या आधी आपण आमच्याबरोबर काही जमातींचा अभ्यास केलात (आधी पंचनामा केलात असे लिहीले होते ) .आज आपण ज्या जमातीवर प्रकाश दिवाकर सोनपितळे टाकणार आहोत, त्या जमातीत सध्यस्थितीत मानव म्हणुन जन्म घेणार्यास किमान एकदा तरी जावे लागते असे सदरहू लेखकांस वाटते, तसे लेखकासं बरच काही वाटते, ऊदा. माझ्या गाडीतला पुसण्याचा कपडा , दर आठवड्याला एक , या क्रमाने ,गायब करणार्याचे, असतील नसतील तेव्हढे कपडे फाडुन चिंध्या कराव्यात , महाप्रचंड तेलकट वड्या मध्ये अर्धे कच्चे शिजलेले बटाटे टाकुन आमची उदर-व्यवस्था बिघडवण्याचे सत्कर्म करण्यार्या वडापाव वाल्याला हात -पाय बांधुन गुदगुल्या कराव्यात, डॉक्टर असुन आयटी कारकुनाशी का लग्न केले म्हणुन वारंवार बायकोला डिवचणार्या, आमच्या, मृदुभाषि, शर्करामुखी सासूबाईंना हत्तीच्या पायी द्यावे ( हिची आई आहे म्हणुन हत्तीच्या, नाही तर डायनासॉर च्या पायी दिले असते. आणी वर मद्राशी पिक्चरच्या राक्षसासारखा ...असो. ता.क. सासुबाईंना मराठी वाचता येत नाही ) , मिटींग च्या नावाखाली सदा न कदा टाईम-पास करणार्या मॅनेजर ला ४० डिग्री च्या उन्हात, अंगात जाड स्वेटर, कानाला मफलर घालुन दिवसभर उभे करावे. आंजावर जिलब्या टाकणार्याला..............असो.
आज ज्या जमाती विषयी आपण बोलणार आहोत, त्या जमातीला रूग्णाची काळजी असते हे लेखक प्रामाणिक पणे मान्य करतो. पण त्याच मुळे काही गमती-जमती होतात हेच सांगण्याचा प्रयत्न, अर्थात या वाक्यामुळे वाचकांच्या लक्षात आले असेलच , ज्यांच्या नाही आले त्यांच्या करिता , ही जमात म्हणजे रुग्णाला भेटायला जाणारे " Visitor " . ही जमात आपल्याला कुठल्याही ईस्पितळात भेटु शकते , पण या जमातीतील चॅम्पियन बनायचे असेल तर आम्ही खाली दिलेल्या या टिपा ..आपण उदाहरण घेत आहोत ते एखाद्या अपघातग्रस्त रुग्णाचे
१ ) सर्वात आधी रूग्ण कुठल्या ईस्पितळा त आहे आणि किमान पक्षी आपल्याला भेटु शकेल याची फोना-फोनी करून माहीती घ्यावी. अपघात आहेच म्हटल्यावर चर्चेला फोनवरच सुरूवात करावी, पहिला प्रश्न, जास्त दारू पिलेला होता का ? ( ईथे आपण क्रिया आणि क्रियापद बदलून ईतर दाखल-ए-कारण करिता वापरू शकता, उदा. हार्ट अटॅक- सिगारेट ओढणे, दमा -पुन्हा सिगारेट ) या प्रश्नाच उत्तर होकारार्थी आल रे आले की लगेच पारा सूरु करावा ' काय राव, त्याला किती वेळा सांगीतले आहे, इतकी नको पित जावु, आम्ही पण पितो आणी टिंब-टिंब भरून पितो. पण किती ही पिलो तरी घरी नीट जातो, आम्हाला नाही कधी अपघात झाला ! " असे सांगुन स्व-कोट्या ची तारीफ करून घ्यावी. मग ज्याच्याशी फोनाफोनी चालु आहे त्यालाच, " आज कुठे बसूयात का ? ई. ई, डिस्कस करून घ्यावे ( पेशंट गेला खड्ड्यात ! ). जर प्रश्नाचे ऊत्तर नकारार्थी आले तर, मग चर्चा वेगळ्या पातळीवर येते, त्यामध्ये, रस्ते, रस्त्यांची दुरा-वस्था, वाढती रहदारी, त्यावर असणारी गर्दी, प्रदुषण, इथून चालु करून गाडी थेट सरकार पर्यंत न्यावी आणि मग ( पुन्हा पेशंट गेला खड्ड्यात ! ) .
