कोकणस्थ माणूस मागे का...

आशु जोग's picture
आशु जोग in काथ्याकूट
17 Apr 2012 - 9:56 pm
गाभा: 

फार फार वर्षापूर्वीची गोष्ट, आमचे काका मिलिटरीमधून निवृत्ती घेउन कोकणातल्या आपल्या गावी जाऊन राहीले.
परिस्थिती अशी की बसून खाणे शक्य

कारण अनेक आंबे फणस काजु कोकमाच्या स्वतःच्या बागा.

पण स्वस्थ बसवेना...

घराच्या पुढील बाजूस एक छोटंसं दुकान टाकलं. गिर्‍हाइक येऊ लागलं... लोकांच्या अपेक्षा वाढू लागल्या
मग दुकानात अधिक वस्तु ठेवणे सुरु झाले.

दुध, आइस्क्रीम, कोल्ड ड्रींक सार्‍याच्या एजन्सी घेतल्या.

हे एका बाजूला पण तिथल्या स्थानिक लोकांचं वागणं अजब.

शक्यतो काही काम सांगितलं की चेहेरा वाकडा. केली तर नाखुशीने अगदी छोटीशी नोकरी करायची.
रिकामा वेळ रस्त्यावर उभा राहून, येणार्‍या जाणार्‍याकडे पहात घालवायचा.
गावातली कोणतीही छोटी घटना इथे बातमी होते.

गावात कुठेही जा चार टाळकी कोंडाळं करून उभी असतात.
कोणत्याही लहान सहान गोष्टीवर चर्चा चालू असते. अगदी आज कुणी नवा शर्ट घातला किंवा
नवीन साडी नेसली तरी इथे चौकातल्या चर्चेला उत येतो.

सुरुवातीला आमच्या काकूला गावातल्या लोकांच्या या वागण्याचा बराच मनस्ताप झाला.
पुढे सवय झाली. दुसर्‍याची प्रगती हे इथे पोटदुखीचे कारण बनते.

गावात कुणी नवीन माणूस आला तर सगळा गाव त्याच्याकडे पहात चौका चौकात उभा राहील. आणि नव्या माणसाला निरखत राहील.

अनेक जणांचा दिनक्रमच हा आहे. सकाळी उठायचे रस्त्यावर जाऊन उभे राहायचे.
कंटाळा आला की उभा राहण्याची जागा फक्त बदलायची.

रिकामटेकडे या शब्दाचा अर्थ इथे समजतो.

आमच्या काकांनी इथल्या अनेक मुलांना कामाला लावण्याचा प्रयत्न केला.

धंदा चालू करुन देण्याची, पैसा पुरवण्याची तयारी दाखवली. पण हातपाय हलवणे कमीपणाचे वाटते.

साधी चहाची टपरी टाकणं यात काय अवघड ? ती टाकण्याचा आग्रह काकांनी काही तरुणांना करून पाहीला. पण कुणाचीच तयारी नाही.

शेवटी काकांच्या दुकानासमोर एक भैय्या चहाची गाडी लावतो.

आजकाल इथल्या बागांमधे काम करणारा मजूर बिहारी आहे.

काही नेपाळी लोकही दिसू लागले आहेत.

प्रश्न पडतो
एवढं सगळ असूनही कोकणात राहणारा कोकणी माणूस असा मागे का !

आहे यावर काही उपाय .....

प्रतिक्रिया

अशोक पतिल's picture

17 Apr 2012 - 10:21 pm | अशोक पतिल

काय हे ...., त्यानी डोळस सत्य तेच सांगीतलेय .
+ १ सहमत .

चित्रगुप्त's picture

17 Apr 2012 - 11:01 pm | चित्रगुप्त

त्या सर्वांनी डायोजनीन ची गोष्ट वाचली असावी.

सचिन's picture

17 Apr 2012 - 11:14 pm | सचिन

प्रश्न आणि उत्तर - दोन्हीही लेखकानेच दिले आहे.

छो.राजन's picture

17 Apr 2012 - 11:25 pm | छो.राजन

मला कोकण विषयी माहित नाही, पण मराठी माणसाची स्तिथी काय आहे:
खरे आहे ते.
१. कोकणस्थ काय मराठी माणूस, सध्या तरी जे काय आहे त्यात सुख मानून! राहतो आहे.
२. उठल्या उठल्या, मारवाड्याच्या दुकानातून हिनुस्तान lever ची टूथ पेस्ट वापरून कोप्र्य्वरच्या भैय्या च्या दुकानावर वर चहा घेणार. मग भैय्या कडून कडक इस्त्रीचे कपडे आणणार. शेट्टी कडे न्याहारी करणार. ओफ्फिचे मध्ये उत्तर भारतीय साहेबा कडे हांजी हांजी करणार. दुपारी परत ऑफिस
मधल्या शेट्टी कडे जेवण करणार. रात्री घरी येवून परत पाव भाजी किंवा भुर्जी खाउन झोपायचे.
३.कपडे / मार्केत्तिंग करायला Reliance / गोदरेज / बिग बझार आहेच

जिथे पिकत तिथे विकत नाही.

या विषयावर आत्ताच गेल्या दोन चार दिवसांत इतकी चर्चा झाली असताना तिथे भाग घ्यायचा सोडून इथे परत नव दुकान थाटण्याच प्रयोजन कळल नाही.

मग काही बोललो तर तर लगेच म्हणाल की बघा एक कोकणी दुसऱ्या कोकाण्याचा धागा ही धड टिकू देत नाही. ;)

आता म्हणतेच तसे. थांब.
गणपाला खरच कोकणी असल्याचा अभिमान नाही. (हलके घेणे.)
सतत कार्यमग्न असतो.;)

अँग्री बर्ड's picture

18 Apr 2012 - 10:17 am | अँग्री बर्ड

हाहाहा.. स्पा भाऊ.. बरोबर बोललात.. बाकी त्या दिवशी लकडी पुलावर फास्टर फेणेची ३ पुस्तके अवघ्या ३० रुपयात मिळाली, वाचताना समाधान मिळाले. असो.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Apr 2012 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

जग हे विचारवंतांची कायमच टिंगल उडवत आलेले आहे. तरी लोकांच्या कुजक्या नासक्या प्रतिक्रियांकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे समाजोद्धाराचे कार्य असेच चालू ठेवावेत.

चिरोटा's picture

18 Apr 2012 - 12:12 pm | चिरोटा

आहे यावर काही उपाय .....

काम न करणार्‍या कोकणी तरुणांना कोकणाबाहेर किंबहुना राज्याबाहेर पिटाळणे हाच एक उपाय.

कौतिक राव's picture

23 Apr 2012 - 2:30 am | कौतिक राव

बरोबर..
कम्फर्ट झोन च्या बाहेर पडल्या बिगार देशोन्नती दुर्लभच..

आशु जोग's picture

23 Apr 2012 - 12:10 pm | आशु जोग

अगदी बरोबर

चिरोटा's picture

18 Apr 2012 - 12:12 pm | चिरोटा

आहे यावर काही उपाय .....

काम न करणार्‍या कोकणी तरुणांना कोकणाबाहेर किंबहुना राज्याबाहेर पिटाळणे हाच एक उपाय.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Apr 2012 - 2:24 pm | अत्रुप्त आत्मा

कुंदन's picture

18 Apr 2012 - 2:35 pm | कुंदन

आम्ही ब्वॉ एकाला पुढे आणायचा प्रयत्न करुन बघितला.
आता दुसर्‍याला पुढे आणणार आहे.

भडकमकर मास्तर's picture

23 Apr 2012 - 5:43 pm | भडकमकर मास्तर

अग्गाग्गा .. कुठे गुंतवताय? :)

प्रीती's picture

18 Apr 2012 - 3:39 pm | प्रीती

अरेच्चा!!!.....परत तेच!!!

जो उठतो तो कोकणस्थावरच काय लिहीतो राव!

फक्त कोकणि माणूस नव्हे तर एकंदर मराठी माणूसच आळशी बनला आहे .

आता यावर उपाय येत्या ५ ते १० वर्षात अपोआपच निघेलस वाटत.(पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतात तसच)

अविनाशकुलकर्णी's picture

18 Apr 2012 - 6:23 pm | अविनाशकुलकर्णी

आता तर सारी पिढी आळशी बनत चालली आहे..नेट ..मोबाईल व बैठे काम..
सरकारी नोक~या ...ही प्रमुख कारणे असु शकतिल??..
आज सा~या एम आय डी सी मधे कामगार मिळणे अवघड झाले आहे..
एक वर्ग चंगळ वादात आकंठ बुडाला आहे..
सा~याचे सुक्ष्म परीणाम होत असतिलच समाजावर

मी गेल्या २० वर्षात ४ देशात राहतो आहे. सगळीकडे स्थानिक माणूस / बाई साधे काम करायला तयार नाहीत. बाकीच्या देशा तून कामगार आणले जातात, भले महाराष्ट्रात up / बिहार / चे लोक.अमेरिकेत mexican लोक.

पैसा's picture

18 Apr 2012 - 7:21 pm | पैसा

कोणा तरी केरळी माणसाला सांगूया शोधायला.

आशु जोग's picture

19 Apr 2012 - 8:15 pm | आशु जोग

परा,

>>जग हे विचारवंतांची कायमच टिंगल उडवत आलेले आहे. तरी लोकांच्या कुजक्या नासक्या प्रतिक्रियांकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे समाजोद्धाराचे कार्य असेच चालू ठेवावेत.<<

ते कार्य चालूच राहील. समाजोद्धार आपलं जीवनध्येय आहे

कपिलमुनी's picture

23 Apr 2012 - 4:57 pm | कपिलमुनी

कुणाच्या ??

बापू मामा's picture

15 Sep 2012 - 4:30 pm | बापू मामा

कोकणी माणसातच हा अवगुण नसून वैदर्भिय देखिल अगदी तस्सेच आहेत.

चौकटराजा's picture

15 Sep 2012 - 5:00 pm | चौकटराजा

मी कोकणस्थ ***** आहे . ( उगीच तो शब्द लिहिला तर अटक बिटक व्हायची ! ) मी मागे नाही. माझ्या मागे जो आहे ना त्याच्या मी पुढेच आहे ! शीम्ब्बळ !

दादा कोंडके's picture

15 Sep 2012 - 9:48 pm | दादा कोंडके

बाकी पुढे कोण आहे? ;)

मला वाटत नाही "कोकणस्थ" माणूस मागे आहे !

आत्तातरी कोकणस्थ माणूस माझ्या शेजारी आहे. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Sep 2012 - 11:11 pm | अत्रुप्त आत्मा

को-कणस्थ ??? ;)

कोकणस्थचा धागा सिंधुसागरातून वर कसा आला न कळे

कोकणस्थ - कोकणात राहणारा
जातीशी संबंध जोडू नये