गाण्याचे व चालीचे इस्लामी करण.
हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे गाण्यांचे झपाट्याने चाललेले इस्लामी करण...
पुर्विच्या गाण्यात गावाताल्या छो~या "रामा रामा गजब हुइ गवारे" म्हणत थिरकताना दिसत.
मात्र हल्ली रामा रामा शब्द जाऊन मौला.अल्ला..बंदा हुजुर...गरीब नवाज..खुदा ...असे शब्द व कव्वाली टाईप चाली वा सुफी चाली जास्त दिसतात असे निरिक्षण आहे..व त्या वर नाचणा~या नायिका...
राक स्तार सिनेमच्या जाहिराति बघताना असो वा खान कंपनीचे सारेच सिनेमे असो वा इतर सिनेमे असो हे जादाच जाणवते...
रेहमान बद्दल असे ऐकिवात आहे कि तो हिंदुच्या पवित्र गीता वा त्या प्रकारच्या गाण्याना चाली लवणार होता पण त्याची आई कट्टर असल्याने तिने काफर च्या देवाची गाणी म्हणण्यास ना पसंती दाखविली व त्या मुळे तो बेत क्यान्सल केला गेला असे फेबु वा एका साइत वर वाचल्याचे आठवते...
गाण्याचे व चालीचे इस्लामी करण.
गाभा:
प्रतिक्रिया
2 Dec 2012 - 12:26 pm | रणजित चितळे
बरोबर पण मला हे कोणी ठरवून करत असेल असे वाटत नाही. त्यामुळे काळजीचे कारण नसावे असे आता तरी वाटते
2 Dec 2012 - 12:36 pm | जानु
काही काळापुरता प्रभाव असतो. सातत्य असल्यास विचार करावा. र.चि. ना १+
2 Dec 2012 - 12:36 pm | श्री गावसेना प्रमुख
त्यांनी रामा किंवा तत्सम बोल घेतले तरी ते विचीत्र पद्धतीने घेतल्याने(कॅरेक्टर ढिला वैगरे) वाद होतात्,त्यामुळे ते नसलेलेच चांगले.
2 Dec 2012 - 12:40 pm | सस्नेह
पूर्वी तर अल्ला-मौला गाणी खूप होती.
'याल्ला याल्ला दिल ले गयी'
'अल्ला तेरो नाम'
बेकस पे करम्..सरकारे मदीना'
तेरे प्यारमे..अल्ला देख रहा है'
इफ्तदाये इश्कमे हम्..अल्ला जाने क्या होगा आगे'
आणखीहि बरीच.
त्या मानाने आता कमीच आहेत...
2 Dec 2012 - 1:10 pm | चौकटराजा
अल्ला मेरी तौबा अल्ला मेरी तौबा
अल्ला बचाये नौजवानोसे
8 Dec 2012 - 2:26 pm | विजुभाऊ
याच्या उलट देखील झालेले आहे.
उदा:दम मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर....... हे मूळ भक्तीगीत होते त्याचे "तू चीज बडी है मस्त मस्त" असले बाजारू गीत झाले. तसेच " मेरा पिया घर आया" हे विरह गीत होते त्याचे डान्स गीत झाले आहे.
2 Dec 2012 - 1:01 pm | संजय क्षीरसागर
सगळं मनातलं एकदाच काय ते व्यवस्थित उतरवून मग काय तो ग्रंथ प्रकाशित करावा यासाठी ही डायरी सप्रेम.
2 Dec 2012 - 10:25 pm | बॅटमॅन
+११११११११११११११
2 Dec 2012 - 5:57 pm | किसन शिंदे
इफ आय अॅम नाॅट राँग, तुम्ही ह्याच विषयावर या आधीही एक धागा काढला होतात.
2 Dec 2012 - 6:04 pm | दादा कोंडके
हो ना. तरी या शिंच्या गीतकारांवर त्याचा काहीही फरक पडलेला नाही त्यामुळे रागाउन त्यांनी आता दुसरा धागा उसवलाय काढलाय. :)
2 Dec 2012 - 6:21 pm | नितिन थत्ते
मला तर उलट भारत म्हणजे फक्त पंजाबच असं वाटण्याची परिस्थिती दिसते.
2 Dec 2012 - 7:32 pm | आनंदी गोपाळ
चिच्चांशी बाडिस
2 Dec 2012 - 10:27 pm | बॅटमॅन
अगदी मनातलं बोल्लात थत्तेचाचा!!!!!!!!!!!!!!
3 Dec 2012 - 4:50 pm | ऋषिकेश
पंजाब+मुंबई+दिल्ली+कोलकाता+ वाई इथे(च) भारत संपतो :) (पूर्वी शिनशिनरीसाट्।ई काश्मिर असायचे त्याचे आता आऊटसोर्सिंग युरोपात झालेले आहे)
3 Dec 2012 - 4:58 pm | गवि
अहो टीव्ही कमी बघता का तुम्ही? आता घरातल्या घरातही नथीपैठण्या घालून :
"मैं आत्या की सारी चालें समझती हूं.."
