3d visualisation: making of rainy night (बदलुन)

स्पा's picture
स्पा in जनातलं, मनातलं
13 Dec 2012 - 3:57 pm

लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..
त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ?

हम्म...

एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं
अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .)
लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली .

आधी बेसिक रूम तयार करून घेतली .
मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे .

बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली .

पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला.
एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं .

फायनल सिन

मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत ,
एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत .

az

adf

रेन्दर्स

vb

hn

सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार .

a

ax

तंत्रविरंगुळा

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Dec 2012 - 4:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गणेशा झाला माझा. काही दिसत नाहीये.

माझापण. नंतर कळलं की त्याच्या लिंका गंडल्या होत्या. :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Jan 2013 - 12:03 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अजुनही लिंका गंडल्यात कां, आमच्या हापीसातल्या नतद्रष्ट नेटवर्क वाल्यांनी माती खाल्लीय, काही कळत नाही.
असो, आज घरी गेल्यावर एकदा बघायलाच हवे.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Dec 2012 - 4:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

आयला स्पावडु मस्त आहे रे झक्कास

चौकटराजा's picture

13 Dec 2012 - 4:05 pm | चौकटराजा

फ्लीम तुटल्याली हाय काय ? पडद्याव काईच दिसत न्हाई !

हारुन शेख's picture

13 Dec 2012 - 4:07 pm | हारुन शेख

जबरी जबर..कमाल आहे एका दृश्य पण वेगळ्या वातावरणात घेऊन जातंय. लय भारी.

चौकटराजा's picture

13 Dec 2012 - 4:12 pm | चौकटराजा

आली खोली समोर .स्टीफन किंगची खोली दिसतेय अगदी !

कवितानागेश's picture

13 Dec 2012 - 4:13 pm | कवितानागेश

मस्तच. :)

गणपा's picture

13 Dec 2012 - 4:15 pm | गणपा

कुठलं सॉफ्टवेयर वापरलं कसं वापरलं त्याचे धडे पण द्या की.

चौकटराजा's picture

14 Dec 2012 - 5:23 pm | चौकटराजा

कोणचं सॉफ्टवेअर ? आवंगणपा, त्ये 3ds max हाय ! त्याचा अभ्यास टकूरं फिर्वून शान टाकतो पघा !
अनुभवी चौ रा

लॉरी टांगटूंगकर's picture

21 Dec 2012 - 9:45 am | लॉरी टांगटूंगकर

मला पण हे सॉफ्टवेअर शिकायचा उत्साह आला होता पण बऱ्याच दिवसांपूर्वी फोटोशॉपचे धडे टाकले होते ते आधी करून बघायचे राहिले आहेत ते आठवले आणि बेत रद्द केला :) ...

बॅटमॅन's picture

13 Dec 2012 - 4:24 pm | बॅटमॅन

स्पांडुरंगा लयच जबरी!!!!

कपिलमुनी's picture

13 Dec 2012 - 4:25 pm | कपिलमुनी

जबर्याटच चित्र आहे

परिकथेतील राजकुमार's picture

13 Dec 2012 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार

स्पावड्या अ‍ॅट हिज बेस्ट !

बाकी रुमला एकच खिडकी दाखवली असतीस तर अजून भारी वाटले असते असे एक प्रेक्षक म्हणून वाटते.

साधारण असे काहीतरी :-
.

अगदी अगदी...सहमत. खोली भयाण घाणेरड्या कळकट हॉटेलची वाटत नाहीये.

पण जी आहे ती कमी भीतीदायक अजिबात नाही.

स्पावड्या.. एकदम चित्तथरारक काम केलं आहेस. रूम आणि वातावरण भीतीदायक वाटतंय फारच. आता तुझ्या कथांमधे अशी चित्रंही बनवून पेरणार की काय??

रामरामरामरामराम...

