गाभा:
अगदी अलीकडे माझे पंढरपूरला जाणे झाले. तिथे पांडुरंग व रुक्मिणी माता एकत्र का नाही आहेत ? कारण काय आहे ?
दोघांचाही मुर्ति एकत्र नाहि आहेत. ह्या बद्दल नक्की काय कथा आहेत? आणी आषाढी व कार्तिकीला त्या एकत्र आणुन पुजा करतात ह्या मागे काय कथा आहेत?
अजुन एका श्लोका मध्ये पांडुरंगाचा उल्लेख रकुमाई वल्लभा, राईच्या वल्लभा असा उल्लेख आहे. राई म्हणुन जो उल्लेख आहे तो पांडुरंगाच्या पत्निचा असावा का ? असल्यास त्यांची मुर्ति पंढरपूरला का नाही आहे ?
तिथे मी खुप जणाना विचारल पण प्रत्येळ वेळी वेगवेगळी ऊत्तर मिळाली.
म्हणुन हा धागा काढला आहे.
उत्तराची वाट बघतो आहे.
अजुन एक : चंद्रभागा नदीची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. हे बघुन अतिशय वाईट वाटल. मन काही वेळ खुप उदास झाल होत.
प्रतिक्रिया
21 Mar 2012 - 3:57 pm | चिंतामणी
डॉन
21 Mar 2012 - 4:26 pm | गवि
तुमच्या लग्नाला किती वर्षं झाली?
21 Mar 2012 - 4:43 pm | निश
गवि साहेब, तुम्हि तर इतिहासा पासुन भविष्य काळा मध्ये विहार करणारे सरस्वतीचा वरदह्स्त असणारे आहात. मग तुम्हाला लग्न होउन किती वर्षं झाली हे माहीत असेलच.
असो पण वरील धाग्याच आपल्याला उत्तर माहीत असल्यास जरुर सांगा.
आपण जर ह्या देवस्थळांबद्दल लेख माला लिहिलीत तर वाचायला आवडेल मला.
तुमचे लेख मस्त असतात.
21 Mar 2012 - 4:46 pm | सूड
त्यांच्या प्रश्नातच उत्तर आहे, शोधा म्हणजे सापडेल.
21 Mar 2012 - 5:00 pm | परिकथेतील राजकुमार
आपण कशाला उगाच लोकाच्या भानगडीत नाक खुपसायचे ?
21 Mar 2012 - 5:03 pm | ५० फक्त
अगदी बरोबर हो, पण ही तर देवांची भानगड आहे.
21 Mar 2012 - 5:17 pm | परिकथेतील राजकुमार
अशाच देवाच्या भानगडीत पडून हनुमानाचे काय झाले हे बहूदा धागा लेखक विसरले असावेत.
21 Mar 2012 - 5:31 pm | निश
पण म्हणुनच हनुमाना ला देवांकडुन अमोघ वर मिळाले हे ही आपण विसरता.
21 Mar 2012 - 6:33 pm | ५० फक्त
अरे तसं नाही हो ते, ते ज्यांच्या भानगडीत पडले ती माणसंच होती, हनुमान भानगडीत पडले आणि मग त्यांना देवत्व आलं.
पण तरी सुद्धा कुणाच्या भानगडीत पडु नये हे मात्र खरं
21 Mar 2012 - 8:41 pm | गणपा
'देवांची भानगड' ???
अरे काय चालवलं काय आहे?
आम्ही हिंदु सहिष्णु म्हणुन तुम्ही स्वतःला पुरोगामी म्हणवणारे लोकं आमच्या देवांबद्दल काय वाट्टेल ते बरगळता.
जर धमक असेल तर इतर धर्मियांच्या भावनेला हात लावून दाखवा.
(संतप्त) गणा
22 Mar 2012 - 3:28 am | Nile
तुम्ही फक्त कोणता धर्म ते सांगा, आम्ही हात काय पाय लावून दाखवू.
(पण मग नंतर आमचे प्रतिसाद उडवू नका म्हणजे झालं!!)
(टंकून ग्रस्त)
22 Mar 2012 - 1:03 pm | निश
गणपा साहेब, देवांची भानगड तर भानगड, उलट आपल्या धर्माच हे महत्त्वाच वैशिष्ट आहे की, आपण देवाला सखा, मित्र मानल आहे. धरला पंढरीचा चोर किंवा देव एक पायान लंगडा ही आणि अशी कीत्येक पद, गाणी, गवळण प्रसिध्द आहेत.
तस ही देवाला अहो देवा नाही तर अरे देवा म्हणतोच ना.
21 Mar 2012 - 5:08 pm | स्पंदना
राईच्या ? की राहीच्या? रुक्मिणीच दुसर नाव राही ना? दुसरी बायको नसावी पांडुरंगाला.
21 Mar 2012 - 5:14 pm | निश
aparna akshay madam, राहीच्या वल्लभा हेच बरोबर असाव बहुतेक
21 Mar 2012 - 5:33 pm | विनायक प्रभू
आयला तिरुपती ला पण असाच काही तरी राडा आहे.
परा म्हणतो त्या प्रमाणे आपण कशाला उगाच लोकांच्या फाटक्यात पाय घालावा?
21 Mar 2012 - 5:35 pm | निश
विनायक प्रभु साहेब, अहो देव हे आपलेच असतात. देवा सारखा सखा सार्या दुनियेत नाही.
21 Mar 2012 - 5:41 pm | विनायक प्रभू
सखा म्हणजे मित्र.
आपण आपल्या मित्राच्या पर्सनल गोष्टीमधे लक्ष घालत नाही.
परा ला विचारा.
इतक्या दिवसात त्याचे कुठल्या बँकेत(सहकारी की नॅशनाइज्ड) खाते आहेत हे पण विचारले नाही.
22 Mar 2012 - 10:51 am | परिकथेतील राजकुमार
पोस्टात होते फक्त खाते. ते पण मागच्या ठाणे भेटीत भिकेला लागले. ;)
बाकी निश तुम्हाला याचे अगदी योग्य उत्तर हवे असेल तर आमच्या तात्याला विचारा. एका फटक्यात तुमच्या सर्व शंकाचे निरसन होऊन जाईल. तात्या म्हणजे तात्या अभ्यंकर, मिसळपावचे संस्थापक.
21 Mar 2012 - 6:27 pm | चौकटराजा
निश , याचं उत्तर तुम्हाला विसूभाउ बापट देतील, खात्रीने. मग ते तुम्हीच इथे टाका. ते माझे फेसबुक मित्र आहेत. ते सर्च मधे तुम्हाला सापडतील.
21 Mar 2012 - 7:06 pm | निश
चौकटराजा साहेब , विसुभाउ बापट म्हंजे कूटुंब रंगलय काव्या त मधले ना.
अहो कूटुंब रंगलय काव्यात मी एक वेळा नाही तर तब्बल ८ वेळा बघितल आहे मागे. अतिशय मस्त.
खुप म्हंजे खुप सुंदर होत कूटुंब रंगलय काव्यात .
आपण स्वता तेच नाही आहात ना.
22 Mar 2012 - 7:09 am | चौकटराजा
विसूभौ माझ्यापेक्शा विद्वान, उत्साही व गबदुल आहेत. माझे खरे नांव प्रोफाईल वर पहा मग फेसबूक वर जा तिथे मला शोध , त्यात फ्रेंडलिस्ट मधे
गोल गोल विसूभौ चा फोटो दिसेल. आता वात्रट पणा पुरे !
21 Mar 2012 - 6:42 pm | निश
चौकटराजा साहेब, नक्की करतो तस आणी धन्यवाद
21 Mar 2012 - 6:47 pm | धन्या
मी ऐकलेली/वाचलेली कथा/दंतकथा काहीशी अशी आहे:
एके दिवशी राधा श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेली असताना तेथे रुक्मिणी येते. राधेला कृष्णाच्या मांडीवर बसलेली पाहून रुक्मिणीला राग येतो आणि ती द्वारका सोडून पार अगदी दिंडीरवनात (सध्याचे पंढरपूर) येते. श्रीकृष्ण तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठोपाठ येतात. या दिंडीरवनातच पुंडलिक नावाचा एक आधी उनाड असलेला परंतू नंतर चांगला मार्गाला लागलेला तरूण आपल्या झोपडीत आई-वडीलंचे पाय चेपत बसलेला असतो. कुतुहलाने श्रीकृष्ण झोपडीच्या दाराशी येऊन आत डोकावतात. पुंडलिकाला आवाज देतात. पुंडलिकाला आपल्या आई वडीलांच्या सेवेत खंड पडू दयायचा नसतो म्हणून तो आतून एक वीट बाहेर फेकतो, आणि आपली आई-वडीलांची सेवा पुर्ण होईपर्यंत श्रीकृष्णाला त्या विटेवर उभा राहायला सांगतो.
ही कथा "युगे अठ्ठावीस वीटेवरी उभा" या ओळीस तसेच पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणी एकमेकांपासून दुर असण्यास आधारभूत आहे.
ते जाऊद्या, आपण श्रीमद्भगवद्पुराण तसेच महाभारत कथा वाचतो, ऐकतो. त्यामध्ये द्वापारयुग संपत असताना आणि कलीयुग सुरु होत असताना यादवांचे आपापसात घनघोर युद्ध होऊन यादव कुळाचा समुळ नाश होतो असे ऐकतो. (यादवी या शब्दाची उत्पत्ती इथेच आहे). अगदी श्रीकृष्णही व्याधाचा बाण अंगठयाला लागून "निजधामाला" जातात. मग जर श्रीकृष्ण निजधामाला जातात हे खरं मानलं तर श्रीकृष्ण दिंडीरवनात रुक्मिणीच्या शोधात दिंडीरवनात येतात आणि पुंडलिक त्यांना इथेच वीटेवर उभे राहायला सांगतो ही कथा दंतकथा आहे. किंवा पंढरपूर आख्यान खरं मानलं तर श्रीमद्भगवद्पुराण तसेच महाभारतामध्ये असलेली श्रीकृष्ण निजधामाला गेले म्हणून जे लिहिलं आहे ते खोटं आहे.
कारण एकाच व्यक्तीच्या जीवनाचे दोन वेगवेगळे शेवट असूच शकत नाहीत. बरोबर ना?
जाणकारांकडून याबद्दलची मते वाचायला आवडतील.
21 Mar 2012 - 6:54 pm | निश
धन्या साहेब, खरच धन्यवाद तुमचे दिलेल्या माहिती बद्दल.
हिच माहिती आम्हाला तिथल्या एका दुकानदारान दिली होती.
21 Mar 2012 - 7:01 pm | धन्या
मी माझ्या प्रतिसादात दोन परस्परविरोधी गोष्टी लिहिल्या आहेत. माझा अंदाज चुकीचा नसेल तर दुकानदाराने तुम्हाला पुंडलिक कथा सांगितली असेल.
मी लिहिलेल्या श्रीकृष्णाच्या निजधामाला जाण्याच्या मुद्दयाचं काय? :)
21 Mar 2012 - 7:08 pm | निश
हो पुंडलिक कथाच सांगितली
21 Mar 2012 - 7:13 pm | धन्या
समोरच्या व्यक्तीच्या अडचणीच्या वाटणार्या मुद्दयांना फाटयावर कसं मारावं हे तुमच्याकडून शिकावं. :)
21 Mar 2012 - 8:19 pm | सेरेपी
अहो तो देव होता (?) ना? त्याला पॅरलल युनिवर्सेस तयार करणं कठीण होतं का? काय तुम्ही लोक? देवाधर्माच्या गोष्टींवर कुशंका काढता.
22 Mar 2012 - 10:45 am | निश
तस नाहि धन्या साहेब.
खर तर तुमच दुसर म्हणणही बरोबर वाटत आहे पण मन साशंक आहे.
कारण आपल्या संत जनाना पांडुरंगाने स्वता येउन मदत केल्याचे दाखले वारकरी संप्रदायात आहेत.
22 Mar 2012 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार
धन्याशेठ अतिशय माहितीपूर्ण आणि सुरेख प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
ह्याच अनुषंगाने गेले कित्येक वर्ष छळत असलेला प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला आहे. तो म्हणजे 'नक्की श्रीकृष्ण किती होते?' माझ्या माहितीप्रमाणे* गोकुळातला एक वेगळा, गीता सांगणारा एक वेगळा, कंसाला मारणारा एक वेगळा इ. इ.
ह्यावर देखील जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
*माहिती आणि ज्ञान ह्यातला फरक समजून घ्यावा.
21 Mar 2012 - 7:17 pm | पांथस्थ
विठ्ठला विषयी माहिती हवी तर दुर्गा भागवतांच्या "पैस" ह्या पुस्तकातील "पंढरीचा विठोबा" हा लेख वाचा. सर्वोत्तम आहे.
21 Mar 2012 - 8:22 pm | चिरोटा
प्रतिभा रानडे ह्यांच्या 'ऐसपैस गप्पा' ह्या पुस्तकात दुर्गाबाईंनी ह्याचे सविस्तर उत्तर दिले आहे. पुस्तक आता जवळ नाही. केव्हातरी नंतर लिहिन.
22 Mar 2012 - 12:27 am | JAGOMOHANPYARE
विठोबा आणि लखुबाई ( रखुमाई ) या दोन भिन्न देव देवता होत्या, त्यांच्यात पती पत्नी संबंध नंतर भक्तानी जोडला.
संदर्भ-- असुरवेद पुस्तक ( लेखक संजय सोनावणी)
http://sanjaysonawani.blogspot.in/2011/07/blog-post_04.html
22 Mar 2012 - 8:32 am | प्रचेतस
सोनवणींचे उल्लेख नका हो देवू.
23 Mar 2012 - 1:13 am | अर्धवटराव
सोनवणेंनी छान थेअरी मांडली आहे.
धन्यवाद.
अर्धवटराव
22 Mar 2012 - 2:09 am | प्राजु
माझ्या मते राही आणि रखुमा बाई.. या दोन पत्नी होत्या विठ्ठलाच्या.
राही रखुमाबाई राणी या सकळा.... अस आहे आरतीत.
नक्की माहित नाही.
आणि विठ्ठलाच्या भवती अखंड भक्तांचा मेळा असल्याने.. रुक्मिणी चिडली आणि 'तुम्ही बसा तुमच्या भक्तांसोबत..' असे म्हणून दुसरीकडे निघून गेली म्हणून वेगवेगळी मंदीरे आहेत .. अशी गोष्ट लहानपणी आजी सांगायची. खरे खोटे तो विठ्ठलच जाणे. :)
22 Mar 2012 - 11:45 am | यकु
प्राजुताई, माझी पण आजी हीच गोष्ट सांगायची !
22 Mar 2012 - 11:47 am | पैसा
हे राधा या शब्दाचं रूप आहे का?
22 Mar 2012 - 3:33 pm | किचेन
राही रखुमाबाई हे रखुमाई राहते या अर्थाने घ्यावं का?
मला काय वाटत..पुंडलीकाने वीट फेकली आणि त्यावर पांडुरंग उभे राहिले....रुखामैला वाट बघून आघून कंटाळा आला.शेवटी ती तुम्ही राहा इथे उभे ,मी आलेच थोडी शॉपिंग करून म्हणून बाजारात गेली असेल.आणि नंतर तिला परतण्याच भानच राहील नसेल...मग रुखमाई मंदिर जिथे पूर्वी मार्केट होत अशा ठिकाणी बांधल असेल.
