भीमाशंकर

नावात्_काय्_आहे's picture
नावात्_काय्_आहे in भटकंती
5 Dec 2012 - 4:13 pm

बारा जोतिर्लिंगापेकी एक , साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात या वेळेस भटकंतीला ( it means trak la ) कुठे जायचे याच्यावर विचार झाला , नि सर्वानुमते भीमाशंकर हे ठिकाण निश्चित करण्यात आले . ट्रेकची तारीख ठरली १ Dec 2012. जवाबदारीची वाटणी हि झाली .
ती खालील प्रमाणे :-
धीरज :- जेवण
समीर :- हिशोब
प्रतीक नि तुषार :- प्रवासाची व्यवस्था …

mail, meeting ,नाही ,हो अस करता करता शेवटी १८ सदस्य झालोत ….
१७ मुले + १ मुलगी ( not fair at all)
(नुसती मुलींची संख्या वाढवून नाही हो उपयोग ,त्यांना ट्रेक ला पण यायची सवय लावली पाहिजे )

असो सकाळी ६ वाजताच्या सिंहगड एक्सप्रेसने निघायचे ठरलं .
" ५.३० शार्प @ शिवाजी नगर " smiley

सगळ्यात शेवटी पोहोचणारा मीच म्हणजे ५.४० ला. तो पर्यंत सर्व पाहोचले होतो .
खर तर हा सुखद धक्का होता ….
एवढी वेळ कटीबद्धता पाहून मस्त वाटल .
Headcount , कोण रात्री किती वाजता झोपून लवकर कस उठले , नको नको त्या प्राण्यांनी ( इन्क्लुडींग GF) या सर्वानी कशी झोप मोड केली , इत्यादी इत्यादी कार्यक्रम पार पडले .

१ group photo पण झाला …
ट्रेन आल्यावर जागा कशी पकडायची ( किंवा बळकावयाची ,याची प्लानिंग पण झाली ) ..
खात्या 'पित्या' घराची पोर …. ती जागा पकडणारच ….
ट्रेन आली , जागा पकडली .

मग गाडीमधले सोपस्कार सुरु झालेत ,
जागे वरून होणारा दंगा , जागा मिळून हि दरवाज्यात बसण्याचा तो प्रकार .
चांगली मुलगी पाहून मुद्दाम केलेली fluttering ….... वगेरे वगेरे ….
तश्या नजरेत ' भरतील ' असा ३ ,४ पोरी डब्यात होत्या .

मग एकदाचा आमचा इ स्टाप आला.
कर्जत.....
कर्जत ला उतरून मग सकाळची न्याहारी ( मराठीत सांगायचं झाल तर breakfast ) करायला गेलो .
न्याहारीत कांदापोहे ( हॉटेलचे ) नि वडा सांबर होता .

तो आटोपून मग ट्रेकमधले सर्वात मोठे काम होते , ते रिक्षा वाल्यांशी घासाघीस करून खांडस ( base village ) पर्यंत रिक्षा ठरवणे .
पहिल्यांदा समीर नि प्रतीक पुढे गेले …
नंतर त्यात धीरज सामील झाला.

रिक्षा वाल्यांशी संवाद करून ' सामोपचाराने 'भाडे ठरेल ….
( भाडखाऊनी त्रास दिला ते सांगायला नको )

मग खांडस पर्यंत प्रवास चालू झाला .
रिक्षावाल्यांच्या पण . . ( टिंब टिंब ) प्रमाणे हद्दी असतात , हे त्यावेळेस समजले -)
त्या हद्दी वरून थोडा वाद झाला ….पण त्यांच्या भांडणात आमचा फायदा होऊन आंम्ही काठेवाडी पर्यंत
पोचलो . ( Thanks to Dhiraj smiley )

17 मावळे नी १ माऊली ,यांनी ट्रेक ला सुरुवात केली.
ऑफिसच्या थंड " गार " वातावरणात , खुर्चीवर बसून मजबूत झालेले त्यांचे शरीर ,
किबोर्ड वर टिचक्या मारून झालेले बलदंड बाहु ,

( सकाळचे १०.४५ मिनिटे .. )
अश्या मावळ्यानसाठी भीमाशंकर ट्रेक , रणरणत्या उन्हात करणे काही अवघड नाही .
( असो १ गोष्ट राहिली , ट्रेक चालू करण्यापूर्वी मुलांचा sun cream लावण्याचा कार्यक्रम पार पडला ) मग सुरुवात झाली ट्रेक ची ,
सुरवातीच रस्ता तसा सोप्पा होता ..
जाता जाता १ बोर्ड लागला ,जंगलात कोण कोण ते प्राणी आहे याचा .
त्यात बिबट्या , तरस , माकड इत्यादी इत्यादी निरुपद्रवी प्राण्याचा उल्लेख होता .