२ अ ) ज्या ईस्पितळात आपल्याला जायचे आहे, तिथे जी काही भेटायची ठराविक वेळ दिलेली असते, त्या वेळेस, जग उलटं-पालटं झाले तरी, अजिबात जावु नये. हवे तर खाली स्टाफशी भांडण/ विनंती करून मग जावे , असे केल्याने आपला इस्पितळामधील वट्ट तर साबित होतोच शिवाय अपघातग्रस्त व इतर व्यक्तींसमोर भाव ही मारता येतो. स्टाफ शी म्हणजे स्टाफशी च बोलावे, काम करणार्या मावश्या व सफाई कामगांरासमोर अजिबात शायनिंग करू नये, केल्यास ' गॅस बुकींग करण्यार्या स्त्रिया, बिएसएनएल च्या कॉल सेंटर वाले व मराविम च्या फोनवर असलेले ईसम ' हे सर्व मिळुन तुमचा ईतका अपमान करू शकत नाहीत, तितका यांच्या एका वाक्याने होवू शकतो.
२ ब ) जायच्या आधी , शहाळे किंवा पथ्य असणारे जेवण घेवून जावे, किमान शहाळे तरी घेवुन जावे ( आम्ही एकदा एकाला भेटायला जाताना नेले होते, त्या दिवशी आम्ही त्याकरिता नेलेले ते सत्ताविसावे शहाळे होते याची नोंद घ्यावी.) शहाळे-खरेदीसाठी आपल्याला लांबवर जावे लागणार नाही. हल्ली ईस्पितळाच्या प्रांगणात च शहाळे मिळतात, शिवाय सुट्टे पैसै ही न्यावेत, खर्च होतील याची पुर्ण शाश्वती असते, शहाळे खरेदी शिवाय पार्किंग असतेच.
३ ) पुर्वसूचना : रुग्ण गोळ्या खाऊन झोपलेला असल्यास त्यास खुशाल उठवावे, आणि वर " अरे झोपला आहेस का ? " असे विचारावे. अपघातग्रस्त व्यक्तीकडे पोचल्या-पोचल्या , तिथे तिथेच रहाण्याची ड्युटी करणारा एखादा नातेवाईक असतोच, इथे बर्याच जणांना ' नेमके कसे झाले? ' असा प्रश्न विचारायचा मोह होवू शकतो, पण... त्याच्या कडे व इस्पितळाच्या भिंतींकडे तुच्छपणे पहात. ' हिथे का अॅडमीट केलेत ' अस विचारून सूरूवात करावी. ' इथुन जवळच , माझ्या मित्राचे/मावशीचे/ चुलतभावाचे/चुलत-चुलत भावाचे/मावशीच्या नणंदेच्या भाचीच्या जावयाच्या मामीच्या मुलाचे हॉस्पिटल आहे, तिथे माझी ओळख आहे, चांगली सोय झाली असती, शिवाय बिलात ही !! " असे सांगुन आधीच बिलाच्या भितीने गाळण उडालेल्या पेशंट ची चाळण करावी, वर " माझ्या मित्राला/मावशीला/ चुलतभावाला/चुलत-चुलत भावाला/मावशीच्या नणंदेच्या भाचीच्या जावयाच्या मामीच्या मुलाला ईथेच अॅडमीट केले होते.. जीव गेला बिचार्यांचा, खुप चुकीचा इलाज केला त्यांच्यावर " असे म्हणुन साग्र-संगीत मीठ चोळावे.
४ ) आपण नेलेले पथ्य असलेले , बेचव जेवण, बिस्कीट वा शहाळे थेट (लग्नात जसे वर वा वधुच्या हाताच आहेर देतो तसे ) रुग्णाच्या हातात द्यावे, प्लास्टर ई. ई. ची अजिबात पर्वा करू नये, ते प्लास्टर केवळ संदेश लिहीण्याकरिताच असते. हे झाल्यावर मग शांतपणे " नेमके कसे झाले ? " हे विचारावे. मग त्यावर रूग्ण आधी दहा वेळा सांगीतलेली कथा , पुन्हा एकदा सांगायला सुरूवात करतो, विश्वास ठेवा, दरवेळी सांगताना त्या मध्ये नावीन्य असते, अॅडीशन असते, त्यामुळे आपण बोअर होण्याचा प्रश्न च नसतो.
५) आणी मग आपण आणलेले (बेचव) खाद्य-पदार्थ रुग्णास खावयासं उद्युक्त करावे, तो लाजे -काजे ते आपणांस खावयास ऑफर करेलच, तेव्हा , " नको रे आत्ताच, मिसळपाव/ वडाशॅंम्पल/ मसाला कट डोसा/गरमा-गरम कांदा भजी/ बटर चिकन/ खरपूस साबुदाणा वडा/भेळ/ दाल वडे ...(वा शक्य तितक्या चमचमीत पदार्थ) खावून आलो " असे सांगुन रूग्णाच्या तोडांची चव घालवावी. शिवाय त्यामुळे रुग्णास लवकरात कवकर बरे होवुन कधी एकदा हे पदार्थ खातो असे वाटते. त्यामुळे एका अर्थी आपण त्याची मदतच करतो.
असो ...तुर्तास ईतकेच..लवकरच आमचा , "वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांना भेटावयाला जायच्या आधीची पुर्वतयारी " हा (लिहीण्याआधी ) सुप्रसिध्द झालेला ग्रंथ प्रसिध्द होणार आहे, त्यात आम्ही डायबेटीस ते खोकला ( कोण म्हणत खोकला झालेल्या रुग्णाला भेटत नाहीत ते ? एखाद्या सूंदर मुलीला होवु द्या एकदा मग बघा ;) ) सर्व काही कव्हर करणार आहोत .......आजच कॉपी बुक करा....;)
प्रतिक्रिया
23 Apr 2012 - 6:41 pm | पैसा
=)) =)) =))
=)) =)) =))=)) =)) =))
वाक्यावाक्यात एकेक असला पंच आहे ना! कहर!!
24 Apr 2012 - 9:15 am | प्यारे१
हाण्ण तिच्या मारी...!
तोडून मोडून फोडून...
बाकी स्त्रीपार्टी विजीटर असल्यास तिनं कितपत मेकअप करुन 'विजिट द्यायला' जायचं ते आहे ना आपल्या नवीन पुस्तकात? ;)
23 Apr 2012 - 6:49 pm | श्रावण मोडक
हाहाहा... शत्रूपक्षची आठवण झाली. :)
23 Apr 2012 - 6:53 pm | शुचि
अफलातून!!! =)) =)) =))
23 Apr 2012 - 7:09 pm | सुहास झेले
लैच..... :) :)
23 Apr 2012 - 7:16 pm | स्वाती दिनेश
लै भारी लिहिले आहे,
स्वाती
23 Apr 2012 - 7:18 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त...
तुम्ही एखाद्याचा जीव घ्याल अशाने ;)
23 Apr 2012 - 7:35 pm | कपिलमुनी
आमच्या एका मित्राला कावीळ झाली म्हणून त्याला विश्रांती साठी प्रायव्हेट रूम मध्ये अॅडमिट केले होते ..सन्ध्याकाळी भेटल्यावर कोणाला तरी तिथे "बसायला" सेफ जागा दिसली .. घरी कारण काय सां गायचे आणि रूम कुणाची हे दोन्ही प्रश्न एकदम सुटले.. मग
रात्री त्याच्या सोबतीला जातो असे सांगून आम्ही २-३ नी त्याच्याच रूममधे पार्टी केली ;)
( अर्थात इतर रुग्णांना आवाजाचा त्रास हि होणार नाही याची काळजी घेउन )
23 Apr 2012 - 7:40 pm | अन्या दातार
हाणतंय तिच्यामारी!
23 Apr 2012 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त रे.....!!!
-दिलीप बिरुटे
23 Apr 2012 - 8:29 pm | शिल्पा ब
=)) =))
23 Apr 2012 - 8:46 pm | प्रचेतस
लै भारी.
23 Apr 2012 - 8:53 pm | यकु
अरारारा! लैच जिव्हाळ्याचा विषय!
मस्त धुतलंय.
पण कधीकधी इस्पितळाझ्ड झालेले लोक खरोखर धोका देतात बरं का.
लोकांना ध्यान शिकवायला घेऊन जाण्यासाठी सकाळी चार वाजता स्वत:ची गाडी घेऊन गावभर हिंडणारा एक अवलिया असाच हॉस्पिटलच्या बेडवरुन गुपचूप निघून गेला. मी आधीच्या दिवशी भेटायला गेलो आणि त्यांना नुकताच डोळा लागला होता म्हणून उठवू नका म्हणालो. दुसर्या दिवशी ते उठलेच नाहीत म्हणे! :(
23 Apr 2012 - 9:33 pm | अत्रुप्त आत्मा
निर्वाण... :-D
23 Apr 2012 - 9:59 pm | मृगनयनी
सुहास'जी.... लय भारी!!.. आवडेश!!!! :)
23 Apr 2012 - 10:02 pm | मैत्र
झकास भाऊ...
सगळ्या टिपा एक नंबर आहेतच पण मराविमं चा 'इसम' लै आवडला. हे लोक एकदम इसम या शब्दाला जागणारेच असतात...
23 Apr 2012 - 10:45 pm | प्राध्यापक
एकदम मस्त.....
24 Apr 2012 - 12:00 am | पाषाणभेद
हा हा हा... मारतोय सुहास्या आज!
24 Apr 2012 - 7:08 am | ५० फक्त
' गॅस बुकींग करण्यार्या स्त्रिया, बिएसएनएल च्या कॉल सेंटर वाले व मराविम च्या फोनवर असलेले ईसम ' हे सर्व मिळुन तुमचा ईतका अपमान करू शकत नाहीत, तितका यांच्या एका वाक्याने होवू शकतो.' - सगळ्यात उत्तम वाक्य, आणि पुर्ण लेख तर उत्तमच रे.
24 Apr 2012 - 7:36 am | रेवती
घ्या......हे असं होतय. एरवी हा बुवा करूण कहाणी लिहितो नाहीतर (फक्त) मला त्याचे लिखाण जातीयवादी वाटेल असे लिहितो. म्हटलं कश्याला धागा तरी उघडायचे कष्ट घ्या. तरीही माझ्या पुढच्या धाग्याचे प्रतिसादक गमवायचे नाहीत म्हणून लेख वाचला आणि खरच आवडला. क्रमांक ५ भारी आहे. मी कोणालाही नावे ठेवू शकणार नाही.
माझे नुकतेच लग्न झाले होते आणि नवर्याच्या मित्राची बायको बाळंतपणात गुंतागुंत होवून हॉस्पिटलात अॅडमिट होती. मित्राने आम्हाला बोलावून घेतले. सगळी गंतागुंत ऐकल्यावर मी तिला भेटायला रूममध्ये (खोली म्हणायचे नाही) गेले. तिला बिचारीला फारशी कल्पना नव्हती (याची मला कल्पना नव्हती). तिने विचारल्यावर मी इत्यंभूत वर्णन केले. ती घाबरली. नंतर सी सेक्शन बाळंतपण करून बाळाला आणि तिला वाचवले. मला चूक समजल्यावर लाजिरवाणे झाले.
24 Apr 2012 - 10:50 am | सुहास..
ही ही ही रेवाकाकू ;)
25 Apr 2012 - 5:00 pm | भडकमकर मास्तर
हे राम...
आणि अशी आठवण पुन्हा काढताय इथे?
आंजावरती स्वतःचे काही चुकलेले मान्य करायचे नस्ते ना?...
24 Apr 2012 - 9:20 am | जेनी...
वाचुन समाधान पावल्यासारखं झालं ..:P
24 Apr 2012 - 2:57 pm | ऋषिकेश
:) हा हा हा
24 Apr 2012 - 3:10 pm | टवाळखोर
खूप छान.. अजून एक सल्ला :
रुग्णास काय रोग झाला आहे त्याप्रमाणे आपल्या माहीतीतली काही उदाहरणे पुडी सारखी सोडवावी.. म्हणजे बायपास असेल तर बायपास झाल्यावर २ महीन्या एखादा कसा गचकला.. किंवा कावीळ असेल तर कावीळीत लोक कसे दगावतात.. साधा ताप असेल तर ताप डोक्यात जाऊन वेड कसे लागते याचे रसभरीत वर्णन करावे.. फक्त उगाच जादा उत्साह दाखवू नये नाहीतर आपले वर्णन संपायच्या आत रूग्ण गचकायचा आणि आपले ज्ञान पाजळायला नवीन रुग्ण शोधायला लागायचा
24 Apr 2012 - 4:01 pm | sneharani
मजा आली वाचायला!
=)) =))
24 Apr 2012 - 5:37 pm | स्पंदना
काय लिहु?
आता नवा शब्द शोधायला हवा. सुरवातीच्या शिक्षा प्रकरणा पासुन, ते शेवटी शहाळ्या पर्यंत लेख कसा नुसती लाह्या फुटावीत तसा फुटत गेला , तड तडा तड तड!
24 Apr 2012 - 5:57 pm | स्मिता.
व्हिजिटर जमातीचे अगदी व्यवस्थित गुणधर्म लिहिले आहेत.
हे वाक्य अतिशय आवडले.
25 Apr 2012 - 10:05 am | सूड
हा हा हा !! मस्तच !! आणखी एक जमात असते, तुम्ही काही नवीन वस्तू घेतलीत की यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात . जसं की कोणी गाडी घेतली की यांची कमेंट " त्या अमक्यातमक्याने गाडी घेतली आणि आजारी पडला, माझ्या नणंदेच्या जावेचे मामा पत्रिका बघतात.त्यांनी सांगितलं होतं गाडी घेऊ नकोस, ऐकलंन् नाय !! तुम्ही केलीत का चौकशी कुठे ?"
25 Apr 2012 - 2:21 pm | प्रकाश घाटपांडे
रुग्णाला धीर द्यायच्या ऐवजी घाबरुन टाकणारे 'हितचिंतक' मी व माझा शत्रुपक्षातले च!
23 Sep 2014 - 11:34 pm | एस
स्वॉरी सुहासराव्व! ;-)
24 Sep 2014 - 4:57 pm | प्यारे१
नवे आहात काय मराठी संस्थळांवर स्वॅप्स ?
धागा वर आणू नका बरं म्हटलं की सुप्त इच्छा धागा वर आणा असंच अस्तंय वो!
वाशा हलकं घेईलच, इलेक्शन्स आलेत. ;)
24 Sep 2014 - 6:17 pm | एस
म्हणूनच तर वर काढला धागा! :-)
24 Sep 2014 - 5:11 pm | मृत्युन्जय
आयला. हा धाग कसा सुटला नजरेतुन? लैच भारी आहे.
खासकरुन भेटायला गेलेल्या माणसांना सिमिलर रोग / अपघात झालेले लोक कसे डो़ळ्यादेखत ४-५ दिवसात इहलोकी गेले हे नक्की सांगावे.
25 Sep 2014 - 11:08 am | खटपट्या
अरेरे, एवढा जबरी धागा वाचायचा राहून गेला !!
मस्त !!