शुभंकरोति
काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा!
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म जलसंपदा
सुष्टबुद्धी विनाशाय
ब्रिगेडशक्ती नमोस्तुते ||
आजोबा, पणजोबा नमस्कार
तुम्हीच आमचे तारणहार
सर्वांना वाकून नमस्कार
दिवा लावला दिल्लीपाशी
आमची सत्ता घराण्यापाशी ||
प्रतिक्रिया
27 Sep 2012 - 11:15 am | तिमा
पूर्वदृष्य बरोबर दिसत होते. पण प्रकाशित केल्यावर विस्कळीत झाले. लेखनविषय निवडता येत नाही. त्यावर दुसरे ऑप्शन्स सुपर इंपोज होतात. दुरुस्त करता आले तर करावे.
27 Sep 2012 - 11:43 am | अन्या दातार
आवरा!!!!
सामान्य लोकांसाठी ही 'अशुभंकरोति'च आहे. :(
27 Sep 2012 - 4:08 pm | निरन्जन वहालेकर
थोडा बदल सुचवतो. पटला तर पहा.
स्कॅमं करोति कल्याणम
भूखंड्म,
निविदा सम्पदा,
सुप्तबुद्धी विना सायास,
"दादा" 'गिरि नमोस्तुते ||
"काका," "बाबा," अन एकच वार
"दादा"च तूमचे मारणहार,
बॉम्ब पडला बारामतिशि,
स्फोट झाला दिल्लिपाशी !
मान्डवली आता दिल्लीपाशी
तुमची सत्ता( थोडी )आमच्याहि पाशी ||