' बस - डे '

अमोल केळकर's picture
अमोल केळकर in काथ्याकूट
19 Oct 2012 - 5:12 pm
गाभा: 

सध्या अनेक ' डेज' ना बस ... बस... म्हणायची वेळ आली असताना, पुण्यनगरीत १ नोव्हेंबरला ' बस डे 'साजरा करण्यात येणार आहे असे कळते. या दिवशी ( च फक्त ) बहुतेक जणांनी सार्वजनीक वाहनातून ( पक्षी - पुण्याच्या शहरी बससेवेतून ) प्रवास करायचे ठरवले आहे. अनेक उद्योगपतींनी याकामी आपले बहुमुल्य योगदान ( म्हणजे फक्त पैसे का? ) दिले असल्याचे कळते. अनेक स्वयंसेवी संस्था, सकाळ समुह यांनी यात आघाडी घेतली आहे.
अर्थात याचा मुख्य उद्देश काय आहे . केवळ तोट्यात चालणा-या शहरी बसेसना नवसंजीवनी देणे आहे का? का आणखी इतरही काही उद्देष्टे आहेत. पुणेकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हे काथ्याकूट.
अर्थात या उपक्र्मातून आम्ही पुण्यात आल्यावर आम्हाला सहजासहजी प्रवास करण्यासाठी ही बसची सेवा मिळाली तर रिक्षाच्या खर्चात बचत :)

आपला
अमोल केळकर

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

19 Oct 2012 - 5:42 pm | मदनबाण

पुणेकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हे काथ्याकूट.
ठाणेकर असल्यामुळे पास म्हणतो.

वाहतुकीचा प्रश्न थोडा सोडवणे , प्रदूषण कमी करणे, इंधनखर्च वाचवणे यासगळ्यासाठी हा प्रयत्न आहे असे पेप्रात वाचून समजले. शहरातील 'बडी हस्तीयाँ' अर्थातच बसने प्रवास करू शकण्याची परिस्थिती अजून पुण्यात नाही म्हणून त्यांनी फक्त आर्थिक मदत केली असेल (काहीच न करण्यापेक्षा बरे.). आता हे किती यशस्वी होते ते पहावे लागेल.

चिरोटा's picture

19 Oct 2012 - 7:46 pm | चिरोटा

बस डे आधी ३१ ऑक्टोबरला बस्-आंघोळ डे साजरा व्हावा.

अहो खरचं सगळ्या बस ना ३१ ऑक्टोबरला आंघोळ घालुन १ तारखेला बाहेर काढ्णार आहेत

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2012 - 11:42 am | llपुण्याचे पेशवेll

बस डे निमित्त घरी बसायचे ठरवले आहे. :)

मी-सौरभ's picture

19 Oct 2012 - 7:50 pm | मी-सौरभ

फार फरक पडेल असे वाटत नाही :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Oct 2012 - 7:53 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आनंद आहे ;-)

रामपुरी's picture

19 Oct 2012 - 9:00 pm | रामपुरी

'सकाळ' चा उद्देश सरळ सरळ प्रसिद्धी मिळवणे, जमल्यास पैसे खाणे असा दिसत आहे. शेवटी 'साहेबांचं' आणि 'टग्याचं' वर्तमानपत्र आहे.

रामपुरी's picture

19 Oct 2012 - 9:04 pm | रामपुरी

सगळं एक दिवसाचं नाटक

अर्धवटराव's picture

19 Oct 2012 - 10:39 pm | अर्धवटराव

उगाच सकाळच्या नावाने बोंब मारण्यात किंवा साहेबद्वयांना शिव्या घालण्यात काहि पॉईंट नाहि. सार्वजनीक वाहतुकिची एक स्ट्रेस टेस्ट म्हणुन या उपक्रमाकडे बघावे. १ नोव्हेंबरला जर रस्त्यांवर जाणवण्या इतपत फरक दिसला तर पुणेकरांच्या आशेला थोडी पालवी तरी फुटेल.

