बापाने पोर कशी संभाळायची ?

बाबा पाटील's picture
बाबा पाटील in काथ्याकूट
24 Jan 2013 - 11:31 pm
गाभा: 

धागा थोडा वादग्रस्त आहे पन माझ्यासारखे सगळेच बाप या भुमिकेतुन गेले असतील. १)पोरग १-२ तास संभाळणे सोप्पे आहे पन त्यानंतर काय ? २)आई जवळ नाही आणी भोकाड पसरले की बाबा हव ते घेउन देतो किंवा पाहिजे ते हट्ट पुरवुन घेणार्‍या अतिहुषार पोट्ट्यांच काय करायच. ३)आई माझ सगळ काम करते,असे केविलवाना चेहरा करुन बाबाला कामाला जुंपतात त्याच काय करावे. ४)इमोशन ब्लॅकमेलिंगच (आई आणी बाळ दोघांकडुन )त्याच काय ?

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

24 Jan 2013 - 11:37 pm | अभ्या..

अजून वेळ आहे. ;)
नंतर देतो प्रतिसाद.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 12:18 am | संजय क्षीरसागर

आता सुरू करा प्रतिसाद

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2013 - 5:55 am | अत्रुप्त आत्मा

@आता सुरू करा >>> =)) काय??? =))

श्रीरंग_जोशी's picture

24 Jan 2013 - 11:47 pm | श्रीरंग_जोशी

श्री मुक्त विहारी यांनी काही काळापूर्वी मूलांची शेती.... हे सदर चालवले होते. हे वाचून कदाचित काही प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.

पिवळा डांबिस's picture

24 Jan 2013 - 11:47 pm | पिवळा डांबिस

जशी जमतील तशी!
आपल्या बापाने आपण लहान असतांना आपल्याला संभाळताना काय काय चुका केल्या होत्या ते आठवायचं आणि मग अजिबात गिल्टी वाटून घ्यायचं नाय!!! मुख्य म्हणजे पोराच्या आईने दाखवून दिलेल्या आपल्या चुकांकडे (आणि त्यानंतरच्या अपरिहार्य लेक्चरकडे!!)फुल्ल दुर्लक्ष करायचं!!!
:)
माझा एक सदरा देणे आहे, इच्छुकांनी व्यनि करावा!!१
;)

खटासि खट's picture

24 Jan 2013 - 11:49 pm | खटासि खट

विनोद / गंमत / टीपी शी आपलं वावडं नाही आई च्या "ड्युटी" शी एरव्ही आपला काही संबंध नाही असा असंवेदनशील मेसेज जातोय. उत्तराबद्दल गंभीर असाल तर सिंगल मेल पॅरेंटसना हा प्रश्न विचारून पहा. घरचं बाहेरचं पाहून बाळाचं कसं काय पहायचं या कल्पनेनेच छाती दडपून जाते. तुमच्या बाबतीत एक करता येईल, जेव्हां जेव्हां घरी असाल तेव्हा नेट बाजूला ठेवून जास्तीत जास्त वेळ बाळाचं तुम्हीच पहायला सुरूवात करा. बाळ आणि पप्पा दोघांनाही काहीच दिवसात (चांगला) फरक दिसेल.

आदूबाळ's picture

25 Jan 2013 - 1:00 am | आदूबाळ

सहमत!

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 12:15 am | संजय क्षीरसागर

मुलाला सांभाळायला, सगळ्या गोष्टी एका फटक्यात जमतील.

दादा कोंडके's picture

25 Jan 2013 - 12:21 am | दादा कोंडके

बाई ठेवा!

सहमत! मुलाचं माहीत नाही पण त्याची आई वठणीवर येइल.

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 12:31 am | अभ्या..

बाई ठेवा.

वॉव मग तर किती धागे?
आईचा धागा: या नवर्‍याला त्या बाईपासून कसे सांभाळू?
बाईचा धागा : पोराला सांभाळेन बापाचे काय करु?
पोराचा धागा: मला सांभाळायचे सोडून हे काय करतायत?
बापाचा परत एक धागा: काय काय सांभाळू?

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 12:34 am | बॅटमॅन

मग "एक धागा सुखाचा, बाकी धागे दु:खाचे, बिनतारी हे वस्त्र सदस्या, तुझिया लेखांचे" असेही म्हणता येईल =))

=)) =)) =))

अत्रुप्त आत्मा's picture

25 Jan 2013 - 6:11 am | अत्रुप्त आत्मा

@मग "एक धागा सुखाचा,>>> =)) ऑबजेक्षन मिलॉर्ड ! गाणं चुकलेलं आहे.
धागा धागा अ-खंड उसवु या, सगळ्यांनीहि धिंगाणा घालू या. =))
हे गाणं हवं ! :-/

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 12:40 am | संजय क्षीरसागर

आयडिया एकदम सही आहे. महिनाभर तरी प्रयोग करून पाहा... नाही जमलं, सोडून द्या

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 12:51 am | अभ्या..

नाही जमलं, सोडून द्या

आँ? काय सोडून द्या?

