गाभा:
पोळी की चपाती ??/
नेमके काय म्हणावे???
पोळी की चपाती?/
एक पक्ष....पोळी ही गुळाची ,पुरणाची असते.... साधी नेहमीची चपाती असते.
दुसरा पक्ष...चपाति असे काही नसते गुळाची असो वा पुरणाची वा साधी..ती पोळीच असते..
नेहमीच्या पोळीत पण साधी व घडीची असे २ प्रकार ...
बहुमत चपातीच्या बाजूने....
पोळपाटावर बनतात त्या पोळ्या...
चपाती मशीनमधे बनतात त्या चपात्या....असेही एक मत आहे..
चपाती हा शब्द कन्नड मधून मराठीत आलेला असेही वाचण्यात आले
म्हणजेच मूळ मराठी शब्द पोळीच. मुंबईत अनेक ठिकाणी पोळी भाजी केंद्र
असतात तिकडे पोळी म्हणजे जिला अनेक जण चपाती म्हणतात तीच मिळते
आमचा एक मित्र ऑम्लेटला अंड्याची पोळी असे म्हणतो
तसेच पिठलं की बेसन?? काही जागी साबूदाण्याच्या खिचडीस साबूदाण्याची उसळ असेही म्हटले जाते..
पदार्थ तोच नावे निराळी
प्रतिक्रिया
4 Feb 2013 - 11:57 am | अत्रुप्त आत्मा
या पोस्ट वरनं १ नक्की म्हणता येइल...तुमच्याकडे कूट-काथ्यांचं भांडार आहे... :-p
4 Feb 2013 - 12:03 pm | स्पंदना
झालं समाधान? आता रात्री सुखाने झोपा हं! तरच उद्याच्या काथ्याची स्वप्ने पडतील.
4 Feb 2013 - 12:03 pm | राही
कणकेत(आता कणीक की नुसते गव्हाचे पीठ?)तेल्/तूप घालून नुसतीच लाटलेली ती चपाती आणि लाटताना आतमध्ये तेल/तूप लावून घड्या घालून पुन्हा लाटलेली ती पोळी असे वर्गीकरण पूर्वी होते.पोळी हे प्रकरण स्पेशलाइझ्ड असते.म्हणजे गूळपोळी,पुरणपोळी,खवापोळी वगैरे.आणखी काही क्राय्टेरिया आहेत.तव्यावर तेल/तूप सोडून त्यावर भाजलेले/तळलेले कुठल्याही पिठाचे अथवा वस्तूचे गोल पदार्थ म्हणजे पोळी/पोळा.तांदळाच्या पिठाच्या अशा प्रकारच्या पदार्थालाच फक्त घावन म्हणतात, इतरांना धिरडी अथवा पोळे. धिरडे थोडे जाडसर असते.घावन पातळसर.भाजणे आणि तळणे यातही फरक आहे.भाजणे म्हणजे कमी तेलावर किंवा कोरडेच विस्तवावर परतणे,रोस्टिन्ग;तर तळणे म्हणजे पदार्थ बुडेल इतक्या जास्त तेलात विस्तवावर शिजवणे,डीप फ्रायिन्ग. चिरणे-कापणे यातही अर्थाचा फरक असावा. तू टाक चिरुनी ही मान मध्ये मान हा जिवंत वस्तू आहे,भाज्या चिरणे मध्ये भाज्या याही चेतन आहेत.याउलट शिंपी कापड कापतो मध्ये कापड ही अचेतन वस्तू आहे.अर्थात हा फरक ढोबळ आहे,काटेकोर नाही आणि आजकाल तर असा फरक कोणीच लक्षात घेत नाही.
4 Feb 2013 - 12:08 pm | राही
मान ही वस्तू असे वाचावे.शिंप्याबरोबर खिसेकापूचेही उदाहरण घेता येईल.
