स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

सोत्रि's picture
सोत्रि in काथ्याकूट
13 Mar 2012 - 4:00 am
गाभा: 

स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री

  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते
    (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)

तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता.

त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली.

सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?

ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले.

साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

13 Mar 2012 - 4:13 am | पिवळा डांबिस

स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं.
असं समजलं तर मग वाद कसे निर्माण करता येतील?
'अर्धनारीश्वर' मध्येदेखील उजव्या बाजूला पुरूष असावा की स्त्री असावी यावर वाद सुरू करतील लोक!
कुठूनही वितंडायला निमित्त हवं ना!!
:)

असुर's picture

13 Mar 2012 - 6:28 am | असुर

कुठूनही वितंडायला निमित्त हवं ना!!

ठ्ठो!!!

याग्गाग्गो पिडांकाका,
पाशवी धाग्यावर, मग भले तो सोत्रिचा का असेना, असला प्रतिसाद म्हणजे धाडसच की. :-)

सगळ्याच्या सगळ्या प्रतिसादाशी सहमत!!!

आणि समानता म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे समानतावादी लोकांना? इथे दोन पुरुष नसतात एकसारखे (जुळे लोक्स दिसायला सारखे असू शकतात), तर स्त्री आणि पुरुष समान असलेलं दाखवणं म्हणजे गायीची शेपटी रेड्याला जोडायचं काम है!

'एकमेकांना पूरक असणं', हा सोत्रिचा मुद्दा एकदम पटला. समानता आणून काय जगण्यातली मजा घालवायची आहे का? त्यापेक्षा डिफरंट असूनही एकमेकांना साथीला असणं जास्त भारी!

सर्व पाशवी शक्तींना आज-आत्ता-ताबडतोब विनम्र अभिवादन! :-)

--असुर

अरे वा!
स्त्री मुक्त झाली काय.
च्यायला, आमच्या आईला कितींदा सांगतोय मुक्त हो, मुक्त हो - अशी रांधा, वाढा, उष्टी काढा कधीपर्यंत करीत रहाणार. पण तिचं आपलं तेच, हे अजून आले नाहीत.. कोणती भाजी करायचीय ते विचारलं असतं वगैरे..

असो. शुभेच्छा मुक्त स्त्रीयांना.
बहुतेक मुक्त झाल्यानंतर आता समान होत असावी.

स्त्रीमुक्तीबद्दल मागे हे वाचलं होतं ब्वॉ:

स्त्रीमुक्ती चळवळीची एक विदुषी मला भेटायला आली (मी अत्यंत उद्धट, निर्दयी माणूस आहे हे आधीच सांगतो). स्त्रीमुक्ती चळवळीबद्दल तुमचं काय मत आहे? तिने मला विचारले. मी म्हणालो मी पूर्णत: स्त्रीयांच्या बाजूने आहे - लढा तुमच्या हक्कासाठी. पण हेही लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या लैंगिक गरजांसाठी पुरूषांवर अवलंबून आहात, तोपर्यंत तुम्ही मुक्त होणार नाही. दुसर्‍या बाजूनेही हे असंच आहे. व्हायब्रेटर वापरून तुम्ही तुमच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकता, ती गोष्ट वेगळी. पण तुम्हाला पुरूष हवा असेल तर तुम्ही, मुक्त नसाल. पुरूषही मुक्त नसेल.
- उप्पलुरी गोपाला कृष्णमूर्ती

आभार (अर्थात आमचेच)

सन्जोप राव's picture

13 Mar 2012 - 6:51 am | सन्जोप राव

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? असा प्रश्न न पडणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता.

किचेन's picture

13 Mar 2012 - 3:11 pm | किचेन

अगदी परफेक्ट उत्तर.

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2012 - 2:10 pm | प्रभाकर पेठकर

मनाला, दृष्टीला असमानता अजिबात न जाणवणं म्हणजेही समानता मानायची का?

धन्या's picture

13 Mar 2012 - 7:32 am | धन्या

मराठी इंटरनेट साइट्सवर स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणाइतकेच होणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय असे आमचे ठाम मत आहे.

५० फक्त's picture

13 Mar 2012 - 8:10 am | ५० फक्त

+१००० टु असुर,

'तर स्त्री आणि पुरुष समान असलेलं दाखवणं म्हणजे गायीची शेपटी रेड्याला जोडायचं काम है!' - एकदम पटेश स्टेटमेंट, खुळं आहेत नुसती बाकी काही नाय, जसं शिंपी आपल्या चुका फॅशन म्हणुन खपवतो तशातला प्रकार आहे हा,

वर यशवंतानं लिहिलेलं त्रिवार सत्य आहे, पण हे सत्य नाकारणं यातच या प्रश्नाचं मुळ आहे. स्त्री -पुरुष समानता याची व्याख्या करणं आधी जमतंय का ते पाहु मग नंतर ती आहे का नाही, होईल का नाही याचा विचार करु. पण त्यापेक्षाही मोठा आणि महत्वाचा विचार हा आहे की हे असं होण्याची गरज आहे का ?१ लिटर पाणि आणि १ किलो वाळु यांच्यात समानता काय अन फरक काय हे सांगणं समजणं शक्य आहे, पण ते दोन्हि समान करुन दाखवा म्हणलं तर कसं होईल.

Nile's picture

13 Mar 2012 - 8:26 am | Nile

१ लिटर पाणि आणि १ किलो वाळु यांच्यात समानता काय अन फरक काय हे सांगणं समजणं शक्य आहे, पण ते दोन्हि समान करुन दाखवा म्हणलं तर कसं होईल.

इथं जरा गोंधळलोय मी!! तुम्ही पाणी का वाळू?

किती लिटर आणि किती किलो तो वेगळा प्रश्न! ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 8:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऐतिहासिक व्याख्येला आजची व्याख्या समजून मग हसू येणं, कीव करणं .... आणि मग अमक्याची शेपटी तमक्याला ... वैतागून असं म्हणावंसं वाटतं, तुम्हाला मुलगी असती आणि तिने कळवळून तक्रारी केल्या असत्या तरी तुम्हाला समजलं असतं का स्त्रियांचं दु:ख?

स्वतंत्र अस्तित्त्व असणार्‍या व्यक्तीला सतत ती लग्न झालेली आहे का नाही याची ओळख विचारणं, नाव ही मनुष्याची मूळ ओळख पण तीच बदलणं, यांतही किती क्रौर्य आहे हे जातायेता हिंसा करणार्‍यांना काय समजणार? स्त्री समानतेच्या बाबतीत कोण किती पाण्यात आहे आणि कोण अजून इ.स. १७६० मधे आहे हे दिसतं आहेच.

संपादित.

अदिती,
तुझा कळवळा समजू शकतो. नक्कीच.
पण मी स्वत: माझ्यापासून सुरुवात करत नाही, तोपर्यंत ती समानता माझ्या कुटुंबात, आई/बहीण/बायको यांच्यापर्यंत पोहोचणार कशी? हाच विचार जसा घरी, तसाच हापिसातदेखील व्हायला हवा.
मुळात हे प्रत्येकालाच, म्हणजे प्रत्येक स्त्री-पुरुषाला स्वत:हून वाटायला हवं. माझ्या परीने मी माझ्या आई/बहीण/बायकोला समान वागणूक देतो का हे महत्वाचं. बाकी तिकडे जगाचे रुल्स काही का असेना.
आणि एकमेकांना पूरक असणं हे कुठेही वाईट नाही. कुणा एकाला सतत पडती बाजू घ्यावी लागत असेल तरच, नाहीतर यासारखी मजा नाही.

आणि ज्या माणसाला धाकटी बहीण असेल तो तर समानतेच्या लाटेत आपोआपच सामील होऊन जातो. पर्यायच नाही. अनुभवावरुन सांगतोय. समानता येणार असेल तर बरंच आहे एका अर्थी. घरात आमच्या मताला एखादा टक्का तरी किंमत येईल. :-)

--असुर

Nile's picture

13 Mar 2012 - 8:35 am | Nile

वरचे काही प्रतिसाद वाचून या पुरुषांनाच आधे मुक्ती मिळू दे अशी सैतानाकडे प्रार्थना केली! म्हणा रे.. राम नाम... !!

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2012 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर

सैतानाकडे प्रार्थना केली! म्हणा रे.. राम नाम

'हडळी'कडे का नाही प्रार्थना करीत?
'पंचकन्या' स्मरे नित्यं... असे सांगितलेले असूनही रामाचेच नांव घ्यायचे का?

किती ही असमानता???

Nile's picture

18 Mar 2012 - 6:35 am | Nile

तुमच्या सारख्यांनी निर्माण केलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच हो! सैतान आमच्यावर प्रसन्न आहे, पण या संस्कृतीमुळे हडळींना प्रसन्न करायचं कसब काही आम्हाला आत्मसात करता आलं नाही हो. नाहीतर हडळींवर प्रेम करायला आमची काही ना नाही! आहेत का काही क्लृप्त्या तुमच्याकडं? ;-)

प्रभाकर पेठकर's picture

18 Mar 2012 - 10:00 am | प्रभाकर पेठकर

तुमच्या सारख्यांनी निर्माण केलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळेच हो!

तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीच्या निर्माणात व्यक्तिशः माझा सहभाग आहे हा माझ्यासाठीही नवा शोध आहे.

सैतान आमच्यावर प्रसन्न आहे, पण या संस्कृतीमुळे हडळींना प्रसन्न करायचं कसब काही आम्हाला आत्मसात करता आलं नाही हो. नाहीतर हडळींवर प्रेम करायला आमची काही ना नाही! आहेत का काही क्लृप्त्या तुमच्याकडं?

सैतान आणि हडळ दोन्ही वृत्ती नकारात्मक आणि विघातक आहेत असे माझे मत असल्याकारणाने चांगल्या, सकारात्मक आणि विधायक वृत्तींना वश करण्याकडे माझा ओढा आहे. मग तो देव असो अथवा देवी. मी लिंगभेद करीत नाही.

Nile's picture

19 Mar 2012 - 7:25 am | Nile

तथाकथित पुरुषप्रधान संस्कृतीच्या निर्माणात व्यक्तिशः माझा सहभाग आहे हा माझ्यासाठीही नवा शोध आहे.

सहभाग असेलही. पण मी फक्त तुमच्या सारख्यांबद्दल बोलत होतो. ;-)

मग तो देव असो अथवा देवी. मी लिंगभेद करीत नाही.

चांगलं आहे. देव्या प्रसन्न करायला माझी काहीच हरकत नाहीए, पण बहुतेक सगळ्या "टेकन" आहेत असे दिसते. (देव आणि देवता यांचा सुद्धा सेक्स रेशो भलता "स्क्यूड" आहे राव!!)

असो.

प्रभाकर पेठकर's picture

19 Mar 2012 - 9:32 am | प्रभाकर पेठकर

सहभाग असेलही. पण मी फक्त तुमच्या सारख्यांबद्दल बोलत होतो.