ए अभिजीत प्लीज काम करु देत ऑफीसात. =))

बाईचा धागा : पोराला सांभाळेन बापाचे काय करु?

=)) =))

कपिलमुनी's picture

25 Jan 2013 - 11:37 am | कपिलमुनी

बापाचा परत एक धागा: काय काय सांभाळू? हह पु वा

योगप्रभू's picture

25 Jan 2013 - 12:36 am | योगप्रभू

कुणाला विचारत बसू नका. केलं की सगळं जमतं.
पहिल्यांदा मुलांना वेळ द्या. ती झोपली की मगच नेटवर वावरा.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 12:49 am | संजय क्षीरसागर

पोरगा झोपला की काय करायचं हा त्यांचा प्रश्न नाहीये

आनन्दिता's picture

25 Jan 2013 - 1:09 am | आनन्दिता

हे असले सल्ले ऐकलेत तर, बाकी काही होवो न होवो पण तुमची घरातुन गच्छंती नक्की होईल..!!

मी काय म्हणते पोरांची भरपूर म्हणजे सॉलीड आबाळ करुन पहा आपोआप आईचच "इमोशनल ब्लॅकमेलींग" होईल ;) आणि आई सुतासारखी सरळ होईल. हाकानाका :D

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 1:16 am | अभ्या..

आई सुतासारखी सरळ होईल

आन बापाची भरपूर म्हणजे सॉलीड आबाळ सुरु होइल. होकीनै शुचितै?
कशाला नवीन धाग्याचा कहार परत? ;)

मी सांगीतलेला उपाय करा. पोरगा मजेत आणि तुम्ही मोकळे!

दुसरी मोठी अडचण आली की पहिलीचा विसर पडतो असं म्हणतात म्हणून सल्ला दिला हो. नाहीतर आपल्याला काही त्यातलं कळत नाही. तेव्हा दुसरा किंवा तिसरा, स्वजबाबदारीवर निस्तरा..

त्यापेक्षा तीन शिफ्टसाठी तीन बायका ठेवलेल्या परवडतील. आणि बाप आपल्याकडे लक्षच देत नाही म्हटल्यावर पोरगं काय बिशाद रडतंय.

म्हणजे बाबा परत कामाला जुंपलेलेच ;)

बाबा काका तुमाला येतायेत ते सेम प्रोब्लेम माझ्या पप्पाना यायचे !

बिच्चारे :(

व्हायचं काय कि पप्पांना सुट्टीच्या दिवशी बाहेर पडायचा कंटाळा यायचा . एकदा दोनदा( च. ) आईला म्हणले
" तु जा मी बघतो पोरांकडे " . आम्हि तीन भावंडं , दादा आणी दी मोठे कळते होते थोडे
मी शेंडेफळ ;)

मी तर आईला म्हणायची तु जा बाबा छान सांभाळतात ...आई बाजारात गेली कि
मी पप्पांना सॉल्लिड ब्लॅक्मेल करायची =)) .....
आई परत आली कि आई म्हणायची " फार त्रास नै नं दिला हिने ?? नै च देणार ,
शानं गं ते पिल्लु माझं " =))

बाबा फक्त एवढच म्हणायचे " नेक्स्ट टैम लिस्ट बनवुन देत जा मी जात जैन बाजारात " :(

:-/

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 1:38 am | संजय क्षीरसागर

हे आनंदिताच्या पोस्टवर मी आता वाचलं :

बाबा पाटील - Wed, 23/01/2013 - 12:59
माझ्या लेकीला देखील असेच भयानक उद्योग पडलेले असतात त्यामुळे घरातली सगळी १० माणसे आणी दोन कुत्री तिच्यावर डोळ्यात तेल घालुन लक्ष ठेवत असतात.....

आपले सगळे प्रतिसाद मागे. तुम्ही आपलं स्वतःला सांभाळा!

आजानुकर्ण's picture

25 Jan 2013 - 3:19 am | आजानुकर्ण

तुम्ही 'सांभाळायची' असे म्हटले आहे. आता येथे ती पोर म्हणजे स्रीलिंगी म्हणजे फक्त मुलगी. पोरं म्हटलं तर लिंगनिरपेक्ष अनेकवचनी. तुम्हाला नक्की बापाने आई नसताना मुलीला कसे सांभाळावे हा प्रश्न पडला आहे की बापाने आई नसताना मुलांना कसे सांभाळावे हा प्रश्न पडला आहे? अनेकांनी पोरगा वगैरे सुद्धा प्रतिसादात लिहिले आहे. त्यांना कसे कळले की पोरगा आहे?

गेले एकदोन दिवस जाहिरातींतील अशुद्धलेखनाबाबत तावातावाने चर्चा झाल्याने मलाही शुद्धलेखनाबाबत हे विचारावे वाटले.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2013 - 5:40 am | श्रीरंग_जोशी

लेखनातला अशुद्धपणा मला पहिल्या नजरेतच आढळला होता. पण मुद्दा महत्त्वाचा वाटला.

शीर्षकात जरी (पोर = मुलगी) असलं तरी धाग्यातल्या मुद्दा क्र.१ मध्ये पोरग (पोरगं = मुलगा) असाही उल्लेख आहेच.

