नमस्कार,
मिसळपाव .कॉम ला पाच वर्षे पुर्ण झाली आहेत. व्यवस्थापनाचा वाढता व्याप बघता मिसळपावच्या संपादक मंडळात पाच नवीन संपादकांची घोषणा करण्यात येत आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे
१) गवि
२) वल्ली
३) किसन शिंदे
४) लीमाऊजेट
५) aparna akshay
सदर संपादक सहा महिण्यांसाठी किंवा पुढील घोषणेपर्यंत कार्यरत राहील. सदर संपादकांना मिपावर प्रकाशित होणारे सर्व साहित्य व प्रतिक्रिया संपादन करण्याचे अधिकार आहेत. केलेल्या संपादनासाठी त्यांनी कुठेही खुलासा देणे अपेक्षीत नाही. तसेच या यादीमध्ये येत्या काही दिवसांमध्ये काही नावे येऊ शकतात. तशी घोषणा त्यावेळी केली जाईल.
तसेच आज पासून मिसळपावचे दोन संपादक थांबताहेत. त्यांची नावे पुढील प्रमाणे.
१) छोटा डॉन
२) निखील देशपांडे
आता पर्यंत या आणि अन्य अनेक संपादकांनी मिसळपाव येथपर्यंत घेऊन येण्यात आपले सहकार्य दिले त्यासाठी त्यासर्वांचा मी आभारी आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा यापुढेही मिसळपाव आणि मला होत राहील अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
20 Sep 2012 - 11:29 pm | ऋषिकेश
काटेरी मुकुट धारण करणार्यांचे सांत्वन! अन् चोता दोन आणि निदेचे सुरक्षित सुटका झाल्याबद्दल अभिनंदन! ;)
(ह घ्यालच)
20 Sep 2012 - 11:50 pm | छोटा डॉन
संपादक मंडळातल्या नव्या शिलेदारांचे अभिनंदन.
संपादक मंडळ हे नेहमी रोटेशन पॉलिसीने चालवले जावे आणि काही काळानंतर त्यात बदल करत रहावे असे आमचे पहिल्यापासुन मत आहे, त्यामुळे संपादक मंडळ आणि सदस्य ह्यांच्यात सौर्ह्याद्य वाढण्यास आणि टिकण्यास मदत होते व बर्याचदा त्यामुळे संपादनाची गरजच नाहीशी होते.
नवनियुक्ती झालेले सर्व सन्माननीय सदस्य अनुभवी आहेतच पण त्यापेक्षा त्यांचा आत्तापर्यंतचा मिपावरचा वावर एक समतोल आणि समजुतदार सदस्य म्हणुन होता ही ओळख जास्त सुखावणारी आहे.
सर्व नवनियुक्त संपादकांचे आमच्याकडुन मनापासुन अभिनंदन आणि नव्या कादकिर्दीसाठी ढिगभर शुभेच्छा.
संपादनाच्या कार्यातुन आम्हाला मुक्त केल्याबद्दल मिपा व्यवस्थापनाचेही आभार.
आता ह्या मोकळ्या वेळातुन आम्ही काही चिल्लर लेख, काही टाईमपास आणि खेळाविषयीचे सदर इत्यादी उपक्रम चालवावे असे म्हणतो आहोत, ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संबंधितांचे पुन्हा एकदा आभार.
जाता जाता आपल्या योगदानातुन मिपा सदाबहार आणि लाईव्हली ठेवणार्या सर्व ज्ञात-अज्ञात सदस्यांचेही आभार.
- ( आभारप्रदर्शक) छोटा डॉन
21 Sep 2012 - 10:43 am | श्रावण मोडक
>>आता ह्या मोकळ्या वेळातुन आम्ही काही चिल्लर लेख, काही टाईमपास आणि खेळाविषयीचे सदर इत्यादी उपक्रम चालवावे असे म्हणतो आहोत, ही संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल संबंधितांचे पुन्हा एकदा आभार.
उपक्रम! पद गेलं की माणसाचं मूळ रूप बाहेर येतं म्हणतात ते असं... ;-) चालवा, चालवा...
21 Sep 2012 - 9:17 am | मी_आहे_ना
नविन संपादकांचे अभिनंदन आणि (नव्या व जुन्या / कार्यरत असणार्या सर्व) संपादकमंडळींना धन्स...
21 Sep 2012 - 10:20 am | प्रास
नव्या संपादक पंचकडीचे अभिनंदन!
आता वरच्या वर्गात गेला आहात तर आमच्याबरोबरच्या सौहार्दात बाधा येऊ देऊ नका म्हणजे झालं. बाकी, तुम्ही आधी शिकवलेला मंत्र विसरलेलो नाहीये - संपादक कधीच चुकत नाही (म्हणे) ;-)
चोता दोन आणि निखील दोघांनाही आमच्या अखिल मिपा धुडगुस आखाड्याचं हार्दिक निमंत्रण! आमच्यात दाखल होऊन बाकीच्यांना तीर्थ-प्रसादाचा लाभ द्यावा ही विनंती. :-)
21 Sep 2012 - 10:45 am | जेनी...
अभिनंदन !!
खफवरचे स्वताहाचे प्रतिसाद स्वताहा उडवु शकतो अशी व्यवस्था करता येईल का?
करा तेवढं ,मझा लै प्रोब्लेम हूतोय :(
23 Sep 2012 - 9:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
Life does not give you undo button, all the time ;-)
21 Sep 2012 - 1:05 pm | विजुभाऊ
संपादक मंडळातील सर्व सदस्यांची नावे कळतील का?
21 Sep 2012 - 1:15 pm | सुहास झेले
सर्वांचे अभिनंदन... :) :)
21 Sep 2012 - 2:33 pm | पिंगू
नविन संपादकांचे अभिनंदन...
22 Sep 2012 - 9:11 pm | तर्री
लेख तथा प्रतिक्रिया उडवणे हे अपवादानेच असु ध्यावे . आचार्य अत्र्यांनी - ना.सी. फडके यांचे वर केलेली टीका लक्षात घेवून "बेंचमार्क " ठरवल्यास काहीही संपादित होणार नाही. मी.पा. हे एक " माच्योर " संस्थळ आहे . तसेच राहू ध्यावे.
शुद्धलेखन जरूर पहावे पण तेवढ्यासाठी धागाकार्त्याची चंपी करू नये.
हया काही सूचना !!
नव्या चमूचे हार्दिक अभिनंदन ! "थांबल्याचे विशेष आभार !!!
23 Sep 2012 - 2:05 pm | प्राजु
अभिनंदन!! आणि शुभेच्छा! :)
23 Sep 2012 - 8:51 pm | समंजस
५ वर्षे पुर्ण केल्याबद्दल मिसळपावचे आणि नविन सरपंच दोघांचेही :)
24 Sep 2012 - 4:29 pm | बालगंधर्व
गविसाहेब, वल्लीदादा, किसनसाहेब,लिमाउजेटताई, अपर्णाअक्शयताई या सर्वाचे मनापासुन अभ्बिनन्दन. तसेच या सर्वान्ना पुडील वाटचालीसाठी शुभेच्चा. तसेच दॉन्साहेब आणि देश्पान्दे साहेबानाही पुन्हा सम्दापक होण्यासाथी शुभेच्चा.
28 Nov 2012 - 4:14 pm | अविनाशकुलकर्णी
सर्वांचे अभिनंदन ....
संपादक मंडळातिल मान्यवरानी सभासदाना पार्टी द्यावि अशी एक सुचना ....
[मेनु..श्री गणपा यांचे धागे या वेळी कामास येतिल.]
28 Nov 2012 - 7:17 pm | निवेदिता-ताई
नवीन सर्व संपादकांचे अभिनंदन.
28 Nov 2012 - 7:26 pm | मदनबाण
नीलकांता अरे... मिपाला वाळवी लागली आहे ! मागचे धागे कोरे झाले आहेत.
सगळी मिपाकर मंडळी त्यांचा बहुमुल्य वेळ या संकेतस्थळा देउन प्रतिसादांची पेरणी करत आहेत... पण वाळवीची भिती वाढत आहे.
आज जे लिहलं ते उद्या दिसेल की नाही याची शाश्वती वाटेनासी झाली आहे तेव्हा सर्व संपादकांनी / मालकांनी जरा लक्ष देउन या वाळवी वरती पेस्ट कंट्रोलचा जालिम उपाय करावा ही नम्र विनंती. ( मला याची जाणिव आहे की तुम्हा सर्वांचा वेळ देखील तितकाच बहुमुल्य आहे.)
सर्व नविन संपादकांना हार्दिक शुभेच्छा.
28 Nov 2012 - 9:40 pm | अत्रुप्त आत्मा
++++++++++++++++++१११११११११११११११११११११११११११११११११११११११११
29 Nov 2012 - 2:13 pm | बॅटमॅन
+११११११११११११.......
1 Dec 2012 - 12:59 pm | नाना चेंगट
सध्या कोण कोण संपादक आहेत?