गाभा:
धमालपंत बरेच दिवसापासून मिपावरुन गायब आहेत. समस्त भारतीय खरडखेचक आणि खरडफेकक असा नावलौकीक अस्लेला धमाल मुलास आपण एवढ्यात पाहीले आहे का?
मिपाच्या नवरत्नापैकी एक असलेले धमालपंत आजकाल मिपावर दिसत नाही. त्यांच्या गैरहजेरीमुळे दरबार सुनासुना झाला आहे. बराच शोध घेवूनही ते आम्हास गवसले नाहीत.
तुम्हाला माहीत आहे का? धमालपंत कुठे गेले?
धमालकाका तुम्ही जेथे असाल तिथून परत या. आम्ही तुमची वाट पहात आहोत. तुम्हाला कोणीही रागावनार नाही.
प्रतिक्रिया
19 Jul 2012 - 10:11 am | पियुशा
च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे ;)
व्हेरी करंट इश्यु ;) व्हेर इज दि धम्या :p
19 Jul 2012 - 6:24 pm | चौकटराजा
च्यायला ....शिर्षक वाचुन मला वाटले की राजेश (काका) खन्नांबद्दल काही लेख आहे Wink
व्हेरी करंट इश्यु Wink
चायला मला वाटले की मातोश्री काका बद्द्ल काही तरी लेख आहे . व्हेरी करंट इश्यू .... व्हेअर ईज संजा राऊत ?
19 Jul 2012 - 10:19 am | इरसाल
बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.
19 Jul 2012 - 10:44 am | कवटी
बाकीचे उरलेले आठ रत्न कोणते ते आधी सांगा.
मला तर मी आणि श्री. रामदास माहिती आहेत... उरलेले सहा शोधावे लागतील....
बाकी शिर्षक वाचून जतीन वरचा लेख आहे असेच वाटले.... पण हरकत नाही... दोन्ही काका सारखेच....
७०च्या दशकात लोक (विशेषतः मुली) दूर दूर रस्ता तुडवत त्या काकाचे निदान दर्शन तरी व्हावे म्हणून जायचे ..
या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..
19 Jul 2012 - 10:50 am | प्यारे१
>>>या दशकात हा काका दूर सिंहगडावर जावून लोकांच्या नडग्या फोडतो..
ऑऑऑऑऑ???????
धम्याबद्दल बोलताय ना मालक?
का गल्ली चुकली?
सांगण्याइतपत काही पुरावा आहे ?
19 Jul 2012 - 10:53 am | कवटी
धम्याबद्दल बोलताय ना मालक?
तुम्हाला "नडगी-फोड कार्पोरेटर" ही टर्म माहित नाही का?
19 Jul 2012 - 10:58 am | प्यारे१
ओह्ह्ह्ह
मग असोच. :)
बाकी, धम्या मिपावर का नाही याबद्दल काहीच माहिती नाही. त्यामुळं नो कमेंट्स.
19 Jul 2012 - 11:17 am | झकासराव
धम्या गायबलाय.
त्याला गुगल प्लस वर लिहिलेल अरे कुठे गायबलाय म्हणुन.
नो रिप्लाय...
असे बरेच जण गायबले आहेतच जुने मेम्बर.
टारु, धम्या, तात्या, मिसळप्रेमी........
19 Jul 2012 - 12:25 pm | इनिगोय
असा एक धागा पुर्ण न झालेल्या छळवादी क्रमशःवर करावासे वाटते, अगदी रोशनी पासून ते विस्टिरिया लॉज पर्यंत.
इंद्र्राज पवार हे आणखी एक गायबलेलं नाव.
बाकी कैवल्याचे चांदणे सध्या कुठे पडलेय / दडलेय, हे जाणण्यास उत्सुक.
19 Jul 2012 - 7:32 pm | पैसा
वेळ जात नाहीये का?
19 Jul 2012 - 7:44 pm | बिपिन कार्यकर्ते
भारीच ब्वॉ मनकवडी तू! :) ;)
19 Jul 2012 - 7:52 pm | पैसा
भिकापाटील कुठे गेले म्हणून मीच धागा काढणार होते एक. त्यानी गणेशा नावाच्या संपादकाना अॅण्टिक्विटी ब्लू द्यायचं कबूल केलं होतं. त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे! ;)
20 Jul 2012 - 6:42 pm | पक पक पक
त्यांना गणेशा संपादक सापडला का याची चौकशी करायची आहे!
गणेशाला आम्ही देखिल शोधत आहोत्,उधारी बाकी आहे... :crazy:
19 Jul 2012 - 8:27 pm | जेनी...
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..
जो त्याना पकडुन आनिल इथे त्याला मजकडुन जिलेबीचे पूडे मिळतिल ;)
20 Jul 2012 - 6:39 pm | पक पक पक
अरे आमचे रंगा काका पण गायबलेत ..
रंगा काका अमेरिकेत बेसन शोधताहेत जिलब्यांसाठी..... :bigsmile:
20 Jul 2012 - 10:55 am | प्रभाकर पेठकर
'सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!) व्यस्त असल्याने मिपावर हजेरी लावता येत नाही', असा साळसूद निरोप, मी केलेल्या एसेमेस चौकशीत, मिळाला होता. (झाले १५-२० दिवस).
20 Jul 2012 - 3:51 pm | प्रशांत
>>>सध्या कामात (कुठल्या कोण जाणे!)
शिकार भाग - ३ च्या कामात (लिखाणात) व्यस्त असावेत...
20 Jul 2012 - 6:43 pm | प्रभाकर पेठकर
कोणास ठाऊक की, एकुलत्या एक मुलाची मोनोपॉली मोडून काढायच्या प्रयत्नात आहेत, देव जाणे.
20 Jul 2012 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते
धम्याला म्हणे दोन मुलं आहेत!!!
20 Jul 2012 - 7:33 pm | प्रभाकर पेठकर
घ्या....!
धमाल मुलगेने इतनी तरक्की कर ली और हमे पताही नही चला|
20 Jul 2012 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार
धम्याच्या पोराने त्याला, 'कामात लक्ष द्या आणि मिपावरते पालथे धंदे बंद करा' असा आदेश दिला आहे.
20 Jul 2012 - 7:05 pm | बिपिन कार्यकर्ते
ही शक्यताच पटण्यासारखी आहे. मात्र कोणता मुलगा? थोरला की धाकटा?
20 Jul 2012 - 7:09 pm | परिकथेतील राजकुमार
थोरला पण सध्या पुण्यातच आहे.
20 Jul 2012 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते
हाहाहा! मेलं ते धम्या मग... दोघं मिळून त्याला कोलत असतील! ;)
20 Jul 2012 - 2:23 pm | चिगो
कुठं गायबलेत हे लोक्स? धमुशेठ, इन्द्रादा, टार्याजी आणि बरेच मिपारत्न..
बाकी, पराने सांगितलेले कारण सर्वाधिक पटतेय.. ;-)
20 Jul 2012 - 6:49 pm | प्रभाकर पेठकर
'भिकापाटील' हा 'धमाल मुलग्या'चाच डू आय्डी नाही नं?
21 Jul 2012 - 4:16 pm | भिकापाटील
काय काका.. कुठे गंगू तेली कुठे राजा भोज......
अर्थात अंदाज चुकलेला आहे. :)