घरातलं बाळ मुलगा असो वा मुलगी एका विशिष्ट अवधीनंतर त्याला सांभाळणे बहुतांश पुरुषांना आजही अवघडच जात असणार या मुद्द्याबद्दल कसलीही शंका वाटली नाही.

जोशी 'ले''s picture

25 Jan 2013 - 7:25 am | जोशी 'ले'

तेच म्हणतो .. बापाने पोर कशी संभाळायची ? हा सद्य परिस्थितील सिरियस धागा वाटला
एक अनुस्वार आपका वाक्य बदल सकता है :-)

अग्निकोल्हा's picture

25 Jan 2013 - 7:37 am | अग्निकोल्हा

"डॅडी इश्यु" कसा एव्हॉइड करायचा, यासंबंधि काही आहे का काय असचं वाटलं प्रथम!

नंतर अर्थातच पॉपकॉर्न हाति घेतले

गवि's picture

25 Jan 2013 - 11:13 am | गवि

पोर किती वयाचं आहे?

थोडक्यात सांगतो. पोराच्या आयुष्याची फार थोडी सुरुवातीची वर्षं ती आपल्या जवळ येतात, बालहट्ट म्हणता येईल असे हट्ट करतात, झळंबतात, कुशीत शिरतात, मारामारी करतात, दात घासायला आ करतात, ..झालीSSS असं खच्चून ओरडतात, आपल्या हातात घास बनण्याआधी चोच वासतात, मनापासून रडतात आणि मनापासून प्रेम करतात.

नंतर वर्षावर्षागणिक हे सगळं मागे पडणार, करतो म्हणालात तरी ती त्यांचं काही करु देणार नाहीत, गाडीच्या चाव्या मागण्यापुरते येतील, त्यांचे अगदी कितीही मित्र बनलात तरी नंतर हे होणारच आहे.

या सर्वात आपल्याला त्याच्याइतक्या वयाचं होऊन पुन्हा वाढण्याची संधी हात पसरुन उभी असते.

तेव्हा पोराला पोर म्हणून भेटायची ही अतिशय लिमिटेड पीरियड ऑफर आहे. एखादं चॉकलेट पोरासाठी आणणारे आणि त्याला शी लागताक्षणी "ए याला घेऊन जा गं..", असं पडल्याजागी म्हणण्यात सुख मानणारे नवरे हे पुरुषप्रधान संस्कृतीचे लाभार्थी दिसत असले तरी प्रत्यक्षात ते दुर्दैवी असतात.

धागा फक्त विनोदी असल्यास हा प्रतिसाद ग्राह्य समजू नये..

या धाग्यामुळे मधे एकदा कुठल्याश्या टीवी चॅनलवर, आई घरी नसताना वडीलांनी मुलाना सांभळायचा चॅलेंज दिलेला आठवतोय.

धन्या's picture

25 Jan 2013 - 11:34 am | धन्या

!!!

या सर्वात आपल्याला त्याच्याइतक्या वयाचं होऊन पुन्हा वाढण्याची संधी हात पसरुन उभी असते.

खरं तर त्यांच्यामुळे आपल्याला आपलं बालपण पुन्हा जगायला मिळतं.

मुलगा लहान असताना काय मस्त जगलोय आम्ही. त्याला फिरायला नेणं, त्याची आंघोळ, त्याच्याबरोबर म्हटलेली गाणी, त्याचा अभ्यास, कपडे आणि खेळण्यांच्या खरेद्या, ट्रिपा, फोटोसेशन्स... आणि सगळ्यात महत्त्वाचा मिळाला तो जगाकडे पाहण्याचा नवा नजरीया!

आज सुद्धा कितीही मतभेद झाले तरी ती गाठ इतकी पक्की आहे की पुन्हा त्याला मिठीत घेऊन नव्यानं सर्व सुरू होतं.

लेखकानं असा प्रश्न विचारला तेंव्हा मजा म्हणून उत्तरं दिली पण संगोपन हा अत्यंत रमणीय विषय आहे. आणि त्यांना तर मुलगी आहे. मुलीसाठी वडील म्हणजे जगातला सर्वात ग्रेट माणूस. बाबा पाटील दृष्टीकोन बदला, संधीच सोनं करा. मस्त आयुष्य घडवा लेकीचं. तुम्ही शेवटापर्यंत आनंदी रहाल.

व्यक्तिगत मत आहे पण एक मूल असणं सुखाचय, पसारा वाढवू नका.

संजय,
एक मूल असणं सुखाचय, या तुमच्या मताशी किंचित सहमत.
सुखाचीच मोजपट्टी लावायची असेल तर पसारा न मांडणेच सर्वात उत्तम. सिंगल राहूनही पैशाच्या जोरावर हवी ती सुखे विकत घेतात.

