गाभा:
आज जरी भारताची अतीशय प्रगती होत असली ,तरी दुसरीकडे ज्या हिशोबाने लोकसंख्या वाढते आहे तेच पुढे त्रासाचे कारण बनणार आहे. तेव्हा हा प्रश्न पडतो की वाढ्त्या लोकसंख्ये बद्दल काय करायला पाहीजे.??
आपली मते जाणुन घ्यायला उत्सुक आहे. ~X( ~X( ~X( ~X(
प्रतिक्रिया
14 Aug 2008 - 3:10 am | नाटक्या
कुटुंब नियोजन. आणखी काही करायला नको 8}
14 Aug 2008 - 3:51 am | मुशाफिर
कुटुंब नियोजनाविषयी आपल्या देशात असलेली सम्पूर्ण अनास्थाच ह्या समस्येच मूळ आहे. तेव्हा सामाजिक प्रबोधनाचा फार उपयोग होण्याची शक्यता जवळपास सम्पलेली आहे. र. धो. कर्व्याना जी गोष्ट काहि दशकान पूर्वी समजली होती , ती आजही आपल्या देशातील लोकाना पटू नये हे दुर्देव. आपण वेळीच सावध झालो नाहि, तर भारताची एक शोकान्तिकाच होणार हे नक्की !!
14 Aug 2008 - 4:07 am | धनंजय
त्यावेळी सक्तीचे कुटुंबनियोजन केले ते बरे नाही केले असे लोकांचे मत होते. तुमचे मत काय?
आणिबाणीनंतर कित्येक वर्षे कुटुंबनियोजन कार्यक्रमांकडे संशयित नजरेने बघितले जायचे, असे ऐकून माहिती आहे.
14 Aug 2008 - 4:28 am | मुशाफिर
त्या वेळी फक्त झोपडपट्टीत रहात असलेल्या लोकान्च कुटुंबनियोजन करण्याची मोहीम सुरु होती , असे ऐकले आहे (माझा तेव्हा जन्मही झाला नव्हता). चीन सारख कायध्यानेच काही निर्बन्ध आणणे गरजेच आहे. माझ म्हणण अस आहे की ,कुटुंबनियोजन न करणार्या व्यक्तिना कुठल्याही प्रकरचे सरकारी लाभ नाकारावेत. आता, कुठल्याही विधायक गोष्टिची सुरवात करायची तर त्याला समाजातील काही घटक विरोध करणारच!! पण असे जहाल उपाय केल्याशिवाय ह्या समस्येच निराकरण होणे कठिण आहे.
14 Aug 2008 - 11:05 pm | विकास
त्यावेळी सक्तीचे कुटुंबनियोजन केले ते बरे नाही केले असे लोकांचे मत होते. तुमचे मत काय?
आणिबाणीनंतर कित्येक वर्षे कुटुंबनियोजन कार्यक्रमांकडे संशयित नजरेने बघितले जायचे, असे ऐकून माहिती आहे.
सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. भा. नि. पुरंदरे यांनी शल्यकौशल्य ह्या त्यांच्या आत्मचरीत्रात्मक पुस्तकात या संदर्भात लिहील्याचे आठवते की, "आणिबाणीत ज्या काही ठिकाणी पद्धतीने कुटूंबनियोजन राबवले गेले त्याचा परीणाम म्हणून नंतर आलेल्या जनता सरकारने त्या कडे पूर्णच दुर्लक्ष केले. परीणामी येउ घातलेली चांगली फळे थांबली (लोकशिक्षण आणि अवेअरनेस)..."
बाकी बळजबरीच्या मी विरोधात आहे पण लोकशिक्षण मात्र सातत्याने होणे महत्वाचे आहे असे वाटते.
14 Aug 2008 - 5:29 am | खरा डॉन
काँडोमचा वापर वाढवला पाहिजे.
-खरा डॉन
बाकी सगळे क्लॉन...
14 Aug 2008 - 9:38 pm | प्रकाश घाटपांडे
कॉमेडीचा वापर वाढवला तरी चालनं. मरेस्तोवर हासतील. अन मरतील.
