पावसाळ्यातलं भंडारदरा

उदय के'सागर's picture
उदय के'सागर in भटकंती
9 Aug 2012 - 3:33 pm

एक साधी, छोटी सहल ज्यातून पावसाचा आनंद मिळावा आणि रोजच्या त्या रटाळ कामातून थोडा 'चेंज'/आराम मिळावा ह्या असल्या अगदी माफक हेतूने आम्ही काही मित्र मागच्या विकांताला भंडारदराला गेलो आणि प्रवासाच्या सुरवातीपासून (नाशिक-भंडारदरा) ते शेवटापर्यंत निसर्गाने जे काहि त्याचे मनोहारी रुप दाखवले, जी काही करमणूक केली... अहाहा.. त्याचे वर्णन करायला शब्दच नाहीत..
हेच वर्णन फोटोतून करावे हा एक प्रयत्न. केवळ प्रयत्नच कारण फोटोंपेक्षा प्रत्यक्ष ते अनुभवणे ह्यात अर्थात खूपच फरक आहे...

(खुप मुसळधार पाऊस/वारा ह्या मुळे बरेच फोटो गाडीत बसूनच काढले आहेत, काही चालू गाडीत काढले तर काही फोटोंमध्ये पाण्याचे थेंब दिसतील जे पावसामुळे लेन्स वर सतत पडत होते... खास कॅमेरा आणि फोटो चांगले यावे यासाठी तिथे एक नवीन छत्री ही घेतली, पण वाराच एवढा की तिनेही जास्त काळ साथ दिली नाही. उल्टी-पाल्टी होउन नंतर उडूनच गेली, कदाचित तिलाही पावसात मनसोक्त हुंदडायचं होतं :))

१. नाशिक-भंडारदरा रस्त्यावरील एक गावं (परदेस वाडी)

२. हिरवीगार परदेस वाडी

३. भंडारदरा येथील 'आर्थर लेक' - सायंकाळच्या वेळी. हा लेक खुप शांत आणि त्याचवेळी खुप भयानकहि वाटत होता...कदाचित तुफान वारा आणि मुसळधार पावसामुळे.....

४.

५.

६.

७.

८.

९. (गाडीतून काढलेला फोटो...खिडकीच्या काचांवर ओघळणार्‍या पाण्यामुळे हा फोटो एखाद्या चित्रा सारखाच दिसतो नाही? :))

१०.

११

१२.

१३.

१४.

१५.

१६. असंख्य धबधबे आणि धुके...

१७.

१८.

१९.

२०.

२१.

२२.

२३. भाताची शेती आणि शेतकरी

जसं कडक उन्हातून एकदम सावलीत वा घरात अल्यावर अपल्याला अंधारी येते ना तसंच मला ह्या सहलीला जाउन घरी आल्यावर डोळ्यावर 'हिरवळी' येत होती :D ...दोन दिवस सतत आणि चारही बाजूंनी एवढी हिरवळ बघत होतो की ती डोळ्यापुढून जातच नव्हती.
कधी कधी खूप काही व्यवस्थित ठरवून / प्लॅन करुन काढलेल्या सहलीत अपेक्षेप्रमाणे मजा येत नाही आणि कधी कधी ह्या अश्या 'झटपट' आणि 'अनप्लॅनड' सहली आपल्याला खूप काही आनंद देउन जातात... तुमचीही अशीच एक पावसाळी सहल होवो ह्या सर्व मिपाकरांना शुभेच्छा :)

प्रतिक्रिया

जातीवंत भटका's picture

9 Aug 2012 - 3:44 pm | जातीवंत भटका

भंडारदरा परिसरातील भटकंती नेहमीच आनंद देऊन जाते. रतनगड, पाबरगड, शिरपुंज्याचा भैरव ह्या बलदंड पहारेकर्‍यांच्या कुशीतलं प्रवरेच खोरं अफलातून आहे !
सुंदर प्रचि , आणखी येऊद्यात...

बॅटमॅन's picture

9 Aug 2012 - 4:35 pm | बॅटमॅन

अतिशय तृप्त करणारे फोटो. बघूनच टाळी लागली :) आता लौकरन जैन म्हंतो कुटंतरी.

मी_आहे_ना's picture

10 Aug 2012 - 10:49 am | मी_आहे_ना

असेच म्हणतो...

किसन शिंदे's picture

9 Aug 2012 - 4:43 pm | किसन शिंदे

पावसाळ्यातली हिरवाई, धुक्याची दुलई आणि गारवा याचा पुरेपूर अनुभव प्रबळगडला घेतला होता, त्यामुळे तुम्ही किती मजा केली असेल याचा अंदाज येतोय.

"आर्थर लेक"च्या फोटोतलं वातावरण अतिशय गुढ वाटतंय.

मेघवेडा's picture

9 Aug 2012 - 4:46 pm | मेघवेडा

प्रचंड मस्त!

यशोधरा's picture

9 Aug 2012 - 4:47 pm | यशोधरा

फोटो १८ व १९ चे फ्रेमिंग सुरेख आहे.

प्राध्यापक's picture

9 Aug 2012 - 6:19 pm | प्राध्यापक

मस्त फोटो,एखादा फोटो रन्धा धबधब्याचे रौद्र रुप दाखवणारा हवा होता,हा धबधबा म्हणजे मनात धडकी भरवणारा आणी त्याच वेळी डोळ्याला सुखवणारा एक अप्रतीम स्थळ.

काय अफलातून फोटो आहेत सर्व.

प्रचेतस's picture

9 Aug 2012 - 9:15 pm | प्रचेतस

सुरेख फोटो.

शेंडी ते घाटघर व्हाया रतनवाडी हा भंडारदर्‍याच्या बॅकवॉटरला संपूर्ण वळसा मारून जाणारा रस्ता तर अतिशय देखणा आहे.

शैलेन्द्र's picture

9 Aug 2012 - 9:34 pm | शैलेन्द्र

खास्करुन पहीला पावुस झाला की तिथे रात्री, काजव्यांची जी तोरण लागतात, ती अप्रतीम असतात

१ नंबर भावा..

खुप मस्त सतेज वाटले फोटो पाहून.
प्रत्यक्ष अनुभव तर निव्वळ स्वर्गच असणार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Aug 2012 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

झकास.

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

9 Aug 2012 - 10:42 pm | सुनील

फोटो मस्तच!

अत्रुप्त आत्मा's picture

9 Aug 2012 - 10:51 pm | अत्रुप्त आत्मा

एकच नंबर आल्यात फोटू :)

सर्वसाक्षी's picture

9 Aug 2012 - 11:21 pm | सर्वसाक्षी

मन प्रसन्न करणारी हिरवी चित्रे. झकास.

स्पा's picture

10 Aug 2012 - 8:21 am | स्पा

असेच

म्हणतो..
कसले फोटो आलेत ... वा अप्रतिम.. स्वत: जाऊन आल्यासारखं वाटलं

प्यारे१'s picture

11 Aug 2012 - 4:25 pm | प्यारे१

खूपच मस्त...!

वा... अगदी हिरव गार वाटल फोटो पाहुन ! :)
पहिला फोटु पाहुन डायरेकट पोहण्यासाठी उडी मारावी वाटली. :)
सगळेच फोटो लयं भारी ! :)

मैत्र's picture

10 Aug 2012 - 12:13 pm | मैत्र

धन्यवाद फोटो इथे डकवल्याबद्दल!!
मस्त हिरवंगार वाटलं... इतक्या लांब जाणं काही शक्य नाही .. किमान पाहून तरी आनंद झाला..

पियुशा's picture

10 Aug 2012 - 12:37 pm | पियुशा

अप्रतिम फोटो :)

अशोक पतिल's picture

10 Aug 2012 - 10:24 pm | अशोक पतिल

अप्रतिम !!!

बारक्या_पहीलवान's picture

11 Aug 2012 - 5:13 pm | बारक्या_पहीलवान

अप्रतिम, सुंदर फोटो.
इकडे सौदी अराबिया वाळवंटत असे सुंदर फोटो पाहून जीवाचे पाणी पाणी होते. सध्या इथल्या अति उन्हाने पाणी पाणी होत आहे. पाउस तर फार फार दूरची बात.
| मस्त हिरवंगार वाटलं... इतक्या लांब जाणं काही शक्य नाही .. किमान पाहून तरी आनंद झाला..
सहमत आहे. इथल्या ओअसीस पेक्षा हे फोटो पाहून आनंद मानतो.

अर्धवटराव's picture

11 Aug 2012 - 8:29 pm | अर्धवटराव

निव्वळ अप्रतीम.

अर्धवटराव

शिल्पा ब's picture

11 Aug 2012 - 10:50 pm | शिल्पा ब

काय हिरवाकंच निसर्ग आहे !
मस्त. अशा ठीकाणी जेव्हा पाउस कमी पडत असेल तेव्हा जास्त मजा येते.

चौकटराजा's picture

12 Aug 2012 - 7:15 am | चौकटराजा

सगळेच मस्त. पण मला १५ लम्बर सर्वात जास्त आवडला. त्यातील पर्स्पेक्टीव्ह खास. धबधब्यातील एखादा फोटो स्लो शटर ठेवून का नाही काढला?. एखादा कामचलाउ ट्रायपॉड बरोबर असावा.

अमोल केळकर's picture

12 Aug 2012 - 12:14 pm | अमोल केळकर

छान सफर :)

अमोल केळकर

तुषार काळभोर's picture

12 Aug 2012 - 10:10 pm | तुषार काळभोर

युरोप, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड दाखवण्यापेक्षा भारतातलंच हे असलं काही का नाही दाखवत?
च्यायला उगाच कॉम्प्लेक्स यायला होतं...
(कॉम्प्लेक्स दूर करणारे फोटो आहेत उदयराव! )

इतकं बरं वाटलं फोटो पाहून!

पैसा's picture

14 Aug 2012 - 10:46 pm | पैसा

प्रत्यक्ष जाऊन आल्यासारखं वाटलं. मस्तच!

वैनतेय's picture

20 Aug 2012 - 12:11 pm | वैनतेय

अप्रतिम
ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा...