचा सामान्य अर्थ 'गोरी'(स्त्री) असा दिसतो, (जसे 'गौरवर्ण' 'हिमगौरी' 'गौरांगिनी' इ.)
लज्जागौरी म्हणजे लज्जेमुळे गोरी वा पांढुरकी पडलेली वा पडणारी. अर्थात लज्जायुक्त अशी स्त्री. लज्जा हा स्त्रीचा अलंकार, तेंव्हा लज्जा हे भूषण जिच्या ठायी आहे, अशी. म्हणून हे नाव 'सोज्वळ' (सोज्वळ ची फोड ब्याम्या इ. नी सांगावी. स + उज्ज्वल ?)
भितीमुळे मनुष्य पांढुरका पडतो म्हणतात. लज्जेमधे भितीचा अंश असतो का? भिती वाटल्यावर रक्तातील हिमोग्लोबीन वा लाल रक्तकण कमी होत असतात का? वगैरेवर तज्ञांनी प्रकाश टाकावा.
काही असो, आमच्या पिढीच्या लोकांना 'लज्जेने खाली मान घालून, वेणीचा शेपटा बोटाला गुंडाळत, अंगठ्याने जमीन (सारवलेली) टोकरत, मधूनच तिरपे कटाक्ष टाकत बघणार्‍या षोडश वर्षिया याची देही, याची डोळा बघायला मिळाल्या, हे अहोभाग्य. अजून ती दृष्ये आठवतात.
सांप्रतकाळी झोका फार उंच गेल्याने आजच्या तरुणांना अशी दृष्ये दुर्लभ असणार. बिचारे.

राजेश घासकडवी's picture

5 May 2013 - 6:50 pm | राजेश घासकडवी

लज्जेने चेहेरा लाल होतो, पांढरा नाही. आकर्षणातून लज्जा निर्माण होते, भीतीत लांब जाण्याची इच्छा असते.

सांप्रतकाळी झोका फार उंच गेल्याने आजच्या तरुणांना अशी दृष्ये दुर्लभ असणार. बिचारे.

आजकालच्या तरुण पिढीला बहुतेक ताकाची तहान दुधावर भागवावी लागते. बिच्चारे.

चित्रगुप्त's picture

6 May 2013 - 6:06 am | चित्रगुप्त

......लज्जेने चेहेरा लाल होतो, पांढरा नाही. ....
होय होय, खरेच की, स्मरण-रंजनात गुंग झाल्याने " लज्जेच्या प्रादुर्भावामुळे तिचे मुखकमल आरक्त होऊन अधिकच शोभायमान दिसू लागले" वगैरे विसरलोच.
शरीर-शास्त्राचे दृष्टीने लज्जा, भिती इ. भावनांमुळे चेहरा लाल वा पांढरा इ. कसाकाय होतो, हे कुणी समजवेल का?

...आजकालच्या तरुण पिढीला बहुतेक ताकाची तहान दुधावर भागवावी लागते. बिच्चारे....

कसल्याश्या क्रांतिमुळे दुग्धाचा महापूर सांप्रतकाळी जिकडे तिकडे चोहीकडे आला आहे म्हणे. तरी ताकाची लज्जत न्यारी ती न्यारीच.

राजेश घासकडवी's picture

6 May 2013 - 7:29 am | राजेश घासकडवी

कसल्याश्या क्रांतिमुळे दुग्धाचा महापूर सांप्रतकाळी जिकडे तिकडे चोहीकडे आला आहे म्हणे. तरी ताकाची लज्जत न्यारी ती न्यारीच.

हा हा हा.... ऑपरेशन व्हाइट फ्लड म्हणतात त्याला. काय पण नाव आहे!

ताकाची चव बरी लागावी म्हणून त्याला चांगली मिरची, कोथिंबीर, आलं, काळं मीठ वगैरे घालून मठ्ठा करतात. धगधगत्या दुपारी प्रवास करणाऱ्या एकांड्या शिलेदारांना ती शांती देते खरी. थोडे शौकीन लोक लस्सी वगैरे करूनही पितात. पण इलेक्ट्रिसिटी काढून घेतलेल्या पाण्याप्रमाणे दुधातून सत्व काढून घेतलेला पदार्थ तो.

चौकटराजा's picture

6 May 2013 - 8:42 am | चौकटराजा

शरीर-शास्त्राचे दृष्टीने लज्जा, भिती इ. भावनांमुळे चेहरा लाल वा पांढरा इ. कसाकाय होतो, हे कुणी समजवेल का?
आता नीट आठवत नाही पण एका पुस्तकात वाचलेले आहे की शरीरात विविध कारणानी रक्ताची आवश्यकता शरीराच्या निरनिराळया भागात वेगवेगळी निर्माण होते. भीतीच्या वेळी हात पाय याकडे ( संरक्षणाच्या भावनेने) अधिक रकपुरवठा झाल्याने चेहरा पांढरा पडतो.

