कोकणसफरीतील विसाव्याचं स्थान - 'उत्तम फार्म'

प्रास's picture
प्रास in भटकंती
8 Dec 2012 - 1:17 pm

सिमेंट कॉंक्रिटच्‍या जंगलामध्‍ये राहणा-या प्रत्‍येकालाच नैसर्गिक जंगलांची एक ओढ असते. शहरापासून दूर निसर्गाच्‍या सानिध्‍यात काही काळ व्‍यतित करुन स्‍वतःसाठी नवी उर्जा मिळवून पुन्‍हा आपपल्‍या कामांना जुंपून घेणारी जनता आजकाल प्रत्‍येक शहरात आढळते. कदाचित यामुळेच काही तरुणांमध्‍ये डोगर-द-यामंधून, जंगलांमधून, नदीच्‍या खो-यांमधून फिरवणारी ट्रेकींगची आवड वाढीला लागल्‍याचे आढळून येते. असं असलं तरी अनेकांना अशा ट्रेकींग प्रकारात होणा-या श्रमाची जाणीवच हतोत्‍साही करते. अशा लोकांना निसर्गाच्‍या सानिध्‍याचं आकर्षण असतं पण त्‍यासाठी अतिरिक्‍त श्रम करणं नको असतं. निसर्ग त्‍यांना त्‍यांच्‍या रिक्रीयेशनसाठी हवा असतो. चार दिवस आपल्‍या धावपळीच्‍या – धकाधकीच्‍या जीवनापासून दूर, नदीकाठच्‍या जंगल प्रदेशात, झाडाखाली पहडून विश्रांती घेत आजूबाजूचा निसर्ग अनुभवत श्रमपरिहारातून पुढच्‍या धावपळीच्‍या आयुष्‍यासाठी उर्जा मिळवणं असा त्‍यांचा विशुध्‍द हेतू असतो. त्‍यांच्‍या अपेक्षा अगदी साध्‍या असतात. त्‍यांना निसर्ग सान्निध्‍य देणारी, मूलभूत सोयींनी युक्‍त असणारी, मानवी गजबटापासून दूर असणारी आणि त्‍यांना अपेक्षित असलेला श्रमपरिहार आणि उर्जा दोन्‍ही देऊ शकणारी अशी जागा हवी असते. माझा स्‍वतःचा सहभागही मी उपरोल्‍लेखित व्‍यक्तिंमध्‍येच करतो. कामाच्‍या संबंधाने कोकणात फिरत असताना केवळ योगायोगानेच वरील सगळया मागण्‍या पूर्ण करू शकणारी जागा मला सापडली आणि तीच आता तुमच्‍यापुढे प्रस्‍तुत करत आहे.

सिंधुदुर्गामध्‍ये कणकवली तालुक्‍यातील प्रसिध्‍द फोंडाघाट गावाजवळ दोन-तीन दिवसासाठी राहण्‍याची सोय बघत असताना जवळच्‍याच कौंडये गावातील ‘उत्‍तम फार्म’चं नाव समजलं. तिथे निश्चित सोय होतेय हे कळल्‍यामुळे सरळ कौंडयेचाच रस्‍ता पकडला. तिथे नेणारा रस्‍ता इतका सुंदर होता की त्‍यामुळे उत्‍तम फार्मबद्दलच्‍या अपेक्षाही वाढीला लागल्‍या.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता.

उत्‍तम फार्मकडे नेणारा रस्‍ता पावसात नुकताच न्‍हालेला. हा रस्‍ता उत्‍तम फार्मच्‍या मधूनच गेला आहे. वर दिसणारा पूल (ब्रीज) हा नव्‍यानेच बांधला गेलाय. रस्‍त्‍यासाठी उत्‍तम फार्मने आपली काही जागा सोडून दिल्‍यामुळे विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन.

रस्त्याने विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन

रस्त्याने विभागलेलं ‘उत्‍तम फार्म’चं माडांचं बन.

या ब्रीजवर आल्‍याबरोबरच जाणवलं त्‍याखालच्‍या नदीचं खळाळतं अस्तित्‍व पण लक्ष मात्र वेधून घेतलं त्‍यावरील या बंधार्‍याने!

बंधा-यावरून उधाण येऊन ओसंडणारं पाणी.

बंधा-यावरून उधाण येऊन ओसंडणारं पाणी.

डाव्‍या बाजूच्‍या बंधार्‍यावरुन येणारं पाणी उजव्‍या बाजूला असं नदीरूपात वाहतं.

खालच्‍या अंगाला दिसतेय जुन्‍या साकवाची जागा

खालच्‍या अंगाला दिसतेय जुन्‍या साकवाची जागा.

जरा वळून पाहताना रस्‍ता असा दिसला

जरा वळून पाहताना रस्‍ता असा दिसला.

हा ब्रीज पार करून जाताच आपल्‍याला उजव्‍या बाजूला अशी दिसते उत्‍तम फार्मची जागा -

हिरवाईतून दिसणारा उत्‍तम फार्म

हिरवाईतून दिसणारा उत्‍तम फार्म.

उत्तम फार्मवर राहण्याची सोय दोन प्रकारची आहे. वरच्या चित्रात दिसणार्‍या चिरेबंदी खोल्या आणि प्रशस्त असा तंबू.

उत्तम फार्म मध्ये राहण्यासाठी सुसज्ज तंबू

उत्तम फार्म मध्ये राहण्यासाठी सुसज्ज तंबू.

एका चिरेबंदी खोलीमध्ये स्वयंपाकधर आणि डायनिंग रुम बनवलेली आहे. पूर्णवेळ स्वयंपाकी (खानसामा) आणि आवश्यक त्या भाज्या नि वाणसामानाने भरलेलं स्वयंपाकघर ही माझ्यासारख्या हौशी बल्लवासा़ठी पर्वणीच होती. या सोयीचा मात्र मी पुरेपूर वापर करुन घेतला.

सकाळ – संध्याकाळच्या रीकाम्या वेळेत उत्तम फार्म मध्ये फेरफटका मारताना टिपलेली काही दृश्ये –

उत्तम फार्मकडे आणणारा रस्ता

उत्तम फार्मकडे आणणारा रस्ता.

उत्तम फार्मवरुन दिसणारा ब्रीज व बंधारा

उत्तम फार्मवरुन दिसणारा ब्रीज व बंधारा.

उत्तम फार्मवरुन दिसणारी नदी

उत्तम फार्मवरुन दिसणारी नदी.

उत्तम फार्मचं माडांचं बन नि दालचिनी लागवड

उत्तम फार्मचं माडांचं बन नि दालचिनी लागवड.

सकाळी दाराशी पडलेला पारिजातकाचा सडा

सकाळी दाराशी पडलेला पारिजातकाचा सडा.

मुक्कामादरम्यान उत्तम फार्मच्या व्यवस्थापकांशी बोलताना ते किती मोक्याच्या जागी वसलंय याची नीट कल्पना आली. तिथून साधारण १८ किमी वर दाजीपूर अभयारण्य आहे. इथे गव्यांचं साम्राज्य आहे. साधारण १० किमी वर नापणे धबधबा आहे, सुमारे ५० किमी वर समुद्रकिना-यावरचं कुनकेश्वर महादेवाचं स्थान आहे, जवळपास ७५ किमी वर डॉल्फिन्सच्या झुंडी पहाण्यासाठी प्रसिध्द वेंगुर्ला आहे. त्याशिवाय १०० किमी वर कोल्हापूर – राधानगरी अभयारण्य आणि दूधसागर धबधबाही आहे. व्यवस्थापकांच्या म्हणण्यानुसार ब-याचदा पर्यटक पहिला मुक्काम गणपतीपुळ्याला करतात आणि तिथून सकाळी निघून दुपारपर्यंत कौंड्याला येतात कारण गणपतीपुळे इथपासून कौंड्ये फक्त १५० किमी वर आहे.

माझ्या वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी उत्तम फार्म मधली एक अलिबाबाची गुहाच माझ्यासमोर उघडली आणि त्यासाठी मला कोणत्याही परवलीच्या शब्दाची आवश्यकता लागली नाही. उत्तम फार्म तर्फे कौंड्ये गावक-यांसाठी केलेली वाचनालयाची सोय तिथे राहायला येणा-या पर्यटकांसाठीही उपलब्ध होती. दोन-तीन मोठी कपाटे भरुन असलेली मराठी – इंग्लीश भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं समोर बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर तीन-चार तास मी बकुळीच्या झाडाखालच्या पारावर बसून अरुण कोलटकरांच्या ‘द्रोण’ या दीर्घ कवितेचा आणि वा. वि.मिराशींच्या ‘कालिदास’ विषयक अभ्यासपूर्ण लेखनाचा आस्वाद घेतला. दरम्यान चहा – कॉफी नि त्याबरोबरच्या अमनचमन खाऊचा रतीब बसल्या जागेवरच मिळण्याची सोय झाली होती.