अर्धवटराव

रामपुरी's picture

20 Oct 2012 - 6:40 am | रामपुरी

आणि ती पालवी दुसर्‍या दिवशी मरून जाईल. एक दिवस 'बस डे' करून ..ट फरक पडणार नाही. हे खोटं ठरलं तर नाव बदलीन (आयडीचं).
बाकी सकाळच्या नावाने बोंबही मारलेली नाही आणि साहेबद्वयांना शिव्या पण घालायचा उद्देश नाही. कारण दोघांनाही त्याने काही फरक पडणार नाही. एवढी सगळी उठाठेव करण्यापेक्षा सकाळने फक्त त्यांचं मराठी सुधारलं आणि मराठीच हिंदीकरण थांबवलं तरी खूप झालं...

झाले , खुपसलात सुरा ;-)
बाकी साहेबद्वया बद्दल इतका आत्मविस्वास तर आमच्या प्रा डॉ ना पन नसेल.

अर्धवटराव's picture

21 Oct 2012 - 11:44 am | अर्धवटराव

एक दिवस बस डे करुन फार काहि फरक पडायला ति काय दांडीयात्रा आहे होय. जिथे अनेकदा बाँबस्फोट होऊन देखील लोकांच्या मानसिकतेत ..ट फरक पडला नाहि तिथे बिचारी एक दिवसाची बस म्हणजे किस झाड कि पत्ती. पण मग सकाळ सारख्या वृत्तपत्राने पब्लीक ट्रान्स्पोर्ट सुरु करावं अशी अपेक्षा ठेवावी काय ? लोकजागृती (टाईमपास म्हणा हवं तर) करणं त्यांच काम... बाकी लोकांनी आणि सरकारने बघुन घ्यावं.

बाकी सकाळने त्यांचं मराठी सुधारलं तर्॑ पुण्याची वाहतुक समस्या कशी सुटेल याचा विचार करतोय.

अर्धवटराव

मैत्र's picture

22 Oct 2012 - 4:52 pm | मैत्र

दोन्ही मुद्द्यांशी प्रचंड सहमत आहे!

अर्धवटराव जोरदार एकदम .
सहमत!

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2012 - 11:56 am | llपुण्याचे पेशवेll

बाकी सकाळने त्यांचं मराठी सुधारलं तर्॑ पुण्याची वाहतुक समस्या कशी सुटेल याचा विचार करतोय.

+१११२
परंतु सकाळने त्यांचे मराठी सुधारावे ही अपेक्षा रास्त नक्कीच आहे.

अविनाश पांढरकर's picture

26 Oct 2012 - 11:29 am | अविनाश पांढरकर

नाव(आयडीचं)कस बदलायच ते सांगा?

अत्रुप्त आत्मा's picture

19 Oct 2012 - 11:37 pm | अत्रुप्त आत्मा

बस करो अब...! ;-)

आशु जोग's picture

20 Oct 2012 - 12:54 am | आशु जोग

बी आर टी, एफ डी आय, हेल्मेट ची सक्ती, लक्ष्मी रोडचे उलटे पालटे पार्कींग
मेट्रो,

सध्या कोणतीही नवी गोष्ट सरकारकडून आली की ती जनतेच्या हितासाठी आहे असा गैरसमज
करून घ्यायचे नाही असे ठरवले आहे.

सरकारमधल्या कोणाचेतरी हित नक्की असते असा अनुभव आहे.

सूड's picture

20 Oct 2012 - 6:50 am | सूड

हम्म !! असंय होय!!

सुहास's picture

20 Oct 2012 - 7:16 am | सुहास

बसने नेहमी प्रवास करणार्‍यांना एक विनंती आपण १ नोव्हेंबर या दिवशी बसने प्रवास करू नये...! म्हणजे सकाळचा बस डे प्रोग्राम यशस्वी होईल..!

-- सुहास

अमोल केळकर's picture

20 Oct 2012 - 9:02 am | अमोल केळकर

हा हा हा :) हे बाकी मस्तच

अहो बस-डेच्या नुसत्या गफ्फा आहेत गफ्फा!!!

बाष्कळ उपक्रम आहे.पुण्यातला कोणताही शहाणा माणूस नाईलाजाशिवाय पीमटीने प्रवास करणार नाही.

सांजसंध्या's picture

21 Oct 2012 - 12:49 pm | सांजसंध्या

काय भानगड आहे ही नेमकी ? समजा आपण टू व्हीलर रस्त्यावर नेलीच त्या दिवशी तर दगाफटका तर नाही ना होणार ?

चिंतातूर बाहुली

आपल्या प्रोफाईल नुसार आपले वास्तव्य वास्को बर्डी गोवा येथे असते, मग तिथे आपण रस्त्यावर दुचाकी आणली काय किंवा एअरबस आणली काय, पुणेकरांना काय त्याचे ? आमच्या शाखाधर्मानुसार आमच्या कुठेही शाखा नाहीत तस्मात इतर कुठेही कुणी काय करावे हा आमचा प्रश्न नाही.

आणि तरी देखिल टु व्हिलर न्यायचीच असेल तर मा. सदस्य. श्री. उगाच काहीतरी यांच्या शेजा-यांचा बोका सोबत घेउन जा, हाकानाका.

सांजसंध्या's picture

22 Oct 2012 - 4:16 pm | सांजसंध्या

आम्ही गोवन नाही असं करत. पुणेकर असले म्हणून काय झालं ..त्यांनाही आपले म्हणा, असंच आपलं आमचं धोरण ! म्हणून काळजीने विचारलं. नाहीतर इथलं निवांत आयुष्य सोडून धूर खात बसच्या मागे फिरण्याची हिंमत असायला जन्म पण पुण्यातलाच हवा..चुभूदेघे
हलके घ्याल ही अपेक्षा ( क्वचितच दिलेल्या प्रतिसादांपैकी आहे :फिदी) )

अत्रुप्त आत्मा's picture

22 Oct 2012 - 6:46 pm | अत्रुप्त आत्मा

सगळ्या प्रतिसादाशी सहमत आहे... :-)

जय - गणेश's picture

22 Oct 2012 - 3:02 pm | जय - गणेश

साह॓ब = कोण ?

कर्ण's picture

22 Oct 2012 - 4:08 pm | कर्ण

पी म टी च्या वाहक आणि चालकांना 'तमीज' आली तर रोजच बस-डे होईल.

सूड's picture

22 Oct 2012 - 4:19 pm | सूड

"तमीज" म्हणजे काय रे भाऊ ?

अंगातली कमीज न काढता जे करतात त्याला तमीज म्हणत असावेत.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2012 - 12:07 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो अंगतली कमीज़ काढली तर तमीज़ नाही असे म्हणतात. म्हणजे तमीज वगैरे गोष्ट म्हणजे शर्टावर लावायचा टाय वगैरे असेल. जसे आम्ही टाय बांधायला शिकल्यावर टाय बांधाता येतो असे म्हणते तसे तमीज वगैरे बांधता, सोडता येणारी एखादी चीज़ असावी असे वाटते आहे. बाकी तमी का तमीज़

बॅटमॅन's picture

1 Nov 2012 - 12:11 pm | बॅटमॅन

तमीज़ बरोबर आहे, तो ज़ चा उच्चार वेगळा दाखविण्याची हिंदीत्/ऊर्दूत सोय आहे, मराठीत नाही. खरे तर च़, ज़, झ़ अशी तीन वेगळी अक्षरचिन्हे रूढ केल्यास लिहिण्याबोलण्यातले कन्फ्यूजन अजू़न दूर होईल.

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Nov 2012 - 12:15 pm | llपुण्याचे पेशवेll

विनोबांच्या गीताई मधे तुम्ही उधृत केलेली अक्षरे तशी लिहायचे पोएटीक लायसन्स विनोबांनी वापरलेले दिसते. :)

खरं का काय? बघितले पाहिजे मग :) हे तर इंट्रेस्टिंग आहे एकदम!

बॅटमॅन's picture

22 Oct 2012 - 4:52 pm | बॅटमॅन

तमीज सोडा पयलं ते बसगिस पुरेशा आणा म्हंतो मी! नुस्तं यक हज्जार बशी पळतेत हिकडून तिकडं हुच्चपैकी पण पायजेत तब्बल ३००० वो..उर्लेल्या बशी कुणीकन्डं आण्णार ते एक थोडं सांगा अन मंग बोला तमीज आणि कमीजच्या वार्ता. हिकडे आमची झालेय नाचीज कनीज दर्रोज हपीसला/कुठेही जायचं म्हंजे.

दादा कोंडके's picture

24 Oct 2012 - 12:37 am | दादा कोंडके

हुच्चपैकी पण पायजेत तब्बल ३००० वो

नुस्त्या बशी आसून काय फायदा न्हाई पघा. त्येंवर लक्ष कोन ठेवनार? म्हागल्या टायमाला त्या मानेनी येक बस पळवली तर किती जीव ग्येले.

पिशी अबोली's picture

23 Oct 2012 - 12:23 am | पिशी अबोली

पुण्यात कायम बसप्रवास करणे म्हण्जे दिव्य काम..आणि अनेक बसेस वर 'आतातरी मला धुवा' अशा खास पुणेरी सूचनाही दिसतात..या आणि अशा परिस्थिति मध्ये काही फरक पडणार असेल तर काही फायदा..नाहीतर २ तारखेपासून पुन्हा आपल 'ये रे बाईक घेऊन पीएमटी च्या मागल्या'..

पी एम टी बसने रेग्युलर प्रवास करणार्‍यांनी आपले अनुभव अपेक्षा लिहील्या तर बरे होइल

इतरांचे म्हणजे आपले उंटावरून शेळ्या हाकणे

अन्या दातार's picture

23 Oct 2012 - 8:05 am | अन्या दातार

टारझनच्या लेखाची राहून राहून आठवण होतेय
कुणीतरी लिंक डकवा रे!

जतीन's picture

23 Oct 2012 - 10:17 am | जतीन

बस डे बस डे म्हणून हि जी चर्चा चालू आहे. पण आपण महिन्यातून एक दिवस तरी वॉकिंग डे साजरा केला पाहिजे.

तलाठी's picture

23 Oct 2012 - 11:16 am | तलाठी

एक प्रयत्न करतायेत..बघु काय होते ते...ण्हायतर हायेच ये रे माझ्या मागल्या....

मी_आहे_ना's picture

23 Oct 2012 - 2:18 pm | मी_आहे_ना

कालच पुण्याचे लाडके खासदार रा.रा. कलमाडी ह्यांनी 'पी एम पी'ला फायद्यात आणण्यासाठी बस ने (२ स्टॉप का असेना) प्रवास केला (बातमी)
मी तर म्हणतो, ह्यांनी घपला केलेले पैसे काढले आणि सरकार-जमा केले ना तर पी.एम.पी.च काय, यस्टी सुद्धा फायद्यात येइल.

चला, त्यांच्या हातून तिकिटाचे तरी पैसे सुटले म्हणायचे. बाकी काही बोलण्यासारखे राहिले नाही. लोकांच्या चेहर्‍यावर हास्य कश्याला यायला हवं? लोकांनाही कळत नाही अश्या मनुष्याला कसं वागवायचं ते!

सकाळच्या वार्ताहराला सांगून मग बसमध्ये बसले काय कलमाडी ? का योगायोगानं त्यांचा रिपोर्टर पण त्याच बसनं प्रवास करत होता ? नाय, सकाळवाल्यानी फोटोबिटो छापलेनीत म्हणून म्हटलं.

श्रीरंग_जोशी's picture

26 Oct 2012 - 8:19 am | श्रीरंग_जोशी

काही नतद्रष्ट लोकांमूळे भाईंच्या हातून कारभारीपणा गेला नाही तर आजवर पीएमपीएमएलने हेलिकॉप्टर सेवा सुरू केली असती. कात्रज - तळजाई - वेताळबाबा - पर्वती - चतुश्रूंगी - निगडी... अन पुण्यातले रस्ते पुन्हा एकदा मोकळे झाले असते. काळाच्या नेहेमी पुढेच चालतात भाई.२०४० चे ऑलिंपिकसुद्धा भरले असते पुण्यात.