किंवा
"आई, तुमने तो कमाल का पांसा फेका है.."
किंवा
"इश्श सासूबाई, मेरेलिये रसोईमें बहुत काम पडे है.. मैं तात्यासाहेब के लिये खाना परोसती हूं.."
अशी "फक्त संबोधनं मराठी वापरणारा" एक नवा ब्रँड किंवा व्हेरियंट टीव्हीवरच्या सिरियलांत नाही का पाहिलात?
3 Dec 2012 - 6:12 pm | बॅटमॅन
मान्य, पण हे प्रमाण फक्त टीव्ही सीरियल्समध्ये जास्त आहे. मोठ्ठ्या पिच्चरांत लय कमीये. शिवाय मराठीकरण हे लोवर क्लासद्वारे जास्तकरून प्रोजेक्ट केले जाते-याला अपवाद इंग्लिश-विंग्लिश, चिंगम, इ.इ. काही पिच्चर. पण इंग्लिश-विंग्लिश मध्ये देखील गोडबोले नामक पुणेकर गृहस्थ राजमा-चावल मिटक्या मारून खातोय आणि वर त्याची आठवण काढतोय असे जे दाखवलेय ते पाहून एक मिपाकर म्हणून डॉळे पाणावून वाहू लागले.
तुलनेने पंजाबीकरण हे कितीतरी अधिक सर्वव्यापी आहे-किती म्हणून उदाहरणे द्यावीत ती थोडीच आहेत :)
3 Dec 2012 - 6:44 pm | चिरोटा
बाजीराव सिंघम 'मराठा हू मै मराठा' म्हणतो. नाव बाजीराव असले तरी नायिका त्याला सिंघम म्हणत असते.
2 Dec 2012 - 10:01 pm | आळश्यांचा राजा
उस्ताद राशीद खानांनी गायलेली भक्तीपूर्ण भजने मला फार आवडतात. हे मीरा भजन तर विशेष.
8 Dec 2012 - 2:55 am | काळा पहाड
प्रचंड आभार
2 Dec 2012 - 11:02 pm | सुहास
तसं आपल्याला या धाग्यात काहीच दम वाटत नाही, पण फक्त ए. आर. रहमानचे नाव ते ही वाईट दृष्टीकोनातून आल्याने एक पिंक टाकतो. संगीतकाराचा गाण्यातल्या म्युझिकशिवाय गाण्यात कुठेही संबंध नसतो, गाण्यात अल्ला घालायचे की भगवान घालायचे की आणखी काही घालायचे हे संगीतकाराने बांधलेली चाल (मीटर) बघून गीतकार ठरवत असतो. बॉलिवूड मधला ट्रेंड बघता इथे मुस्लिम गीतकार जास्त आहेत हेही धागाकर्त्यांनी ध्यानात घ्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे संगीताला (म्युझिकला) कोणत्याही धर्माशी जोडू नका. कव्वाली आणि सुफी चालीचे म्युझिक आले की मुसलमानी म्युझिक आले असे जर तुम्हास वाटत असेल तर अवघड आहे.
बाकी फेसबुकवरचे जर १००% खरे असते आणि लोकांनी त्यावर विश्वास ठेवला असता तर जग आजपर्यंत किमान ५० वेळा तरी नष्ट झाले असते.
--सुहास
2 Dec 2012 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा
++++++++++११११११११११११११११११११११
3 Dec 2012 - 12:23 am | जेनी...
+१
सुहास एकदम सहमत.
बाकि अविकां ची जुनी स्टायिल आहे हि .
विषय काढुन पळुन जायचे . आता ते धाग्याकडे फिरकणारहि नाहित
त्यामुळे मग आपणच आपली मतं मांडत बसायचा जाम कण्टाळा येतो
ते नुसते लांबुन मज्जा बघतात :-/
3 Dec 2012 - 12:01 pm | रामदास
आयडीमध्ये कु दिसला की पळून जावे असे धोरण तूर्तास मी स्विकारले आहे.
3 Dec 2012 - 12:25 am | अर्धवटराव
.
अर्धवटराव
3 Dec 2012 - 4:05 pm | पियुशा
+++++११११११११११११११११११११११११११११११ टु सूहास
प्लिज निदान संगिताला (म्युझिकला ) कुठ्ल्याही धर्माशी / देशाशी /पंथाशी जोडु नका
3 Dec 2012 - 6:25 pm | चिरोटा
खरे तसे असायला हवे पण संगिताचा वरील कशाशीही संबंध नसतो हे समजणे भाबडेपणाचे ठरेल.सध्याच्या काळात संगीत काय वा कुठलिही कला,पद्धतशीर मार्केटिंग केले जाते.मोठे आर्थिक् व्यवहार,कुठलातरी मोठे संगीत कंपू,गुरु, ह्यामागे असतातं. बॉलिवूडमधल्या अनेक गीतकारांना हल्ली विशिष्ट पंथिय शब्दच जास्त का सुचावेत हा अकु ह्यांचा प्रश्न आहे.व्यक्तिशः मला त्यात धर्माचा संबध वाटत नसून 'माल जास्त खपतो म्हणून बनवला जातो' असे वाटते.
2 Dec 2012 - 11:37 pm | क्लिंटन
"मधुबन मे राधिका नाचे रे गिरीधर की मुरलिया बाजे रे" हे गाणे महंमद रफींनीच गायले आहे ना?
3 Dec 2012 - 2:14 am | राही
बैजु बावरातली सगळी भजने, जोगन, तानसेन,आस्तिक वगैरेतली गाणी,कृष्णावरची सगळी गाणी,राधा,मीरा वगैरेंची गाणी इ.इ.
3 Dec 2012 - 6:21 pm | विकास
ते गाणे सैगल/मन्ना डे/महेंद्र कपूर/मुकेश यांना का म्हणायला दिले नाही? ;)
असो, चर्चेचे वर्गिकरण "विरंगुळा" मधे करायचे राहीले असावे असे वाटते.
3 Dec 2012 - 3:42 am | हारुन शेख
धागा अर्थात उथळ. प्रतिक्रियांचे कौतुक :)
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
3 Dec 2012 - 11:53 am | पैसा
धाग्याचे नाव पाहून उघडावा असेही वाटले नव्हते. पण शेवटी बघितला. अकुंकडून अपेक्षित धागा. रहावत नाही म्हणून रेहमानबद्दल ४ शब्द खरडतेच. लगान सिनेमातालं "ओ पालनहारे" आणि "मधुबन में जो कन्हय्या" ही गाणी कोणी संगीत दिलेली आहेत हो? या सिनेमाचा निर्माता/अभिनेता कोण आहे हो? सांगायची गरज आहे का? आणि रेहमानचा "वंदे मातरम" अल्बम कसा विसरलात?
3 Dec 2012 - 12:14 pm | गवि
काय करणार.. डूटी..
असंच ना? ;)
6 Dec 2012 - 1:06 pm | किसन शिंदे
सहमत!
याच परंपरेतलं जोधा अकबरमधलं बेला शेंडेने गायलेलं "मनमोहना" विसरून कसं चालेल?
3 Dec 2012 - 3:18 pm | चिरोटा
ह्यामागे ईस्लामीकरण वगैरे नसून सुफी/बंदा/मौला वगैरे बॉलिवूडमध्ये unexplored territories आहेत.पूर्वीच्या काळात थोडीफार गाणी असतीलही पण सध्या असल्या गाण्यांना चलती आहे.
अजीर्ण होईपर्यंत गोष्टी ताणणे हा बॉलिवूडचा स्वभावधर्म आहे.
3 Dec 2012 - 3:31 pm | llपुण्याचे पेशवेll
धागाकर्त्यांच्या भावनांशी सहमत आहे. इस्लामचे उदात्तीकरण सरसकट सर्वत्र चाललेले दिसत आहे. गाण्यांमधे तर असे शब्द मुद्दाम येताना दिसतात.
बाकी मांजर बनून डोळे मिटून दूध प्यायचे का हे आपले आपण ठरवावे.
3 Dec 2012 - 4:50 pm | पिंगू
सहमत आहे. नाहीतरी आजकाल बॉलीवूडमध्ये पंजाबी सूफी संगीताचा प्रभाव जरा जास्तच होत आहे.
- पिंगू
6 Dec 2012 - 9:55 am | पुण्याचे वटवाघूळ
गाणे ऐकताना त्यातला अर्थ, शब्दांचे सामर्थ्य आणि अर्थातच आवाज (तो आपल्या हृदयाला किती भिडतो) आणि संगीत याच गोष्टी बघाव्यात. गाणारा/संगीत देणारा कोणत्या धर्माचा आहे, त्यात राम आहे की मौला/खुदा (माझ्यासाठी दोन्हींमध्ये फरक नाही) हे बघू नये असे मला वाटते. मला जसा किशोर कुमार/ मन्ना डे/हेमंत कुमार आवडतात त्याचप्रमाणे महंमद रफी/तलत आझीझ हे पण आवडतात. इतकेच काय तर मला जगजीतची काही गाणी आवडतात तशीच गुलाम अली/मेहदी हसनचीही गाणी आवडतात.
आणि हो.चुपके चुपके ऐकावे ते गुलाम अलीचेच. जगजीत सिंगच्या चुपके चुपकेमध्ये गुलाम अलीच्या चुपके चुपके च्या नखाचीही सर नाही असे मला वाटते.पण तसे वाटायचे कारण म्हणजे गायकांचा धर्म नसून कोणाचा आवाज हृदयाला अधिक भिडतो हे महत्वाचे. तेव्हा नको तिथे धर्म घुसडू नये ही विनंती.
6 Dec 2012 - 10:16 am | गवि
परफेक्ट.
हिंदू संगीत संस्कृतीइतकीच मुस्लिम संगीत / कला संस्कृतीही परंपरेने डेव्हलप झाली आहे. कितीतरी खांसाहेब गुरुशिष्य परंपरेत प्रसिद्ध आहेत. अशा खांसाहेबांचे , उस्तादांचे शिष्य हे सर्वधर्मीय आहेत.
प्रगल्भ विकसित अशा संगीतपद्धतीचा प्रभाव व्यावसायिक संगीतावरही पडणं म्हणजे मुस्लिम किंवा तत्सम प्रभाव वाढवण्याचं षडयंत्र असं का वाटून घ्यावं?
संगीत, खेळ, नृत्य, एकूण वेगवेगळी कलाक्षेत्रं तरी जात धर्म यांच्या पलीकडे असावीत अशी फार इच्छा आहे.
6 Dec 2012 - 10:37 am | चौकटराजा
खून का , ऐश का, जुनून का , रहम का , दुआ का या हुन्रर का कोई मजहब नही होता .
6 Dec 2012 - 10:21 am | श्री गावसेना प्रमुख
काय अविनाश कुलकर्णी साहेब निवांत ना,इथे आग लागलीयेझोपता काय
7 Dec 2012 - 11:23 am | अविनाशकुलकर्णी
चर्चा गायकाचा धर्म हि नसुन गाण्याचे इस्लामि करण हा आहे...
दबंग..व अक्षय देवगण खान कंपनिच्या सिनेमाची गाणी निट ऐकली कि जाणवते..
7 Dec 2012 - 12:57 pm | श्रीरंग_जोशी
इस्लाम काय आपल्याला परका आहे का?
8 Dec 2012 - 12:04 am | अर्धवटराव
एका वाक्यात सर्व विवादांचे निर्मूलन
(बीर्याणी आणि मसालेभात भोक्ता) अर्धवटराव
8 Dec 2012 - 1:44 am | विश्वनाथ मेहेंदळे
हम्म्म्म..... झोपेतून उठलात की बोलू....
8 Dec 2012 - 1:12 am | विकास
इस्लाममधे मला वाटते संगीतच निषिद्ध आहे. त्यामुळे संगिताचे इस्लामीकरण होते म्हणणे अयोग्य ठरेल.
7 Dec 2012 - 11:26 am | अविनाशकुलकर्णी
रफिच्या ७० च्या दशकातल्या गाण्याचे दाखले इथे लागु पडतात का?
२०१२ चालु आहे..गाणी निट आइकली कि इस्लामि करण किति वेगाने होत आहे ते जाणवते.
7 Dec 2012 - 1:03 pm | परिकथेतील राजकुमार
माझा इथला चौकशी करणारा प्रतिसाद का उडाला बा ? का अजून स्कोर सेटल करण्याचे खेळ चालूच आहेत? :)
असू दे.. असू दे.. तुम्हाला आनंद मिळतोय ना? मग चालू द्या.
8 Dec 2012 - 8:38 am | कवितानागेश
गाणी निट आइकली कि इस्लामि करण किति वेगाने होत आहे ते जाणवते>>
मग आता आपण काय करायचे बरे????? :(
10 Dec 2012 - 2:52 pm | चिगो
मग आता तूम्ही ह्याच्याविरोधात मोर्चे काढा, निषेध करा.. रेहमान आणि त्याच्यासारख्या इस्लामीकरण (?) करणार्या संगीतकारांना वाळीत टाका.. मी तोपर्यंत त्याचे 'ओ पालनहारे' 'मधुबन मे जो कान्हा', 'श्रीरामजी आये' इत्यादी, तसेच 'पिया हाजी अली' 'मौला मेरे ले ले मेरी जान' वगैरे ऎकतो..
काय त्रास आहे साला.. अरे नसेल ऎकायची अशी गाणी तर नका ऎकू ना ! कूणी नरड्याला चाकू लावून ऎकायला भाग पाडतोय का?
10 Dec 2012 - 6:04 pm | नितिन थत्ते
हेच ते....
अकु सांगतायत,"सावध रहा". त्या लोकांचा डाव लक्षातच येत नाहीये तुमच्या. जेव्हा सगळं हिरवं होईल तेव्हा मग अकुंची आठवण येईल. :)