4 Feb 2013 - 4:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कणकेत(आता कणीक की नुसते गव्हाचे पीठ?)तेल्/तूप घालून नुसतीच लाटलेली ती चपाती आणि लाटताना आतमध्ये तेल/तूप लावून घड्या घालून पुन्हा लाटलेली ती पोळी असे वर्गीकरण पूर्वी होते
हेच बरोबर आहे. पण, किंचित बदल करावा, असे वाटते.
एका पोळीचा उंडा (च्यायला, उंडाच म्हणतात ना) पोळपाटावर घ्यायचा पण तिला लाटण्याने लाटायचे नाही. नुसते चापटी मारायची. चापटी मारत मारत केलेली ती चपाती (बाजरीच्या भाकरीला थापतात तसं) आणि घड्या घालून पोळपाटावर लाटलेली ती पोळी असं असावं असं वाटते.
-दिलीप बिरुटे
(अंदाजपंचे दाहोदरसे)
8 Mar 2014 - 4:09 pm | आयुर्हित
माझ्या मते पोळी हा मराठी व चपाती हा शब्द मुळात हिंदी/परभाषीय असावा.
"चपाती (Chapati)" के लिए हिन्दी अर्थ | Meaning of "चपाती" in Hindi
एक प्रकार की पतली, हलकी और मुख्यतः हाथों से दबाकर बढ़ाई हुई (चकले पर बेली हुई रोटी से भिन्न) रोटी।
8 Mar 2014 - 5:15 pm | बरखा
मला वाटत. हिन्दी भाषेत रोटी अस म्हणतात. तेव्हा चपाती हा हिन्दी भाषी नसावा.
बाकी चालुद्यात....
10 Mar 2014 - 1:41 am | आयुर्हित
Chapati is known as sapati or doday in Pashto language. सपाती हा मुळचा अफगाणी शब्द आहे.
Chapati is noted in Ain-i-Akbari, a 16th-century document, by Mughal Emperor, Akbar’s vizier, Abu'l-Fazl ibn Mubarak.[1] १६००व्या शतकातील आईने अकबरी मध्ये याचा उल्लेख आहे
10 Mar 2014 - 11:24 am | बॅटमॅन
रोचक माहिती. धन्यवाद.
14 Mar 2014 - 10:19 pm | चित्रगुप्त
सपाती-सपाटी ज्यावरून आले, तो मूळ पुष्तू शब्द कोणता? 'सपात' वा सपाट असा शब्द आहे का?
4 Feb 2013 - 12:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अवघड आहे. :-|
4 Feb 2013 - 12:15 pm | गब्रिएल
प्रयत्न चान्गला आहे..पन् तिकडे चालु अस्लेल्या महात्मा-राष्ट्रपिता-अहिंसा च्या मारामारीत गुन्तलेल्या लोकान्ला किति खेचून आणेल सांगता एत नाही. तरीपण शुभेच्च्चा !
4 Feb 2013 - 2:35 pm | खबो जाप
+१००
4 Feb 2013 - 12:32 pm | संजय क्षीरसागर
चोळी की काचोळी ??/
नेमके काय म्हणावे???
चोळी की काचोळी? /
एक पक्ष....चोळी ही बायकांची, वडारणीची असते.... साधी नेहमीची कंचुकी असते.
दुसरा पक्ष...चोळी असे काही नसते बायकांची असो वा वडारणीची वा साधी..ती कंचुकीच असते
.............
आमचा एक मित्र चोळीला झंपर असे म्हणतो
तसेच ब्लाउज की टॉपलेस?? काही जागी टॉपलेसला नजरबंदी असेही म्हटले जाते
...जागा तीच नावे निराळी
4 Feb 2013 - 12:40 pm | अत्रुप्त आत्मा
__________________/\_______________________/\______________________/\_____________________
4 Feb 2013 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरी गोष्ट अशी की, सुधारणावादी महिला म्हणाल्या की, "चोळी" ला "का चोळी" म्हणायचं ? ब्लाऊज का नाही?"
