मूलांची शेती....भाग २...स्वओळख आणि नियम...

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
30 Jun 2012 - 3:18 am
गाभा: 

आधीचा भाग (http://www.misalpav.com/node/22109)

सर्व प्रथम , मला काही मान्यवर व्यक्तींचे आभार मानायचे आहेत.

१. श्री. अविनाश भोमे ("तुम्ही आणि तूमची मूले" ह्या पुस्तकाचे लेखक)
२. श्री. प्रविण दवणे (अनेक पुस्तकांचे लेखक, विषेशतः "सावर-रे" चे सगळे भाग)
३. डॉ. अनिल अवचट
४. डॉ. हातवळणे ("यशवंत व्हा!" ह्या पुस्तकाचे लेखक)
५. श्री. विलास मुणगेकर ("कार्य शैली" ह्या पुस्तकाचे लेखक)
६. डॉ. विजया वाड
७. व.पू. काळे
८. स्व. निळू फूले
९. डॉ. उल्हास कोल्हटकर

वरील सर्वांनी, मला त्यांचा अमूल्य वेळ दिला आणि ह्या सर्व मान्यवर लेखकांची मते वाचूनच माझ्यातील "वडीलरूपी राक्षस " बाहेर नाही आला, तर एका "बापाचा" जन्म झाला.

१. श्री. प्रशांत दामले
२. श्री. प्रभाकर पणशीकर
३. ह्रुदयनाथ मंगेशकर
४. जादूगार रघूवीर (ज्यु.)
५. श्री, विजय चव्हाण

वरील सर्व मान्यवरांनी, माझ्या मूलांसाठी, ३/४ मिनिटे वेळ दिला आणि त्यामूळे मूलांना ह्या कलाकारां विषयी आदर पण वाटला.

========================================================
सर्व प्रथम मी. काही गोष्टींचा खूलासा करतो,

१. इथे आपण मुलांच्या शेतीचे (किंवा जडण घडणीचे किंवा संगोपनाचे) व्यवस्थापन कसे करावे ह्याचे विचार मंथन करणार आहोत.ह्यात प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित आहे.
२. मी काही सर्वज्ञ नाही. माझ्या कडून पण काही चूका झाल्या आहेत, काही होत पण असतील आणि पूढेही होतील, त्यामूळे, मूवि, म्हणत आहेत तेच सत्य . असे समजून चालू नका.

३. माझे वाचन प्रचंड आहे.मी काही सिद्धहस्त लेखकांना भेटलो आहे.वेळ प्रसंगी, त्यांच्याशी विचार विनिमय पण केला आहे.त्यामूळे, माझ्या मूलांच्या बाबतीत, मी सध्या एक समाधानी बाप आहे.
४. इथे आपण , सरकारची धोरणे किंवा क्लासेस. इत्यादी गोष्टींचा विचार करणार नाही आहोत.
५. इथे मी फक्त, आम्ही केलेल्या चूका आणि त्या कशा सुधारल्या ते सांगणार आहे,त्यातील विचारांवर देवाण-घेवाण व्हावी ही अपेक्षा आहे.वातावरण , हसते खेळते असू द्यावे ही विनंती आहे.
६. संपादकांना विशेष आग्रह आहे, की त्यांनी, ह्या ग्रूप मधील जून्या आणि जाणत्या लेखकांना त्यांचे पण अनूभव लिहायची विनंती करावी.
७. चला आपण सगळे मिळून एक नविन पिढी घडवू या. कशाला हवे ते सरकार? मिपाच मदतीला तयार हवे.आपण कदाचित, आर्थिक मदत नाही करू शकणार पण सुयोग्य सल्ले तर नक्कीच देवू शकतो.
========================================================

आजचे विचार मंथन "स्व-ओळख आणि नियम"

स्व-ओळख...

तूमच्यातील स्ट्राँग पॉइंट सांगा असे, जर कूणी मला १५ वर्षांपूर्वी विचारले असते, तर मला एक पण सांगता नसता आला.आज जर विचारले तर मी ३/४ नक्की सांगू शकीन आणि तेच खरे असतील आणि वीक पॉइंट्सचे काय? आधी खूप होते पण आज ते पण २/४च उरले आहेत.त्यांची तीव्रता कमी आहे.पण आहेत.

खरे तर आपली ओळख ही "गूनावगूणांनी" होत असते, काही दैवी भाग असतो..जसे रूप, कला, रंग ...

पण एखाद्या मूलाला विचारा? तो म्हणेल, "माझा बाप जगातील सगळ्या गूणांचा बाप आहे. तो एका बूक्कीत नारळ फोडतो,झाडावर चढतो, १५/२० राक्षसांना एकाच वेळी मारतो.वगैरे वगैरे..."

आणि एखाद्या मूलीला विचारा. ती म्हणेल "माझी आई ही जगातील सगळ्यात सूंदर स्त्री आहे."

मूलांच्या नजरेत एका बापाचे स्थान हे असे असते. आणि आपण त्याला अनावश्यक ओरडून आणि चार-चौघांत त्याचा अपमान करून , त्याच्या नजरेतील आपल्याच चांगल्या प्रतिमेला , आपणच तोडून टाकतो.

मूले ही प्रतिमा बराच काळ सांभाळत असतात. म्हणूनच म्हणालो, की तूमच्या गूणांना ओळखा, जे चांगले गूण असतील ते अजून चांगले करा आणि जे वाईट असतील , ते फेकून द्या.

एक उदाहरण देतो. मला मनापासुन स्वैपाक करयला आवडतो.मला सूट्टी असेल त्या दिवशी सकाळचे जेवण मी बनवतो.मूले पण मदत करतात आणि ह्याचा एक फायदा असा झाला की. आज ती जगाच्या पाठीवर कूठेही जावू देत, ती उपाशी नाही मरणार.

मला वाचन करायला आणि गप्पा मारायला मनापसून आवडतं.माझ्या कडे स्वतःची २०००च्या आसपास पुस्तके आणि दिवाळी अंक आहेत (शतायूषी, अबकडई, अक्षर, ह्या टाइप मधले)आज कळत-नकळत , मूले पण वाचन करतात.(पण पूस्तके न वाचता , गूगल वर शोधून काढून वाचतात.माध्यम बदलले आहे, पण ध्येय तेच आहे.... नविन काय आहे ते स्वीकारा, त्यातील चांगले काय ते शोधा आणि मूलांना शिकवा)कूणी घरात आले तर , धाकटा मस्त गप्पा मारतो.(मोठा सध्या पौंगडावस्थेत असल्याने, पटकन फ्री होत नाही,)लहानपणी दोघेही छान गप्पा मारायचे.

म्हणून म्हणालो, तूमच्यातील सुप्त गूण ओळखा.

आता हे ओळखायचे कसे?

फार सोपी ट्रिक आहे...तुम्हाला साप्ताहीक सूट्टी असते की नाही. समजा तूम्हाला रविवारी सूट्टी आहे. तर शनिवारी संध्याकाळी, टी.व्ही. बघू नका.एक दिवस त्याला न बघितल्याने काही फरक पडत नाही.मस्त पैकी एखादे पुस्तक वाचा. किंवा मनाला आवडेल ते काम करा.आणि जेवण झाले की शांत पणे शत पावली करा आणि थोडे थकलात की, मनांत कूठलाही विचार न आणता, झोपा. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळाले असेल.

मला पुस्तक वाचल्यावर आणि गाणी ऐकून झाल्यावर माझ्यातील सुप्त गूणांची ओळख झाली.

नियम....

आपण सगळेच जण काम-धाम करणारी माणसे.पण कूठेही काम करा, प्रत्येक संस्थेचे काही नियम असतात आणि त्यांची कठोर पणे अमंलबजावणी होत असते.इथे २ उदाहरणे देतो.

१. छ. शिवाजी राजे यांनी, काही नियम केले होते. औरंगजेबाच्या बरोबर लढाई करतांना, ते नियम पाळल्यामूळे, बराच फायदा झाला.
२.टाटा. बिर्ला सारख्या कं. टिकल्या त्या, त्यांच्या काही नियमांमूळेच.

मग आपल्याच घरांत असे काही नियम असायला हवेत का नको? ते नियम कोण ठरवणार? आणि नियमांची प्राथमिकता काय? आणि त्यांची शिथिलता किती असायला हवी? सध्या सगळ्याच घरांत , जास्तीत जास्त २च मूले असल्याने , मी पण २च मूलांना ग्रुहीत धरून "विचार मंथन" करत आहे. माझ्या कडून एखादा मूद्दा मांडायचा राहिला असेल तर तो मांडा.

मला २ मूले, दोन्ही मूलांना वाढवतांना मी वेगळे वेगळे प्रयोग केले,निसर्गत: मोठ्या मूलावर जास्तच.वेळ प्रसंगी मुलांना मार पण दिला, पण तशी वेळ फार क्वचितच आली.आज-काल एक दोन वाक्यातच काम होवून जाते.मूले ८-१० वर्षांची होईपर्यंत आम्ही वेगळे रहात होतो आणि मग पूढे आम्ही एकत्र कूटूंब पद्धत स्वीकारली आणि त्याचा फायदे झाले, तसेच काही तोटे पण झाले.पण एकूणच एकत्र कूटूंबाचा फायदाच जास्त झाला आणि त्याला कारणीभूत झाले ते आमच्या घरातील नियम.

हे नियम आखले ते, माझ्या मूलांनी आणि आम्ही.फार लहानपणी, मी एक कथा-मालिका वाचली होती " चीपर बाय द डझन"... कळत-नकळत. त्यात, त्या कूटूंबियांचे, एकमेकांबरोबरचे संबंध फार घट्ट होते.वडीलांचे, अचानक निधन झाल्यावर देखील, मूले फार लवकर स्वतःच्या पायावर उभी राहिली, कारण त्यांनी केलेले नियम.

घरडा कॉ.त आल्यानंतर मला व्यसन लागले, ते मालिका बघायचे. त्यावेळी, "आभाळमाया" नावाची सिरियल चालली होती.जवळजवळ ४०० भाग बघितले असतील.मूले लहान होती.अभ्यास घ्यावा लागत न्हवता.सिरियल संपली आणि एक दिवस मी शांतपणे विचार केला.आणि एक आराखडा तयार केला.

१. एकूण भाग ४०० , मी बघितले ३०० (मी ४००च बघितले)
२. एक भाग ३० मिनिटांचा , म्हणजे १५० तास (तसे नाही झाले, मी १५ मिनिटे आधी आणि १५ मिनिटे नंतर पण टी.व्ही. बघायचो)
३. ह्या १५० तासात मी काय शिकलो? मला काय फायदा झाला? ह्यातील कूठल्या घटना माझ्या आयुष्यात आल्या किंवा येणार आहेत?
४. ह्याच वेळेचा मला दुसरी काही गोष्ट करायला उपयोग झाला असता का?( हो. मी मूलां बरोबर खेळलो असतो, त्यांना गाणी म्हणून दाखवली असती.)

मला, माझे उत्तर मिळाले,,,, त्या दिवसापासून मी एक पण मालिका बघितली नाही आणि आयुष्यात, जो पर्यंत माझे हात-पाय चालत आहेत , तो पर्यंत मी मालिका बघणार नाही.

आज माझ्या मूलांना हे व्यसन नाही, ते मालिका बघतात, पण १०-१२ भाग चूकले तरी, आकांड-तांडव करत नाहीत.योग्य त्या वयात, त्यांना कार्टून नेटवर्क बघावेसे वाटले.आम्ही पण बघू दिले, पण काही नियम आखले. ह्या इतक्या-इतक्या गोष्टी झाल्या की मग आणि ते पण १/२ तासच.कधी कधी मीच मूलांना बोलवायचो, अरे हे बघ "टॉम आणि जेरी " आले.मूले यायची आणि तेव्हढा भाग बघून झाला की, परत आपल्या आपल्या कामाला लागायची.क्वचितच ह्या मूळे मूलांनी ओरडा खाल्ला असेल. हे सगळे का शक्य झाले, तर नियमामूळे. आपला बाप स्वतः ते नियम पाळतो म्हणून मूले पण हा नियम स्वीकारतात.

आमच्या घरातील नियम आम्ही आखले आहेत , त्यात मूलांचा पण सहभाग आहे,जिथे त्यांना ते नियम शिथिल करून हवे होते.तिथे त्यांना ते करू दिले.त्यांच्या वर विश्वास टाकला कारण त्यांनी तो मिळवला होता.

त्यांनी , तो विश्वास कसा मिळवला , ते आपण बघू या पूढच्या भागात.

आज इथेच थांबतो... पूढचा भाग... मूलांना ओळखा...

प्रतिक्रिया

शुचि's picture

30 Jun 2012 - 3:42 am | शुचि

लेखमाला उत्तम आहे.

श्रीरंग_जोशी's picture

30 Jun 2012 - 3:44 am | श्रीरंग_जोशी

हे वाचून इतके समाधान मिळत आहे की प्रतिसाद द्यायला शब्द सुचत नाहीयेत.

मुवि - तुम्ही लिहत रहा असेच या विषयावर, आम्ही कथामालिकेच्या पुढच्या भागाची भरपूर प्रतिक्षा करू शकतो...

भरत कुलकर्णी's picture

30 Jun 2012 - 3:50 am | भरत कुलकर्णी

उपयोगी लेखमाला. अभिनंदन.

बाकी वर उल्लेखलेल्या कलाकारांविषयी आदर आहेच पण एक दोन मिनीटांत त्यांच्याकडून काही शिकायला मिळेल ही शंका आहे.

चतुरंग's picture

30 Jun 2012 - 3:54 am | चतुरंग

किती वेळ भेटता यापेक्षा कोणाला भेटता याचा प्रभाव असतो. व्यक्तिमत्त्वाचे संमोहन असते.
पुढे जेव्हा केव्हा कारणा कारणाने ती भेट आठवत राहील ती काही परिणाम साधून जाते आणि शिकायला मिळते ते त्याद्वारे. पहिली दोन किंवा चार मिनिटे हे फक्त निमित्त असते!

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 4:25 am | मुक्त विहारि

मूलांसाठी

उघड सत्य...
१. ही सगळी माणसे भेटू शकली, म्हणून त्यांच्या मनातील , बूजरे पण नाहीसे झाले.

सुप्त मनांतील सत्य...
१. आपण असेच मोठे होवू शकतो ही एक भावना मनांत तयार कळत नकळत तयार होते.
२. कितीही मोठी झाली तरी. इतर लोकांना भेटायला ते नाही म्हणनार नाहीत.

माझ्या साठी,

३/४ मिनिटेच का होईना पण , बोलले आणि तो प्रभाव राहिला.आयुष्यभराचा अमूल्य ठेवा असतो हा... त्याची कशाबरोबरही तूलना नाही करता येणार.

सहज जमले , तर एकदा , तूमच्या आवडत्या कूठल्याही व्यक्तीला भेटून या. हे अनूभव शब्दात नाही वर्णन करता येत.

सुनील's picture

30 Jun 2012 - 3:52 am | सुनील

उत्तम चाललीय लेखमाला.

चतुरंग's picture

30 Jun 2012 - 3:56 am | चतुरंग

जिथे वाटते तिथे सविस्तर प्रतिसाद देईनच.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 4:03 am | मुक्त विहारि

जेव्हढे म्हणून चांगले देता येईल तेव्हढे देवू या...

आपण , आर्थिक मदत नाही करू शकणार, पण वैचारीक मदत तर नक्कीच करू शकतो..त्याला कूठे पैसे लागतात? आपले अनूभव दूसर्‍यांबरोबर शेयर करणे उत्तमच असते.

भरत कुलकर्णी's picture

30 Jun 2012 - 4:15 am | भरत कुलकर्णी

अहो मुवि, या मुळ लेखात आधीच्या भागाचा उल्लेख हा हवा होता. चुकून शेवटचा ९ चोप्य करायचा राहिलेला दिसतो आहे. सकाळी संपादक येवून दुरूस्त करतीलच म्हणा. (किंवा दुसर्‍या खंडातील संपादक असतील तर आताच होईल. )

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 4:28 am | मुक्त विहारि

आता संपादकांना गाठायचे कसे?

संपादक मंडळ या आय डी स व्य नि करावा अथवा पैसा किंवा गणपा किंवा छोटा डॉन यांना करा.

मुक्त विहारि's picture

30 Jun 2012 - 6:23 am | मुक्त विहारि

संपादक मंडळास, व्य नि केला आहे.

एकदम मस्त !!

़क्या बात..
ग्रेट

अमित's picture

30 Jun 2012 - 7:24 am | अमित

दुसरा भाग ही छान झाला आहे.

अमितसांगली's picture

30 Jun 2012 - 1:23 pm | अमितसांगली

लेखमाला उत्तम दिशेने चालली आहे....

५० फक्त's picture

30 Jun 2012 - 3:12 pm | ५० फक्त

उत्तम लेखमाला धन्यवाद.

गोंधळी's picture

30 Jun 2012 - 10:09 pm | गोंधळी

लकी कुटुंब

ब्रम्हचारी.

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2012 - 1:45 am | प्रभाकर पेठकर

अत्यंत महत्त्वपूर्ण लेख. आदर्श पिता बनण्याचे अनेक सुलभ मार्ग, वाचतो आहे.

ह्यातल्या काही गोष्टी मीही केल्या माझ्या मुलावर ठराविक संस्कार करताना. त्यापैकी वाचनाची आवड त्याला लागली आहे. मी मराठी पुस्तके वाचायचो तो इंग्रजी कादंबर्‍या आणि माहिती पुस्तके वाचतो. बाकी आमच्या काळी नसलेला संगणक नांवाचा माहिती स्रोत त्याच्या हाती आहेच. आपल्या पेक्षा वयाने मोठ्या पाहुण्यांशी गप्पा मारणे त्याला जमते तसेच आपल्या पेक्षा वयाने लहानांना रिझवणेही त्याला जमते. तो एक फेवरीट 'दादा' असतो. समवस्कांचे बरेच फोन येत असतात. म्हणजे त्याच्या मित्रमंडळीतही तो 'वेलकम' आहे.

मुक्तविहारी साहेब, तुमचा हा लेख अजून १५-२० वर्षे आधी वाचनात आला असता तर खुप जास्त मदत झाली असती. माझी समजही जास्त परिपक्व झाली असती. असो. ते होणे नव्हते. ह्या पुढे तरी त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा मला फायदा होईल ह्या बाबत मनांत अजिबात शंका नाही. धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

1 Jul 2012 - 2:59 am | मुक्त विहारि

तुम्ही एक चांगले बाप तर आहातच आता तूमचा मुलगा एक चांगला "बाप" होईल आणि तुम्ही एक चांगले,,,आजोबा...

नेहमी चांगलेच बघावे हो...

प्रभाकर पेठकर's picture

1 Jul 2012 - 8:50 am | प्रभाकर पेठकर

नेहमी चांगलेच बघावे हो...

सत्य वचन.

म्हणूनच मी आशावादी आहे आणि येत्या भविष्यकाळात चांगले पाहतो आहे.

ह्या पुढे तरी त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचा मला फायदा होईल ह्या बाबत मनांत अजिबात शंका नाही.

धन्यवाद.

शिल्पा नाईक's picture

2 Jul 2012 - 1:30 pm | शिल्पा नाईक

तुम्ही मालिकेच एकदम छान केल, पण मोठ्या माणसांच्या मालिकेच्या वेडामुळे लहान मुलांना पण टि.वी. ची सवय लागते. त्यावर काय उपाय करायला हवेत? (मोठी माणसं= सा.बा. वय ६१, सा. बु. वय ६५)