पण त्यामध्ये माणसासारख्या उपद्रवी नि घुसखोर प्राण्याचा उल्लेख नाही , हे पाहून वाईट वाटलं .
नंतर थोड चालल्यावर झाडी सुरु झाली , चढण पण कठीण झाली होती .
आणि अर्धा तास चालल्यावर आम्ही आमच्या पहिल्या पडावावर पोहचलो .

गणपती मंदिर ….
मंदिरात ताक पिऊन , पुढे सुरवात झाली .
तसा रस्ता थोडा कठीण आणि चढण्याचा होता , पण आजूबाजूला झाडी असल्यामुळे आणि ताजेतवाने असल्याने चढता येत होते.

काही वेळाने एका पठारावर आलो .
त्या पूर्वी २,४ सुकलेले धबधबे पार केलेत.
या दरम्यान १ प्रसंग झाला , पठारावर कोणीतरी रात्री पार्टी केली होती .
प्लास्टिक , कचरा , बियरच्या कॅनस ,प्लेटस वगेरे वगेरे पडल्या होत्या .
निसर्गात येऊन निसर्गाची एवढी अव्हेलाना.
सोटा घेऊन त्यांना अश्या जागेवर फटके मारले पाहिजे कि रोज सकाळी आठवण झाली पाहिजे .
असो , आम्ही कचरा आवरायला सरसावलो .नी १० मिनिटात तो सर्व कचरा आवरला गेला .
आता बॅगेसोबत कचऱ्याच्या हि पिशव्या घेऊन चालू लागलो .

हौशी मंडळी त्यांच्या कॅमेरातून स्थितःचित्रे ( means photos) काढत होती .
मस्त view दिसत होता . खाली छोटासा झरा होता , आजुबाजूची शेती , छोटी पण टुमदार घर आणि पुढे पठारावर असलेली घनदाट झाडी .
त्या झाडीतून चालत चालत थकवा निघून गेला , हो पण भूक लागली होती .
trek

trek1

चालत चालत जवळ जवळ २.३० तास झाले होते , मग १ कामचलाऊ झोपडीच्या इथे आम्ही " दुपारचा LUNCH "घेतला .
जेवणात मेथी पराठे , चटणी नी बटाट्याची भाजी , आणि भुकेल्या मावळ्यांनी ( Google suggested मवाल्यांनी ) सर्व संपवली .

trek3

trek2

त्यातच धीरज नी २ कविता ऐकवल्या .
( कवी लोकांना काय फुकट श्रोते मिळाले कि काय ते सुरु होतात smiley )
असो..४५ मिनिटे आराम करून ट्रेकिंगचा दुसरा टप्पा सुरु झाला .

त्या वेळेस बरोबर घडाळ्यात दुपारचे २.१५ वाजले होते .
पोट पुढे आलेल्या पोटात पोटभर ढकललं होत ,पण पुढची चढण पाहून पोटात गोळा आला .
भरीत भर ( खाणे नाही ) चढताना नावालाही सावली नाही , सूर्य डोक्यावर ,
अशी बिकट परिस्थितही आमची पावले आम्हाला घेऊन चढू लागली. smiley
साधरण बोटावर मोजून ,१० मिनिटे झाली असतील , नी सर्वांनी इ स्टाप घेतला .

पाणी हि तसं आता मोजकच उरल होत .
सर्वात वरती चढण्यात होते , समीर ( हवा का झोका ) and one & only the greatमृणाल.

त्या मागे हि बरीच मंडळी होती ,
क्रमाक्रमाने सर्व मंडळी जात होती , पण सर्वात शेवटी होता , विवेक the शर्मा .
' भारदस्त ' व्यक्तीमत्वाची , ' वजनदार ' असामी .

पंजाबदा पुत्तर भटीनडे दि शान ,
अपना विवेक यार्र !!!
तर विवेक नी धीरज सर्वात शेवटी .
विवेक दर ५ मिनिटांनी १० मिनिटे थांबत होता .
२ घोट पाणी म्हणून १/२ बाटली पाणी पित होता .
उन्हाने चेहरा लाल झाला होता ..
विवेकला घेऊन चढण्याची तुलना हि फक्त तोफ घेऊन गडावर चढण्याशी होऊ शकते .
अशातच काही सदस्य पुढे गेले होते .
रस्ता जरी डाव्या बाजूला जायचा असला तरी थोडस उजव्या अंगाला वरती , प्रतीक , भूषण नी तुषार दिसत होते .
थोड जवळ गेल्यावर समजल , नको त्या जागेची मस्ती त्यांना नडली होती , नी शॉटकट म्हणून ते तिकडे गेले .

आता पुढे जाणे अशक्य झाले लक्षात आल्यावर ते परत आले .
इकडे धीरजचा विवेकशी , नी विवेकचा स्व:ताशी संघर्ष चालू झाला .
शेवटी विवेक ने pen killer ( दुखाशामक गोळी ) घेऊन धीरज नी इतरांचा pain कमी केला .
कौशिक पण आता थकला होता , तरी तो चालत होता .
आता चढण संपून सरळ झाडीचा रस्ता लागल होता .
सूर्य पण डोंगराच्या दुसरया बाजूला गेल्यामुळे मस्त सावली आली होती .
समोरून काही गावकरी येत होती .
मंदिर किती दूर ? विचारल्यावर १० मिनिटे म्हटली ,
विवेकने ते ऐकून भारी dialog मारला " धीरज भाई ये १० मिनिट मतलब , गावावलोके १/२ घंटा है .
घंटा SS हम जल्दी पोहचणे वाले है !”
एकंदरी शेवटी घाम गाळात , थांबत ,चालत आम्ही वरती पहोचालो .
वरती पाण्याचे भारतात स्वच्छ म्हणता येईल अस तळं होत.
मंदिर ५ ते १० मिनिटे अंतरावर होते ….
( FB वरच वाक्य आहे , भारतात अंतर वेळेत मोजतात )
हात पाय धूऊन चालत चालत मंदिराच्या पायऱ्यानशी पोहचलो .
तेथे ओंकार , समीर नी प्रतीक होते , त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या शेवटी येणाऱ्यानसाठी आणून ठेवल्या होत्या . सोबत शोऐब नी लिओ पण होते .
( आमच्या इथले शंकर एहसान , लॉय म्हणजे " सिवा , शोऐब नी लिओ )
काही आस्तिक लोक देवळात गेली होती . काही तिथे माणसातल्या देवासाठी थांबली होती .
तो पर्यंत घड्याळ्यात ४.२० झाले होते .५ वाजता पुण्याला जायची बस पकडायची होती .
सो हळू हळू सर्व जमा होऊन ५ वाजे पर्यंत बस स्टाप वर गेलो .
सगळे fresh झालो , चहा , जुस , कणीस पोटात ढकलू लागलो .
काही लोक बेंचवर पहुडली , काही गप्पांचे फड रमले .

पण सर्वात आतापर्यंत सुंदर गोष्ट पाहायला मिळाली , तो म्हणजे सूर्यास्त .
क्षितिजावर होणारा सूर्यास्त , तो संधीप्रकाश , खाली दिसणारी ते डोंगर नी झाडी सर्व कस मंत्र मुग्ध करणारे . या निसर्गदेवते समोर काहींचे कॅमरे लवले तर काहींच्या माना .
संध्याकाळचे ६.१५ वाजले होते , ५ वाजताची बस अजून आली नव्हती .
तसा भारतीय " प्रमाण " वेळे नुसार पण एवढा ' वेळ ' नको व्हयला.

मग पुण्याला जाण्यासाठी दुसरे पर्याय शोधण्यास सुरुवात झाली .
पर्याय १ . भीमाशंकर वरून मंचर ला जायचे , व तिथून पुण्याला .
यात बरीच अनिश्चितता होती . १८ लोकांना वाहन मिळणे कठीण .

पर्याय २ .पुण्यासाठी थेट गाडी शोधणे .
तशी थेट गाडी मिळणे कठीण , परत १८ लोक . smiley
पर्याय ३. भिमाशंकरला मुक्काम करणे .
हा सर्वात शेवटचा पर्याय निवडण्यात आला.
पर्याय ४. परत रात्री उतरून खांडस ला जाणे . ( suggested by prateek )
ह्या पर्यायावर प्रतीक ला शिव्या टाकण्यात आल्या हे सांगायला नको .आणि पर्याय खारीज करण्यात आला.
अंधार दाटला होता नी लख्खं चांदण न्हाल होते .
खूप दिवसांनी ( रात्रीनी ) असं चांदणे पहिले होते .
रणरणत उन्हं , सावली , सूर्यास्त नी आता चांदण . निसर्ग हि माणसाच्या मनासारखंच असतो .

त्यातच १ गाडी भेटली . Direct पुण्या पर्यंत , पण त्यात १८ लोकं मावली नाही . smiley
उतरल्यावर दुरून मोठा Head light दिसला , आणि बस आली .
पण ती बस महामंडळाची नसून खाजगी होती .
त्यातून ' माल ' म्हणता येतील असा पोरी उतरल्या . (साधारण ३० एक पोरी असतील )
कोणीतरी "स्पाय" गिरी करून , माहिती मिळवली ,त्या पोरी night ट्रेकला आल्या होत्या .
त्यातच कोणीतरी आपणही " Night “ ट्रेक करावा असा सल्ला दिला .
आणि बहुतेक मुलांनी त्याला समर्थन दिले .
तितक्यात १ बस आली महामंडळाची , पण ती कल्याण साठी होती .
त्या बस ड्रायव्हर ने मागून पुण्याची बस येत आहे अस सांगितलं .
आणि शेवटी १५ मिनिटांनी पुण्याची बस आली , त्या वेळेस घडाळ्यात ०७.१५ मिनिटे झाली होती .पुन्हा जागा पकडण्याचे सोपस्कार झालेत आणि बस मध्ये आम्ही बसलो .

बस सुरु झाले , सर्व पेंगू लागली .
डोळे मिटले गेले.
खरच trek म्हणजे काय ?

नुसता डोंगरावर चढणे. का पाठीवर bag नी गळ्यात कॅमेरा लटकावून हिंडणे .
नाही , ट्रेकमुळे निसर्गाच्या जवळ गेलो. रेल्वेतून पाहिलेला खंडाळ्याचा घाट , टमटम मधून ( रिक्षा) पाहिलेले खांडस गाव . भर उन्हात चढताना अनुभवलेला डोंगर , अंगाला शांत करणारी सावली ,
झोपडीत घेतलेलं जेवण , एकमेकांची साथ देत गाठलेले शिखर , शंकरा पुढे नतमस्तक झालेले मस्तक , स्वच्छ पाहिलेले ते चांदणे , नी आता शांत मिटलेले डोळे.

सगळचं अद्वितीय !!!!
I always say , “Trek builds your character “
what say guys ?

धीरज भंडारे.
dhiraj.bhandare@gmail.com

प्रतिक्रिया

हा अनुभव मी ही ९३-९७ सलग पाच वर्षे घेतला आहे. पण आम्ही पहिल्या वा दुसर्‍या श्रावणी सोमवारी जायचो.
तेव्हा वर देवळाशी भलतीच गर्दी असायची.
श्रावणातल्या अधुन मधुन तुरळक पडणार्‍या पावसामुळे डोंगर चढता-उतरताना थकवा जाणवायचा नाही.
तेव्हा स्वत:चा कॅमेरा वैग्रे चंगळवाद फोफावला नसल्याने सगळा निसर्ग डोळ्यांनी कैद करुन मनाच्या एका कोपर्‍याद दडवून ठेवलाय. आज तो तुमच्या निमित्ताने बाहेर आला.
धन्स.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:13 pm | नावात्_काय्_आहे

हा ट्रेक पावसाळ्यासाठीच बनला आहे .
:-)
Thank you ….

हारुन शेख's picture

5 Dec 2012 - 4:43 pm | हारुन शेख

मिश्कील लेखनशैली. वृतांत आवडला. फोटो पण टाका खुमारी अजून वाढेल लेखनाची.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:14 pm | नावात्_काय्_आहे

धन्यवाद .
उद्या नक्की फोटो टाकतो सर .

छान ट्रेक केला म्हणायचा ...

आनखिन एक रात्र थांबुन मज्जा करुन सकाळी फिरता आले असते.

बाकी सरळ सरळ वृत्तांत आवडला हे वेगळे सांगावयास नको.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:15 pm | नावात्_काय्_आहे

thank you Ganesh ..
ओळखल असेलच मला तू ?

चौकटराजा's picture

5 Dec 2012 - 5:18 pm | चौकटराजा

मस्त मिश्कील शैली. ओघवत्या मुक्तछंद कवितेची ही शैली.मला तर लई मजा आली. मी अनेक वर्षापूर्वी जमीनीला तोंड लावून मीमाशंकरला पाणी प्यालो. ( भर पावसाळ्यात मस्त आकाशात पतितं तोयं असे होते.) त्याची आठवण झाली. बाकी तुम्ही तिथेच मुक्काम करून त्या दुसर्‍या कळपाबरोबर काय क्याम्पफायर काय ते केल्याचा कार्यक्रम आला असता ना मंग आनखी मजा आली आसती राव !

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:17 pm | नावात्_काय्_आहे

हा हा हा ….

लंकेवर लाख सोन्याच्या विटा आहे …
पण त्याचा मालक वेगळा .
आपण फक्त तारीफ करावी .

Thanks for ur appreciation .

बॅटमॅन's picture

5 Dec 2012 - 5:44 pm | बॅटमॅन

लेखनशैली विशेष आवडली.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:18 pm | नावात्_काय्_आहे

Thank you sir...

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 6:18 pm | मालोजीराव

फोटू टाकले असते तर अजून फक्कड जमला असता लेख !

लेखनशैली थोडीथोडी 'आमचा पक्ष पोरींवर लक्ष' टाईप वाटली ;)

पु.ले.शु.

लेखनशैली थोडीथोडी 'आमचा पक्ष पोरींवर लक्ष' टाईप वाटली ;)

त्यामुळेच मसाला नीट जमलाये खरे तर :D

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:25 pm | नावात्_काय्_आहे

सामान्य लोकं , सामान्य लोकांसार्खाच वर्तन असणार …..

:-) पण आपण ही जे पाहिजे तेच वाचले वाटतं . :-)

Thanks sir ...

लिखाणाच्या बाबतीत 'लेखनशैली थोडीथोडी 'आमचा पक्ष पोरींवर लक्ष' टाईप वाटल'' मालोजीरावांशी सहमत. पोरींबद्दलचे उल्लेख टाळता आले असते तर जास्त छान वाटलं असतं.

पुढच्या ट्रेकला अजुन जास्त माउली आणि त्यांच्या माउली येतील या साठी शुभेच्छा.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:40 pm | नावात्_काय्_आहे

जे घडल आहे ते लिहील आहे .
ताकाला जाऊन भांडे काय लपवायचे ?

आपला सल्ला नक्की लक्षात ठेवून पुढे प्रामाणिकपणे उलेख टाळण्याचा प्रयत्न करेन .

आपला आभारी आहे .

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 6:54 pm | मालोजीराव

कृपया ताक आणि भांडे यांचा उल्लेख करू नये ! मिपावर ताक आणि भांड्याची मालकी फक्त दोनच मिपाकरांकडे आहे

:P

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 6:57 pm | नावात्_काय्_आहे

मिपावर नवीन आहे सांभाळून घ्या . :-)

मिपावर बहुदा ताक आणि भांडे हे शब्द एका स्ट्रिंगमध्ये आल्यास थंडी पडुन गोठण्याची प्रक्रिया सुरु होते अशी एक कन्स परेसि थेरी आहे.

साहेब प्लेट या खाऊन झाल्यवर उचलुन घेऊन जायच्या असतात .
तुम्ही सोन न्या किंवा ७ /१२ चे उतारे , फक्त कचर तिथे न टाकता परत आणून कचरा पेटीत टाका .
( आता कृपया कचरा पेटी तिथे लावा हा मोलाचा सल्ला देऊ नका ) .
तुम्ही खाणारे असाल , त्यावरच तर हॉटेलवाल्यांची ' चंगळ ‘ होते .
तुमच्या सारखे सुज्ञान नागरिक स्वतची जवाबदारी समजतात .

तिमा's picture

5 Dec 2012 - 7:08 pm | तिमा

तुमच्या वर्णनावरुन तुम्ही खांडस मार्गे 'गणपतीघाटाने' गेलात, हे स्पष्ट होते. या घाटात पहिल्या अर्ध्या चढावापर्यंत वारा लागतो. पुढच्या अर्ध्या चढात वारा बिलकुल लागत नाही, त्यामुळे थकायला होते.
ट्रेकिंग करताना एक अलिखित नियम आहे की ढसाढसा पाणी पिऊ नये. अगदी गरज भासलीच तर फक्त एखादा घोट पाणी प्यावे. मग वर गेल्यावर प्या पाहिजे तितके पाणी!
तुम्ही मुक्काम केला नाहीत म्हणजे तुम्ही भीमाशंकर पूर्ण पाहिलेच नाहीत. शेकरु, ही मोठी खारोटी पहायलाच हवी. पुढच्या वेळेस मुक्कामाचा बेत करा.

धन्यवाद , आम्ही या पूर्वी शिडी घाट नि गणपती घाट या दोघी वाटेनी गेलो आहोत .
साधारणतः मागील ६ वर्ष पासून आम्ही ट्रेक करत आहोत .
पण एकंदरीत नवीन सदस्यांची संख्या पाहता आम्ही गणपती घाटाचा रस्ता घेतला .

मालोजीराव's picture

5 Dec 2012 - 9:37 pm | मालोजीराव

गोरखगड-मच्छिंद्रगड-सिद्धगड-भीमाशंकर ....अप्रतिम ट्रेक आहे जमल्यास नक्की करा !
त्यातला सिद्धगडवाडी परिसर डोळ्यांचे पारणे फेडणारा,सह्याद्रीच्या कड्यावर वसलेल सुंदर टुमदार गाव

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 10:40 pm | नावात्_काय्_आहे

I I SIR .

On card....

सस्नेह's picture

5 Dec 2012 - 9:51 pm | सस्नेह

छान वर्णन व लेखनशैली.
फोटो टाकले असते तर आणखी काही मार्क दिले असते.

नावात्_काय्_आहे's picture

5 Dec 2012 - 10:41 pm | नावात्_काय्_आहे

Thanks a lot ...

फोटो टाकतो उद्या....

मोदक's picture

6 Dec 2012 - 12:00 am | मोदक

फोटो टाका राव.

हा ट्रेक करायचे लै दिवस ठरले आहे - बघू कधी जमते ते..

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 12:45 am | नावात्_काय्_आहे

कधी जायचं सांग.
हडसर नि चावधान night trek plan करतोय .
कळवतो तुला .

चावंड म्हणायचे आहे का?

की माझा उच्चार चुकतो आहे?

संजय क्षीरसागर's picture

6 Dec 2012 - 12:16 am | संजय क्षीरसागर

या वयात पोरींवर लक्ष नसेल तर नक्कीच केमीकल लोच्या आहे. असंच सहज आणि प्रामाणिकपणे लिहित रहा.

ज्यांच्या आयुष्यातला रोमान्स संपला त्यांनी आपलं वय झालं म्हणून समजावं. इथे आमचे चौरा बघ,

बाकी तुम्ही तिथेच मुक्काम करून त्या दुसर्‍या कळपाबरोबर काय क्याम्पफायर काय ते केल्याचा कार्यक्रम आला असता ना मंग आनखी मजा आली आसती राव !

नाईटट्रेक का नाही केला विचारतायत! इसको बोल्ते है जिंदादिली.

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 12:50 am | नावात्_काय्_आहे

thank you sir .. :-)
पुलनचे १ वाक्य आहे , शरीराला जशी कुबड तसी मनाला हि कुबड आलेली माणसे असतात .
तस काही मिपाकरांचे झाले आहे .
असो , thanks for your supprting word.

अर्धवटराव's picture

6 Dec 2012 - 1:28 pm | अर्धवटराव

>> शरीराला जशी कुबड तसी मनाला हि कुबड आलेली माणसे असतात .
मिपावर नवे आहात म्हणताय ना तुम्ही. मिपाकरांबद्दल अशी शेरेबाजी टाळा ( त्याकरता पात्रतेच्या काहि विषेश परिक्षा द्यायला लागतात :) ). मुलींचा उल्लेख ( ज्याला कोणाला ) अवास्तव वाटण्याचे कारण तुमच्या ट्रेकच्या वर्णनाच्या रंगाशी ते सुसंगत नाहि. निसर्गसौंदर्य, स्त्रीसौंदर्य, मदीरास्वाद... अशा अनेक भन्नाट चवींच्या कॉकटेल्सचे महापुर वाहातात मिपावर. उगाच मनाच्या कुबडेपणाचे आरोप करु नका.

बाकी ट्रेकवर्णन छान झालय.

अर्धवटराव

गणपा's picture

6 Dec 2012 - 2:58 pm | गणपा

+१ टू अर्धवटराव.

+१, टु अर्धवटराव आणि गणपाभौ..

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 6:02 pm | नावात्_काय्_आहे

I LOVE CRITICS …
:-)

Thank you guys......

सुहास झेले's picture

6 Dec 2012 - 12:22 am | सुहास झेले

मोदकराव मला पण संगतीला घेऊन चला ;-)

बाकी भटकंती आवडली, पण फोटोंची कमतरता आहे.... :)

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 12:50 am | नावात्_काय्_आहे

फोटो टाकतो उद्या.... :-)

नितिन काळदेवकर's picture

6 Dec 2012 - 9:51 am | नितिन काळदेवकर

फोटो असते तर बरे झाले असते. प्रवास वर्णन उत्तम. ट्रेकिंगसाठी नाकं मुरडणार्‍यांना जोश निर्माण होईल. पूर्वी आम्ही दर वर्षी हा ट्रेक करायचो. कर्जतला संध्याकाळी ५.२० ची गाडी पकडून(मुंबईवरून)जायचो आणि खांडसला विठठ्ल रखुमाईच्या मंदिरात मुक्काम करायचो.सकाळी लवकर उठून ट्रेकला सुरवात करायचो. सकाळी लवकर डोंगर चढायला सुरवात केली तर उन्हं लागत नाही कारण सूर्य पलिकडे असतो. त्यामुळे दमछाक होत नाही.
एक गोष्ट समजली नाही तुम्ही सुर्यास्त बघायला नागफणीला गेला होतात कां ? कारण नागफणीवरुनच सुर्यास्त सुंदर दिसतो,

चौकटराजा's picture

6 Dec 2012 - 10:24 am | चौकटराजा

ही नागफणी भीमाशंकरची का ? असल्यास जिथून खाली पाहिले की पोटात गोळा येतो ती जागा का ?

नितिन काळदेवकर's picture

6 Dec 2012 - 12:45 pm | नितिन काळदेवकर

होय भीमाशंकरचे सर्वात उंच ठिकाण जिथून सुर्यास्त सुंदर दिसतो.

सूर्यास्त नागफणीवरून नाही पहिला .
आणि हो तुम्ही सुचवलेला प्लान एकदम मस्त आहे.
पुढच्या वेळेस नक्की त्याच प्लानने जातो .

Thank you.

मृत्युन्जय's picture

6 Dec 2012 - 10:39 am | मृत्युन्जय

लेखनशैली आवडली. खुलवुन लिहिले आहे. फटु असले असते तर बहार आली असती. लेख छानच जमला आहे. पण .......

त्यातून ' माल ' म्हणता येतील असा पोरी उतरल्या

वरच्यासारखे काही उल्लेख टाळले असते तर चालले असते. ताकाला जाउन भांडे लपवण्यात काय हशील हे जरी खरे असले तरी आंजावर लिहिताना काही समाजनियम पाळावेत असे वाटते. वरील वाक्य विशेषतः खुप हिणकस वाटले. कॉलेजकुमारांचा कट्टा आणि मिपा यात थोडा फरक आहे याचे भान असणे आवश्यक आहे.

असो. लेख चांगला जमला असल्याने आणि मिपावर नविनच आहे म्हणत आहात तर एवढे नक्कीच क्षम्य असावे. पुलेशु.

मृतुंजय धन्यवाद ..
आभारी आहे .
दिलेली " सूचनेच्या " अनुषंगाने पुढचे लेख लिहिण्यात येतील .

त्यातून " माल ' पोरी उतरल्या म्हणायच्या एवजी त्यात्यून " सुंदर वजा सोज्वळ " मुली उतरल्या .
:-)
शेवटी वाघ म्हंटल काय नि वाघ्या म्हंटल काय ? :-)

असो अभिप्रायाबद्दल पुन्हा १दा आभारी आहे .

मालोजीराव's picture

6 Dec 2012 - 2:12 pm | मालोजीराव

एखाद्या सुंदर मुलीच्या बापाला 'तुमची कन्या फार सुंदर आणि सोज्वळ आहे हो ' असं म्हणण्याऐवजी
'तुझी पोरगी एकदम माल आहे रे ' असा म्हणून पहा बरं !

त्या पोरीच्या बापाने दिलेल्या 'प्रतिसादातून' वाघ आणि वाघ्यातला फरक कळेलच...कसे ;)

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

उत्तम प्रवास वर्णन. फटू कुठे आहेत ?

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद परा
फोटो उद्या टाकतो.

फोटोत_काय_आहे

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद.
मिपावर नविन आहे फक्त सातच महिने झालेत. संभाळून घ्या.

मिपात_काय_आहे

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:54 am | परिकथेतील राजकुमार

खिडकीत बसून शुक शुकला काय भ्यायचे ? जे विचार केले ते तसेच लिहिले. लाजायचे काय ?