यावरून "चोळी", "काचोळी" आणि "ब्लाउज" असे तीन प्रकार झाले आहेत.
4 Feb 2013 - 1:12 pm | संजय क्षीरसागर
`चोळी' नाम आहे, `का चोळी?' हा प्रश्न आहे आणि "ब्लाउज हे उत्तर आहे.
4 Feb 2013 - 1:55 pm | बॅटमॅन
हे उत्तर चूक आहे. आता बरोबर उत्तर काय ते विचारु नका =))
4 Feb 2013 - 2:26 pm | डॉ सुहास म्हात्रे
नाम, प्रश्न आणि उत्तर ही तीनही प्रश्नोत्तरातून मिळालेली नाम टाईपची उत्तरेच आहेत. :)
4 Feb 2013 - 12:54 pm | सूड
पोळी आणि चपाती यातही लोक जातियता आणल्याशिवाय राहत नाहीत. एक मैत्रीण चुकून चपाती म्हटली असता एका मित्राने ऐकवलेलं वाक्य उदाहरणादाखल्,"हे बघ!! तू माहेरची फडके आणि सासरची देवधर आहेस. चपाती नाही पोळी म्हण !!"
4 Feb 2013 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
फडके आणि देवधर यात जातियता कशी आली बुवा?
बाकी अ.कु. चे धागे रोचक असतात.
पोळी की चपाती हा प्रश्र्ण RTI मधे कॄशी किंवा अन्न आणि औषध खात्याला विचारायला पाहिजे.
पैजारबुवा,
4 Feb 2013 - 1:01 pm | चौकटराजा
मुक्तछंदातील कवितेचा प्रयत्न वाखाणण्याजोगता आहे.
होळी की शिमगा ?
टोळी की कंपू ?
कोळी की मासेमार ?
चोळी की कंचुकी ?
मोळी की गठ्ठा ?
अ आ , कवितांना तयार आहात ना ?
4 Feb 2013 - 1:01 pm | गवि
मला वाटतं पोळाच्या स्त्रीलिंगी काउंटरपार्टला, अर्थात उनाड गायीलादेखील पोळी म्हणत असावेत..
4 Feb 2013 - 1:09 pm | संजय क्षीरसागर
पाखरू म्हणतात!
4 Feb 2013 - 1:11 pm | ज्ञानोबाचे पैजार
बराबर.....
जाडा जाडी, मामा मामी इ.
गविंचे हे लॉजीक बरोबर असेल तर मग मला चोळीच्या काउंटर पार्टचा अर्थ समजला तो कदाचीत बरोबर असावा,
पण तेच लॉजीक वीडी आणि मिडी ला का बसत नाही?
गविच पण असच काहीस लॉजीक आहे का?
पैजारबुवा
4 Feb 2013 - 1:05 pm | दिपक.कुवेत
हेच बोल्तो. नुसतं चपातीविषयीच नाहि तर ईतरहि अनेक बाबतीत...जस कांदा चीर म्हणायचं...कांदा काप नाहि.
5 Feb 2013 - 1:24 am | अगोचर
आणि साडी नेस म्हणायचं साडी घाल नाही -
5 Feb 2013 - 11:30 am | गवि
धागा "अप्रकाशित" केला म्हणायचं, "उडवला" म्हणायचं नाही.
कविता चान म्हणायचं.. भिकार नाही..
इत्यादि भर घालू इच्छितो..
4 Feb 2013 - 1:53 pm | नाना चेंगट
अरे काय चाललं आहे मिपावर ? हा कसला काथ्याकुट?
उद्या नवे असलेच काथ्या कुटायला काढाल
कुल्ला कि ढुंगण?
पाद की फुसकुली?
छ्या !! काही खरं नाही ब्वा !!!
4 Feb 2013 - 8:33 pm | चौकटराजा
यासाठी मोलसवर्थ यांचा जंगी मराठी इंग्रजी शब्दकोश पहावा .दोन्ही चा अर्थ एकच ! तिसरा पण एक शब्द दिलाय तिथं नाना !
4 Feb 2013 - 2:04 pm | चिगो
विदर्भात (आमच्याकडे) चपाती नसतेच.. (मी तरी ऐकलेली नाही) फक्त पोळीच.. कणकेत तेल/तूपही घालत नाही, आणि ती नुसतीच भाजली जाते तव्यावर, आणि त्यानंतर गॅसवर टम्म फुगवली जाते, तरी पोळीच.. तसेच साबूदाण्याची "उसळ" असते.. बायकोच्या माहेरकडे (पक्षी: मुंबई) "चपाती" म्हणतात, जरी ती राहींनी सांगितलेल्या पद्धतीने तेल/तूप लावून, घड्या घालून केली जात असली, तरी चपातीच.. वरुन "अंड्याची पोळी, पुरणाची पोळी.. ही चपातीच !" हे ऐका.. च्यामारी, म्हणून तर म्हणतो ना राऽऽव, इदर्भावर अन्याय व्हतो, म्हून.. ;-)
4 Feb 2013 - 2:09 pm | बॅटमॅन
असं आहे खरं. कर्नाटक-तमिऴनाडूमध्ये अनुक्रमे होळिगे-पोळिगे असा शब्द पुरणपोळीला आहे, तर "रेग्युलर" चपाती ही चपातीच असते. माझे बाबा-काका-मावसोबा या तिघांकडूनही ऐकलेले आहे, की त्यांच्या लहानपणी पुरणाची असेल तर पोळी, नैतर चपाती असे म्हणायचे. पण यात थोडा जातनिहाय फरकही आहे. काही जातींत चपातीला पोळी म्हणतात, म्हंजे चपाती हा शब्दच हद्दपार, तर काही जातींत दोन्हीही शब्द वापरले जातात.
4 Feb 2013 - 11:36 pm | पक्या
आणि ती नुसतीच भाजली जाते तव्यावर, आणि त्यानंतर गॅसवर टम्म फुगवली जाते - ह्याला फुलका म्हणतात.
5 Feb 2013 - 12:44 pm | चिगो
तुम्ही फुलका म्हणा, आम्ही "पोळीच" म्हणतो..
आपली ती पोळी, दुसर्याचा तो फुलका.. ;-)
4 Feb 2013 - 2:28 pm | चेतन माने
चाय बराबर खाताव ती चपातीच असते. चाय-पोळी !!! अएह्ह कसं वाटत ते!!!
चाय-चपाती च बेष्ट
4 Feb 2013 - 2:29 pm | चेतन माने
चाय बराबर खाताव ती चपातीच असते. चाय-पोळी !!! अएह्ह कसं वाटत ते!!!
चाय-चपाती च बेष्ट
4 Feb 2013 - 2:38 pm | अधिराज
पुण्यामध्ये चपाती म्हणणारा हा "गावंढळ" आणि पोळी म्हणणारा हा "सुधारलेला" असे समीकरण आहे, असे एका पुणेरी मित्राने संगितल्याचे स्मरते.खरतर विंग्लिश मध्ये पण चपातीच म्हन्त्यात.
4 Feb 2013 - 2:42 pm | बॅटमॅन
खराय ते. पण इंग्लिशच्या आधारे एखादा मराठी शब्द चूक-बरोबर ठरवताना पाहून हहपुवा झाली.
4 Feb 2013 - 2:49 pm | अधिराज
नाहीओ सर, मराठी शब्द चूक-बरोबर ठरवण्यासाठी म्हणून नाही सांगितलं, पण विंग्लिश मध्ये आसल तर ते सरसकट करेक्ट असं मानण्याची पद्धत हाय म्हणून आपलं सांगितलं.
4 Feb 2013 - 2:59 pm | बॅटमॅन
पद्धत हाय म्हणून ती बरुबर आशिलच आसं काय नाय!! आसू सोडा जावा ओ.
4 Feb 2013 - 3:14 pm | अधिराज
का म्हनून लेकरावर येवडं कावताय?(;_;). मी कुठं म्हटलं काय बरोबर काय चुक. मला बी थोडं विंग्लिश येतं म्हणून त्यात काय म्हनत्यात ते सांगितलं ना. लहान असलो म्हनून काय झालं आम्ही आमचं निरीक्षण बी नोंदवू नाय व्हय.
4 Feb 2013 - 3:38 pm | बॅटमॅन
नोंदवा की काय त्यात, हिते कोणी पाणिनी नाय. फकस्त पद्दतीबद्दलचं मत खटाकलं म्हून म्हन्लो इतकंच :)
4 Feb 2013 - 11:40 pm | पक्या
बरोबर आहे. असा समज आहे पुण्यात. शिवाय चपाती शब्द वापरणारे जास्त ब्राम्हणेतर लोक पाहिले आहेत. ओळखीतल्या ब्राम्हणांकडे पोळीला चपाती शब्द वापरलेला ऐकला नाही. हे फक्त निरीक्षण आहे.
5 Feb 2013 - 3:05 pm | अत्रुप्त आत्मा
@ हे फक्त निरीक्षण आहे. >>> +++++++++++++१११११११११११११११११११११ आणी ते भरपूर खरे(ही) आहे.
8 Feb 2013 - 12:02 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी बरोबर आहे निरिक्षण. माझ्या भाच्याने आंतरजातीय विवाह केला आहे. त्याची बायको चपाती म्हणते. तर बहिण तिला सांगत असते कि आता तू पोळी म्हणायचस.
12 Mar 2014 - 6:35 pm | साती
:)
4 Feb 2013 - 3:00 pm | कुंदन
मि पा चे मुक्त पीठ का करताय?
6 May 2015 - 6:31 am | यसवायजी
तुम्ही उत्तर शोधताय का हुडकताय?
------------------------
अजुन काही प्रश्न..
खीळा की मोळा?
खांब की डांब?
खड्डा की डबरा?
साळुता की केरसुणी?
कोल्हापुरी SYG
4 Feb 2013 - 3:20 pm | चावटमेला
बादली की बारडी?
उभा आहे की उभारलोय?
टमटम की सिक्स सीटर की वडाप?
(सांगलीकर) चावटमेला
4 Feb 2013 - 3:39 pm | बॅटमॅन
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला वडाप हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो. दळपात दळतात, कांडपात कांडतात, तसं वडापमध्ये वडतात.
(मिरजकर) बॅटमॅन.
4 Feb 2013 - 4:23 pm | यसवायजी
मानलं राव तुम्हाला.. काय लॉजीक लावलय?? खत्र्या.. :)
4 Feb 2013 - 5:02 pm | चावटमेला
सगळे बरोबर. व्यक्तिशः मला वडाप हा शब्द जास्त अर्थवाही वाटतो. दळपात दळतात, कांडपात कांडतात, तसं वडापमध्ये वडतात.
सहमत... टमटम काय नि वडाप काय, सगळीकडे अगदी कोंबून कोंबून माणसं वडतात
4 Feb 2013 - 10:11 pm | सस्नेह
वडा कसा दोन पावांमधे कोंबतात तशी माणसे दोघा दोघांमधे कोंबतात म्हणून वडाप..
(इचलकरंजीकर) स्नेहांकिता
4 Feb 2013 - 10:22 pm | बॅटमॅन
वा हेही सहीये!!!
4 Feb 2013 - 3:25 pm | अधिराज
चिटकवणे की चिकटवणे
नेहेमी की नेहमी
(कदाचित पहिले शब्द बरोबर)
4 Feb 2013 - 3:44 pm | मनराव
>>चिटकवणे की चिकटवणे.....<<
चिकट पदार्थाने चिकटवतात.... त्यामुळे चिकटवणे बरोबर असेल...