जे एका वेळी सुख वाटते, ते कालांतराने कटकट ठरु शकते. एक मूल सुखाचे असते, पण ते मोठे झाल्यावर अपुरेपणा लक्षात येतो. ताई-दादा किंवा लहान भावंडांच्या नात्याची जाणीव झाली नाही तर सिंगल चाईल्ड एकलकोंडे बनते, मागेल ते मिळणारच, लाडाचा वाटेकरी मी एकटाच यातून आत्मकेंद्रीपणा येतो. इतरांबरोबर काही गोष्टी शेअर करण्याची सवय लागत नाही. जबाबदारीची जाणीव होत नाही. असे मूल हट्टी, वर्चस्ववादी बनण्याची शक्यता जास्त असते आणि पुढे एक जबाबदार नागरिकही त्यातून घडत नाही (मी-माझा, समाजाशी मला देणे-घेणे नाही अशी स्वमग्नता)

त्यामुळे पुढचा पसारा वाढवू नये, हे ठीक, पण
'हम दो हमारे दो' हे तत्त्व उत्तम

सोशल नेटवर्किंग तुफानी आहे.

वाय कुणालाही बहिण मानून जगणं (बहुदा) घरातल्या बहिणीपेक्षा अत्यंत सोयीच असावं. इस्टेटीचे वाटे, आई-वडीलांची जवाबदारी, नणंद-भावजय कलगीतुरे, काही लफडी रहात नाहीत. सगळं ऑपशनल आणि तरीही सर्व भावनिक गरजा पूर्ण होतात.

इतरांबरोबर काही गोष्टी शेअर करण्याची सवय लागत नाही.

ती मित्रा-मैत्रिणींबरोबर राहिलं की लागते. पुढे बायको आली की सगळं शेअर केल्याशिवाय मजा नाही ते कळतं.

योगप्रभू's picture

25 Jan 2013 - 12:44 pm | योगप्रभू

संजय,
आभासी जगापेक्षा वास्तव जगच आपल्याला जमिनीवर ठेवण्यास मदत करते. अर्थात कुठल्या जगात रमावं, हा ज्याचा त्याचा प्रश्न.
आमचे अनुभव वेगळे आहेत. 'आमचे' शब्द वापरण्यामागे ज्यांना संभाव्य समस्येची वेळीच जाणीव झाली असा पालकांचा गट आहे.

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 12:53 pm | संजय क्षीरसागर

तुमचा तसा अनुभव असेल तर तो मान्य आहे.

पण एकूणात देशाची लोकसंख्या, दुसरं मूल वाढवण्यात होणारी (दुहेरी) भावनिक गुंतवणूक, आर्थिक ताण आणि मानवी नातेसंबंधात असणारी कमालीची संदिग्धता बघता माझा अनुभव `एक कुटुंब, एक मूल' आहे.

धन्या's picture

25 Jan 2013 - 1:00 pm | धन्या

"सिंगल चाईल्ड" हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे हे मान्य. परंतू सामाजिक दृष्टीकोनातून आणि एकंदरीत त्या मुलाच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनेही निवड तितकीशी योग्य ठरत नाही.

पण एकूणात देशाची लोकसंख्या, दुसरं मूल वाढवण्यात होणारी (दुहेरी) भावनिक गुंतवणूक, आर्थिक ताण आणि मानवी नातेसंबंधात असणारी कमालीची संदिग्धता बघता माझा अनुभव `एक कुटुंब, एक मूल' आहे.

"सिंगल चाईल्ड" चे परीणाम या सार्‍या बाबींपेक्षा गंभीर होऊ शकतात. चीनने हा प्रयोग करुन पाहीला आहे.

टवाळ कार्टा's picture

25 Jan 2013 - 12:49 pm | टवाळ कार्टा

असहमत

धन्या's picture

25 Jan 2013 - 12:50 pm | धन्या

एकुलते एक बाळ ही कल्पना मुलांच्या लहानपणी (मुलगा आणि मुलगी दोघेही अभिप्रेत) कितीही रम्य वाटत असली, त्याने आपले "सोशल स्टेटस" स्टेटस कितीही उंचावत असले तरीही हे प्रकरण ते मुल मोठे झाल्यावर, संसारात पडल्यावर खुपच तापदायक ठरु शकते.

जेव्हा एकुलते एक मुल असते तेव्हा आई वडीलांचं लक्ष पुर्णपणे त्याच्यावरच केंद्रीत असते. याने त्याला "सेंटर ऑफ स्टेज" राहण्याची सवय लागते. आई वडील त्याची प्रत्येक ईच्छा पुर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करतात आणि मग तडजोड काय असते हे त्याला शेवटपर्यंत कळत नाही. असो "सिंगल चाईल्ड" या विषयाचा आवाका खुप मोठा आहे. तुर्तास एव्हढेच.

जाता जाता, चीनने त्याची लोकसंख्या आवाक्यात आणण्यासाठी "एकच मुल" ही योजना राबवली आणि मानसशास्त्रात लिटील एम्परर सिंड्रोमची भर पडली.

इथे इश्श्यू एकुलते एक बाळ असा नसून, पालक त्याचे पालन कसा करतात हा आहे. एकुलत्या एक बाळाचे संगोपन व्यवस्थित केले तर त्याला समाजात राहण्याचे सर्व धडे आरामात गिरविता येतील. मी स्वतः अशी कैक उदाहरणे पाहिली आहेत. वरचा प्रतिसादही सिंगल चाईल्डच्या कल्पनेचे जनरलायझेशन आहे, ज्याशी मी असहमत आहे.