बस डे चे आयोजन करण्यार्‍यांनी आधी पीएमटी ने महिना भर प्रवास करावा आणि मग खर्‍या समस्या जाणून घेऊन उपक्रमांचे आयोजन करावे. रोजच पीएमटी ने प्रवास करण्यार्‍यांना कसले आले आहे बस डे चे कौतूक. मी तरी त्या पीएमटीला कंटाळूनच स्कूटी घेतली.

लटकलेल्यांना लटकणे म्हणजे पी एम टी चा प्रवास

अनि अधून मधून खिशातले पैशे जाणे

माम्लेदारचा पन्खा's picture

24 Oct 2012 - 4:05 pm | माम्लेदारचा पन्खा

मागे एकदा याची देही याची डोळा प्रत्यक्ष पहिले होते कि पीएमटी च्या बस रात्रभर आगारात चालू ठेवतात कारण बंद केली तर दुसऱ्या दिवशी ती सुरु होत नाही......अजून ही तीच परिस्थिती आहे का?

कान्होबा's picture

25 Oct 2012 - 8:19 pm | कान्होबा

आधि रोजच्या बस निट चालूदेत अहो आज आलेली बस उद्या असेलच याची खात्री या पी यम पी यम एल वाल्याना देता येत नाही आणी ३००० बस काय कर्म चालवणार हे दिवसभरात.सकाळ्च्या एखद्या रुट वर असलेली गाडी संध्याकाळी असेलच याची शाश्वती नसते ती मधेच कुथत कुथत शेवटच्या घट्का मोजत असते.
मी गेले ७ वर्षा पी एम टी ने प्रवास करतो पण सकाळ आणी संध्याकाळ च्या वेळेत कधी वेळेवर बस मिळेल तर शपथ.कधी एका पायावर उभे राहुन तर कधी अंतराळत प्रवास करत असल्यासार्खे वाट्ते
काही उदाहरण देतो--------
१)७ आक्टोबर ला सन्ध्याकाळी ३.५० ला मि स्वतः सिंह्गड रोड्च्या संतोष हाल च्या इस्टाप ला शनिपार ला जायला थांबलो होतो तर ४.४५ पर्यत १ ही बस आली नाही.आणी हे १ तारखे ला म्हने ३००० बस चालवणार.
२)शनिपार ते दत्तवाडी या गाडिला प्रत्येक ट्रिप ला हाताच्या बोटावर मोजता येतील इतके प्रवासी असतात कधी तर चालक वाहक दोघच गाडी घेउन फेरया मारत असतात आणी या बस ची एका पाळी ची रक्कम ३००-४०० रु.च्या वर कधी जात नाही आणी यात चालक वाहकाचा सुद्धा खर्च निघत नाही मग अशा गाड्या चालवण्या पेक्शा जिथे गर्दी असते तिथे बस वाढ्वा ना..
३)कुंबरे पार्क,कोथरुड डेपो,धायरी इ. काही रुट ला तर एका मागे एक स्पर्धा असल्यासारख्या ४-४ बस सोड्तात यामुळे अर्निंग काय कपाळ वाढ्णार.
४) काही दिवसापुर्वी गाडीत जागा असुनही इस्टाप सोडुन पुढे चाललेली गाडी मी शिटी मारुन थांबवली तर वाह्क मलाच त्याचा जाब विचारायला लागला म्हणे तुला काय करायचे आहे. असे हे चालक वाह्क हातात विमाने दिल्यासारख्या बस चालवत असतात ते सुद्धा ८ तासाच्या डयुटि मद्धे. मी असे ऐकले आहे १ तारखेला सर्वा चालक वाहकाना १६ तास ड्युटी लावणार आहेत मग या १६ तासात ही लोकं प्रवाशांना स्वर्ग म्रुत्यु नरक पाताळ सगळीकडे फिरवुन आणतील नव्हे पोचवतीलच.
असो आता यावरुनच काय ते ठरवा १ तारखेला काय काय अनुभवायला मिळेल!!!!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

