चावडीवरच्या गप्पा – बस डे
“काय घारुअण्णा, आज काय मग बसने, मंडईत वाहिनीना घेउन?”, चिंतोपंत एकदम थट्टेखोर हसत.
“अरे हो आज बस डे होता नाही का! आज काही बाहेर जायला झालेच नाही. त्यामुळे काय झाले ह्या बस डेचे काही कळलेच नाही”, नारुतात्या.
“अहो कसला डोंबलाचा बस डे अन काय, आमच्या हिला पण भारीच हौस.”, घारुअण्णा भयंकर त्राग्याने.
“काय झाले?”, इति नारुतात्या.
“अरे, चांगले म्हणत होतो की आपली स्कूटर घेउन जाऊ, पण नाही! नवरोबाचे ऐकेल ती बायको कसली.”, घारुअण्णा घुश्श्यात.
“अहो, काय झाले ते नेमके सांगाल का, का उगाच त्रागा करताय एवढा.”, इति नारुतात्या.
“शिंचा बस डे म्हणे! आपण सच्चे पुणेकर आहोत तर बस डे पाळलाच पाहिजे, असे म्हणून चक्क पीएमटीच्या बसने घेउन गेली मला मंडईत.”, घारुअण्णा तणतणत.
“अहो त्यात रागावण्यासारखे काय काय एवढे? बरोबरच म्हणाल्या की वाहिनी, त्यात त्यांचे काय चुकले ?”, इति भुजबळकाका.
“तरी म्हटलेच अजून बहुजानह्रदयसम्राट कसे नाही बोलले. अहो त्या मोडक्या पीएमटी बसने कधी प्रवास केला आहे का तुम्ही ?”, घारुअण्णा अजून घुश्श्यात, “सगळी बस कराकरा वाजत होती, होर्न सोडून सगळ वाजत होते! त्यात पुन्हा शिवाय पत्रे ठिकठिकाणी फाटलेले, त्याने कुठे लागू नये, विजार फाटू नये त्यासाठी कसरत करावी लागली ती वेगळीच.”
“च्यामारी, परवा तर, छॅsss, आपल्या पुण्याची सगळी रया गेली, कसला हा ट्राफिक जॅम होतो आजकाल असे तुम्हीच कोकलत होतात ना!”, भुजबळकाका उपरोधाने.
“अहो बहुजानह्रदयसम्राट, प्रत्येक वेळी वाकड्यांतच शिरायला हवें का?”, घारुअण्णा लालेलाल होऊन.
“खरे आहे हो भुजबळकाका, घारुअण्णा म्हणताहेत ते, बसेसची अवस्था तशीच आहे पुण्यात, मुंबईच्या बेस्ट सारखी काही सेवा नाही पुण्यात.”, इति चिंतोपंत.
“त्या मुंबईकरांना नाही काही असले बस डे वैगरे पाळावे लागत. तिथे बस कशा चकाचक असतात.”, घारुअण्णा रागाने.
“अहो घारुअण्णा, तिकडे मुंबईत सगळे, प्रवास बस नाहीतर लोकलनेच करतात!”, नारुतात्या.
“नाहीतर काय, तुम्हाला तर बुडाखाली गाडी घेतल्याशिवाय बाहेर निघायला नको असते, मग त्या बसेसची सेवा चांगली असावी म्हणून प्रशासनावर दडपण आणणार कोण ?”, शामराव बारामतीकर चर्चेच्या मैदानात उतरत.
“व्वा! ह्याला म्हणतात निष्ठा, ह्यांच्या सकाळ समुहाने आयोजित केला ना हा बस डे, मग तर हे त्याचे गुण गाणारच”, घारुअण्णा उपरोधाने.
“घारुअण्णा, तुम्ही उगाच माझ्या निष्ठेवर घसरू नका. तो विषय काढायचं काम नाही.”, शामराव बारामतीकर जरा तडकून.
“हो ना! घारुअण्णा, तुमचा नेमका राग कशावर आहे? वाहिनी तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध बसने घेउन गेल्या म्हणून की सकाळ समुहाने बस डे आयोजित केला म्हणून खी…खी…खी..”, भुजबळकाकाही आता जरा थट्टेने .
“तुम्हाला नाही कळणार हो बहुजानह्रदयसम्राट. तुम्हाला समजूनच घ्यायचे नाहीयेय तर बोलून काय उपयोग?”, घारुअण्णा हताशपणे.
“पण सांगा की नीट समजावून मग, तुम्हाला काय म्हणायचे ते.”, भुजबळकाका जरा सिरीयस होत.
“अहो, मला सांगा, हे असले बस डे वैगरे साजरे करून काय साध्य होणार आहे? उद्यापासून येरे माझ्या मागल्याच ना! हे असले पालथे धंदे सांगितलेत कोणी.”, घारुअण्णा.
“ही तुमची टोकाची भूमिका आहे असे नाही तुम्हाला वाटत?”, भुजबळकाका.
“अरें देवा! ह्या भुजबळकाकांना माझे म्हणणे कधी पटणार हे तो विश्वेश्वरच जाणे.”, घारुअण्णा उद्वेगाने.
“घारुअण्णा, अगदी विश्वेश्वरापर्यंत जायची काही गरज नाहीयेय! मलाही तुमचे म्हणणे जरा टोकाचेच वाटत आहे.”, इतका वेळ शांत असलेले सोकाजीनाना.
“तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, सोकाजीनाना?”, घारुअण्णा जरा शांत होत.
“अहो आपल्या देशात इतके डे साजरे होतातच ना? त्यात अजून एक. बाकीचे ते सगळे डे जवळजवळ परदेशीच असतात. आपला हा बस डे तर खास स्वदेशी आहे की नाही? तोही चक्क मराठमोळ्या पुण्यातला. त्याचा आपल्याला अभिनान असला पाहिजे आणि असे काहीतरी अभिनव करण्याची प्रथा पुणेकर कायम ठेवत आहे त्याचाही”, सोकाजीनाना मंद हसत.
“गमतीचा भाग सोडा. पण आज पुण्यात किती वाहने झाली आहेत बघा आणि त्यात पुन्हा हे वाहन म्हणजे स्टेटस सिम्बॉल. अहो सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यात कसला आलाय कमीपणा. तिकडे जपानमध्ये एका कम्पनीचा सीइओ सुद्धा सब-वेने प्रवास करतो. रस्त्यावरची वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तिला पर्यायी विकल्प शोधायला नको का? त्यासाठी जनमानस तयार व्हायला हवे ना. हा सकाळ समुहाचा एक प्रयत्न, त्या दृष्टीने टाकलेले एक पहिले पाउल, म्हणून ह्याकडे सकारात्मक दृष्टीने बघूयात ना. हे जनमानस तयार झाले तर त्या जनमानसाच्या रेट्याने बससेवा सुधारित, चांगली आणि प्रवास करण्यायोग्य करण्यासाठी प्रशासनावर दबावही आणता येईलच की. करायच्या आधीच नुसते, हं, असल्याने काय होणार आहे, पालथे धंदे सगळे, असला निराशावाद आणि नकारात्मक भूमिका का घ्या?”
“काय झाले आहे की आजच्या जमान्यात कशाकडेही शंकास्पद नजरेने आणि नकारात्मक बघायची सवयच, लागलीय आपल्याला. जरा मोकळ्या मनाने विचार करा. एका दिवसात किती इंधन वाचले आज, किती प्रदूषणही कमी झाले असेल? कितीतरी जणांना, किती कमी पैशात ऑफिसला जाता येते ते आज पहिल्यांदाच कळले असेल. कितीतरी जणांच्या शरीराला आज कधी नव्हे तो व्यायाम मिळाला असेल असेल, बसप्रवासात त्रास होउन. त्यातून समजा एखाद्याने जरी नेहमी सार्वजनिक वाहतुकीनेच प्रवास करायचे असे ठरवले तरीही हा बस डे साजरा करण्याच्या प्रयत्नाला यश आले असे म्हणता येईल ना!”
“मी तर म्हणतो की फळाची अपेक्षा कराच का? फक्त कर्म करूयात की. नुसताच अजून एक ‘डे’ साजरा झाला असे समजूयात. काय? तेव्हा सोडा ह्या फुकाच्या बातां आणि चहा मागवा”. सोकाजीनाना हसू कायम ठेवत.
घारुअण्णांनी मान हालवत चहाची आणि हसत ऑर्डर देण्यास दुजोरा दिला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छानच
आता त माझी खात्रीच पटली ..
:)
खरय नाना ,
विशेश मिशेश
खूप छान. पण मुंबईची तुलना ती
:(
हाहा. बरं.
टी.आर.पी
सोकाजी नाना तुमचे घारु , नारु
:)
म्या उचालतो ह्यो इडा
अब्या , तुझच नाव घेणार होती
डन!
हांगाश्शी
भुजबळांचे बुज्बळीकरण पाहून
ज्यांनी ज्यांनी हा 'बस'डे
ब्रेकिंग न्युज!!
काल जरा
नाइलाजास्तव बाईक डे..
नाइलाजास्तव बाईक डे
मराठी रॉक्स बगा हो, काय त्या
मे ए ए ए लो ओ ओ ...
ह्म्म्म... चीन ने या आधीच या
सोत्रिअण्णा ते पार्टीत दुस्रं
का?? कुणाच्या घरी का??
का ओ पूजाज्जी मंदलि कुनच्य
मस्त आहे हो तुमची चावडी. उगा
मस्त ओ सोत्रि, मजा आली.
सोत्रि साहेब, कथेतुन प्रबोधन एकदम मस्त.
पुण्यासाठी मनामध्ये विशेष
बॅटमॅन साहेब, अहो माझ पुण्यात घर आहे म्हणुन म्हटल तस.
चावडीवरच्या गप्पा ऐकायला
छान...सदर आवडले आहे ( ही फकत
मस्त!