हा फार व्यक्तिगत आरोप होतो आहे. माझ्या सारख्यांबद्दल म्हणण्यासाठी काय जाणता आपण माझ्या बद्दल?

ज्या प्रतिसादावरून आपण हा व्यक्तिगत हल्ला सुरू केला आहे तो मुळात विनोद निर्मिती करणारा प्रतिसाद आहे. हे कृपया ध्यानात घ्यावे.

Nile's picture

19 Mar 2012 - 12:23 pm | Nile

आम्ही पण विनोदच करत होतो की हो!

तुमच्याबद्दल काडीचीही माहिती नसताना तुमच्यावर आरोप करायला तुम्हाला मी काय मराठी संस्थळांवरचा कोणी मुर्ख सदस्य वाटलो की काय? ;-)

Nile's picture

19 Mar 2012 - 12:28 pm | Nile

दोविसात्यामजाम्ह.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2012 - 11:28 am | परिकथेतील राजकुमार

म्हणा रे.. राम नाम... !!

ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली. निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो.

बाकी विहिर, समुद्र, तळे, डबके, नाला, धरण ह्यांच्या व्याख्या नक्की झाल्या की संबंधितांनी कळवण्याचे करावे. त्या आधारे आम्ही सर्व ठिकाणी कधी बेडूक, कधी देवमासा, कधी बोंबील, कधी अ‍ॅनाकोंडा वैग्रे बनून डूंबून यावे म्हणतो.

Nile's picture

13 Mar 2012 - 12:05 pm | Nile

ह्या परमेश्वरद्वेष्ट्या निळ्याच्या कळफलकातून रामनाम टाईपले गेलेले बघून आज एक वाचक म्हणून शरम वाटली.

वाक्य पुर्ण केलेलं नाही हे लक्षात असुद्या!

निळ्याच्या स्वप्नात जांबुवंत येवो.

मेल्या!! जाबुंवती तरी म्हणायचस!! एक वेलांटी द्यायला तुला काय पैसे पडतात का रे?

बॅटमॅन's picture

13 Mar 2012 - 11:38 am | बॅटमॅन

वा वा वा...प्रामाणिक लेखावर उग्गीच आरडा ओरडा करणाऱ्या प्रतिक्रिया पाहून कीव आली.

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 11:52 am | श्रावण मोडक

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?
साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.

मिळालं तर, किंवा मिळालं की, मला कळव ही नम्र विनंती.
इथं नाही मिळालं तर एक काम कर. वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता.
त्या उत्तराचं विज्ञान करायला जाऊ नकोस, शास्त्रही करू नकोस, किंवा सिद्धांतही करू नकोस. म्हणजे असले प्रश्न पडणार नाहीत. सुखी राहशील. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 12:13 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! उत्तर एक फटके अनेक! अनेकता मे एकता! ;)

वहिनींना, आईला, सासुबाईंना, भावजयीला, पोरींना (एकूण स्त्री नातलग, सुहृदांना) विचार. त्या देतील ते उत्तर त्या-त्या संदर्भात तुझ्यापुरतं खरं. तीच समता.

वरचा संजोपरावांचा प्रतिसाद आणि हे वाक्य अक्षरशः पटलं :)

मस्त कलंदर's picture

13 Mar 2012 - 12:18 pm | मस्त कलंदर

संजोपराव म्हणतात,

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय? असा प्रश्न न पडणे म्हणजेच स्त्री पुरुष समानता.

हेच खरं.

बाकी, ओढून ताणून प्रत्येक मुद्दा स्त्री-पुरूषाच्या लैंगिकतेशी आणणं, आणि आमच्या घरची बाई कशी घरच्यासांठी झिजण्यात सुख मानते आणि काय या आजकालच्या मुली आणि त्यांचं स्त्रीमुक्तीचं फॅड म्हणणं हे नेहमीप्रमाणेच पटत नाही. सगळेच स्त्रीपुरूष जगभर ताकाचं भाडं घेऊन फिरताहेत असं जरी मान्य केलं, तरी ती भूक भागल्यानंतर बुद्धीची, पोटाची अशा इतरही गरजा असतात हे यांच्या ध्यानी कधीतरी यावं अशी भाबडी अपेक्षा आहे. घरची स्त्री, मग ती नोकरी करत असू दे अथवा नाही, पण त्यांच्या माथी नुसती रांधा, वाढा, उष्टी काढा का मारावं? पुरूष करतात ती नोकरी, आणि बायका हापिसात चकाट्या पिटतात का? घरच्या बाईला विरंगुळा हवा असेल, एखादा छंदा जोपासायचा असेल, तर "तिचं काम आम्ही करतो" असं न म्हणता, "हे आमचं घर आहे, आणि तिथे मनापासून आम्ही सगळेच दिसेल ते काम करतो" असं आलं तर बिघडलं कुठे? बरं, कामवाली बाई करो वा घरातली बाई पण स्वयंपाक-धुणी-भांडी हे एवढंच काम नसतं. घरभर पसरलेल्या पेपरांपासून आल्या गेल्याची उसाभर हे सगळं तीच पाहात असते. घरच्या संस्कृती-परंपरांची पताकापण तिच्याच खांद्यावर असते. कामवाल्यांकडूनही कामं तिनंच करोन घ्यायची असतात, ती नीट नाही झाली तर, "उद्यापासून तूच करत जा गं, ती बाई चांगलं काम नाही करत" हे वाक्य येतं की "आपण मिळून करत जाऊ" असं म्हटलं जातं? एकेकाळी घरातली कामं स्त्रियांची अशी त्या काळाप्रमाणे विभागणी झाली असेल, तर बदलत्या काळानुसार प्रत्येकानं किमान आपलं काम तरी का करू नये? काम असेल तर घर काय तिचं एकटीचं आणि इतर वेळेस सगळ्यांचं असं म्हणणं म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे.

स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय. यातला पहिला 'M' बहुतेक जणींकडे असतोही. हे असं झालं तर "करावं पुष्कळ वाटतं पण कामांमुळे वेळ मिळत नाही" ही सबब कुणी देणार नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 12:22 pm | बिपिन कार्यकर्ते

मकी आणि संजोपरावांना ... +१

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 12:46 pm | श्रावण मोडक

प्रतिसादाशी सहमत. म्हणूनच सन्जोप रावांशीही सहमतच.

स्त्री मुक्तीचा अर्थ फक्त आर्थिक स्वातंत्र्य, घरकामातून सुटी किंवा काही अंतर्वस्त्र न घालणं नव्हे. तिला मन आहे, तिचे काही विचार असू शकतात, स्वतःच्या गरजा असू शकतात या सगळ्यांची दखल घेणं आणि त्याप्रमाणे जसा आपण काही कामांपासून्/गोष्टींपासून पळ काढून आपल्याला हवं ते करतो, तसं न करता तिला MOM- Motive, Opportunity, Method उपलब्ध करून देणं होय.

यातील तो मॉमचा घिसापिटा प्रकार सोडला तर उत्तम लिहिलं आहेस. त्यात धागाकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर सामावून जातं.
ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती. ;)

मस्त कलंदर's picture

13 Mar 2012 - 1:45 pm | मस्त कलंदर

ती सही तेवढी या प्रतिसादाखाली नको होती.

हाहा.. उलट ती सही आयटीवाल्यांच्या घरात तर हवीच हवी. ;-) कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच नाही का? घर कितपत आणि कसं नीट आवरलंय यावरून तुम्हाला आता नक्की कुणाचा संगणक बंद पडला असू शकेल हे सांगता येईल ना आता?

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 12:20 pm | बिपिन कार्यकर्ते

स्त्री पुरूषात काही नैसर्गिक भेद आहेत. शारिरीक आणि भावनिक, दोन्ही प्रकारचे. ते राहणारच.

पण एका माणूसपणाच्या पातळीवर मात्र दोघे समान आहेत. सभोवतालावर समान हक्क असणे, एकमेकांबद्दल माणूस म्हणून पूर्ण आदर असणे, साधक बाधक विचार करून आणि आपापल्या परिसंस्थेतल्या प्रत्येक घटकाचा नीट विचार करून मग आपापले निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दोघांनाही असणे, अनिर्बंध स्वातंत्र्य स्त्री अथवा पुरूष अशा कोणालाच नसणे इत्यादी गोष्टी म्हणजे समानता असे ढोबळमानाने म्हणता येईल. स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून आणि पुरूष केवळ पुरूष आहे म्हणून एकमेकांपुढे लहान मोठे न ठरणे म्हणजे समानता.

नितिन थत्ते's picture

13 Mar 2012 - 12:36 pm | नितिन थत्ते

अगदी अचूक विवेचन.

अवांतर : मुंबईत एक पुरुषमुक्ती संघटना आहे. (बहुधा हरीश सदानी इत्यादि लोक चालवतात). त्यांचे ध्येय पुरुषप्रधान समाजाच्या पारंपरिक कल्पनांतून पुरुषांची मुक्ती करणे हे आहे.

बॅटमॅन's picture

13 Mar 2012 - 12:49 pm | बॅटमॅन

अवान्तर: सांगलीत एक पुरुष हक्क संरक्षण समिती देखील आहे. कधी गेलो नाही, बोर्ड मात्र लई वेळेस पाहिलाय.

सोत्रि's picture

13 Mar 2012 - 2:10 pm | सोत्रि

स्त्री केवळ स्त्री आहे म्हणून आणि पुरूष केवळ पुरूष आहे म्हणून एकमेकांपुढे लहान मोठे न ठरणे म्हणजे समानता.

परफेक्ट! आवडले!!

- (नैसर्गिक भेद मान्य असलेला) सोकाजी

धन्या's picture

13 Mar 2012 - 3:18 pm | धन्या

मोजक्या आणि नेमक्या शब्दांत सांगितलंत बिपीनदा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 9:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शारिरीक आणि भावनिक, दोन्ही प्रकारचे. ते राहणारच.

शारीरिक भेद हे नेचरमधून आलेले आहेत. भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून आलेले आहेत का नर्चरमधून?

या विषयांत अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांनाही याची उत्तरं ठामपणे देता येत नाहीत आणि इथे आंजावर लोकं अशी विधानं करतात आणि त्याला +१ करतात याचं आश्चर्य वाटत नाही. फक्त असे प्रतिसाद देणार्‍या लोकांची नावं वाचून थोडं आश्चर्य वाटतं एवढंच.

असुर, जाहीरपणे शॉव्हनिस्टच दिसणार्‍या लोकांच्या प्रतिसादांचं आश्चर्य वाटलं नाही. पण समानता म्हणजे गायीची शेपटी रेड्याला वगैरे वाचून मीच लोकांना ओळखण्यात कमी पडते हे निश्चित लक्षात आलं.

बाकी चालू द्या.

अदिती - काहीतरीच बरंका तुझं! अगं मानसशास्त्र, उतक्रांतीशास्त्र वाचायची काय गरज आहे?
मला तर कीचेनचा प्रतिसाद १००% पटलेला आहे. स्टुप्पिड काहीतरी आर्ग्युमेंटस तुम्हा स्त्रीमुक्तीवाल्यांची...म्हणे नेचर आणि नर्चर.
मला एवढंच कळतं की शेवटी नर्चरींग हे स्त्रीचंच काम आणि तेव्हढं जरी तिने धडपणे केलं तरी पुष्कळ झालं. नस्त्या भानगडीत बाईमाणसानं पडावंच कशासाठी?

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2012 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर

भावनिक फरक दिसतात ते नेचरमधून आलेले आहेत का नर्चरमधून?

मला वाटतं तेही नेचरकडूनच आलेले आहेत. नर्चर च्या माध्यमातून ते बदलता मात्र येतील.

आत्ता बहिणीच्या नातीला (वयवर्षे २) भातुकलीशी खेळताना बघितले आणि मिपावरील ह्याच चर्चेची आठवण झाली. मुली आईला स्वयंपाकघरात काम करताना पाहतात, वडिलांना सायकल, बाईक दुरुस्ती करताना पाहतात पण त्या आईच्या कार्याने जास्त प्रभावित होतात आणि भातुकलीची खेळणी पसरुन बसतात, बाहुलीची वेणीफणी करतात. पण मुले, ही खेळणी घरात असूनही, त्याकडे आकर्षित होत नाहीत. त्यांना बॅट-बॉल, बंदुक आणि इतर मैदानी खेळांचे आकर्षण वाटते. हा नैसर्गिक ओढाच म्हणावा लागेल. जे हार्मोन्स तुमच्या शरीरात असतात ते तुम्हाला तसे घडवितात आणि आजू बाजूची माणसे त्यालाच खतपाणी घालून वाढवतात. तुमची भावनिक वाढही त्या त्या साच्यातच होत जाते. ह्याहुन वेगळ्या साच्यात मुलांना वाढवायचे असेल तर प्रयत्नपुर्वक वेगळे नर्चरिंग करावे लागेल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 11:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुली आईकडे बघून प्रभावित होतात यात हॉर्मोन्स का महत्त्वाचे?
शरीररचनाशास्त्राचा माझा फारसा अभ्यास नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे मुली आणि मुलांचे लैंगिक गुणविशेष दाखवणारे हॉर्मोन्स ८-१० वर्षांच्या आधी शक्यतोवर स्त्रवत नाहीत. मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांमधे फरक आहे हे साधारण काय वयामधे समजतं?

दोन वर्षांच्या नातीला भातुकलीही द्या आणि खेळण्यातल्या गाड्या, स्क्रूड्रायव्हरही द्या. तिच्यासमोर आई रोजच्यारोज पोळ्या लाटते तसेच वडील, आजोबा, काका, मामा (स्त्री नातेवाईकांनी केल्यास अधिकच उत्तम) कोणीतरी घरातली बिघडलेली उपकरणं दुरूस्त करू देत. तिला भातुकलीच दिली तर ती गाड्या आणि स्क्रूड्रायव्हरने खेळणार कशी? त्यातून एका मुलीवरून समस्त किंवा बहुतांश स्त्रियांबद्दल निष्कर्ष काढल्यास ते चुकीचे ठरण्याचीच शक्यता अधिक.

मोठा भाऊ असेल तर बहिणींनी त्याचं अनुकरण करणं आणि बहिण असेल तर भावाने तिचं हे अगदी सर्रास दिसतं. मोठ्या भावांच्या बहिणींनी (घरचे काच करणारे नसतील तर) मुलग्यांचे कपडे घालणे, "मी आलो, गेलो" असं म्हणणे आणि बहिणींच्या भावांना फ्रॉकची आवड, "मी आले, गेले" असं म्हणणं कित्येक घरांमधे पाहिलेलं आहे. मोठं भावंडं सख्खंच पाहिजे असंही नाही, शेजारच्या मुलांशी घनदाट मैत्री असेल तर पिअर फॉलोइंग अगदी लहानपणापासूनच होतं.

माझ्या ओळखीत दोन-तीन लहान मुलगे आहेत, ते रोज आई-आजी पोळ्या लाटताना, भांडी घासताना शेजारी उभे रहातात. असं करता आलं नाही तर रडून घर डोक्यावर घेतात. माझ्या ठाण्यातल्या शेजारच्यांच्या नातवाला, वय वर्ष चार-साडेचार असल्यापासून रोज घरी एकतरी पोळी लाटायची असते. अशा सवयी नसलेल्या मुलग्यांना वाढवण्यात त्यांचे आई-वडील, आजी-आजोबा चुकले म्हणायचं का? नाही. हा मुलगा आजीजवळ बराच काळ असतो, आजीबद्दल त्याला अधिकच प्रेम आहे आणि म्हणून आजीची नक्कल करायला त्याला फार आवडते.

आजूबाजूला लोक काय म्हणतात हे लहान मुलांना चांगलंच समजतं. सुदैवाने किंवा दुर्दैवाने ही लहान मुलं आपल्या घरातले मोठे, विशेषतः जे त्यांची अधिक काळजी घेतात त्यांना, ऑलमोस्ट देवच समजतात. मोठे लोक काय बोलतात तेच्च प्रमाण मानतात. आणि मग मोठ्यांच्या स्त्रियांचं काम, पुरूषांचं काम अशा समजूती असल्या की मुलांना तेच खरं वाटत रहातं. दोन वर्ष हे असं काही समजण्यासाठी खूप मोठं वय झालं. दहा-बाराव्या महिन्याचे असताना मुलांना इगोही असतो.

पेठकरकाका,
मुले, ही खेळणी घरात असूनही, त्याकडे आकर्षित होत नाहीत. त्यांना बॅट-बॉल, बंदुक आणि इतर मैदानी खेळांचे आकर्षण वाटते.
माझा मुलगा अगदी चार वर्षाचा होईपर्यंत स्वयंपाकघरातील भांडी, कांदे, बटाटे (सुरी, कात्री, किसणी सोडून बाकी सगळ्या वस्तू) यांच्याबरोबर मनसोक्त खेळायचा. नजर चुकवून धान्य डब्यातून काढणे, भिरकावणे, डिशवॉशरमध्ये भांडी जमतील तशी टाकणे असे करायचा. आई करतिये ते सगळं करून बघायचं. इतकच काय दोन वर्षाचा असताना शेजारणीकडे जाऊन तिच्या मुलीचे कपडे घालायला हवेत म्हणत होता. नंतर बांगड्याही मागितल्यावर विचित्र वाटले. बघू तरी काय करतोय म्हणून पुढे ठेवल्यावर निघून गेला. बाबा जे काही करतात तेही सगळे करून पाहिले. मुख्य म्हणजे ही दोन मोठी माणसे करतायत ते सगळं मलाही मिळालं पाहिजे ही भावना. नंतर मात्र कांद्याचा बॉल झाला आणि चार गोष्टी फुटल्यावर सगळं हळूहळू बंद झालं. आता फक्त आणि फक्त मैदानी खेळ. पण एका घरात फक्त मुले असतानाही डॉल्स हाऊस आणि किचन सेटस असे प्रकार होते. ती मुले भरपूर खेळायचीही.
माझ्या भावाची मुलगी चार वर्षाची आहे पण भातुकली वगैरे फारच कमी खेळते. दंगा मात्र भरपूर. आम्ही मारे बाजारातून 'मुलींना (जास्त करून आम्हाला) आवडणार्‍या' गोष्टी (बांगड्या, पिना इ.) घेऊन आलो तर फारसा उत्साह दाखवला नाही. अजून काही वर्षांनी ती हे सगळं करेलही पण सगळेचजण मुलगा किंवा मुलगी असल्यामुळे मुलाचे अथवा मुलीचे खेळच खेळतील असे सांगता येत नाही असे म्हणण्यास वाव आहे.
मी कॉलेजला जायच्या दिवसांमध्ये नवरा स्वयंपाक करीत असे त्यावेळी माझ्याच मुलाला नव्हे तर मुलाच्या मित्रांनाही वावगे वाटत नसे. उलट आज मुगाची खिचडी करा ना म्हणायची त्याची आठवण झाली. ज्या मुलांच्या घरी वडील 'बायकी' समजल्या जाणार्‍या कामाला हात लावत नसत ती मुले अचंबित होत व आपापल्या घरी सांगत व ज्यांच्या घरी वडील नेमानं स्वयंपाक करतात ती मुले जणू हे नेहमिचेच ;) अशी वागत असत. मोठ्यांचे वागणे एकवेळ नाटकी म्हणता येईल पण मुलांना काय म्हणणार? ती खर्‍या भावनाच दर्शवतात.

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2012 - 7:48 am | प्रभाकर पेठकर

मी सर्वसाधारण निरिक्षण नोंदविले आहे.

प्रत्येक स्त्री मध्ये पुरुषाचे अंश आणि प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रिचे अंश असतातच. जेंव्हा एखाद्या पुरुषांत स्त्रिचे अंश जास्त असतात तेंव्हा तो पुरुष स्त्रियांची पारंपारीक कामे जास्त आवडीने आणि सहजपणे करतो. जसे स्वयंपाक. मला स्वतःला स्वयंपाक करणे, लहान मुलांना सांभाळणे, संगोपन करणे आवडते आणि जमतेही. माझ्या पत्नीला हे तेवढे जमत नाही. ती रोजचा स्वयंपाक करते पण आवड नाही. ती नोकरी नाही करीत गृहिणीच आहे तरीही तिला घरकामाची आवड नाही. लहान मुलांशी ती तितकी लगेच समरस होत नाही.

ज्या स्त्रियांमध्ये पुरषी अंश जास्त असतो त्यांचा पुरुषांची पारंपारीक कामे करण्याकडे ओढा जास्त असतो. पुरशी कपडे वापरणे, तशी केशरचना करणे, मनची कणखरता दाखविणे, बेफिकिरी वृत्ती, टेक्निकल गोष्टींची आवड इ.इ.इ.
नृत्यकला निसर्गतः स्त्रियांकडे जास्त असते पण पुरुषही नृत्यकलेत पुढे आहेत. कारण त्यांच्यातील स्त्रित्वाचा अंश. हा त्यांच्यातील स्त्रित्वाचा अंश कित्येकदा इतका जास्त असतो की तो सहज, त्यांच्या वागण्या बोलण्यातून, दृश्यमान होतो.
नटण्या मुरडण्याची आवड आणि ज्ञानही स्त्रियांना जास्त असते पण त्या क्षेत्रातही आघाडी घेतलेले व्यावसायिक पुरुष आहेत.
तात्पर्य, परस्परांमध्ये विरुद्ध लिंगी अंश कमी जास्त प्रमाणात असतात त्यानुसार त्यांच्या आवडी निवडी आणि कौशल्ये ठरत असतात. माझे निरिक्षण हे सर्वसाधारण परिस्थितीचे आहे. मुलींना मुलींचे खेळ आवडतात तर मुलांना मुलांचे.

याचा सांख्यिकी विदा जमा केला तर थोडक्यात हेच दिसून येईल की स्वयंपाक, लहान मुले, सजावट, यंत्र, तर्क या गोष्टी व्यक्तीच्या स्त्री अथवा पुरूष असण्यावर अवलंबून नसून व्यक्तीच्या मूळ वृत्तीवर अवलंबून आहेत. लहानपणापासून बालकांवर अमकी वृत्ती स्त्रियांची आणि तमकी वृत्ती पुरूषांची असा भडीमार न झाल्यास स्त्री आणि पुरूष दोघेही या पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी पडणार नाहीत. आणि आपापल्या आवडीची कामं निवडू शकतील.

माझा वरच्या प्रतिसादांमधला प्रश्न नेचर का नर्चर हा याच अर्थाने होता.

पारंपरिकदृष्ट्या पुरूषांची कामे करणार्‍या अनेक स्त्रिया पुरूषांपेक्षा लांब केस असणार्‍या, स्त्रियांसाठी बनवलेले कपडे वापरणार्‍याच बहुतांशाने दिसतात. मी स्वतः, पुरूषांची संख्या प्रचंड प्रमाणात अधिक आहे अशा क्षेत्रात काम केलं आहे. (विज्ञान, तर्क, भावनेला जागा नाही.) तिथेही स्त्रिया स्कर्ट, शॉर्ट्स, स्टॉकिंग्ज, साड्या, सलवार-कुडते असले स्त्रियांचेच कपडे घालून येताना दिसतात. (जीन्स-टीशर्ट्स ही तर वर्किंग क्लासमधून केव्हाच नर्ड, गीक वर्गाकडेही आलेली आहे. पण त्यातही स्त्रियांचे कपडे विशेषतः टीशर्ट्स इत्यादी वेगळ्या रंगाचे दिसतातच. आकारानेही कपडे वेगळे असतात.) आणि माझ्या या (एक्स)कलीग्ज, मैत्रिणी, ओळखीतल्या, संख्येने निदान ७०-७५ असतील, त्यांतल्या एक दोघींचेच केस थोडे लहान आहेत पण अगदी पेराएवढे केस ठेवणारी कोणीही नाही. अगदी खरोखरच लांबसडक म्हणता येतील असे केस असणारी एक ब्रिटीश मैत्रीण नेहेमी पुरूषांसारखे थोडे सैल कपडे घालते. पण लहान मुलांना उत्तमरित्या शिकवते.

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2012 - 4:39 pm | प्रभाकर पेठकर

लहानपणापासून बालकांवर अमकी वृत्ती स्त्रियांची आणि तमकी वृत्ती पुरूषांची असा भडीमार न झाल्यास स्त्री आणि पुरूष दोघेही या पुरूषप्रधान संस्कृतीचे बळी पडणार नाहीत.

माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी तरी कुठे असा भडिमार वगैरे झालेला पाहिला/अनुभवला नाही.

पारंपरिकदृष्ट्या पुरूषांची कामे करणार्‍या अनेक स्त्रिया पुरूषांपेक्षा लांब केस असणार्‍या, स्त्रियांसाठी बनवलेले कपडे वापरणार्‍याच बहुतांशाने दिसतात.

माझ्या विधानांचा विपर्यास होतो आहे . मी कुठेही असे म्हंटलेले नाही की पुरुषांची पारंपारिक कामे करणार्‍या/करू इच्छिणार्‍या स्त्रिया पुरुषांसारखे बारीक केस राखतात किंवा त्यांनी राखावे.
मीही माझे स्वतःचेच उदाहरण दिले आहे. मला स्वयंपाक करायला, लहान मुलांचे संगोपन करायला आवडते पण म्हणून मी काही केस स्त्रियांप्रमाणे वाढवलेले नाहीत. (असे उरलेच किती म्हणा). मी काही बायकी कपडे घालत नाही. असो.

माझ्याकडून हा विषय संपला आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

14 Mar 2012 - 9:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या इतक्या वर्षांच्या आयुष्यात मी तरी कुठे असा भडिमार वगैरे झालेला पाहिला/अनुभवला नाही.

१. घरी पाहुणे येतात, पुरूष बाहेरच्या खोलीत बसतात, बायका आतल्या खोलीत.
२. घरचा रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बालसंगोपन घरातली स्त्री करते.
३. बॅंकेतली कामं, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, अशा 'पुरूष' माणसांशी बोलून कामं करवून घेणं, यंत्रदुरूस्ती आदी कामं घरातली पुरूषमंडळी करतात.
४. माळ्यावरचं सामान काढायला, प्रवासाला निघताना बॅगा उचलायला, इतर हमाली कामं करायला पुरूषमंडळीच असतात.
५. मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाई यांच्याशी घरातली स्त्री बोलते. भंगारवाला, रद्दीवाला, धारवाला या पुरूष लोकांशी, नाही म्हणायला स्त्रियाही बोलताना दिसतात.

अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून बालकांवरही स्टीरीओटाईप्सचा भडीमार होतो. "बायकांसारखा काय रडतोस"* हे त्यातलं सगळ्यात डोक्यात जाणारं वाक्य!

*याचं अतिशय व्यक्तिगत कारण आहे, माझा भाऊ. वडील गेले तेव्हा मोकळेपणाने रडण्यासाठीही त्याला तब्बल चार दिवस वाट बघावी लागली.

शिल्पा नाईक's picture

15 Mar 2012 - 1:20 pm | शिल्पा नाईक

पेठे काकांच मत पटतय (कारण स्वानुभव). मला दोन जुळी मुले आहेत. एक मुलगा आणी एक मुलगी. दोघेहि अगदि जन्मा पासुनच typical आहेत. म्हणजे मुलीला सगळी बायकी काम (फरशी पुसणे, बाहुलीला झोपवणे अशी काम आवडतात, पण याच वेळी माझा मुलगा मात्र त्या बाहूलीला फेकुन देतो. त्याला गाड्या खुप आवड्तात.

दादा कोंडके's picture

15 Mar 2012 - 10:01 pm | दादा कोंडके

पेठे काकांच मत पटतय

वरती कुठेही पेठे यांचा प्रतिसाद नाहिये. तुम्हाला पेठकर असं म्हणायचं आहे का?
एखादा सदस्य जरा पण्णाशीच्या आसपास असला तर त्याला "काका" असं म्हटलंच पाहिजे का?* त्या सदस्याचं आडनाव व्यवस्थित लक्षात न ठेवता त्याला "काका" म्हणल्यावरच आदर व्यक्त होतो का?
बरं, काका म्हणल्यावर पुरुष तोंडातून ब्र काढत नसतील पण इथल्याच काही चाळीशीच्या पुढच्या स्त्रियांना काकू म्हणल्यावर राग येइल.** मी म्हणतो, इथं तुमची समानता की काय ती कुठे गेली?

* तुम्ही वैयक्तीक रित्या त्यांना ओळखत असाल, आणि पेठकरांची त्यांना पेठेकाका म्हटलेलं चालत असेल तर शेपुट घालून मी हा प्रतिसाद मागे घेतो. :)
** हे सिद्ध करण्यासाठी विदा वगैरे मागू नये.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2012 - 1:24 pm | प्रभाकर पेठकर

घरी पाहुणे येतात, पुरूष बाहेरच्या खोलीत बसतात, बायका आतल्या खोलीत.
गेला तो काळ. हल्ली बायकाही पुरुषांच्या बैठकीत बसून चर्चा करतात.

घरचा रोजचा स्वयंपाक, साफसफाई, बालसंगोपन घरातली स्त्री करते.
'स्त्री करते' नाही करायची. सगळ्याच नाही तरी अनेक घरांमधुन पुरुष मंडळी ही कामे करताना दिसतात.

बॅंकेतली कामं, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, अशा 'पुरूष' माणसांशी बोलून कामं करवून घेणं, यंत्रदुरूस्ती कामं घरातली पुरूषमंडळी करतात.
बँकेतील कामे बायका करताना सर्रास दिसतात. प्लंबर, इलेक्ट्रीशियन ह्यांच्या कामात पुरुषांना जास्त गती असल्या कारणाने पुरुष मंडळी करतात.

माळ्यावरचं सामान काढायला, प्रवासाला निघताना बॅगा उचलायला, इतर हमाली कामं करायला पुरूषमंडळीच असतात.

नैसर्गिक भेदाभेद. पुरुषांचे स्नायू स्त्रियांच्या स्नायुंपेक्षा अधिक बळकट असतात (सर्वसाधारणपणे) त्यामुळे वरील कामे पुरुषांकडे आली आहेत.

मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाई यांच्याशी घरातली स्त्री बोलते. भंगारवाला, रद्दीवाला, धारवाला या पुरूष लोकांशी, नाही म्हणायला स्त्रियाही बोलताना दिसतात

मोलकरीण, स्वयंपाकाच्या बाईंशी बोलायला पुरुष खुप 'उत्सुक' असतात पण सुरक्षेच्या कारणास्तव बायकोच बोलू देत नाही. (ह. घ्या.) भंगारवाला, धारवाला, रद्दीवाला ह्यांच्याशी पुरुषही बोलतात बरं! असो.

ह्यातही कुठे मला तथाकथित 'भडीमार' दिसत नाही.

शिल्पा नाईक's picture

15 Mar 2012 - 2:52 pm | शिल्पा नाईक

+१

सोत्रि's picture

15 Mar 2012 - 3:46 pm | सोत्रि

सहमत!

- (समानतावादी) सोकाजी

( सहमत असनार्‍या सोकाजींशी ) सहमत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Mar 2012 - 9:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या गोष्टी सगळ्या घरांमधून अशाच होतात असं नाही. पण अनेक घरांमधे हेच होतं. परिस्थिती काही घरांमधे बदलते आहे हे निश्चित. पण अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून स्टीरीओटाईप्सचा भडीमार लहान मुलांवर होतो.

वरच्या गोष्टींमधल्या अनेक गोष्टी मला माझ्या नाही तरी इतर अनेकांच्या घरांमधे दिसतात. "ही सगळी बायकी कामं" असं सरळच बोलण्याचा जमाना शहरांमधून हद्दपार झाला असेल, होतो आहे. त्यामुळे मी ज्याला भडीमार म्हणते आहे, तो अतिशय सटल लेव्हलवर होतो. घरी फर्निचर बनवणारा सुतार स्त्री बोलली तर दुर्लक्ष करतो आणि पुरुषाने सांगितलं तरच ऐकतो हे मी माझ्या लहानपणापासून पहात आले आहे. त्याने फारसा फरक पडत नाही. पण सुतार घरी गेल्यावर घरात आई-बाबा फर्निचरबद्दल काय आणि कसे बोलतात याचा प्रचंड फरक पडतो.