25 Oct 2012 - 10:35 pm | अत्रुप्त आत्मा

@मग या १६ तासात ही लोकं प्रवाशांना स्वर्ग म्रुत्यु नरक पाताळ सगळीकडे फिरवुन आणतील नव्हे पोचवतीलच.>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif आंम्ही कान्होबांबरोबर १/२ वेळा पुण्यात पी...एम-टी ने फिरलो आहे,त्यांचा या यंत्रणेचा अभ्यास सॉल्लिड आहे...खुद्द चालु फेरीत मेन हेड ऑफिसला फोन करून ऑन ड्युटी कंडक्टरला घाम फोडण्याची त्यांची पद्धत आहे. त्यामुळे त्यांच्या मतावर आमी फकस्त,व्हय जी..व्हय जी... येवढच म्हणू शकतो... ;-)

म्हणजे १ तारखेला सर्व चालक मंडळी मानेच्या पावलावर पाऊल टाकणार तर !!

मी_आहे_ना's picture

26 Oct 2012 - 12:16 pm | मी_आहे_ना

पण अहो, मानेनी चालवलेली ती 'बर्‍या' कंडीशनमधली एसटी होती. पीएमपी बस 'तशी' पळेल का. असो.
मंडईच्या स्टॉपलाही असेच पीएमपी चालक-वाहक नं थांबता पुढे जातात, तिथल्या शेयर-ऑटो ह्यांच्याच असतात म्हणे.

सूड's picture

26 Oct 2012 - 3:58 pm | सूड

पीएमपी बस 'तशी' पळेल का.
रस्ता आपल्याला आंदण दिलाय असं समजून ते गाड्या चालवतात. मनात येईल तिथे थांबणार, नाही वाटत तिथून सुसाट पळवणार. :D

चितळेंनी किती दिलेत ?

कान्होबा's picture

31 Oct 2012 - 6:20 pm | कान्होबा

अहो चितळे सदाशिव पेठी त्यांच्या हातुन बाकरवडी सुटली तरी खुप झाले

खेडूत's picture

31 Oct 2012 - 10:52 pm | खेडूत

कै च्या कै ..
एक कोटी देणारया ची वार्षिक उलाढाल पाच हजार कोटी आहे असे वाचले.
एकमेकांची दोन-दोन कामे करणारे असे खर्च करू शकतात..
शिवाय बस-डे ला देणग्या का लागणार आहेत? लोक तिकीट काढणार आहेत ना?

आनन्दा's picture

26 Oct 2012 - 6:24 pm | आनन्दा

बाकी १६ तास बस चालवणार असतील तर आपण बसमध्ये बसलेलेच बरे. उगीच बाहेर रस्त्यावर राहून आपला जीव धोक्यात का बरे घाला?

पप्पु अंकल's picture

26 Oct 2012 - 9:52 pm | पप्पु अंकल

आपण सध्या कुठे आहात से ५ का पुणे?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

31 Oct 2012 - 10:39 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी अजिबात पी.एम.पी.एम.एल. च्या भरवसा ठेवणार नाही. आपल्याच हिशातले पैसे घालावुन आपलाच अपमान कोण करून घेणार? त्या पी.एम.पी.एम.एल ला कुठे आग लागलेली दिसली तर मी स्वखर्चानी अजुन पेत्रोल टाकीन त्याच्यावर.

कान्होबा's picture

1 Nov 2012 - 10:26 am | कान्होबा

२-४ टाळकी घेउन बस फिरत आहेत रिकाम्या काय उपयोग झाला बस डे चा.

५० फक्त's picture

1 Nov 2012 - 12:12 pm | ५० फक्त

एगझॅक्टली, एकाच मार्गावर एकामागुन एक बस अशा फिरत आहेत की जसं एका बाजुला त्सुनामी आली आहे अन तिथुन लोकं भरुन परत आणायची आहेत. एकुण ३०% ट्रॅफिक कमी आहे पण ज्यांना टायमावर पळायचं आहे ते बसडे पासुन लांबच आहेत.

कुंदन's picture

1 Nov 2012 - 11:24 am | कुंदन

आज आमच्या दुबैत पण Public Transport Day साजरा करत आहेत , त्या निमित्ताने बहुध बस प्रवास मोफत आहे असे ऐकण्यात आले आहे. तेंव्हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा.