मला पडलेले काही प्रश्न

मन's picture
मन in काथ्याकूट
12 Sep 2012 - 5:53 pm
गाभा: 

फार दिवसापासून काही प्रश्न पडलेत बुवा. काही वर्षापूर्वी मिळालेली उत्तरं पुरेशी वाटेनात; आता पुन्हा नव्या दमाच्या गड्यांसमोर, काही जुन्याजाणत्यांसमोर सादर करतोय.
.
१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?
.
तुम्हालाही असे अचाट प्रश्न असतील तर अवश्य मांडा. मिपाची ब्यांडविड्थ फुल्ल टू वापरुन घेउया.
प्रश्न नसतील पण उत्तरं असतील तर तीही अवश्य द्या. ह्याला सुटेबलासतील तर अतृप्त आत्म्याच्या ष्टायलित स्मायल्याही द्या.
.

--मनोबा

प्रतिक्रिया

ढकलपत्रावरून साभार...

हे लिहायचे राहिले का??

सारेच ढकलपत्रातील नाहित.
.
सिरिअसपणाला कंटाळलेला

चिरोटा's picture

12 Sep 2012 - 6:43 pm | चिरोटा

मस्तच. कंपनीच्या HR ला Aptitude Test मध्ये घालायला सांगितले आहेत.
उत्तरांच्या प्रति़क्षेत.

तिमा's picture

12 Sep 2012 - 6:51 pm | तिमा

१. बिअरबारचे पार्किंग स्लॉट हे ड्रायव्हर ठेवलेल्या गाड्यांसाठी असतात.
२. पहिलं घड्याळ बनवलं तेंव्हा किती वाजले होते ते माहीत नाही. पण पहिली वेळ रजनीकांतने बघितली.
३. दंड भरावा लागला, याची ज्यांना शरम वाटते, अशांसाठी हा कायदा आहे.
४. आपण लहान असताना आई आपल्या पायात बूट घालते, मोठेपणी आपण बूटात पाय घालतो. शर्टाचे उत्तरही तेच.
५. सर्वप्रथम जोडप्याला 'अ‍ॅपल'ने सांगितलं.
६. मंत्र्यांच्या खिशात.
१०. को र्‍या कागदाची झेरॉक्स कोरा कागदच येईल.
११. आम्ही 'गाढवासारखं राबवलं जाताय असच ऐकलं होतं.
१९. तुमची कुठली जमीन ? ती आता आमच्या 'दादां'ची झाली.

बाकीच्या प्रश्नांची उत्तरे ऐकण्यास उत्सुक !
-- प्रश्नराव उत्तरजाणे

पुण्याचे वटवाघूळ's picture

12 Sep 2012 - 7:28 pm | पुण्याचे वटवाघूळ

मलाही काही प्रश्न भयंकर सतावतात. त्यातला एक प्रश्न:

गव्हाच्या तृणांकडे/रोपांकडे बघून त्यातील दाणे काढावेत, त्या दाण्यांचे पीठ करावे, मग त्या पीठात पाणी आणि तेल घालून ते मळावे आणि त्याची कणिक करावी, त्या कणकेचे गोळे करावेत, आणि त्या गोळ्यांना त्याच दाण्यांचे पीठ लावून आणि थोडे तेल लावून ते लाटावेत आणि मग ते भाजावेत आणि खावे असे कोणा महान व्यक्तिला वाटले असेल आणि ते कसे? आणि असे वाटायचे बेसिस काय असावे?

हे सगळं एकदम एकाच व्यक्तीला वाटलं नाही. किंबहुना इतर क्षेत्रातल्या शोधांप्रमाणे इथेही अपघाताने बदल घडत गेले.

गहू (आणि बार्ली देखील) गेली ३०००० वर्षं माणसाच्या अन्नाचा महत्त्वाचा भाग आहे. या दाण्यांचे पीठ करून खाता येते हे माणूस अश्मयुगातच शिकला आहे. या धान्याचा प्रसार प्रामुख्याने युरोप, आफ्रिकेचा काही भाग, आणि एशिया - भारतीय भूखंडात झाला. या सर्व भागांमध्ये आंबवलेल्या आणि न आंबवलेल्या गव्हाच्या पीठाचे पाणी आणि तेल / तत्सम पदार्थ घालून अनेक पदार्थ तयार होतात, चपाती / रोटी / फुलका हा त्यातला निव्वळ एक प्रकार आहे.

असे वाटायचे बेसिस हे निव्वळ चविष्ट पदार्थ करण्याच्या आणि खाण्याच्या माणसाच्या आवडीत असावे..

धागा हायजॅक करण्याचा उद्देश नसल्यामुळे एवढ्यावरच थांबलेले बरे..

आनंदी गोपाळ's picture

14 Sep 2012 - 11:12 pm | आनंदी गोपाळ

पोळी ज्याने शोधली त्याने शोधू देत ;)
बार्लीची बियर अन माल्टची व्हिस्की कुणी शोधली अन कशी? :>

त्यात बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
निवांत उत्तर लिहितो.

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
--> कारण पिउन गाडीत बसायला मनाई नाही.

२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
--> पहिला वेळ घड्याळ बनवणार्‍याने ही पाहिला नाही, घड्याला चालु आहे का.. कीती वेळात कुठल्या ठिकाणी( नंबर पर्यंत) येते ते पाहुन ..अशी अनेक प्रात्यक्षिके करे पर्यंत बराच ' वेळ' निघुन गेला होता.

३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
---> नव्हे, दंड म्हणजे नियम मोडल्याची शिक्षा.. फी आधीही आकारली जाते.

४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
-->बुटामध्ये पाय घालतो, तस म्हंटल जात नाही म्हणुन क्रिया उलटी मात्र कधी होत नाही.
बहुतेक आपण अंगावरती शर्ट घालतो, जसे की डोक्यावरती हेलमेट.

५)आधी अंडे की आधी कोंबडी ? जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
--> पुनरुत्पादनाबद्दल सांगावे लागत हे तुम्हाला कोणॅए सांगितले बरे ?

६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
--> तिजोरीत .. मग ती देशाची असुद्या.. माणसांची असु द्या.. किंवा आनखिन कोणाची.

७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
--> डॉग.

८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
--> नाही, ती प्रकाशाच्या वेगा येव्हडीच आहे.

९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
--> युनायटेड नेशन.

१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
--> फक्त विज वाया जाईन, मशिन चा वापर होईल.. आणि कोर्‍या कागदाचीच प्रत जशीच्या तशी बाहेर येइन.

११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
--> कुत्याला उठ म्हण्टली की उठायची आणि बस म्हंटल की बसायची सवय असते, आणि तुमचे राबणे तसेच असते, हे कर म्हण्टल की करायच, बाकी स्वताचे निर्णय न घेता येण्यामुळे कुत्र्यासारखं राबवल जातय अशी ओरड होते.

१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
--> कॅल्कुलेटर आणि फोन एकाच वेळेस बनले नाहित, आधी कॅल्सी बनले, त्यावेळी ९ ८ ७ असा क्रम होता..
फोन बटना अगोदर सर्क्युलर डायलिंग मध्ये होता .. त्यात १ .. २...३ ...... ० असा क्रम असल्या कारणाने तसाच क्रम फोन बटन पॅड मध्ये ठेवला गेला.

१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
--> माशांना तहान लागत नाही. मात्र ते शरीरातील सॉल्ट बाहेर टाकण्यासाठी पाणी पितात किंवा पाणी अब्सॉर्ब करतात.
ते सतत पाण्यात असल्याने, तहान न लागता ते पाणी सतत शरिरात घेत असतात्.जसे की आपण हवा घेतो.. आपल्याला हवा घेण्यासाठी काही तरी लागते का ?

१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
--> निसर्ग अजब आहे हे मान्य करण्यासाठीचे ते एक उदा. आहे.. पृथ्वी तरी कुठे फिरता फिरता भरकटते ?

१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
--> दोन ऑईल च्या मिलनातुन बेबी ऑईल बनते

१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
--> त्याची स्मृती पुर्ववत झाली अस म्हणायच असत. स्मृती गेली होती हे त्याला मधल्या काळातील बदलामुळे कळु शकते.

१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
--> रेडिओ एकु शकत नाही..

१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
--> जो पर्यंत ते इतरांना/निसर्गाला घातक नाही तो पर्यंत चालेल. बोअर घेणे हे त्यातीलच एक उदा.

