गाभा:
राष्ट्रवादीचे धुरंधर, धडाडीचे नेते अजितदादा पवारांनी आपला राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली आहे.
आता हे करुन काकाला धोका दिला का झोका दिला आणि ह्यातले बाबाकरता किती आणि साहेबांकरता किती आणि अशाच सुरस आणि चमचमीत चर्चांनी टीव्ही व अन्य माध्यमे भरून गेली आहेत.
पांढरे नामक एका अधिकार्याने पर्दाफाश करुन अजितरावजीदादासाहेब पवारांचे काळे धंदे उघडकीस आणले म्हणून नाईलाजाने दादांना हे करावे लागले असे म्हणतात. आता पांढर्यांचे काही काळेबेरे होते का बघायचे.
पाटबंधारे खाते खायला चांगले असावे असे दिसते आहे. अजितदादा, तटकरे अशी भ्रष्टाचारातील रथी, अतीरथी मंडळी त्यात पडलेली दिसतात.
बघू आता हे पेल्यातले वादळ आहे का काही मोठे घडते ते.
प्रतिक्रिया
26 Sep 2012 - 9:11 am | सुहास..
पण थोडा डिट्टेल वारी घेतला असता तर बरे वाटले असते हुप्प्या शेट ! :)
माझे काही राजकीय अंदाज
१ ) ही पुर्णतः मोठ्या पवारांची खेळी आहे, ते सध्या ' रस्ता ' बनवित आहेत, सुप्रिया सुळेंसाठी . उद्या आपल्याला सुप्रिया सुळे मोठ्या पदावर दिसल्या तर मला काडीमात्र आश्चर्य वाटणार नाही.
२ ) सिंचन ची श्वेतपत्रिका निघाली तर ( ती निघालीच पाहिजे ! ) अजित पवारांची राजकीय कारकीर्द संपणार होती , शिवाय राष्ट्रवादीची प्रतिमा धुळीस मिळणार होती. म्हणुन थोडी साफ-सफाई म्हणुन राजीनामा - नाट्य , अर्थात पब्लीक ला हे सांगु शकत नाही .
३ ) सरकार ला बाहेरून पाठिंबा देण्याचे कारण = मध्यावधी निवडणुकांच खापर रा.कॉ. वर फोडल्या जावु नये म्हणुन ही असु शकतो .
अर्थात गणित फायदा तोट्याचे आहेत , पृथ्वीराज चव्हाण ' पाटबंधारे ' नंतर , सगळ्याच जिल्हा बॅंकेच्या ( ज्या बहुतांशी रा,कॉ. च्या हातात आहेत) मागे लागणार होते, हे ही एक सबळ कारण असु शकते :)
26 Sep 2012 - 9:29 am | सोत्रि
सर्व मुद्द्यांना +१
-(कसलीच पावर नसून प्ले करणारा) सोकाजी
26 Sep 2012 - 9:35 am | सहज
>>पृथ्वीराज चव्हाण ' पाटबंधारे ' नंतर , सगळ्याच जिल्हा बॅंकेच्या ( ज्या बहुतांशी रा,कॉ. च्या हातात आहेत) मागे लागणार होते,
हे महाराष्ट्राच्या (सामान्य लोकांच्या) दृष्टिने चांगले की वाईट?
26 Sep 2012 - 9:52 am | सुहास..
हे महाराष्ट्राच्या (सामान्य लोकांच्या) दृष्टिने चांगले की वाईट? >>>
सामान्य लोकांसाठी ( विषेशता ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी ) खुप चांगले, आणि साखर कारखान्यांमधील , चेयरमन पासुन ते क्लर्क पर्यंत पसरलेल्या रा.कॉ. च्या सामान्य आणि अग्रीम कार्यकर्त्यांसाठी ( यात काही अंशी शेतकरी वर्ग ही मोडतो ) महाभयानक वाईट !!
26 Sep 2012 - 9:59 am | सहज
चला म्हणजे पॉवर पॉलिटीक्ससाठी का होईना, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या बर्या करता (खूप चांगले) काहीतरी प्रयत्न केले. की आता ते जाउन हे येणार व जैसे थे!! ही दिल्लीवाल्या काँग्रेसची कुरघोडी की चव्हाणांची राजनीती तेही सांग. :-)
26 Sep 2012 - 9:49 am | इरसाल
श्री. पांढरे यांचे पत्र छापले आहे. खालील प्रतिसादही वाचनीय आहेत.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=251...
26 Sep 2012 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दुव्याबद्दल धन्स. पत्रावरुन निष्कर्ष करणे घाईचे होईल परंतु पत्रातील विषय आहे कळकळीचा आणि प्रामाणिक वाटतो.
-दिलीप बिरुटे
28 Sep 2012 - 1:23 pm | इरसाल
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=318...
खालच्या ३/४ ओळी महत्त्वाच्या.
26 Sep 2012 - 10:08 am | तर्री
कॉग्रेसहा एक हल्ली एक बेजबाबदार पक्ष झाला आहे पण त्यामध्ये काही माणसे अपवादाने चांगली आहेत. आपले मुख्यमंत्री एक अपवादात्मक चांगले गृहस्थ आहेत. त्यांच्या राशीला मात्र राष्ट्रवादीचे "शनी व राहू " लागले आहेत.