धन्या's picture

25 Jan 2013 - 1:08 pm | धन्या

मी जनरलायझेशन केलंच नाही.

संसारात पडल्यावर खुपच तापदायक ठरु शकते.

आजूबाजूची एकुलती एक बाळं मानसशास्त्राचा चश्मा लावून पाहिली की त्यातली खुपच कमी तुम्ही म्हणताय तशी हेल्दी पॅरेंटींग झालेली/होत असलेली असतात हे मात्र नक्की. :)

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 1:30 pm | संजय क्षीरसागर

मानसशास्त्राचा चश्मा लावून पाहिली की त्यातली खुपच कमी तुम्ही म्हणताय तशी हेल्दी पॅरेंटींग झालेली/होत असलेली असतात हे मात्र नक्की.

माझा व्यक्तिगत अनुभव एका मुलाचा आहे. शिवाय बहिणीला एकच मुलगा आहे. त्या दोन्ही भावंडात कमालीच ट्युनिंग आहे. माझ्या मेव्हण्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भाच्यावर आमच उभयतांच प्रेम आहेच पण मुलीला आम्ही आमचीच मुलगी समजतो आणि तिचे सर्व हट्ट स्वतःच्या मुलीसारखे पुरवतो.

चीनचं माहिती नाही पण भारतात कुटुंबसंस्था अजून तग धरून आहे. मी सांगतोय तसा विचार केला तर फॅमिली एक्स्टेंशन तर होतंच आणि देशाच्या सर्वव्यापी समस्येत आपला सोडवणूकीचा वाटा राहतो.

या बाबतीत बॅटमॅन म्हणत आहेत ते लागू होतं. आई वडीलांना बाल संगोपन म्हणजे काय याची जाण असेल तर मुलांच्या संख्येवर मुलांचा व्यक्तिमत्व विकास अवलंबून नसतो.

प्रत्येक कुटुंबातील आई वडीलांना अशी जाण असतेच असं नाही. किंबहूना अशी जाण खुप कमी आई वडीलांना असते. :)

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 2:07 pm | बॅटमॅन

हम्म मे बी, सँपल बायस दोघांचाही असू शकेल.

हे "सँपल बायस" काय प्रकरण आहे मालक?

गुगलून उत्तर मिळेल. परंतू तुम्हीच जरा विस्ताराने लिहा. तुम्ही याच मुद्दयाला धरुन लिहाल त्यामुळे व्यवस्थित कळेल.

योगप्रभू's picture

25 Jan 2013 - 1:26 pm | योगप्रभू

बॅट्या,
तुला आधी सांगितलंय तेवढं कर. तुझ्या इश्शूबाबत (प्रतिसादाबाबत) ३-४ वर्षांनी बघूच आम्ही. घोडामैदान फार लांब नाही. :))

मला नवल एका गोष्टीचं वाटतंय, की बाबांच्या संगोपनावर अजुन आया कशा बोलत नाहीयेत? पुरुषजातीच्या कौशल्यांबाबतचा हा पारंपरिक अविश्वास म्हणावा का? :)

हा योगप्रभूंचा फाऊल धरण्यात यावा.

बाबांच संगोपन ऑलरेडी झालय. आयांच संगोपन सुद्धा झालेलय. त्यांनी `एकमेकांच संगोपन कसं करावं' अशी चर्चा शुचिच्या पोस्टवर चालू आहे.

धन्या's picture

25 Jan 2013 - 1:44 pm | धन्या

माझा विश्वासच बसत नाहीये तुम्ही असाही प्रतिसाद देऊ शकता यावर. ;)

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 2:02 pm | संजय क्षीरसागर

आता काय झालं? तुम्ही उगीच मला `शिरेयस मानूस' समजताय राव.

समजूतीचा घोटाळा झाला आहे खरा...

एक डाव माफी असावी देवा. :)

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 2:08 pm | अभ्या..

माझा आहे विश्वास.
संजयजी देउ शकतात असे प्रतिसाद. :) आणि त्यांनी तसे खूप दिलेत.

योगप्रभू's picture

25 Jan 2013 - 1:57 pm | योगप्रभू

हा हा हा..
संजय,
बाबांचे संगोपन कौशल्य असं मला म्हणायचं होतं. गरीबाला सांभाळून घ्या. :)
मस्त गुदगुल्या करताय.

गरीब बिचार्‍या मला भवसागरात पार ओढायची कारस्थानं आहेत ही =))

नाय तर काय. बिचाऱ्याचं सांगोपन करून घ्यायचं वय आहे सध्या. हो की नै रे?

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 2:15 pm | बॅटमॅन

ही ही हा हा हा... =))

(पौगंडहास्य)

अभ्या..'s picture

25 Jan 2013 - 2:13 pm | अभ्या..

अरे तुला भवसागर पार करुन द्यायची सुवर्णसंधी दिली आहे ही.
सोचो मत. कूद जावो.