शरमेत_काय_आहे

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

पण तुमच्या लेखावरती तुमच्याच प्रतिक्रिया जास्त दिसत आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2012 - 11:55 am | परिकथेतील राजकुमार

लिहायलाच आल्यावरती लिहायला काय लाजायचे ?

फाटक्यात_पाय्_आहे

माझ्या नंतर प्रतिकिया देण्यात तुमचाच क्रमांक आहे .

असो , आम्ही फक्त येणाऱ्या प्रतीकीयाना "पोहोच'पावती " देत असल्या मुळे आमच्या प्रतिकिया जास्त आहे .

असो राहिला ७ महिन्याचा प्रश्न ..
हा खाते उघडण्याची निविदा पाठवली त्या दिवसां पासून आहे .

बाकी तसं मी आता आताच २ आठवड्या पासून इथे आहे . :-)

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2012 - 3:26 pm | अत्रुप्त आत्मा

@आम्ही फक्त येणाऱ्या प्रतीकीयाना "पोहोच'पावती " देत असल्या मुळे आमच्या प्रतिकिया जास्त आहे .>>>पाव्हनं,,, त्या सगळ्या पोहोच पावत्या दोन दिवस थांबून एकाच प्रतिसादात देत चला या पुढे,,,म्हणजे घेणार्‍यांना पोहोचतील,आणी तुंम्हालाही भरून पावतील.

नावात्_काय्_आहे's picture

6 Dec 2012 - 6:01 pm | नावात्_काय्_आहे

भा पो ...

चेतन माने's picture

6 Dec 2012 - 1:00 pm | चेतन माने

वर्णन एकदम मस्त, सरळ सरळ लिखाण आवडले
अवांतर: प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. काही उत्तरं गुलदस्त्यात ठेवण्यातच मज्जा असते
आणि पराशेठ्च्या प्रतिक्रियांनी तर हहपुवा झालीये :D :D :D

ह भ प's picture

6 Dec 2012 - 3:08 pm | ह भ प

नावात्_काय्_आहे साहेब..
सर्वांसारखंच मी पण म्हणतो.. 'फटू पायजे व्हते राव..'

प्राध्यापक's picture

6 Dec 2012 - 8:20 pm | प्राध्यापक

मित्रा,लेख मस्तच लिहलायस,भिमाशंकरच्या परिसरात आणखी एक दुर्लक्षीत ट्रेक आहे,आहुपे गाव ते भिमाशंकर हा २० किलोमीटर अंतराचा ट्रेक आहे.संपुर्ण रस्ता घनदाट जंगलातुन जातो,जमल्यास करुन पहा,मी १९९७ मधे केला होता.

नितिन काळदेवकर's picture

7 Dec 2012 - 9:26 am | नितिन काळदेवकर

आहुपे गाव ते भिमाशंकर याबद्द्ल आणखी माहिती मिळाल्यास उत्तम. उदा कोठून निघायचे,कोणती गाडी पकडायची इत्यादी.

प्राध्यापक's picture

7 Dec 2012 - 4:06 pm | प्राध्यापक

नितीन, आहुपे गावाला जाण्यासाठी घोडेगाव येथुन सायंकाळी ४ वाजता आहुपे मुक्कामी बस निघते,साधारण ८ वाजेपर्यंत बस तिथे पोहचते,रात्री तिथेच मुक्काम करायचा,(आम्ही बस मधेच मुक्काम केला होता,कारण तिथे मुक्कामाची कसलीहि सोय नाही,मात्र तेथील गावकरी मात्र आतिथ्यशील आहेत.)सायंकाळचा डबा घेऊन जा.आणी सकाळी ट्रेक ला सुरुवात करा,सुरुवातीचे २/३ किलोमीटर गावातील कोणीतरी रस्ता दाखवायला येइल,पुढचा प्रवास मात्र वाडया वस्त्या वरुन विचारत करावा,करावा,प्रचंड कष्टाचा आहे,मात्र निसर्ग अप्रतीम्,शब्दात मांडण अवघड्, रस्त्यामधे एकवेळ पाणी मागीतल तर मिळणार नाही, मात्र अतिशय मधुर ताक आणी मलइदार दही मात्र मिळेल.

काही हरवत नाही तर ती जत्रा कसली ?वेळेवर येऊन उभी राहात नाही ती बस नव्हे ,चुकत नाही ती वाट कशी ? भरकटत नाही ते मन कसे ?पाय दुखत नाही ती पायपिट कशी ? काही फजिति झाली नाही तर ती भटकंती कसली ? मित्रा असेच बिनधास्त लिहित राहा .