चित्रगुप्त's picture

6 May 2013 - 12:25 pm | चित्रगुप्त

लज्जेच्या मुळाशी आकर्षण असते म्हटले, तर अधिक रक्तप्रवाहामुळे चेहरा अधिक आकर्षक होणार, तेंव्हा "लज्जेच्या अविर्भावामुळे मुखकमळ आरक्त होउन अधिकच शोभायमान झाले " वगैरे साहित्यिक वर्णन शास्त्रीय कसोटीवरही खरे उतरते म्हणायचे.

ढालगज भवानी's picture

4 May 2013 - 1:27 am | ढालगज भवानी

कालच कोणीतरी कोणाला तरी सांगत होते "हलकट जवानी" नाव कसय =))
मला सुचणारे- चिसौकां : ), खाष्ट सासू, अवदसा : )

ढालगज भवानी's picture

4 May 2013 - 1:30 am | ढालगज भवानी

प्रतिसादप्रिया, द्विशतककांक्षिणी देखील सुंदर वाटतं नाही? ;)

ढालगज भवानी's picture

4 May 2013 - 1:40 am | ढालगज भवानी

कंपूप्रवेशासक्ता =)), काथ्याकूट्प्रावीण्यलतिका
आता बास करते ;)

धमाल मुलगा's picture

4 May 2013 - 4:41 am | धमाल मुलगा

क्काय एकेक नावं...क्काय एकेक नावं! आँ? नुसती नावं वाचूनच आमचा चेहरा वधस्तंभाकडं नेल्या जाणार्‍या चारुदत्तासारखा झाला की! अशा नावाच्या बाया (म्हणजे, त्या बाया; बाया नसून बाप्पे आहेत हे ठाऊक असल्यानं तर अधिकच त्रास!) रोज येऊन बोर्डाची एकतर राखरांगोळी करणार नायतर संगीतबारी! अरेऽऽ....आधीच इथं हैत त्या मुलुखमैदान अन फत्तेलष्कर कमी हैत काय? :P

(स्वगतः बेट्या..मोहोळाखाली धूर करुन आणि दगड मारलायस, आत शून्य मिनिटात पळ नायतर 'चिंधड्या राई राई एव्हढ्या...' झाल्याशिवाय राहणार नाही......पळाऽऽऽ.............. )

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 8:32 am | चित्रगुप्त

कंपूप्रवेशासक्ता वरून सुचलेल्या आयड्या:

कंपूबाला, कंपूशीला, कंपूकुमारी
कंपूबालिका, कंपूचालिका
कंपूचारिणी, कंपूविचरिणी,
कंपूभद्रा, कंपूचंद्रा, कंपूचंद्रिका
कंपूशालिनी, कंपूमालिनी, कंपूवाहिनी
कंपूतारिणी,कंपूविरहिणी, कंपू-रमणी, कंपूविहारिनि, कंपूवासिनी
कंपूप्रिया, कंपूस्मिता, कंपूअस्मिता
कंपूरमणीगणमुकुटमणी, कंपूगणविदारिणी, कंपूहारिणी
कंपूभामा, कंपूभंगिमा, कंपूवर्धिनी,
कंपूभंगिनी, कंपूमर्दिनी, कंपूविध्वंसिनी, कंपूनाशिका, कंपूवारिणी, कंपूताडिनी
कंपूसंवर्धिनी, कंपूस्वप्ना, कंपूमग्ना
कंपूविलासिनी, कंपूसौदामिनी, कंपूकौस्तुभी
कंपूगौरी, कंपूशोभिनी, कंपूशरदिनी, कंपूगुंजना, कंपूप्रिता
कंपूप्रवेशदायिनी, कंपूप्रवेशहारिणी
कंपूडाकिनी, कंपूपिशाच्चिनी, कंपूलोलिता
कंपूमति, कंपूचित्ता, कंपूप्रज्ञा

सध्या एवढेच पुरे. पुन्हा भेटूच.

मदनबाण's picture

5 May 2013 - 9:16 am | मदनबाण

हॅहॅहॅ...
शॉलिट्ट... :)

(मदनगुप्त) ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2013 - 10:52 am | डॉ सुहास म्हात्रे

कंपूनामविशेषप्रकांडपंडीत चित्रगुप्ता, आमचा __/\__ स्विकारावा !

बॅटमॅन's picture

5 May 2013 - 12:16 pm | बॅटमॅन

चित्रगुप्तांच्या प्रतिभात्सुनामीसमोर साष्टांग लोटांगण!!!!!! _/\_

ढालगज भवानी's picture

5 May 2013 - 4:30 pm | ढालगज भवानी

:ऑ कंपूवहीनी ???????? अर्र तिच्या कंपूवाहीनी आहे व्हय? =))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 May 2013 - 5:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

काका लैच फॉर्मात आहेत !!!

वा बुवा ...

बॅटमॅन's picture

4 May 2013 - 1:54 am | बॅटमॅन

अरारारारा =)) =)) =)) =))

चित्रगुप्तजी, आमचा साष्टांग दंडवत घ्यावा. श्वा , युवा आणि मघवा हे पाणिनीने एकाच सूत्रात कसे बसवले असतील हे थिंकून थिंकून आम्ही हतमेंदूबल होत होतो, पण आज तर आपण कमालच केलीत. _/\_

कुठे प्यारिस-नेपोलियन आणि कुठे दासबोध, आणि कुठे मिपावरच्या महिला ;)

आजपासून आपला शिष्य झालो, स्वीकार व्हावा. (तेवढी चित्रंबित्रं काढायला सांगू नका, पाया पडतो अजून एकदा हवं तर ;) )

व्हिज्युअलायझेशन म्याटर्स ब्याट्या. :)
(चित्रं हाताने काढ नायतर मनात रंगव पण व्हिजुअलायझेशन पायजेच. आणि त्यात सुध्दा चित्रगुप्तजीसारखा दांडगा एक्स्पीरीयन्स म्हणजे आपण फक्त त्यांच्या पायाच पडू शकतो.)

हे बाकी खरं. हाताने चित्रे काढा नैतर मनात रंगवा. आम्ही चित्रकला-निरक्षर असल्याने मनातच चित्रे रंगिवतो :)

बाकी चित्रगुप्तजींबद्दल बहुत काये लिहिणे? मर्यादेयं विराजते.

चित्रगुप्त's picture

4 May 2013 - 10:04 am | चित्रगुप्त

...आजपासून आपला शिष्य झालो, स्वीकार व्हावा...
भो शिष्योत्तमा, आधी "श्वा, युवा आणि मघवा हे पाणिनीने एकाच सूत्रात कसे बसवले " हे काय प्रकरण आहे, याचा खुलासा मजजैश्या 'असंस्कृत' जनांना कर बा.

बॅटमॅन's picture

4 May 2013 - 3:42 pm | बॅटमॅन

श्वन्, युवन् आणि मघवन् या एकमेकांशी काहीच संबंध नसलेल्या शब्दांच्या विभक्तीचे नियम मात्र एकसारखेच आहेत. म्हणून ते एका सूत्रात गोवलेत. त्याबद्दल एक श्लोक फेमस आहे. त्याचा अर्थ असा, की काच, मणी आणि सोने या तीन एकदम विजोड गोष्टी एखाद्या बालिकेने एकाच दोर्‍यात ओवल्यामुळे तिजबद्दल आश्चर्य वाटावे तर पाणिनीने श्वान, युवा आणि मघवान (इंद्र) या तीनही विजोड गोष्टींना एकाच सूत्रात ओवलेले आहे. तद्वतच नेपोलियन, दासबोध आणि मिपावरच्या आयड्यांची त्सुनामी हे तीन विषय तुम्ही एका लेखात गोवले. :)

चित्रगुप्त's picture

4 May 2013 - 5:02 pm | चित्रगुप्त

असे होय..
तो फेमस श्लोक कोणता? अणि ते सूत्र कोणते?

काचं मणि: काञ्चनमेकसूत्रे मुग्धा निबध्नन्ति किमत्र चित्रम् |
विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||

हा तो श्लोक.

सूत्र कुठले ते मला माहिती नाही कारण अष्टाध्यायी वाचली नाही कधी. इतकेच माहिती की श्वान, युवा आणि मघवान या तीनही शब्दांची विभक्तिरूपे एकाच प्रकाराने होतात- त्यांचे विभक्तिप्रत्यय सारखे आहेत.

श्रीनिवास टिळक's picture

5 May 2013 - 1:28 am | श्रीनिवास टिळक

पुण्याला Modern High School (१९५४-५७) मध्ये शिकत असताना आमच्या दीक्षित सरानी एकदा फळ्यावर लिहिलेला हा श्लोक थोडा वेगळा होता तो असा:
शुनेव यूना प्रसभं मघोना प्रधर्षिता गौतमधर्मपत्नी | विचारवान् पाणिनिरेकसूत्रे श्वानं युवानं मघवानमाह ||
तरुण असलेल्या इंद्राने [मघोना] गौतम ॠषीच्या धर्मपत्नीचा बळजबरीने कुत्र्याप्रमाणे [श्वानाप्रमाणे] विनयभंग केला. म्हणूनच विचारपूर्वक पाणिनिने त्या तिघांना एका सूत्रात [एकत्र] कोंबले आहे.

आयला भारी!! हा दुसरा पाठ मी कधीच ऐकला नव्हता. हा पाठ जास्त रोचक अन एक्स्प्लेनसुद्धा जास्त करणारा वाटतोय. बहुत धन्यवाद या पाठासाठी :)

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 4:16 am | चित्रगुप्त

टिळक साहेब, तुम्ही त्यावेळी कितवीत होता हो ? (असा श्लोक कितवीच्या मुलांना शिकवणे त्याकाळी ग्राह्य मानले जायचे, हे विचारायचे आहे)
'श्वानाप्रमाणे विनयभंग' म्हणजे नेमके काय, असे कुणी दिक्षित सरांना विचारले होते काय? (आम्ही असतो, तर विचारले असते).

बिचारी अहिल्या. इंद्रदेवाचा याबद्दल जेवढा निषेध करावा, तेवढा थोडाच. (कदाचित अहिल्येने पूर्वजन्मी एकाद्या कुत्र्याला भाकरतुकडा देण्याऐवजी 'हाड मेल्या' म्हटले, म्हणून कुणीतरी "हे दुराचारिणी, तू श्वानाप्रमाणे विनयभंगित होशील" असा शाप दिल्यामुळे हे कर्तव्य खुद्द इंद्र देवांना करावे लागले असेल. ( कुठूनही कसलाही आयडी सुचतो, आताच आम्हाला 'विनयभंगिता' सुचला.
काही अंशी इंद्रदेवांच्या या कृत्यामुळे जो काही ब्रम्हघोटाळा झाला, त्याचे वर्णन इथे वाचा.
http://www.misalpav.com/node/23698

आता अहिल्येला अजून शिव्या घातल्यागत होईल, पण या संदर्भातला एक श्लोक सांगूनच टाकतो. पार्श्वभूमी अशी, की गौतम ऋषींनी अहिल्येला शिळा बनवले, पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती पुनः जिवंत झाली. नंतर एकदा नारदमुनी तिच्याकडे आले आणि तिला विचारले, खरं खरं सांग, गौतम ऋषींच्या वेषातला तो इंद्रच होता हे तुला कळलं होतं की नाही? ती म्हणाली हो. मग त्याला का होकार दिलास हे सांगताना तिने सरळ सांगितले की ब्रह्मचर्य पालन करणारी अगदी साध्वी स्त्री असली, तरी "योग्य" असा पुरुष दिसला की ती एक्साईट होते.

"ब्रह्मचर्येऽपि वर्तन्त्या: साध्व्या: ह्यपि च श्रूयते |
युक्तं हि पुरुषं दृष्ट्वा योनि: संक्लिद्यते स्त्रियः||"

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 4:46 am | चित्रगुप्त

उगाच नाही संस्कृतास देवभाषा म्हणत.
(सुचलेले आयडी: संक्लिद्यता, संक्लिता, इ.)

संस्कृतमधे कितीही अश्लील लिहीलेलं इथे चलतंय असं दिसतं.

....संस्कृतमधे कितीही अश्लील लिहीलेलं इथे चलतंय असं दिसतं...
हा फार मोलाचा मुद्दा उपस्थित केलाय. असंच काहिसं चित्रकला, फोटोग्राफि यात घडत असतं.
ज्या प्रमाणात नग्न व्यक्तिचा फोटो अश्लील मानला जातो, त्या मानाने नग्न चित्रे तशी मानली जात नाहीत.
या मुद्द्याचा विस्तृतपणे छडा लावण्यासाठी एकादा धागा काढला पाहिजे. साहित्य, सिनेमा, नाटक, संगीत, चित्रकला आदि सर्वांचा यात विचार व्हावा.

संजय क्षीरसागर's picture

5 May 2013 - 1:22 pm | संजय क्षीरसागर

ते व्यक्तीनिहाय असावं असं वाटतं

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 1:39 pm | चित्रगुप्त

मी म्हणतोय तसा धागा मिपापुरता नसून एकूणच साहित्य/कलाक्षेत्राविषयी, त्यातील अश्लीलतेच्या प्रश्नाविषयी असावा.

`इथे कशाला अश्लील म्हणायच आणि कशाला नाही' असंच त्याच स्वरूप असेल. तुम्ही पोस्ट टाका म्हणजे व्याख्या काय ते एकदा नक्की समजेल.

तुम्ही पोस्ट टाका

प्यारे१'s picture

5 May 2013 - 2:03 pm | प्यारे१

तुम्हाला येतं संस्कृत????
आम्हाला नाय जमत ब्वा! :(

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 4:42 am | चित्रगुप्त

हे संस्कृतवाले पण कैच्या कै शिकवतात.
आम्हाला आता या श्लोकातून 'विनयभंगिता' विनयभंगिनी' 'श्वानसम विनयभंगिता' कुक्कुटसम विनयभंगिता' असले आयडी सुचू लगले, तर कुणाला दोष देणार ? आँ ?

आणि मूळ श्लोकात 'विनयभंग' हा शब्द नाहीच, तरी अर्थाची नीट फोड करून सांगावी. प्रत्येक गोष्टीच्या अगदी मुळापर्यंत जाउन शिकणे बरे. ( आयडी: 'मूलगामिनी' 'मूलगमिता' 'मूलगमनप्रिया')

श्रीनिवास टिळक's picture

5 May 2013 - 8:52 am | श्रीनिवास टिळक

नक्की वर्ष आता आठवत नाही बहुतेक १९५७ असावे जेव्हा मी अकरावीत होतो (माझा जन्म १९३९) पाणिनीचे मूळ सूत्र असे आहे 'श्वयुवमघोनामतद्धिते" (6:4.133)

मूळ सूत्राबद्दल बहुत धन्यवाद :)

आणि चित्रगुप्तजी, अजून नावे येऊद्यात ;)

बाकी असोच.

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2013 - 2:10 am | श्रीरंग_जोशी

शीर्षक वाचून बराच वेळ धागा उघडला नव्हता (हाच एखाद्या स्त्रीसदस्यनमाने प्रकाशित केला असता तर.., जाउद्या जर तर चा प्रश्न कशाला उगाच?)

शेवटी काही प्रतिक्रिया आलेल्या पाहून उघडला, मग प्रतिक्रिया वाचल्या अन मग मूळ लेख वाचला.
क्या बात हैं, १ नंबरी!!! काय काय ती नावे?

कालच मी खफवर पूजासाठी नवे सदस्यनाम म्हणून 'भटकती आत्मा' हे नाम सुचवले होते.

"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर" कसे वाटेल?

मराठी मुलगी, कोकणी नखरेवाली, मुंबईची छोकरी... नवी स्त्रीसदस्यनामे सुचणं वाटते तेवढं सोपं नाही बुवा.

धमाल मुलगा's picture

4 May 2013 - 4:30 am | धमाल मुलगा

>>मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर
नि:शब्द!!! तोडलंस मित्रा, तोडलंस!
ये बैस इथं. नामकरणाच्या वेळी मलाही कुण्णीच अर्धीसुध्दा सुचवणी मागत नाहीत.

आपल्याला नावं ठेवण्यातच जास्त विंट्रेष्ट...हे असलं क्रिएटिव्ह कधी अन कसं जमावं?

भो चित्रगुप्त महाराज, तुमचा हा बारशाचा कार्यक्रम जोरात चालुद्या! मी लक्ष ठेऊन आहे. पुढंमागं एखादी पोरगी झाली की तिचं नाव काय ठेवावं हा माझा प्रश्न मिटेल. :)

"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर"

यापेक्षा "लवंगलतिका खानझोडे-मोगलगिद्दीकर" हे मशीनगण नाव भारीये!

मूळ लेखः "कुक्कुटगंधा" वाचून ह.ह.लो. :))

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2013 - 8:37 am | श्रीरंग_जोशी

पण मी लिहिलेले नाव घ्यायचे म्हणजे मालगाडी निघून जाईपर्यंत रेल्वे क्रॉसिंगवर वाट पाहण्यासारखे आहे ;-).

आदूबाळ's picture

5 May 2013 - 11:41 am | आदूबाळ

हो ना!

"इतने सारे नाम? बाकी लोग किधर है?" हा अंअअ मधला ड्वायलाग आठवला!

चित्रगुप्त's picture

6 May 2013 - 6:15 am | चित्रगुप्त

"मालविका अफझलपूरकर-अहमदपूरकर" आणि "लवंगलतिका खानझोडे-मोगलगिद्दीकर" दोन्ही आयड्या भारीच आहेत.
- चित्रा गुप्तगंगातीरकर-मादागास्करकर

श्रीरंग_जोशी's picture

6 May 2013 - 6:21 am | श्रीरंग_जोशी

काही वर्षांपूर्वी मासिकामध्ये एक किस्सा वाचला होता.

एका विवाहात नवरदेव नवरीचे नाव बदलताना मालविका हे नाव सुचवतो. तर त्याचा एक मित्र पचकतो की मेल्या सेल्स अ‍ॅन्ड मार्केटींगमधून प्रॉडक्शनला शिफ्ट झालास तरी अजून माल काय विकतोस?

भटकती आत्मा । माझे मित्र मला म्हणतात ।

विसोबा खेचर's picture

4 May 2013 - 7:05 am | विसोबा खेचर

एक विलक्षण प्रतिभावंत, अत्यंत उच्च दर्जाचा विनोदी लेख. लै म्हणजे लैच भारी. वाचून निखळ करमणूक झाली साहेब. येऊ द्या अजून असंच काही खुमासदार... :-)

श्री गावसेना प्रमुख's picture

4 May 2013 - 8:35 am | श्री गावसेना प्रमुख

भविष्याची डायरी सापडली वाटते पॄथ्वीतलावावरच्या चित्रगुप्तांना

विश्वनाथ मेहेंदळे's picture

4 May 2013 - 9:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

काय लिवलंय, काय लिवलंय....
दंडवत !!!!!!