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 2:16 pm | बॅटमॅन

इन्शाल्लाह!

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 2:18 pm | संजय क्षीरसागर

भवसागरात!

धन्या's picture

25 Jan 2013 - 2:17 pm | धन्या

तू तुझ्या स्वाक्षरीच्या वर सेपरेटर लाईन टाक. पुढे मागे गडबड होऊ शकते.

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 2:18 pm | बॅटमॅन

पुढे, मागे गडबड होऊ शकते.

पुढे, मागे, गडबड होऊ शकते.

पुढे मागे, गडबड होऊ शकते.

यातले नक्की काय ;)

धन्या's picture

25 Jan 2013 - 2:21 pm | धन्या

हा पुढे आणि मागे चा "सँपल स्पेस" समजायचा काय? ;)

बॅटमॅन's picture

25 Jan 2013 - 2:39 pm | बॅटमॅन

प्रॉबेबलि ;)

तस्मात पोहायला शिक. सॉलिड मजा आहे या भवसागरात!

बॅट्या,
तरुणाईच्या नौका भवसागरात विहरताना बघायला बरं वाटतं रे.

एक वेडा समुद्रपक्षी नुकताच वाट चुकून अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला.
भवसागरात चोचसुद्धा ओली केली नाही त्या पाखरानं.
जाऊ दे.

अप्रीशिएट द सेंटिमेंट पण थोडे मतभेद आहेत. अर्थात, इथे लिहिले तर

"अवांतरांचा गल्बला | कोणी पुसेना कोणाला||" असे होईल म्हणून थांबतो. :)

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 4:27 pm | संजय क्षीरसागर

असा कयास आहे म्हणून थांबतो

अद्द्या's picture

25 Jan 2013 - 11:20 am | अद्द्या

बाबांना विचारून सांगतो ..

त्यांच्या सोबत असताना मी शांत असायचो .. (म्हणे) :D

बाबा पाटील's picture

25 Jan 2013 - 12:00 pm | बाबा पाटील

माझी लेक खरच खुप शहाणी आहे तशी , मी तिला संभाळायच्या एवजी तीच मला संभाळुन घेते बर्‍याचदा,पप्पा सतत कामात असतो हे तिला चांगलच कळत्,तिने जो काही बालहट्ट केला तो पुरवायलाही खरच खुप समाधान असत.दुसर म्हणजे ती मुलगी आहे म्हणुन कदाचित स्त्रीकडे असणार्‍या उपजत समजुदार स्वभावामुळे असेल पन जर मुलगा असता तर त्या माठ्याने एतक समजुन घेतल असत की नाही कोनास ठाउक.बाकी खोड्या मात्र ठरवुन काढते,सुपिक बुद्धीमत्ता,आणी जोडीला डोरेमॉन आणी शिनचॅन नावाच कार्टुन असल्यावर दुसर अपेक्षित तरी काय धरायच....

कदाचित स्त्रीकडे असणार्‍या उपजत समजुदार स्वभावामुळे असेल

हे जनरलायझेशन झालं. अर्थात हे असं जनरलायझेशन खुप वेळा होतं, पुरुष म्हणजे एक विशिष्ट गुणांची यादी आणि स्त्री म्हणजे एक विशिष्ट गुणांची यादी.

या बाबतीत वपुंचं एक वाक्य आठवतं, "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणाने सांगता येते की माणसाबद्दल काहीच ठामपणाने सांगता येत नाही." हे वाक्य स्त्री आणि पुरुषांना सारखेच लागू होतं.

बाकी सगळं छान आहे हो, पण त्या शिन्चॅन पासून लांब ठेवा तिला.

वॉव डॉरेमॉन आणि शिंच्यान मला पण आवडतं :)

लाल शर्ट आणि पिवळी चड्डी काय भारी दिसतो :)

त्याचा आवाज खुप फेव्रेट ....:)

तुमच्या मुलीची रास कन्या आहे कैवो ???

बाबा पाटील's picture

25 Jan 2013 - 10:23 pm | बाबा पाटील

आम्ही तिघेही वृषभ.... ....पन मला त्या दोघी मायलेकी वृश्चिक वाटतात.....

जेनी...'s picture

25 Jan 2013 - 10:27 pm | जेनी...

सहिये ;)

भारी कार्‍टून असणार ...
गणपा काकाच्या कन्येची आठवण आली ....

बाबा पाटील's picture

25 Jan 2013 - 10:36 pm | बाबा पाटील

घरातली दहा मानस एक साईड्ला अन हे एक पिल्लु एक साईडला........

पन मला त्या दोघी मायलेकी वृश्चिक वाटतात.....

वृश्चिक नावं ठेवायचं काम नाही हं

अंधश्रद्धेला नाव ठेवायचं काम नाही का ;)

अभ्या..'s picture

26 Jan 2013 - 11:46 pm | अभ्या..

नाही, हे फाटे फोडायचं काम आहे. ;)

अगदी जिलेबीगत सरऽळ फाटे बघ, होय किनी?

१०० वेळा सहमत शुचितैंशी, आयला वृश्चिकेची दोन चार माणसं आहेत म्हणुन तर जग चाललंय सुखासुखी नाहीतर काय विचारायची सोय नव्हती....

होय तेचायला, नैतर मेष-वृषभ-सिंह-कर्क-मीन-धनु-मकर वगैरेंच्या जंगलराज्याऐवजी आणि उर्वरितांच्या माठ आणि हरामी राज्यांपेक्षा स्कॉर्पियन क्वीनचे राज्यच खरे , हो की नै...

बापाने पोर कशी संभाळायची ?

हा प्रश्न तुम्हाला पडला या बद्दल तुमचे अभिनंदन. कारण बर्‍याच घरात , स्त्री नोकरी करणारी असो वा नसो, घर, मुलं इ. ची जबाबदारी फक्तं आणि फक्तं स्त्रीचीच असते.

तसं मुलांना सांभाळणं (मोठ्यांच्या तुलनेत) काहीच अवघड नसतं. प्रत्येक मुल हे युनिक असतं, त्या मुळे दुसर्‍यांचे अनुभव उपयोगी पडतीलच असं नाही. आणि "आलिया भोगासी ..." अशा अविर्भावात हे काम करण्यापेक्षा, ती एक आनंददायक जबाबदारी आहे अशा पद्धतीने स्विकारले तर आपोआप मार्ग मिळत जाईल..

ती एक आनंददायक जबाबदारी आहे अशा पद्धतीने स्विकारले तर आपोआप मार्ग मिळत जाईल..

एकमेव सोल्यूशन!

पिलीयन रायडर's picture

25 Jan 2013 - 2:40 pm | पिलीयन रायडर

माझ्या नवर्‍याला विचारा... (त्या साठी आधी मला व्यनी करा!)
माझा मुलगा आणि माझा त्याचा बाबा ह्यांचा एकमेकांवर भयंकर जीव आहे. एकदा ऑफिस मधुन घरी आलो की नवरा आणि पोरगा किंचाळत एकमेकांकडे झेप घेतात. दोघांचे चेहरे बघण्या लायक असतात. माझा नवरा बर्‍याचदा मला आराम म्हणुन रात्रि ३ द पोरगं रडत उठलं कि ३ ही वेळा उठुन गरम दुधाची बाटली घेउन येतो आणि त्याला पाजतो. शी-शु च त्याला वावडं नाही. शी चे लंगोट स्वतः धुवुन टाकतो.. एक जन्म दिला त्यानंतर आता असं काहीच नाहीये की मी आई म्हणुन वेगळं करु शकते आणि माझा नवरा नाही. हो फक्त झोपताना त्याला माझ्या मांडीची सवय आहे आणि बाबांची मांडी टोचते म्हणुन तेवढं मात्र मीच करते. बाकी कामावर जाणार्‍या आयांचे नवरे कसे असायला हवेत ह्याचा माझा नवरा वस्तुपाठ आहे.
एकदा बाळ रात्री सारखे उठवते म्हणुन सासुबाई त्याला स्वतःपाशी घेउन गेल्या. मी अत्यंत आनंदात ताबडतोब झोपुन घेतलं (हो हो.. झोप हीच सर्वोच्च आनंददायक गोष्ट असु शकते..) नवरा मात्र ४ दा उठुन बाळाकडे जाउन आला..
मुळात तो इतका आनंदात असतो त्याच्या मुलासोबत की त्याला ही जबाबदारी वाटतच नाही..

सेम एक्स्पिरियन्स हियर. पोराला बापाचा अन बापाला पोराचा आईपेक्षा जास्त लळा.

विचित्र वाटेल पण, कधीतरीच... आपला जीव वैतागला असताना पोराच्या छोट्याशा कुशीत डोकं ठेवून पाहिलं आहेत का? आईच्या कुशीत वाटलं नसेल असं शांत वाटतं.

पिलीयन रायडर's picture

25 Jan 2013 - 3:10 pm | पिलीयन रायडर

अगदी अगदी हेच्च...
बाळाचा स्पर्श "स्ट्रेस बस्टर" असतो..
काय सुरेख हसतात मुलं..!! चाटतात काय आपल्याला.. आणि मी दिसल्यावर तो माझ्याकडे पाहुन खुप खुश होतो..मग जोर्जोरात पाय झाडतो..आणि मग जी "झेप" घेतो ना.. माझ्या जन्माचं सार्थक होतं तेव्हा..!!

सस्नेह's picture

25 Jan 2013 - 2:46 pm | सस्नेह

'हे बेबी' चित्रपट पहा...
एका(पोरा)स एक नाही, तीन तीन 'बाप' सँपल्स पहायला मिळतील...

इरसाल's picture

25 Jan 2013 - 4:14 pm | इरसाल

गवि आणी पिलीयन रायडरशी १००% सहमत.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Jan 2013 - 4:31 pm | परिकथेतील राजकुमार

ह्याच्यासाठीच आधी विचार करून मग कृती करायची असते.

असो...

संजय क्षीरसागर's picture

25 Jan 2013 - 5:01 pm | संजय क्षीरसागर

म्हणायचय का?