विलासराव गेले १० वर्षे महाराष्ट्र लुटत होते आणि त्यांची राष्ट्रवादीशी "भागीदारीच" होती. बाबा आल्या पासून ही लुट मार थांबली आहे . पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी ला हा मोठा अडसर आहे. " बाबांना हटवणे " आणि नारायण प्रवृत्तीच्या माणसाला तेथे बसवणे हा सगळ्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. ही एक राजकीय खेळी आहे.
राष्ट्रवादीच्या नव्या पिढीच्या राजकारणाशी त्याचा जवळचा संबंध आहे. तसाच त्याचा कॉंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेतृत्वाशीही आहे.
26 Sep 2012 - 11:13 am | चिरोटा
साला पृथ्विबाबा पॉलिटिक्स खेळायला लागलाय. काही महिन्यांपूर्वी बाबा वेळेत फाईल हलवत नाही,नको त्या चौकशा करतो म्हणून बातम्या पसरवल्या होत्या राष्ट्रवादीवाल्यांनी.
26 Sep 2012 - 11:22 am | इरसाल
पृथ्वीराजांनी सोदाहरण स्पष्ट करुन दिले त्यांना.
घ्या तुमच्या फुल्या फुल्या
26 Sep 2012 - 12:36 pm | ५० फक्त
या सर्व घडामोडीवर मिपावरील सर्व आजी माजी कंपुबाजांनी व्यवस्थित लक्ष ठेवावे व राजकारणाचा एक नविन धडा शिकुन घ्यावा ही नम्र विनंती.
27 Sep 2012 - 10:58 pm | निनाद मुक्काम प...
मिपावर कंपू बाज आणि कंपू आहेत ?
1 Oct 2012 - 11:24 am | विश्वनाथ मेहेंदळे
मिपावर कंपू आणि कंपूबाज कधीही नव्हते.
मिपा हा एक मोठ्ठा परिवार आहे असे परवा कुणीतरी म्हणत होते.
म्हणून म्हणतो, अभ्यास वाढवा ;-)
26 Sep 2012 - 1:07 pm | मदनबाण
पांढरे नामक एका अधिकार्याने पर्दाफाश करुन अजितरावजीदादासाहेब पवारांचे काळे धंदे उघडकीस आणले म्हणून नाईलाजाने दादांना हे करावे लागले असे म्हणतात. आता पांढर्यांचे काही काळेबेरे होते का बघायचे.
>>>
काही दिवसांपूर्वी मी माझ्या सहीत भावार्थ ज्ञानेश्वरीचा दुवा दिला होता,ती लिहणारे हेच विजय बळवंत पांढरे आहेत.
http://www.ednyaneshwari.com/
त्यांनी ज्याप्रकारे हे महाराष्ट्रातले वॉटरगेट प्रकरण बाहेर आणले,त्या बद्धल त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे.
भ्रष्टाचाराला विरोध करणारी मंडळी / तरुण त्यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील याची मला खात्री आहे.
महाराष्ट्रातील धरणांची ही दुरावस्था असताना, तिकडे चीन मात्र धरणांच्या बाबतीत जगातला सगळ्यात मोठा निर्माता झाला आहे,अधिक माहिती साठी सहीतला दुवा वाचण्याचे कष्ट इच्छुकांनी घ्यावे.
26 Sep 2012 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार
कोण अजितदादा पवार ?
26 Sep 2012 - 6:13 pm | कपिलमुनी
माझा अंदाज :
काकांना काँग्रेसची साथ सोडायची आहे ..त्यांना थर्ड फ्रंट आणि त्या बरोबरच पंतप्रधान झाल्याची स्वप्ने पडत आहेत..
नाराजीचा फटका काँग्रेसला निवडणुकी मधे बसणार आहे ... त्यामुळे डुबत्या जहाजाला सोडले तर कुणा-कुणाचा पाठिंबा मिळेल याची चाचपणी करणे ...
थर्ड फ्रंटच्या कडबोल्याचा सर्वमान्य चेहरा अशी मान्यता मिळवून २०१४ ची तयारी करणे असा उद्देश या राजीनामा नाट्यामागे असू शकतो...
27 Sep 2012 - 11:30 pm | आशु जोग
आता त्या पांढरे यांचे काय होणार ?
28 Sep 2012 - 2:27 pm | चिंतामणी
नविन काय लिहू.
एक मात्र वाटते की आपल्याकडे म्ह्णतात की "इजा, बिजा झाले के तिजा होणरच. " हे तिजा आहे असे वाटते.
1 Oct 2012 - 3:41 am | हुप्प्या
उर्मटशिरोमणी अजितदादा पवार ह्यांचा राजीनाम्याचा हुकमी एक्का जळला असे वाटते. थोरल्या साहेबांनी ह्या धगधगत्या आगीवर व्यवस्थित पाणी ओतून त्याची पार राखुंडी केली. राजीनामा दिला ते योग्यच झाले. आता चला आपापल्या कामांना लागा असे सांगून ह्या बंडोबाला थंड केले.
एकंदरीत हाही डाव काकासाहेबांनीच जिंकला म्हणायचा. धडाडी, उर्मटपणा, टगेगिरी हरली, मुत्सद्देगिरी, कावेबाजपणा, धूर्तपणा जिंकला.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252...
लोकसत्तेचा अग्रलेख चांगला आहे.