साहित्यः
१ मोठे रताळे उकडून, साल काढून, कुस्करून घ्रेणे
दीड वाट्या गव्हाचे पीठ
१/२ वाटी मैदा (ऐच्छिक)
२ टेस्पून साजुक तूप
१/२ टीस्पून हळद
१-१/२ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून बडीशेप पावडर
१-१/२ टीस्पून धणेपूड
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
पाकृ:
मिक्सींग बाऊलमध्ये कणीक, मैदा, लाल तिखट, बडीशेप पावडर, हळद, मीठ, साजुक तुप व कुस्करलेले रताळे घालून एकत्र करा.
चमच्याने थोडे-थोडे पाणी घालून घट्ट कणीक भिजवून घ्या.
भिजवलेल्या कणकेच्या गोळ्यावर ओला रुमाल किंवा किचन पेपर टॉवेल ठेवून १ तास तसेच ठेवून द्या.
आता कणकेचे छोटे छोटे गोळे करुन जाडसर पुर्या लाटून घ्या.
कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा.
एक-एक पुरी सोडून त्यावर झार्याने थोडे तेल उडवून घ्या.
पुरी फुगली की उलटवावी. अशा सर्व पुर्या तळून घ्याव्यात.
ह्या पुर्या तुम्ही कुठल्याही ग्रेव्ही असलेल्या भाजीबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर किंवा नुसत्या चहाबरोबर सर्व्ह करा.
नोटः
चवीला तिखट-गोड छान लागतात.
तिखटाचे प्रमाण आवडीनुसार व रताळ्याच्या गोडीनुसार वाढवावे.
इथे मिळणारे रताळे बेताचे गोड असते म्हणून दिलेल्या तिखटाचे प्रमाण पुरेसे आहे.
रताळयाच्या गोड पुर्या करायच्या असल्यास रताळे कच्चे किसून साजुक तुपात परतून, वाफवून घ्यावे. त्यात आवडीप्रमाणे गुळ घालून तो विरघळेपर्यंत ढवळावे. त्यात कणीक, किंचित मीठ घालून घट्ट पीठ भिजवावे व पुर्या लाटून तळावे.
प्रतिक्रिया
13 Mar 2013 - 5:57 am | स्पंदना
मुलं रताळ का कुणास ठाउक खात नाहीत. आता या पद्ध्तिने खातात का पहाते.
फार छान फोटोज. सुरेख मांडणी.
अवांतरः- ती काळ्या रंगाची प्लेट अन तेलाचे भांदे ५० राव मागतील. जास्तीचं घेउन ठेव.
13 Mar 2013 - 9:12 am | तर्री
सुगरण बाईंची कमाल म्हणायची. रताळे शिजवून , भाजून किंवा भाजी करून खाता येते हे माहित आहे . ही प.कृ . पाहून अती अचंबित होण्यात आले आहे ......
13 Mar 2013 - 9:46 am | चिंतामणी
बाकी काही लिहायची गरज नाही.
बाकी aparna akshay च्या सुचनेकडे लक्ष दे.
13 Mar 2013 - 4:15 pm | पैसा
खासच फोटो आणि पाकृ.
14 Mar 2013 - 12:59 pm | दिपक.कुवेत
पाकॄ नेहमीप्रमाणेच छान!
14 Mar 2013 - 1:25 pm | Mrunalini
मस्त दिसतायत पुर्या... करुन बघायला पाहिजे. :)
14 Mar 2013 - 1:35 pm | अक्षया
छान पाककॄती !!
15 Mar 2013 - 3:50 am | किसन शिंदे
अफलातून!!
फोटो लय कातिल आलाय.
15 Mar 2013 - 8:36 am | कच्ची कैरी
मला रताळे आवडतात पण त्याच्या पुर्या करण्याचा विचार कधी आलाच नाही ,आता नक्की करुन बघनार :)
15 Mar 2013 - 12:16 pm | सस्नेह
यात उपासाला चालण्यासाठी काय घालता येईल सानिकाताई ?
15 Mar 2013 - 12:27 pm | अनन्न्या
मी पण क्रुती वाचताना हाच विचार करत होते उपासाला चालण्यासाठी राजगिरा, शिंगाडा, वरी यापैकी कसले तरी किंवा मिक्स पीठे वापरून होतील का पुय्रा?
15 Mar 2013 - 2:21 pm | क्रान्ति
मस्त, खमंग पुर्या आणि फोटो!
अवांतर - त्या दोन वस्तूंवर माझा पण डोळा आहे बरं ;)
15 Mar 2013 - 3:35 pm | सूड
पाकृ मस्तच !! रताळ्याच्या गोडाच्या पुर्या पण मस्त होतात.
15 Mar 2013 - 4:19 pm | पिंगू
रताळ्याच्या पुर्या कधी खाल्ल्या अथवा बनवल्या नाहीत. बनवून खायला हव्यात एकदा तरी..
15 Mar 2013 - 4:39 pm | nishant
मस्त !
15 Mar 2013 - 7:53 pm | स्वाती दिनेश
पुर्या छान झालेल्या दिसतात,
स्वाती
16 Mar 2013 - 11:52 pm | निवेदिता-ताई
सुंदर
16 Mar 2013 - 11:58 pm | श्रिया
पाकृ मस्तच.
19 Mar 2013 - 3:50 pm | प्यारे१
:)
मस्त!