4 Feb 2013 - 3:38 pm | कुंदन
डुलकी की डुकली?
4 Feb 2013 - 3:40 pm | बॅटमॅन
डुकली हा सबूद आपण तरी नै ऐक्ला ब्वा कंदीपण.
(भांबुर्ड्यातल्या एका सकलमहाराष्ट्रीय वसतीगृहात राहिलेला) बॅटमॅन.
5 Feb 2013 - 1:27 am | जेनी...
मला तर दोन्ही ऐकुन झोप येते ..
4 Feb 2013 - 4:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला तर दोन्ही बरोबर वाटतात. अर्थ पोहचतो. :)
-दिलीप बिरुटे
(कुंदनच्या प्रश्नांचा फ्यान)
5 Feb 2013 - 11:27 am | स्पा
पिशवी कि पिव्शी?
बादली कि बालदी
4 Feb 2013 - 3:57 pm | यसवायजी
निजा.. झोपा.. लवंडा.. पसरा.. पडा.. की अजुन काही?? :D
5 Feb 2013 - 12:57 am | आदूबाळ
उलथा?
4 Feb 2013 - 4:16 pm | प्रसाद गोडबोले
काथ्याकुट की एरंडाचे गुर्हाळ ?
=))
4 Feb 2013 - 4:29 pm | अधिराज
मारुन टाकणे, हत्या करणे, ठार मारणे, खून करणे, गचकवणे, गेम करणे, खपवणे की अजुन काही?
4 Feb 2013 - 4:43 pm | प्रसाद गोडबोले
वध राहिला कि हो साहेब =))
4 Feb 2013 - 5:02 pm | खबो जाप
मी पण तेच म्हणार होतो वधायचे राहिले कि...... :-)
5 Feb 2013 - 1:28 am | जेनी...
हाणायचं
5 Feb 2013 - 1:29 am | जेनी...
हाणायचं पण राह्यलं ?
5 Feb 2013 - 11:38 am | अधिराज
आवं पूजा बाई , हाणनं येगळ, म्हंजे हाणणे, मारणे, खर्चापानी देणे, पाकिस्तान दाखवणे, हाडं काडं येक करणे, हात पाय तोडने वगैरे वगैरे.
5 Feb 2013 - 11:22 am | अधिराज
आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वाढ" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.
5 Feb 2013 - 11:32 am | अधिराज
"वध" ऐवजी चुकुन "वाढ" टाइप झालं,ते दुरुस्त कसं करावं माहीत नाही. परत असं वाचा.
आमच्याबी मनात आलं होतं "वध" टाकावं, पण इकडच्या तिकडच्या चर्चा वाचल्यावर "वध" ह्या शब्दाची प्रोफाइल जरा हाइ लेवेलची हाय आसं वाटलं. म्हंजे वध ही गोष्ट सामन्या माणसाने करायची गोष्ट नाही (हे माझं वैक्तिक मत हाये) आसं वाटलं ,म्हनून सोडून दिलं.
4 Feb 2013 - 9:17 pm | श्रिया
अजुन काही
वरचे तिकीट काढणे, वर पाठवणे
5 Feb 2013 - 12:57 am | आदूबाळ
ढगात पाठवणे
5 Feb 2013 - 10:54 am | खबो जाप
हाण तेच्या मारी ............ :-)
5 Feb 2013 - 11:28 am | अधिराज
आजुन आठवलं जीव घेणे, टपकावणे. बाकी म्हैईला वर्गाकडं बी अशा शब्दांचा संघ्र हाये, हे बघुन कौतुक वाटतं.
5 Feb 2013 - 8:26 pm | यसवायजी
ह्यात ते टपका डालनेका बसतय का बघा..
4 Feb 2013 - 5:10 pm | इरसाल
पोळी-भाजी
मटण-चपाती
कधी मटण-पोळी किंवा पोळी-चिकन ऐकले नाही.
इथे जात आडवी येत असावी काय ? (म्हणजे कोकण, विदर्भ, खांदेश, मराठवाडा इ.इ.)
