बार का लावतात ?

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
17 Jan 2013 - 9:02 pm
गाभा: 

इमारतीतल्या जिन्याच्या कोपर्‍यात २-३ जोरदार पिचकार्‍या मारून मग "तंबाखू का खातात?" असे विचारल्यासारखा हा काथ्या आहे. पण काय आहे नं जर विचारलं नाही तर उत्तर कधीच कळणार नाही. तेव्हा विचारतोच.

खूपदा या प्रश्नास सामोरे जावे लागते की "भारतातले पुरूष बार का लावतात?"

मी बरेचदा, व्यक्ती आणि तिचा कल पाहून "विरंगुळा" हे उत्तर देऊन वेळ मारुन नेतो. तर काहींना सांगतो की "वयात आल्यानंतर मुलांनी बार लावायचाच" अशी परंपरा आहे. मग पुढचा प्रश्न येतो "काहीकाही बायका पण बार का लावतात?" आणि मी निरुत्तरसा होतो.

पण काही मित्र मैत्रिणी हे जवळचे असतात. मग त्यांना सविस्तर सांगतो की शरीरशास्त्राच्या तत्वज्ञानानुसार, बार लावताना तंबाखू चुन्याबरोबर मळली जाते व त्यातल्या कॅल्शियममुळे दात बळकत होतात व चकाकतात देखील. काहीजणांना बार लावल्यावर जोरदार किक बसते आणि वेगळाच उत्साह येतो. विशेषतः विद्यार्थ्यांना बार लावल्यावर तोंड बंद ठेवावे लागत असल्याने अभ्यास चांगला होतो. काही जणांना बार लावल्याशिवाय दिवसाची सुरूवात चांगली होत नाही. म्हणजे नकळत बार पचनक्रियेला मदत करतो. "बार"ला "जर्दा" हेदेखील नाव आहे. काहीजणांना काळा बार लागतो तर काही जणांचे पिवळ्या बार शिवाय चालत नाही. बार च्या या बहुगुणी उपयुक्ततेमुळे अनेक जण बार लावतात.

आता हे उत्तर कितपत बरोबर आहे यावर कोणी जाणकार प्रकाश टाकू शकतील का? या परंपरेमागे, अन्य काही कारण आहे का?

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

17 Jan 2013 - 9:12 pm | मुक्त विहारि

मस्तच...

श्रीगुरुजी.... तुम्हाला तर सगळंच माहित आहे हो!.. तीन चार न्युरोट्रान्स्मीटर्स, निकोटीनने मेंदूत स्त्रवणारं डोपॅमाईन!,.... तरीही विचारत आहात? ;)

मेंदुंमध्ये स्त्रवणारे डोपॅमाईन हे न्युरोट्रान्समीटर पार डॉपॅमाईन सर्कीटमध्ये जाऊन मेंदूमधील प्लेजर सेंटर उत्तेजित करण्यासाठी पुरुषांनी गाल आणि कवळी यांच्यामध्ये मल्टी ठेवण्याची परम्परा आहे...... काम करुन थकणार्‍या स्त्रियांना देखील बार मारण्यासाठी बोलावले जाते!!

सस्नेह's picture

17 Jan 2013 - 9:18 pm | सस्नेह

अलिकडे लोक कुठे कुठे अन काय काय लावतील सांगता येत नाही..!

श्रीरंग_जोशी's picture

17 Jan 2013 - 9:38 pm | श्रीरंग_जोशी

प्रथम चुकून 'वार का लावतात' असे वाचले?
बार लावणे म्हणजे तंबाखूचे सेवन करणे हे मला नव्यानेच कळले. तसा मराठीत बार भरणे असा जुना वाक्प्रचार आहे.

बाकी तंबाखू, खर्रा, पान मसाला, गुटखा हे सर्व कधीच चाखून न पाहिल्याने लोक त्याचा शौक का बाळगतात याबाबत केवळ अंदाज बांधू शकतो.

धन्या's picture

17 Jan 2013 - 9:51 pm | धन्या

आपण तंबाखू आणि तत्सम पदार्थांच्या व्यसनांपासून दूर आहोत हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jan 2013 - 9:59 pm | श्रीरंग_जोशी

सह्याद्री वाहिनी चा प्रभाव म्हणा...

संसारा उध्वस्त करी दारू,
बाटलीस स्पर्श नका करू...

दारू येथे प्रतिकात्मक आहे, सर्वच मादक द्रव्यांपासून दूर राहिलेले बरे...

