मिपा म्हणी

श्रीरंग_जोशी's picture
श्रीरंग_जोशी in काथ्याकूट
21 Jun 2012 - 12:28 pm
गाभा: 

या मागची प्रेरणा

मित्रांनो आपल्याला वाटत नाही का की रोजच्या बोलण्यात पारंपरिक म्हणींचा वापर कमी होत चाललाय.
चला तर मग, आपण या म्हणी आठवणींच्या कप्प्यातून बाहेर काढूया.

हो पण, जश्या च्या तशा नाहीत, तर त्यांना मिपा म्हणींचे स्वरूप देऊन

उदा :

  • धाग्यापेक्षा प्रतिसाद जड
  • उथळ लेखनाला प्रतिसाद फार
  • अडला कवी संपादकांचे पाय धरी
  • धागा नको पण प्रतिसाद आवर
  • आपलेच धागे अन आपलेच प्रतिसाद
  • सदस्याची धाव प्रतिसादापर्यंतच
  • व्याकरण नको पण भाषाशुद्धी आवर
  • टंकेल ते डकवेल काय

कृपया हलकेच घ्या.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार

सदस्य नको पण डायरीया आवर.

असो...

तुम्हाला आमच्याकडून एक छोटी भेट :-

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 12:50 pm | बॅटमॅन

डायरिया वरचा श्लेष हेतुतः होता की होते होते हो गया? ;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 1:05 pm | श्रीरंग_जोशी

परा गुरूजी -
आपल्यालाही एक छोटीशी भेट - ऊर्जाबचत करून वाचवलेले पेटतेल
Petrol

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार

तुमचा कीबोर्ड आणा बरं जरा इकडे.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 1:54 pm | श्रीरंग_जोशी

कळले नाही....

कीबोर्ड (कळफलक) - त्यात असे काय आहे?

दिपक's picture

21 Jun 2012 - 1:59 pm | दिपक

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 2:02 pm | श्रीरंग_जोशी

हे काय? पेटतेल एवढे महाग झालेले असताना असा वापर?

सालं मीपाचं वैशिष्ठ्य हेच की पोस्ट ओपन केल्याशिवाय सदस्याच नांव कळत नाही आणि एकदा पोस्ट बघितली की मग राहवत नाही!

(आहो, कि-बोर्ड आणि पेट्रोल दोन्ही तुमचंच आहे)... आता निदान मला धन्यवाद तरी म्हणू नका.

अमितसांगली's picture

21 Jun 2012 - 1:25 pm | अमितसांगली

अर्ध्या जीलेबीने पिवळे होणे...

अरुण मनोहर's picture

21 Jun 2012 - 1:38 pm | अरुण मनोहर

कंपूत एकोळी शेर शहाणा

धागा तेथे दंगा

ऑफीसच्या वेळेवर मिपापत्र

दोन शब्दांचा आव त्याला धागा ऐसा ताव

मोहनराव's picture

21 Jun 2012 - 1:46 pm | मोहनराव

रोज जिलब्या टाके त्याला कोण आवरे!
(रोज मरे त्याला कोण रडे)
;)

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 1:52 pm | श्रीरंग_जोशी
  1. चार दिवस संपादकांचे
  2. धाग्यात नाही तर विडंबनात कुठून येणार
  3. प्रतिसादांत दंगल धाग्यात चंगळ
  4. (वाङमय) चोरीचा मामला हळू हळू बोंबला

१. रिकामा रंगा अन बिनकामाचा दंगा... :bigsmile:
2. आपलाच धागा अन आपलेच प्रतिसाद.. :bigsmile:

कुंदन's picture

23 Jun 2012 - 9:22 am | कुंदन

रिकामा रंगा , धाग्याला तुंबड्या लावी.

-पोरींच्या आयडीने पोरगेच फार..

-भरवशाची आयडी पण निघाला टोणगा..

-ज्या गावचा आयडी..त्याच गावचा आयपी.. (अर्थात गावाची थाप मारताना आयपी सांभाळा..)

- आयडीच्या जिवावर बायडी उदार..

-अगं अगं डू आयडी, मशीन तरी बदल..

