✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

ग
गणपा यांनी
Wed, 07/11/2012 - 20:19  ·  लेख
लेख
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. झालं बाईंची विकेट उडाली. आता बरोबर उत्तर माहित असुनही सांगता येत नसल्याने लेकी समोर धर्मसंकट उभं राहिलं. सांगीतल तर आपण बाईंची परिक्षा घेत होतो हे सत्य उघडं झालं असतं. प्रसंगावधान राखुन लेक निमुट खाली बसली. आणि अश्या प्रकारे एकाच बॉल वर दोन विकेट डाऊन झाल्या. ;) अशी चुकीची माहिती आपल्या मित्रं मैत्रींना मिळु नये असं तिला मना पासुन वाटत होत. मनाला चुटपुट लागुन राहिली. घरी आल्यावर आईला अडचण सांगीतली. बायकोला पण झाल्या प्रकाराची गंमत वाटली. ती म्हणाली की उद्या शाळेत गेल्यावर बाईंना सांग की आईने दुसर्‍या पुस्तकात पाहुन सांगितलं की 'स्वीट पोटॅटो इज अ रुट. वील यु प्लीज कन्फर्म?' आपल्या प्रत्येक अडचणीवर आईकडे उत्तर असतं म्हणुन लेक खुश झाली. आईने धर्म संकाटुन वाचवल्या बद्दल लेकीने एक गालगुच्चा बक्षिस दिला आणि स्वारी 'आज मधहोश हुआ जाये रे..मेरा मन...' गुण गुणत खेळायला पळाली. :)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
बालकथा
विनोद
मुक्तक
शिक्षण
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
17479 वाचन

💬 प्रतिसाद (42)

प्रतिक्रिया

अरे वा..

स्वाती दिनेश
Wed, 07/11/2012 - 20:25 नवीन
तिच्या बाईंचीच परीक्षा आहे खरी, 'अनोखे' किस्से अजून सांग. स्वाती
  • Log in or register to post comments

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 07/11/2012 - 20:46 नवीन
चांगलीच परिक्षा घेतली. मस्त किस्सा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

कसली चुणचुणीत पोर आहे :)

अर्धवटराव
Wed, 07/11/2012 - 20:50 नवीन
लाईफ सदाबहार करणारे किस्से हे :) अर्धवटराव
  • Log in or register to post comments

वाह

मी-सौरभ
Wed, 07/11/2012 - 20:52 नवीन
मस्त किस्सा... तुमची स्वारी 'आज मधहोश हुआ जाये रे..मेरा मन...' गाण गुणगुणते हे वाचून अजूनच कौतुक वाटले.
  • Log in or register to post comments

सध्या रात्री झोपण्या पुर्वी

गणपा
Wed, 07/11/2012 - 20:56 नवीन
सध्या रात्री झोपण्या पुर्वी ९:३० ते १०:३० एफ एम वर जुनी गाणी ऐकण्याचा नाद लागलाय. त्याचच हे फलीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हा हा हा...

स्मिता.
Wed, 07/11/2012 - 20:54 नवीन
हुशार आणि समंजस आहे तुमची कन्या!
  • Log in or register to post comments

किस्सा आवडला

शुचि
Wed, 07/11/2012 - 20:54 नवीन
"रीडर्स डायजेस्ट" ला असे किस्से जरूर पाठवा. एक तर छापून तरी येतात व फुकट "सब्स्क्रिप्शन" अथवा पैसे मिळतात किंवा "सब्स्क्रिप्शन" तरी मिळतेच मिळते - अनुभव आहे. मुख्य समाधान मिळते व अनेक लोकांपर्यंत आपला आनंद पोचतो.
  • Log in or register to post comments

हा हा हा किस्सा आवडला

जाई.
Wed, 07/11/2012 - 20:56 नवीन
हा हा हा किस्सा आवडला
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा एकदम भारी आहे

हरिप्रिया_
Wed, 07/11/2012 - 21:48 नवीन
मस्त किस्सा :) एकदम भारी आहे हा तुमची लेक.
  • Log in or register to post comments

एकदम भारी आहे हा तुमची

सोत्रि
Wed, 07/11/2012 - 23:30 नवीन
एकदम भारी आहे हा तुमची लेक.
सहमत! पण, गणपाच्या लेकीचे हा आणि आधिचे किस्से वाचून, त्याची लेक तिच्या आईवर गेलीय हे चाणाक्ष मिपाकरांच्या ध्यानात आले असेलच. गणपा यायच्या आत पळतो आता... ;) - (चाणाक्ष) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हरिप्रिया_

पुर्णपणे

चिंतामणी
गुरुवार, 07/12/2012 - 09:38 नवीन
सहमत! (सोक्या- या भारतभेटीत गणपा पुणेवारी नक्की करणार.) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

तुमची मुलगी पास होऊन वरच्या

मराठे
Wed, 07/11/2012 - 21:59 नवीन
तुमची मुलगी पास होऊन वरच्या वर्गात गेली की तुमच्या पेक्षा तिच्या बाईंनाच अधिक आनंद होत असेल! :)
  • Log in or register to post comments

+१

स्पंदना
गुरुवार, 07/12/2012 - 03:57 नवीन
मला वाटतय गणपा ऐवजी बाईच पेढे वाटत असणार. आणि वर वरच्या वर्गातल्या बाईंना 'शुभेच्छा' पण देत असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

हा हा हा. मजेशीर....दोघींचीही

रेवती
Wed, 07/11/2012 - 23:17 नवीन
हा हा हा. मजेशीर....दोघींचीही पंचाईत झाली.
  • Log in or register to post comments

लहान मुले अशीच पंचाईत करत

पिंगू
Wed, 07/11/2012 - 23:38 नवीन
लहान मुले अशीच पंचाईत करत असतात आणि हे असे किस्से नेहमीच हहपुवा करुन जातात.
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Wed, 07/11/2012 - 23:40 नवीन
हे पाणी भयंकर आहे!
  • Log in or register to post comments

जाम भारी किस्सा.

प्रचेतस
गुरुवार, 07/12/2012 - 00:00 नवीन
जाम भारी किस्सा. :)
  • Log in or register to post comments

जालिम पोरगी. पण मनान अगदी

स्पंदना
गुरुवार, 07/12/2012 - 04:00 नवीन
जालिम पोरगी. पण मनान अगदी हळुवार वाटतेय. ए! गणपा माझा पोरगा पण जुनीच गाणी म्हणतो , नखरेवाली आऽआऽआऽ..हिंदी शब्द तर आम्हाला पण माहित नाहीत त्यात त्याचे फन्नी उच्चार. भारी वाटत.
  • Log in or register to post comments

चांगलीच खोडकर झालीये

मराठमोळा
गुरुवार, 07/12/2012 - 05:55 नवीन
चांगलीच खोडकर झालीये :)
  • Log in or register to post comments

लय भारीच हो.......

लीलाधर
गुरुवार, 07/12/2012 - 08:48 नवीन
किस्सा आवडला गेला हाये.... :)
  • Log in or register to post comments

आवडले

इरसाल
गुरुवार, 07/12/2012 - 09:11 नवीन
एकंदरीत बाइंचे(शाळेतल्या) काही खरे नाही.
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा

कुंदन
गुरुवार, 07/12/2012 - 09:12 नवीन
मस्त किस्सा ! गंपा तुझी पण विकेट काढत असेल ना ती अधुन मधुन , ते पण किस्से येउ दे की ;-)
  • Log in or register to post comments

असेच म्हणते

sneharani
गुरुवार, 07/12/2012 - 10:40 नवीन
तुमची विकेट निघालेले किस्से येऊ देत की! बाकी, हा किस्सा भारीच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

कै च्या कै

चिंतामणी
गुरुवार, 07/12/2012 - 17:10 नवीन
तो स्वतःच कसे सांगेल की त्याचा क्लिन बोल्ड झाला म्हणून. त्यापेक्षा एखादी पाकृ टाकायला सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sneharani

खिक्

ऋषिकेश
गुरुवार, 07/12/2012 - 10:37 नवीन
खिक्
  • Log in or register to post comments

मस्त किस्सा! गणपा तुझी लेक

प्यारे१
गुरुवार, 07/12/2012 - 11:49 नवीन
मस्त किस्सा! गणपा तुझी लेक मस्त 'रोटेशन' करवते बाईंना...!
  • Log in or register to post comments

पोरीने

मन१
गुरुवार, 07/12/2012 - 12:21 नवीन
पोरीने शिक्षिकेचा "क्लास" घेतला म्हणायचं....
  • Log in or register to post comments

>>>"टिचर स्वीट पोटॅटो इज अ

नाना चेंगट
गुरुवार, 07/12/2012 - 14:17 नवीन
>>>"टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" हे काय वाक्य आहे ते काही कळाले नाही. :(
  • Log in or register to post comments

नक्की काय कळालं नाही? स्टेम =

शुचि
गुरुवार, 07/12/2012 - 18:21 नवीन
नक्की काय कळालं नाही? स्टेम = खोड, रूट = मूळ, स्वीट पोटॅटो = रताळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

चला..

कुंदन
गुरुवार, 07/12/2012 - 18:23 नवीन
आज ज्ञानात एक भर पडली.... स्वीट पोटॅटो = रताळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

आयला ! अस्सं होय ! चला ते

नाना चेंगट
गुरुवार, 07/12/2012 - 18:28 नवीन
आयला ! अस्सं होय ! चला ते शब्द वापरुन मी वाक्य करतो. बघा बरे जमते का? गणपाची किस्से सांगण्याची स्टेम चांगली आहे आणि त्याचा रुट स्वभाव स्टेमकर आहे ! जमतयं ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हाहा

शुचि
गुरुवार, 07/12/2012 - 20:41 नवीन
=)) =)) नाना तुम्ही पण एक अवलिया आहात अगदी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

लै भारी..

चिगो
गुरुवार, 07/12/2012 - 14:18 नवीन
लैच चुणचुणीत आहे लेक तुमची.. बा इथं मिपावर भल्याभल्यांच्या तोंडात पाणी आणतोय, आणि लेक शाळेत भल्याभल्यांच्या तोंडाचं पाणी पळवतीय.. ;-)
  • Log in or register to post comments

जियो चिगो! जियो! काय वाक्य

स्पंदना
गुरुवार, 07/12/2012 - 19:02 नवीन
जियो चिगो! जियो! काय वाक्य आहे. पाणी आणणे अन पळवणे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो

गणपा साहेब, लेख आवडला.

निश
गुरुवार, 07/12/2012 - 15:43 नवीन
गणपा साहेब, लेख आवडला. तुमची लेक खरच तुमच्या सारखी समजुतदार व हुशार व गुणी आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 07/12/2012 - 18:28 नवीन
उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. श्री. गणपा साहेब, तुमची लेक मराठी संस्थळांवर वावरायला परिपक्व झाली आहे.
  • Log in or register to post comments

'गोड बटाटा'

अस्वस्थामा
गुरुवार, 07/12/2012 - 22:22 नवीन
कंच्या शाळेत जाते म्हणायची तुमची मुलगी..? बाईना 'बटाटा' कुठे येतो हे जर माहित असेल तर 'गोड बटाटा' कुठे येत असेल याचा अंदाजपंचे तीर तरी मारायला यायला हवे होते ना.. आता बटाटा कुठे येतो हे नसेल माहित तर मग काय बोलायचं ..
  • Log in or register to post comments

हे बरे आहे तुझे

कुंदन
गुरुवार, 07/12/2012 - 22:33 नवीन
तु हाणत जा चिकन तंगड्या , ती बिचारी खातेय रताळी..
  • Log in or register to post comments

तुमचेच मित्र..

नाना चेंगट
Fri, 07/13/2012 - 11:14 नवीन
तुमचेच मित्र..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

मित्र..

कुंदन
Fri, 07/13/2012 - 17:24 नवीन
तो पण आमचा , तु पण आमचाच ... अन ... .... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना चेंगट

स्वारी पण प्रतिसाद काही कळला

गणपा
Fri, 07/13/2012 - 12:02 नवीन
स्वारी पण प्रतिसाद काही कळला नाही कुंद्या. पण त्यावर नानाची मात्र अपेक्षीत प्रतिक्रिया. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

झक्कास किस्सा..

उपास
Fri, 07/13/2012 - 12:26 नवीन
गणपा, लेक हुशार तर आहेच पण धीट तसेच मोठ्यांचा आदर करणारी आहे.. शाबसकी ! पावणे तीन वर्षाचा माझा मुलगा मराठी व्याकरणात असाच गोंधळवतो.. मी - बंड्या, हात धुवू.. बंड्या - धुवले मी - अरे धुवले नाही रे धुतले बंड्या - बाबा, हा त कुठून आणता तुम्ही मधे.. धु व ले हेच बरोबर.. मी - बर! ... :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा