घोस्ट इफेक्ट ! (Ghost Effect)

मदनबाण's picture
मदनबाण in कलादालन
24 Jul 2012 - 12:03 pm

सध्या मला माझा कॅमेरा घेउन वेगवेगळे प्रयोग करायचा छंद लागला आहे...
जालावर फोटोग्राफी संबंधी विविध लेख वाचायचे आणि त्याचे जमतील तसे प्रयोग करुन पाहावयाचे...
सध्या जालावर एचडीआर (High dynamic range) फोटोंची धूम चालु आहे... मी सुद्धा यात सामिल व्हायचे ठरवले,मग काय प्रयोग सुरु.
यातला पहिला प्रयोग म्हणजे घोस्ट इफेक्ट ! एचडीआर फोटोग्राफी मधे नको असलेला एक अडथळा...
मी याच अडथळ्याचा वापर करायचे ठरवले.माझा एचडीआर फोटोग्राफी एक प्रयोग थोडासा सफल झाला आहे,पण अजुन हवी तशी लोकेशन किंवा सबजेक्ट सापडला नाही...पुढच्या भागात बहुधा मी एचडीआर फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन....
तो पर्यंत तुम्ही घोस्ट इफेक्ट पहा. :)

कॅमेरा- निकॉन डी-५१००

(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

छायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

24 Jul 2012 - 12:16 pm | चौकटराजा

बाणकाका मी घेतलेल्यात HDR सोय आहे. आपण हे कसे काय केले राव ? आपल्या " येड्या" छंदास सलाम !

बाणकाका मी घेतलेल्यात HDR सोय आहे.
काका ? अहो मी अजुन ६ठी गाठली नाहीये हो ! बहुधा तुमच्या पेक्षा देखील लहान असेन ! ;)
मला हे फोटु काढायला इशेष कष्ट झाले नाहीत्,थॅक्स टु निकॉन एचडी ऑप्शन ! :)
तुमच्या कॅमेरा कंचा हाय बरं ?
खरं तर एचडीआर फोटोग्राफी हे EV स्टॉप्स घेउन केली जाते... म्हणजे -२ /० /+२ असे तीन फोटो एकत्र केले की एक एचडीआर फोटो तयार होतो.परंतु तीन EV स्टॉप्स पेक्षा जास्त घेउन अधुन फोटो घेतले तर जास्त डायनॅमिक रेंज अचिव्ह करता येईल असे मला वाटते.
या वरच्या प्रयोगात दोन फोटोंचा एक फोटो करण्यात आला आहे,तो सुद्धा कॅमेराच करतो... आपण फक्त एचडी ऑपश सिलेक्ट करायचा,फोटोत अधिक स्पष्टता येण्यासाठी योग्य एक्सोजर सेटींग आणि शटर स्पीड मात्र आपण निवडायचा...की घोष्ट इफेक्ट रेडी ! :)
तुमच्या कॅमेरात एचडी ऑप्शन असेल तर तो ऑन करुन फोटो काढुन पहा.शक्यतो आयएसओ रेंज कमी ठेवा.
एचडीआर फोटोग्राफीसाठी ट्रायपॉड हवाच असे मला वाटते...आणि माझ्याकडे असलेला ट्रायपॉड एकदम मरतुकडा आहे...त्यामुळे मला एचडीआर फोटोग्राफी कितपत करायला जमेल अशी शंका आहे.बघुया !
एचडीआर फोटोग्राफी म्हणजे नक्की काय ?
तर हे वाचा:--- http://www.stuckincustoms.com/hdr-photography/

चौकटराजा's picture

24 Jul 2012 - 12:49 pm | चौकटराजा

मानाचा गनपती हाय आपन ! म्हून शान कधी मदी " काका " ते प्नॉसॉनिक टी झेड २५ हाय आमच्यावालं ( गरीब मानुस हाय ! ) पन करून पघतो ! .

बाणा च्यामारी लै भारी रे..
आणखीन किडे दाखव

चिगो's picture

24 Jul 2012 - 2:13 pm | चिगो

लै भारी, बाणजी..

नाना चेंगट's picture

24 Jul 2012 - 2:25 pm | नाना चेंगट

घोस्ट नाही रे बाणा ... गोस्ट.. !

कधी सुधरणार नाहीत हे देशी घाटी लोक... यु नो.

मदनबाण's picture

24 Jul 2012 - 5:16 pm | मदनबाण

घोस्ट नाही रे बाणा ... गोस्ट.. !
स्वारी बरं का नाना !

अत्रुप्त आत्मा's picture

24 Jul 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

मोटर सायकल.... १ नंबर

सुहास..'s picture

24 Jul 2012 - 6:33 pm | सुहास..

ट्यांव !! लईच वेगळी कमाल !!

फोटोकसरती अजुन येवु द्यात बुवाजी !

अमितसांगली's picture

24 Jul 2012 - 7:05 pm | अमितसांगली

छान..

रेवती's picture

24 Jul 2012 - 7:26 pm | रेवती

बापरे! हा भारी इफेक्ट आहे.
कशाचा साईडइफेक्ट म्हणायचा हो बाणकाका? ;)

कशाचा साईडइफेक्ट म्हणायचा हो बाणकाका?
आज्जे... यु टु ? ;)

जाई.'s picture

24 Jul 2012 - 8:47 pm | जाई.

छान जमलाय इफेक्ट

आबा's picture

25 Jul 2012 - 2:46 am | आबा

सुरेख !

मदनबाण's picture

25 Jul 2012 - 9:40 am | मदनबाण

सर्व मंडळींना धन्स ! :)

मदनबाण एक फोतो खिडकीचाही टाका .
मस्त इफेक्ट.

मदनबाण's picture

25 Jul 2012 - 5:41 pm | मदनबाण

धन्स अपर्णा तै... :)

मदनबाण एक फोतो खिडकीचाही टाका .
इथे टिचकी मारा...
खिडकीतुन पाहताना...

स्पंदना's picture

26 Jul 2012 - 7:27 am | स्पंदना

ते पाहिलय हो!
आम्हाला खिडकी बघायची आहे. तेंव्हा खाली रस्त्यावर जाउन त्या खिडकीचा फोटो काढा. माझ्यातरी मते त्या खिडकीतच काय तरी गोम आहे.