मी आणिक माझ्या तपासण्या

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
7 Apr 2012 - 2:46 pm

परवा रुटीन चेक अप साठी असाच आमच्या फॅमीली डॉक्टरांकडे गेलो होतो. हा आरोग्य विषयक जागरुकतेचा डास मला असा अधून मधून चावत असतो आणि मग मी झपाटल्या सारखा न चूकता, अहोरात्र, अविश्रांत, अविरत (म्हणजे सलग दोन ते तीन दिवस) सकाळचा वॉक, दोरीवरच्या ऊड्या, ३ ते ४ सुर्यनमस्कार (अगदी सुर्यदेवाला मी नक्की काय केलय ते कळायच्या आत आटोपतो) असे तत्सम प्रकार करतो.

डॉक्टरांशी जुजबी गोष्टी झाल्यावर माझ्या प्रकॄती अस्वास्थ्याचे कारण सांगितल्यावर कम्प्लीट बॉडी चेक अप करून घे असा सल्ला उक्ती रुपाने आणि चिठ्ठी रुपाने दिलाने. मीही भक्ती भावाने ती चिट्टी घेऊन "आमच्या येथे सर्व प्रकारच्या चाचण्या करुन मिळतील" अश्या बोर्ड लावलेल्या 'सुरेख पॅथालॉजी' मध्ये गेलो.

काउंटरावर कुणी एक चष्मीष्ट इसम बसला होता. त्याचे पुढे डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी धरली. ती त्याने पाहून न पाहील्या सारखी केली. कदाचित कुठल्याश्या जटील चाचणीत गुंतला असावा. समोरच्या कॉम्प्युटरावर बघत समोरच्या कीबोर्डावर टाईपरायटर सारखा काहीतरी खडकवत होता. एक ५-७ मिनीटे खडखडकम केल्यावर मी दिलेली चिठ्ठी चष्म्यासमोर धरली
"कोण डॉक्टर कामथ का?"
" होय आमचे तीन पिढ्यांचे डॉक्टर आहेत. माझी आजी, माझे काका आणि आता ..."
" ह्या सर्व टेस्ट करायच्या आहेत का ? " त्या ढापण्याला माझ्या घराणेशाहीत रस नव्हता
" होय" मी थोड्याश्या नाराजीने म्हणालो
" बरोबर क्रीएटीनाईन आणि लंग्स च्या टेस्ट्पण करून घ्या."
"क्रीएटी नाईन म्हणजे ? " खर मला ते क्रीएटीव नाव खुप आवडल
"कीडनी प्रोफाईल. बरोबर पोटॅशीयम , युरीक अॅसीड पण करुन मिळतील"
ही नाव मी ८-१० च्या रसायन शास्त्र, जीवशास्त्र ह्या पुस्तकात ऐकली होती. एप्रील मध्ये त्या त्या विषयांचा पेपर झाल्यावर त्यानंतर ती आताच ऐकत होतो. तशी माझी स्मरणशक्ती फोटोजेनीक का काय म्हणतात तशी आहे. म्हणजे बघा ना इतक्या वर्षांनंतर सुद्धा मला विषयांची नाव जशी च्या तशी आठवत होती.
" बर चालेल"
"ही बॉटल घ्या युरीन टेस्ट साठी "
"स्टूल टेस्ट पण करायची का ?" मी पण पक्का तयारीचा होतो
" गरज नाही. सध्या तरी "
" बर लीपीड प्रोफाईल आहे तेंव्हा बारा तास उपास करावा लागेल"
" अरे बापरे बारा तास उपास? पण मला भुक सहन होत नाही हो. थोड कामी नाय चालणार आठ तास वगैरे"
"नाही. बारा तास म्हणजे बारा तास " (लोकपाल विधेयकाच्या कक्षात पंतप्रधान आलेच पाहीजेत अश्या अविर्भावात ठामपणे तो म्हणाला)
बारा तास म्हणजे रामदेव बाबांबरोबर उद्या माझ पण नाव पेपरात येइल का असा मी विचार करत होतो.
"आज रात्री जेवल्या नंतर बरोबर बारा तासांनी तपासणी साठी या आणि येताना बॉटल घेऊन या न विसरता"

त्या रात्री मला भुकेने झोप लागली नाही पण माझ्या अंगात आरोग्य जागरूकतेने ठाण मांडले होते. ठरल्याप्रमाणे मी गजर वाजल्या नंतर तासा भराने उठलो. बारा तास पुर्ण व्हायला अजून अर्धातास बाकी होता. म्हणून मी पेपर वाचला, सकाळचे भविष्य वाचले, शतपावल्या केल्या. तरी मेला तो अर्धा तास संपत नव्हता. भुकेने जीव मेतकुटीला आला होता म्हणून आज रात्री छान तुप घालून मेतकुट भात जेवायच अस ठरवला. पोटातल्या कावळ्यांनी त्याला आवाजी मतदाने अनुमोदन दिले.

ठरल्या वेळेला मी ' सुरेख पॅथालॉजी' मध्ये पोहोचलो. तिथे ढापण्याच्या जागेवर एक तरुणी बसली होती. त्या व्हॅम्पायारच्या चित्रपटात दाखवतात तशी कदाचित संध्याकाळी ती ढापण्याच रुप घेत असावी. तिला कालची चिट्ठी दाखवली आणि बॉटल दाखवली. तिने हात पुढे केला तशी ती बॉटल मी तिच्या हातावर ठेवली. तशी हातावर झुरळ आणिक उंदीर एकदम ठेवल्या सारखी ती जोरात किंचाळली.
" अहो उचला उचला ते. त्या तिथे समोरच्या ट्रे मध्ये ठेवा ते" ती केकाटली
" ओह ओह सॉरी सॉरी " मी आशाळलो.
आता मला कस कळणार की तीने त्या समोरच्या ट्रे कडे हात दाखवला का हात पुढे केला ते. तरी बर तीने ओंजळ नाही पुढे केली ते नायतर काहीतरी भयानक प्रसंग त्या ठीकाणी उद्भवला असता. लहान पणा पासून मी कामात तसा चटपटीत आहे . कूणी काही सांगितल की मी लगेच ते अमलात आणतो. पण त्यामुळे कधी कधी अशी अवस्था होते.
" काल रात्री किती वाजता जेवलात"
" रात्री साडे नऊ वाजता. काल सारेगमपात तो वैभव मांगले काय सुरेख गायला ना"
" तर मग पाच मिनीट थांबा" तीने सरळ माझ्याकडे दुर्लक्ष्य केल. कदाचित मघाचा राग काढला असावा. असो.
" चला तुमचा नंबर आला. तेथे आत जाऊन बसा"
त्याप्रमाणे मी ठरल्या जागेवर जाऊन बसलो.
आत दुसर्या एका मुलीने मला हाताची बोट घट्ट वळायला सांगितली. त्याप्रमाणे मी हाताची मुठ घट्ट वळून घेतली आणि त्या मुलीने लगेच एक रबरी पट्टी हाताला घट्ट बांधून घेतली. आणिक हाताच्या अंगठ्याने दाबत आता कुठची नस घ्यावी ते तपासले. तसा मी धष्ट्पुष्ट असल्याने तिला थोडा वेळ लागला पण अखेरीस तिला मनाजोगती शीर मिळाली असावी त्यावर तिने कापसाने काही तरी चोपडले आणि खुस्स करून सुई खुपसली आणीक रक्त-उपासणी सुरू केली. एक नळी भरुन घेतल्यावर दुसरी नळी लावली आणिक मग तिसरी. नळावर पाणी भरायला आलेली महीला अचानक पाण्याची मोठी धार लागल्यावर खुशीत यावी आणि बादल्या, घागरी, हंडे, पातेली भरुन घ्यावी तशी ती नळ्या भरुन घेत होती (इथे मी दुखल्या मुळे ओरडतो होतो आणि बाहेर बसलेले रक्ततपासू (रक्त तपासायला जे येतात ते रक्ततपासू आणि जे रक्त तपासतात ते रक्त पिपासू ) हसत होते ही बिन महत्वाची गोष्ट सांगत नाही.) शेवटी सर्व रिकाम्या नळ्या भरल्यावर तिने सुई काढली आणि हात दाबून धरायला सांगितला. मग उरलेले रक्त तिने एका काचेच्या चकती वर घासून घेतले आणि त्या सर्व नळ्या बंदकरून गुळ्ळ गुळ्ळ असा आवाज करुन घासून पुढे पाठवून दिल्या आणि माझ्या हाताव्र एक बारीकशी पट्टी लावली. ही रक्तपिपासू मंडळी रक्त काढताना सढळ हाताने रक्त काढतात आणि मग मलमपट्टी करताना कंजुषी कश्या साठी बर करतात?

" संध्याकाळी ६ ते ८ मध्ये रीपोर्ट मिळेल"

ते ऐकायला मी थांबलो नाही. तडक उडप्या कडे जाऊन उपमा रवा मसाला ऑर्डर केली आणि ते येइपर्यंत उपमा-शिरा मिक्स आणि फिल्टर कॉफी झोडली. मग रवा-मसाल्या नंतर पुन्हा एक कॉफी. गेलेल रक्त भरुन नको का काढायला?

ठरल्या वेळेत मी त्या सुरेख रक्तउपासणी केंद्रात गेलो (ह्यालाच मी आधी सुरेख पॅथेलॉजी म्हणत होतो हे जागरुक वाचकांनी ओळखले असेलच) आणि माझा रीपोर्ट मागितला.
" ३७५० रुपये"
" किती? "
" तीन हजार सातशे पन्नास"
" इतके"
"हो"
" लिपीड प्रोफाईल ८०० , क्रीएटीनाईन ७००, ब्लड ऊरीन शुगर ३०० , लंग्स प्रोफाईल ....."
ह्या सर्व प्रोफाईल मध्ये माझा आर्थिक प्रोफाईल मात्र भरडून निघाला होता. म्हणजे एक नळी भर रक्त साधारण १२०० रुपयाला पडले. पडले म्हणजे शब्दशः पडले. रक्त हे किमती आहे म्हणतात ते उगाच नाही.

" अभिनंदन तुम्हाला काही झालेल नाही. फक्त बॅड कलोस्ट्रोल थोड वाढलय. रोज ४५ मिनीट ब्रीस्क वॉक घ्या"
काही कस झाल नाही लोको. माझ तीन नळ्या रक्त गेल, ३७५० रुपये गेले, तोंडावरच तेज गेल,चेहेर्याची रया गेली,शरीराचा तजेला गेला आणि तुम्ही रक्त पिपासू, रक्त उपासू लोक म्हणता मला काही झाल नाही. हे म्हणजे अगदी टू मच. त्यांनी माझ्या पडलेल्या खांद्यावर एक थाप मारली. तो रीपोर्ट घेऊन मी आमच्या फ्यामीली डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी पण मला काहीच झालेल नाही म्हणून माझ्या पडलेल्या खांद्यावर थाप मारली.

आजकाल माझ आरोग्य जागरुकतेची व्याख्या ही चांगल चुंगल खाण आणि निर्धास्त झोपण (ह्यालाच हिंदीत घोडे बेचके सो जाना म्हणतात आणि मराठीत गाढवासारख झोपण म्हणतात) अशी संकुचित झालेली आहे. त्यातूनही नकळो तो रोग्य विषयक जागरुकतेचा डास मला कधी चावलाच तर मी स्वत:चा खांदा थोपटून घेतो आणि म्हणतो 'बेट्या आल ईज वेल"
*********************************************************************************************************
समाप्त

चु भु द्या घ्या

औषधोपचारविरंगुळा

प्रतिक्रिया

स्पा's picture

7 Apr 2012 - 3:08 pm | स्पा

=))
=))
=))
=))

फक्कड जमलाय

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Apr 2012 - 4:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

+१
मजेदार लेख आहे. आवडेश !!!
काही काही पंचेस एकदम भारी...

दादा कोंडके's picture

7 Apr 2012 - 3:16 pm | दादा कोंडके

मजेदार अनुभव.

मागच्या वर्षी नवीन कंपनीत रुजू होण्याआधी अशाच काही टेस्ट करायला सांगितल्या होत्या. बंगळूरच्या एका टोकाहून दुसर्‍या टोकाला बाईक दामटवत भर उन्हाळ्यात पॅथोलॉजी लॅब मध्ये पोहोचल्यावर काउंटर वरच्या (सुबक ठेंगणी) तरूणीनं एक प्लास्टीकचा फ्लास्क दिला आणि अगदी बोटांनी किती मिलीलिटर पाहिजे ते माप पण दाखवलं. मला भयानक एंबेरेसिंग झालं होतं. कधी एकदा तिथून पळून जाउ असं वाटत होतं . पण तीनं दाखवलेलं माप घामाघूम अवस्थेत भलतच जास्त वाटल्यानं पाणी पिउन थोडावेळ तीथंच बसावं लागलं होतं! :)

त्या कंपनीत काही गेलो नाही पण सगळ्या चाचण्या फुकटात करून घेतल्या. ;)

राजघराणं's picture

7 Apr 2012 - 3:18 pm | राजघराणं

माझी पॅथोलॉजी लॅब आहे.

आपला रक्तपिपासू

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2012 - 3:48 pm | अत्रुप्त आत्मा

@आपला रक्तपिपासू >>> डॉक्टर...हाच आयडी घ्या ना मग...? ;-)

सुधीर मुतालीक's picture

7 Apr 2012 - 11:36 pm | सुधीर मुतालीक

म्हंजे, जनांचे स्टुल आणि युरीन हे तुमचे ब्रेड बटर !!!

मुक्त विहारि's picture

7 Apr 2012 - 3:23 pm | मुक्त विहारि

मस्तच...

मराठी_माणूस's picture

7 Apr 2012 - 3:35 pm | मराठी_माणूस

चाचणीत काहीच निघाले नाही म्हणून विनोद सुचतोय

रणजित चितळे's picture

7 Apr 2012 - 3:54 pm | रणजित चितळे

मस्त

बंगळूरला कोठे असता. मी पण सध्या बंगळूरलाच आहे.

पैसा's picture

7 Apr 2012 - 3:56 pm | पैसा

एकदम खुसखुशीत!

विसुनाना's picture

7 Apr 2012 - 4:20 pm | विसुनाना

मजा (-मझा असे वाचावे) आला.

सर्वसाक्षी's picture

7 Apr 2012 - 5:07 pm | सर्वसाक्षी

अनेकदा अशा तपासण्यांमधे नसलेले रोग असल्याचे सांगुन लुटले जाते. माझ्या माहितीत असे लोक आहेत ज्यांना 'तात्काळ अ‍ॅडमिट व्हा, उद्या सकाळीच अँजिओग्राफी करुन टाकु. ८० % टक्के ब्लॉकेज आहे, कधीही काहीही होऊ शकते' असे सांगितले गेले होते. वर 'जायच तर जा पण काहीही कधीही होऊ शकतं, त्यापेक्षा वेळीच ऑपरेशन केलेले बरे' असा सल्ला दिला जातो आणि पेशंटला शक्यतो 'कुलिंग पिरियड' मिळु देत नाहीत. मात्र माझ्या परिचयाची ती व्यक्ति तशीच बाहेर पडली आणि दुसर्‍या दिवशी एशियन हार्ट मध्ये एका परिचित कार्डिओलॉजिस्टला भेटली आणि त्याने काहीही झालेले नसल्याचे ठामपणे सांगितले. ती व्यक्ति अजुनही मजेत व ठणठणीत आहे.
अनेकदा आवश्यक नसलेल्या तपासण्या करायला सांगितल्या जातात. मिटर चालु.

अनेकदा नामांकित पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये तिथे बसविलेल्या सर्व यंत्रांद्वारे होणार्‍या सर्व तपासण्या सक्तिने करतात. त्याशिवाय पैसे वसूल कसे होणार?

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर पहिला प्रश्न 'बील कंपनी देणार का/ मेडिक्लेम आहे का? ' असा असतो. रोगाचे निदान/ तपासण्या व उपचार त्यानुसार ठरतात.

तुम्ही भाग्यवान आहात,सुटलात.

यकु's picture

7 Apr 2012 - 6:17 pm | यकु

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

एवढं भारी लिहीता मग तुम्ही 'मूखदूर्बळ' कशाने हो ? ;-)

शिल्पा ब's picture

8 Apr 2012 - 4:32 am | शिल्पा ब

अहो, ते मुखदुर्बळ आहे टंकदुर्बळ नैत!!

असो, लेख मजेदार आहे.

तिमा's picture

7 Apr 2012 - 7:46 pm | तिमा

बिल फुगलेले वाटते. संपूर्ण चांचण्या साधारण २०००/- मधे करुन मिळतात, व रक्त फक्त एकच नळी भरुन काढले जाते, जेवणानंतर फार तर परत एकदा.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Apr 2012 - 1:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे

रक्त फक्त एकच नळी भरुन काढले जाते, जेवणानंतर फार तर परत एकदा.

साहेब, माझी कंपनीतून तीनदा मेडिकल झाली आहे. मला काही खर्च आला नाही, पण त्यांनी दर वेळेला किमान ४-५ सिरींज भरून रक्त काढले आहे. शेवटी मला तर संशय आला होता की दर डोई २-३ सिरींज रक्त ज्यादा काढून विकतात की काय ;-)
तीनही मेडिकल्स मुंबईत रणबक्षी लॅब (साधारणत: ती कंपनी रॅनबॅक्सी म्हणून ओळखली जाते) मध्ये झाल्या होत्या.

तिमा's picture

9 Apr 2012 - 8:33 pm | तिमा

लॅबचे नांव उघड केल्याबद्दल धन्यवाद. आता त्या लॅबवर फुली .

चिगो's picture

7 Apr 2012 - 8:11 pm | चिगो

एकदम खुसखुशीत लेख जमलाय, राव.. रक्त गेल्याने (मनातील) विनोदी सेल्स वाढले आहेत वाटतं.. ;-)

टकाटक लेख.. लगे रहो !

मजेशीर लेखन
नुकताच अनुभव घेतला गेला आहे

रेवती's picture

8 Apr 2012 - 12:53 am | रेवती

लेखन आवड्या.
मजेदार.

कौशी's picture

8 Apr 2012 - 3:42 am | कौशी

लेखन आवडले..

आनंद आहे, वर मराठी माणसानं लिहिल्याप्रमाणे काही निघालं नाही म्हणुन विनोद सुचतोय, काही निघाल्यानंतर विनोद सुचला असता तर अजुन जास्त कौतुक वाटलं असतं,

मजेशीर लिखाण.

चौकटराजा's picture

8 Apr 2012 - 9:52 am | चौकटराजा

ते ऐकायला मी थांबलो नाही. तडक उडप्या कडे जाऊन उपमा रवा मसाला ऑर्डर केली आणि ते येइपर्यंत उपमा-शिरा मिक्स आणि फिल्टर कॉफी झोडली. मग रवा-मसाल्या नंतर पुन्हा एक कॉफी. गेलेल रक्त भरुन नको का काढायला?
मूख्दुर्बल सायबा, ह्यी वर दिल्याली आमची क्वाप्पी तुमी काय म्हून करून र्‍हायले बॉ ? .
आपल्या रक्त तपासणीचा पंचनामा संध्याकाळी ६ वाजता असतो. सबब हा दिवस होटेलमधे खायची हुक्मी संधी. कारण सकाळच्या लिपस्टिक
वाल्या सुंदरीने पोटभर नाष्टा करा असे बजावलेले असते ना ?

३७५० म्हण्जे खूपच कमी.यात स्ट्रेस टेस्ट,ई सी जी आणि जठराची कसली तरी टेस्ट करण्यासाठी माझ्या आईंना अदमीत केल होत.२दिवसान्च दवाखान्याच भाद,तपासण्यांचे पैसे,रात्रभर दवाखान्याच्या त्या औशधि वासात तळमळत झोपण्याचे ३५००० झाले.तुम्हाला सुरेख पाथोलोजी म्हण्जे खूप साद्धा दवाखाना सांगितला होता डॉक्टरांनी.आम्हाला जहांगीरमध्ये जायला सांगितलं होत.आणि एवढं करूनही काहीच निघाल नाही.छातीत दुखण्याच कारण आहे असिडीती.

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2012 - 1:18 pm | प्रभाकर पेठकर

मस्त, खुसखुशीत लेख. अभिनंदन.

१२-१४ तास उपाशी राहून रक्तशर्करा तपासल्यावर, जेवल्या नंतर पुन्हा २ तासांनी रक्तशर्करा तपासून घ्यावी. ते जास्त फायदेशीर ठरते.

चाळीशीच्या पुढे दरवर्षी आणि काही समस्या/व्याधी असेल तर दर सहा महिन्यांनी तपासण्या कराव्यात.

श्रीयुत संतोष जोशी's picture

8 Apr 2012 - 6:23 pm | श्रीयुत संतोष जोशी

""""""तरी बर तीने ओंजळ नाही पुढे केली ते """"""

लै म्हंजे लैच भारी

Pearl's picture

8 Apr 2012 - 9:52 pm | Pearl

हा.हा.. छान अनुभवकथन. चांगला प्रयत्न आहे.
आणि एवढ्या चाचण्या करून 'ऑल इज वेल' रिपोर्ट मिळाल्याबद्दल अभिनंदन.
>>नळावर पाणी भरायला आलेली महीला अचानक पाण्याची मोठी धार लागल्यावर खुशीत यावी आणि बादल्या, घागरी, हंडे, पातेली भरुन घ्यावी तशी ती नळ्या भरुन घेत होती >>
हे खूप आवडलं :-)

मूखदूर्बळ's picture

9 Apr 2012 - 2:44 pm | मूखदूर्बळ

धन्यवाद मंडळी

प्रीत-मोहर's picture

9 Apr 2012 - 3:09 pm | प्रीत-मोहर

लेख आवडेश !!!

मृत्युन्जय's picture

9 Apr 2012 - 10:20 pm | मृत्युन्जय

पर्वा अर्धाच वाचुन झाला होता. आज पुर्ण वाचला. झ्याक जमला आहे एक्दम.