अग्निकोल्हा's picture

26 Jan 2013 - 1:30 am | अग्निकोल्हा

सारासार अन विचार विरुध्दार्थी वाटत आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Jan 2013 - 12:09 pm | संजय क्षीरसागर

सारासार विचार करून ते झोपले.

या वाक्यात `विचार' हा शब्द गाळून चालणार नाही

घरी बाबा आल्यावर मुलगा खांद्यावर हात टाकून मित्रासारखा बसतो. ओरडण्याचे काम आईचे असा अलिखीत नियम आहे आमच्या घरी! गतिमान आयुष्यातील स्वागतार्ह बदल आहेत हे!
माझ्या बाबांना मी खूप घाबरत असे, पण तेवढच प्रेमही होत. आई हरीतालिकेचा उपवास कड्क करायला लावायची. रात्री बाबा मस्त पिठलं-भात करीत आणि खायला लावीत. मला म्हणायचे, मी देईन तुला चांगला नवरा बघून, उगाच उपाशी नको झोपू!

मला उगीचंच 'इन पर्स्युट ऑफ हॅपीनेस' आठवला. त्यातला बाप, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुठलीही सपोर्ट सिस्टीम नसताना आपल्या मुलाला कसा सांभाळतो हे खरंच बघण्यासारखं आहे. त्या चित्रपटात मुलगा जरा मोठा दाखवला आहे. मात्र खर्‍या आयुष्यात त्या माणसाचं मूल फक्त दीड-दोन वर्षांचं होतं. म्हणजे त्याला सांभाळायला जिवाचा किती आटापिटा करायला लागला असेल.

श्रीरंग_जोशी's picture

25 Jan 2013 - 8:18 pm | श्रीरंग_जोशी

ह्रुदयस्पर्शी चित्रपट - 'इन पर्स्युट ऑफ हॅपीनेस'.

मराठीमध्येही 'बाळाचे बाप ब्रह्मचारी' असा चित्रपट दोन दशकांपूर्वी येऊन गेलाय...

अग्निकोल्हा's picture

25 Jan 2013 - 8:49 pm | अग्निकोल्हा

विषेशतः "पॉसिबल" आणि "प्रोबॅबल" मधला फरक तो मुलाला जसा सामजावतो आणि त्यानंतर मॅच पहायला जायचं असताना पोरगं जे कॉमेंट करतं... सहीच! आता मनोरंजनाकडेच विषय वळलाय तर नॉट विदाउट माय डॉटरही वाचताना फार कंटाळ आला न्हवता...

कवितानागेश's picture

25 Jan 2013 - 10:49 pm | कवितानागेश

सेम पिंच.

जेनी...'s picture

25 Jan 2013 - 9:52 pm | जेनी...

एकुन मस्त चर्चा झालीय ..... बालपणात शिरायलाहि वेळ लागला नाहि ...
वडील खुप हळवं व्यक्तिमत्व असतं .. लहानपणी त्यांच्या कुशीत जेवढं सुरक्षित वाटतं
तेवढच सुरक्षित त्यांचं सतत आपल्यावर लक्ष असल्यावर वाटतं .
मी इकडे यायला निघाल्यावर पप्पा एअर्पोर्ट्वर येइपर्यंत माझ्यासमोर अजिबात रडले नाहित ...
पण मी आत शिरल्यावर मात्र त्यांचे भरुन आलेले डोळे आजहि विसरायला होत नाहित .
मी इकडे आल्यावरहि पप्पाना घरात माझ्या बडबडीचा भास व्हायचा ...
कितीहि लांब असलं तरी ते सतत जवळ असल्यासारखं वाटतं .. खुप एकटं वाटलं ,
कुणाशी भांडण झालं , अगदि कधी कधी काहि कारण नसलं तरि मी कधीहि त्यांना
फोन करते ... खुप हलकं वाटतं त्यांच्याशी बोलुन ... अटॅच्मेन्ट इतकी गोड आहे कि
स्वताहाला नशिबवान समजन्याइतकी .....

रेवती's picture

25 Jan 2013 - 10:45 pm | रेवती

वाचतीये. थोडे प्रतिसाद सोडल्यास बाकीचे चांगले आहेत.

शित्रेउमेश's picture

26 Jan 2013 - 1:26 am | शित्रेउमेश

अरे तुम्हा लोंकांना असले विषत रोज सुचतात कुठुन????

अरे तु शित्रे काकांचा उमेश का ???

कवितानागेश's picture

26 Jan 2013 - 10:57 pm | कवितानागेश

१००!

इन्दुसुता's picture

27 Jan 2013 - 12:12 am | इन्दुसुता

बाबांच संगोपन ऑलरेडी झालय. आयांच संगोपन सुद्धा झालेलय. त्यांनी `एकमेकांच संगोपन कसं करावं' अशी चर्चा शुचिच्या पोस्टवर चालू आहे.

आजकाल त्याला संगोपन म्हणतात काय... :)) बरी सामान्य ज्ञानात भर पडली... :)
बाकी ( मी) बाबा नसल्यामुळे, अण्भव णाय म्हणून पास....