बाळासाहेबांना श्रध्दांजली....

नीलकांत's picture
नीलकांत in काथ्याकूट
17 Nov 2012 - 5:20 pm
गाभा: 

मा. बाळासाहेब ठाकरेंना मिसळपाव परिवारातर्फे विनम्र श्रध्दांजली....

प्रतिक्रिया

विनम्र श्रद्धांजली.

___/\____

श्री's picture

17 Nov 2012 - 5:33 pm | श्री

विनम्र श्रद्धांजली.

वैभवजोशि's picture

17 Nov 2012 - 5:38 pm | वैभवजोशि

सहेब :(

प्रशु's picture

17 Nov 2012 - 5:42 pm | प्रशु

पोरके झालो आपण, काय बोलु, साहेब.............

मदनबाण's picture

17 Nov 2012 - 5:42 pm | मदनबाण

हिंदुहॄदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.
हिंदुस्थानातील हिंदुचा बुलंद आवाज असणार्‍या या मराठी वाघाला काळाने स्वतःमधे समावुन घेतले आहे. :(

पिंगू's picture

17 Nov 2012 - 5:43 pm | पिंगू

भावपूर्ण श्रद्धांजली... :(

विकास's picture

17 Nov 2012 - 5:46 pm | विकास

विनम्र श्रद्धांजली. गेल्या काही दिवसांमधील बातम्यांमुळे याला अतर्क्य अथवा अकस्मात नसले तरी जेंव्हा वाचले तेंव्हा वाईट वाटले.

सुधीर's picture

17 Nov 2012 - 5:48 pm | सुधीर

विनम्र श्रध्दांजली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2012 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संभाजीनगरात मराठवाडा संस्कृती मंडळावर साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी कोण आटापिटा करायचो. साहेबांचं भाषण एक जादु असायची. साहेबांचं वक्तृत्त्व ही एक दैवी देणगीच होती. आता केवळ आठवणी.

साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..

-दिलीप बिरुटे

माझीही शॅम्पेन's picture

17 Nov 2012 - 6:02 pm | माझीही शॅम्पेन

आज आम्ही पोरेके झालो :( एक खराखुरा हिंदू हृदय सम्राट आज नाही हे सगळच अविश्वसनीय आहे
देव आपल्या सर्वांना हे दु:ख पेलण्यची शक्ति देवो

तुषार काळभोर's picture

17 Nov 2012 - 6:04 pm | तुषार काळभोर

महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गेला...

आशु जोग's picture

17 Nov 2012 - 6:05 pm | आशु जोग

उद्धव, आदित्य आज खर्‍या अर्थाने पोरके झाले.

विसुनाना's picture

17 Nov 2012 - 6:10 pm | विसुनाना

माझ्या कळत्या वयापासून 'बाळासाहेब ठाकरे' हे नाव घेतले की केवळ एकच व्यक्ती डोळ्यासमोर उभी रहात असे. ही व्यक्ती आपल्यातून निघून जाईल असे कधीच वाटले नव्हते. प्रत्येक मराठी माणसाच्या विचारविश्वाचा एक महत्त्वपूर्ण भाग आता कायमचा नाहीसा झाला...
श्रद्धांजली.

इष्टुर फाकडा's picture

17 Nov 2012 - 6:11 pm | इष्टुर फाकडा

:(

बॅटमॅन's picture

17 Nov 2012 - 6:27 pm | बॅटमॅन

युगांत!!

सर्वसाक्षी's picture

17 Nov 2012 - 6:30 pm | सर्वसाक्षी

बाळासाहेब म्हटले की सेनेचे सुरुवतीचे दिवस आठवतात. मी तेव्हा खूपच लहान होतो, पण सेनेच्या सभांना दादरमध्ये होणारी गर्दी आणि मिळणारा प्रचंड व उस्फुर्त प्रतिसाद अजुनही लक्षात आहे. खड्या आवाजात बोलणारे बाह्या दुमडलेला सदरा व विजार या पोशाखातले , व उजवा हात वरच्या दिशेने उचललेले बाळासाहेब डोळ्यासमोर येतात. त्यांच्या भाषणशैलीवर बहुधा आचार्य अत्रे यांचा प्रभाव असावा. बोलणे एकदम रोखठोक. "एका प्रार्थनस्थळातुन विशिष्ठ जमातीच्या लोकांकडुन दगडफेक झाली" वगैरे गुळ्मुळीत भाषा त्यांना कधीच मानवली नाही.
ते इडल्या विकतात तर आपण वडे विकु असे बाळासाहेबांनी सुचविताच दादरमध्ये सर्वत्र भगव्या टोप्या घातलेले शिवसैनिक वडे विकताना दिसु लागले. दहा वर्षांपूर्वी कबुतरखान्या समोरच्या गल्लीच्या नाक्यावर वडापाव खाताना गाडीच्या मालकांना सहज म्हटले की काका, आपली गाडी वर्षानुवर्ष पाहतोय, अजुन तीच चव, तीच मऊसूत हिरवी चटणी, फक्त तुमच्या डोक्यावर आता भगवी टोपी नाही! मालकांना भरुन आले, म्हणाले गाडी १९६८ पासून लावतोय. धंदा कसा चोख असावा, तो ईमानदारीने करतोय; आजही सर्वात स्वस्त आणि दर्जेदार वडा आपलाच आहे.