५० फक्त's picture

15 Dec 2012 - 8:29 am | ५० फक्त

आता तुझ्या कथांमधे अशी चित्रंही बनवून पेरणार की काय?? - असेल असेल, मा.श्री.मिस्पाजी व त्यांचे काही परममित्र असे प्रयोग करणा-या एका संस्थळाचे संस्थापक सदस्य आहेत अशी अफवा आहे आंतरजालावर खरं खोटं माहित नाही.

स्पा's picture

15 Dec 2012 - 1:51 pm | स्पा

हुम्म..

खरंय , अपडेट करतो आहेच
धन्स रे

पैसा's picture

14 Dec 2012 - 5:08 pm | पैसा

तात्या विंचू कशाला तयार करतोस रे हे?

jaypal's picture

14 Dec 2012 - 5:29 pm | jaypal

जबराट, खतरनाक असे सगळे शब्द ओवाळुन टाकीन स्पा तुझ्या या कलेवर पण
ती २ भांडी हातात का गेउन बसलास ते आधी सांग

त्यात 'रक्त गाभुळलेल्या चिंचा' असाव्यात असा आमचा होरा आहे.

स्पंदना's picture

14 Dec 2012 - 5:45 pm | स्पंदना

कुठाय कलेवर? मला नाही दिसल चित्रात.

शिग्रेटी फुकाया लागलास व्हय रं?
थांब तुझ्या आईलाच नाव सांगतू.

स्पा's picture

15 Dec 2012 - 1:51 pm | स्पा

ओ गणपा
"तो मी नव्हेच "

मूकवाचक's picture

14 Dec 2012 - 5:32 pm | मूकवाचक

मस्तच ...

प्यारे१'s picture

14 Dec 2012 - 5:35 pm | प्यारे१

मस्त रे स्पावड्या!

स्मिता.'s picture

14 Dec 2012 - 5:40 pm | स्मिता.

एकनंबर जबरा काम केलंय. ते खिडकीवर जमलेलं धुकं, त्यातून ओघळणारं पावसाचं पाणी, त्यावर उमटलेले हाताचे पंजे... फोटोच दिसतोय तो अगदी. कीप ईट अप!

स्मिता.'s picture

14 Dec 2012 - 6:31 pm | स्मिता.

जो प्रयोग केलाय तो सुरेखच आहे. पण चित्र पुन्हा पाहिल्यावर वाटलं की टेबलावर सगळं नुसतं ठेऊन दिल्यासारखं आहे. तिथे कधी माणूस वावरल्याच्या खुणा म्हणून अ‍ॅश-ट्रे मधे थोडी राख आणि सिगरेटचे १-२ तुकडे, एखादी जुनाट उघडी पडलेली डायरी असं टाकलं तर आणखी परिणाम साधेल.

स्पा's picture

15 Dec 2012 - 1:53 pm | स्पा

जबरदस्त सूचना

खर हे मला सुचायला हव होतं , पण असो :)
आता बरेच बदल करतोय सीन मध्ये , त्यामुळे या गोष्टी पण बदलेन

स्पा's picture

7 Jan 2013 - 11:45 am | स्पा

@ स्मिता : बदल केलेत :)

स्मिता.'s picture

7 Jan 2013 - 2:44 pm | स्मिता.

बदल केल्यानंतरचे फोटो आणखी परिणामकारक झाले आहेत. शेवटून दुसरा खासच!

स्पंदना's picture

14 Dec 2012 - 5:44 pm | स्पंदना

मिश्टर एस. पी. ए. त्या शेगरेटी ऐवजी चिरुट (पक्षी चिलीम) टाकुन बघा. नाही जरा भारदस्त वाटत.

एकदम मस्त. शेवटच चित्र बरच काही डोक्यात आणुन गेल. त्यात "ते" अजुन यायच आहे हे ही आल.

नि३सोलपुरकर's picture

14 Dec 2012 - 5:52 pm | नि३सोलपुरकर

स्पावड्या मस्त जमलय ..
अभिनंदन तुझे आणी सौरभचेही

मालोजीराव's picture

14 Dec 2012 - 6:38 pm | मालोजीराव

झक्कास जमलाय रे...आता एखादी भयकथा पण येउदे लगोलग !

bhoot

सुहास..'s picture

15 Dec 2012 - 10:39 am | सुहास..

.आता एखादी भयकथा पण येउदे लगोलग ! >>

माल्या , त्या पेक्षा जी अर्धवट आहे ती पुर्णत्वास नेली तरी चालेल म्हण ;)

कवटीची हास्यमुद्रा लहानपणी लै हसरी वाटायची, त्यामुळे प्राथमिक शाळेत असताना वहीत कायम हाडाचे सापळे काढत असे, त्याची यानिमित्ताने आठवण झाली. पर्फेक्ट स्केलेटॉर कवटी आहे ही ;)

दादा कोंडके's picture

17 Dec 2012 - 7:33 pm | दादा कोंडके

कवटीची हास्यमुद्रा लहानपणी लै हसरी वाटायची

पुर्वी डेंजरच साइन म्हणून पेंटरवाले रस्त्याच्या कडेला पाट्यांवर कवटी रंगवायचे. बहुतेक वेळा त्याकडे बघून हसूच यायचं.

बाकी शरीराचं मातीत विघटन झालं की कवटी अखंड न रहाता त्याचे सुटे भाग होतात कारण त्यांचे खुपशे जोड स्नायुंनी बनलेले असतात असं एका डाग्दर मित्रानी सांगितलं होतं. पण सिनेमात कवट्या अगदी जबड्या सकट हसताना वगैरे दाखवतात.

सोत्रि's picture

14 Dec 2012 - 9:06 pm | सोत्रि

शेवटच्या चार फोटोंमधला प्रवास आणि शेवटच्या फोटोमधला इफेक्ट जबराट!
मेणबत्तीच्या ज्योतीचा प्रकाश थोडा कमी केला तर गडद छटा येऊन आणखिन परिणामकारक होईल असे वाटतेय.

-(मल्टी डिमेंशनल) सोकाजी

मेणबत्तीच्या ज्योतीचा प्रकाश थोडा कमी केला तर गडद छटा येऊन आणखिन परिणामकारक होईल असे वाटतेय

ह्म्म्म..
ओके सर्र
पाहतो करून , थोडं लायटींग बदलाव लागेल

सुहास..'s picture

14 Dec 2012 - 9:09 pm | सुहास..

लई भारी रे !

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Dec 2012 - 9:09 pm | बिपिन कार्यकर्ते

स्पारायण धारप!!!!!!!!!!!!!!!!!!

_/\_

विकास's picture

14 Dec 2012 - 9:14 pm | विकास

सॉलीड! असं जमलं पाहीजे असे वाटते. पण... :(

हुकुमीएक्का's picture

14 Dec 2012 - 9:48 pm | हुकुमीएक्का

मेणबत्ती चा इफेक्ट आवडला... hats off

नानबा's picture

14 Dec 2012 - 9:57 pm | नानबा

स्पा, एक नंबर एडिटींग राव... चायला मी पण बरेच दिवस 3ds max शिकायचा (घरच्या घरी) निष्फ़ळ प्रयत्न केलाय.. आता तुमच्या कडूनच धडे गिरवावे म्हणतो....

दादा कोंडके's picture

14 Dec 2012 - 11:45 pm | दादा कोंडके

_/\_ खत्राच!

काही वर्षापुर्वी थ्री डी मॅक्स, थ्री डी मार्क, ब्लेंडर, माया, फ्लॅश शिकण्याचा प्रयत्न केला.
पण कल्पकता आणि एका जागी बूड टिकवण्याच्या गोळ्यांचा अद्याप शोध लागला नसल्यानं काहीच जमलं नाही. :(

चान चान !! पण ती बै भांडी का घेऊन बसलीये कळलं नाही.

स्पा's picture

15 Dec 2012 - 1:54 pm | स्पा

:D

मलाही कळलेलं नाहिये :P

अभ्या..'s picture

15 Dec 2012 - 12:03 am | अभ्या..

थ्री डी मॅक्स, थ्री डी मार्क, ब्लेंडर, माया, फ्लॅश शिकण्याचा प्रयत्न केला.

एवढं सगळं एकदम? दादा, लोकं एकेका एप्लीकेशन मध्ये जिंदगी घालवतेत. ;)
स्पावड्या भारीय रे. मस्त जमलेय.
(आणि तेवढे दादांना त्या कल्पकतेच्या न बूड टिकवायच्या गोळ्या देउन टाक बाबा.;) )

अत्रुप्त आत्मा's picture

15 Dec 2012 - 8:13 am | अत्रुप्त आत्मा

स्पांडु रंग महाराज की जय....!

@एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggle.gif

५० फक्त's picture

15 Dec 2012 - 8:28 am | ५० फक्त

लई भारी रे, आवडलं.

मितभाषी's picture

15 Dec 2012 - 10:24 am | मितभाषी

एकदम खत्री..

स्पा's picture

15 Dec 2012 - 1:56 pm | स्पा

धन्स लोक्स.
सर्व बदल नोंदवून ठेवलेत
मिपाकर लैच क्रिएटीव आहेत , हे परत सिद्ध झाले :)
अपडेटेड इमेज सोमवारी टाकतो

अपडेटेड इमेजची वाट बघतोय रे...

भिकापाटील's picture

15 Dec 2012 - 3:08 pm | भिकापाटील

स्पाकाका त्या झोळ्या तेवढ्या खाली सरकव जरा. बाकी बेस्टच

चित्रगुप्त's picture

15 Dec 2012 - 3:15 pm | चित्रगुप्त

प्रयत्न आवडला. हा,माझा प्रांत नव्हे, तरी काही सुचवतो:
या चित्रात प्रमुख्याने प्रकाशाचे दोन स्त्रोत आहेतः १. खिडकीतून येणारा निळसर, ग्रे अन्धुक प्रकाश आणि २. मेणबत्तीचा पिवळट, जास्त स्पष्ट प्रकाश. या दोन्ही प्रकाशांचा योग्य समतोल जेंव्हा साधेल तेंव्हा चित्र खरे वाटेल. मूर्तीच्या चेहर्‍यावर मेणबत्तीचा प्रकाश दिसत नाहीये. मूर्तीचे डोळे जर उघडे, चमकदार (भयानक) दाखवता आले, तर चित्रात एकदम जिवंत पणा येइल, असे वाटते. तसेच मि. स्पा च्या नावाच्या पट्टीवर वरच्या कडेवर प्रकाश हवा.
खिडकीच्या फ्रेमच्या पट्ट्या फार चकाचक आखीव वाटतात, त्या जरा जुनाट दिसल्या, तर वातावरण निर्मितीत भर पडेल.
तशी तुमची मूळची इमेज जास्त गूढ वाटते. त्यात फक्त काचेवरील पाउस, हाताचे पंजे, आणि मूर्तीवर पडणारा मेणबत्तीचा हलकासा प्रकाश, एवढेच हवे होते. हाताच्या पंजांचा आकार रक्षापात्राच्या संदर्भात लहान वाटतो (लहान मुलाचे पंजे?) तसेच जमिनीपासून खिडकी अडीच ते तीन फुटावर सुरु होते असे मानले, तर पंजे नेमके कुठे हवेत? (मोठ्या माणसाचे पंजे साधारणतः जमिनीपासून साडेचार-पाच फुटावर येतील.)
अर्थात हे सर्व सहज सुचले ते लिहिले, फारसे मनावर घेउ नका.