पैसा's picture

4 May 2013 - 9:22 am | पैसा

केवळ मुलीचा आयडी घेऊन महिला विभागात प्रवेश मिळतो हे कुणी सांगितलं ब्वॉ तुम्हाला? निवृत्त महिला आणि इतर काही उल्लेख वाचून अंमळ करमणूक झाली.बर्‍याच जणांना कोल्ह्याला द्राक्षे आंबट असावीत असा सौंशय येतो आहे. एकूण सगळे अजब तर्कशास्त्र तर वाचून हसू की रडू हे कळेना! :D

महिला आयडी घेऊन महिला विभागात प्रवेश मिळाला नाही की ना अत्र ना परत्र अशी अवस्था व्हायची शक्यता! वरनं मज्याशी मय्यत्री कर्नार कं चा भडिमार होऊन गाशा गुंडाळायची वेळ यायची!

परिकथेतील राजकुमार's picture

4 May 2013 - 10:02 am | परिकथेतील राजकुमार

पॅरिस फिरुन आलात होय तुम्ही.
चान चान.

अध्यात्मिक वगैरे आयडी: गुप्तकरणी
साहित्यिक आयडी: चित्रा गुप्ता
सोज्वळ आयडी: सौ.चित्रा गुप्ते
चटोर आयडी : गुप्तचरित्रा
सुवासिक आयडी: चित्रगंधा
धडकीभराऊ आयडी: गुप्ती
सुप्रसिद्ध आयडीवरून बेतलेले आयडी: गणना संपलेली चित्रा
संस्कृतप्रचुर आयडी : मुक्त-चित्रा
खरेखुरे वाटणारे आयडी: तुमचीच चित्रा

श्रिया's picture

4 May 2013 - 11:40 am | श्रिया

हा! हा! मजेदार लेख.
अजून काही नावं: कलहकंठी, मधुकंठी, वादप्रिया

ढालगज भवानी's picture

4 May 2013 - 5:26 pm | ढालगज भवानी

हाहा कलहकंठी, वादप्रिया :)

प्यारे१'s picture

4 May 2013 - 6:08 pm | प्यारे१

>>>वादप्रिया

हा संपादक मंडळासारखा आयडी एक नि वापरणारे सगळे असा आयडी झाला.

- संवादप्रिय ;) प्यारे

रमेश आठवले's picture

4 May 2013 - 11:50 am | रमेश आठवले

नेपोलियनला इजिप्त मध्ये डच चित्रकाराने काढलेले शिवाजी महाराजांचे तैलचित्र सापडले अशी वाक्यरचना अगदी सुरवातीलाच टाकून, बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यमय वाक्याने कथेची सुरवात करण्याच्या पद्धतीची आठवण करून दिलीत.

तिमा's picture

4 May 2013 - 12:43 pm | तिमा

किती म्हणजे किती उत्सुकता असावी त्या भिंतीपलिकडे पहाण्याची ? पण तिथला पहारा चोख आहे. अगदी 'चित्रगुप्त' ही तिथले हिशोब ठेवू शकणार नाही. त्यापेक्षा नकोशा वाटणार्‍या पु. आयडींनाच मला मैत्री करायची आहे, असे व्यनि पाठवा. ते लगेच मिपावरुन काढता पाय घेतील.

कवितानागेश's picture

11 May 2013 - 4:20 pm | कवितानागेश

गुड आयडीया! :)

श्रावण मोडक's picture

4 May 2013 - 12:43 pm | श्रावण मोडक

हुच्च लेख आहे.

प्यारे१'s picture

4 May 2013 - 1:57 pm | प्यारे१

चित्रगुप्त :
सदस्यकाळ
3 years 1 month

हम्म्म्म!

मुक्त विहारि's picture

4 May 2013 - 3:32 pm | मुक्त विहारि

आवडला..

सस्नेह's picture

4 May 2013 - 9:58 pm | सस्नेह

नावे भारी कल्पक आहेत. लेखही मस्त.
संपादिकाहो, लक्षात ठेवा बरे नावे ! अर्ज येतील...

चौकटराजा's picture

5 May 2013 - 8:46 am | चौकटराजा

पवि सारखा अ‍ॅस्ट्रल प्रवास करून चित्रगुप्त मु पो मि पा, हे वरीजिनल चिगु कडे गेले. त्यांच्या प्राचीन काळच्या चोपड्या त्याना मिळाल्या . त्यातून स्त्री ची समस्त रूपे वर्णन करणार्‍या आयडी( या) त्याना मिळाल्या. वाटेत विआबुवा भेटले. भर पडली. मिपावरचे काही आचारी नवे पदार्थ त्या यादीत सोडीत आहेत.
एकंदरीत चित्रगुप्त महाराजांचे मस्त चालले आहे !!! हबिनंदण !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2013 - 12:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुमासदार लेखन. आयडींचे नावे वाचून हहपुवा झाली.
चित्रकाराला जे जे दिसतं त्याचं उत्तम चित्र रेखाटलंय.

अजून येऊ द्या अस्सचं आणि चित्रांबद्दलही.

-दिलीप बिरुटे

राजेश घासकडवी's picture

5 May 2013 - 7:09 pm | राजेश घासकडवी

खुसखुशीत लेखनाचा उत्तम नमुना.

नेपोलियनपासून सुरूवात करून माआखामिझामिंच्या प्रश्नांपर्यंत गाडी मस्त आणली आहे. (माआखामिझामि शब्दाचं कामिकाझिशी ध्वनिसाधर्म्य आहे खरं) कंपूसहस्रनाम तर भारीच.

मात्र

"अरे बरंय की मग ते. 'फ़ाटक्या पायपुसण्यापासुन क्रिएटिव वॉल- हँगिंग' "चला, मंगळागौरीची गाणी आठवूया" वगैरे धागे तिकडल्यातिकडेच रहातील"...

अशी तुम्ही सर्व स्त्रियांची खिल्ली उडवता ते आवडलं नाही. मुळात स्त्रियांची मिपावर खिल्ली उडवली जाते, ती त्यांना झेपत नाही म्हणून त्यांना नवीन बंद दालन उघडावं लागलं - आय मीन उघडून दालन बंद करावं लागलं. म्हणजे उघडून ते बंद ठेवावं लागलं - बंद म्हणजे बंद झालेलं नाही, बंदिस्त या अर्थाने बंद. छेः मला नीट शब्दांत मांडता येत नाही. लेकिन भावनाओं को समझो. आता तुम्ही त्या दालनात काय चाललंय याची निव्वळ कल्पना करून त्यांची चेष्टा करत आहात. यामुळे मिपावरील स्त्री-पुरुषांचं तुम्ही जास्त ध्रुवीकरण करत आहात. याबद्दल तुमचा निषेध करावा तेवढा थोडा.

चित्रगुप्त's picture

5 May 2013 - 11:55 pm | चित्रगुप्त

अहो कंपूसहस्त्रनामात बेछूट सुटलेले आमच्या कल्पनेचे वारू महिला विभागात काय असावे, या मामल्यात अगदी पांगळे झालेले आहे. आम्ही कसली डोंबलाची कल्पना करणार आणि चेष्टा करणार? आमच्या कल्पनेची झेप "चला मंगळागौरीची गाणी आठवूया" इतपतच. म्हणून तर आमच्या मित्राला स्त्रीआयडी घेऊन तिकडे शिरायचे आहे, आंखो देखा हाल बघायला. पण आता आमच्या या लेखाने सगळेच मुसळ केरात जाणार म्हणायचे.
या निमित्ताने का होइना आपला चरणस्पर्श या नाचीजच्या लेखाला झाला, हे अहोभाग्य.

राजेश घासकडवी's picture

6 May 2013 - 7:36 am | राजेश घासकडवी

म्हणून तर आमच्या मित्राला स्त्रीआयडी घेऊन तिकडे शिरायचे आहे, आंखो देखा हाल बघायला.

त्या मित्राप्रमाणे अनेकांना आत शिरून काही चमचमीत दिसतंय का बघण्याची इच्छा असणार याची खात्री आहेच. पण आंखो देखा हाल त्याने जर लोकांना सांगितला तर त्याचे हालहाल होणार नाहीत याची ग्यारंटी दिलीत का तुम्ही??

बायदवे, हे दालन खरोखरच सुरू होऊन त्यात काही लिखाण सुरू झाल्याचं तुमच्या मैत्रिणीचं कातडं पांघरलेल्या मित्राकडून काही कळलं का? असल्यास अजूनही तो जिवंत आहे का याबद्दल आपण काही कॉमेंट करू शकाल का?

मन१'s picture

6 May 2013 - 6:09 pm | मन१

झक्कास....

चित्रगुप्त's picture

7 May 2013 - 8:35 pm | चित्रगुप्त

मैत्रिणीचं कातडं पांघरून गुहेत शिरू पाहणार्‍या मित्राच्या जनाज्यात शरीक होउन आताच परतलो आहोत.

श्रीरंग_जोशी's picture

7 May 2013 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी

दोन मिनिटे शांतता पाळून श्रद्धांजली वाहतो.

