गाभा:
बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंबेडकरी जनतेने दिलेल्या लढ्यानंतर त्यांना स्मारकासाठी त्वरीत जागा मिळाली,मग ज्या छत्रपती शिवरायांनी हा देशाला स्वराज्याचे स्वप्न दाखवले,मेलेल्या मनात स्वाभीमान जागृत केला,मनामनात,इथल्या दगडाधोंड्यात स्वराज्याचे,सुराज्याचे स्पुलिंग पेटवले त्या शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक कधी होणार्,का इथला मराठा पेटल्यावरच सरकारला जाग येणार आहे.....
प्रतिक्रिया
7 Dec 2012 - 8:22 pm | प्यारे१
बाबा पाटील आगे बढो.... हम तुम्हारे साथ है!
7 Dec 2012 - 8:48 pm | वसईचे किल्लेदार
हांग्गाशी ...
7 Dec 2012 - 8:50 pm | सुनील
इथला म्हणजे नक्की कुठला ते कृपया स्पष्ट करावे.
शिवाय, केवळ "इथल्यांनीच" का पेटावे, "तिथल्यांनी" का नाही, तेदेखिल स्पष्ट करावे. म्हणजे प्रतिक्रिया देणे सुलभ जाईल!
(मधला) सुनील
7 Dec 2012 - 10:04 pm | विकास
सहमत.
बाकी मध्यंतरी कुठेतरी वाचल्याप्रमाणे, या (अरबी समुद्रातील स्मारकाची फाईल) पर्यावरण खात्यात आहे.
7 Dec 2012 - 10:10 pm | तर्री
मराठा अलीकडे तापवून , वाट सोलून तय्यार आहे.
निवडणुकांची ठिणगी पडली की पेटतील तेवढ्या पुरते ! बाकी सुशेगात !
7 Dec 2012 - 10:25 pm | श्रीरंग_जोशी
तत्कालिन उपमुख्यमंत्र्यांनी (ते आज पुन्हा नव्याने उपमुख्यमंत्री बनले आहेत) बहुधा वर्ष दिड वर्षापूर्वी सांगितले होते की हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सरकारला परवडण्यासारखा नाही त्यामुळे तो रद्द करत आहोत...
सर्वप्रथम २००४ च्या विधानसभा निवडणूकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने याचे वचन दिले होते. ८ - ९ वर्षे होऊन गेल्यावर त्यांनी त्याच्या आर्थिक बाबींवर विचार करणे सुरू केले आहे. प्रकल्प होणार नाहीच असे काही नाही.
इंदू मिल ची जागा मिळण्यासाठी १० वर्षांहून अधिक काळ लागला. इथे तर समुद्रातच क्रुत्रिम बेट बनवायचे आहे. म्हणजे जागा मिळवण्याचा विलंब वाचेल.
२०१४ च्या निवडणूकीत काँग्रेस राष्ट्रवादीने समुद्रात प्रकल्प उभारल्याने पर्यावरणाचे नुकसान होईल म्हणून अवकाशात स्मारक उभारण्याचे वचन दिल्यास आश्चर्य वाटायला नको.
8 Dec 2012 - 1:41 am | विश्वनाथ मेहेंदळे
अच्छा म्हणजे बाबासाहेब केवळ दलितांचे आणि केवळ मराठ्यांचे अशी विभागणी झाली आहे काय ?
कोब्रा, देब्रा, सारस्वत, सीकेपी, पाठारे प्रभू (आणि इतर अनेक जाती) यांनी काय करायचे ??
8 Dec 2012 - 2:09 am | तिरकीट
कोब्रा, देब्रा यांनी ज्ञानेश्वर, रामदास अशांची नवे घ्यायला हरकत नसावी
8 Dec 2012 - 2:22 am | पिवळा डांबिस
आणि सारस्वत, सीकेपी, पाठारे प्रभू हे अरबी समुद्राचा फक्त माशांचं कोठार म्हणुन उपयोग करत असल्याने असला भर समुद्रात बेट उभारण्याचा आचरटपणा प्रत्यक्षात आला तर तिथून माशे निघून जातील का या चिंतेत आहेत....
-मत्स्यगोत्री डांबिस
8 Dec 2012 - 1:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हे पटले !!!
-सगोत्री विमे
8 Dec 2012 - 2:41 am | काळा पहाड
शाब्बास, तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. आगे बढो. सुंभ जळाला तरी पीळ जात नाही हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे. शिवाय आता श्री अजीत पाटलांसारखा निर्गवी, निस्पृह, प्रामाणिक आणि नम्र नेता आहेच तुम्हाला दिशा द्यायला. जास्तीत जास्त मराठ्यांना या उपक्रमात आणण्याचा प्रयत्न करा. प्रसंगी नोकरी वर लाथ मारून मराठा तरूणांनी या उपक्रमात सहभागी झालं पाहीजे. बाकिच्या जातींना आपण दाखवून देऊ कि प्रसंगी आपण देशोधडीला लागू, पण स्वाभिमान सोडणार नाही. हीच लढ्याची वेळ आहे. सोडा ते कमरेचं आणि बांधा डोक्याला !! उपसा ती तलवार !!! बाबा पाटील, आगे बढो जवान, सारा मराठा तुमच्या साथीला आहे !!!