प्रकाश घाटपांडे
14 Aug 2008 - 6:57 am | रेवती
आपले मतही जाणून घ्यायला आवडेल. आपण तयार आहात का एकतरी मूल दत्तक घेण्यास?
आता माझे मत असे आहे की सगळ्यांना समस्या व आपल्या परीने करण्याचे उपाय माहीत आहेत. सुज्ञास सांगणे न लगे.
रेवती (आज्जी)
14 Aug 2008 - 7:35 am | हर्षद आनंदी
लोकसंख्या वाढीचे मुळ कारण म्हणजे, अशि़क्षितपणा आणि कुटुंब नियोजनाबाबत औदासिन्य !!
|| निर्लज्जम् सदा सुखी ||
14 Aug 2008 - 8:58 am | विसोबा खेचर
लोकसंख्या वाढीचे मुळ कारण म्हणजे, अशि़क्षितपणा आणि कुटुंब नियोजनाबाबत औदासिन्य !!
हर्षद आनंदीशी सहमत आहे!
आपला,
(औरस, अनौरस कुठलंही अपत्य नसलेला, अविवाहीत!) तात्या.
14 Aug 2008 - 9:26 am | प्रकाश घाटपांडे
"भगवान / अल्ला की देन" " जो चोच देतो तो चारा ही देतोच" वगैरे.. झोपड पट्टीत अधिक मुले असतील तर त्यांच्या कडे "खाणारी तोंड" अस न बघता" कमावणारे हात" या दृष्टीने पाहिले जाते. लोकसंख्या वाढ ही मूळ समस्या नसून नियोजनाचा अभाव हे कारण आहे असाहि एक मत प्रवाह दिसतो. त्यांच्या मते लोकसंख्यावाढ ही गोष्ट अपयश टांगायची खुंटी आहे. भारतात विपुल निसर्ग संपदा आहे ती आहे त्या लोकसंख्येच्या दुप्पटीला हि पुरुन उरेल अशी आहे.
मी स्वतः या मताशी असहमत आहे. नियोजनाचा अभाव हा आहेच यात शंका नाही.
प्रकाश घाटपांडे
14 Aug 2008 - 9:36 am | मराठी_माणूस
लोकसंख्या हा प्रश्न न समजता प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ हाताशि आहे असे समजा. तेव्ह्ढे रोजगार निर्माण करा. फक्त शहरेच नव्हे तर बाकिच्या भागांच्या प्रगति कडे पण लक्ष द्यायला हवे. रोजगार आणि शिक्षण ह्याचि कायम स्वरुपी सोय झालि कि अशिक्षित पणा बराचसा कमि होइल आणि लोकांना त्यांचे त्यानाच कुटुंब नियोजनाचे महत्व पटेल , सक्तिचि गरज भासणार नाहि.
15 Aug 2008 - 2:22 am | मुशाफिर
शेवटी निसर्गात उपलब्ध साधनानाही मर्यादा आहेत. लोकसंख्या हा प्रश्न न समजता प्रचंड प्रमाणात मनुष्यबळ हाताशि आहे असे समजा.
हे जरी खरे मानले तरी , एव्हढ्या लोकाना अन्न, वस्त्र आणि निवारा आपण खरोखर पुरवू शकतो का? ह्याचा विचार करायलाच हवा!! आणि शिक्षणाचे म्हणत असाल, तर आजही स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक मुलगाच व्हावा म्हणून स्त्री भ्रुणाचा गर्भपात करुन घेतात हे कशाचे लक्षण आहे?
त्यामुळे, सक्तिचे कुटूम्बनियोजन हाच एक पर्याय आपल्या सर्वानपुढे आहे.
14 Aug 2008 - 9:39 am | चतुरंग
प्रश्न मोठा आहे आणि त्यात मी काय करु शकतो?
आजकाल दोनच मुलं (मूल ह्या अर्थी) होऊ द्यायचं प्रमाण सुशिक्षित वर्गात खूप आहे. कित्येकदा फक्त एकच मूल असते.