चौकटराजा's picture

15 Dec 2012 - 4:53 pm | चौकटराजा

@ चित्रगुप्त साहेब ,
मूर्तीच्या चेहर्‍यावर मेणबत्तीचा प्रकाश दिसत नाहीये. मूर्तीचे डोळे जर उघडे, चमकदार (भयानक) दाखवता आले, तर
आपले हे निरिक्षण परफेक्ट आहे.यात तांत्रिक बाब अशी की. मेणबतीची ज्योत हा 3ds max मधे लाईट सोर्स आहे. तो कोणत्या प्रकारचा ओमनी, स्पॉट की डिरेक्शनल यावर त्याचा आसमंतावरचा प्रभाव अवलंबून असतो. माझ्या मते तो ओमनी या सारखा डिफाईन केला नसेल तर त्याचा प्रभाव त्या बाहुलीच्या बॉडीवर दिसेल तोडावर दिसणार नाही.स्पॉट व डिरेक्शनल लाईट चा झोत मर्यादित असतो ओमनीचे तसे नाही. उदा सांगायचे झाले तर सूर्य का ओमनी लाईट सोर्स आहे.

नंदन's picture

16 Dec 2012 - 5:48 am | नंदन

लै भारी, स्पाशेठ!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Dec 2012 - 2:19 am | निनाद मुक्काम प...

खतरनाक
राहिलेल्या भय कथेचा पुढचा भाग अश्याच चित्रा सह येऊ दे.

प्रचेतस's picture

18 Dec 2012 - 12:33 pm | प्रचेतस

छान छान.
आवडले.

प्रीत-मोहर's picture

20 Dec 2012 - 9:42 pm | प्रीत-मोहर

आवडले रे स्पावड्या :)

इरसाल's picture

21 Dec 2012 - 3:26 pm | इरसाल

पुस्तकांची बायडींग उलटी का आहे ?

आम्ही सॉफ्ट्वेअरात औंरंगजेब !!!!!

किसन शिंदे's picture

21 Dec 2012 - 6:19 pm | किसन शिंदे

जबराट!!

शेवटचा फोटो तर खास जमलाय.

चाफा's picture

22 Dec 2012 - 3:23 am | चाफा

लै भारी स्पावड्या :)

चिगो's picture

22 Dec 2012 - 12:59 pm | चिगो

खतरा जमलंय.. बाकी तू जाणकारांच्या प्रतिसादांवरुन सुधारणा करुन त्येला 'लैच खतरा' बनवशील हा विश्वास आहे..

झक्कास... आणि प्रतिसादानुसारच नव्हे तर त्या प्रतिसादांमधले योग्य पॉईंट्स घेऊन त्यात तुझी आणखी कल्पनाशक्ती आणि कला वापरुन आणखीनच उत्कृष्ट काम सादर केलंस. धन्यवाद आणि कौतुक..

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 12:33 pm | प्रचेतस

नवे चित्र छानच झालेय.
पण लाल रंगसंगतीचा वापर किंचीत कमी करायला हवा होतास असे वाटते.

ह भ प's picture

7 Jan 2013 - 12:13 pm | ह भ प

नादखुळा.कॉम..
झबरदस्त.

पियुशा's picture

7 Jan 2013 - 1:15 pm | पियुशा

जबरा !!!

आमचाही कुर्निसात स्वीकारावा
__/\__

लय भारी

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jan 2013 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

दुसरं बी दिन्ही फोटू भारी हायाती :-)

ये बास आता. लय भ्या वाटुन झाल. आता एक गाण्याचा ऑडिओ टाक.

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 12:24 am | कवितानागेश

ये हुई ना बात!
जबर्रा!! :)

अर्धवटराव's picture

8 Jan 2013 - 5:07 am | अर्धवटराव

हे खतरनाक जमलय.
सही रे स्पावड्या.

अर्धवटराव