एकात्म.... ही माझी घारीवर लिहिलेली एक गोष्ट आहे म्हणून हे नाव दिले आहे.
बर्याच जणांना फोटोची प्रत खराब न होता ते अपलोड कसे करावे हा प्रश्न पडतो. मी असे करतो. अर्थात फोटोशॉपमधेच...
फोटोशॉपमधे फोटो उघडावा.
Image - Size - 800 X 600 px करावा.
File - save for web.... मधे जाऊन पहिजे तो preset select करावा. jpg -High quality ठेवावी....
जयंत कुलकर्णी.
प्रतिक्रिया
24 Jul 2012 - 4:47 pm | सर्वसाक्षी
अतिशय सुरेख चित्रे. सगळीच छान आहेत, तरीही घार विशेष आवडली.
24 Jul 2012 - 5:01 pm | उदय के'सागर
फोटो तर आवडलेच पण त्याही पेक्षा 'फोटोशॉप' चा केलेला योग्य वापर जास्त आवडला. :)
24 Jul 2012 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फोटो तर आवडलेच पण त्याही पेक्षा 'फोटोशॉप' चा केलेला योग्य वापर जास्त आवडला.
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
24 Jul 2012 - 7:07 pm | अमितसांगली
सर्वच फोटो उत्तम..
24 Jul 2012 - 7:47 pm | प्रचेतस
अतिशय सुंदर फोटो.
24 Jul 2012 - 8:44 pm | जाई.
सुंदर फोटोज
25 Jul 2012 - 3:04 am | आबा
सुरेख
घारीचा फोटो तर ए १ आहे !
25 Jul 2012 - 3:44 am | किसन शिंदे
घारीचा फोटो लय भारी!
25 Jul 2012 - 10:34 am | sneharani
सुंदर आहेत फोटो!मस्तच!!
:)
25 Jul 2012 - 10:43 am | अत्रुप्त आत्मा
फोटुग्री येक नंबर....
25 Jul 2012 - 11:21 am | झकासराव
जबरदस्त फोटोग्राफी. लेन्स मोठ्या अपेरेचरची दिसतेय. त्यामुळे फोकसिन्ङ जबरी झालय.
७०-२०० फ २.८ का?
25 Jul 2012 - 11:57 am | जयंत कुलकर्णी
मी आता झूम लेन्स वापरायचे सोडून दिले आहे. फक्त प्राईम वापरतो. प्राईमलेन्स चा Sharpness झूममधे येऊ शकतो असे मला वाटत नाही. ही ३०० ची आहे.
26 Jul 2012 - 11:28 am | झकासराव
ओक्के. :)
2 Aug 2012 - 12:10 am | एस
खरे आहे. प्राईम लेन्सशी झूमची तुलना होऊ शकत नाही. पक्षिछायाचित्रणासाठी निकॉनची ६०० मिमि फार छान लेन्स आहे.
आपला कॅमेरा कोणता आहे?
25 Jul 2012 - 11:02 pm | सुधीर
सगळेच फोटो आवडले! न राहवून एकात्म शोधून काढले. इन्स्टॉलमेंट मधे ५ भाग वाचून काढेन असं ठरवलं खरं, पण कसचं काय, पूर्ण वाचूनच उठावं लागलं. कथा खूप आवडली.
26 Jul 2012 - 1:46 am | अभ्या..
सुरेखच.
photoshop फक्त बॉर्डर फिदरसाठी आहे ना? का फिल्टर्स चा वापर पण आहे? घारीचे ईल्सस्ट्रेशन वाट्ते अगदी.
26 Jul 2012 - 3:28 am | अर्धवटराव
सुंदर फोटो.
तुमची "एकात्म" पण फार आवडली होती.
अर्धवटराव
26 Jul 2012 - 6:23 am | वीणा३
त्या शिंजीर ची चोच कसली धारदार वाटत्ये. आणि त्या च्श्मेवाल्याचा रंग मस्त आहे, फक्त जाम चिडल्यासारखा वाटतोय.
31 Jul 2012 - 7:09 pm | किल्लेदार
मस्त....
पहिल्या फोटोमधला ईफेक्ट कसा आण्ला आहे कळेल का ?
2 Aug 2012 - 7:34 am | जयंत कुलकर्णी
किल्लेदार, सोप्पे आहे.
१ कॅनव्हासचा साई़झ वाढवा. (क्रॉप टूल वापरून.)
२ लॅसोने पक्षाभोवती आकार काढा.
३ फेदरचा आकडा द्या.
४ इनव्हर्स सिलेक्शन करा.
५ डिलिट मारा.....
बस्स हाकानाका....
2 Aug 2012 - 12:04 am | एस
सर्व प्रकाशचित्रे उत्कृष्ट आहेत...
शिंजिर चा फोटो छोट्या शिंजिराच्या (Small Sunbird) मादीचा असावा. (शिंजिर = Purple Sunbird).
(संदर्भ - The Book of Indian Birds by Salim Ali)
5 Aug 2012 - 11:31 am | शुचि
मला पोपट सर्वात आवडला. काय सुंदर काँबिनेशन आहे लाल-हिरवा. मस्त मस्त!!!!!
6 Aug 2012 - 8:11 am | चैतन्य दीक्षित
घारीचा आणि पोपटाचा फोटो विशेष आवडला.
धन्यवाद
6 Aug 2012 - 4:02 pm | जागु
अप्रतिम.