व्यर्थ ना हो, हे बलिदान!!

सुहास..'s picture

8 May 2013 - 10:20 am | सुहास..

हा हा हा हा हा

शशिकांत ओक's picture

8 May 2013 - 9:57 pm | शशिकांत ओक

लेंग्याची नाडी आवळा गुप्त चित्रा,
स्त्रियांच्या नावाच्या किती अंगचटी जाल.

आपला चरणस्पर्श या नाचीजच्या लेखाला झाला, हे अहोभाग्य.

असे आपण म्हणाला नाही म्हणजे मिळवले....

"लेंग्याची नाडी" हा सुद्धा एक आयडी आहे की. लै भारी सुचवलं ओककाका.
बाय द वे . पिवळी डांबीस सारखा हिट्ट आयडी अजून ओपन आहे

चित्रगुप्त's picture

15 May 2013 - 7:27 pm | चित्रगुप्त

तुमच्या अवघ्या दोन ओळींच्या प्रतिसादातच लेंग्याची नाडी काय, आवळणे काय, अंगचटी जाणे काय, धमाल लिहिले आहे.
हे सर्व वाचून तुम्हाला खरेतर आता 'ती' नाडी सोडून आता असे अंगचटी जाणारे लिखाण केले पाहिजे, असे वाटले.
काय म्हणता?

श्रावण मोडक's picture

8 May 2013 - 10:02 pm | श्रावण मोडक

चित्रगुप्त हा आयडी हॅक झाला आहे का?

चित्रगुप्त's picture

9 May 2013 - 7:05 am | चित्रगुप्त

....चित्रगुप्त हा आयडी हॅक झाला आहे का?...
नाही नाही. चित्रकाराखेरीज आमच्यात एक टवाळ कार्टं दडून आहे. (आणखी काय काय पण आहे)

(जमल्यास) आमचा आगामी आयडी:
चित्रा गुप्तगंगातीरकर-मादागस्करकर

श्रीरंग_जोशी's picture

9 May 2013 - 9:58 pm | श्रीरंग_जोशी

आगामी आयडी जोरदार आहे.

शुभेच्छा!!

चैदजा's picture

12 May 2013 - 10:57 pm | चैदजा

गुप्तगंगातीरकर

वाचतांना एक अक्षर आकारांतात व अनुस्वारा सकट वाचले.

राजा सोव्नी's picture

10 May 2013 - 10:49 pm | राजा सोव्नी

फारच छान लेख,असेच लेखन करा चित्रगुप्त साहेब ,

बावळट's picture

11 May 2013 - 6:38 am | बावळट

ह्या ह्या ह्या
लईच भारी वो.
स्त्री-आयडी घेऊ पाहणार्‍यांची गोची होणार पण आता.

चैदजा's picture

12 May 2013 - 10:49 pm | चैदजा

बदाम राणी,
मिपापथगामिनी

काहिकाहि मिपाकरांकडुन बर्‍याचवेळा गळ टाकायचा प्रयत्न होतो हे खरे आहे. मी जेंडर विषयी माहिती टाकली नाही तरी खडा (स्टोन) टाकुन बघतात.

बावरी ,राधा-बावरी,तू तिथे मी --या आयडी पण बघा चघळून !

बावरी ,राधा-बावरी,तू तिथे मी --या आयडी पण बघा चघळून !

त्रिवेणी's picture

14 Nov 2013 - 11:50 am | त्रिवेणी

अशक्य धागा आहे हा

arunjoshi123's picture

1 Jan 2014 - 9:25 pm | arunjoshi123

अगाईगं. च्यायला त्या अमेरिकेचा जीडीपी कितीही होवो, जोपर्यंत चित्रगुप्त साहेबांसारखे लोक आमच्या देशात आउटपुट देताहेत तोपर्यंत आमचेच जीवनमान उच्च.

रामदासांनी कमरवस्त्र घट्ट आवळून "दासीबोध" लिहायला कल्याणीला घळीत बोलावून घेतले. विचार करून कि मिपावर चित्रगुप्तच्या मतीतून आणखी स्त्रीनामांच्या सुनामी चा पान्हा पुन्हा फुटायच्या आत ढवळे प्रकाशकांकडे त्वरित दासीबोध पोहोचता करायला हवाय...

खटासि खट's picture

6 Mar 2015 - 8:41 am | खटासि खट

आमचा दडवत घ्यावा.
सर्वांनीच. लेखकू आणि प्रतिसादकुमार / कुमारी यांनी

प्रतिसादकुमारी - सभ्य (जनरल) आयडी .

चित्रगुप्त's picture

24 Apr 2021 - 9:01 am | चित्रगुप्त

नवीन मिपाकरांसाठी पुन्हा एकदा.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 8:41 pm | मुक्त विहारि

खुसखूशीत