गोतांबीर

साबुदाणा खिचडी's picture
साबुदाणा खिचडी in पाककृती
15 Feb 2013 - 4:46 am

हा कोकणी पदार्थ सहसा "दैवज्ञ ब्राह्मणांकडील" लग्नात आढळतो. लग्नात दुसर्‍या दिवशी "तिखट" जेवण असतं तेव्हा सोबत गोतांबीर करतात.

साहीत्य - २ वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी साखर, १ वाटी नारळाचे घट्ट दूध, २ वाट्या नारळाचे पातळ दूध, वेलची, २ मोठे चमचे तूप

कृती - तूप एका कढईत घाला. त्यात मंद आचेवर गुलाबीसर होईपर्यंत गव्हाचे पीठ भाजून घ्या. छान सुरमट (खमंग) वास दरवळतो. नंतर त्यात पातळ नारळाचे दूध हळूहळू घाला. गुठळ्या होऊ नयेत याची दक्षता घ्या. नंतर जाड दूध व साखर घाला. भज्याच्या पीठासारखे होते. त्यात वेलची घाला. फार घट्ट वाटल्यास पाण्याने सरसरीत करुन घ्या. पण हे साधारण श्रीखंडासारखे दिसते.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

15 Feb 2013 - 7:09 am | स्पंदना

अरे वा ! खरच नविन पदार्थ! जरा फोटो असता तर?

पैसा's picture

15 Feb 2013 - 10:32 am | पैसा

काहीसा घाटल्यासारखा प्रकार दिसतोय.

सानिकास्वप्निल's picture

15 Feb 2013 - 12:21 pm | सानिकास्वप्निल

मला ही असेच वाटले :)

कवितानागेश's picture

15 Feb 2013 - 12:15 pm | कवितानागेश

छान पदार्थ.
थोडं गुळवणीसारखे लागेल.
गुळवणी करताना सुके खोबरे वापरतात, नारळाच्या दुधाऐवजी.

परिकथेतील राजकुमार's picture

15 Feb 2013 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार

पाककृती बाद धरण्यात आली आहे.

अवांतर :- आधी मला सदस्यनामाच्या जागी पाककृतीचे नाव आणि पाककृतीच्या जागी सदस्यनाम आल्यासारखेच वाटले,

विशाखा राऊत's picture

15 Feb 2013 - 4:00 pm | विशाखा राऊत

सेम

चिंतामणी's picture

16 Feb 2013 - 11:49 pm | चिंतामणी

सेम हिअर.

फटुची परंपरा न पाळणा-या पाकृ अप्रकाशीत करण्यात याव्यात आणि सदर सदस्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी सं.मं.ला विनंती.

सूड's picture

15 Feb 2013 - 1:02 pm | सूड

पण फोटू कुठाय ?

शुचि's picture

15 Feb 2013 - 7:48 pm | शुचि

फोटो नव्हता :( ..... आई (सासूबाईंनी = साबुदाणा खिचडी) अजून थोड्या अनवट पाकृ टीपून ठेवलेल्या आहेत. त्या कालांतराने टाकणार आहे :D .... पण फोटो टाकता येणार नाहीत कारण साहीत्य नाही :( .... इथे भारतिय ग्रोसरी जवळपास नाही, १५० मैलांवर मिळते.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Feb 2013 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा

फो..............................................टूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ ??????????? http://www.easyfreesmileys.com/smileys/free-sad-smileys-159.gif

फोटोच्या अनुपस्थितीत फारच उत्सुकता वाढल्याने (आणि पातळ दूध/ जाड दूध हे नीटसं कळलं नाही म्हणून) आंतर्जालावर शोध घेतला तर दैवज्ञांच्या विवाहाविषयी हा डिट्टेलवार लेख मिळाला ज्यात अखेरीस या 'शहाळ्याच्या गोतांबिरी'चा उल्लेख आहे. तिथेही फोटो नाहीच मिळाला :-(

बहुगुणी सर, लेखाची लिंक उघडत नाहीये :(

कवितानागेश's picture

16 Feb 2013 - 8:18 pm | कवितानागेश

लेख दिसत नाहीये.
शहाळ्याचा वापर करत असतील तर दूध पातळच निघेल.

बहुगुणी मी सांगते जाड दूध /पातळ दूध म्हणजे काय ते. कारण मी कैक वेळा आईंना नारळाचे दूध काढताना पाहीले आहे. नारळाचा चव मिक्सरमधून काढून दाबून त्याचं जे दूध निघतं ते जाड दूध. नंतर परत थोड पाणी घालून सरसरीत करुन परत दाबून, दूध काढतात ते पातळ दूध.

बहुगुणी's picture

17 Feb 2013 - 10:03 pm | बहुगुणी

लेखात वाचल्यावर 'शहाळ्यातली सायीसारखी मऊ मलई म्हणजे घट्ट दूध असावं' असा माझा गैरसमज होत होता तो दूर केल्याबद्दल धन्यवाद! (स्वयंपाकघरात आधिक वेळा जायला हवं ;-))

दिपक.कुवेत's picture

16 Feb 2013 - 1:55 pm | दिपक.कुवेत

नविन रेसीपी...करुन बघिन.

Mrunalini's picture

16 Feb 2013 - 3:45 pm | Mrunalini

वेगळीच पाकृ...
करुन बघायला पाहिजे.

हारुन शेख's picture

16 Feb 2013 - 5:42 pm | हारुन शेख

वेगळी पाकृ. आणि शिवाय दोन नवे (सुरमट, सरसरीत) अनवट शब्दपण मिळाले. धन्यवाद.

वेगळी पा.क्रु.

श्रीरंग_जोशी's picture

16 Feb 2013 - 9:55 pm | श्रीरंग_जोशी

महालक्ष्म्यांच्यावेळी (गौरी) केल्या जाणाऱ्या आंबिलची आठवण झाली.

मिपावर स्वागत.

अशाच इतरही पाकृ येऊद्या.

ही बनवून पाहिलेली गोतांबीर!!

gotambir

किसन शिंदे's picture

22 Aug 2016 - 5:34 pm | किसन शिंदे

भारी !!

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 11:11 pm | चंपाबाई

हुग्गीचा सावत्र भाऊ

म्हण्जे तुम्ही माईसाहेबांची सावत्र बहीण आहात तसंच ना?

चंपाबाई's picture

22 Aug 2016 - 11:27 pm | चंपाबाई

नाय हो ! कित्त्त्तीदा सांगू ... माई वेगळ्या ... नाना वेगळे .... अन मी वेगळं !