जळ.लि..
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का?
तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का?
तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का?
तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का?
तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का?
वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा. हे तुमच्यासाठी आहे.
या गाईडलाईन्स म्हणजे अक्सीर इलाज आहे का हे मला माहीत नाही, पण तोडकंमोडकं ज्ञान जमवून समदु:खी बोरुबहद्दर क्यांडिडेट्सना काही ढोबळ का होईना, पण युक्तीच्या चार गोष्टी सांगाव्यात, म्हणजे मी त्यांच्यामधे तरी ज्येष्ठ ठरेन आणि या उपायांचे परिणाम मला स्वतःला या वयात इजा न करुन घेता अन्य तरुणलेखकमित्रांवर तपासून पाहता येतील.
पहिली गोष्ट म्हणजे आपण मध्यमवर्गीय (विचारांचे) आहोत अशी लाज अजिबात बाळगू नका. लाज सोडणे ही मध्यमवर्गीय विचार सोडण्याची पहिली पायरी. विचार कोणत्याही आर्थिक-सामाजिक-लैंगिक-भौगोलिक वर्गात बसून स्त्रवत नसतात. विचार तेच असतात. फक्त आपलं कार्कुंडं प्रेझेंटेशन बदलून ते वास्तवसदृश बनवणं आपल्या हाती आहे. यासाठी काही बेसिक शिकवणी..
पहिला प्वाईंटः
- तपशील. तुम्ही फक्त मुद्द्यांना स्पर्श करता का? तसं असेल तर ही सवय सोडली पाहिजे. तपशिलात जा. जिथे शक्य आहे तिथे बारीकसारीक तपशील आले पाहिजेत.
या तपशिलांबाबत एक अधिकची गोष्ट.. हे तपशील हे अत्यंत नैसर्गिक असले पाहिजेत. नैसर्गिक या शब्दावरुन तुम्हाला निसर्गसौंदर्य वगैरे दिसलं असेल तर ते तसं नाही. नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक विधी आणि क्रिया. यात उत्सर्जन आणि समागम या क्रिया प्रामुख्याने येतात. वमन ही एक क्रियाही यात धरता येईल.
आता या प्वाईंटला समजण्यासाठी एकदोन उदाहरणं घेऊ:
उदा. १.
-सध्याचं मध्यमवर्गीय "मिळमिळीत लिखाणा"तलं वाक्य - (हेन्सफोर्थ रेफर्ड टू अॅज मिळ.लि.):
आयुष्यात अनेक स्त्रिया येऊन गेल्यानंतरही "तिची" ओढ विसरता का येऊ नये असा विचार त्याच्या मनातून जाता जात नव्हता.
-अनुभवसमृद्ध "जळजळीत लिखाणात" कन्व्हर्ट केलेलं वाक्य - (हेन्सफोर्थ रेफर्ड टू अॅज जळ.लि.):
*च्या** जिंदगीत शेकड्यांनी धंदेवाल्या ** चवलीपावलीच्या भावात अंगाखालून गेल्यावर आज भे** तिचीच आठवण डोस्कं का जाळतेय.. ?
उदा. २. मिळ.लि:
"पावसाळ्याच्या दिवसात त्या रस्त्याने जाताना त्याला नेहमीच आपले शाळेचे दिवस आठवायचे. विशेषतः दळवीसर. खूपच कडक होते ते. मुलं चळाचळा कापायची त्यांच्या नावाने.."
जळ.लि. कन्व्हर्टेड :
"पावसात गांडुळासारख्या लिबलिबीत झालेल्या त्या राडीच्या रस्त्याने जाताना बाजूच्या हागणदारीकडे त्याचं लक्षच जायचं नाही, कारण त्याला आठवायचा शाळेतल्या दळवीसरांनी चड्डीत मुतेपर्यंत दिलेला हग्यामार.."
इतःपर ठीक.. आता पुढचा प्वाईंट किंवा लेसन पाहू..
- शिव्या: अपशब्द हा जळजळीत वास्तववादी लिखाणाचा अविभाज्य भाग आहे. शिमला मिरचीने इथे भागणार नाही. बेडगी, लवंगी, भूत झोलकिया अशा जातींच्या मिरचीचा इफेक्ट यायला पाहिजे. बाकी वाचकांचं काय मत होईल याची फिकीर करु नका. वास्तववादी लिखाणाला चाहते कधीही कमी पडत नाहीत.
इथे एक स्पष्ट करायला हवं. मा***** भ*** फो**** या शिव्या नीट माहीत असून इथे भागणार नाहीये.
भ, फ या आद्याक्षरांच्या शिव्या या तितक्या वास्तववादी राहिलेल्या नाहीत. त्या मध्यमवर्गीय सामान्य लोक रोजच्या आयुष्यात ऐकतातच आणि बर्याचदा देतातही. मध्यमवर्गीय सामान्य माणसाला रोज ऐकायला बघायला मिळत नाही ते वास्तववादी हे लक्षात घेऊन अनवट शिव्यांचा ष्टॉक जमा करावा. त्या शिव्या कुठून आणायच्या? हा प्रश्न रास्त आहे. पण जरा अन्य वास्तववादी जळजळीत लिखाण वाचलं की दहाबारा नव्या शिव्या गाठीला जमा होतील. त्या आलटूनपालटून वापरता येतील. शिवी ही कशाच्या तरी संदर्भातच आली पाहिजे असं नाही. विरामचिन्हासारखी किंवा विरामचिन्हांऐवजी शिव्या वापरता येतील. फाईंड्+रिप्लेस हे फंक्शन वापरुन सर्व स्वल्पविराम या शिव्यांनी रिप्लेस करता येतील.
या प्वाईंटाची उदाहरणं:
मिळ.लि.: "रस्तोगी पोटभर जेवून आपल्या खुर्चीत परत आला. दिवसरात्र खाल्लेल्या पैश्याने माजलेली नजर इकडेतिकडे फिरवत आणि ढोसलेल्या बियरने सुटलेलं पोट सावरत तो खुर्चीत बसला.."
जळ.लि. कन्व्हर्टेड: "भिकार** रस्तोगी उलटेस्तोवर पोट भरुन परत आला. *डीप्रमाणे दिवसरात्र *** कमावलेल्या पैशाने माजलेली नजर वखवख करत ऑफिसातल्या बायाबापड्यांवरुन फिरली आणि विदेशी मारुन मारुन लोळणारं दोंद खुर्चीत कोंबत तो भ** खाली टेकला.."
तिसरा प्वाईंट..
- समाजातल्या वाईट गोष्टी: यात गरिबी, श्रीमंती, ड्रग्ज, देशी दारु, खोपडी, पॉलिशच्या वासाची नशा, गांजा, व्यभिचार या काही नमुन्यादाखल गोष्टी सांगतो. यातल्या प्रत्येक गोष्टीचा थेट फर्स्टहँड अनुभव आपल्याला आहे असं ध्वनित होणारी वाक्यं "जळलि"साठी उपयोगी ठरतात. लिखाण थेट अनुभवातून आलं आहे याची जाणीव वाचकाला करुन देण्यासाठी अनुभव थेटच हवेत. मात्र वर दिलेला तपशिलाचा मुद्दा फॉलो करताकरता या भानगडीच्या बाबतींमधेसुद्धा फारच तपशील दिलात तर पोलीसांचा फेरा आपल्या मागे पडण्याचा धोका उद्भवेल. तेव्हा तिथे जरा सांभाळून रहा आणि थोडातरी मोघमपणा पाळा.
सामान्य शरीरसंबंधांना वर्णनात प्राधान्य देऊ नये. म्हणजे, वर्णनाला प्राधान्य द्यावं पण सामान्य, वैवाहिक, रूढिमान्य शरीरसंबंधांना जळलिमधे जागा नाही. असे मिळमिळीत संबंध बरेचजण रोज घरच्याघरी करतच असतात. हे संबंध घराबाहेर करण्याला प्राधान्य द्यावं. पुन्हा एकदा, तपशील विसरु नये. संपूर्ण जग बाहेरख्याली आहे असा समज आपल्या लिखाणातून पक्का करावा. कथाविषयातील सर्वात सोज्वळ सज्जन वाटणार्या व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला अचानक पतीखेरीज अन्य कोणासोबत, शक्यतो अनेकांसोबत संबंधित करावे. आपण स्वतः वयाच्या दहाव्या वर्षाच्या आधी कोणाचातरी श.सं. लपून किंवा अपघाताने पाहिलेला असला पाहिजे (शेत, पोटमाळा, चाळीची गच्ची अशा काही जागा यासाठी मुक्रर करता येतील) "संपले बालपण माझे" ही जाणीव कमी वयात झालेली असली तरच पुढे वास्तववादी लिहीता येईल.
दारुसुद्धा रम,व्हिस्की वगैरे नको. बराचसा कारकुंडा मध्यमवर्ग आयएमएफएल्स पीत असतो हे लक्षात घेऊन त्या दारु टाळाव्यात. त्याऐवजी रातराणी, संत्रा किंवा तत्सम दे.दा. आपल्या लेखनात असाव्यात. अधिक देशीमद्यनामांच्या माहितीसाठी एकदा धाडस करुन देदादुमधे बसण्यासही हरकत नाही. सोडा तेवढीतरी मिडिऑकरगिरी आणि दाखवा धाडस..
जनरल शब्दसंग्रह म्हणून काही शब्द आठवतील, गावतील तसेतसे तिथल्यातिथेच टाचणवहीत लिहून ठेवायला हरकत नाही. यातूनच आपला स्वतःचा ऐनवेळी उपयोगाला येणारा "मिळलि इन्टू जळलि" शब्दकोश तयार होईल आणि रुपांतरण सुलभ होईल.
उदा. हापसणे, भडभडून, लगदा, बिळबिळीत, षंढ, नागवा, हिजडा, नासवणे, खरुज, निखारा, जळजळ, मळमळ, तडफड, फडफड, आचके, रक्ताची गुळणी, उकिरडा, गावकुस, गटारं, तटतटून, चिळकांड्या, फराफरा, टराटर, पच्चकन, ढवळून, आसूड, कडकलक्ष्मी, फटके, चामडी,खच्चून...
सर्व ज्ञान विनामूल्य मिळत नसतं. तस्मात इथे थांबावं लागत आहे.
या विषयाची ही जनहितार्थ जाहिरातार्थ झलक वगळता कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे (कविता धरुन) जळलित रुपांतर करुन देण्याची कामे आम्ही चरितार्थार्थ घेत असतो. संपर्कासाठी "जळवि" या आमच्या अन्य आयडीला व्यनी करावा.
आजच्या शिकवणीवर आधारित काही स्वाध्याय (सरावासाठी): खालील वाक्याचे जळलिमधे रुपांतर करा:
-"त्याची नजर खूपच भेदक होती. ती नजर तिच्या निळ्या डोळ्यांना आरपार भेदून गेली..तिने नकळत डोळे मिटून घेतले.."
-"नगरपालिका उद्यानात फुलंच फुलं उगवली होती. प्रसन्न हवेत पक्ष्यांचा पाखरहाट चालला होता.. किलबिलीने आसमंत भरला होता.."
-"आपण दोघांनी एकमेकांना विसरुन गेलेलंच चांगलं.. ती हातातल्या चाफ्याच्या फुलाची पाकळी कुस्करत म्हणाली."
-"पुण्यात त्या पहाटे प्रचंड थंडी होती. मी कुडकुडतच बाईकला किक मारली.. सुट्टीच्या दिवशीही पहाटे बाहेर पडण्याचा वैताग "तिच्या" आठवणीने एकदम दूर पळाला.."
-"काळ्यानिळ्या पडलेल्या गालांच्या आणि सुजलेल्या डाव्या डोळ्याच्या आरश्यातल्या उजवीकडच्या प्रतिबिंबाकडे पाहात मी स्वतःलाच प्रश्न केला.. "लिहीशील पुन्हा असे लेख? बोल.. लिहीशील?"
....................
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हापसणे, भडभडून, लगदा,
हम्म
हा हा..
वाह वाह..
आयला
रुमाल शेंबुड पुसुन ठेवला आहे,
भाऊ पाध्येंच्या 'वासुनाका' या
च्यायला!
भेंडी.. अजून किती ् अभ्यास
या बया! काय ह्ये??
काळ्यानिळ्या पडलेल्या
(No subject)
जळ लि मेली लक्षण!
भडकमकर अॅकेडमीत
+१
मिळ-लि ते जळ्-लि..
खुप भडक .
भडक.लि.
_/\_
हा हा
हसवून मारु नका म्हणजे मिळवलं
ढुंगण हा भेदक शब्द ???
तो शब्द ढुं*ण असा लिहायचा गं
हा हा
बसवला टेंपोत!
काय हे?
डिस्टिंक्शन...!!!
जय हो गुरु
:-)
एक नंबर!!!!!!!! फस्क्लास्फष्ट
जबराट
घोडा पलटी,टांगा फरार लिखाण
ग्रहपाठ
...
+!@#$%^^&*()_+
बीभत्स
_/\_
एका शिकवणीवरून लगेच ती पातळी
उत्तम.. एकदम जळलि.
(&*($%&^&^%%^$##$%&*&*&^%%$%^
हा हा..
मास्तरानू
(No subject)
खतर्नाक लिहिलय..
एकच आयडी शोध, 'पोलिटिअक्ली
जळजळ ली!!!!!
घोर कलीयूग
गविसाहेब, मुळात लिहिणार्याच्या लिखाणात ताकद असावी लागते.
गवि साहेब,लेख मस्त झाला आहे.
एक्दम कणेकरी इष्टाइल लेख