अनामिक भटकंती ११: तुंग

गणेशा's picture
गणेशा in भटकंती
19 Jul 2012 - 4:43 pm

१० जून पासुन प्रत्येक आठवड्याला एक भटकंती असे गणित यावेळेस चुकते की काय वाटत असतानाच रात्री तुंग किंवा विसापुर या जवळच्या किल्ल्यांना भेट देण्याचा बेत ठरला. तरीही मुंबई वरुन पुण्याला घरी जाण्यास उशिर झाला आणि उद्याचा प्लॅन नक्की काय हे न ठरवताच उद्या उगवला सुद्धा.

सकाळी मित्राला फोन करुन निवांत जाऊ असे ठरवून तो आल्यावरच कुठल्या किल्ल्याला जायचे ते ठरवु सांगितले.
मागील आठवड्यात ही, विसापुर चा प्लॅन असताना, ऐन टाईमला पावसात गच्च भिजुन बेडसे ला गेलो .यावेळेस ही विसापुर नको.. गर्दी असते. या कारणाने तुंग रस्त्यातच फायनल झाला, आणि आम्ही दोघे सोमाटणे फाटा- पवनानगर - तिकोना-जवन आणि नंतर समोर दिसणार्या किल्ल्याला पण वळसा घालुन जावे लागल्याने सुमारे २५ कीमी अंतर असलेल्या नितांत सुदर निसर्गाने उधळन केलेल्या रस्त्याने तुंग ला पोहचलो.

पवन मावळ मधील घाटरक्षक असलेला तुंग किल्ला पुर्वी बोरघाटमार्गे चालणार्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी उपयोगात यायचा.
लोहगड विसापुर एका बाजुला, तिकोना आणि नंतर तुंग हे पवन मावळचे चार शिलेदार.
लोहगड- विसापुर आणि तिकोना या किल्ल्यांवर आता गर्दी खुप असते, त्यामुळे निखळ आनंद दायी सोपा ट्रेक म्हणजे तुंग

गोमुखी मुख्य द्वारा मधुन वरती गेल्यावर, सर्वत्र सतेज हिरवळ पसरलेली होती, हवेतील अल्हाद दायकता, प्रदुषणाचे नामोनिशान नाहि, आणि आमच्या नशिबाने तेथे कोणीच नाही ( फक्त २ छोटे गृप वरती भेटले.. बस्स) अश्या सुंदर वातावरणात मन एकदम रमुन गेले, गार वार्यात तेथेच थांबावे असे वाटत होते.

गडाचे सर्वोच्च टोक

भातशेती.

बर्याच भेटणार्या लोकांशी बोललो, शेतात भात तर लावला हाये पण पावसानं लय इक्रित केलय यावेळेस, मावळात पण पाउस नाय म्हण्जी कमाल झालीया, आता येत्या आठवड्यात पावसानं दगा दिला तर सगद संपल, पोटाला चिमटा काढुन जगाव लागल.
असे सगळ्या गोष्टी ऐकत, आणि पावसाला साकडे घालत आम्ही निघालो होतो.

तळे

लोहगड - विसापुर

परतताना..
खरे तर गडावरील अल्हादायक वातावरण, प्रदुषणाचे नामोनिषाण नाही.. प्रसन्नता खुप. पुन्हा माघारी फिरुच नये असे वाटत होते. परंतु तसे करुन चालत असते तर माणुस सर्वात सुखी झाला असता.
तरीही परतताना लागलेली भाताची खाचरे, हिरवा निसर्ग, पांढरे शुभ्र झरे आणि काळे ढग मन मोहवुन टाकत होते.

घोड्यांवरी स्वार झाल्याप्रमाणे येणार्‍या पाऊसाच्या धारा मध्येच चिंब करत होत्या.

--------------------------------------------------------------------------------
अनामिक भटकंती ८-९-१०: रोहिडा-लोहगड-बेडसे.
अनामिक भटकंती ७: राजगड...स्वराज्याचा शिल्पकार : http://www.misalpav.com/node/20849
अनामिक भटकंती ६ - कार्ला लेणी.
अनामिक भटकंती ५ - किल्ले पुरंदर : http://www.misalpav.com/node/20592
अनामिक भटकंती ४ - केरळ : http://www.misalpav.com/node/20316
अनामिक भटकंती ३ - रतनगड: http://www.misalpav.com/node/19239
अनामिक भटकंती २ - सांदण दरी: http://www.misalpav.com/node/18728
अनामिक भटकंती १ - राजा रायगड: http://www.misalpav.com/node/18323

--------------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया

पियुशा's picture

19 Jul 2012 - 5:00 pm | पियुशा

ज्जे बात !!!
काय ती पोपटी हिरवळ काय ते फटु :) मस्त मस्त मस्त !!!!

स्मिता.'s picture

19 Jul 2012 - 6:56 pm | स्मिता.

ती पोपटी हिरवळ खूपच खिळवून ठेवते. तो गवताचा क्लोज-अप फोटो मस्त!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2012 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

क्या बात...!क्या बात...!क्या बात...!

गणेशा.... बाबा...काय फोटो काढलेस रे! जबरदस्त!
प्रत्येक फोटोमधे ती दाट गच्च हिरवळ,आणी पावसाचं कुंद वातावरण अगदी आकंठ,तुडुंब जाणवतय. निम्मि सफर फोटूमुळेच घडल्यासारखं वाट्टय. तुस्सी ग्रेट हो!

किसन शिंदे's picture

19 Jul 2012 - 5:42 pm | किसन शिंदे

गडाचं हवालदार भ्येटलं कि नाई आन हो त्या म्हादेवाच्या मंदिरात गेल्ता कि नाही. :)

चौकटराजा's picture

19 Jul 2012 - 5:45 pm | चौकटराजा

गणेशा राव, मस्त फोटो, जवळ जवळ सगळेच. तुंग धरणाच्या भितीच्या बाजूने फार अंगावर येणारा अन
आकर्षकही दिसतो. मला तर वर पर्यंत जाणार्‍याचा हेवाच वाटतो. लहानपणी अप्पांबरोबर न गेल्याची
रुखरुखही !
प्रत्येक फोटोच्या खाली दोन काव्य पंक्ति टाकल्यास बहार येईल गड्या !

प्रत्येक फोटोच्या खाली दोन काव्य पंक्ति टाकल्यास बहार येईल गड्या !

असेच विचारात होतो, पण फोटोत जो हिरवे पणा दिसतोय त्या पेक्षाही कीतीतरी छान वातावरण तेथे होते, शब्द अक्षरशा जोडावे लागले असते आणि मग मजा गेली असती..

असो तेथे रात्री टेंट टाकुन राहिलो तर कीती मज्जा येइल असे वाटत होतेच. आणि आम्हाला फक्त २ गृप भेतले त्यातला १ गृप तेथेच राहणार होता असेच भासत होते( १ मुलगी, आणि तिचे दोन मित्र)
त्यांचा हेवा वाटला...
आणि पहाटे पहाटे कसे सुंदर वातावरण असेल असे आठवतच कुसुमाग्रजांच्या ओळी आठवल्या होत्या.
तुमच्या रिप्लाय मुळे म्हणुन हा रिप्लाय लिहिला.

" काढ सखे गळ्यातील, तुझे चांदण्यांचे हात
क्षितिजापल्याड उभे, दिवसाचे दूत " - विशाखा

मृत्युन्जय's picture

19 Jul 2012 - 6:40 pm | मृत्युन्जय

त्यातला १ गृप तेथेच राहणार होता असेच भासत होते( १ मुलगी, आणि तिचे दोन मित्र). त्यांचा हेवा वाटला...

गणेशा खरे सांग. नक्की कोणाचा आणि कशासाठी हेवा वाटला ;)

हेच विचारणार होतो पण मोह आवरला, आता तुम्ही विचारलंच आहात तर +१ :D

+१ कशाला प्रतिसादाला का टेंट मध्ये?

उदय के'सागर's picture

19 Jul 2012 - 5:53 pm | उदय के'सागर

अहाहा...हे फोटो पाहून काय गार वाटलं म्हणून सांगू .... :)
चला काल पासून 'म्हणावा' तसा पाऊस सुरू झाला नसला तरी 'म्हणायला' का होईना पाऊस पडतोय... आता जरा मज्जा येईल सह्याद्रीत भटकंती करायला :) ...

मन१'s picture

19 Jul 2012 - 6:05 pm | मन१

फोटो छान. कधी मधी मीही थोडंसच का सेनामलवलीच्या ह्या आणि त्या बाजूने फिरुन पाहिलेलं. मस्त मजा येते पावसाळ्यात.
तुंग आणि तिकोना हे शिवरायांनी अगदि सुरुवातीच्या काळात उचललेल्या किल्ल्यांपैकी एक म्हणून माहिती आहेत.
(तोरणा,पुरंदर हे अगदि सुरुवातीच्या काळात, मिसरुड फुटतानाच्या वयात घेतले आणि त्यानंतर)
बहुतेक त्यांच्या मोहिते मामांकडून त्यांनी हे तुंग्-तिकोना घेतले. शिवकाळात बहुतांश काळ हे शिवरायांकडेच होते.

प्रचेतस's picture

19 Jul 2012 - 6:24 pm | प्रचेतस

मस्त हिरवेगार फोटो आणि वर्णनही सुरेख हो कवी गणेशा.
पूर्वी केलेल्या तिकोना आणि तुंग सफरींची आठवण करून दिलीत.

पवना माळ मधील घाटरक्षक असलेला तुंग किल्ला पुर्वी बोरघाटमार्गे चालणार्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी उपयोगात यायचा.
लोहगड विसापुर एका बाजुला, तिकोना आणि नंतर तुंग हे पवना माळचे चार शिलेदार.

ह्या पवना नदीच्या खोर्‍याचं नाव पवना माळ नसून पवन मावळ असे आहे हो. ;)

पाण्यात डुंबणारा तुमचा एकही फोटू नसल्याबद्दल निषेध.

सुरेख फोटो. पावसाळी वातावरण छान टिपलंय.

पैसा's picture

19 Jul 2012 - 6:45 pm | पैसा

गणेशा, मस्त लिहिलंस आणि फोटो पाहून डोळ्यांना अगदी थंडगार वाटलं.

सुहास झेले's picture

19 Jul 2012 - 7:36 pm | सुहास झेले

व्वा व्वा... एकदम धम्माल :) :)

सर्वसाक्षी's picture

19 Jul 2012 - 9:06 pm | सर्वसाक्षी

वा! प्रसन्न करणारी चित्रे. हिरवळ मस्तच.

चित्रगुप्त's picture

19 Jul 2012 - 9:23 pm | चित्रगुप्त

वाहवा. केवळ अप्रतिम फोटो.
मला विशेषतः शेवटले दोन रात्रीचे आवडले. एरव्ही विजेचे खांब फोटोत छान दिसत नाहीत, पण यात छान वाटतायत.

जाई.'s picture

19 Jul 2012 - 10:16 pm | जाई.

सुरेख फटू

फोटो पाहून खूप शांत प्रसन्न वाटलं!

मोदक's picture

20 Jul 2012 - 2:57 am | मोदक

फटू दिसले आणि आवडले.. :-D

५० फक्त's picture

20 Jul 2012 - 8:14 am | ५० फक्त

फोटो जाम भारी आलेत रे, एमए (मास्टर्स इन अ‍ॅडजेस्ट्मेंट) कधी केलंस रे ?

नाखु's picture

20 Jul 2012 - 9:20 am | नाखु

पावसाळी चित्र सफर....

मी_आहे_ना's picture

20 Jul 2012 - 9:43 am | मी_आहे_ना

मस्त छायाचित्रे आणि वर्णन सुद्धा. सुरेख, हेवा वाटावा अशी सफर घडवलीत.

बज्जु's picture

20 Jul 2012 - 11:56 am | बज्जु

मस्त भटकंती, सुरेख वर्णन आणि फोटो.

जातीवंत भटका's picture

20 Jul 2012 - 1:04 pm | जातीवंत भटका

लई दिसांनी तुंगचे फोटू बघाया मिळाले. धन्यवाद !

स्पंदना's picture

20 Jul 2012 - 6:16 pm | स्पंदना

केव्हढी हिरवळ अन काय अँगल साधलाय प्रत्येक फोटोत.
गणेशा मस्त नजर आहे फोटोची. सगळ्यात आवडला गवताच्या पात्यांचा क्लोजअप.

आत्मशून्य's picture

20 Jul 2012 - 6:26 pm | आत्मशून्य

दिल गार्डन गार्डन हो गया!

हरिप्रिया_'s picture

21 Jul 2012 - 7:21 pm | हरिप्रिया_

हिरवे गालिचे पाहून डोळे सुखावले :)

सायली ब्रह्मे's picture

23 Jul 2012 - 10:50 am | सायली ब्रह्मे

फोटो आवडले.

पाऊस ह्या गडांचे रुपच पालटवून टाकतो!
आठव्या फोटोतील त्या अर्धगोलाकार झुडुपाचे काही विशिष्ट नाव आहे का? तोरणा किल्ल्यावर अशी खूप झुडुपे आहेत.

यशोधरा's picture

26 Jul 2012 - 9:53 am | यशोधरा

सुरेख फोटो. पहिला तर एकदम मस्त आहे!