8 Dec 2012 - 8:57 am | श्री गावसेना प्रमुख
8 Dec 2012 - 9:05 am | प्रचेतस
रायगडासारखा बुलंद दुर्ग असता इतर ठिकाणी महाराजांचे स्मारक करण्याची गरज काये?
राजांचे किल्ले व्यवस्थित राखणे हेच त्यांचे उचित स्मारक ठरावे.
8 Dec 2012 - 11:15 am | काळा पहाड
माफ करा मले, पन ते करायला काम करावं लागतं ना भौ. काम बिम कोन करनार म्हंतो मी. आनी या मधे टेंडर है, कॉन्ट्रॅक्ट है, मलिदा है. ते सोडून गड बिड दुरुस्त करायला काय आमी यडबंबू वाटलो काय तुमास्नी.
10 Dec 2012 - 12:00 pm | सुमीत
रायगडा सारखे बोलता इतिहास सांगणारे छत्रपतींचे स्मारक असताना करदात्यांचे करोडो रुपये कशाला बुडवायचे.
तोच पैसा आहेत ते गड किल्ले राखायला वापरावा.
आता इंदू मिल वरती स्मारक उभे करण्या साठी लागणारा पैसा कसा उभा करणार कि तो पण आपल्या सारख्या करदात्यांच्या खिशाला कात्री लावून ? असल्यास कुठे जाब विचारायचा?
8 Dec 2012 - 11:27 am | बाबा पाटील
उगच भंजाळ्यागत कर नका राव,मी आंबेडकरी जनता हा शब्द वापरालाय्,त्यात आंबेडकरांचे विचार मानणारे सगळेच येतात्,आपल्या घटनेच्या प्रस्तावनेत जे पहिलेच वाक्य आले आहे ते we the people of india हे एकच वाक्य मी प्रमाण मानतो,त्यामुळे त्यांचे विचार माणनार्यामध्ये मी देखिल आहे,त्यामुळे माझ्या पाटीलकीवर जाण्याचे काहीच कारण नाही,दुसरी गोष्ट मराठा हा हिकचा आणी तिकडचा कुठलाच नसतो,जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा,जो मराठी बोलतो तो मराठा,ज्याचे इमान या मातीशी आहे तो मराठा,जो शिवछत्रापतींचे विचार मानतो तो मराठा.बाकी ज्यांना जे समजायच आहे ते समजुन घ्या.
8 Dec 2012 - 2:05 pm | काळा पहाड
+१
8 Dec 2012 - 4:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आम्ही जन्मजात येडझवे आहोत म्हणून उठसूट जातीवर जातो. त्याला काही इलाज नाही, काय करणार ? Adjust करा थोडे..
10 Dec 2012 - 12:24 pm | बाळ सप्रे
पाटिलसाहेब..
तुमची मराठ्यांची आणि आंबेडकरी जनतेची उदात्त व्याख्या आवडली.. मला मराठा आणि आंबेडकरी असण्याचा अभिमानही आहे..
पण या व्याख्येत बसणारा मराठा सरकारने स्मारक न बनविल्यास पेटुन वगैरे उठेल असे वाटत नाही..
ते पेटुन उठणारे वेगळे बरं का.. त्यांची वेगळी व्याख्या करावी लागेल..
8 Dec 2012 - 2:03 pm | काळा पहाड
माझे स्वतःचे मत विचारले तर, असे स्मारक होउ नये असे आहे. कारण कि त्याने काहीही साध्य होणार नाही. महाराज बहुधा सगळ्यात पॉप्युलर व्यक्ती असावेत महारास्ट्रातले. ज्या माणसाने महारास्ट्राला स्वाभिमान दिला, त्याचे ऋण काहिही झाले तरी फिटणार नाहीत. पण याचा अर्थ असा नाही कि आपण त्यांचे फक्त पुतळे उभारून त्यांच्या विचारांना तिलांजली द्यावी. आपण अजूनही एक गरीब देश आहोत हे लक्षात ठेवायला हवं. महाराजांचा पुतळा आपण जरूर उभारू. पण केव्हा? जेव्हा प्रत्येक मुलाला दुध आणि प्रत्येक भारतीयाला अन्न देण्याची क्षमता आपल्यात येइल तेव्हा. सध्या तरी आपली ती लायकी नाही.
8 Dec 2012 - 6:31 pm | श्री गावसेना प्रमुख
बहुसंख्य समाजातले काही लोक स्वतला फार मोठे तत्ववेत्ता किंवा निधर्मी समजतात त्यापासुन खरा धोका आहे भारतीयांना
अखंड महाराष्ट्रातील समस्त बहुजनांना प्रेरणादायी ठरेल असे शिवस्मारक झालेच पाहीजे,
8 Dec 2012 - 9:39 pm | पैसा
महाराजांच्या नावाने करोडो रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा सगळे किल्ले स्वच्छ आणि नीट ठेवावेत आणि महाराज ज्या रयतेसाठी जगले त्या रयतेसाठी काहीतरी भरीव काम करावे.
9 Dec 2012 - 11:46 am | तिमा
स्मारक हे कुठल्याही समाजाच्या प्रगतीला मारक असते. कारण ज्याचे स्मारक होते, ती व्यक्ती सर्वात उत्तुंग समजली जाते आणि त्यामुळे त्याच्यापेक्षाही उत्तुंग किंवा मोठे बनण्याचा कोणी प्रयत्नच करत नाही. थोडक्यांत, प्रगतीचा आलेख त्या उत्तुंग बिंदुच्या वर कधीच जाऊ शकत नाही.
10 Dec 2012 - 12:05 pm | बॅटमॅन
असहमत. स्मारकाने तुम्ही म्हणता तसे झाल्याचे युरोपीय देशांत तरी दिसून येत नाही. अतिरेकी व्यक्तिपूजक भारतीय समाजाबद्दल म्हणायचे असेल तर अंशतः सहमत, पण मग तसे पाहिले तर रामायण-महाभारत ह ग्रंथ, राम-कृष्ण-भीम-अर्जुन आदि लोकांची स्मारकेच नव्हेत काय? इतकी वर्षे ती स्मारके असताना चंग्रगुप्त, शिवाजी जन्मलेच की.
तुमच्या म्हणण्याचा रोख लक्षात आला आणि त्याच्याशी सहमत आहे, परंतु प्रतिसादात सरसकटीकरणाचा वास आल्याने वरचा परिच्छेद लिहिला इतकेच.
10 Dec 2012 - 11:40 am | ऋषिकेश
त्या स्मारकावरचे राजकारण शिळे झाले.. सध्या दुसर्या एका स्मारकाच्या चिंतेत सगळे आहेत :)
10 Dec 2012 - 12:00 pm | चिरोटा
स्मारक,पुतळ्यांचे राजकारण ज्या राज्यांमधे केले जाते त्यात उत्तर प्रदेश नंतर म्हाराष्ट्राचा नंबर लागतो.असले इश्युज कधी शिळे होत नाहीत.त्याला ऊत द्यायचा असतो अधून मधून.२०१४ पर्यंत राजकिय पक्ष पुतळे,स्मारक,आतलेxबाहेरचे,मराठा xबिगर मराठा असल्या मुद्द्यांवरून लोकांना पेटवतील असा माझा अंदाज आहे.
10 Dec 2012 - 11:47 am | इरसाल
पहिल्या वर्षी त्याची स्वच्छ्ता राखली जाईल. हारतुरे, छ्त्रचामर स्वछः ठेवले जाईल मग पुढील वर्षापासुन त्या स्मारकातील पुतळ्याचे डोके कावळे, कबुतर यांच्या **साठी अर्पित केले जाईल व विशिष्ट दिवशी आठवण येवुन धुतील वगैरे वगैरे....
12 Dec 2012 - 11:06 pm | मस्त् राम
धागा उत्तम काढला आहे. एक राजकीय सूचना करावीशी वाटते, राज्याला एखादा "स्मारक मंत्री" असावा. बरीच स्मारके मार्गी लागतील आणि एक राजकारणी रोजगाराला लागेल कसे?
13 Dec 2012 - 12:00 am | विकास
मस्त सूचना!
13 Dec 2012 - 1:56 pm | बापू मामा
शिवरायांचे स्मारक खरे तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आहे. वेगळे स्मारक करण्याची गरज नाही.
त्या पेक्षा शिवाजी महाराजांच्या चरित्रांच्या प्रती नविन पिढीला मोफत किंवा सवलतीने द्या.
त्यांच्या स्फूर्तीदायक चरित्राचे दर्शन घडवण्यासाठी स्वतंत्र संस्कार सारखे चॅनेल चालवा. आंतरजालावर अधिक माहिती द्या.
13 Dec 2012 - 2:53 pm | दादा कोंडके
अजिबात नको. कुणितरी असंच मोफत दिलेलं 'नवा करार' आणि इस्कॉन कम्युनिटीचं कुठलसं पुस्तक परवा अक्षरशः रद्दीत टाकलं.