4 Feb 2013 - 10:13 pm | सस्नेह
मटण-भाकरी कशी शोभते तशी चपाती नाय शोभत मटणाशी..
5 Feb 2013 - 11:00 am | इरसाल
पण धागा पोळी-चपातीचा आहे ना !!!!!!
4 Feb 2013 - 9:01 pm | बबन राव
चपटी बद्दलपन बोला कि राव!!!!
5 Feb 2013 - 10:56 am | खबो जाप
चपटी म्हनाव देशी म्हनाव कि गावटी व ...........
4 Feb 2013 - 9:12 pm | नानबा
बबन राव, आवं चपटी ही काय अशी खुल्यात बोलायची गोष्ट हाय का वं? तिचा निवांत दाराआड आस्वाद घ्येत्यात लोकं. आणि मंग पडत्यात कुठंतरी कडंला..
4 Feb 2013 - 9:14 pm | नानबा
अजून एक समान शंका -
लाईट गेले की गेली? विज जाते, दिवे जातात, मग लाईट या विंग्रजी शब्दाला स्त्रीलिंगी म्हणावे की नपुसकलिंगी??
4 Feb 2013 - 9:18 pm | सुनील
काथ्याकूट तोच शीर्षके निराळी ;)
बाकी पोळी आणि चपाती यांतील कुठला शब्द सांविधानिक आहे?
4 Feb 2013 - 9:29 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या घरी तर पोळीच म्हंटले जाते तांत्रिक नाव जरी फुलके असले तरीही.
अन लहानपणीपासून मराठी चित्रपट, सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम पाहून असा समज होता की उच्चभ्रू लोक पोळीलाच चपाती असे म्हणतात.
लहानपणी शाळेतल्या गुरुजींनी सांगितलेली एक गोष्ट आठवली.
भारत स्वतंत्र झाल्यावर भारताला भेट देणार्या परदेशी शिष्टमंडळासाठी तत्कालीन पंतप्रधान पं. नेहरूंनी मेजवानी आयोजित केली होती. पाहुण्यांनी विविध भारतीय पदार्थांवर भरपूर ताव मारला. पण त्यापैकी एक नेहरूंना म्हणाले मि. नेहरू यू हॅव अरेंज्ड अ वंडरफूल डीनर; एव्हरीथींग इज गुड बट युअर चप्रासी इज नॉट गुड. नेहरूंना प्रथम आश्चर्य वाटले की काम करणारे चप्राशी (शिपाई) पाहुण्यांशी बेअदबीने वागले? तेवढ्यात त्या पाहूण्यांनी चपातीकडे इशारा केला.
पाहुण्यांच्या भारतीय पदार्थांच्या मर्यादित ज्ञानाने घोळ केला होता.
5 Feb 2013 - 12:32 am | खटासि खट
पोळी म्हटलं कि बैलपोळाच आठवतो राव
5 Feb 2013 - 1:09 am | श्रीरंग_जोशी
मल तान्हापोळा आठवतो.
धमाल असायची...
5 Feb 2013 - 1:30 am | श्रीरंग_जोशी
स्वयंसुधारणेची सुविधा हवी...
5 Feb 2013 - 12:52 pm | श्रीगुरुजी
"पोळी" हा शुद्ध प्रमाणित (म्हणजे पुणेरी) मराठीतला शब्द आहे.
"चपाती" हा ग्रामीण मराठीतला शब्द आहे.
5 Feb 2013 - 3:34 pm | राही
उलट असू शकते. चपाती हा सर्वसाधारणपणे सर्वत्र प्रचलित असलेला प्रमाण शब्द बनू शकतो.पोळी हा काही थोड्या लोकांकडून/मध्ये वापरला जाणारा घरगुती बोली भाषेतला शब्द बनू शकतो.
5 Feb 2013 - 3:48 pm | गवि
लुसलुशीत मऊ, अनेकपदरी आणि चिंचगुळाची आमटी+उकडलेल्या बटाट्याच्या भाजीसोबत खाण्यासाठी अत्यंत योग्य असते ती "पोळी". पोळ्या दोन किंवा तीन खातात.
सुके + रस्सा अशा दुहेरी मटणासोबत जाडजूड आणि दणदणीत अशी जी मस्ट असते ती "चपाती". चपात्या खाताना मोजत नाहीत.
वगैरे..
8 Feb 2013 - 12:05 pm | प्रकाश घाटपांडे
विश्लेषण आवडल. पटल.
10 Feb 2013 - 6:03 am | शुचि
अहो तो जाडजूड दणदणीत रोटला बरं का .
5 Feb 2013 - 5:23 pm | Gawade Jawaharl...
नळ आला ,पानि आले ,पानि सूटले...........
5 Feb 2013 - 6:54 pm | निनाद मुक्काम प...
आम्ही येथे पाव खातो
क्वचित इंडियन उपाहारगृहात नान खातो ती सुद्धा गार्लिक आणि जोडीला पिकल असत
.
खरे तर येथे ह्या विषयावर लिहिण्यात अजिबात रस नव्हता.
पण सदर लेख आमच्या आडनाव बंधूंनी काढला आहे.
तेव्हा त्यांच्या आदरापोटी हि प्रतिक्रिया खरडली.
मुक्काम पोस्ट .......
8 Feb 2013 - 12:41 am | आशु जोग
चपाती म्हणणारे आम्ही लोक गावंढळ का
10 Feb 2013 - 6:05 am | शुचि
गावंढळ की गावठी की पावटे?
अहो जोग तुम्हाला उद्देशून नाही बरं का. असच आपलं.
10 Feb 2013 - 6:06 am | श्रीरंग_जोशी
http://misalpav.com/comment/457200#comment-457200
8 Mar 2014 - 2:18 pm | चित्रगुप्त
सोपे आहे.
आट्याची केली, तर 'पोळी'. कणकेची केली, तर 'चपाती'
संताचे पोल्ट्री फार्म होते, त्याला बंताने विचारले, अरे अंड्यातून पिल्लू निघाले, की तू ओळखतोस कसे, कोंबडा की कोंबडी ते?
संता म्हणाला, "आसान है, सामने कुछ दाने फेको, चुगने लगा, तो मुर्गा. ... चुगने लगी, तो मुर्गी"
8 Mar 2014 - 11:24 pm | काळा पहाड
पोळी हे नाजूकपणे तुपाबरोबर खायचे प्रकरण आहे. जी चापली जाते ती चपाती.
अंडाभुर्जी आणि चपाती खातात. पोळी नव्हे.
शिकरणाबरोबर खातात ती पोळी. चपाती नव्हे.
8 Mar 2014 - 11:31 pm | साळसकर
हि पोळी साजूक तुपातली हिला म्हावर्याचा लागलाय नाद ... ;)
मॉरल ऑफ द स्टोरी - म्हावर्याबरोबर खातात ती पोळी, मटणाबरोबर खातात ती रोटी, भाजी बरोबर खातात ती चपाती !!!
10 Mar 2014 - 5:58 am | निनाद मुक्काम प...
माझ्या मित्राच्या घरी पोळीला चपाती व काकू ला काकी म्हणणे हे अशुद्ध भाषेचे लक्षण मानले जायचे ,
आमच्या घरी सगळे पोळी म्हणतात म्हणून पोळी म्हणतो.
10 Mar 2014 - 11:39 am | एम.जी.
आता शब्दांवरूनच काथ्याकूट चाललाच आहे तर
माझ्या मित्राने मराठीस बहाल केलेले दोन शब्द...
मोठा असतो तो फोटो आणि आयकार्ड साईजचा तो छोटो...
ज्या पोस्टाच्या तिकिटाला मागून डिंक लावलेला असतो त्याला म्हणायचे चिकिट...