सुधीरभाऊ ऐन विशीत महापौर झाले, अर्थातच मुंबईचे सर्वात लहान महापौर, तेव्हा निघालेल्या त्या प्रचंड मिरवणुका अजुनही आठवतात.

मुंबईत जेव्हा जेव्हा हिंदु - मुसलमान दंगे झाले तेव्हा हिंदुना सेना आणि बाळासाहेब हे मोठे आधार वाटत असत. ९२ च्या दंग्यात एका रात्री शितलादेवी मंदीरावर हल्ला होणार अशी अफवा उठली तेव्हा कर्फ्यु फाट्यावर मारुन हजारो शिवसैनिक समुद्रकिनार्‍यावरुन लपत छपत माहिमला पोचल्याची सर्वत्र चर्चा होती.बाळासाहेब हे वादग्रस्त व्यक्तिमत्त्व होते पण आजही आपल्या अनुयायांवर आणि अवघ्या महाराष्ट्रावर इतका प्रभाव असलेले असे दुसरे व्यक्तिमत्त्व दुसरे नाही. त्यांच्या निष्ठावंतांची तुलना ही शिवरायांच्या मावळ्याशी केली तर वावगे ठरु नये. निष्ठावंत शिवसैनेकांना हा धक्का सहन करणे फार जड जाईल.

कधीही कुठल्याही कारणास्तव कुण्या राजकीय पक्षाने भारत बंद वा मुंबई बंद चा आवाज दिला तर प्रत्येक मुंबईकर एकमेकाला तातडीने विचारु लागे 'साहेबांचा पाठिंबा आहे का?" जर सेनेने बंद पुकारला तर मुंबई बंद! जर सेनेने पाठिंबा दिला नाही, तर मुंबईकर चाकरीवर हजर.

शिवसैनिकांनाच काय, 'बाळासाहेब आता आपल्यात नाहीत' हे सत्य स्विकारायला समस्त मुंबईकरांना वेळ लागेल. ईश्वर या झंझावाती नेत्याच्या आत्म्यास शांती देवो ही प्रार्थना.

भगव्या ध्वजाचा निष्ठावंत शिलेदार अनंतात विलीन झाला!
ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.

प्रकाश घाटपांडे's picture

17 Nov 2012 - 6:35 pm | प्रकाश घाटपांडे

बाळासाहेबांना विनम्र आदरांजली.

अमोल खरे's picture

17 Nov 2012 - 6:40 pm | अमोल खरे

संपलं सर्व. काय बोलणार. काल त्यांची तब्येत सुधारतेय हे ऐकुन आशा उंचावल्या होत्या, पण वाईट बातम्या कधीच खोट्या ठरत नाहीत त्याचा प्रत्यय आला. एक जबरदस्त डॅशिंग माणुस आपल्याला सोडुन गेला. बाळासाहेबांना श्रद्धांजली.

चिगो's picture

17 Nov 2012 - 6:40 pm | चिगो

बाळासाहेब म्हणजे घणाघाती, तडफदार नेतृत्व.. ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.

अपूर्व कात्रे's picture

17 Nov 2012 - 6:43 pm | अपूर्व कात्रे

जन्माला येणारा माणूस मरणाची वेळ सोबत घेऊनच येतो असे म्हंटले तरी काहींचे मरण पचवणे अवघड जाते. बाळासाहेब ठाकरे त्यापैकीच एक.
महाराष्ट्राच्या आणि काही प्रमाणात देशाच्या राजकारणात भले-बुरे योगदान असलेल्या या ढाण्या वाघाचा अंत म्हणूनच काळजाला चटका लावतो.

नावातकायआहे's picture

17 Nov 2012 - 6:44 pm | नावातकायआहे

मा. बाळासाहेब ठाकरेंना भावपुर्ण श्रध्दांजली...

झालेत बहु होतील बहु परंतु या सम हाच.
साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली.
आज पहिल्यांदा राजकीय नेता गेल्यावर खुप वाईट वाटत आहे.

भावपूर्ण श्रद्धाजंली

खेडूत's picture

17 Nov 2012 - 6:50 pm | खेडूत

मा.बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रध्दांजली

भावपूर्ण श्रद्धाजंली

चतुरंग's picture

17 Nov 2012 - 7:13 pm | चतुरंग

मी लहान असताना बाळासाहेबांचे नाव ऐकू येई. माझ्या आत्याचे मिस्टर हे शिवसैनिक. त्यांच्याकडून बाळासाहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल ऐकू येई परंतु तेव्हा ते समजण्याचे वय नव्हते. दसरा मेळाव्याचे फोटो पेपरात येत त्यातली भव्यता आणि दिमाख बघून हा माणूस काहीतरी वेगळा आहे एवढे मात्र निश्चित जाणवत असे. अधूनमधून त्यांच्या वादग्रस्त भाषणांमुळे आणि लेखांमुळे ते चर्चेत असत. काही असले तरी सडेतोड आणि निर्भीड मतप्रदर्शन आणि दिलदार वृत्ती ही त्यांच्या रक्तातच होती असे वाटते. एका अनोख्या व्यक्तिमत्त्वाला आणि कुशल संघटकाला महाराष्ट्र मुकला.
बाळासाहेबांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

(दू:खी)रंगा

सव्यसाची's picture

17 Nov 2012 - 7:22 pm | सव्यसाची

श्रद्धांजली

अकस्मात तोही पुढे जात आहे...

