निसर्ग दत्त महाराज

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
20 Nov 2012 - 12:54 pm
गाभा: 

.

निसर्ग दत्त महाराज नवा विचार.... नवी दृष्टी .
*म्हणजे याचा नेमका अर्थ असा का??????????
*हातामध्ये सोनचाफ्याचे फुल जरूर घ्या पण त्याचा वास घेवू नका .... असेच ना ????

*असे असावे का? कि ..वास घ्या..आनंद अनुभवा....आणि पुढे चला...
सारखा वास घेत बसू नका.....

*आनंद अनुभवा....आणि पुढे चला...>>>> नुसते एव्हडे नाही चालणार तर त्यामागे धावू नका , विरक्त व्हा !

*निसर्ग महाराज नवा विचार.... नवी दृष्टी ..
-जय हो............

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

20 Nov 2012 - 8:29 pm | अर्धवटराव

विचार आलाय मनात, तर काहि कारणास्तव आलाय. ते कारण जाणुन त्यावर योग्य उपाय होतोय का ते बघा... विचारांनी जे सुख-दु:खाचे ट्रिगर्स दिलेत, त्या सुख-दु:खांना प्राधान्य देऊ नका. जसं, भूक लागली आहे, कारण शरीराला पोषणाची आवश्यकता आहे... तर हे पोषण व्यवस्थीत होतेय का ते बघा, निव्वळ जिभेचे चोचले पुरवण्याच्या मागे लागु नका.

सुख-दु:खांच्या संवेदना काहि कारणास्तव होतात.. ते कारण जाणणं महत्वाचं, केवळ सुख-दु:खात रममाण होणे नव्हे.

(आयला... आपल्याला बोलायला काय जाते...)

अर्धवटराव

रामपुरी's picture

21 Nov 2012 - 1:56 am | रामपुरी

"निसर्गदत्त"
मस्त आहे.
पुलं च्या 'माझा शत्रूपक्ष' मध्ये जशी शिकार्‍यांची नावे आईबापांनी लहानपणीच हंबीरराव, झुंजारराव ठेवलेली असतात तसंच काहीसं वाटलं.

पाषाणभेद's picture

21 Nov 2012 - 10:12 pm | पाषाणभेद

आता तरी या अस्ल्या बाबा महाराजांचे धागे बंद करा रे बाबांनो.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Nov 2012 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा

++++++++++१११११११११११११११ टू पा.भे.

५० फक्त's picture

21 Nov 2012 - 11:07 pm | ५० फक्त

++++++++++१११११११११११११११ + अजुन २,

मा. संपादक मंडळ,

जाणत्या अजाणत्या तथाकथित ज्ञानी अज्ञानी आयडिंकडुन

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 3:49 pm | प्यारे१

चाकू कुणाच्या हातात आहे ह्यावर त्याचा वापर कसा होतो/ होऊ शकतो ते अवलंबून ठरतं.

एक सत्य घटना आहे. माझ्या एका मित्राच्या चार वर्षाच्या भाच्यानं स्वैपाकघरातला चाकू वर उंच फेकला. आपण चेंडू फेकतो तसा. दुर्दैवानं तो त्याच्या डोळ्याच्या बाहुलीत घुसला.... पुढच्या सगळ्या गोष्टी लिहीण्यात अर्थ नाही.

चाकू त्या मुलाच्या हातात अजाणतेपणं आला होता. चोर जाणतेपणं(?) हातात घेतात नि डॉक्टर सूज्ञपणं. तोच चाकू.
कशासाठी, कसा वापर होतो, कोण करतो ह्यावर सगळं अवलंबून. तोवर 'योग्य' मार्गदर्शना/काच्या मदतीनं गोष्टी घडाव्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 4:02 pm | अत्रुप्त आत्मा

चाकुचं उदाहरण वास्तविक नाही... चाकु वापरण्याचे निश्चित असे बरे/वाइट संकेत असतात... म्हणुनच तर आपण उदा- देखिल तसच दिलत,,, पण मग आध्यात्मात काहि संकेत बर्‍या भाषेत असले,तरी त्याचा मतितार्थ इहलौकिक दृष्ट्या निंदनीय/वाइट/आत्मघातक/जिवनपरांग्मुख असतो... त्याचे काय...? ''सगळंच्या सगळं अध्यात्म/धर्म/परंपरा चांगलच असतं,आपण वापरताना चुकतो'' हा दावा अचरट आणी दांभिक आहे.

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 4:15 pm | प्यारे१

>>>> ''सगळंच्या सगळं अध्यात्म/धर्म/परंपरा चांगलच असतं,आपण वापरताना चुकतो'' हा दावा अचरट आणी दांभिक आहे.

अगदी बरोबर आहे....अशा प्रकारचा कुठलाही दावा मी केलेला नाही. सगळ्या परंपरांचा आपण अभ्यास केला आहे का? चार आंधळे नि हत्तीच्या गोष्टीत मला हत्तीचा कान सुपासारखा वाटतो त्यातून मी चांगलं वाईट बाजूला करु शकतो.... मी आंधळा अथवा डोळस असं म्हणताना मी'च' डोळस/शहाणा असं म्हणत नाही. पण एक निश्चित सांगू शकतो की जे वाचनात आलं त्यानुसार ते अनुकरणशील आहे. किंबहुना तेच घेणं श्रेयस्कर आहे, इतर नाही. त्याची गरज देखील नाही. (हे पूर्णतः वैयक्तिक आहे)

वर "आता तरी या अस्ल्या बाबा महाराजांचे धागे बंद करा रे बाबांनो."

ह्या संदर्भात वरील उदाहरण होते. सरसकट सगळंच बंद करा म्हणणं रास्त नाही. हे असं म्हटलं जाण्यामागचं ताजं कारण आपल्या सर्वांना ठाऊक आहे. त्या विशिष्ट प्रकरणामध्ये नि लहान मुलाद्वारे अजाणतेपणी केला गेलेला चाकूचा वापर एवढीच तुलना अपेक्षित होती. बाकी चाकूचे उदाहरण 'वास्तविक' नाही म्हणण्याचे कारण?

अत्रुप्त आत्मा's picture

23 Nov 2012 - 4:19 pm | अत्रुप्त आत्मा

@बाकी चाकूचे उदाहरण 'वास्तविक' नाही म्हणण्याचे कारण? >>> वास्तविक नाही,याचा अर्थ वस्तुस्थितिला धरून नाही... असो...!
पण ह्या असल्या चर्चा आल्या कि आपला स्टँड नेहमी व्यक्ति चुक/व्यवस्था(अध्यात्म) बरोबर असा असतो... हे काय कोडे आहे... आणी दरवेळी ते वैयक्तिक असेल,तर लेखनात सार्वत्रिकता का जाणवते???

प्यारे१'s picture

23 Nov 2012 - 4:48 pm | प्यारे१

व्यक्ती मध्ये/ मानवी बुद्धीमध्ये चार दोष...
इंद्रियांचा सीमितपणा,
त्यांना होणारा भ्रम,
लोभीपणा,
नि चुका करण्याची शक्यता
असतात. हे तत्त्वज्ञानात नाहीत. म्हणून तत्त्वज्ञान बरोबर.

माझं वैयक्तिक मत म्हणण् याचं कारण म्हणजे मला तुम्ही तत्त्वज्ञान / अध्यात्म कशाला मानता याबद्दल मला माहि त नाही. भग वद्गीता, उपनिषदे, ब्रह्मसूत्र आणि त्यावरच्या शंकराचार्य, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, एकनाथ, नामदेव यांच्या व त्याला समांतर गोंदवलेकर महाराज अथवा आणखी कुणीही असेल तर ते मी ऐकतो. ह्या वर सांगितलेल्या व्यक्तींनी कधी ही कुणा कडे काहीही मागितलेले नाही, स्वार्थीपणा नाही.

व्यक्ती वक्ता म्हणून बोलत असताना( लिहीलेली पुस्तकं इ.इ. स्वरुपात देखील अपेक्षित आहे)
त्याचं व्यक्तिमत्व- चार्मिग इ.इ.,
वक्तृत्व- शब्द सामर्थ्य उपमा इ.इ.,
वक्तव्य- सांगायचं आहे ते...
ह्यामध्ये वक्तव्य लक्षात न राहता बाकीच्या अवडंबरामध्ये माणूस गुरफटला जातो.

तुम्ही बोलताय ते 'अ‍ॅप्लिकेशन' बद्दल बोलताय. मी बोलतोय ते 'प्रिन्सीपल्स' बद्दल. व्यव स्था व्यक्तीहून श्रेष्ठ असतेच. असावी. नाहीतर 'आणीबाणी' लागू होते. :)

संजय क्षीरसागर's picture

23 Nov 2012 - 5:00 pm | संजय क्षीरसागर

आध्यात्मात काहि संकेत बर्‍या भाषेत असले,तरी त्याचा मतितार्थ इहलौकिक दृष्ट्या निंदनीय/वाइट/आत्मघातक/जिवनपरांग्मुख असतो... त्याचे काय...?

अध्यात्म जीवनविरोधी नाही. ते जगणं आनंदाच करतं. साधक सिद्धी आणि चमत्कारांच्या मागे असतात त्यामुळे त्यांना वैफल्य येतं.

''सगळंच्या सगळं अध्यात्म/धर्म/परंपरा चांगलच असतं,आपण वापरताना चुकतो'' हा दावा अचरट आणी दांभिक आहे.

हा दोन्ही बाजूंनी अत्यंत व्यापक पण निराधार दावा आहे.

मुळात जर कुणाला `सगळं व्यवस्थित चाललय' असं वाटत असेल तर त्यानं अध्यात्माच्या नादी लागू नये.

ज्याला मृत्यूची अनिवार्यता लक्षात आली आणि तो केव्हांही (अगदी या क्षणी) येऊन सगळा डाव उधळू शकतो हे मनोमन पटलं. किंवा ज्यानं यथोचित उपभोगून आता जीवन पुनरावृत्ती व्यतिरिक्त काही नाही आणि मृत्यू सर्व पुसून टाकेल हे जाणलं त्याच्यासाठी अध्यात्म आहे.

अध्यात्म जगणं तर आनंदाच करतच पण मृत्यू देखील सार्थक करतं कारण सत्य जाणलेला, मृत्यूत शरीरापासून मुक्त होतो, मरत नाही.

''सगळंच्या सगळं अध्यात्म/धर्म/परंपरा चांगलच असतं आपण वापरताना चुकतो" असं म्हणण फक्त त्याच्या दृष्टीनं योग्य आहे ज्यानं योग्य साधनेनं `आपण व्यक्ती आहोत' या भ्रमातून मुक्ती मिळवली.

"हा दावा अचरट आणी दांभिक आहे" असं म्हणणं अयोग्य आहे कारण त्याचा अर्थ सगळं अध्यात्म व्यर्थ आहे असा होतो.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Nov 2012 - 7:53 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

काळा पहाड's picture

23 Nov 2012 - 12:08 am | काळा पहाड

जय नित्यानंद बाबा

श्री निसर्गदत्त महाराज त्यांच्या `सुखसंवाद' या एकमेव पुस्तकामुळे (प्रकाशक श्री सतीश आव्हाड,सी-११, विश्वजीत सोसायटी, नौपाडा, ठाणे (प) फोन्स ५३६० २२३ / ५४४ ८७८७) अध्यात्मिक जगतात स्वतःच निर्विवाद स्थान निर्माण करून आहेत.

ते पुस्तक म्हणजे साधकांच्या प्रश्नांना समोरासमोर दिलेल्या उतारांच्या एकशेएक प्रवचनांच दुर्मिळ संकलन आहे.

आपण सत्य आहोत याबद्दल साधकाला इतका जबरदस्त आत्मविश्वास या पुस्तकाखेरिज इतर कोणत्याही साहित्यातून दिलेला माझ्या पाहण्यात नाही.

अध्यात्मिक प्रगतीची लक्षणं कोणती? यावर महाराजांच उत्तर किती समर्पक आहे : `निश्चिंतपणा, आराम, आनंदाची जाणीव, अंतर्यामी सखोल शांती आणि बाहेर भरपूर उत्साह' (प्रवचन ८९)

इथे सदस्यांनी प्रतिसादात व्यक्त केलेली भीती अनाठायी आहे. खरं तर चमत्काराचा लवलेष नसलेलं सिद्धपुरुषानं केलेलं सत्याच विवेचन हाच त्या भीतीवर एकमेव उपाय आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Nov 2012 - 12:50 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

कवितानागेश's picture

23 Nov 2012 - 3:38 pm | कवितानागेश

माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद. :)

खटासि खट's picture

23 Nov 2012 - 12:17 pm | खटासि खट

अल्पमतीमुळे लेख समजण्यास अडचणी आलेल्या आहेत. कृपया लेखनविस्तार करणेत यावा ही नम्र विनंती. आम्ही सर्व महाराजांना मान देतो.

राम भजनकूं दिया | कमलमुख राम भजनकूं दिया ||
लख चौर्‍यायंशी फेरे| फिरकर सुंदर नरतनू पाया ||
खाया पिया सुखसे सोया | नाहक जमाना खोया ||
जो मुख निशिदिनी रामनाम नही | वहां तुम कछुं नही किया
कहत कबीरा सुन भाई साधु |आया वैसाही गया ||

अकु तुमच्या धाग्यांवर आणि प्रतिसादांवर मी लक्ष ठेवुन आहे.