कुठे करू पावसाळ्यातली रम्य सफर?

विनीत संखे's picture
विनीत संखे in भटकंती
16 Jul 2012 - 8:22 pm

सायबानु

लिहिण्यास श्रम ह्यासाठी की मला फ्यामिलीसोबत (२ मोठे आणि एक छोटुकली) मुंबईच्या जवळपास पावसाळ्यात (ऑगष्ट मध्ये) रम्य सहल करायची आहे. २ दिवस तीन रात्र. छोटुकली ११ महिन्यांची आहे. त्यामुळे सहलींचे पर्याय कमी सापडतात. गाडीची व्यवस्था मला करता येईल... वीस पंचवीस हजारांचे बजेट आहे (बायको पंधरात बघतेय ... त्यात "रम्य"पणा कमी व्हायची भिती असल्याने मी बजेट वाढवलंय)

काही मी शोधलेले पर्याय ...

१. लोणावळा अ‍ॅम्बी वॅली - इथे बुकींग कशी करतात हो?
२. महाबळेश्वर
३. माथेरान - (बाळाला घेऊन घोड्यावर किंवा पायी चालता येईल का?)
४. पांचगणी - फिरण्यालायक काय आहे इथे?
५. इगतपुरी - मानस रीसोर्ट की मानस लाईफस्टाईल?
६. इतर

भटक्या मिपाबांधवांनो कृपया सांगावे... जागा चांगली असेल तर फोटो टाकीन. :-)

प्रतिक्रिया

मन१'s picture

16 Jul 2012 - 8:26 pm | मन१

http://www.anandavalley.com/ ह्या ठिकाणी फार मागे एकदा कंपनीची सहल गेल्याचे ज्येष्ठ सांगत होते. अनुभव चांगला होता. कृत्रिम टेकडी, फवगेले, झाडी वगैरे बनवले गेले आहे.
त्यात फळबागा आहेत. त्यात तुम्हाला ताजा रस समोर काढून देतात म्हणे.

प्रेरणा पित्रे's picture

17 Jul 2012 - 10:48 am | प्रेरणा पित्रे

१. घनवटकर बंगलो - अलिबाग (www.holidaygb.in) - किहीम आणि आवास बीच जवळ
२. रिवाइन रिसोर्ट - पाचगणी (www.ravinehotel.com) - पाचगणी मार्केट, मॅप्रो, महाबळेश्वर जवळ
३. आयुष रिसोर्ट - पनवेल, कर्नाळा (www.aayushresort.com)

यातील पहिली दोन ठिकाणे पंधरा ते वीस हजाराच्या आत येउ शकतिल... लहान मुलीच्या द्रुष्टीने जवळ आणि सोयिस्कर आहेत... स्वताची गाडी असल्यास उत्तम.... तिसर्या ठिकाणी मी स्वत गेली नाही पण ओळखीतले बरेच जण गेले आहेत...

१. दिवेआगार (आता सुवर्णगणेश मूर्ती नाही).

धनराज बदामीकरांचे कॉटेज,

गावात अनेक उत्तम खानावळी आहेत. जरुर चाखून पहा..

दिवेआगार - श्रीवर्धन रस्ता.

२. दूरशेत फॉरेस्ट लॉज (निसर्गातल्या अनेक पावसाळी अ‍ॅक्टिव्हिटीज निसर्गात जाऊन कंडक्ट केल्या जातात. पूल आहे, रूम्समधे टीव्ही नाही):

तेथील ओपन एअर भोजनगृह :

राहण्याची व्यवस्था :

फॉरेस्ट लॉजमधल्या नाश्त्याचा नमुना:

३. सगुणाबाग,नेरळ.

उत्तम अशा धबधब्याला भेट, शेतावर टूर, पोरांना म्हशीवर राईड, स्वतः मासे पकडणं, तिथल्या मत्स्यशेतीच्या तळ्यांमधे फिशिंग आणि तळ्यातच असणारं एक घर. शिवाय अनेक गावरान दिसणारी कॉटेजेस.

तिथेच जवळ एमू फार्म आहे. हे सर्व फिरणं + सर्व जेवणखाण एंट्री फीमधे इन्क्लूडेड.

मला स्वतःला दूरशेत आणि सगुणाबाग हे त्यांच्या ठिकाणासाठी अत्यंत आवडले पण तिथे प्रत्येक वेळी रपरप चिखलातून जेवायखायला मूळ भोजनगृहापर्यंत जावं लागतं हे काहीजणांना त्रासदायक होऊ शकतं. अशा सर्व ठिकाणी पावसाळ्यात दमटपणा असतो आणि विशेषतः सगुणाबागमधे चादरी वगैरे दमट खाजर्‍या असण्याचा अनुभव आला. ते तेवढे सांभाळा. पोरं फार लहान नसतील आणि सोबत वृद्ध नसतील तर ही ठिकाणं वेगळा अनुभव देतील.

४. हिडन व्हिलेज , हे माझं खास आवडतं पावसाळी ठिकाण, म्हणून जर्रासा जास्त तपशील.

