श्री.शरद काळे यांचे अभिनंदन

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
26 Jan 2013 - 12:06 pm

माझे मित्र श्री.शरद पांडुरंग काळे यांना पद्मश्री हा बहुमान जाहीर झाला आहे. जैवशास्त्रावरील संशोधन आणि त्याचा उपयोग करून जैवी कच-यापासून (बायोमासमधून) ऊर्जेची निर्मिती या सध्याच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर ते अखंड कार्यरत असतात. अशा अनेक प्रकल्पांच्या उभारणीला त्यांनी हातभार लावला आहे. वसुंधरवरील पर्यावरणाची जपणूक या ध्येयाला त्यांनी वाहून घेतलेले आहे. त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

विज्ञानबातमी

प्रतिक्रिया

नाना चेंगट's picture

26 Jan 2013 - 1:02 pm | नाना चेंगट

अभिनंदन. :)

त्यांच्या जीवनाविषयी तसेच त्यांनी केलेल्या कार्याविषयी अधिक माहिती लेखामधे दिली असती तर बरे झाले असते असे वाटते.

पिंगू's picture

26 Jan 2013 - 5:02 pm | पिंगू

+१

- पिंगू

नर्मदेतला गोटा's picture

26 Jan 2013 - 2:01 pm | नर्मदेतला गोटा

आय ए ओफिसतेहोते ना ते

पैसा's picture

26 Jan 2013 - 5:29 pm | पैसा

त्यांच्या कार्याबद्दल सविस्तर लिहा.

आनंद घारे's picture

26 Jan 2013 - 6:52 pm | आनंद घारे

श्री शरद काळे यांना पद्मश्री हा बहुमान मिळाल्याचे समजले तेंव्हा विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍या एका मराठी माणसाला तो मिळाला या आनंदाच्या भरात ती बातमी मी लगेच कळवली. ते आपल्या प्रयोगशाळेत कोणते संशोधन करतात आणि त्यांनी त्यात कोणते शोध लावले आहेत वगैरे माहिती जनतेला देण्याचा अधिकार फक्त त्या खात्याच्या अधिकृत प्रवक्त्याला असतो. यामुळे वसुंधरा, पर्यावरण, ऊर्जा वगैरे की वर्ड्समधून मी त्यांचा त्रोटक परिचय करून दिला होता. सवडीने त्यांच्याबरोबर चर्चा करून आणि त्यांची अनुमती घेऊन यावर सविस्तर लेख लिहिण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्याबरोबर बोलतांना जे विचार ते मांडतात त्यातले मुद्दे असे आहेत.

पृथ्वीवरील जमीन, पाणी आणि हवा यांचेकडून आपण सतत काही ना काही घेत असतो आणि यात सारखी वाढ होत आहे. आपण काढून घेतलेले पदार्थ तिला परत मिळाले नाहीत तर त्यांचे साठे संपून जातील. ते सगळे पदार्थ जसेच्या तसे पृथ्वीला परत करणे आपल्याला शक्य नसले तरी त्यांचा नाश न करणे आणि ते तिला परत मिळावेत यासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे आणि आपल्याच फायद्याचे आहे. वनस्पती, कृमी, कीटक वगैरे इतर जीवांच्या सहाय्याने हे करणे शक्य आहे. आपण जे जे काही घेतो ते सगळे परत करतो अशी परिस्थिती भविष्यकाळात कधीतरी आली तर त्यानंतर माणसाला अनंत काळपर्यंत चिंतामुक्त राहता येईल. बायोमासपासून इंधन तयार करणे, पावसाचे पाणी जमीनीत जिरवून त्याचा उपयोग करणे आणि मुख्य म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कच-याला त्याज्य वस्तू न समजता भविष्यकाळातील संसाधन (रिसोर्स) या नजरेने पाहून त्याचे रिसायकलिंग कसे करता येईल याचा विचार करणे महत्वाचे आहे.

हे विचार सगळ्यांनाच पटतात, पण ते आचरणात आणण्यासाठी काय करायला हवे किंवा करणे शक्य आहे यावर श्री.काळे मोलाचे काम करत आहेत.

नर्मदेतला गोटा's picture

27 Jan 2013 - 1:46 pm | नर्मदेतला गोटा

अगदी मोघम

सुनील's picture

26 Jan 2013 - 7:42 pm | सुनील

डॉ काळे यांचे अभिनंदन!

घारे यांच्याकडून विस्तृत माहितीच्या प्रतीक्षेत.

डॉ. काळेंचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या कार्याबद्दल विस्तृत माहिती वाचायला आवडेल.

मदनबाण's picture

27 Jan 2013 - 8:20 am | मदनबाण

डॉ. काळे यांचे अभिनंदन ! :)

त्यांच्या कार्या बद्धल माहिती जाणुन घ्यायला आवडेल.

नर्मदेतला गोटा's picture

27 Jan 2013 - 1:45 pm | नर्मदेतला गोटा

>ते आपल्या प्रयोगशाळेत कोणते संशोधन करतात आणि त्यांनी त्यात कोणते शोध लावले आहेत वगैरे माहिती जनतेला देण्याचा अधिकार फक्त त्या खात्याच्या अधिकृत प्रवक्त्याला असतो.

मिसळीवर खरडण्यापूर्वी हे लक्षात आलं नाही वाटतं

आनंद घारे's picture

27 Jan 2013 - 4:59 pm | आनंद घारे

मिसळीवर खरडण्यापूर्वी हे लक्षात आलं नाही वाटतं
आलेलं होतं, तरीसुद्धा खरडलं, आता काय म्हणणं आहे?

श्री.शरद काळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! ते एका महत्वाच्या विषयावर संशोधन करत आहेत, त्यामुळेच त्याबद्दल विस्तृत माहिती मिळण्याची उत्सुकता आहे.

नर्मदेतला गोटा's picture

27 Jan 2013 - 10:14 pm | नर्मदेतला गोटा

त्यांची काही वेबसाइट असेल तर ती द्या
म्हणजे त्यांच्या कामासंबंधी जाणून घेता येइल

Nile's picture

29 Jan 2013 - 9:07 am | Nile

तुम्हाला शोध घेता येत नाहीत वाटतं. नर्मदेतले गोटे सुद्धा दिर्घ वास्तव्याने गुळगुळीत होतात, तुम्हाला मात्र फारसं पाणी लागलेलं दिसत नाही? असो.

घारेकाका, चांगली बातमी दिल्याबद्दल धन्यवाद. श्री. काळे यांचे अभिनंदन. त्याच्या कार्यासंबंधी जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

यशोधरा's picture

29 Jan 2013 - 9:23 am | यशोधरा

डॉ काळे यांचे अभिनंदन. त्यांच्या कार्याविषयी विस्तृत वाचायला आवडेल.