राजघराणं's picture

17 Nov 2012 - 7:44 pm | राजघराणं

वाढूही शकतो

बाळा साहेबांचे शेवटचे भाषण...
http://www.youtube.com/watch?v=ITNxUt92my8

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली..... *~*~*~*~*~*~* :(
बाळासाहेब... तुम्ही किमान शम्भरी नक्की गाठाल... असे वाटले होते.... पण १५ वर्षं आधी पोरके केलेत तुम्ही महाराष्ट्राला.... :( :( :(
_______________________

'राज'कारणातली बरीच समीकरणं आता झपाट्यानं बदलतील.... याबद्दल शन्का नाही....

गेल्या ४-५ दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांवरून ही बातमी लवकरच यायची शक्यता आहे असे अपेक्षित होतीच.

कालच टीव्हीवर ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे मनोहर जोशींनी जाहिर केले तरी त्यांचा बोलताना दाटून येणारा आवाज, डोळ्यातून येणारे अश्रू थांबवायची कसरत आणि एकूणच देहबोली यावरून का कोण जाणे बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत ही बातमी चुकीची आहे असेच वाटले.

बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

शैलेन्द्र's picture

17 Nov 2012 - 7:52 pm | शैलेन्द्र

"कालच टीव्हीवर ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत हे मनोहर जोशींनी जाहिर केले तरी त्यांचा बोलताना दाटून येणारा आवाज, डोळ्यातून येणारे अश्रू थांबवायची कसरत आणि एकूणच देहबोली यावरून का कोण जाणे बाळासाहेब उपचारांना प्रतिसाद देत आहेत ही बातमी चुकीची आहे असेच वाटले."
खरयं..

मैत्र's picture

17 Nov 2012 - 7:54 pm | मैत्र

"बाळ" नावाचा "बाप" माणूस गेला...एका पर्वाचा अस्त झाला..
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र श्रद्धांजली...

प्रभो's picture

17 Nov 2012 - 7:54 pm | प्रभो

:(

दत्ता काळे's picture

17 Nov 2012 - 8:13 pm | दत्ता काळे

भारतीय राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटवीणारं उमदं व्यक्तिमत्व गेलं.
बाळासाहेबांना भावपूर्ण श्रध्दांजली.

आता सेनेची खरी कसोटी लागणार.

अर्धवटराव

इन्दुसुता's picture

17 Nov 2012 - 8:14 pm | इन्दुसुता

मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.
ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो.

शित्रेउमेश's picture

17 Nov 2012 - 8:47 pm | शित्रेउमेश

मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.

मंदार कात्रे's picture

17 Nov 2012 - 8:48 pm | मंदार कात्रे

वाईटातून चांगले घडावे ............अशी एक अंधुक आशा ...................साहेबांची सेना आणि म न सेना आता तरी एक व्हावी...............!
साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली !

मैत्र's picture

17 Nov 2012 - 9:50 pm | मैत्र

असेच म्ह्णतो..

अभ्या..'s picture

17 Nov 2012 - 8:52 pm | अभ्या..

श्रध्दांजली एका सडेतोड आणि परखड अस्सल मराठी बापमाणसाला
एका थोर कलावंताला आणि निर्भय राजकारण्याला

फार उपकार आहेत बाळासाहेब तुमचे आमच्यावर

प्यारे१'s picture

17 Nov 2012 - 9:14 pm | प्यारे१

चार दोन दिवसात समजून उमजून देखील काळीज थोडंसं हललंच.

श्रद्धांजली नि मानाचा मुजरा...!

गेल्या चार दोन वर्षात 'वर'देखील ना सुद्धा लोकांची वानवा भासू लागलेली दिसतेय.सर्वार्थानं मोठे लोक पटापट पदोन्नती करताना दिसत आहेत.... :(

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Nov 2012 - 9:45 pm | बिपिन कार्यकर्ते

.

बोललेला प्रत्येक शब्द कधीच मागे न घेणारा महाराष्ट्राचा वाघ हरपला.

अत्रन्गि पाउस's picture

17 Nov 2012 - 9:52 pm | अत्रन्गि पाउस

बाळासाहेबांना विनम्र श्रद्धांजली...
साहेब खूप दिलेत महाराष्ट्राला...आता अखेरच्या प्रवासाला नीट जा..सांभाळून राहा...
आमच्यात जीव अडकवू नका..
गुड बाय!!!

समंजस's picture

17 Nov 2012 - 10:02 pm | समंजस

मा. बाळासाहेब ठाकरेंना विनम्र श्रध्दांजली.
संयुक्त महाराष्ट्रातील आणि संयुक्त महाराष्ट्राचा सतत पुरस्कार करणार्‍या आणि त्या करीता संघर्ष केलेल्या सच्च्या नेत्यांच्या फळीतील शेवटचा नेता ही आता निघून गेला.

