सेन्टी मेन्टी : ती - एक गुणगुण

सुहास..'s picture
सुहास.. in काथ्याकूट
19 Jul 2012 - 1:10 pm
गाभा: 

,एसडी ( व्हाट अ ग्रेट मॅन ! ) एकदा पंचमदा ( अनादर ग्रेट मॅन ! ) ला म्हणाले होते की " भारतीयांना फावल्या वेळात गाणे गुणगुणायला फार आवडते, तु अशी गाणी बनव जी गुण-गुणता येतील " आणि त्याचा परिणाम....छोटी सी कहानी से, बारिशों के पानीसे...ते....रूठ न जाना तुमसे कहुं तो....पर्यंत दिसून येतो.कधी तरी एकट्याने फिरता-फिरता,बाईकवर, प्रवासात, सिगरेटचा पफ मारता-मारता, एकांतात एखादे गाणे सुचले नसेल तर नवलच ! खरे आहे, भारतीय मनामध्ये संगीत ठासुन भरले आहे, त्यातल्या त्यात फिल्मी संगीत, अर्थात (कानाला हात लावुन) शास्त्रीय संगीताचे चाहते जगभरात आहेतच, पण प्रत्येक प्रंसगाला सामोरे जाताना, मग तो लग्न सभारंभ असो ( तेनु घोडी किसने चढाया, बुतनी के ) वा डोहाळे जेवण (ग कोणीतरी येणार येणार ग) मित्राचा वाढदिवस असो (यारी है ईमान मेरा यार मेरी जिन्दगी ) वा प्रेयसी चे लग्न, (मुबारक हो सबको समां ये सुहाना , मैं खुश हूं मेरे आसुंओ पे न जाना) गाणी आहेत...प्रेयसी...जिला हल्ली गर्लफ्रेंड पण म्हणतात ! ..या एका शब्दाकरिता तर गाणीच गाणी आहेत. तिच्या दिसण्यावर तर ...प्रत्येकाला काव्य करता येते असे नाही, म्हणुनच त्या आम्हा पामरांना हे संगीतच तारते.

सुट्ट्या संपुन कॉलेज सूरु होणाच्या पहिला दिवस ! ती गावाला - मी गावाला, ना नेटवर्क , ना कॉल, कधे-मधे नातेवाईंकाच्या गराड्यातुन चोरून केलेला एखादा समस, विरह संपणार असतो आज !! कॉलेजला ही गर्दी !!! तास संपतो, ती निघाली केमीस्ट्रीला, मी अकांउट्सला , त्या प्रचंड गर्दीत दोघांच्या नजरा नुसत्या भिरभिरत आहेत. सरते शेवटी सापडते, ती मैत्रींणी च्या पसार्‍यात, मी मित्रांमध्ये ! पिवळ्या फुलाच्या डिझाईनच्या मॅक्सीवर नाजुक गुलाबी लेस, छातीपाशी पुस्तकं कवटाळलेली, रेशमदार केसांची पोनी बांधलेली आहे, अशीच ती उजव्या हाताने बट बाजुला सरकवत, माझ्या कडे तिरपा कटाक्ष टाकुन ती, तिच ते लाजलेलं, पण ओळख दाखविणारं स्मितहास्य करते आणि ते हास्य मनात साठवल्या जाते, उरात ठसते. त्या एका हास्यासाठी......तेरी एक हसी के बदले मेरी ये जमीन ले ले, मेरा आसमान ले ले !

"कॅफे डिलाईट" ला बसलो आहे तिच्या बरोबर, आजुबाजुला मित्रमैत्रिणी, अगदी सगळ्यांना ठावुक असले तरी ती नेहमी बसताना समोर च बसते, जवळ किंवा चिकटुन नाही, म्हणे संवाद चांगला होतो त्यामुळे ! काहीतरी विषय चालु आहे, नेहमीच असतो, माझ लक्षच नाही, मी हरवलो आहे तिच्या तपकिरी छटा असलेल्या डोळ्यांत, नशेचे घोट घेतो आहे, तंद्री तुटली...तिने केलेच असे ...झटक्यात केसांच्या पोनी मधुन रबर बॅन्ड काढला.तसाच थेट नाजुक गोर्‍या-पान मनगटा त घातला. केस विस्कटुन पुन्हा हातानेच सरळ केले आणि दोन्ही हातांचे तळवे कपाळावरून मागे घेत केस सावरून पुन्हा रबर बॅन्ड केसात माळला. हे सगळ बोलता-बोलता तिच्या छातीला आलेला उभार माझ्या तंद्रीची पार वाट लावुन गेला. " सुsहास, तु एकतोयेस ना माझ ! " मॅडम वर नाजुक आवाजात विचारतात मला ! " अग बबडे, पुरूष आहे मी ! तुझ्या त्या तारूण्य सुलभ हालचालींनी जरासा का असेना, विचलीत होणारच ! " अर्थात हे मनात ल्या मनात...पण उत्तर मात्र " हो ! एकतोय की "...पण मन मात्र पुन्हा त्या तारुण्य सुलभ हालचालीमध्ये अडकतं ..........विचारामुळे अजुन खोलवर अडकत जातं....खोलवर...