टोनी या गृहस्थाने बनवलेला आणि नीट मेंटेन केलेला हा एक थीम रिजॉर्ट आहे. मुळात नैसर्गिक जागेतच रचना केल्याने त्यात कृत्रिमता अजिबात नाही.

टोनी स्वतः इथेच राहात असल्याने रिजॉर्टचा मेंटेनन्स उत्तम असतो. कसारा घाटाच्या आगोदर, शहापूरनंतर आटगांव लागते. तिथून पाच दहा मिनिटे ड्रायव्हिंगच्या अंतरावर ही जागा आहे.

गेट (लपलेलं)

रिसॉर्टमधे प्रवेश करणारा छोटा पूलः

पाटील हाऊस भिल्ल हाऊस असे राहण्याचे ऑप्शन्स आहेत. सारवलेली घरं, चूल वगैरे (चहाबिहा बनवण्याची हुक्की आली तर सर्व सामान ठेवलेलं असतं खोलीत.. पण खाण्यापिण्याची चारीवेळ रेलचेल असते..)

कूलर टीव्ही वगैरे असतात.

दिलेल्या भाड्यात (२-३ हजारच्या मधे) सर्व जेवणं आणि नाश्ते धरलेले असतात. दुपारी चहा म्हणजे फक्त चहा नव्हे. त्यासोबत गरम भजी आणि इतर काही. जेवण साधं गावठीच असतं. पण गरमागरम अन अनलिमिटेड.

या ठिकाणाच्या आसपास बघण्यासारखा एक "पॉईंट" असा काही नाही. पण परिसरच खूप सुंदर आहे. मुळात रिजॉर्टच्या आतच नैसर्गिक धबधबा आणि ओढा आहे. त्यात पावसाळ्यात धो धो पाणी असतं. त्यात मनसोक्त नहाताना आणखी बाहेर कुठे फिरायला जाण्याचा विचारही मनात येत नाही..

या ठिकाणाच्या आसपास बघण्यासारखा एक "पॉईंट" असा काही नाही. पण परिसरच खूप सुंदर आहे. मुळात रिजॉर्टच्या आतच नैसर्गिक धबधबा आणि ओढा आहे. त्यात पावसाळ्यात धो धो पाणी असतं. त्यात मनसोक्त नहाताना आणखी बाहेर कुठे फिरायला जाण्याचा विचारही मनात येत नाही..

एक स्विमिंगपूलही बनवला आहे. पाटील हाऊसच्या आवारात पाण्याचा एक हौदही आहे. त्यात एकदम गावातल्या देशी स्टाईलने धबालधूम डुंबता येतं. पोरं तर बाहेरच पडणार नाहीत.

सोबतीला माणूस देऊन ते आसपासची ठिकाणं दाखवतात..

तिथे सुंदर तळं मिळालं त्याचा फोटो:

आता थांबतो अन्यथा पोस्टच व्हायची..

पावसाळी सफरीसाठी शुभेच्छा..

सुनील's picture

17 Jul 2012 - 9:37 pm | सुनील

धन्यवाद!

चित्रगुप्त's picture

18 Jul 2012 - 9:37 am | चित्रगुप्त

व्वा.. किती सुंदर जागा आहेत... पुढल्या वर्षी नक्की जाणारच. धन्यवाद.

बॅटमॅन's picture

18 Jul 2012 - 12:49 pm | बॅटमॅन

हिडन रेजॉर्ट निव्वळ अप्रतिम!!!!!!!!!!

आसावरी मेढेकर's picture

11 Aug 2012 - 1:13 pm | आसावरी मेढेकर

असे वाटते की आपण तेथेच आहे

अप्रतिम!!इगतपुरी माझ माहेर तुमचा फोटोमधून तो पाउस धुक धबधबे पाहून घरची आठवण आली.आज गविंचा आणि तुमच्या धाग्यावर इगतपुरीच नाव वाचून खूप छान वाटल..

सुनिल पाटकर's picture

18 Jul 2012 - 10:18 pm | सुनिल पाटकर

महाबळेश्वर, पांचगणी ,माथेरान - हि मोठ्या प्रमाणात पाऊस असणारी ठिकाणे टाळा.
सापुतारा बेस्ट ......शिवथरघळ....दिवेआगर,हरिहरेश्वर

मी गेलो नाही पण खूप एकुन आहे त्याबद्दल.

मी गेलो नाही पण खूप एकुन आहे त्याबद्दल.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2012 - 12:39 pm | परिकथेतील राजकुमार

पावनखिंड हॉलिडे रिसॉर्ट.

http://pawankhind.in/

http://pawankhind.in/Mpage_0.htm

चिंतामणी's picture

20 Jul 2012 - 1:03 pm | चिंतामणी

सर्वात उत्कृष्ट ठिकाण. सर्वाथाने.

बायकोच्या बजेटमधेसुद्धा बसू शकेल आणि त्यामुळे जास्त आनंदी वातावरण असेल. ;)