प्रसिद्ध
चित्रपट अभिनेते राजेश खन्ना यांना प्रकृती खराब झाल्यामुळे मुंबईतील
लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजेश खन्ना यांच्यासोबत
पत्नी डिंपल कपाडीया रुग्णालयता असून तज्ज्ञ डॉक्टरांचे एक पथक
प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. राजेश खन्ना यांना सोमवारपासूनच अशक्यपणा आणि
थकवा जाणवत होता. अखेर त्यांना गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हि बातमी आमच्या पिढीला अस्वस्थ करणारी आहे.
सुपर स्टार असा किताब मिळवणार हा एकमेव नट. ..
आखरी खत नाव्याच्या साधारण सिनेमात त्याला पाहिले अन प्रेमात पडावा असाच नट होता.
नंतर बहारोके सपाने..मग आराधना..राजेश खन्ना तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला होता.
स्वतःच्या रक्ताने त्याचे चित्र मुलींनी काढले असा एका मेव अभिनेता..
डिंपल कपाडीया बरोबर लग्ना नंतर मात्र गृह कलहाच्या बातम्या येऊ लागल्या ..
सुदंर अभिनय ..देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेला हा अभिनेता लोकप्रियतेच्या शिखरावर होता.
आनंद .बावार्जी..नमक हराम..एक से बढकर एक सिनेमे काका चे.
पुढे अमिताभ युग सुरु झाले अन काका मागे पडला...
राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो व त्यांना दीर्घायुष्य लाभो हि त्या दया घना कडे प्रार्थना
प्रतिक्रिया
27 Apr 2012 - 9:58 pm | निवेदिता-ताई
राजेश खन्ना यांना लवकर बरे वाटूदे..अशी गजाननाकडे प्रार्थना....:)
27 Apr 2012 - 10:11 pm | सुनिल पाटकर
राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो
27 Apr 2012 - 10:11 pm | सुनिल पाटकर
राजेश खन्ना यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो
27 Apr 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा
आपुन बी काका चे फॅन आहोत,लवकर बरा वाटो त्याला ... :-)
27 Apr 2012 - 11:32 pm | पैसा
मधला राजेश सर्वाना आवडेल असाच होता. वयाबरोबर भूमिका बदलायला त्याला जरा वेळ लागला, पण नंतर अवतार मधे तो आवडलाच.
त्याला लवकर बरं वाटू दे ही शुभेच्छा!
28 Apr 2012 - 1:09 am | प्रभाकर पेठकर
राजेश खन्ना ह्यांना प्रकृती स्वास्थ लाभले असून ते त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
असे वृत्त, त्यांच्या मॅनेजरने प्रसिद्धीस दिले आहे. काळजी नसावी.
28 Apr 2012 - 1:14 am | यकु
थँक्यू पेठकरकाका
क्या बात है आज तुम्ही लागोपाठ गुडन्यूज देताय ;-)
28 Apr 2012 - 1:38 am | बॅटमॅन
पुष्पा ऽ ऽ मै ठीक हो गया :)
28 Apr 2012 - 1:49 am | यकु
=))=))=))=))=))=))
=))=))
=))
आवरा !!!
28 Apr 2012 - 6:57 am | रेवती
खी खी खी.
28 Apr 2012 - 2:35 am | नेहरिन
I Hate Tears
28 Apr 2012 - 7:00 am | चौकटराजा
राजेश उर्फ जतीन खन्ना यांचे एकोणीसशे पन्नास साला दरम्यान जन्मलेल्या पिढीवर उपकारच आहेत. आबालवृद्धाना आवडणार्या या अभिनेत्याने सर्व प्रकारच्या भूमिका केल्या मग रेड रोज असो किंवा आनंद ! जन्तीन राव बरे होउन घरी गेले ही एक खास समाधानाची बातमी आहेच . जुग जुग जियो काका !
28 Apr 2012 - 10:10 am | सुहास..
28 Apr 2012 - 11:37 am | परिकथेतील राजकुमार
कोण राजेश खन्ना ?
धन्यवाद.
28 Apr 2012 - 12:01 pm | नितिन थत्ते
>>कोण राजेश खन्ना ?
६५-७५ दरम्यानच्या तरुणींचा "परिकथेतील राजकुमार".
>>धन्यवाद.
वेलकम.
29 Apr 2012 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार
चला म्हणजे उद्या आम्ही गचकायच्या आधी आमच्या नावाने पण एक लेख पडण्याचे चान्सेस आहेत म्हणायचे.
29 Apr 2012 - 11:56 am | नितिन थत्ते
स्वयंघोषीत "परा"वर लेख येईल का ते सांगता येत नाही.
तुम्ही आधी आडमिट तर व्हा...
28 Apr 2012 - 8:22 pm | प्रास
काकाच्या हिरोगिरी संपण्यानंतरच्या बर्याच भूमिकांमध्ये उपरोल्लेखित अधोरेखितपणा फारच जाणवला होता. ;-)
काकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली ही चांगली बातमी आहे.
काके, पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!
28 Apr 2012 - 9:37 pm | कौतिक राव
पण आप्ल्या आनन्द ला भेटायला त्याचे बाबूमोशाय आल्याचे काही ऐकले नाही..
:(
28 Apr 2012 - 9:38 pm | कौतिक राव
.
28 Apr 2012 - 9:38 pm | कौतिक राव
-
28 Apr 2012 - 10:16 pm | इरसाल
मानवी कार्पेट वेलकम मिळालेला हा पहिला अभिनेता आहे.
कोणत्यातरी कॉलेजच्या कार्यक्रमात गेला असताना तिथल्या विद्यार्थी/विद्यार्थीनीं नी त्याच्या गाडीपासून ते स्टेजपर्यन्त झोपून त्याला आपल्या अंगावरून चालत जायला लावले होते.(प्रेमापोटी).
29 Apr 2012 - 10:55 am | खटासि खट
राजेश खन्ना यांना बरे वाटू दे..
केसाचा बॉबकट केल्यानंतर त्यांचं सगळं बिघडलंच
29 Apr 2012 - 1:01 pm | बोलघेवडा
राजेश खन्ना यांना बरे वाटू देत.
तसा बघायला गेल तर काका म्हणजे एक अति उदो-उदो झालेला कलाकार वाटतो. त्या काळी लोकांना फ़ारसा काही ओप्शन नसल्यामुळे वर आलेल्या काहि कलाकारांपेकि एक.
30 Apr 2012 - 9:16 am | चिरोटा
राजेश खन्ना यांना बरे वाटू देत.
तसा बघायला गेल तर काका म्हणजे एक अति उदो-उदो झालेला कलाकार वाटतो.
खरे आहे. काकांच्या मध्यम अभिनय क्षमतेच्या करीअर मधून आर.डी./किशोर काढलात तर काय उरेल ? बॉलिवूडची दुनिया ही उदो उदो करणार्या/करुन घेणार्यांचीच आहे.
30 Apr 2012 - 5:48 pm | नितिन थत्ते
ऑ?
>>काकांच्या मध्यम अभिनय क्षमतेच्या करीअर मधून आर.डी./किशोर काढलात तर काय उरेल ?
म्हणजे अमिताभ बच्चन वजा सलीम जावेद असं का?
असो. अधिक अभ्यास करावा लागेल.
1 May 2012 - 4:16 am | अर्धवटराव
काकाचे काहि चित्रपट खरच खुप छान होते.. माझा सर्वात आवडता चित्रपट म्हणजे बावर्ची... आनंद देखील खुप छान. पण बाकी आपण काहि काकाजींचे फॅन नाहि बुआ.
अर्थात, जर सलमान-शहारुख एव्हढी प्रचंड लोकप्रियता मिळवु शकतात तर काकाजींनी काय घोडं मारलय.
अर्धवटराव