(आता राहिलेत ते दिल्ली शासनकर्त्यांपुढे व्यक्तीगत फायद्या करीता हुजरी करणारे कथित नेते.)

पाषाणभेद's picture

17 Nov 2012 - 10:23 pm | पाषाणभेद

एक युगांत झालाय आज. बाळासाहेबांना आदरांजली.

एखाद्या समुदायावर 'गारुड घालणं' म्हणजे काय ते या माणसानं शिकवलं.
कुणी लाख फाटक्या तोंडाचा म्हणो पण असंख्य विखुरलेल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं आणि बांधुन ठेवण्याच काम यानं केलं.
९३च्या दंग्यांच्या काळात केवळ साहेब आणि त्यांचे मावळे होते म्हणुन कुर्ल्यासारख्या ज्वलनशील भागाच्या जवळ राहात असतानाही कुणाची टाप नव्हती आमच्या भागात दंगा करण्याची.

गेल्या दोन चार दिवसांपासून कानावर येणाऱ्या बातम्यांमुळे मनाची तयारी होत होती. पण तरी सुद्धा आत खोलवर एक अंधुकशी आशा होती. हा वाघ त्या काळावरही मात करेल.
पण अखेर काळ जिंकला.
आत काही तरी तुटल्यासारखं सारखं वाटतय. :(

पैसा's picture

17 Nov 2012 - 10:42 pm | पैसा

विनम्र श्रंद्धाजली...

सावकार स्वप्निल's picture

17 Nov 2012 - 11:17 pm | सावकार स्वप्निल

जगात अगोदरच बोटावर मोजन्या इतके 'वाघ' आहेत, एक 'वाघ' ............!

मोदक's picture

17 Nov 2012 - 11:41 pm | मोदक

.

विरोचन's picture

17 Nov 2012 - 11:51 pm | विरोचन

श्रद्धांजली

अनामिका's picture

18 Nov 2012 - 12:11 am | अनामिका

माननिय बाळासाहेबांनी आज या जगाचा निरोप घेत महाराष्ट्रयातल्या मराठीमाणसाला अखेरचा "जयमहाराष्ट्र" तर हिंदुस्थानातल्या प्रत्येक स्वाभिमानी व अभिमानी "हिंदुला" अखेरचे "जयहिंद" केले..बाळासाहेबांच जाण हे मानल तर प्रकृतीला धरुन आणि निसर्ग नियमाला अनुसरुनच आहे...पण तरीही त्यांच्या जाण्याच्या बातमीने पोटात खड्डा पडला.....सेनेचा हा ढाण्या वाघ गेली ४५ वर्षे खड्या आवाजात डरकाळी फोडत होता एकाहाती किल्ला लढवत होता..आज बाळासाहेबांनी काय दिले? याचा विचार अनेक जण करतायत....या उत्तुंग व्यक्तिमत्वाने .. मराठी माणसामधे स्वाभिमानाचा व्हनी चेतवला .. मराठी माणसाला मानाने जगायला शिकवले..हिंदुत्व हेच राष्ट्रियत्व असे ठणकावुन सांगितले..जाज्वल्य देशाभिमान प्रत्येक मराठी व अमराठी माणसामधे जागवला .. बाबरी पडल्यानंतर त्याचे श्रेय आपल्या सैनिकांना देताना परिणामांचा विचार केला नाही.. आणि उगिचच जातीपातीचे घाणेरडे राजकारण कधी केले नाही.. अतिशय विश्वासु असलेले जुने सहकारी साथ सोडुन अर्ध्या वाटेतुन निघुन गेले तरी बाळासाहेब डळमळले नाहित.. अतिशय प्रांजळपणे आपली मते मांडणारा हा स्पष्टवक्ता असलेला भारतिय राजकारणातला एकमेव असामान्य नेता . कुणाचीही भिड न बाळगणारा ,व परिणामांची तमा न बाळगणारा हा एकमेव द्र्ष्टा नेता ..आज आपल्यातून निघून गेलाय...त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधी भरुन निघेल का?हा प्रश्न सतावतोय ....मला आणि माझ्यासारख्या अनेकांना..त्यांच्या पश्चात सेनेचे काय होणार ?हा प्रश्न देखिल भेडसावतोय.
शिवतिर्थावरीलच नव्हे तर प्रत्येक जाहिर सभे मधे त्यांच्या मुखातून उच्चारले जाणारे "येथे उपस्थित माझ्या तमाम हिंदु बांधवांनो व भगिनींनो"हे चिरपरिचीत संबोधन या पुढे ऐकू येणार नाही....त्यांच्या ओजस्वी वाणीतून निखार्‍या प्रमाणे बाहेर पडणारे ते राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत असलेले मनस्वी व जाज्वल्य विचार यापुढे कधी ऐकु येणार नाहीत्..त्या ढाण्या वाघाची ती डरकाळी आज कायमची शांत झाली..असा मनस्वी व द्रष्टा नेता असा माणूस या पुढे होणे नाही..
आज एक छ्त्र हरपले...
एक पर्व संपले..
एक अखंड अविरत घोंघावणारे वादळ शांत झाले...
महाराष्ट्र ...मराठी माणूस्..स्वाभिमानी व अभिमानी हिंदू.. भगव्यावर श्रद्धा असणारी प्रत्येक व्यक्ती..आणि निष्ठावान शिवसैनिक कायमचे पोरके झाले....पण तरीही बाळासाहेब आपल्यातून फक्त शरिराने दुर गेलेत्..त्यांनी दिलेले विचारांचे व हिंदुत्वाचे धगधगते अग्नीकुंड बाळासाहेबांवर श्रद्धा असणार्‍या प्रत्येकाला कायम पेट्ते ठेवायला लागेल्..आणि या देशातल्या प्रत्येक हिंदुंच्या आत कुठे तरी दडलेली ती बाळासाहेब नावाची वृत्ती व प्रवृत्ती जागृत करावीच लागेल. याच प्रवृत्तीच्या जागे होण्याने काँग्रेस नावाची या देशाला लागलेली वाळवी नष्ट करता येईल. ...महाराष्ट्रावर व देशावर पुन्हा डौलाने भगवा फड्केल ती आणि तीच माननिय बाळासाहेबांना खर्‍या अर्थाने श्रद्धांजली असेल...
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

दादा कोंडके's picture

18 Nov 2012 - 12:20 am | दादा कोंडके

मनाची तयारी केली होती तरी बातमी वाचून काहितरी तुटल्यासारखं झालं.

दुश्यन्त's picture

18 Nov 2012 - 12:43 am | दुश्यन्त

भावपूर्ण श्रद्धांजली! असा नेता परत होणे नाही!

पिशी अबोली's picture

18 Nov 2012 - 1:18 am | पिशी अबोली

ते जातील असं २-३ दिवस खरं वाटत असूनही ते गेलेत हे अजून खरं वाटत नाही..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Nov 2012 - 2:46 am | निनाद मुक्काम प...

विनम्र श्रद्धांजली

शकु गोवेकर's picture

18 Nov 2012 - 3:02 am | शकु गोवेकर

भले श्रिमान बाळासाहेब विषयि गैरसमज असोत पण हिन्दुंना गरजेच्या वेळेस त्यानि जी एक्जुट केलि त्याला तोड नाहि,हे खरे! कारण ते मरण्यापुर्वि म्हणाले की हा देश आजारि झाला आहे व त्यासाठि देशाला वेंटिलेटरची जरुरि आहे,बाळासाहेब खरा योद्धा माणुस व नररत्न!

सुहास झेले's picture

18 Nov 2012 - 4:25 am | सुहास झेले

:( :( :(

चौकटराजा's picture

18 Nov 2012 - 6:40 am | चौकटराजा

p
बाळासाहेबाना राजकारणात वा चित्रकारीत खोडरब्बर वापरायचे मान्य नव्हते . या त्यांच्या अलौकिक गुणविशेषाला मानाचा मुजरा व विनम्र आदरा़जली !

पुण्याचे वटवाघूळ's picture

18 Nov 2012 - 7:44 am | पुण्याचे वटवाघूळ

बाळासाहेबांना श्रध्दांजली.

५० फक्त's picture

18 Nov 2012 - 8:33 am | ५० फक्त

विनम्र श्रद्धांजली

किसन शिंदे's picture

18 Nov 2012 - 9:17 am | किसन शिंदे

साहेबांना विनम्र श्रध्दांजली!!

दीपा माने's picture

18 Nov 2012 - 10:08 am | दीपा माने

माननीय बाळासाहेबांच्या थोर आत्म्याला विनम्र अभिवादन! व्यक्ती जाते पण विचार आणि कार्य चालूच रहाते.

एक तेजस्वी पर्व संपले. विनम्र आदरांजली.

अमित's picture

18 Nov 2012 - 10:27 am | अमित

विनम्र श्रध्दांजली...!

हुप्प्या's picture

18 Nov 2012 - 11:22 am | हुप्प्या

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी बाणा ह्यांचा धडाडीने पुरस्कार करणारा एक नेता गेला.
असुनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला अशी मराठीची गत होऊ घातली होती तेव्हा मराठीला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देणार्‍यात बाळासाहेब अग्रस्थानी होते. ह्या एकाच कामाकरता माझ्यासारखे असंख्य मराठी लोक त्यांचे ऋणी राहतील.
शिवाजी महाराजांइतकेच सावरकरांनाही मानणारे आणि ते जाहीरपणे ठणकावून सांगणारे बाळासाहेबच.
त्यांच्या जाण्याने शिवसेनेतच नव्हे तर महाराष्ट्रातही एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माझी मनःपूर्वक श्रद्धांजली.

माम्लेदारचा पन्खा's picture

18 Nov 2012 - 11:50 am | माम्लेदारचा पन्खा

उषाकाळ होता होता काळरात्र झाली.......
मराठी माणसाचा आधारस्तंभ उन्मळून पडला.......
आता फक्त देवच मराठी माणसाला वाचवेल ........
तुमच्या नुसत्या असण्याचा सुद्धा किती आधार होता....
पण तुम्ही चेतवलेल्या ठिणगीचा वणवा होईल याची काळजी आम्ही घेऊ....
साहेब......साहेब.........

संतोषएकांडे's picture

18 Nov 2012 - 12:51 pm | संतोषएकांडे

श्रध्धांजली

खादाड's picture

18 Nov 2012 - 1:22 pm | खादाड

......!

कौन कहेता हैं, जिंदगी में कशिश नही ?
मौत युंही नहीं चली आती ...

बाळासाहेबांना श्रध्दांजली !
~ वाहीदा

अन्या दातार's picture

18 Nov 2012 - 1:49 pm | अन्या दातार

श्रद्धांजली :-(

मराठी माणसाला मुंबईत मानान, ताठ मानेन उभा करणारा आधारस्तंभ हरवला. अरे ये मराठी है। असे सरकास्टीक बोल ऐकणारे आम्ही शिवसैनिकांच्या जोरावर खरच स्वत:ला स्वाभिमानान अश्यावेळी हा! क्यू रे महाराष्ट्रा मे मराठी नाही तो कौन मिलेगा रे? असा उलट विचारू शकत होतो. नोर्थीज ना शिवाजी अकेले ही थे जीन्होने मोगालोका विरोध किया ! इसलिये शिवसेना हमे प्रिय है । हे ही सांगु शकलो ते या वाघाच्या डरकाळीच्या जोरावर. बाळासाहेब जातील पण त्यांनी निर्माण केलेली ही जी स्वभिमानाची जाणिव आहे ती नाही जाणार.

लाल टोपी's picture

18 Nov 2012 - 3:41 pm | लाल टोपी

बाळासाहेब .... एक पर्व काळाच्या पडद्याआड गेले...

Is this a sheer coincidence ?? or Destiny has something to say -
- Bala Saheb (9 word)
- Thackeray (9 word)
- Matoshree (9 word)
- Sena chief (9)
- Time 3:33 (3+3+3)
- funeral start : 9 am
- today date : 18th (1+8 )
- birth year: 1926 (1+9+2+6=18, 1+8=9)
~ अचंबीत वाहीदा

माझीही शॅम्पेन's picture

18 Nov 2012 - 9:33 pm | माझीही शॅम्पेन

जरा तपशीलात घोळ आहे
word नव्हे Letters !!!

ह्या निमित्ताने एक सोप्पा प्रश्न ( न गुगल करता) सांगता येतेय का सांगा)

बाळा साहेबानच पूर्ण नाव काय ? ...... बाळ हे त्यांच नाव नव्हत बर का

.

अर्धवटराव

माझीही शॅम्पेन's picture

18 Nov 2012 - 10:39 pm | माझीही शॅम्पेन

नाही , मी बरेच वेळा हेच ऐकतो पण ते माझ्या माहिती प्रमाणे ते नाही

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 8:38 am | श्री गावसेना प्रमुख

बाळ आहे त्यांच नाव,बाळकेशव नाही.

किसन शिंदे's picture

19 Nov 2012 - 11:28 am | किसन शिंदे

बाळ केशव ठाकरे!

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 11:34 am | श्री गावसेना प्रमुख

त्यांनी बाळकेशव लिहीले,म्हणुन मी खर नाव लिहील.केशव तर त्यांचे वडील

माझीही शॅम्पेन's picture

19 Nov 2012 - 12:55 pm | माझीही शॅम्पेन

माझ्या माहिती नुसार त्यांच खर नाव
श्यामकांत केशव ठाकरे
बाळ - हे त्यांनी धारण केलेल नाव आहे

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 4:08 pm | श्री गावसेना प्रमुख

कसे काय बरे....काही लिखीत

माझीही शॅम्पेन's picture

19 Nov 2012 - 4:18 pm | माझीही शॅम्पेन

ठाकरेंना जवळून ओळखणारे माहिती आहेत , ते बोलताना श्यामकांत (बाळा साहेब) आणि श्रीकांत (बाळा साहेबांचे बंधू) असा उल्लेख करायचे , त्यामुळे गुगल वर ही माहिती मिळणार नाही. धाग्याचा गुंता करण्या आधी थांबतो

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Nov 2012 - 4:33 pm | श्री गावसेना प्रमुख

ठीक आहे,बघुया नंतर

श्री गावसेना प्रमुख's picture

18 Nov 2012 - 5:22 pm | श्री गावसेना प्रमुख

अखेरचा हा तुम्हाला दंडवत साहेब.
1

अत्रुप्त आत्मा's picture

18 Nov 2012 - 5:44 pm | अत्रुप्त आत्मा

अखेरचा हा तुला दंडवत...--^--
:-(

बापू मामा's picture

18 Nov 2012 - 9:47 pm | बापू मामा

बाळासाहेबांची भाषणे,म्हणजे सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनातले पण मुखात न येणारे बोल होते.
जसे आपण पडद्यावर, बच्चनने खलनायकाची केलेली धुलाई पाहिल्यावर आनंदी होउन टाळ्या पिटतो, तसे काहीतरी काळजास
भिडणारे ( पण श्रोत्यांकडून कृतीत न उतरणारे) त्यांचे भाषण असे.
त्यांच्या परखड विचारांना आपण सर्वांनी कृतीची जोड द्यावयास हवी होती, ही खंत वाटत राहील.