२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
-->ती प्रतिज्ञा त्यान पाळावी.. कारण सगळ्या कसमा तो मोडु शकतो.. आणि ही कसम त्याने मोडली नाही म्हणजेच त्याने प्रत्येक कसम मोडली आहे ह्या कसमे सहित असा अर्थ निघतो.
I am a liar and I am speaking lie
-->त्याच म्हणणं खर

२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
--> आपण मेलेलो आहे हे कोणाला कळत नाहिच, मरत आहोत हे श्वास कोंडत असेल त्यावेळस कळेल. झोपेत आपोआप/गोळ्या खाऊन्/नशेने मेल्यावर त्याचे ज्ञान त्याला पोहचत नाही.

२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली? ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?

--> हार्ट आणि ब्रेन ही मशिन प्रमाणे आहे, ज्यात ती फिट्ट बसवाल त्या शरीराची गाडी ते पळवतील. स्मृती हे इंधन आहे. जे इंधन टाकाल त्याचेच आउटपुट दिसेल.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Sep 2012 - 9:15 pm | लॉरी टांगटूंगकर

1)बार मध्ये येण्या साठी
२) त्या वेळी १० वाजून १० मिनिटे झाली होती म्हणून साहेबांच्या घड्याळात पण तीच वेळ आहे आणि त्या वेळेच्या सन्मानार्थ सर्व घड्याळवाले घड्याळ विकण्यापूर्वी या वेळेला आणून ठेवतात .
५) आधी अंडे डायनोसोर च्या केमिकल लोच्या मुळे भलतेच अंडे पडले आणि असेच लोचे होत राहिल्या मुळे ती जमात कोंबडी पर्यंत आली
६)
७) कुत्र्या सारखे काम करणारे
८)पेटंट आहे कॉपीराइट नाही
९) कोरा कागद पण गरर्मा गरम!!!
११)प्राण्यान मध्ये ज्या कोणत्या प्राण्याला राबवता थोडे फार राबवता येते तो मंजे कुत्रा ,पु लंच्या भाषेत पेपर आणणे ,दोन पायावर उभे राहणे वागीरे निरर्थक कामे तरी तो करतो बाकीचे तितके पण करत नाहीत ...आणि गाढवा सारखे काम करतोय म्हणून घायला लाज वाटेल ,
१२)हि चूक टच स्क्रीन मध्ये दुरुस्त करण्यात आली आहे
१३)पाणी पितात
१७) ते सोडा, त्याला भाषा कशी काय आठवते ?
१८)मी त्या वाहनात रेडीओ नाही ऐकत .
१९)अगदी!!!!,आमच्या कडे कुदळ मागू नका मंजे झाले.