देव पांडुरंगा माफ कर. _/\_
23 Mar 2012 - 2:42 am | विश्वनाथ मेहेंदळे
स्वतः एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीची टिंगल करता ? कसे करवते तुमाच्याने हे ? स्त्री आहात तर स्त्रीच्याच बाजूने बोला. नाही तर तुम्ही डु आयडी असल्याची जाहिरात करतो की नाही ते बघा. प्लस स्पेशल भुतावळ सोडेन तुमच्या खरडवहीत खरडी लिहून लिहून हैराण करायला.
मिलियन स्पायडर(मॅन)
23 Mar 2012 - 1:12 pm | किचेन
माफी असावी.टिंगल करण्याचा आजीबात हेतू नव्हता.साधारण नववीत असताना पहिल्यांदा पंढरपूरला गेले होते.तेव्हा अशी वेगवेगळी मंदिर का हा प्रश्न नाही पडला.पण गेल्या पालाखीपास्न हाच प्रश्न डोक्यात आहे.वेगळी मंदिर का? आमच्या देवघरातही विठोबाची मूर्ती आणि रुखामैची मुती एकत्र नाही.वेगवेगळी आहे.
तेव्हापासून माझ्या परिन मी विचार होत.एकदा असंच आम्ही दोघ बाहेर गेलो असताना तुल्शिबागेजवळ एका मित्राची वाट बघत होतो.तेव्हा मी त्याला तू थांब इथे वाट बघत मी आले भाजी घेऊन अस म्हंटल. नंतर घरी गेल्यावर राखुमैच असंच झाल असेल का हा विचार डोक्यात आला.
तुम्ही माझ्या दु आयडी असल्याची खुशाल जाहिरात करा.पण फरक पडणार नाहीये.माझ्याशी फोनवर,चेपुवर जे बोललेत त्यांना मला स्पष्टीकरण द्यायची गरज पडणार नाही.
परवा सचिन बोलला तसं ' मी त्यांच्याच मताचा विचार करते,ज्यांचा मी आदर करते'
24 Mar 2012 - 7:48 am | अत्रुप्त आत्मा
@रुखामैला वाट बघून आघून कंटाळा आला.शेवटी ती तुम्ही राहा इथे उभे ,मी आलेच थोडी शॉपिंग करून म्हणून बाजारात गेली असेल.आणि नंतर तिला परतण्याच भानच राहील नसेल...मग रुखमाई मंदिर जिथे पूर्वी मार्केट होत अशा ठिकाणी बांधल असेल. >>> --^--^--^--
22 Mar 2012 - 9:24 am | धन्या
डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लिहिलेलं हे ४२३ पानांचं पुस्तक या विषयावरचं उत्तम पुस्तक आहे.
श्रीविठ्ठल हा पंढरपूर परिसरातील गवळी आणि धनगर लोकांचा लोकल देव. एकादया छोटया गावात दिसणार्या वेतोबा, विरोबा किंवा म्हैसोबासारखाच. याच समाजातील पुढे आलेल्या राजांनी या लोकदेवाचे उदात्तीकरण करुन त्याला विष्णु-कृष्ण रुप दिले. या देवाच्या मंदिराच्या परीसराचा भाग असलेल्या चिंचबनात म्हणजेच दिंडीरवनात असलेल्या लखुबाई या ग्रामदेवतेला काळाच्या ओघात या लोकदेवाचे पत्नीपद मिळाले.
पुढे कुणीतरी या देवाच्या आयुष्याला पुंडलिक कथा चिकटवली आणि यादवीमध्ये निजधामाला गेलेल्या श्रीकृष्णाचे इतिहास दोन वेगवेगळे शेवट सांगू लागला. आणि वर एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे तो देव असल्यामुळे या दोन वेगवेगळ्या शेवटांवर प्रश्न विचारण्याची कुणालाच गरज भासली नाही.
गेल्या दोनेक वर्षांत झालेल्या वाचनामुळे श्रीविठ्ठलाबद्दल तो काळाच्या ओघात वैष्णवरुप प्राप्त झालेला गवळी आणि धनगर समाजाचं कुलदैवत होता याची खात्री पटली होती. आता प्रश्न असा होता की ज्ञानदेवांसारख्या ज्ञानी, प्रगल्भ आणि समाजमनाची जाण असलेल्या तरुणानेही श्रीविठ्ठलाचं हे वैष्णवरुप स्विकारावं याचं आश्चर्य वाटायचं.
अर्थात याचीही उत्तरे पुढे मिळाली. एक म्हणजे श्रीविठ्ठलावर ज्ञानदेवांची असलेली श्रद्धा ही त्यांची वैयक्तिक श्रद्धा होती. किंवा दुसरं कारण हे असू शकतं की तेव्हाच्या समाजाला एका समान धाग्याने बांधण्यासाठी, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होण्यासाठी काहीतरी ठाम निमित्त असायला हवं होतं. ( जसं पुढे टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती सुरु करुन केलं.) ते निमित्त ज्ञानदेवांना श्रीविठ्ठलाच्या रुपाने मिळालं. अर्थात विठ्ठलभक्ती ज्ञानदेवांच्याही खुप आधीपासून सुरु होती परंतू तिला "ग्लॅमर" आलं ते ज्ञानदेवांनी केलेल्या तिच्या प्रसारामुळे.
ज्ञानदेवांनी ही विठ्ठलभक्तीची इमारत इतक्या मजबूत पायावर उभी केली की आज आठशे वर्षानंतरही अवघा महाराष्ट्र सहा ते आठ लाखांच्या संख्येने आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूरात जमा होतो आणि "पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय" च्या जयघोषात देहभान विसरुन जातो...
22 Mar 2012 - 3:17 pm | इष्टुर फाकडा
मी वाचलं होतं त्याप्रमाणे संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत नाही, जे देवगिरी किल्ल्यावर बहमनी किंवा निजामांच्या सेवेत होते) त्यांनी हा विठ्ठल विजय देवराय कडून भांडून वगैरे परत महाराष्ट्रात आणला होता. कर्नाटकात हम्पी मध्ये विठ्ठलाची मंदिरे सुद्धा आहेत. यावर प्रकाश टाकावा.
22 Mar 2012 - 3:19 pm | प्यारे१
संत एकनाथांचे गुरु (नाव आठवत नाही, जे देवगिरी किल्ल्यावर बहमनी किंवा निजामांच्या सेवेत होते)
>>>जनार्दन स्वामी
बहुतेक निजाम शहाच्या चाकरीत.
22 Mar 2012 - 3:57 pm | इष्टुर फाकडा
बरोबर. धन्यवाद प्यारे !
22 Mar 2012 - 4:09 pm | गणपा
22 Mar 2012 - 8:34 pm | इष्टुर फाकडा
शेवाळकरांचे हे निरुपण माहित न्हवते. सुंदरच आहे.
22 Mar 2012 - 9:33 pm | धन्या
धन्यवाद गणपाशेठ. छान आहे निरुपण.
परंतू "कानडा विठ्ठलू कर्नाटकू" मधल्या कर्नाटकू या शब्दाची "नाटकं करणारा" अशी फोड ऐकून कपाळावर हात मारुन घेतला. अर्थात त्यात नविन काहीच नाही. एकदा किर्तनाला उभे राहिले की किर्तनकार शब्दांची याहीपेक्षा भयानक मोडतोड करतात हे माहिती आहे.
सागरभाऊ, तुमच्या वरील एका प्रतिसादातील प्रश्नाचे उत्तर या ध्वनीफीतीत मिळाले असेलच. :)
22 Mar 2012 - 9:39 pm | गणपा
अगदी अगदी. =))
24 Mar 2012 - 9:26 am | प्राजु
पण या निरूपणात विजय नगरच्या सम्राटांनी विठ्ठलाचं हरण करुन त्याला कर्नाटकात नेऊन त्याची स्थापना केली आणि भानूदासांची भक्ती, आराधना पाहून विठ्ठल पुन्हा स्वतःहून पंढरपुरास आला असंही सांगितलं आहे शेवाळकरांनी यात. आणि म्हणूनच कानडा ओ विठ्ठ्लू कर्नाटकू... असं म्हंटलं आहे.
यामध्ये फक्त 'नाटक करणाराच" असा अर्थ का घ्यावा वाटला तुम्हाला?
2 Apr 2012 - 11:11 pm | बॅटमॅन
संत एकनाथांचे पणजोबा भानुदास यांना दृष्टांत झाला विट्ठलाचा की विजयनगरला मी सुखात नाही म्हणून. मग भानुदास गेले आणि विट्ठलमूर्ती परत गुपचूप पंढरपुरात आणली अशी आख्यायिका आहे. आणि एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी यांनी सांगितल्यावरून एकनाथ एकदा शत्रूशी लढले अशीदेखील एक अनरिलेटेड आख्यायिका आहे.
22 Mar 2012 - 9:24 am | रणजित चितळे
येथे देवांचा राजा इन्द्र देव विठ्ठलाला सांगतात तूला जर का रकमाईशी लग्न करायचे असेल तर भरपूर पैसे, सोने, नाणे जमा कर व मला दाखव की रकमाईचा सांभाळ करु शकशील. तेव्हा पासून तिरुपतीचा बालाजी पैसे गोळा करत आहे. त्याच्या शिवाय रुक्मीणी त्याला वरणार नाही..... अशी गोष्ट आहे.
वर दिलेली पुंडलीकाची गोष्ट मी पण लहानपणी ऐकली होती. महादेव शास्त्री जोशांची सुरदास, पुंडलीक अशा सगळ्या भक्तांवर सुंदर पुस्तक होते ते वाचले होते (नाव आठवत नाही आता कोणी सांगेल तर बरे होईल).
22 Mar 2012 - 10:33 pm | आनंदी गोपाळ
तेव्हा पासून तिरुपतीचा बालाजी पैसे गोळा करत आहे.
धन्यवाद!
22 Mar 2012 - 9:51 am | प्यारे१
मंथूनि नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडीमार्गु |
सलमानचे मैने प्यार किया चे पोस्टर असो किंवा दबंगचे असो,
मला जर पोस्टर सलमानचीच आठवण करुन देतंत तर अडचण काय?
माढ्याच्या मूर्तीबद्दल अजून कसा काय प्रतिवाद आला नाही बरं?
बाकी चालू द्या.
22 Mar 2012 - 10:08 am | धन्या
अगदी अगदी. अशा गोष्टींमध्ये प्रत्येकाने तारतम्य बाळगून आणि विवेकाने वागावे.
माढयाच्या मूर्तीबद्दल आम्ही एक प्रतिसाद - "बोगस अध्यात्माची सुरसकथा-१" लाइथे थोडं लिहिलं आहे.
22 Mar 2012 - 10:14 am | प्यारे१
आयला धन्या,
नवीन होतास काय हा (वरचा संदर्भ ) लेख लिहीलास तेव्हा? लेका बरा होतास की!
सखू कधी भेटली म्हणायची मग? ;)
22 Mar 2012 - 10:36 am | धन्या
प्रत्येकाच्या मनात एक सखू दडलेली असते. पण लोक काय म्हणतील या भावनेने किंवा समाजात जगताना समाजाचे नियम पाळावे लागतात म्हणून म्हणा, चारचौघात "विठ्ठल विठ्ठल" करावे लागते. :)
22 Mar 2012 - 10:43 am | प्यारे१
हाच फरक असतो हो सामान्य माणसात आणि खर्या संतमहंतांमध्ये.
कायद्याला घाबरुन राहणारे आणि त्यामुळे नीतीमत्ता बाळगणारे, तिचा बडेजाव करणारे वेगळे आणि आतूनच वाटतं म्हणून संधी मिळूनही नीतीमत्ता न सोडणारे वेगळे. पहिल्या प्रकारचे सामान्य तर दुसर्या प्रकारचे असामान्य. संत.
22 Mar 2012 - 10:49 am | धन्या
अध्यात्मावरचं वाचन बरंच असला तरी आपल्याला "गुरु" असावा असं आज तरी वाटत नाही. जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा "गुरु" पदासाठी आपला विचार नक्की करण्यात येईल. ;)
22 Mar 2012 - 10:55 am | प्यारे१
बळंच कर???
आहो आमची लायकी ती किती? उगाच काहीपण!
बाकी, गुरु जेवढा लवकर कराल तेवढं जास्त लवकर भलं होण्याची (आपली साधना सुरु होण्याची, गुरु पाठीशी असतातच) शक्यता निर्माण होते एवढं बोलून या धाग्यावर रजा घेतो.
22 Mar 2012 - 11:50 am | विसुनाना
वर श्री. धन्या यांनी लिहिल्याप्रमाणे ढेरे यांचे 'श्रीविठ्ठल : एक महासमन्वय' हे पुस्तक विठोबाबद्दलच्या सर्व शंका दूर करणारे आहे.
मुळात पंढरपुरातली सध्याची विठोबाची मूर्ती ही 'खरी' विठोबाची मूर्ती नसून ती एका काळात माढ्याला हलवली गेली होती असे दिसते. तेव्हा राही/रखुमा या दोन्ही मूर्ती त्याचवेळी वेगळ्या ठिकाणी स्थापित झाल्या असाव्यात.
22 Mar 2012 - 12:39 pm | चौकटराजा
या ठिकाणी वल्ली यांचे संशीधनपर विवेचन का नाही. कुठे एखादी बखर चालण्यात स्वारी दंग आहे का काय ? विठोबाची बखर सापडलेली दिसतेय !
22 Mar 2012 - 12:57 pm | प्रचेतस
मला नाही माहित हो.
तसेही वर संतसाहित्याचे गाढे अभ्यासक श्री धनाजीराव वाकडेबुवांनी अधिक माहिती दिलेलीच आहे.
22 Mar 2012 - 2:04 pm | बाळ सप्रे
पौराणिक कथा आणि हिंदी सिनेमा मध्ये असे प्रश्न विचारायचे नसतात.. :-)
उलट तुम्हीच एखादे पिल्लु सोडुन देउ शकता.. कि ह्या ह्या कारणामुळे ते वेगळे झाले होते.. सांगायचं कि अशी एक दंतकथा आहे म्हणून.. तुम्हालाही कोणी विचारणार नाही "का" म्हणून..
22 Mar 2012 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
अहो दंतकथा कशाला ? मी सांगतोय तीच कथा खरी आहे, आणि स्वतःच्या मामाकडून ऐकली आहे असे सांगायचे. पुढे, 'मामाचे आडनाव बडवे आहे' असे ठोकून दिले की झाले.
22 Mar 2012 - 5:00 pm | रमताराम
आमची रिक्षा रांगेत लावतो आहे. :)
काही काळापूर्वी लिहिलेल्या विठ्ठलाच्या स्त्रिया या आमच्या लेखाची शिफारस करतो आहे.
22 Mar 2012 - 5:17 pm | गणपा
तुमच्या रिक्षातुन मारलेला फेरफटका आवडला बर्का. :)
22 Mar 2012 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार
ररांना इथे पाहून सदगदित झालो.
ररा ही विट घ्या आणि हलू नका आता इथून.
खरेतर दोन विटा देणार होतो, पण कोणीतरी येऊन कागद पण दिला असता तर पंचाईत. ;)
22 Mar 2012 - 10:37 pm | आनंदी गोपाळ
कागद देण्याची- आपलं वापरण्याची- प्रथा नाही.
तुम्ही 'पल्याडला' केव्हा गेलात?
24 Mar 2012 - 9:29 am | सांजसंध्या
सर्वांच्या अभ्यासपूर्ण प्रतिक्रियांसाठी
______/\_____