रंगबिरंगी भूछत्रं

सोत्रि's picture
सोत्रि in भटकंती
20 Sep 2012 - 11:13 am

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्‍यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. चेन्नैच्या भयंकर उकाड्यावर हा उतारा एकदम कातिल होता.

पहिल्या दिवशी सकाळी सकाळी 'कोकर्स वॉक' नावाच्या साधारण एक किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर एक रपेट मारून 'साईटसिइंग'ला सुरुवात झाली. त्यानंतर एक जंगलातला ट्रेल होता. सुरुच्या बनातून असलेला एक मस्त ट्रेल. अचानक एका चढावर एक लहान फुलाच्या गुच्छासारखे काहीतरी दिसले म्हणून फोटो काढायला पुढे सरसावलो आणि काय आश्चर्य, ती फुले नसून रंगबिरंगी भूछत्र, कुत्र्याच्या छत्र्या किंवा जंगली अळंबी असल्याचे निदर्शनास आले. एकदम चकितच झालो ती विविध रंगातली भूछत्री बघुन. आजूबाजूला बघितल्यावर जाणवले की खूपच सुंदर, ह्यापूर्वी कधीही न बघितलेले भूछत्र्यांचे रंगबिरंगी आणि मनमोहक विश्व.

लहान मुली पावसात छत्र्या घेऊन फिरायला निघाल्या आहेत असे वाटायला लावणारी ही सुंदर आणि लालचुटुक भुछत्रे.

चॉकलेटच्या किंवा कॉफीच्या लॉलीपॉपची आठवण करून देणारी ही कॉफी कलरची सुंदर भुछत्रे.

लहानपणी गंगा नदीची जी काही चित्रमय झलक पाहिली होती त्यानुसार गंगा नदी म्हटले की तिच्या घाटावर असलेल्या पंडित लोकांच्या गोलाकार छत्र्या ह्यांचीच आठवण मला प्रथम होते. ही भुछत्री बघितल्यावर एकदम त्यांची आठवण झाली. चमक (शायनिंग) असलेली भुछत्रं पहिल्यांदाच बघितली, मी तरी.

ही भुछत्रे भरघोस फुलांचे गुच्छ असल्याची जाणिव करून देत आहेत.

चिमुकली आणि अगदी नाजूक असणारी ही भुछत्रे बघताच एकदम नाजूक चणीच्या लहान गोंडस बालिकांची आठवण होते.

एकदम एलियनांच्या UFO प्रमाणे दिसणारी ही एकदम वेगळ्याच रंगछटा असलेली भुछत्रे.

फुलांच्या गुच्छाप्रमाणेच असणारी ही भुछत्रे, पण ह्यावेळी वेगळ्या नजरेने आणि ऍंगलने बघितल्यावर कॉर्नेट ह्या म्युसिकल इंस्ट्रुमेंटला असलेल्या दट्ट्यांची आठवण होत होती.

भूछत्रीकोडाईकनाल

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

20 Sep 2012 - 11:33 am | प्रचेतस

मस्त हो सोत्रीअण्णा.
फुलांवेगळा भूछत्रांवरचा धागा आवडला.

हे रोहिड्याच्या वाटेवर आम्ही टिपलेले भूछत्र

गवि's picture

20 Sep 2012 - 11:38 am | गवि

वा. मस्त फोटो आहेत रे सोत्रि.

फोटो बघून मधेच सात खून माफ मधले डॉ. मोधुसुदन ऊर्फ मोधुदा ऊर्फ मोश्रूमदा -मा. नासिरुद्दिन शहा यांची आठवण झाली..

मिसळपाव's picture

20 Sep 2012 - 4:26 pm | मिसळपाव

... फोटोंमधे कसल्याशा शेंगा दिसताहेत. त्या शेंगांचा भूछत्रांच्या वाढित काहि सहभाग असतो कि काय? तो भूछत्रांचा 'घोस' विशेष आवडला.

(अवांतर - खरं खरं सांग, हि भूछत्रं बघून "याचं काय बरं पेय करता येईल" डोक्यात नाहि आलं तुझ्या? !)

प्रभाकर पेठकर's picture

20 Sep 2012 - 4:34 pm | प्रभाकर पेठकर

मस्त, सोत्री.

निसर्गाची 'कॉकटेल्स'ही वेड लावणारी असतात. तुमच्या नाविन्याच्या ध्यासानेच तुमची नजर ह्या नजार्‍याकडे वळलेली दिसते आहे. अभिनंदन.

अर्धवटराव's picture

21 Sep 2012 - 12:16 am | अर्धवटराव

निसर्गाची आडवाटेची उधळण अगदी पारखी नजरेने टिपली.
सुंदर.

अर्धवटराव

पिवळा डांबिस's picture

21 Sep 2012 - 1:00 am | पिवळा डांबिस

मस्त, मस्त, मस्त!
सगळेच फोटो आवडले!!
जियो!!!

मदनबाण's picture

21 Sep 2012 - 9:29 pm | मदनबाण

मस्त ! :)

पैसा's picture

21 Sep 2012 - 11:03 pm | पैसा

काय अ‍ॅलिसच्या वंडरलँडमधे गेल्ता काय अण्णा?

'अॅलिसची वंडरलॅंड' एकदम चपखल शब्द!

-(वंडरबाॅय) सोकाजी

किसन शिंदे's picture

22 Sep 2012 - 7:49 am | किसन शिंदे

मस्त फोटोज!

वरून ८व्या फोटोतल्या अळंब्या भाजलेल्या पावासारख्या दिसताहेत.

हरिप्रिया_'s picture

23 Sep 2012 - 2:35 pm | हरिप्रिया_

मस्त !!!

प्रास's picture

23 Sep 2012 - 9:20 pm | प्रास

झकास हो सोत्रिआण्णा!

माझीही शॅम्पेन's picture

25 Sep 2012 - 11:14 am | माझीही शॅम्पेन

एक्दम झकास

चोता छत्रि (शाम्पेन)

माझीही शॅम्पेन's picture

25 Sep 2012 - 11:15 am | माझीही शॅम्पेन

एक्दम झकास

...............................चोता छत्रि

तर्री's picture

25 Sep 2012 - 11:24 am | तर्री

आवडेश..

सुहास..'s picture

25 Sep 2012 - 11:39 am | सुहास..

मस्तच ओ साकीअण्णा !

परिकथेतील राजकुमार's picture

25 Sep 2012 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

फटूग्राफी एकदम आवडेश.
सोत्रीअण्णाची वेगवेगळ्या विषयांवरती लिहिण्याची हातोटी आपल्याला कायमच भुरळ घालत आली आहे.

बाकी, प्रवासात तुम्ही मिसळ वैग्रे खाल्ली का नाही ? फोटो कुठे आहेत ?

वेगवेगळ्या चवीची, प्रकारची आणि झटकेबाज मिसळ खावी फक्त पूण्यात हे पुण्यात राहून कळल्याने तिकडे मिसळ शोधायच्या आणि खायच्या फंदात पडलोच नाही. ;-)

-(पुणेरी मिसळभोक्ता) सोकाजी

चेतन's picture

28 Sep 2012 - 2:31 pm | चेतन

फोटो मस्त

पण एकदम मिसळभोक्ता ;-)

चेतन

खुशि's picture

28 Sep 2012 - 1:46 pm | खुशि

खुप सुन्दर आहेत ही भुछत्रे. कोडाईकनालही सुन्दर.

सोत्रि साहेब , लय भारी फोटो आहेत. मस्त