अर्धवटराव's picture

12 Sep 2012 - 10:47 pm | अर्धवटराव

१)पिउन गाडी चालवायला मनाइ आहे अस म्हणताय, मग बीअर बारला पार्कंग स्लॉट कशाला ठेवलेत?
-- बीअर खरच किती "चढते" हे चेक करायला
२)जगातलं पहिलं घड्याळ जेव्हा बनवलं तेव्हा नक्की किती वाजले होते?
-- "बारा" वाजले होते
म्हणजे सर्वात पहिला "वेळ" कुणी पाहिलाय?
-- शॉपींगमॉल बाहेर बायकोची वाट बघणार्‍या नवर्‍याने.
३)जर नियम मोडल्यावर दंड भरावा लागत असेल(आणि तेव्हढच करुन सुट्णार असु, तर ) दंड म्हणजे नियम मोडाण्यची फी नव्हे काय?
Tax is fine to be correct, fine is the TAx to be wrong!!
-- ती सरकार व त्यांच्या बगलबच्चांच्या "खाण्यापिण्याची" सोय मात्र आहे
४)आपण "पायामध्ये बूट" घालता, की बूटमध्ये पाय घालता?
-- कुठेच नाहि. आपण अ‍ॅक्च्युली जोडे डोक्यात वा थोबाडात घालतो.
>>नक्की काय करता? जे करता तसं का म्हणत नाही?
-- ज्याला जोडे घालुन चालु पडायचय तो "नक्की काय करता" चा विचार करत नाहि. जगातले यच्चयावत मानव एकतर आशिल आहेत किंवा वकील तरी, त्यामुळे जे करता ते तसं म्हणायचा प्रश्नच येत नाहि.
>>तुम्ही अंगात शर्ट घालता की शर्टात अंग घालता?
-- "अंग" कुठे घालतात याचं उत्तर सार्वजनीक संस्थळावर देण्याजोगं नाहि. मिपाकरांना हा प्रश्न पडावा याचं आश्चर्य वाटतं.
५)आधी अंडे की आधी कोंबडी ?
-- आधि इराणी ब्रेड-ऑम्लेट विकणारा आला, मागाहुन त्याचे मराठी नोकर चाकर. एका नोकराकडे अंडी होती व दुसर्‍याकडे कोंबड्या. जो मालकाच्या मागोमाग आला ते जिन्नस आगोदर आलं.
>>जगातील सर्वप्रथम जोडप्याला पुनरुत्पादनाबद्दल कुणी सांगितलं?
-- त्यांच्या मुलाने
६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?
-- स्वीस बँकेत
७)"डॉग फूड" बनवलं जातं तेव्हा त्याचं "टेस्टंग" कोण करतं?
-- दिग्वीजयसींग सारखे लोक
८)अंधाराची गती प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक आहे काय?
-- दोघांचीही गती सारखीच आहे. बल्ब बनवणार्‍याची गती सर्वात जास्त आहे.
९)कॉपी राइट चिन्हाचं कॉपीराइट कुणाकडं आहे?
-- कॉपीकॅट वाल्याकडे
१०)कोर्‍या कागदाची झेरॉक्स काढली तर काय होइल?
-- कोरा कागद आपण खरच कोरे आहोत हे बघुन हसेल तरी वा रडेल तरी
११) खर तर कुत्री नुसतीच बसुन खाताना सगळीकडं दिसत असली तरी "कुत्र्यासारखं राबवलं जातय" अशी ओरड का होते?
-- राबवणे कुत्रीच्या अनुशंगाने येतं, खाण्याच्या नाहि
१२)कॅल्क्युलेटर आणि फोन मधल्या बटनांचा क्रम नेमका उलट का असतो?
-- बोलताना हमखास चुका व्हाव्या म्हणुन
१३)माशांना तहान लागल्यावर ते काय करतात?
-- "पीतात".
१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?
--पक्षी समाजाचे पाय कायम जमीनीवर असतात, अगदी झोपताना देखील.
१५)कॉर्न ऑइल मक्यापासुन, ,वेजिटेबल ओइल वनस्पतींपासुन मग "बेबि ऑइल" कशापासुन बनतं?
-- प्रत्येक गली मोहोल्लेमे अश्या तेलकट बेब्या असतातच कि
१७)स्मृती भ्रंश झालेल्या माणसाची स्मृती परत आल्यास त्याला "आपली स्मृती गेली होती "हे आठवत का? नसेल तर त्याची स्मृती परत आली असं कसं म्हणायचं?
-- स्मृतीभ्रंष न झालेल्या लोकांना त्यांचा स्मृतीभ्रंष झाला नाहि हे कधीच आठवत नाहि. या रेफ्रन्सने काम भागवले जाते.
१८)ध्वनीच्या वेगानं जाणार्‍या वाहनात तुम्ही रेडिओ कसा काय ऐकु शकता?
-- रेडीओ चे बटन उलटे फिरवुन
१९)माझ्या जमिनीच्या मालकीत खालपर्यंत्,जमिनीच्या गाभ्यापर्यंत खोद्काम मी केलं तर चालेल का?
-- करा ना. पण तुम्हाला खड्ड्यात गाडायला तत्पर असलेले बायको व इतर व्हिलन मंडळी आजुबाजुला नाहित हे बघुन घ्या.
२०)प्रेमात पडालेला प्रेमी जेव्हा अशी प्रतिज्ञा करतो की "ये कसम खाये हम हर कसम तोड दे"..ही प्रतिज्ञा त्यानं पाळाअवी का? ती पाळणं म्हणजेच ती मोडणं नव्हे काय?
-- शहाणा माणुस मुळात प्रेमात पडतच नाहि, आणि खुळावलेल्या माणसाकडुन प्रति़ज्ञापालनाची कसली अपेक्षा ठेवावी...
>>"I am a liar and I am speaking lie" असं कुणी म्हणत असेल तर त्याचं म्हणणं खरं की खोटं?
-- नवरा असेल तर खरं, प्रियकर असेल तर खोटं
२१)झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?
-- अप्सरेने स्वप्नभंग केल्यावर
२२) हार्ट ट्रांन्सप्लांट प्रमाणे उद्या ब्रेन ट्रांन्सप्लांट किंवा स्मृती ट्रांन्सप्लांट होत असेल माणसाची आयडेंटिटि कुठली?
ज्याची स्मृती ट्रांन्सप्लांट करण्यात आली आहे त्याचाच गत भूतकाळ त्याला आठवत राहील, स्वतःचा नाही. मग त्यानं आयुष्य कुणाचं म्हणुन जगायचं?
स्मृतीचं की त्याच्या खर्‍या खुर्‍या भूतकाळाशी निगडित?
--नव्या स्मृतीतल्या भूतकाळाशी निगडीत

अवांतरः
चला, जगात आम्हि अगदीच एकटे नाहि तर ;)

अर्धवटराव

आशु जोग's picture

13 Sep 2012 - 6:33 am | आशु जोग

असीम त्रिवेदी या व्यंगचित्रकाराचं काय चुकलं
हा देखील एक मोठाच प्रश्न आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Sep 2012 - 6:46 am | अत्रुप्त आत्मा

झोपेत मेलेल्या माणसाला आपण मेलोय किंवा मरत आहोत हे कधी कळतं ?

या गोष्टीवर नक्कीच संशोधन झाले असणार! मृत्यू, मृत्यूपश्चात जीवन, पुढील जन्म या विषयातील जाणकार मंडळी मि पा वर आहेतच. तेच योग्य उत्तर देतील. :)

दारु खराब गोष्ट आहे

एवढे लोक तिला इत्ताली वर्षे पित आहेत

पण दारु संपत कशी नाही

सोत्रि's picture

13 Sep 2012 - 10:27 pm | सोत्रि

दारु खराब गोष्ट आहे

ब्वॉरं... कोणाचा म्हणायचा हा जावई शोध?

पण दारु संपत कशी नाही

खीक्क... कोणाला कशाचं अन बोडकीला केसाचं

- ( इत्ताली वर्षे पिणारा ) सोकाजी

सोत्रि's picture

13 Sep 2012 - 10:27 pm | सोत्रि

.

आशु जोग's picture

14 Sep 2012 - 10:59 pm | आशु जोग

दारु खराब आहेच
ज्येष्ठ विचारवंत अमिताभ बच्चन यांनीच हे म्हणून ठेवलय.

दारुमुळे लिव्हर खराब होते असेही ते म्हणतात.

त्यामुळे आम्ही ती रोज थोडी थोडी संपवतोय.

सुटीच्या दिवशी सामूहीक प्रयत्न करतो.

(पिता पिता) जोग

६)जगातील सर्वच देश कर्जात आहेत(गंमत करत नाहिये, अमेरिका सुद्ध कर्जात आहे.) तर सर्व पैसा जातो कुठे?

कान इकड करा सांगते.... सारा पैसा ना गरिबांकडे आहे. त्यांनी साठवल्यामुळे श्रीमंतांकडे नाही उरला.

संदर्भ्..अर्थात अमेरिका.

Kavita Mahajan's picture

14 Sep 2012 - 2:21 pm | Kavita Mahajan

१४)पक्षी झोपेत झाडावरुन खाली पडत कसे नाहित?

कारण फांदीवर ते विशिष्ट पद्धतीने पाय गुंडाळतात व पायांना त्यामुळे कुलुप लागल्यासारखे होते. माझ्या कुहू या कादंबरीच्या वेळी मी पक्ष्यांच्या दैनंदिन सवयींचा अभ्यास केला, तेव्हा हे समजले. :-).

यावर एक झक्कास किस्सा आठवतो.

शाळेत साधारणतः ८वीत वगैरे.
प्र. शास्त्रीय कारणे द्या. 'रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये?'
उत्तरः
झाडावर हडळ असते.
रात्री आपण झोपलो का ती खाली येते.
हडळ आपल्याला खूप हसवते. ती गुदगुल्या करते. आपण हसतो.
ती अजून हसवते. आपण अजून हसतो.
पण सकाळी उठून पहातो तर आपण मेलेलो असतो.
म्हणून रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये.

तात्पर्यः
सकाळी उठून पाहिलं की कळतं.

ज्ञानराम's picture

16 Sep 2012 - 10:14 am | ज्ञानराम

हा हा हा ह्या....... >>>:bigsmile: