तुम्ही खोटंच बोलता : एक निष्कर्ष. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in काथ्याकूट
2 Jan 2013 - 7:46 am
गाभा: 

नमस्कार, तुम्ही खोटं बोलता का ? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतांना मजा आली. समाजात वावरतांना आपण खोटं बोलत असतो, हे माहिती असूनही 'सत्यं वद' ची हाकाटी पीटतांना पाहून लोकांची गंमत वाटते. संशोधनात एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यापर्यंत काही गृहितकं असली पाहिजेत म्हणजे निष्कर्षाकडे पोहचता येते, किंवा निष्कर्षकाडे जाण्याची एक पायवाट तयार होते असे म्हटल्या जाते. काही एक गृहितं संशोधकाने गृहितं धरलीच पाहिजेत. तेव्हा अशा 'एका विषयासंदर्भात व्यक्तीकडून माहिती मिळविण्यासाठी तयार केलेली प्रश्नांची एक क्रमबद्ध सूची म्हणजे प्रश्नावली’ अशा या प्रश्नावलीतून सामाजिक मूल्यांचे मापन करण्यासाठी मदत होते. बरं गंमत अशी की सामाजिक मूल्यांचे मापन करण्याचे सर्वमान्य असे काही मापन यंत्र अस्तित्त्वात नाही, अशा विविध संशोधनाच्या माध्यमातून काही निष्कर्षाकडे जाता येते. बरं, समाज हा परिवर्तनशील आहे, म्हणजे बदल हा समाजमनाचा स्वभाव आहे, माणसाचे विचार सतत काळानुरुप बदलत असतात म्हणून सामाजिक व्यवहारांचे मापन करणे तसेही अवघडच काम असते.

प्रश्नावली व्याख्या :
१] मूलभूत स्वरुपात प्रश्नावली ही प्रेरणांचा असा समूह आहे की जी शिक्षित लोकांपुढे या प्रेरणाच्या अंतर्गत त्यांच्या मौखिक व्यवहारांचे निरीक्षण करण्यासाठी प्रस्तूत केली जाते.- लुडबर्ग
२] सामान्य रुपात प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची उत्तरे प्राप्त करुन घेण्याची पद्धती असून तिच्यात प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो. आणि जी उत्तरदाता स्वत: भरतो. -गुड आणि हॅट
३] A questionnaire is a list of questions given to a number of person for ansers. -बोगार्डस
४] '' It does constitute a convenient method of obtaining a limitied amount of information from a samll group which is widely scattered '' - Wilson Gee.

वरील व्याख्यांचा विचार केल्यावर आपल्याला असे लक्षात येते की जवळ जवळ सर्वच विद्वानांनी ' उत्तरे मिळविण्याकरिता’ तयार करण्यात आलेली 'प्रश्नांची एक तालिका’ या अर्थाने प्रश्नावलीकडे पाहिलेले आपणास दिसून येते.

प्रश्नावली विविध स्वरुपाची असते जसे की संरचित प्रश्नावली, असंरचित प्रश्नावली, बंदिस्त प्रश्नावली, मुक्त प्रश्नावली, चित्रमय प्रश्नावली, मिश्रित प्रश्नावली. इ.इ. तुम्ही खोटं बोलता का ? या प्रश्नाच्या उत्तरासाठी संशोधनकर्त्याने 'बंदिस्त प्रश्नावलीची' निवड केली आहे. (Closed Ended Question) अशा प्रश्नावलीत प्रश्नांची संभाव्य उत्तरं ही प्रश्नावलीत दिलेली असतात. उत्तरदात्याला प्रश्नाच्या उत्तरासाठी एक पर्याय निवडायचा असतो. बंदिस्त प्रश्नावलीमधून उत्तर स्पष्ट मिळतात अशी अपेक्षा असते आणि अशा प्रश्नावलीमधून उत्तरांचे वर्गीकरण करणे सोपे जात असते. आदर्श प्रश्नावलीची वैशिष्टे आपणास सांगायची तर अशी सांगता येतील.

१] प्रश्नांची संख्या कमी असली पाहिजे. २] प्रश्नांची उत्तरे आहे, नाही, किंवा आकड्यात मिळवता आली पाहिजे. ३]प्रश्न सोपे असावे, प्रश्न द्विअर्थी नसावे, आणि प्रश्न लांबलचक नसावे.४] प्रश्न पक्षपात करणारे नसावे. ५] प्रश्नातून इच्छित माहिती मिळाली पाहिजे. इ.इ.

आपणास एव्हाना लक्षात आले असेलच की ''तुम्ही खोटं बोलता का ?'' या प्रश्नावलीच्या संदर्भात प्रश्न सोपे, स्पष्ट, आणि इच्छित माहिती मिळेल अशी होती. तुम्ही खोटे बोलता का ? या प्रश्नावलीत अगदी सर्वच प्रश्न उत्तम होते असा संशोधकाचा दावा नाही, प्रश्नावलीत काही दोष निश्चित राहीले होते. प्रश्नावलीत दोषांचे पुन:परिक्षण करण्याची संधी होती मात्र संशोधकाने इथे टाळले आहे.

vote

आपणास खोटे बोलणे आवडते काय या प्रश्नाच्या उत्तरा संदर्भात जवळ जवळ ६४% टक्के लोकांना वाटतं की खोटं बोलू नये. लहानपणापासून समाजाच्या सुशिक्षित आणि अडाणी लोक यांच्याही मनावर बिंबवलेले असते की खोट बोलू नये, आई-वडीलांशी तरी नाहीच नाही. आई-वडीलांशी खोटं बोलता का या प्रश्नाच्या उत्तरात थोडं थोडं आणि प्रसंग पाहून याचे प्रमाण ८०% भरते आहे. खोटे बोलण्याच्या कारणाची आपल्याला चिकित्सा करायची नाही, किंवा असे खोटे बोलणे जे कोणा एकाचे फायद्याचे होते, किंवा आवश्यक होते, असेलही परंतु इथेही खोटे बोलले गेलेले दिसत आहे.

पती-पत्नी आयुष्याच्या प्रवासातील रथाची दोन चाकं पण आयुष्य जगत असतांना अनेकदा मतभिन्नता येते, सर्वच गोष्टी एकमेकांना पटत नाही, तर काही पटतात तरीही ६७% लोक हे खोटं बोलतात, नियमित असो वा कधीतरी खोटं बोलण्याचं प्रमाण इथे अधिकचे दिसत आहे.

कधीकधी आणि प्रसंग पाहून ६४% लोक कार्यालयीन ठिकाणी लोक खोटं बोलतात त्यात अधिकचे नियमित खोटे बोलणारे ९% मिळवले तर एकूणच ७३% लोक कामकाजाच्या ठिकाणी खोटं बोलतात.

मित्र-मैत्रीणीशी खोटं बोलता का याचं उत्तरात खोटं बोलत नाही, असे दिसते. आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणीजवळ मन खुले करण्याचा प्रयत्न असावा, किंवा हे एक हक्काचं ठिकाण असावं म्हणून इथे ५५% लोकांनी खोटं बोलत नाही, असे म्हणाले आहे.

आयुष्यात खोटं बोलण्याचं महत्त्व तडजोड आहे, असं ७३%लोकांना वाटत आहे. त्याच स्वरुपाच्या प्रश्नाच्या उत्तरात ते प्रमाण ६७% वर आलं आहे.

सर्वच माणसं आयुष्यात खोटं बोलतात का याच्या उत्तरात ८०% लोक मानतात की सर्वच लोक खोटे बोलतात मात्र सर्वच मधे आपणही येतो हे उत्तरदाते विसरुन गेलेले दिसत आहेत.

खोटं बोलणे हा गुण मानायला ४६% लोकांनी नकार दिला आहे. हा गुण आहे आणि नैमित्तिक अशा प्रकारचा हा गुण आहे, असं ३६% लोकांना वाटलं आहे. तर १८% लोक सांगू शकत नाही असं म्हणतात.

खोटं बोललं पाहिजे का या उत्तरात ५५% लोक खोटं बोललं पाहिजे म्हणतात तर ४५ टक्के नाही म्हणतात. खोटं बोलणं आवडतं का असं विचारलं होतं तेव्हा ६४ % लोक म्हणाले होते की नाही. एकूणच हेतू काहीही असो, समाजात सर्वच ठिकाणी लोक खोटं बोलतात हाच या प्रश्नावलीचा निष्कर्ष आहे.

प्रश्नावलीची उत्तर लिहिणारे मिपाकर कपिलमुनी, चित्रगुप्त,रेवती,सिद्धार्थ,श्रृती कु. हिरवळ, अनन्न्या, परीकथेतील राजकुमार, लिमाउजेट आणि सुचेल तसं आपण उत्तर लिहिलीत आपले मनःपूर्वक आभार. आभार यासाठी की आपापल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित मांडणे, तसेच आपल्यामुळे एक्सेल मधे विदा टाकून टक्केवारी काढणे हे शिकता आलं कदाचित ते खूप सोपं असेलही पण मग ती चित्र कॉपी पेष्ट करायची [एका आकृतीत घोळ झाला] वगैरे शिकता आलं. बाकी, अ ते ज्ञ सतत दुरुस्तीच्या मोडमधे होतं, त्यामुळे तिकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. अ‍ॅडमिनच्या भावना दुखावल्या वगैरे म्हणे, पण चालायचंच. अ ते ज्ञ वर साडेतिनशेच्या वर क्लिका करणा-यांचेही आभार.

एक दोन प्रश्नांची उत्तरं देणारे उत्तर दात्यांना विश्लेषण करतांना वगळले आहे, तरीही एक दोन प्रश्नाचे उतरे देणार्‍यांचे आभार. अवांतर-विषयांतर आणि विषयासंबंधी लिहिणार्‍या मिपाकरांचे आणि मायबाप वाचकांचेही आभार. आणि नववर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

संदर्भ :
१]संशोधन सिद्धांत आणि पद्धती; डॉ.सदा कर्‍हाडे. प्रकाशनः लोकवाड्मय गृह, मुंबई
२]सामाजिक संशोधन पद्धती; डॉ.दिलीप खैरनार, प्रा.किशोर राऊत. चिन्मय प्रकाशन.औरंगाबाद.

प्रतिक्रिया

अवघड आहे. कळलं नाही असं म्हटलं तर तुम्ही म्हणाल पुन्हा खोटे बोलतेय म्हणून!

तुमच्या चिकाटीला आणि सुव्यवस्थित निरीक्षण-निष्कर्षांना शिरसाष्टांग नमस्कार. निष्कर्ष रोचक आहेत, (हे खोटे बोललेले नाही) खोटे बोलून दुसर्‍याचे भले होत असेल तर जरूर खोटे बोलावे.

अवांतर: त्या साडेतीनशे क्लिकांमधे एक माझीही होती.

दादा कोंडके's picture

2 Jan 2013 - 3:50 pm | दादा कोंडके

निष्कर्ष रोचक आहेत

आपल्याला निष्कर्ष रोचक का वाटले? आपल्याला काही वेगळे निष्कर्ष अपेक्षीत होते का? जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

पैसा's picture

2 Jan 2013 - 7:31 pm | पैसा

मला संपूर्ण सर्वेक्षण रोचक वाटले. त्यात प्रश्नांपासून निकालापर्यंतचे सगळे आले.

रोचक वाटण्याचे कारण सर्वेक्षणाचा विषय नसून त्याची एकंदर पद्धती हे आहे. सर्वेक्षण हा विषय मला नवीन असल्याने त्यासाठीचे प्रश्न निवडणे, उत्तरांच्या आधारे सामाजिक विषयांवर आकडेवारी काढणे, त्यानुसार अनुमान करणे, इ. गोष्टी रोचक वाटल्या. हे सर्वेक्षण 'तुम्ही भूत मानता का?' असे असते तरी मला रोचक वाटले असते.

स्पंदना's picture

2 Jan 2013 - 7:56 am | स्पंदना

तुम्ही या धाग्यात चांगले समजावून सांगितलेत सर!
निकालाची उत्सुकता होतीच.

यशोधरा's picture

2 Jan 2013 - 8:53 am | यशोधरा

LOL! :D धागा काढून नावानिशी आभार मानणार हे आधीच सांगितलं असतं तर मीही नसती का दिली उत्तरं? :P

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणत होतो. अरे, प्रश्नावलीचं उत्तर लिहा रे, उत्तर लिहारे, कोणी राहीलं का उत्तर द्यायचं असं सारखं म्हणत होतो, तरी तुम्ही उत्तरे लिहिलं नाहीत. आता तक्रार चालणार नाही.

धाग्यात प्रतिसादात आभार मानले की ज्याचं नाव आभारात नसतं त्याला उगाच चुटपुट लागून राहते, अशा चुटपुटीचा अन्भव घेतला आहे. आपल्या भावना पोहचल्या. धन्यवाद :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

3 Jan 2013 - 9:44 pm | यशोधरा

तरी तुम्ही उत्तरे लिहिलं नाहीत >> तुम्ही जाहीर धाग्यार जाहीर आभार मानणार असं जाहीर न केल्यामुळे! तुमचा निषेध!

ऋषिकेश's picture

2 Jan 2013 - 9:02 am | ऋषिकेश

:) रोचक निष्कर्ष!

नंदन's picture

2 Jan 2013 - 9:17 am | नंदन

केवढा हा धागा आणि केवढ्या त्या व्याख्या! उदा. ३] A questionnaire is a list of questions given to a number of person for ansers. -बोगार्डस (Sic)
विद्यावाचस्पतींच्या* व्यासंगापुढे नतमस्तक :).

* आमच्या एका (सध्या आंजावरून रजेवर असलेल्या) ज्येष्ठ काकांनी प्राडाँना दिलेली पदवी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 8:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जानेवारीत सत्तावीस तारखेला काकांना भेटायचा प्लॅन आहे, प्लॅन प्रत्यक्षात उतरला तर पहिली वाहिली नक्की भेट आहे.
काकांशी नियमित गप्पा असतातच......!

-दिलीप बिरुटे

सर आपल्या निष्कर्षांना वरुन असे वाटते कि ,
समाजात सहजरित्या खोट बोल्ले जाते व ते सर्वमान्य आहे असच ना? कि ह्यच्यासाथि पुन्हा वेगळी प्रश्नावली.

धन्या's picture

2 Jan 2013 - 1:45 pm | धन्या

सर, मराठीतून पाय चार्ट बनवण्यासाठी कुठले सॉफ्टवेअर वापरले?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक्सेल मधे बरहा वापरुन मराठी लिहिलं.

-दिलीप बिरुटे

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jan 2013 - 3:20 pm | प्रकाश घाटपांडे

धन्य आहे!

इस्पिक राजा's picture

2 Jan 2013 - 3:38 pm | इस्पिक राजा

विडंबन पुर्ण गंडेश आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो. गाळलेल्या जागा भरल्या किंवा मूळ लेखातल्या काही शब्दांच्या जागी नवे शब्द पेरले की विडंबन तयार होते असे काही लोकांना का वाटते कोणास ठाऊक.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> विडंबन पुर्ण गंडेश आहे असे नम्रपणे नमूद करु इच्छितो.

विडंबन ? बरं बरं विडंबन. 'तुम्ही खोटं बोलता का?' या प्रश्नावलीचे हे स्वतंत्र विश्लेषन आहे, असं समजून वाचलं असतं तर तुम्हाला माझं कौतुक करावं वाटलं असतं. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी वाटली असती. तरीही, आपल्या प्रतिसादाचा लम्रपणे आदर करतो. धन्स. :)

नवीन वर्षात आपण एखादा सर्वांना आवडणारा नवीन लेख लिहावा. अभ्यासपूर्ण [तिरपे आणि तिरकस नव्हे] प्रतिसाद लिहून रसिक मायबापांची दाद मिळवावी, यासाठी नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आमच्यावरही असाच लोभ असू द्यावा. :)

दिलीप बिरुटे

तिमा's picture

2 Jan 2013 - 6:58 pm | तिमा

भारत हा एक विकसित,भ्रष्टाचारमुक्त,सभ्य पुरुषांचा,स्त्रियांसाठी अतिशय सुरक्षित आणि अजिबात अंधश्रद्धा नसलेला देश आहे.

स्पंदना's picture

3 Jan 2013 - 5:26 pm | स्पंदना

याला वीधान म्हणुया, फॉर अ चेंज!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Jan 2013 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादकर्ते आणि सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

विकास's picture

3 Jan 2013 - 10:07 pm | विकास

तुमच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांचे काय होत असेल ते समजले. आमच्या सारख्या टवाळांना बंक करावे लागले असते हो. :(
;)

A questionnaire is a list of questions given to a number of person for ansers.

हे वाचताना अमिताभचे खालील वक्तव्य आठवले (संदर्भः नमक हलाल) :-)

... In the year 1979 when Pakistan was playing against India at the Wankhede stadium Wasim Raja and Wasim Bari were at the crease and they took the same consideration. Wasim Raja told Wasim Bari, look Wasim Bari, we must consider this consideration and considering that this is an important match we must put this consideration into action and ultimately score a run. And both of them considered the consideration and ran and both of them got out.

परिकथेतील राजकुमार's picture

3 Jan 2013 - 10:22 pm | परिकथेतील राजकुमार

आमचे आभार मानल्याबद्दल आभार.