विकास's picture

17 Jan 2013 - 9:55 pm | विकास

प्रथम चुकून 'वार का लावतात' असे वाचले?

=)) तो धागा आता तुम्ही चालू करा! ;)

बार लावणे म्हणजे तंबाखूचे सेवन करणे हे मला नव्यानेच कळले.
मला देखील.

आता मिपासाठी एक स्वाक्षरी करण्याचा विचार आहे: "मी कुंकू, थुक्का अथवा बार लावत नाही, तसेच ते लावणार्‍यांचा अथवा न लावणार्‍यांचा द्वेषही करत नाही." :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2013 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> प्रथम चुकून 'वार का लावतात' असे वाचले ?
वार हे कपड्याचंही माप आहे. एकवार कपडा. पाचवार, सहावार आणि नऊवार हे शब्द माहित असतीलच. :)

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

17 Jan 2013 - 10:31 pm | दादा कोंडके

पुर्वी, आई जेवायला घालत नसेल आणि बाप भीक मागू देत नसेल तर वार लावत. :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jan 2013 - 10:33 pm | श्रीरंग_जोशी

मग आजकाल काय करतात?

दादा कोंडके's picture

17 Jan 2013 - 10:44 pm | दादा कोंडके

आता कष्ट करून स्वाभिमानानं पोट भरतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2013 - 9:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वाभिमानानं पोट भरतात.

कोण ? आई वडील का पोरं

कोण ? आई वडील का पोरं

आताचे आईवडील, पोरांना थोडी मोठी होउन स्वतः कमवण्याची अक्कल येइपर्यंत किमान दोनवेळचं जेवण देण्याची ऐपत नसताना भाराभर पोरं पैदा करून ठेवत नाहीत. आणि या उप्पर अशी वेळ आलीच तर पोरं कष्ट करून पोटं भरतात.

-(पुर्वजांचं, 'वार लावून जेव असू, यंव करत असू-त्यंव करत असू वगैरेचं कौतुक नसलेला) दादा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 10:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पोरांना थोडी मोठी होउन स्वतः कमवण्याची अक्कल येइपर्यंत किमान दोनवेळचं जेवण देण्याची ऐपत नसताना भाराभर पोरं पैदा करून ठेवत नाहीत.

कैच्या कै. भराभर पोरं पैदा करायची कै बाया-मान्साला हौस नसावी. 'हम दो और हमारा एक' चे फायदे तोटे आमच्या पूर्वीच्या पिढीला कळले नाही. बाया बिचार्‍या जन्मानुजन्म सोशिक होत्या आणि एकत्र कुटुंबात सर्वच कुटुंब वाढत असल्यामुळे पोरांना दोनवेळचं जेवण आरामात मिळतही होतं. कोणी पोरगा अगदी रिकामा असला तरी गुण्यागोविंदानं कुटुंबात सुखानं नांदत होता. पोरं स्वतःच्या कष्टानं उभी राहातात हा अपवाद असेलही पण, अशा पोरांना-पोरींना कष्टानं आकाशात भरारी घ्यावी म्हणून पंखांना बळ देणारे माय-बाप कोणत्याही पिढीत सापडतील आणि झेप घेतल्यावर माय-बापांना उतार वयात खस्ता खायला लावणार्‍यांची संख्या मात्र याच पिढित अधिक भरावी. असो.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

20 Jan 2013 - 4:30 pm | दादा कोंडके

'हम दो और हमारा एक' चे फायदे तोटे आमच्या पूर्वीच्या पिढीला कळले नाही.

माझं तेच तर म्हणणं आहे.

बाया बिचार्‍या जन्मानुजन्म सोशिक होत्या

यात कौतुक कसलं?

कोणी पोरगा अगदी रिकामा असला तरी गुण्यागोविंदानं कुटुंबात सुखानं नांदत होता. पोरं स्वतःच्या कष्टानं उभी राहातात हा अपवाद असेलही पण, अशा पोरांना-पोरींना कष्टानं आकाशात भरारी घ्यावी म्हणून पंखांना बळ देणारे माय-बाप कोणत्याही पिढीत सापडतील आणि झेप घेतल्यावर माय-बापांना उतार वयात खस्ता खायला लावणार्‍यांची संख्या मात्र याच पिढित अधिक भरावी. असो.

हम्म. ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज एक समाज म्हणून आपण दिवसें दिवस प्रगल्भच होत जातोय. पूर्वी बार्बेरियन समाजामध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी शारिरीक बळाची गरज असे. त्यामुळे प्रत्येक आईवडील स्वतःच्या मुलांकडे म्हातारपणाची 'सोय' म्हणून बघत असत. त्यानुसार लहानपणापासून पुंडलीक, श्रावणबाळाच्या कथा सांगून त्यांचं व्यवस्थीत ब्रेन कंडिशनींग करत असत. यात पुढच्या पिढ्यांमध्ये, 'विवेक' मागं पडून केवळ 'वयाचा मान' ठेवण्याची मानसिकता आली.

असो. हे म्हणणं पटत असेल तर पुढचं बोलू.

श्रीगुरुजी's picture

20 Jan 2013 - 12:52 pm | श्रीगुरुजी

"आताचे आईवडील, पोरांना थोडी मोठी होउन स्वतः कमवण्याची अक्कल येइपर्यंत किमान दोनवेळचं जेवण देण्याची ऐपत नसताना भाराभर पोरं पैदा करून ठेवत नाहीत. आणि या उप्पर अशी वेळ आलीच तर पोरं कष्ट करून पोटं भरतात."

हे तितकेसे खरे वाटत नाही. सध्याच्या काळात भारंभार मुलांना जन्म न देता फक्त १ किंवा २ वर थांबणारे फार थोडे आहेत. अजूनही अनेक कुटंबात मुलगा होईपर्यंत मुलांना जन्म देणे सुरूच असते. एका विशिष्ट धर्मात तर कुटुंबनियोजन हे अधार्मिक आहे अशी समजूत करून दिल्यामुळे मुलगा/मुलगी असा भेद न करता अनेक मुलांना जन्म दिला जातो.

पैसा's picture

17 Jan 2013 - 10:41 pm | पैसा

बाकी बार, तंबाखू यासारखी व्यसने जास्त करून पुरुषांनाच का बाळगावी लागतात? वरती कुणीतरी तंबाखूच्या औषधी गुणधर्माच वर्णन केल आहे. हा फायदा स्त्रियांना का नको? अशा स्त्रीद्वेषट्या प्रथेचा जाहीर निषेध. : )

योगप्रभू's picture

17 Jan 2013 - 11:37 pm | योगप्रभू

पैसा बाय,
तंबाखू हे केवळ पुरुषांचे व्यसन नाहीय. समस्त नव्हे, पण लक्षणीय प्रमाणात स्त्रिया तंबाखू सेवन करतात. ग्रामीण भागातील अनेक विक्रेत्या स्त्रियांकडे (दाया, झाडूवाल्या यांच्याकडेपण) कापडी चंची असते. तिच्या कप्प्यात काथ, सुपारी, चुना, विड्याची पाने, तंबाखू असते. अनेकजणी तंबाखू भाजून केलेली मशेरी दाताला चोळून त्याच्या नादात कामे उरकतात. फार कमी स्त्रिया पुरुषांप्रमाणे चारचौघात तंबाखू हातावर मळून खातात. वरच्या वर्गातील स्त्रिया तर अगदी क्वचित, पण मराठीतील एका बुजूर्ग अभिनेत्रीला मी बिनधास्त सगळ्यांसमोर तंबाखू चोळून खाताना पाहिले आहे. गुटख्याच्या नादात वहावत गेलेल्या नवरा-बायकोचे उदाहरणही पाहिले आहे. कॉलेजच्या मुली सिगरेट ओढताना बघणे आता नवलाईचे राहिलेले नाही. परवा आमच्या घराजवळच्या पानाच्या दुकानात उभा होतो तर दोन मुली आल्या. पानवाल्याने त्यांना साबणाच्या आकाराचे एक खोके न बोलता काढून दिले. मला प्रथम वाटले, की ते सिगरेटचे पाकिट आहे, पण मग पानवाला म्हणाला, 'तो हुक्क्याचा तंबाखू आहे.' ज्या मुलींना सिगरेटचे व्यसन असते त्यांची हॉस्टेलमध्ये किंवा भाड्याने राहाताना कुचंबणा होते. मग त्या हुशारीने सिग्रेटची तहान हुक्क्यावर भागवतात. हा तंबाखू सुगंधी असतोच, पण जोडीला त्या मुली खोलीत सुगंधी उदबत्तीपण लाऊन ठेवतात. म्हणजे मग कुणाला फारसे समजत नाही.

उगाच आपलं गरीब बिचार्‍या पुरुषांना दरवेळी वेठीस धरायचं म्हणजे काय! :)

विकास's picture

18 Jan 2013 - 12:57 am | विकास

उगाच आपलं गरीब बिचार्‍या पुरुषांना दरवेळी वेठीस धरायचं म्हणजे काय!

बाकी काही नाही हो...त्यात केवळ पुरूषद्वेष असतो झालं... ;)

केदार-मिसळपाव's picture

18 Jan 2013 - 7:12 pm | केदार-मिसळपाव

ग्रामीण भागातील अनेक विक्रेत्या स्त्रियांकडे (दाया, झाडूवाल्या यांच्याकडेपण) कापडी चंची असते. तिच्या कप्प्यात काथ, सुपारी, चुना, विड्याची पाने, तंबाखू असते. अनेकजणी तंबाखू भाजून केलेली मशेरी दाताला चोळून त्याच्या नादात कामे उरकतात.

अगदी अचुक वर्णन.. आपला योगप्रभाव जाणवला...

अभ्या..'s picture

17 Jan 2013 - 11:37 pm | अभ्या..

मला मेस लावली तसा बार लावणार्‍यांबद्दल लेख वाटला. :(
पण हा असला हर्बल बार होय. घ्या मग डब्बल. :)

श्रीरंग_जोशी's picture

17 Jan 2013 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

बार वरून आठवले, प्राथमिक शाळेच्या मैदानात सुद्धा डबल बार (अन कधी कधी सिंगल बार देखील) लावलेले असायचे. त्याचा कुणाला कधीही उपयोग करताना पाहिल्याचे आठवत नाही ;-).

आता त्या बार लावतात का वगैरे विचारू नकोस

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2013 - 12:11 am | श्रीरंग_जोशी

त्यांच्याबद्दल केवळ वृत्तपत्रांतूनच वाचले आहे म्हणून आठवल्या नसाव्या :-).

"बार"ची देवाणघेवाण ही अशी एकच प्रथा आहे ज्यात देणा~याचा हात खाली असतो आणि घेणा~याचा वर!

अभ्या..'s picture

18 Jan 2013 - 12:18 am | अभ्या..

आणि मागणारा कोणीही असु देत, देणारा (शक्यतो) नाही म्हणत नाही. :)

दादा कोंडके's picture

18 Jan 2013 - 2:06 am | दादा कोंडके

सहमत.

फ्रेशर असताना माझे दोन मराठी मित्र दिल्लीमध्ये सर्विस इंजिनीअर म्हणून इन्वर्टर दुरुस्तीचं काम करायचे. एक निर्व्यसनी होता तर दुसरा तंबाखू सम्राट. अनोळखी ठिकाण, वेगळी भाषा, लोकं वगैरेंमुळे पहिला एका महिन्याच वैतागला. तर दुसरा कुठेही गेला तरी अगदी सहज वॉचमन, रिक्षावाले यांच्याशी गप्पा मारायचा. :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Jan 2013 - 2:11 am | श्रीरंग_जोशी

आमच्या वसतिगृहातही परीक्षेचा काळात ऐन मध्यरात्री देखील हेवेदावे असणार्‍यांची इतर मध्यस्थांद्वारे अशा जिनसांची देवाण घेवाण व्हायची.

वर्गमित्रांत काही बंगबंधू पण होते त्यांनी तर त्या काळात उपलब्ध असलेली कुठलीच नशा सोडली नसेल.

जेनी...'s picture

18 Jan 2013 - 2:14 am | जेनी...

चांगलय .

लावा बार .. पण रस्त्यावर , बिल्डिंगिच्या कोपर्‍यात थुकु नका

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Jan 2013 - 8:53 am | श्री गावसेना प्रमुख

1
कारे गाय छाप से का,दे तन म

खबो जाप's picture

18 Jan 2013 - 9:56 am | खबो जाप

बार का उघडतात ? (प्यायचा )
बार का उडवतात ?(लग्नाचा)
बार का भरतात ?(बंदुकीचा)
बार का म्हणतात ?(साबणाच्या वाडीला)

सुचवा आणखी सुचवा ...........

भीडस्त's picture

18 Jan 2013 - 10:52 am | भीडस्त

दार का लावतात? असा धागा उघडीन म्हणतो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2013 - 12:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय विचारतील लोक काही सांगता येत नाही. :D

बाबा पाटील's picture

18 Jan 2013 - 11:35 am | बाबा पाटील

मला एकच बार माहिती आहे....तो फक्त बंदुकीचा.....

मला आणखी एक बार माहितिये 'प्रेशर'चा...

गवि's picture

18 Jan 2013 - 12:24 pm | गवि

जुन्या गाण्यात काय की पण, बार बार देखो म्हणायचे ते.. किंवा हपीसात "रेज द बार" "रेज द बार" असं सारखं ऐकवतात ते, किंवा "बार अ‍ॅट लॉ" असे जुन्या काळी लोक असायचे ते, किंवा "एज नो बार".. किंवा शर्टावर ज्याच्या गंजाची रेष उठते असा कपडे वाळत घालण्याचा "बार" .... जिच्यावरुन क्वालेजातल्या शिरिनला "जरा शीरिन" म्हणून चिडवायचो तो रिन बार .. हे सर्व वेगळेच ..

केदार-मिसळपाव's picture

18 Jan 2013 - 7:17 pm | केदार-मिसळपाव

मला आणखी एक माहित आहे.. अहो आपला मराठीतला - बार....असे आहे का.. बास आता...

रमेश आठवले's picture

18 Jan 2013 - 12:58 pm | रमेश आठवले

युरोप व अमेरिकेत tobacco plug गालफडात ठेवण्याची सवय बऱ्याच लोकाना असते.
तंबाखू खाणे याला पंचम लावणे असे ही म्हणतात. बहुतेक सर्व शास्त्रीय गायक बैठकीच्या सुरवातीस बार लावतात . म्हणून पंचम लावणे असा शब्द रूढ झाला आहे कि काय याविषयी माहिती नाही.

काय उत्तमोत्तम वैचारीक धागे येत आहेत मिपावर!! प्रतिसाद देण्यास शब्दच सापडत नाहीत. कदाचित विचारशक्ती कमी पडत असावी!!

शैलेन्द्र's picture

18 Jan 2013 - 6:04 pm | शैलेन्द्र

हा धागा वाचल्यावरही तुम्ही विचार आणि शब्द यांचा अन्योन्य संबंध लावताय? मिपा ही वैचारिक पाणपोई नाही हो..

Dhananjay Borgaonkar's picture

18 Jan 2013 - 6:33 pm | Dhananjay Borgaonkar

ज्याची त्याची आवड. आता काय बोलणार.

अवांतर - पुरुष गाऊन का घालतात असा पण धागा काढावा का याचा विचार करतो आहे :P

धमाल मुलगा's picture

18 Jan 2013 - 6:51 pm | धमाल मुलगा

मला सांगा, तमाक् खाणारा अन सिग्रेटी ओढणारा ह्यांना अनोळखी जागी नेउन सोडलं, तरी त्यांची पटकन इतर (समव्ययसयसनी) लोकांशी ओळख होते की नाही?
अहो, चुना किंवा इस्तु(विंग्रजीत लाईट प्लिज वैग्रे) अशा देवाणघेवाणीतून ,सोसल तेव्हढं) सोशल नेटवर्किंग होतं. नेहमीची टबलाच्या अल्याडपल्याड बसुन न होणार्या कामांच्या पळवाटेच्या चरच सुरुवात करायला 'आईसब्ररेकर' असा उपयोग होतो.

ते असो, तुमच्याकडं कोन्चा है तमाक्? ह्यो घ्या चुना आन डबल मळा. :)

केदार-मिसळपाव's picture

18 Jan 2013 - 7:24 pm | केदार-मिसळपाव

आहो इथे जर्मनीत "हास्ट दु फोयर?" (लायटर आहे का?) असा त्यान्चे गोड हास्य मिळवणारा प्रश्ण विचारुन नेहमी वेगवेगळ्या मुलिन्शी ओळख वाढवणार्या बर्याच महाभागान्ना बघितले आहे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

19 Jan 2013 - 1:19 pm | घाशीराम कोतवाल १.२

धमाल राव काढा ईस्तु चिलिमी बार भरुन तैयार है ...

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 10:32 pm | नर्मदेतला गोटा

.

धाग्याला कुंकू लावले.

नर्मदेतला गोटा's picture

18 Jan 2013 - 11:20 pm | नर्मदेतला गोटा

जोर का लावतात

आदूबाळ's picture

19 Jan 2013 - 12:29 am | आदूबाळ

आधी दार लावतात आणि मग जोर लावतात. उलटं केलं तर अनावस्था प्रसंग ओढवेल...

बॅटमॅन's picture

19 Jan 2013 - 2:02 am | बॅटमॅन

धड दार लागत नसेल तर जोर लावावा लागेलच की ;)

अग्निकोल्हा's picture

19 Jan 2013 - 3:31 am | अग्निकोल्हा

असचं म्हणांवस वाटतयं!