आशु जोग's picture

18 Nov 2012 - 10:07 pm | आशु जोग

राज्यसभेवर त्यांनी
प्रीतीश नंदी, राम जेठमलानी, चंद्रिका केनिया,
संजय निरुपम अशा अनेक अमराठी लोकांना संधी दिली.

मराठीच काय तर अमराठी लोकांनाही सामावून घेणारे त्यांचे सर्वसमावेशक नेतॄत्व होते.
खूप आठवणी सांगता येतील...

मालोजीराव's picture

18 Nov 2012 - 11:21 pm | मालोजीराव

balasaheb

सानिकास्वप्निल's picture

19 Nov 2012 - 12:18 am | सानिकास्वप्निल

.

॥ सेनापती ॥'s picture

19 Nov 2012 - 3:59 am | ॥ सेनापती ॥

साहेबांच्या सभेला नेहमीच खच्चून गर्दी होत आली आहे पण सर्वात जास्त गर्दी त्यांनी शेवटच्या सभेला खेचली. ते पण एक शब्दही न बोलता. :)

झाले बहू.. होतील बहू.. परि या सम हा... पु.लं. गेले तेंव्हा असे हळवे क्षण आयुष्यात आले होते. आज ते पुन्हा अनुभवले.

कौशी's picture

19 Nov 2012 - 8:52 am | कौशी

विनम्र श्रद्धांजली ..

कौशी's picture

19 Nov 2012 - 8:52 am | कौशी

विनम्र श्रद्धांजली ..

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2012 - 8:53 am | श्रीरंग_जोशी

कोट्यावधी लोकांप्रमाणेच मीदेखील बाळासाहेबांच्या विचारांपासून प्रेरित होतो, आहे व नेहमीच राहीन. त्यांच्या विचारातील स्पष्टपणा, एकदा घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहण्याची वृत्ती व जीवाला जीव देणारी माणसे घडवण्याची त्यांची हातोटी या गोष्टी आजच्या काळात विरळाच.

त्यांच्याबद्दलची भावलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रत्येक ठिकाणी महत्त्वाची ठरणारी माणसाची जात त्यांच्या पक्षात नगण्य होती; माणसाच्या जातीपेक्षा त्याची योग्यता, कार्यावरील निष्ठा व परिश्रम हेच त्याच्या प्रगतीचा आलेख उंचावू शकत.

रालोआच्या सत्ताकाळात इतर प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्याच्या हितसंबंधांसाठी केंद्रसरकारला वेठीस धरत असताना महाराष्ट्राने नेहमीच त्यागाची भूमिका घेत मोठ्या भावाचे कर्तव्य पार पाडले शेवटी कुणीतरी देशहिताचा विचार केल्याशिवाय राष्ट्राचे गाडे पुढे कसे सरकेल? बाळासाहेबांच्या खंबीर नेतृत्वामुळेच हे शक्य होऊ शकले.

बाळासाहेबांना त्यांच्या सभेत प्रत्यक्ष ऐकण्याच्या अनेक संधी गमावल्याबद्दल मला आजही वैषम्य वाटते. पण १२ वर्षांपूर्वी सेनेचे अधिवेशन आमच्या शहरात झाले होते त्यावेळी त्यांच्या गाड्यांचा ताफा विश्रामगृहाकडे निघालेला असताना रस्त्याच्या कडेने त्यांना बघू शकलो. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती पण तरीही त्यांचे हात लोकांसाठी जोडलेलेच होते. त्यांच्या प्रसिद्ध काँन्टेन्सा गाडीमध्ये शेजारी उद्धव बसले होते. त्या क्षणाकरिता मी स्वतःला भाग्यवान समजतो.

समाजासाठी व देशासाठी असलेले त्यांचे बहुमोल योगदान न बघता त्यांच्या कारकीर्दीतील केवळ काही घटनांचा एकांगी विचार मांडत काही तथाकथित विचारवंत (दुर्दैवाने त्यात बरेच मराठीही आहेत) त्यांच्या मृत्यूदिवशीही त्यांच्याबद्दल वाईट बोलतात हे पाहून मनापासून वाईट वाटते. मराठी माणसाचा आवाज ताकदीने मांडणारा आज कुणीही नाही हे गोष्ट मनाला चटका लावून जाते.

झाले बहु, होतीलही बहु, परंतु यासम हाच.

ज्ञानराम's picture

19 Nov 2012 - 9:36 am | ज्ञानराम

-----/\---- अखेरचा हा तुला दंडवत.

नगरीनिरंजन's picture

19 Nov 2012 - 9:51 am | नगरीनिरंजन

श्रद्धांजली...

अरुण मनोहर's picture

19 Nov 2012 - 11:01 am | अरुण मनोहर

विनम्र श्रद्धांजली.

मूकवाचक's picture

19 Nov 2012 - 11:15 am | मूकवाचक

_/\_

बाळासाहेब तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा व पुन्हा जन्म घ्या.
मुळात थोर लोक आपल्यातुन देहाने जरी गेले तरी ते विचार रुपाने आपल्यात जिवंतच असतात.
शिवाजी महाराजाना जाउन ३ शतक लोटली. तरि ते आपल्यात आजही जिवंत आहेत. शिवाजी महाराज की जय अस म्हणताच आपल्या अंगात जस नवचैतन्य येत उत्साह येतो, अंगावर रोमांच ऊभे राहतात. अगदी तसच बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो असे म्ह्टल्यावर आपल्याला ह्यापुढेही होईल. बाळासाहेब हे आपल्यात जिवंत होते आहेत व राहतीलच.

शिद's picture

19 Nov 2012 - 1:14 pm | शिद

मा.बाळासाहेब ठाकरेंना भावपूर्ण श्रध्दांजली... _/\_

जुइ's picture

19 Nov 2012 - 3:41 pm | जुइ

विनम्र श्रद्धांजली..

पाटव's picture

19 Nov 2012 - 4:14 pm | पाटव

__/\__

लोकनेता कसा असावा याचाच वस्तुपाठ (उपस्थित सर्व नेत्यांना) कालच्या अंतीम प्रवासाने दिला... बहुदा इंदिरा गांधींनंतर अंत्ययात्रेला एवढा जनसागर लोटल्याचा हा पहीलाच प्रसंग असावा...

वामन देशमुख's picture

19 Nov 2012 - 5:44 pm | वामन देशमुख

एकमेव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनम्र श्रद्धांजली!

मी-सौरभ's picture

19 Nov 2012 - 6:39 pm | मी-सौरभ

जय महाराष्ट्र !!!!!!!

मनिमौ's picture

19 Nov 2012 - 7:22 pm | मनिमौ

आज महाराश्ट्र पोरका झाला .

आयुष्कामी's picture

19 Nov 2012 - 8:01 pm | आयुष्कामी

गेली मराठीची ती शान , गेला हि़ंदुत्वाचा तो ज्वलंत अभिमान !

आता उरली आहे ती फक्त आठवण , आठवण आणिक आठवण !!!!!!!

सुधीर१३७'s picture

19 Nov 2012 - 9:38 pm | सुधीर१३७

.

केशवराव's picture

19 Nov 2012 - 10:17 pm | केशवराव

शब्द नाहित .

अप्पा जोगळेकर's picture

19 Nov 2012 - 10:41 pm | अप्पा जोगळेकर

शिवसैनिकांच्या आणि अंत्यसंस्कारांसाठी जमलेल्या लाखो लोकांच्या भावना यांचा विचार करुन शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारांना परवानगी दिली हे समजू शकतो.
पण तिरंगी झेंड्यात गुंडाळले ते पाहून डोके चक्रावून गेले.

॥ सेनापती ॥'s picture

20 Nov 2012 - 3:17 am | ॥ सेनापती ॥

शासकिय इतमामात म्हणजे हे सर्व आलेच की. :)

श्री गावसेना प्रमुख's picture

20 Nov 2012 - 9:56 am | श्री गावसेना प्रमुख

ह्यान्ना काय कळनार

विजय_आंग्रे's picture

20 Nov 2012 - 10:32 am | विजय_आंग्रे

ह्यान्ना काय कळनार
<<
<<
+१००

प्रभाकर पेठकर's picture

20 Nov 2012 - 11:51 am | प्रभाकर पेठकर

प्रबोधनकारांच्या सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली 'शिवसेना' जन्मास आली तेंव्हा मी १३-१४ वर्षांचा असेन. 'राजकारणात कधीच उतरणार नाही' असे म्हणणारी शिवसेना राजकारणात पोहण्याचे पहिले हात मारताना पाहिलेलं आहे. 'मराठी माणूस' हा पत्ता जोरदार चालला. सुरुवातीचा विरोध दाक्षिणात्यांना आणि आधाराचा हात मराठी तरूणाला होता. शिवसेनेच्या जोरावर अनेक मराठी तरूणांना नोकर्‍या मिळाल्या. मी त्यातलाच एक होतो. बाळासाहेबांच्या सडेतोड आणि कोणाचाही मुलाहिजा न राखता केलेल्या विरश्रीयुक्त भाषणांनी स्फुरण चढायचं आणि मनगटात बळ संचारायचं. 'लुंगी हटाव' घोषणेने जोर धरला. पुढे दंगल उसळली त्यात दादरच्या 'विसावा'चा बळी गेला.'शिवसेना पुरस्कृत बटाटावडा' ह्या चळवळीने अनेक मराठी तरूणांना उद्योग धंद्यात उतरवलं. 'हा आवाज कोणाचा.. शिवसेनेचा' वगैरे घोषणा शिवसेनेला भक्कम करण्यात सार्थ ठरल्या. तो काळ आणि बाळासाहेबांची किमया विलक्षण होती. 'मीही व्यवसाय करू शकतो' ह्या विचारांच बीज मराठी तरूणाच्या मनांत रुजलं.
पुढे पुढे राजकारणातील सामान्यमाणसाला अनाकलनिय आणि अस्विकारार्ह तडजोडी, सत्तेसाठी बिजेपीशी हातमिळवणी, स्थानिक राजकारण सोडून केंद्रातील धडपड..... शिवसेना मराठी माणसापासून दूर होत गेली. असो.

काहिही असले तरी शिवसेनेचे, बाळासाहेबांचे मराठी तरूणावर खुप उपकार आहेत्.त्याला स्मरुन.....विनम्र श्रद्धांजली.