त्यातले किती जण एक स्वतःचे होऊ देऊन दुसरे दत्तक घेऊ शकतील?
सुशिक्षित वर्गानेच ह्यात पुढाकार का घ्यावा हा युक्तिवाद नको. अंतिमतः पुढच्या पिढ्यांना काही चांगले आयुष्य अनुभवायचे असेल तर आपण काही देणे लागतोच.
ह्या शिवाय तळातल्या लोकांचे लोकशिक्षण, नियोजन हे उपाय सरकारी/एन.जी.ओ. ह्यांच्या पातळीवर होत रहाणे गरजेचे आहे. शिक्षणाने झापडे किलकिली व्हायला मदत होईल.
चतुरंग
14 Aug 2008 - 10:49 am | विदुषक
चिन चे उदहरण २ गोश्टी साठी ...
१. कुटुंब नियोजनाबाबत कडक धोरण आणी त्याची अमलबजवणी .... (लोकशाही मधे कदक धोरन शक्य आहे ?)
१. लोकसंख्या ही समस्या न मनता .. ती चा वापर शक्ती म्हनुन करणे
हे दोन्ही उपाय एकाच वेळी करायला पाहीजेत
मजेदार विदुषक
14 Aug 2008 - 2:57 pm | सहज
चीन सारखे १ मुल धोरण
समजा दोन घरे - शेजारी
जोडपी त्यांना एकच मुल व एक आई वडील व, सासु सारसे हो [२ आजी २ आजोबा, एकच मुल म्हणल्यावर कोणावर अवलंबून?]
=१४ लोक
त्या लहान मुला मधील एक मुलगा एक मुलगी...
काही वर्षानी मोठी झाली व त्यांचे लग्न झाले
समजा सगळे कुठल्यान कुठल्या दुखापतीने बेजार पण दीर्घायुषी तसेच आर्थीक साक्षरता कमी
कालांतराने एका कमावत्यावर किति लोकांचा भार असेल विशेषता जर सरकार सगळ्यांना सांभाळण्या इतके सक्षम नसेल व महागाई अशीच असेल?
-----------
उपाय
१) सरासरी लग्नाचे वय २५ ते ३० [निदान सध्याच्या सरासरी वया पेक्षा ५ वर्षाने आधीक] असावे या करता तरुणात / समाजात प्रबोधन काही बाबत जसे सरकारि नोकरीस पात्रता म्हणून आवश्यक
२) [सरासरी ] आईचे वय पहील्या मुलाच्या जन्माच्या वेळी - २५ ते ३० या करता तरुणात / समाजात प्रबोधन
जेणे करुन जन्मदर जरा मंदावेल.
३) २ पेक्षा जास्त मुले नकोत.
४) एक स्वताचे मुल व दुसरे दत्तक शक्य असल्यास
५) २ पेक्षा जास्त मुले असल्यास शक्य तेवढ्या सर्व सरकारी सवलतींना अपात्र / जादा टॅक्स /शिक्षणाचा, आरोग्य सेवेचा जादा खर्च इ जास्त भुर्दंड व दोन पेक्षा कमी मुले असतील तर शक्य तेवढ्या सवलती जसे त्या घरातील वृद्ध लोकांना आरोग्यसेवा, टॅक्स मधे सवलत
जेणे करुन कमी मुले [एक विशिष्ट जन्मदर-मृत्युदर असणे] असणे हे आर्थीक दृष्ट्या आयुष्यभर पुर्ण कुटुंबाला फायद्याचे आहे व समाजाच्या, देशाच्या हिताचे हे समजावे.
शेवटी थोडे कायदे पण जास्त प्रबोधन, लोकशिक्षण हाच मार्ग. देशहिताला प्राधान्य लोकांनी दिले, असे करण्यामागचे फायदे पटवून दिले तरच लोक मनावर घेतील. अन्यथा काय आहे ते चालायचेच.
14 Aug 2008 - 2:24 pm | विनायक प्रभू
बेअर फूट डॉक्टर चा चिनमध्ये उपयोग केला जातो. ह्याचे डॉ. ज्ञान फक्त निरोध चा शास्त्र शुद्ध वापर, कॉपर टी इनसरशन व इतर साधनाचि माहिती गरिबातल्या गरिबात ,गावा गावात पोचवणे एवढ्यापुरते मर्यादित. बाकी प्रॅक्टीसला परवानगी नाही. हा प्रयोग खुप यशस्वी झाला.
विनायक प्रभु
14 Aug 2008 - 2:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे हे डॉक्टर आपल्या बेअरफूट इंजिनीयरसारखे आहेत का?
www.barefootcollege.org
14 Aug 2008 - 6:45 pm | खादाड_बोका
मी ईथे अमेरीकेत राहातो. तरी सुध्धा मला फक्त एकच अपत्य आहे. बायकोची ईछ्या आहे की दुसरे पाहीजे. पण मी तिला समजवुन सांगीतले, की आपण दुसरे मुल भारतातुन दत्तक घेवु. आधी नाही म्हणाली. पण आता तयार झाली आहे. मला वाट्तो की जर प्रत्येक NRI नी एक मुल दत्तक घेतले, तर कमीत कमी अनाथ मुलांचा तरी प्रश्न सुटेल. B)
Charity Begins at Home....
14 Aug 2008 - 9:35 pm | llपुण्याचे पेशवेll
हरकत नाही NRI नी मुले दत्तक घ्यायला. अशी सगळी मुले NRI नी मुले दत्तक घेण्याचा सपाटा लावला तर कदाचित अनाथ मुलांची संख्या वाढण्याचा धोकाही संभवतो. म्हणजे कोणतरी NRI मूल दत्तक घेईलच तर ठेवा नेऊन झालेले मूल अनाथालयाच्या पायरीवर ही प्रवृत्ती वाढणार नाही कशावरून.
पुण्याचे पेशवे
14 Aug 2008 - 10:44 pm | रेवती
पेशवे जी,
त्या मूलाचं काही बरं वाईट होण्यापेक्षा अनाथालयात आलेले चांगले.
रेवती
14 Aug 2008 - 6:58 pm | मदनबाण
कठीण प्रश्न आहे !!
सुटण्याची अपेक्षा कमी आहे !!
कारण :--
चालु - रबडीदेवी प्रसन्न..
-----------------------------
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
14 Aug 2008 - 7:23 pm | शितल
सुशिक्षित हिंदु कुंटुंबात एक नाही तर दोन मुले असतात. आणि एका जॊपल्याला एकच अपत्य , दुसरे हवे असेल तर दत्तक घ्या, असा कायदा.
आणि सक्तीचे कुटंबं नियोजन हाच मार्ग आहे.
मला वाटते हिंदुस्थानातील मुस्लीमांना विवाह (कितीही विवाह करण्याची मुभा) आणी मुल ह्यावर काही तरी निर्बंध घालायला हवेत.
तरच भारतात लोकसंख्या प्रश्न सुटु शकेल.
14 Aug 2008 - 7:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
१५% मुसलमानांवर बंदी घालून हा प्रश्न किती सुटणार? त्यातले पण समजा ५-१०% सुशिक्षित असतीलच!
सगळ्यांनीच कुटुंबनियोजन शिकलं पाहिजे. आणि दत्तक अपत्य संकल्पना खूप चांगली वाटते.
14 Aug 2008 - 8:05 pm | शितल
>>>>१५% मुसलमानांवर बंदी घालून हा प्रश्न किती सुटणार?
भारतात १५% मुसलमान असतील असे तुम्हाला वाटते का ?
पाकिस्तान एवढेच भारतात मुस्लीम असतील.
भारताच्या लोकसंख्येच्या ४५% मुस्लीम आहेत भारतात.
14 Aug 2008 - 9:21 pm | प्रकाश घाटपांडे
विषयांतर नको पण चुकीची माहिती दिली जाउ नये म्हणुन केवळ प्रतिसाद.
इथे पहा भारताबद्दल माहिती. १३.४ टक्के मुस्लीम भारतात आहेत.
लोकसंख्या नियंत्रण करण्यात कुठल्याही धर्माचा अडसर नको.
प्रकाश घाटपांडे
14 Aug 2008 - 9:28 pm | विकेड बनी
भारताच्या लोकसंख्येच्या ४५% मुस्लीम भारतात असते तर तुमचा प्रत्येक शेजारी तुम्हाला मुस्लीम दिसता. ट्रेनमधली ३ पैकी १-२ व्यक्ती मुस्लीम. ऑफिसातील अर्ध्या व्यक्ती मुस्लीम. आम्हाला भारतात नाही असे काही दिसत.
काय फेकाफेकी आहे ही?
14 Aug 2008 - 7:36 pm | मदनबाण
मला वाटते हिंदुस्थानातील मुस्लीमांना विवाह (कितीही विवाह करण्याची मुभा) आणी मुल ह्यावर काही तरी निर्बंध घालायला हवेत.
हा विचार उत्तम आहे पण ते लगेच म्हणतील आमच्या कुराणाच्या खिलाफ़ आहे..
आणि आमचे नालायक राजकारणी तर एकवेळ सर्व हिंदुंची नसबंदी करतील पण त्यांना मात्र एका शब्दची विचारणा करणार नाहीत !!!!!
(कट्टर हिंदु)
मदनबाण.....
"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
14 Aug 2008 - 8:48 pm | नारायणी
या समस्येत हिंदु मुस्लिम असा भेद केला तर समस्या बाजुलाचं राहिल आणि आंदोलने,राजकारण हेचं सुरु राहिल.
14 Aug 2008 - 9:47 pm | सखाराम_गटणे™
तुमचे बरोबर आहे, कायदा सगळ्यांना सारखा हवा.
उगाच अल्पसख्यांक म्हणुन लाड नकोत.
त्यानेच तर भारतापुढ्च्या अडचणी वाढल्यात.
सखाराम गटणे
14 Aug 2008 - 11:46 pm | मुशाफिर
तो धर्माधारित असू नये ही अपेक्षा आहे. मी चीन चे उदाहरण ध्यानात घ्यावे असे आधी म्हटले आहे, कारण तेथे फक्त कायदे केले जात नाहीत, तर ते अमलातही आणले जातात. तसेच , अगोदरच्या काहि प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ही पूर्ण राष्ट्रची समस्या आहे हे जाणून प्रत्येक भारतीयाने ह्या विषयी जबाबदारीने वागायला हवे, मग त्याचा धर्म कोणताही असो. केवळ अल्पसन्ख्यान्कच ह्या सम्यस्येला जबाबदार नाहीत, नाहीतर उत्तरेकडील हिन्दू बहुसन्ख्य राज्यात बेसुमार लोकसन्ख्या वाढ का होते आहे?
तसेच मध्यमवर्गाच म्हणाल, तर साधारण १९८० पर्यन्त तरी मध्यमवर्गीयही कुटूम्बनियोजन करत नव्हते (अगदी तथाकथित पुरोगामी हिन्दू सुद्धा!). दोनपेक्षा (खरेतर आता एकच!) जास्त मुले असल्यास सरकारी लाभ देवू नयेत. तसेच, भविष्यात जे ह्या नियमाचे उल्ल्नघन करतील त्याना आर्थिक दन्ड ही करावा. राज्यकर्त्याना ह्या गोष्टिचे भान यावे म्हणून जनतेनेच अशा लोकाना आपले प्रतिनीधित्व नाकारवे. उदा. लालू यादव.
ह्या गम्भीर सामजिक समस्येला धार्मिक समस्या होवू देवू नये. बाकी आपण सारे सुज्ञ आहातच!
14 Aug 2008 - 11:13 pm | टारझन
इथे ऊगाच खाजवून काहीही होणार नाहीये. ज्ञानेश्वरी वाचून किती ज्ञानेश्वर पैदा झाले ? आपले लोक सांगून ऐकतील तर शप्पथ. आपले रक्त झिजवण्यापेक्षा , मी एक प्रॅक्टीकल ऊपाय सांगतो. मला एकच मुल असेल (मुलगा/मुलगी काहीही असो).. असं आज प्रत्येकाने ठरवलं तर ऊपाय आगामी १० वर्षात नक्कीच दिसतील.रोम एका दिवसात तयार होत नाकी, ईच्छाशक्ती आणि वेळ या गोष्टी कारणीभुत होत्या...... आपलं पब्लिक कुलदिपकाच्या नावाखाली ७-८ पणत्या पेटवून मोकळ होतं... मग बसतो प्रत्येक पणतीत तेल घालत.हे पणत्या-दिव्याचे खेळ थांबणे गरजेजे आहे.
अजुन एक प्रकार आहे, हे पैदास वाढण्याच कारण "आहे देवाची इच्छा" असं सांगतात. यांना सरळ विचारायला हवं की "का रे बाबा, तुला देव कधी कुठे बोलला, की हे एवढे काम पुर्ण कर ? " असले ढेकुण मेंटॅलिटीचे लोक मुख्य कारण आहेत .
तसा तात्यांचा ऊपाय एकदम बेष्ट पण तो फारच अवघड आहे.
अवांतर : कुठेतरी वाचल होतं की प्रत्येक देशात लोकसंख्येच एक चक्र चालु असतं. युरोपीय देशात लोकसंख्यादर वाढतो आहे .. तर भारत-चिन यांनी आपला पिक गाठलेला असुन आता आपला लोकसंख्यावाढीचा दर कमी होणं चालू आहे.
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
14 Aug 2008 - 11:21 pm | चिन्या१९८५
कुटुंबनियोजन ते ही सर्वांना
15 Aug 2008 - 12:11 am | प्राजु
थोडि जातीवाचक पण गंभिर चर्चा चालू आहे.
शितलचे म्हणणे चुकीचे आहे असे मी नाही म्हणणार. मुस्लिम लोकसंख्येचा आकडा चुकला असेल पण त्यातून तिला जे सांगायचे आहे ते महत्वाचे आहे. माझ्या पाहण्यात मुस्लिमच काय पण अशी हिंदू कुटुंबही आहेत जी मुलाच्या हव्यासापायी ५ मुलांना जन्म देऊन कसे तरी उदर निर्वाह करताहेत. सांगलीत आमच्या सोसायटीच्या वॉचमनलाच ५ मुली आहेत. मुलगा होत नाही म्हणून हा अट्टाहास. करायल गेले एक आणि झालं भलतचं. मुलगा हवा म्हणून ५ मुली जन्माला घातल्या आणि आता त्यांचे शिक्षण, लग्न.. या सर्वाम्चा खर्च कसा करायचा या विवंचनेत दोघ नवरा बायको आहेत.
हीच कथा थोड्या फार फरकाने संपूर्ण भारतात दिसून येते. बाळंतपणात आई गेली.. त्यामुळे पित्याने त्या छोट्यासाठी दुसरी आई आणली.आणि त्याचा सांभाळ करत त्या दोघांनी मिळून आणखी २-३ जन्माला घातली. हे खूप कॉमन झाले आहे.
समाज प्रबोधन आणि २ पेक्षा जास्त अपत्ये असतील तर कोणत्याही सुविधा उपलब्ध होणार नाहीत असा कायदा. हाच उपाय आहे.
यातही अशी पळवाट होऊ शकते... जसे.. बायको सांगते आहे.. " माझी दोन मुले आणि तुझी २ मुले मिळून आपल्या २ मुलांना मारताहेत"
याला काय सांगायचं कपाळ!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Aug 2008 - 12:31 am | धनंजय
चीनच्या १-मूल धोरणाबद्दल इथे चांगली चर्चा झाली आहे. शिवाय आजकाल मध्यमवर्गात कित्येकदा एक-दोनच अपत्ये असलेली दिसतात.
तसे बघता चीनमध्ये आणि भारतामध्येही कुलदीपकाला फार महत्त्व आहे. लहान कुटुंब हवे आणि कुलदीपकही हवा या २ हव्याहव्याशा गोष्टी कधीकधी एकमेकांना टक्कर देतात. याबाबत भडकमकर_मास्तरांचा संपादकीय लेख पुन्हा वाचण्यासारखा आहे.
२००६ सालाच्या आकड्यांप्रमाणे चीनमध्ये दर १०० मुलांमागे केवळ ७९ मुली जन्माला येत होत्या. हे भारतातल्या आकड्यांपेक्षा बरेच वाईट आहे. चीनच्या उदाहरणाचे अनुकरण करायचेच असेल तर डोळसपणे करावे. प्राजु वर त्यांच्या वॉचमनचे उदाहरण देतात - कुलदीपक मिळवण्यासाठी ते चार मुलींचा बोजा सांभाळत आहेत. ते तरी ठीक. त्याला एकच मूल व्हायची सक्ती असती, तर या चार मुलींच्या अर्भकांबद्दल त्याला इतका पुळका राहिला असता का?
या चर्चेतला विचार एकांगी राहू नये. चीनचे उदाहरण देताना, भारतात कुलदीपकाचे महत्त्व आठवताना भडकमकर मास्तरांचा अग्रलेख या ठिकाणी अगदीच विसरला जाऊ नये.
15 Aug 2008 - 12:45 am | प्राजु
धनंजय तुमचं म्हणणं १००% खरं आहे. म्हणजेच काय तर समाज प्रबोध! याच्या शिवाय पर्याय नाही. गर्भ निदान न करणे.. आणि २ मुलं झाली की ऑपरेशन करून घेण्यासाठी उद्युक्त करणे. यालाच समाज प्रबोधन म्हणावे काय?
साक्षरता आणि तळागाळातील लोकांपर्यंत जनजगृती करणे याशिवाय पर्याय आहे का?
माझ्या बघण्यात आणखी एक उदाहरण. माझ्या मैत्रिणीच्या नवर्याला ४ मोठ्या बहिणी आहेत. मैत्रीण जेव्हा गरोदर राहिली तेव्हा तिला मुलगा व्हावा म्हणून बरेच उपास तापास केले तिच्या सासूने आणि तिलाही करायला लावले. कर्मधर्मसंयोगानं तिला मुलगा झाला. पण तिला जेव्हा दुसर्यांदा दिवस गेले तेव्हा तिला पुन्हा जुळी मुलंच झाली. आता तिची सासू अतिशय आनंदात आहे.. पण ती मात्र मुलीसाठी हळवि होते आहे.
याला काय म्हणावे??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Aug 2008 - 2:51 am | वेदनयन
कुटुंबनियोजन सहसा सुशिक्षित करतात. समाजाच्या खालील स्थरात कुटुंबनियोजनचा अभावच असतो. सुशिक्षितांना एक किंवा दोन मुले तर अशिक्षितांना अनेक. त्यामुळे मला असे वाटते, सुशिक्षित व अशिक्षित यामधील अंतर वाढेल / वाढत आहे. धनिक व गरीब यांचे प्रमाण व्यस्त असणे कोणत्याच देशाला परवडणारे नाही.
याउलट समाज प्रबोधनाने योग्य असा परिणाम होईल. पण त्याची फळे चाखायला थोडा वेळ लागेल.
--माझ्या दोन पावल्या
15 Aug 2008 - 3:38 am | मुशाफिर
भारताची लोकसन्ख्या ज्या वेगाने वाढत आहे, त्या मानाने समाजप्रबोधन करणे फारच कठिण आहे. आपली लोकसन्ख्या नक्कि किती आहे हेहि एक रहस्यच आहे (कारण, देशातल्या दुर्गम भागात खरोखर जनगणना केली जाते का? हा एक स्वतन्त्र अभ्यासाचा विषय आहे.)
आपण ह्या बाबतीत किती बेजबाबदारपणे वागत आलो आहोत (२०व्या शतकाच्या सुरवातीपासूनच) ते http://www.indianchild.com/population_of_india.htm इथे वाचा.
तेव्हा, ताबडतोब आणि दीर्घकाळ परिणाम दाखवणारा उपायच करायला हवा आणि सध्यातरी सक्तिचे सन्ततिनियमन हाच पर्याय दिसतो.