तिच्या बहिणीच्या लग्नाला बोलावले होते सर्वांना, मला अगत्याचे ! म्हणे साक्षात तिच्या पिताश्रीं शी ओळख करून देणार होती..मी बाहेर लई मोठ्ठा गुंड , केस विस्तारलेले, गळ्यात काळ्या धाग्यात ओवलेले ओम च सोनेरी पान, तोंडात गुटख्याचा हा मोठा पोबारा, बोलताना थुकल्याशिवाय बोलताच येत नसे, कपडे तर असे की अक्षरश एखाद्याने पाहिल तर पहिल्याच ईम्प्रेशन मध्ये " स्सालं छपरी ! " म्हणेल ( अर्थाते हे वाचल्या पोरगी कशी गटली असा प्रश्न वाचकांच्या मनात उभा राहु शकतो, तर, त्याचे उत्तर आहे की " लक बाय चान्स " )...शेवटी मनाची तयारी करून न्हाव्याकडे ...सॉरी..सॉरी बार्बर शॉप मध्ये शिरलो ...डोळ्यावर येणार्या केसांना कात्री लागली...मधोमध भांग असलेला माझा महिरप एका बाजुला भांग घेत चपटा झाला. त्या दिवशी फॅशन स्ट्रीट च्या दुकानदारांवर चक्क हजार रू. उधळले..माझे नव्हे !! माझ्या एका मित्राचे...सकाळी तयार झाल्यावर चक्क तिर्थरूपांचे डोळे हे येव्हढे झाल्याचे मला अजुनही आठवते. मनोमन खुश होतो मी, लग्न कार्यालयात गेलो आणि ...आणि...आणि...

ती दिसली !! माझा एक 'फ्लर्ट ऑफ द मिलेनियम' मित्र म्हणायचा " बाळ्या , लक्षात ठेव , पिसारा मोराचा फुलतो, लाडोंरीचा नाही ..तो नग्न होत असला तरी त्यात सौंदर्य असते, आयाळ सिंहाला असते, सिंहीणीला नसते, साधा बोका देखील मांजरीपेक्षा 'मस्त ' दिसतो, म्हणुन सौंदर्यावर भाळण सोडुन दे " त्या दिवशी, त्या क्षणी त्याला धरून बूकलून काढावास वाटले. " साल्या म्हणा साडी त पाहिले का रे कधी तिला " ...साडी हा एकुण प्रकार केवळ पुरुषांचा छळ करण्याकरिता निर्माण झाला असावा असे आमचे सपष्ट मत आहे....काय दिसत होती ...गोर्‍या रंगावर बैंगणी रंगाची साडी !! एका बाजुला भांग असलेले मोकळे केस... कानात पर्पल कलर च डुल...एरवी हातात कड्याशिवाय काही नसते ..छुनछुन करणार्‍या बांगड्या ...गळ्यात त्याच कलरशी मॅचिंग पातळ चेन...आणि त्याच चेन शी उजव्या हाताच्या अंगठ्याने चाळे करीत " आज हॅन्डसम दिसतो आहेस ",मी, पुन्हा मनातल्या मनात " अग माझ सोड तु ....तु ...तु ....जशी मन्मथरिती धाकटी...सिंव्हसम कटी...उभी एकटी ....अंगी तारुण्याचा बहर ...मदन तलवार !!

तिच्याबरोबर चार एक वर्षांमध्ये असे कित्येक क्षण आले, गेले. कधी पावसांत चिंब भिजलो, कधी भांडलो, कधी रूसवा काढला, तरी कधी स्वताच रूसलो. आज ती आयुष्यात नाही. आणि 'आहे ' देखील ! नाही नाही ..मी ईमोशनल, हळवा , सेन्टी, सेन्सेटिव्ह वगैरै अजिबात नाही. स्मरणरंजनात जास्त काळ मन रमू शकत नाही, पण असाच कधीतरी चार मित्रांबरोबर कुठेतरी, चहाच्या टपरीवर, बांधावर बसलेला असताना, कुठुन तरी, रेडियो मधुन किंवा कुणाच्या मोबाईल मधुन एखादी अशीच गुण-गुण बाहेर पडते आणि मन अलगदपणे, नकळत, सहज रित्या, कोणी न सांगता, भुतकाळात शिरते. तो भुतकाळ सुखाचा होता. हा वर्तमानकाळ सुखाचा आणि त्याच वेळी ती सोबत नसलेल्या विरहाच्या दुखाचा. दोन्ही मध्ये एकच गोष्ट समान असते, ती म्हणजे " ती " . ती, तिच्या तारूण्य सुलभ हालचाली, तिच रूप हे अस्थायी आहे हे सत्य वर्तमानातले , पण माझ्या लेखी, माझ्या भुतकाळात ती अजुन ही तशीच आहे, आणि ती गुणगुण देखील......

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jul 2012 - 1:35 pm | प्रचेतस

छान लिहिलंस.

मन१'s picture

19 Jul 2012 - 1:35 pm | मन१

शीर्षकाला शोभेल असं आणि रंजक.

मी_आहे_ना's picture

19 Jul 2012 - 1:39 pm | मी_आहे_ना

छान लिहिलंय... तारुण्यातल्या तरल भावना सुरेख शब्दांत मांडल्यात.

प्यारे१'s picture

19 Jul 2012 - 1:44 pm | प्यारे१

वाश्या तू?????????????

बरा आहेस ना?
श्रावण (महिना बरं. बाकी नाही काही म्हणायचं ;) ) सुरु नाही झाला अजून. :)

तारुण्याच्या प्रेम लहरी छान टिपल्यात...

इरसाल's picture

19 Jul 2012 - 2:34 pm | इरसाल

आवडले. खुप छान लिहिले आहे.काही ठिकाणी स्वतःचा भुतकाळ डोकावताना दिसतोय.

स्मिता.'s picture

19 Jul 2012 - 2:52 pm | स्मिता.

सेन्टी-मेन्टी लेख छान झालाय. सोबत गाण्यांची पेरणीही छानच!

नाना चेंगट's picture

19 Jul 2012 - 3:24 pm | नाना चेंगट

हं .. अजून एक !

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

19 Jul 2012 - 6:29 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

काय काय लिहिलय, काय काय लिहिलय..
तुसी छा गये... आजसे आपको हम लव्हगुरु पुकारेंगे ;)

पैसा's picture

19 Jul 2012 - 6:59 pm | पैसा

भारी सुरेख लिहिलंस रे सुहाश्या!

रेवती's picture

19 Jul 2012 - 7:12 pm | रेवती

आज रसिकता उतु चाललिये सुहासची. ;)

निवेदिता-ताई's picture

20 Jul 2012 - 7:29 am | निवेदिता-ताई

छानच...आवडले :)

किसन शिंदे's picture

20 Jul 2012 - 8:47 am | किसन शिंदे

आगाऊ वाश्याचा एक वेगळाच पैलू आज नजरेसमोर येतोय. ;)

आवडलं रे.! :)

सोत्रि's picture

20 Jul 2012 - 9:37 am | सोत्रि

खासंच! आवडले...

-(सेंटी) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

20 Jul 2012 - 10:48 am | प्रभाकर पेठकर

प्रयत्न चांगला आहे.

'प्रेमा'पेक्षा 'शारीरिक आकर्षण' जास्त प्रकर्षाने जाणवले.

तोंडात गुटख्याचा हा मोठा पोबारा

'पोबारा' नव्हे, 'तोबरा'.
'पोबारा' म्हणजे 'पळून जाणे' आणि 'तोबरा' म्हणजे घोड्यांचे खाणे भरलेली ती पिशवी जी त्यांच्या तोंडालाच बांधलेली असते.

रणजित चितळे's picture

20 Jul 2012 - 11:11 am | रणजित चितळे

सुहास खूप छान. आवडले.

अवांतर
असले रोमॅन्टीक प्रसंग काथ्या..., चर्चेच्या भागात का?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Jul 2012 - 11:25 am | घाशीराम कोतवाल १.२

अग बबडे, पुरूष आहे मी ! तुझ्या त्या तारूण्य सुलभ हालचालींनी जरासा का असेना, विचलीत होणारच ! " अर्थात हे मनात ल्या मनात...
मनातच बोला तोंडावर बोलला असतास तर लय भारी पडल असत राव तुला.

" अग माझ सोड तु ....तु ...तु ....जशी मन्मथरिती धाकटी...सिंव्हसम कटी...उभी एकटी ....अंगी तारुण्याचा बहर ...मदन तलवार !!

वाश्या अरे सगळ काय रे मनात डेअरिंग केलीस कि नाही ????????

Dhananjay Borgaonkar's picture

20 Jul 2012 - 4:36 pm | Dhananjay Borgaonkar

:)

स्पंदना's picture

20 Jul 2012 - 5:38 pm | स्पंदना

अय मोठा गुंड! पयल्या झुटलाच पोबारा केलेला दिसतो?

हे सगळ मनात म्हणण्या ऐवजी मोठ्यान म्हंटल असत तर जीव ओवाळुन टाकला असता कुणीही तुझ्यावर. पण असो.
वाचुनसुद्धा जीव ओवाळुन टाकावासा वाटतोय लिखाणावर.

चावटमेला's picture

20 Jul 2012 - 8:56 pm | चावटमेला

लेख मनापासून आवडला