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 2:11 pm | श्रीरंग_जोशी

फारच दमदार आहेत तुमच्या मिपा म्हणी..

  • आयपी सलामत तो आयडी पचास
सूड's picture

21 Jun 2012 - 4:21 pm | सूड

नाव सोनाक्षी आणि हातात आपट्याची पानं !! ;)
डुआयडीची कर्म आयडीस काळ.

आक्षी आक्षी काय समय सुचक का काय तसली पत्रिकिर्या.

चिंतामणी's picture

21 Jun 2012 - 1:59 pm | चिंतामणी

(सक्रीय) सभासद कमी कंपू फार.

कपिलमुनी's picture

21 Jun 2012 - 1:58 pm | कपिलमुनी

स्वताच्या धाग्याला स्वताचेच प्रतिसाद :)

चिंतामणी's picture

21 Jun 2012 - 2:01 pm | चिंतामणी

धागा टिचभर (अहो रूपं अहो ध्वनी) प्रतीसाद पानभर :p

बाळ सप्रे's picture

21 Jun 2012 - 2:38 pm | बाळ सप्रे

आपला तो धागा दुसर्‍याच्या त्या जिलब्या :-)

अर्धवटराव's picture

21 Jun 2012 - 9:43 pm | अर्धवटराव

:) पर्फेक्ट म्हण.

अर्धवटराव

अरुण मनोहर's picture

21 Jun 2012 - 2:54 pm | अरुण मनोहर

दम नाही लिखाणाला आणि अक्षरं डकवा मिपाला

टंकत्या लाज की वाचत्या लाज?

शुद्धलेखन येईना म्हणे टंकनदोष!

अजातशत्रु's picture

21 Jun 2012 - 4:39 pm | अजातशत्रु
  • मिपावरुन जात नाही ती जात
  • नाकात बोलणार्‍यास अशुद्ध लेखनाचा त्रास
  • शब्दांचे किस पाडता प्रतिसादांचाही पाऊस पडे
  • कारवायी नंतर

  • धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे
  • कपिलमुनी's picture

    21 Jun 2012 - 5:52 pm | कपिलमुनी

    >>धागा गेला प्रतिसाद गेले ,हाती आले रडगाणे

    उदय के'सागर's picture

    21 Jun 2012 - 7:58 pm | उदय के'सागर

    प्रतिसांदांवरुन धाग्याची परीक्षा :)

    (शिता वरुन भाताची परीक्षा)

    श्रीरंग_जोशी's picture

    21 Jun 2012 - 8:05 pm | श्रीरंग_जोशी

    धागाकर्त्यास ठेच प्रतिसादकर्ता शहाणा....

    खडीसाखर's picture

    21 Jun 2012 - 9:00 pm | खडीसाखर

    १. उचलला कळ्फलक बडवला खरडायला (उचलली जीभ लावली टाळ्याला)
    २. डू आयडी ची खोड 'निलंबना' शिवाय जात नाही (जित्याची खोड मेल्यावाचून जात नाही)
    ३. प्रतिसादापुरते लेखन (ताकापुरते रामायण)
    ४. धागाकर्ता हिंडतो आन्तरजालाशी चित्त त्याचे प्रतिसादाशी (घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी)

    १. डायरी घेवून मागे लागणे..

    २. अतिधागे त्याचा शर्ट फाटका..

    ३. लिहायला गेलो कविता, झाला काथ्याकुट

    ४. अर्धे लिहायचे आणि सगळीकडे जायचे

    ५. यकु आला रे आला

    ६. धाग्यात सुटली खाज, तर प्रतिसादात कशाला लाज ?

    श्रीरंग_जोशी's picture

    21 Jun 2012 - 9:27 pm | श्रीरंग_जोशी

    मित्रा, फारच सडेतोड म्हणी मांडल्यात रे.

    शेवटची तर खासच...!!

    आणखी एक...

    विडंबनात नाही भाव अन म्हणा त्यास वॉव!!

    ७. कठीण समय येता ग्रुप कामास येतो

    ८. विचारांविना काथ्याकुट व्यर्थ आहे.

    ९. लिहिणार्‍याला पळ म्हणायचे, आणि पळणार्‍या ला लिही म्हणायचे

    १०. कामाचा ना धामाचा, धागा टाकतो नेमाचा

    ११. समुद्रावर हजर अन विहिरीवर नजर

    १२. कामापुरता गणा अन ताकापुरती पैसा

    १३. सोत्रीस पावशेर

    १४. कुठे गविंचे लेख आणि कुठे आयडीच फेक

    रमताराम's picture

    21 Jun 2012 - 10:10 pm | रमताराम

    काय अब्यास काय अब्यास. _/\_

    -ररीष पुणेकर

    शिल्पा ब's picture

    21 Jun 2012 - 10:19 pm | शिल्पा ब

    अजुन एक
    कोणाला कशाचं अन "क्ष" ला कंपुचं.

    ५० फक्त's picture

    22 Jun 2012 - 8:03 am | ५० फक्त

    मा. कविवर्य श्री. गणेशा, तुम्हास मिपाम्हणीरत्न असा पुरस्कार आणि एक चुरचुर नान आमचेकडुन सादर भेट.

    निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

    21 Jun 2012 - 9:45 pm | निनाद मुक्काम प...

    कर काथ्याकुट ,हो विचार जंत ( पी हळद...)
    कंपू बाहेरच्याचा लेख अळणी
    दोन कंपुंमध्ये राडा , मूकवाचकांचा फायदा ( दोघांचे भांडण ..)
    मिपात राहून कंपूशी वैर घेऊ नये.

    अर्धवटराव's picture

    21 Jun 2012 - 9:55 pm | अर्धवटराव

    १) काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय
    २) मिपाचे धर्म तीनच ( आपापल्या मगदुराप्रमाणे ठरवावे)
    ३) थत्ते मियां तो थत्ते मियां, 'क्ष' मियां ...अरे देवा
    ४) मी नाहि कंपुतली, खरड बघा आतली
    ५) टंकना न जाने संपादक तेढा

    अर्धवटराव

    काळे गेले, गुगळे गेले, आता मलाही वीट आलाय

    आवडली एकदम.

    ती ४ थी वाली मला जमतच नव्हती .. बरी झाली लिहिली ती म्हण

    सूड's picture

    21 Jun 2012 - 10:11 pm | सूड

    डुआयडी खाई नी आयडी बोंबलत जाई.
    अंगात नाही बळ डुआयडी काढून पळ
    खर्‍याचं खोटं नि डुआयडीचं नाव मोठं..
    डुआयडी करी बाता नि आयडी खाई लाथा..

    विश्वनाथ मेहेंदळे's picture

    21 Jun 2012 - 10:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे

    हाहाहा !!!
    "तोंड दाबून बुक्क्यांचा मार" ला एखादी म्हण काढ ना रे !!!

    अरुण मनोहर's picture

    22 Jun 2012 - 3:29 am | अरुण मनोहर

    तोंड दाबून जनरल डायरचा मार...

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 3:51 am | श्रीरंग_जोशी

    सरपंच... सरपंच... सरपंच...

    (महाश्वेता मालिकेतील 'जगदंब... जगदंब... जगदंब' च्या धर्तीवर)

    तोंड दाबून बुक्क्यांचा मार

    अजून १ म्हण ही घ्या :-D

    :-D प्रतिसाद सोडून स्मायल्याच फार :-D

    किसन शिंदे's picture

    22 Jun 2012 - 8:24 am | किसन शिंदे

    भयकंर चिडला आहात जणू.? ;)

    एवढ्या सौजन्यपूर्ण प्रतिसादात तुम्हाला चीड कुठे दिसली ? मी चिडावं असं काही घडलंय का ?

    अरुण मनोहर's picture

    22 Jun 2012 - 4:04 am | अरुण मनोहर

    गावंढ्या गावात एकोळी सवाशिण

    टंकून टंकून दमले आणि संपादकपदी लागले

    उधळले कंपूवीर, खरडवह्या फुंकते

    उथळ धाग्याला प्रतिसाद फार

    शंभर उंडग्यांचे तर एक विचारजंताचे (सौ सुनार की तो एक लोहार की)

    तुझ्या धाग्याला लागलं ***

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 8:33 am | श्रीरंग_जोशी

    कोणाचे हे लेख, धागा हा कोणाचा, डुप्लिकेट आयडी त्याचा तोची जाणे....
    (संत ज्ञानेश्वरांची क्षमा मागून)

    पैसा's picture

    22 Jun 2012 - 8:51 am | पैसा

    धागा आणि बर्‍याच प्रतिक्रिया फारच आवडल्या आहेत! आणखी भर घालू शकले असते पण.....

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 9:01 am | श्रीरंग_जोशी

    पण काय?

    ५० फक्त's picture

    22 Jun 2012 - 9:35 am | ५० फक्त

    पैसातैना असं म्हणायचं आहे -

    हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है.

    टवाळ कार्टा's picture

    22 Jun 2012 - 12:27 pm | टवाळ कार्टा

    आयला
    "हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है." हि लाइन कोणी कोणाची ढापली म्हणायची ;)

    येऊ द्या तुमच्याकडल्याही म्हणी!

    बिपिन कार्यकर्ते's picture

    22 Jun 2012 - 10:06 am | बिपिन कार्यकर्ते

    नवीन सदस्याला धागे फार...
    नवीन सदस्याला उचापत्या फार...
    (उथळ पाण्याला खळखळाट फार).

    जोयबोय's picture

    22 Jun 2012 - 10:45 am | जोयबोय

    'परा' चा कावळा करणे

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 10:53 am | श्रीरंग_जोशी

    कावळ्याच्या (प्रतिसादाच्या) शापानि धागा मरत नसतो.

    कापूसकोन्ड्या's picture

    22 Jun 2012 - 11:06 am | कापूसकोन्ड्या

    धाग्यावरून ख.व. गाठणे.

    कापूसकोन्ड्या's picture

    22 Jun 2012 - 11:03 am | कापूसकोन्ड्या

    १)प्रतिसादातुरांणां न भयं न लज्जा!
    २)प्रतिसाद येइना, म्हणे धागा जिलब्याचा
    ३)कसेही मिपावर ( कसेही ज्ञान प्रकाशात)

    बॅटमॅन's picture

    22 Jun 2012 - 12:42 pm | बॅटमॅन

    पापभीरूणां न सुखं न मज्जा ;)

    श्रीरंग_जोशी's picture

    23 Jun 2012 - 10:00 am | श्रीरंग_जोशी

    खास करून मेंगळट तरुणांसाठी ;-)

    हा हा हा.. चला धाग्याच्या निमित्ताने बरेच जणांच्या आत कोंडलेल्या वाफेला वाट मिळाली म्हणायची की बोळा निघाला म्हण्याचं? ;)

    बॅटमॅन's picture

    22 Jun 2012 - 12:54 pm | बॅटमॅन

    कॉलिंग सखाराम गटणे :P

    चावटमेला's picture

    22 Jun 2012 - 4:24 pm | चावटमेला

    ओरिजिनल आयडीला डु आयडीची साक्ष
    टंकता येईना की बोर्ड वाकडा
    झाकली मूठ शंभर प्रतिसादांची
    संपादकाच्या जीवावर सदस्य उदार..

    मिपा उघडायला आणि आन्तर्जाल जायला....

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 10:55 pm | श्रीरंग_जोशी

    जालाचे तेल मिपावर...

    मराठे's picture

    22 Jun 2012 - 11:00 pm | मराठे

    चार दिवस धाग्यांचे, चार दिवस नाड्यांचे.

    आले सरपंचाच्या मना, तेथे कोणाचे चालेना.

    धाग्यावरून संस्थळाची परिक्षा.

    श्रीरंग_जोशी's picture

    22 Jun 2012 - 11:14 pm | श्रीरंग_जोशी

    माझ्याकडून पुन्हा काही

    प्रतिसाद नको पण खरडी आवर...

    धाग्यापेक्षा विडंबन मऊ

    श्रीरंग_जोशी's picture

    23 Jun 2012 - 1:08 am | श्रीरंग_जोशी

    ज्या गावच्या कविता त्या गावची विडंबने

    श्रीरंग_जोशी's picture

    23 Jun 2012 - 1:44 am | श्रीरंग_जोशी

    १०० विडंबने करून आयडी निर्वाण पावला...

    पाहताच खरपूस धागा झेपावे विडंबनाकडे...
    (समर्थांची क्षमा मागून)

    शिल्पा ब's picture

    24 Jun 2012 - 8:43 am | शिल्पा ब

    दमडीचं नाही वाचन अन प्रतिसादाला नाही फुरसत
    राहतो त्या परदेशातल्या पंतप्रधानाचे वेडेचाळे गोड
    प्रतिसादांचा भुकेला ब्लॉग अन खरडी उचकी
    लेखापेक्षा प्रतिसादच जास्ती
    डोक्याले सुटली खाज अन कीबोर्डाला नाही लाज

    श्रीरंग_जोशी's picture

    24 Jun 2012 - 8:42 pm | श्रीरंग_जोशी
    • नवसदस्याच्या मनात भांबावणे
    • प्रतिसादकर्त्याच्या मनात टवाळकी करणे
    श्रीरंग_जोशी's picture

    25 Jun 2012 - 4:35 am | श्रीरंग_जोशी
    • चित्रपटापेक्षा परीक्षण भारी
    • तुम्ही कराल ते परीक्षण आम्ही करू ते विडंबन
    • प्रतिक्रिया लिहीन तेथे वाद घालीन
    श्रीरंग_जोशी's picture

    25 Jun 2012 - 5:54 am | श्रीरंग_जोशी

    कुणाच्या धाग्यावर... कुणाचे वाजे?

    श्रीरंग_जोशी's picture

    25 Jun 2012 - 6:24 am | श्रीरंग_जोशी

    प्रसंगी धाग्यावर प्रतिसाद रगडिता विडंबनही उमळे...

    मराठमोळा's picture

    25 Jun 2012 - 7:20 am | मराठमोळा

    मजेदार धागा..

    आमची भर..

    १. नकटीच्या कवितेला सतराशे साठ रसग्रहणं
    २. प्रतिसाद नको पण टोमणे आवर
    ३. पंख लागून उडावे परी डु आयडी निशी उरावे.
    ४. संस्थळ हक्क मालकाचा, रुबाब कंपुचा
    ५. वेळ बघून धागे प्रसवावेत (अंथरुण पाहुन...)
    ६. सदस्य भांडत आणि वाचक मजा घेत. (आंधळ दळतं..)
    ७. आपला व्यनी ठेवायचा झाकुन आणि दुसर्‍याची खरड पहायची वाकून
    ८. आयत्या कच्च्या मालावर विडंबनोबा..
    ९. धागा तरो आनी संपादक मरो.
    १०. कंपूवाचून धागा तरला. (औषधावाचून..)
    ११. प्रतिसादक सोडून धागाकर्त्याला सुळी (चोर सोडून संन्याशाला सुळी)

    :)

    श्रीरंग_जोशी's picture

    25 Jun 2012 - 8:28 am | श्रीरंग_जोशी

    एकाहून एक भारी.

    याला म्हणतात अनुभवी फलंदाजाची फटकेबाजी.

    आशु जोग's picture

    30 Jun 2012 - 7:59 pm | आशु जोग

    एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे
    जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे

    --

    कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे

    कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात सरपंचाचे

    श्रीरंग_जोशी's picture

    1 Jul 2012 - 10:12 am | श्रीरंग_जोशी

    अर्धवटरावांनी मिपा ट्रेंड्स धाग्यावर खालील ओळी लिहिल्या आहेत.

    एक धागा ममोचा | शंभर धागे मिपाचे ||
    भयकारी हे सत्य वाचका, तुझीया अभिव्यक्तीचे ||

    श्रीरंग_जोशी's picture

    2 Jul 2012 - 9:01 pm | श्रीरंग_जोशी

    धागा असेल दमदार तर विडंबन होईल जोमदार...