कौंड्ये गावातल्या जीवनाचा केंद्रबिन्दू तिथलं पावना देवीचं मंदिर आहे. नवरात्रीमध्ये आणि विशेषत: दस-याच्या दिवशी इथे मोठा उत्सव असतो. या उत्सवात समस्त गावकरी येतातच पण गावातले मुंबईला वास्तव्याला असलेले चाकरमानी देखिल यावेळी आवर्जुन उपस्थित असतात. सव्वाशे वर्षापूर्वीचं हे मंदिर ही उत्तम फार्मच्या लगतच आहे.

उत्तम फार्मच्या आंब्याच्या वनालगतच पावना देवीचं मंदिर

उत्तम फार्मच्या आंब्याच्या वनालगतच पावना देवीचं मंदिर.

पावना देवी मंदिर

पावना देवी मंदिर.

पावना देवीच्या मंदिराकडे नेणारा गर्द झाडीतील रस्ता

पावना देवीच्या मंदिराकडे नेणारा गर्द झाडीतील रस्ता.

मंदिराच्या आवारातील विरगळ आणि ब्राह्मणदेव

मंदिराच्या आवारातील विरगळ आणि ब्राह्मणदेव.

विरगळ जवळून

विरगळ क्र. १ (जवळून)

विरगळ (दुसरा) जवळून

विरगळ क्र. २ (जवळून)

एकूण काय, तर कामानिमित्ताने ओळखीचं झालेल्या उत्तम फार्मवर निसर्ग सान्निध्याचा आस्वाद घेण्यासाठी आणि सोबतच जवळच्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी पुन्हा एकदा आवर्जुन मुक्कामाला येण्याचं ठरवून अस्मादिकांनी मुंबई नामे सिमेंट – कॉन्क्रिटच्या जंगलाकडे कूच केले.

प्रतिक्रिया

पक पक पक's picture

8 Dec 2012 - 1:20 pm | पक पक पक

मस्त ,जायला नक्की आवडेल्.माहिती बद्दल धन्यवद... :)

'उत्तम फार्म' नावाप्रमाणेच उत्तम दिसते आहे.
खोल्या व तंबू यांच्या दराचा अंदाज दिल्यास बरे होईल.
या महिनाअखेर अशा एखाद्या ठिकाणी जाण्याचा विचार आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2012 - 3:47 pm | परिकथेतील राजकुमार

फोटो ब्लॉगस्पॉटवरून इथे टाकल्याने ते लोड व्हायला प्रचंड वेळ घेत आहेत. तसेच जोड शब्द देखील तुटलेले असल्याने वाचायला त्रास होतो आहे. येथे काही बदल करता येईल काय ? धाग्यावर आल्यानंतर ५ मिनिटांनी ही प्रतिक्रिया लिहित आहे पण अजूनही फटू आणि धागा अर्धवट उघडलेले आहेत.

प्रचेतस's picture

8 Dec 2012 - 5:23 pm | प्रचेतस

अगदी हिरवागार निसर्ग आहे सगळीकडे.

बाकी शेवटच्या दोन तीन फोटोतल्या ज्या शिळा आहेत ते वीरगळ नाहीत. त्या भक्तांच्या स्मारकशिळा वाटत आहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

8 Dec 2012 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त.............................................. :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2012 - 6:09 pm | निनाद मुक्काम प...

फारच सुंदर सचित्र लेख आहे
वैद्य राज आपण इतके दिवस आभासी जगातून बेपत्ता होता. आता कळले की आपण निसर्गाच्या सानिध्यात खरे खुरे आयुष्य जगत होतात.

अनन्न्या's picture

8 Dec 2012 - 6:32 pm | अनन्न्या

आमच्या रत्नागिरीच्या जवळचे ठिकाण आम्ही मात्र येथे पाहतो आहोत.

वाह! लगेच फार्मवर जावेसे वाटत आहे.

मी-सौरभ's picture

10 Dec 2012 - 8:27 pm | मी-सौरभ

मग करा बु़क तिकीट :)

स्पंदना's picture

9 Dec 2012 - 10:43 am | स्पंदना

परसात पारिजातकाचा सडा पडे
केंव्हा फुले वेचायला येशील तू गडे....

मस्त विश्रांती झालेली दिसतेय वैद्यराज.

प्रभाकर पेठकर's picture

9 Dec 2012 - 4:04 pm | प्रभाकर पेठकर

'उत्तम पार्क' बाहेरून तरी खुणावतो आहे. आंत, खोल्या, डायनिंग हॉल, स्वयंपाकघर, व्हरांडा इ.इ. सोयी कशा आहेत त्याचीही छायाचित्रे आली असती आणि अर्थात, सोबत खर्चाचा अंदाज असता तर लेख परिपूर्ण झाला असता.

अजूनही वेळ गेलेली नाही.

येडगावकर's picture

9 Dec 2012 - 7:05 pm | येडगावकर

खरचं! इथे जायला नक्की आवडेल. प्रचिवरुन फार्म फार सुंदर आहे असे वाटतय खरं! (कदाचित हा प्रचिंचा प्रभाव असु शकतो!) तेव्हा कृपया जायचे कसे, एकंदरित खर्च जरा सांगाना राव!

पियुशा's picture

9 Dec 2012 - 4:58 pm | पियुशा

सुरेख !

हारुन शेख's picture

9 Dec 2012 - 6:03 pm | हारुन शेख

मला तर बाबा फोटोवरून भारलेला परिसर वाटतोय. काही परामानसशास्त्रीय अनुभव आले का हो ?

सोत्रि's picture

9 Dec 2012 - 6:22 pm | सोत्रि

+१ सहमत!

एक चांगली भयकथा लिहीण्यासाठी लागणारे वातावरण फोटोतून दिसते आहे.

- (भारलेला भटक्या) सोकाजी

प्यारे१'s picture

9 Dec 2012 - 8:14 pm | प्यारे१

मस्तच

हुकुमीएक्का's picture

10 Dec 2012 - 2:58 am | हुकुमीएक्का

ठिकाण देखील एकदम सुरेख आहे. . . पावसाळ्यामध्ये जायला खुप बरे वाटावे असे ठिकाण आहे. . .

बॅटमॅन's picture

10 Dec 2012 - 3:21 am | बॅटमॅन

मस्त ठिकाण!!! बाकी इतर प्रतिसादक म्हणताहेत त्याप्रमाणे आर्थिक गणित थोडेसे मांडलेत तर बाकीच्यांना पिलॅन करायला बरं.

नंदन's picture

10 Dec 2012 - 8:17 am | नंदन

सचित्र वर्णन आवडलं.

वाचनालयाची सोय तिथे राहायला येणा-या पर्यटकांसाठीही उपलब्ध होती. दोन-तीन मोठी कपाटे भरुन असलेली मराठी – इंग्लीश भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं समोर बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. त्यानंतर तीन-चार तास मी बकुळीच्या झाडाखालच्या पारावर बसून अरुण कोलटकरांच्या ‘द्रोण’ या दीर्घ कवितेचा आणि वा. वि.मिराशींच्या ‘कालिदास’ विषयक अभ्यासपूर्ण लेखनाचा आस्वाद घेतला. दरम्यान चहा – कॉफी नि त्याबरोबरच्या अमनचमन खाऊचा रतीब बसल्या जागेवरच मिळण्याची सोय झाली होती.

हमीनस्तो, हमीनस्तो, हमीनस्त :)

लई भारी ओ प्रासजी, फक्त तेवढं आतले फोटो आणि खर्चाचं लिहा जरा. म्हणजे बचत करायला सुरुवात करायला हवी का नाही.

नितिन काळदेवकर's picture

10 Dec 2012 - 9:07 am | नितिन काळदेवकर

फारच उत्तम. या ठिकाणी जायला आवडेल. मात्र याचे बुकिंग कोठून होते ? याची कोणती साईट आहे कां ? याबद्दल कळेल कां ?

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Dec 2012 - 9:13 am | श्री गावसेना प्रमुख

याच बुकींग आम्ही करतो फक्त आमच्या स्विस खात्यावर १०००० अमेरिकन डॉलर रक्कम टाकुन द्या

आवो साब्जी.. इशका अता-पता, फुन लंबर त्यो बताओजी..

या वीकेंडला आमचा जायचा प्लाण आहे..तेव्हा.. प्लीज याचे काँटॅक्ट डिटेल्स द्या..

सविता००१'s picture

10 Dec 2012 - 10:38 am | सविता००१

छानच. नक्की जायला आवडेल. :)

सुहास झेले's picture

10 Dec 2012 - 11:58 am | सुहास झेले

मस्त आहे जागा... आवडली :) :)

गवि's picture

10 Dec 2012 - 6:34 pm | गवि

आवडले.
एसी , टीव्ही ., कोंबडी वडे , मासे आहेत का?

कित्ती हो तुम्ही 'चंगळवादी' ?
निदान व्यनीतून तरी विचारायचे.. !

कोंकणात निसर्ग. भरपूर. .. त्यात अनोखे काही नाही. चंगळ खूप कमी मिळाते.. म्हणून. रोखठोक विचारावे तिथे जाण्या पूर्वीच..

:)

सस्नेह's picture

10 Dec 2012 - 9:10 pm | सस्नेह

a