---

वरच्या एका प्रतिसादात दोन बालकांचं निरीक्षण करून काही निष्कर्ष मांडला आहे. अशा प्रकारचे निष्कर्ष संख्यात्मक पातळीवर काढण्यासाठी २ हा आकडा फार छोटा आहे. निदान १०० पटीने कमी आहे. माझ्याही ओळखीत दोन मुलगे आहेत ज्यांना अनुक्रमे पोळ्या करायची आणि भांडी घासायची फार आवड आहे. मला स्वतःला (आणि जाणत्या वयात झालेल्या काही मैत्रिणींनाही) भातुकली वगैरे खेळायची अजिबात आवड नव्हती. माझ्या घरातले बहुतेकसे पुरूष रोजचा स्वयंपाक अतिशय उत्तम करतात. पण एवढ्या कमी आकड्यांमधून संपूर्ण मानव जातीच्या मानसिकतेबद्दल बोलणं धोक्याचं आहे.

अवांतरः मुलं टिपिकल आहेत हे एवढंच वर्णन पुरेसं आहे. स्त्रीवादी, समानतावादी लेखनात, विचारवंतांमधे, (संपूर्ण जगातल्याच, भारत, महाराष्ट्र असंही नाही.) टिपिकल हा शब्द टाकाऊ या शब्दाप्रमाणेच निगेटीव्ह मानला जातो. मूर्तीभंजन किंवा iconoclasm हा शब्द उच्च मानला जातो.

Nile's picture

15 Mar 2012 - 10:04 pm | Nile

वरील संवादात निरीक्षणांवरून अनूवाद काढण्यापेक्षा जनुकीय(जेनेटीकली) असे गुण ट्रान्सफर होतात का यावर चर्चा केल्यास जास्त उपयोगी होईल.

दोन व्यक्ती वेगवेगळ्या वैयक्तिक निरीक्षणांवरुन वेगवेगळे तर्क काढत असतील तर त्याचा काही उपयोग नाही.

मुलींची भातुकली सारख्या गोष्टींची आवड किंवा मुलांची गाड्या वगैरे सारखी आवड जनुकांद्वारे निर्माण झालेली असते का?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Mar 2012 - 11:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अगदी सहमत आहे.

दोन नाही, निदान २०० बालकांचे सांपल घेऊन त्याचा अभ्यास करावा लागेल वगैरे विधानं त्याच संदर्भात केली आहेत. जनुकीय संदर्भात कोणते क्रोमोझोम्स रेसेसिव्ह आहेत आणि कोणते डॉमिनंट वगैरे अभ्यास करावा लागेल. असं काही करता येईल का नाही याबद्दल, मर्यादित वाचनानंतर माझं मत "सध्यातरी कठीण आहे" असं आहे.

त्यापेक्षा अनेक स्त्री-पुरुषांचं, बालकांचं निरीक्षण होत आहे, पण कशासाठी होत आहे हे न सांगता निरीक्षण केल्यास अगदी जनुकीय अभ्यासाएवढी नाही पण बरीच विश्वासार्ह (विश्वासु किंवा विश्वासू नव्हे, विश्वासू हा शब्द सजीवांसाठी वापरतात; निर्जीव गोष्टी विश्वासार्ह असतात) माहिती मिळेल.

शिल्पा ब's picture

15 Mar 2012 - 10:48 pm | शिल्पा ब

तुम्हाला स्त्रीमुक्ती वाल्यांचे ओक किंवा युयुत्सु म्हणावं का असं विचारावंसं वाटतयं. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Mar 2012 - 11:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

जरूर विचार. मिपावर थोडी व्यावहारिक अडचण येऊ शकते; तुझे-माझे प्रतिसाद इथे संपादित होतील की नाही माहित नाही. पण समुद्रात अडचणीचे वाटणारे लेख, प्रतिसाद आणि प्रश्न संपादित होत नाहीत.

विचारण्याच्या आधीच उत्तर देते. मला असं वाटत नाही. कारण माझं 'एकला चालो रे' नाहीये. "स्त्रियांना कड्याकुलपात, बुरख्यांआड बंदीस्त करा" असं इथेही कोणीही म्हणणार नाही. इथे आणि ऐसीअक्षरे दोन्ही संस्थळांवर माझ्या विचारांप्रमाणेच विचार असणारे लोकंही दिसताहेत. तू धनंजय, Pearl, Nile, पिलियन रायडर इत्यादींचे प्रतिसाद वाचले नाहीस का?

शिल्पा ब's picture

16 Mar 2012 - 2:10 am | शिल्पा ब

अर्थातच. पण हा किंवा तुझा धागा उगाच म्हणुन काढलाय असही नाही अन म्हणुनच मला तुझ्यापेक्षा पर्लचे प्रतिसाद जास्त संतुलित वाटले. तु त्रागा करुन उपप्रतिसाद देते आहेस असं जाणवलं म्हणुन वरचा प्रतिसाद. मला पेठकरांचा प्रतिसादसुद्धा आवडला.

सगळेच स्त्रीविरोधी म्हणता येणार नाहीत...खास करुन भारतात अन त्यातही उत्तर भारत (युपी, बिहार, झारखंड इ.) सोडला तर इतर ठीकाणी.

दुसरं म्हणजे कीतीही नोकरी केली किंवा इतर ठीकाणी कर्तुत्व दाखवले तरी जोपर्यंत घरात स्त्रीला मानाने वागवलं जात नाही तोपर्यंत बाहेरच्यांनी कसं वागावं याचा विचार करण्यात अर्थ नाही. त्यासाठी आपल्या लेकराला समान वागणुक देण्याचं शिकवलं तरच फरक पडेल.

अजुन एक - वरती बरेच प्रतिसाद आहेत तरीही - नुसती वेशभुषा बदलुन खट काही फरक पडणार नाही..

सार्वजनिकरीत्या जेव्हा कोणी एखादीचं लक्ष नसताना किंवा असतानाही घाणेरडेपणाने बोलताना किंवा हात लावताना तुम्ही बघता त्यावेळी काय करता? किंवा त्या स्त्रीने प्रतिकार केला तर तुम्ही काय करता? अगदी प्रत्येकवेळी नाही जमणार पण कधीतरी का होईना जमेलच. मी स्वतः प्रतिकार करते अन मदतही करते. अन गंमत म्हणजे माझ्या मदतीला सुद्धा फक्त मीच असते हा मुंबईतला अनुभव आहे जिथे मी २२-२३ वर्ष घालवली.

नुसते लेख पाडुन काहीही होणार नाही. कृती महत्वाची. नाहीतर इथे मारे बाजीराव अन वेळ आली की शेपुट घालुन पसार.

असो. इथे लिहीणारे जरी धाग्या धाग्यांवर स्त्रीदेहाबद्दल वाट्टेल ते लिहित असले तरी अशावेळी आम्ही अगदी सज्जन असंच लिहिणार म्हणुनच घरातुनच आई बापाने आदर्श ठेवणं हे अतिमहत्वाचं आहे...कारण मुलं त्यांचच बघुन शिकतात.

>>आपल्या लेकराला समान वागणुक देण्याचं शिकवलं तरच फरक पडेल.>>
+१

>>सार्वजनिकरीत्या जेव्हा कोणी एखादीचं लक्ष नसताना किंवा असतानाही घाणेरडेपणाने बोलताना किंवा हात लावताना तुम्ही बघता त्यावेळी काय करता? किंवा त्या स्त्रीने प्रतिकार केला तर तुम्ही काय करता? अगदी प्रत्येकवेळी नाही जमणार पण कधीतरी का होईना जमेलच. मी स्वतः प्रतिकार करते अन मदतही करते >>
त्याबद्दल तुमचं खरचं मनापासून अभिनंदन. खरच खूप गट्स लागतात असं वागायला.

>>नुसते लेख पाडुन काहीही होणार नाही. कृती महत्वाची.>>
लेखही महत्वाचे आहेत. नक्कीच. आणि कृतीही महत्वाची आहे.

>>घरातुनच आई बापाने आदर्श ठेवणं हे अतिमहत्वाचं आहे...कारण मुलं त्यांचच बघुन शिकतात. >>
+१

प्रभाकर पेठकर's picture

16 Mar 2012 - 11:43 am | प्रभाकर पेठकर

अदिती,

अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टींमधून स्टीरीओटाईप्सचा भडीमार लहान मुलांवर होतो.

'भडीमार' हा शब्द फारच सर्वसाधारण आणि गुळगुळीत अर्थाने वापरला जातो आहे. एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर अविरत किंवा अविश्रांत मारा होतो त्याला भडीमार करणे असे म्हणतात. जसे, गुन्हेगाराकडून गुन्ह्याची कबुली मिळविण्यासाठी पोलीस प्रश्नांचा भडीमार करतात. त्या प्रकारे घरात मुलांवर चुकीच्या संस्कारांचा भडीमार कधीच होत नाही. अशा पद्धतीने व्यक्तीमत्त्वे घडविणे शक्य असते तर सर्वाचीच मुले कर्तृत्ववाने, सज्जन, सरळमार्गी वगैरे झाली असती. मुलांना 'वाढविणे' ही समस्याच उरली नसती.

हं! 'बायकांसारखा रडतोस काय तू मुलगा आहेस नं!' हे वाक्य जरूर ऐकू येतं. पण, पुरुषांपेक्षा बायका जास्त संवेदनशील असतात त्यामुळे पुरुषांपेक्षा लहानसहान दु:खात, अपमानात, संकटात रडण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात. हे वास्तव तर मान्य असावं? भविष्यात, मोठेपणी येणारी संकटं, दु:ख, अपमान ह्याने खचून न जाता खंबिरपणे त्याला सामोरे जाणे, कुटुंबातील इतरांना आधार देणे ह्यासाठी कोणाला तरी एकाला 'तयार' करावेच लागते. नैसर्गिकरित्या स्त्रिया जास्त संवेदनशील, परिणामी संकटांचा सामना करताना बिचकतात. (आता लगेच कणखर बायकांची १०० उदाहरणे नकोत. परिस्थितीनुरुप {घरात आधार देणारा पुरुष नसला किंवा तोच फुसका असेल तर} बायकाही कणखर होतात. पण, अशा बायकांचे प्रमाण अगदी अत्यल्प असते.) जेंव्हा एखादी स्त्री संकटाचा सामना एकटी, कुणा पुरुषाच्या मदतीशिवाय, आधाराशिवाय करते तेंव्हा तिचे सर्वत्र कौतुक होते. पण पुरुषाने सामना केला तर कौतुक होत नाही कारण पुरुषाकडून तशी स्वाभाविक अपेक्षाच असते. म्हणूनच मुलांना जास्त कणखर बनविण्याचा प्रयत्न केला जातो. कोणीच कणखर नसेल आणि सगळे कुटुंब हातपाय गाळून बसले तर कसे व्हावे? संसारात स्त्री आणि पुरुष दोघेही मनाने कणखर असतील तर सोन्याहून पिवळे. पण संवेदनशील, कोमल मनाच्या मुलीला बळेच कणखर बनवायचा प्रत्यत्न करणे म्हणजे तिच्यावर अन्याय आणि भावनिक अत्याचारच होईल. स्वेच्छेने ती तशी बनलीच तर, ' तू मुलगी आहेस, रड.' असे कोणी म्हणत नाही.

मुलेही हळुवार मनाची असतात. (जशा स्त्रिया कणखर असू शकतात). कवी ग्रेस ह्यांची आई गेल्यावर केलेल्या कवितेत त्यांनी म्हंटले आहे, 'अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे' ह्या वाक्यातील त्यांचा भावनिक हळूवारपणा अंगावर काटा आणतो. तर, 'मेरी झांशी नही दूँगी म्हणणारी' झांशीची राणी मनाचा कणखरपणाच दाखवते.

"ही सगळी बायकी कामं" असं सरळच बोलण्याचा जमाना शहरांमधून हद्दपार झाला असेल, होतो आहे.

बौद्धीक कौशल्याच्या बाबतीत स्त्री-पुरुष भेदभाव करण्याचा जमाना मागे पडतो आहे. पडलाच पाहिजे. पण, शारीरीक स्नायुंच्या ताकदीच्या बाबतीत फरक हा राहणारच. तोही, जादूची कांडी फिरवून, स्त्रियांचे स्नायु पुरुषांप्रमाणे बलवान झाले तर नैसर्गिक वेगळेपणाच हरवून बसेल आणि स्त्रिपुरुष आकर्षणातली स्वाभाविकता नाहीशी होईल.

घरी फर्निचर बनवणारा सुतार स्त्री बोलली तर दुर्लक्ष करतो आणि पुरुषाने सांगितलं तरच ऐकतो हे मी माझ्या लहानपणापासून पहात आले आहे.

मी दोन घरांचे डिझाइनिंग, फर्निशिंग सर्व स्वतः केले. अर्थात, सुताराची मदत घेऊन. माझ्या पत्नीकडे कलात्मक दृष्टीकोन (अ‍ॅस्थेटीक सेन्स) कमी आहे तरीही माझा सुतार घरातल्या प्रत्येक फर्निचरच्या निर्माणात 'मेमसाहेबांचा' विचार जरूर घेतो. मी ही शक्यतो अडकाठी करीत नाही.
दुसर्‍यांच्या उदाहरणांना १-२ मुलांचे असे म्हणून सांखिकी विदा कमी असल्याची ओरड करताना स्वतः मात्र फक्त स्वतः चा अनुभव कथन करून तिच चुक करते आहेस. जगभरातील स्त्रिपुरुष समानतेवर चर्चा करताना २०० हे सँपलही 'दर्यामे खसखस आहे' पण ते तुला चालते आहे. जगभरातील स्त्रिपुरुष समानतेवर भाष्य करण्याइतका विदा आपल्या कोणाजवळच्याही वैयक्तीक अनुभवात नाही. त्यामुळे चर्चाच खुंटेल. जो तो स्वतःच्या अनुभवातीलच उदाहरणे देणार आणि त्यांनाच प्रातिनिधिक समजणार.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2012 - 4:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

एखाद्या गोष्टीचा एखाद्यावर अविरत किंवा अविश्रांत मारा होतो त्याला भडीमार करणे असे म्हणतात

एक्झॅ़टली. ती गोष्ट subtle (मराठी शब्द?) असो (उदा: आईचे, वडलांचे कोणाचेही स्नेही, नातेवाईक घरी आले की आई उठून चहा-पाणी पहाणार, बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत बसणार.) वा भडक (उदा: "बायकांसारखं रडू नकोस", अशा प्रकाराने लहान मुलांना "समजावणे".). माझा भडीमाराचा मुद्दा आहे तो या subtle गोष्टींच्या बाबतीत आहे.

पुरुषांपेक्षा बायका जास्त संवेदनशील असतात त्यामुळे पुरुषांपेक्षा लहानसहान दु:खात, अपमानात, संकटात रडण्यासारख्या गोष्टी त्यांच्याकडून होत असतात.

यातल्या अधोरेखित विधानावर आक्षेप. या विधानाला पुष्टी (न?) देणारी मानसशास्त्र संशोधकांची मतं मला अधिक ग्राह्य वाटतात.
त्यातून रडणे म्हणजेच्च कमकुवतपणाचे लक्षण यावरही आक्षेप. अप्रिय गोष्ट घडल्यास हमरीतुमरीवर उतरणे, धक्काबुक्की, शिवीगाळ इत्यादी प्रतिक्रियाही मनाचा निदान तेवढ्यापुरता कमकुवतपणाच दाखवतात; ज्या गोष्टी प्रामुख्याने पुरूष करतात. (रडणं असू देत वा शिवीगाळ/धक्काबुक्की करणे, यांपैकी कोणत्याही प्रकाराने भावना व्यक्त न करण्यातून मनाचा खंबीरपणा दिसतो यावरही माझा १००% विश्वास नाही*.) भावना व्यक्त करण्याची पद्धत शारीरिक क्षमतेवरून (अपवाद वगळता) ठरत असावी, हे विधान मला मान्य आहे; पण संवेदनशीलता शारीरिक बळावर अवलंबून असते हे मला मान्य नाही.

माझं आधीचं वाक्यही निदान १०० पटीने सांपल साईझ वाढवावा लागेल असं आहे; २०० बालकांचा अभ्यास करून ठोस निष्कर्ष काढता येतील असं नाही. (टीव्ही शोजच्या टीआरपीसाठी साधारणतः काही हजार लोकांचा सर्व्हे घेतात. वास्तविक भारतात टीव्ही पहाणारे लाखो लोक असतील.) इतर काही व्यक्तिगत अनुभव हे उदाहरणं म्हणून दिलेले होते; 1. बाहेरच्या व्यक्तींचा (क्वचितच भेटणारे काके-मामेही नाही, अगदी बाहेरचे) मुलांवर फार परिणाम होत नाही, पण घरातल्या मोठ्यांच्या वागण्याचा होतो आणि 2. स्टीरीओटायपिंग करणारे प्रसंग भडीमारासारखेच अंगावर कोसळत असतात हे सांगण्यासाठी.

*अतिशय जवळची प्रिय व्यक्ती निवर्तल्यावर रडणं ही स्त्री-पुरूषांची होणारी अतिशय स्वाभाविक होणारी प्रतिक्रिया आहे. पण त्यानंतर दहा दिवसांनीही व्यवहाराचा विचार सोडून रडतच बसणं हा कमकुवतपणा आहे. एकेकाळी, विशेषतः काही समाजांमधे, विधवांना इतर काहीच गती नसल्यामुळे सतत रडण्याशिवाय फारसा पर्यायच नसे. त्यांच्यावर तसं आयुष्य लादलंही जात असे.
एखाद्याशी तीव्र मतभेद झाल्यास राग येणं, त्यातून धुसफूस, धक्काबुक्की, शिवीगाळ करून व्यक्त होणं हे ही उत्क्रांतीमधून आल्यामुळे एक प्रकारे नैसर्गिकच आहे. पण दहा दिवसांनीही संवाद साधण्याऐवजी डोक्यात राख घालून घेणं हा ही कमकुवतपणाच आहे.
सेल्फ-पिटी किंवा आत्मदया हा ही एक मनाच्या कमकुवतपणाचा प्रकार. आर्थिक परिस्थिती, शारीरिक अडचणी, ही कारणं तर समजतातच पण निष्कारण असणारी आत्मदया हा पण मानसविकारतज्ञांना हाताळावा लागणारा प्रकार आहे.

प्रभाकर पेठकर's picture

17 Mar 2012 - 3:39 pm | प्रभाकर पेठकर

अदिती,

मला वाईट वाटते की मी चर्चेमध्ये तुला माझा मुद्दा पटवून देऊ शकलो नाही. ( की तुला पटवुनच घ्यायचा नाहीए? तसे असेल तर मी माझी शक्ती वाया घालविणे हे अत्यंत मूर्खपणाचे ठरेल.)

तरीपण हे शेवटचे.....

एक्झॅ़टली. ती गोष्ट subtle (मराठी शब्द?) असो (उदा: आईचे, वडलांचे कोणाचेही स्नेही, नातेवाईक घरी आले की आई उठून चहा-पाणी पहाणार, बाबा पाहुण्यांशी गप्पा मारत बसणार.) वा भडक (उदा: "बायकांसारखं रडू नकोस", अशा प्रकाराने लहान मुलांना "समजावणे".). माझा भडीमाराचा मुद्दा आहे तो या subtle गोष्टींच्या बाबतीत आहे.

आजकालच्या काळात नुसते चहा पाणीच नाही तर पुरुष पोहे सुद्धा करतात. तेंव्हा बायका एखाद्या वाहिनीवरील सिरियलच्या किंवा साड्यांच्या सेलच्या गप्पा मारत बसतात. 'आमचे हे नं, पोहे फार सुंदर करतात.' असे एखादे वाक्य टाकले की काम भागते.
जाताना घरची स्त्री पाहुण्या स्त्रीला कुंकू लावते. पाहुण्या पुरुषाला टिळा का लावित नाही? असमानता का अधोरेखित करते?
'बायकांसारखे रडू नकोस' वर भाष्य करून झाले आहे. तेंव्हा त्यावर आता काही लिहीत नाही.

ह्याला मी 'भडीमार' म्हणत नाही, मानत नाही. असेलच तर खालील गोष्टी का नाहीत??

स्री दाक्षिण्याची अपेक्षा, स्त्रियांनी वेगळा खास असा मान अपेक्षिणं. वादावादी कितीही विकोपाला गेली तरी स्त्रीवर हात न उचलणं. स्रियांसाठी वेगळी रांग पाहणं, पुरुषांच्या रांगेत आजारी, वृद्ध कितीही ताटकळत उभे असले तरी त्यांच्यापेक्षा शारीरिक पातळीवर सशक्त असणार्‍या तरूण स्त्रियांना फक्त ती स्त्री आहे म्हणून खास वेगळ्या रांगेने पुढे जाउ देणं. समानतेच्या जमान्यात स्त्रियांसाठी रेल्वेत वेगळे डबे असणं आणि ते असूनही काही स्त्रियांनी पुरुषांच्या डब्यातून प्रवास करणं, पण स्रियांच्या डब्यातून सहकुटुंब सहपरिवार प्रवास करायलाही पुरुषांना परवानगी नसणं, पुरुषांच्या दाढीच्या रेझरच्या आणि अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत स्त्रियांचा सहभाग, पुरुषांना आकर्षित करणार्‍या अंग प्रत्यंगाचे खुलेआम प्रदर्शन करणे, त्यावर कुणाही स्त्रिमुक्ती किंवा असमानतेवर आरडाओरडा करणार्‍या संस्थांनी भाष्य न करणे, अशा मॉडेल्सना, 'ह्या तुमच्या वागण्याने 'असमानता' अधोरिखित होते आहे' हे का समजाविले जात नाही, अशा जाहिरातींवर, देह प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी सरकार-दरबारी का लावुन धरली जात नाही.
अशा अनेक, अनेक, अनेक, अनेक गोष्टींचा भडीमार पुरुषांच्या डोळ्यांवर, मनावर होत राहतो आणि स्त्री आणि पुरुष वेगळे आहेत हेच जन्मभर मनावर बिंबविले जाते. त्यावर का कोणी भाष्य करीत नाही. फक्त घरचा पुरुष मुलांवर चुकीच्या संस्कारांचा भडीमार करतो आणि बाहेरच्या जगात स्त्री जो 'असमानतेचा' भडीमार करीत असते तिला कधी तू दोष देणार?
स्त्रियांच्या ह्या असमानतेचा आग्रह धरण्याच्या भूमिकेबद्दल तुझे मानसशास्त्र संशोधक काय म्हणतात हेही जाणून घ्यायला आवडेल मला.

यातल्या अधोरेखित विधानावर आक्षेप. या विधानाला पुष्टी (न?) देणारी मानसशास्त्र संशोधकांची मतं मला अधिक ग्राह्य वाटतात.

तसे असेल तर चर्चेच्या मुळ विषयावरच मानसशास्त्र संशोधकांची मते विचारात घेऊन आपले मत बनवावे. उगाच आम्हा गावंढळांची मते विचारून वेळेचा आणि विचारांचा अपव्यय कशासाठी?

त्यातून रडणे म्हणजेच्च कमकुवतपणाचे लक्षण यावरही आक्षेप.

मनाने सशक्त माणसेही हाताळता न येणार्‍या दु:खद भावनांनी तात्पुरती हतबल/विव्हळ होऊन अश्रू ढाळतात. पण तुलनेने लवकर सावरतात आणि समस्येच्या, दु:खाच्या निराकरणावर उपाय शोधण्याच्या मागे लागतात. मनाने कमकुवत माणसे लवकर सावरत नाहीत. किंबहुना, खुपदा, ह्या दु:खावर, समस्येवर काही उपायच नाही असा मनाचा ग्रह करून घेऊन हातपाय गाळून बसतात.

अप्रिय गोष्ट घडल्यास हमरीतुमरीवर उतरणे, धक्काबुक्की, शिवीगाळ इत्यादी प्रतिक्रियाही मनाचा निदान तेवढ्यापुरता कमकुवतपणाच दाखवतात;

हा मनाच्या कमकुवतपणापेक्षा बौद्धीक कमकुवत पणा आहे असे नाही वाटत?

आता, तुझी मानसशास्त्र संशोधक काहीही म्हणोत. माझ्या आजवरच्या आयुष्यातील अनुभवांवरून/ निरिक्षणांवरून मी माझी मते बनविली आहेत. ती तुला पटावीच असा माझा आग्रह नाही.

धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Mar 2012 - 11:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कुंकू लावणं हीच मुळात असमानता आहे. विधवेला, घटस्फोटीतेला ते लावत नाहीत त्यामधे ती अतिशय क्रूर पद्धतीने अधोरेखित होते.

मानसशास्त्र संशोधक काहीही म्हणोत

मग थांबू या. :-)

पैसा's picture

18 Mar 2012 - 6:49 am | पैसा

एका खेड्यात एका अशिक्षित आजीच्या तोंडून ३५ वर्षांपूर्वी मी हे ऐकलं होतं, " कुंकू आपण लग्न व्हायचा आधीपासून लावतो, मग कुंकू लावायला नवरा असला नसला काय फरक पडतो?" आता आसपास पाहते, तर कोणी असा भेदभाव करताना मला कधी दिसलं नाही. अगदी ख्रिश्चन आणि मुस्लिम बायकाना पण हळदीकुंकवाला बोलवून कुंकू लावतात.

कमॉन यार! मला तरी १०० तले ९०/९५ लोक चांगलेच भेटतात. तुलाच हे खवट लोक तेही पुणे आणि ठाणे अशा ठिकाणी, कुठून भेटतात?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2012 - 10:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कमॉन यार! मला तरी १०० तले ९०/९५ लोक चांगलेच भेटतात. तुलाच हे खवट लोक तेही पुणे आणि ठाणे अशा ठिकाणी, कुठून भेटतात?

प्रश्न चष्म्याचा आहे पैसा ताई.. आपण ज्या रंगाचा चष्मा घालू त्या रंगाची दुनिया दिसते. मग कुणी माहेरवाशीण म्हटले तरी त्यात खवचटपणाच दिसतो (ह्याला साधारण दोन वर्षांपूर्वीच्या चर्चेचा संदर्भ आहे)
असो, पण म्हणून चष्मा न काढता दुनियेला नावे ठेऊ नयेत. सगळ्या वाईट गोष्टी भिंगातून पहिल्या तर मोठ्याच दिसणार...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2012 - 2:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद व्यक्तिगत असल्यामुळे उत्तर जाहीर देण्याची इच्छा नाही.

---

अधिक विचारान्ती काही उदाहरणंच (विवेचन नव्हे!) लिहीण्याची इच्छा झाली आहे. प्रति-प्रतिसाद न देण्याबद्दल पैसाचे आभार.

मला भेटलेली माणसं वाईट नाहीत; यांतले अनेक लोक गोड आहेत. पण ती माणसं व्यवस्थेची बळी आहेत; इतर क्षेत्रांत क्वचित नामांकितही आहेत पण या बाबतीत विचार न करणारी आहेत. माझ्या नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमधे भरपूर शॉव्हनिस्ट आहेत. आणि यातल्या बहुतेकांकडे माझं शक्यतोवर जाणं-येणं आहे.

विधवेला कुंकू लावू नको म्हणणारी काकू आहे. "लग्नानंतर ते तुझं नाव काय ठेवणार" असं मला विचारणारी मावशी आहे. आई-वडलांनी मागे ठेवलेल्या प्रॉपर्टीवर मला मालक न समजता माहेरवाशीण (अर्थात यात थोडा भाग व्यक्तीगत आयुष्यावर आक्रमणाचाही आहे.) समजणारी शेजारची बाई आहे. "बाकी तुझं करियर वगैरे ठीक आहे, पण घरच्या पाहुण्यांचं आगतस्वागत नीट व्हायलाच हवं" असं म्हणणारे मित्र+काका आहेत. यांच्यात झालेला एक चांगला बदल म्हणजे आता माझ्या वयाच्या मुलगी-सून-मैत्रिणीकडून त्यांच्या अशा अपेक्षा नाहीत. पण आजही त्या घरी गेलं की काकूच सतत स्वयंपाकघरात असते आणि आम्ही कोणी टोकतो तेव्हाच काका भाज्या निवडायला बसतात. "आडनाव बदललं की कटकट नसते म्हणूनतरी बदल" असं म्हणणारे तर असंख्य नातेवाईक, सहकारी आणि ओळखीचे आहेत.

"सेन्सिबल मुलगी मिळाली तरच लग्न करेन" असं म्हणणार्‍या एका मित्राला भेटलेल्या सगळ्या सेन्सिबल मुली ह्याचा पगार कमी म्हणून नाही म्हणतात. (इथेही मौजेचा भाग असा की इतर पुरूषांच्याच डॉमिनंट वागण्यामुळे ह्याला त्रास होतो.) वयाने मोठ्या मुलीशी लग्न करणार म्हणून मुलाला टाकणारे आई-वडील माहित आहेत. (मुलाला त्याचा फरक पडत नाही हा भाग निराळा!) किंवा याच कारणास्तव आईवडलांशी खोटं बोलणारे काही मित्र-मैत्रिणी आहेत.

---

मला हे लोकं का दिसतात? कारण शॉव्हनिझम आणि इतर गोष्टी यांची गल्लत मी करत नाही. शॉव्हनिझमचा विचार करताना मी इतर चष्मे काढून ठेवते.

रेवती's picture

18 Mar 2012 - 8:46 pm | रेवती

हो, हे क्रूर वगैरे असेल, म्हणजे आहेच पण परिस्थिती बदलतिये ही आनंदाची बातमी नाकारून चालणार नाही. हैद्राबादला हळदीकुंकवाला एक विधवा आजी "याल का?" असे मी विचारताच आनंदाने तयार झाल्या होत्या, नंतर तर सवाष्ण म्हणूनही सुनेबरोबर जेवायला आल्या. त्यावेळी त्यांचे वय ७० वगैरे असेल. एका खेड्यातून पुण्यात आलेल्या आईच्या मैत्रिणीचा नवरा अचानक निवर्तल्यावर तीन लहान मुलांना वाढवताना 'सोय' म्हणून का होईना त्या बाईंनी कुंकू, मंगळसूत्र यांचा त्याग केला नाही आणि त्यांच्या कोल्हापूरजवळच्या छोट्या खेड्यातल्या नातेवाईकांनी अगदी जिव्हारी वगैरे लागेल अशी टीकाही केली नाही (केली तरी त्यांच्याकडे लक्ष कोण देणार? ;) ). आता मुलींची लग्नं झालीत आणि दोन्ही आंतरजातीय लग्नं यांनीच अगदी ठरवून करून दिलीत. सगळा भारत अस्साच बदलायला हवा हा आग्रह मी आत्ता धरणार नाही पण परिस्थिती बदलतीये आणि सुदैवाने बदललेल्या परिस्थिचा फायदा होणार्‍या अनेक मुलींमध्ये मीही आहे याचा आनंद होतो. त्यात माझे कर्तृत्व किती? फारसे नाही. आता मी यातून काय शिकायचे/धडा घ्यायचा वगैरे गोष्टी आहेतच.:)

कवितानागेश's picture

19 Mar 2012 - 11:50 am | कवितानागेश

सहमत.
मी आजपर्यंत कुंकू न लावणारी विधवा बाई पाहिली नाहीये. ( अपवादः आजी. पण ती १९१३ च्या बॅचमधली होती)
शिवाय कुंकू, गंध लावणरे आणि हौसेनी कान टोचणारे पुरुष देखिल पाहिलेत.

स्वगतः दोघांचेही कुणीतरी 'कान टोचणे' हीच ती समनता असेल का बरे???? :P

रम्या's picture

16 Mar 2012 - 11:40 am | रम्या

+१,
माझ्या लडक्या पुतणीला लहानपणापासून पुष्कळ मोकळ्या वातवारणात वाढवलं. खेळणी म्हणून पुष्कळ गाड्या आणून दिल्या. पण तिच्या आवडत्या मात्र बाहूल्या, भांडीकुंडी ! आम्हीतरी काही वेगळी वागणुक दिल्याचं आठवत नाही.

स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.जस काही अन्याय वगैरे फक्त स्त्रियांवरच होतो.ज्यांना ज्यांना अस वाटतंय न त्यांनी एकदा पुरुषांच्या जोड्यात पाय घालून बघा.अगदी लहानपणापासूनच त्यांना आपल्या अडचणी भावना केवळ पुरुष आहे म्हणून गाठोड्यात बांधून ठेवाव्या लागतात.मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना? महाविद्यालयीन अडमिशन बद्दलही तेच...पुढे जाऊन जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतो.बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?वृध्द आणि अपंगांच्या जागेवरही तरुण बसलेले असतातच न.राहिली गोष्ट गर्भवती स्त्रियांची किवा ज्यांच्या कडेवर मुल आहे अशा स्त्रियांची.त्यांना बसायला पुरुष जागा करून देतात...पण स्त्रिया नाही.अनेकदा पुरुषही बस मध्ये तान्हा बाळाला कडेवर घेऊन येतात पण त्यांना कोणी जागा देत नाही.अगदी प्रामाणिकपणे मीही दिली नव्हती.उलट त्यालाच मी घेते बाळाला म्हणून ते बाल पूर्णवेळ माझ्याकडे ठेवाल होत.घरी दमून भागून पुरुष घरी आला कि त्याला दिवस कशा दगदगीत गेला असेल याचा विचार न करता तुमच्याशी लग्न करून मी काय काय गमावलं याची यादी दिली जाते.स्त्रिया स्वतःच्या दुखाची जाहिरात करून दुसर्या स्तीयांची आणि पुशांचीही सहानभूती मिळवण्यात यशस्वी झाल्यात.
हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.

आहाहा... कैलास जीवनच्या जाहिरातीत काशाच्या वाटीने थकल्याभागल्या आजोबांचे पायाचे तळवे चोळणारी आजी दाखवली आहे.. त्यावेळच्या आजोबांच्या चेहर्‍यासारखे भाव समस्त पुरुषांच्या तोंडावर आले असावेत हा प्रतिसाद वाचून.. ;)

नगरीनिरंजन's picture

13 Mar 2012 - 1:48 pm | नगरीनिरंजन

किचेनतै,
पावलांचा फोटो पाठवणे.

प्रतिसाद वाचुन डॉले खरच पाणावले.

सुहास झेले's picture

13 Mar 2012 - 4:11 pm | सुहास झेले

खरंय ....

स्पा's picture

13 Mar 2012 - 1:24 pm | स्पा

हेच आणि असेच म्हणतो :D

प्रचेतस's picture

13 Mar 2012 - 1:29 pm | प्रचेतस

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

सोत्रि's picture

13 Mar 2012 - 2:19 pm | सोत्रि

आधि गवि आणि गणपाशी बाडिस होतो. :)

स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.

हे विधान जरा अ‍ॅग्रेसिव्ह वाटते आहे. जशी तुम्ही दुसरी बाजू मांडलीत तसेच मकी, बिका, सन्जोपरावांच्या प्रतिसादांचा विचार करता तो मूर्खपणा आहे असे अजिबात नसावे.

- (शहाणा) सोकाजी

असू दे हो थोडावेळ.. थांबा हो जरा सोत्रि... ;)

किचेनतै, कुणीतरी दुसरी बाजु घेणं अतिशय गरजेचं होतं, ती घेतल्याबद्दल धन्यवाद. अर्थात तुमच्या व्यवसायामधला अनुभव पाहता या मताला विशेष महत्व आहे हे निश्चित. अर्थात ही दुसरी बाजु मांडताना थोडासा एकटोकीपणा आला आहे, पण चर्चेसाठी ते आवश्यक आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2012 - 3:56 pm | अत्रुप्त आत्मा

पन्नासशी-शंभर टक्के सहमत ... :-)

@राहिली गोष्ट गर्भवती स्त्रियांची किवा ज्यांच्या कडेवर मुल आहे अशा स्त्रियांची.त्यांना बसायला पुरुष जागा करून देतात...पण स्त्रिया नाही.अनेकदा पुरुषही बस मध्ये तान्हा बाळाला कडेवर घेऊन येतात पण त्यांना कोणी जागा देत नाही.अगदी प्रामाणिकपणे मीही दिली नव्हती.उलट त्यालाच मी घेते बाळाला म्हणून ते बाल पूर्णवेळ माझ्याकडे ठेवाल होत.>>> आणी किच्चुतैच्या या नम्र कथनाला सलाम ---^---

छोटा डॉन's picture

13 Mar 2012 - 2:27 pm | छोटा डॉन

सहमत आहे.

- छोटा डॉन

अन्नू's picture

13 Mar 2012 - 3:22 pm | अन्नू

किचन बैचा यीजय असो...!
द्रौपदीची इज्जत वाचीवणार्‍या किसनासारख्याच धाऊन आलात बगा!

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2012 - 3:58 pm | पिलीयन रायडर

ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत...
तरी आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %) इ अनेक " मुर्ख" विषयांवर द्यावे...

कसय ना ताई... स्त्री - पुरुष समानता म्हणताना पुरुषांना काही दु:ख नाहीच असं कोणी म्हणत्च नाहीये हो... पण मी वर उल्लेखलेल्या बर्याच गंभीर समस्या स्त्री च्या बाबतीत दिसतात... त्यांच काय?

जगात मुर्ख, कजाग, भांड्खोर बाई आणि वरील समस्या समजु शकणारे पुरुष नाहीतच असं कोणी म्हणलच नाहीये.. पण स्त्री म्हणुन भेडसावणार्या समस्या सहन करणार्या बायका आणि त्याची जाणिव अजिबात नसणारे पुरुष थोडे जास्त आहेत हो...

मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना?

मुलगी म्हणजे खर्च असं सोप्प समीकरण लावुन मुलींना अगदी पुरुन टाकणारे, कचर्यात टाकणारे पालक आहेत हे तुम्हाला माहित नाही काय? असे लोक मुलींवर शिक्षणाचा खर्च करतील का??

~`^

जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतो

किती ते जनरलाय्जेशन?? किती मुलं आपल्या पेक्षा जास्त पगार असणार्या मुलीला स्विकारायला तयार असतात? किती पालक असे आहेत जे "मुलगी लग्ना नंतर नोकरी सोडणार नाही" असं ठणकावुन सांगु शकतात? किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??

बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?

मासिक धर्म ज्यात अनेक मुली बराच त्रास सहन करतात.. अशा वेळी गर्दी मध्ये पुरुषांचे स्पर्श आणि धक्के सहन करण्या पेक्षा त्यांना हकाची जागा मिळु नये का?? तुमच्या महिती साठी मी कधीही जागे साठी भांडत नाही आणि गरजु पुरुषाला जागाही करुन देते...

हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.

खर तर तुमच्या ह्या वाक्या नंतर प्रतिक्रिया देण्याची इच्छा मेली होती....

राजेश घासकडवी's picture

13 Mar 2012 - 9:39 pm | राजेश घासकडवी

भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %)

किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??

स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेत विषमता म्हणजे खरोखर काय हे सांगणारा एकमेव प्रतिसाद. वरचे मुद्दे सोडून उंची, बसमध्ये जागा, पेताडगिरी वगैरे मुद्दे मांडलेले पाहून गंमत वाटली.

+१
पिलियनच्या मताशी पूर्णत सहमत

Pearl's picture

16 Mar 2012 - 7:18 am | Pearl

पिलीयन रायडर यांच्याशी +१

<<ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत..<<
याला तर एक्सक्लुसिव +१.

आणि खरचं आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी याविषयी द्यावे. वाचायला आवडेल.

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.
२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.
३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो.
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)

शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.
२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.
३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो.
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)

शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

कवितानागेश's picture

17 Mar 2012 - 7:04 pm | कवितानागेश

कधीपासून याच मुद्द्यांवर लिहायचे होते,
पण ......
फक्त एकच टिप्पणी करतेय...
अनेक घरांमधून दिसणारी गोष्ट आहे. जेंव्हा एखाद्या घरात मुलीला 'परकी' होनार म्हणून कमीपणाची वागणूक आणि मुलाला मात्र 'आपला सांभाळ' करणार म्हणून 'प्रेमाची' वागणूक मिळते तेंव्हा तिथे दोन्हीकडेही 'अर्थकारण'च असते. मुलाला काही 'निरपेक्ष प्रेम' वगरै मिळालेले नसते.
त्याच्यापुढची आव्हाने वेगळी असतात.
थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो!

मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.

शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.

करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का?

एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.

माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो.

मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते.

प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.

या मुद्द्याचा तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यातला विरोधाभास कळेल. मुलीचे लग्न झाले की तिचा माहेरशी संबध कारणपरत्वे असतो. तसेच मुलीच्या सासरी आई वडिल सारखे सारखे जाऊ शकत नाही कारण लगेच त्यांना "लेकीकडे जाईन, तुपरोटी खाईन, धष्ट पुष्ट होईन ..." इत्यदि कथा + टोमणे ऐकवले जातात. पण हेच आईवडिल स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून फक्त सेवा घेत नाहीत तर त्याच्या संसाराला सर्वोतोपरी मदत करतात. काही लेकुरवाळे आजीआजोबा माझ्या माहीतीमधे आहेत जे आपले वय, दुखणी विसरून नातवंडांचे संगोपन करतात, घरच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडतात. आणि निवृत्तीच्या वयात देखील घरातील कामे करत नाही म्हणून मुलाची आणि सुनेची बोलणी (काही जण) ऐकून घेतात. मुलीप्रमाणेच मुलाच्याही शिक्षणाला, लग्नाला खर्च येतोच. मग त्या मुलाने आईवडिलांसाठी काही केले तर त्याची एव्हढी जाहिरात करण्याचे काय कारण ?
राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क?

(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)

असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना?
आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.

शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

हे लाखमोलाचे वाक्य आहे. पण हे फक्त स्त्रियांनी बोलून उपयोगी नाही तर पुरूषाना देखीत ते कळले पाहिजे.

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.
+१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)

शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.

करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का? - प्रश्न विचारताना एक अतिशय महत्वाचा शब्द गाळलात तुम्ही ' आवडीच्या' , हेच मुलांबद्दल ही होते. - घराची परिस्थिती सांभाळण्यासाठी करियर करणे आणि आवडीच्या क्षेत्रात करीयर करणे यात फरक आहे, मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी तरी समजुन आहे.

एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.

माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो.

मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते. - आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय.

प्रत्येकवेळेस ...करण्याचे काय कारण ?(बराच भाग गाळला आहे, उगा मेगाबायटी प्रतिसाद व्हायला नको)
राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क? - मुलगी, सासर, माहेर, पगार आणि खर्च यावर एक वेगळी चर्चा इथं झाली आहे आधी.

आणि वर लिमाउजेटनी लिहिलंय तसं, या समानतेच्या ओढाताणीत 'थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो! - हे आपण विसरुनच जातो.
मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.' + १००००

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.
+१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)

विवाह जुळवण्याच्या व्यवसाय ....... ...... ........ !!! असो.

२. माझा आक्षेप मुभा म्हणजे परवानगी या शब्दाला होता. तिने आवडीच्या किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करावे की न करावे या साठी तिला इतरांची परवानगी कशासाठी हवी.
मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी देखील समजूत आहे. पण हे ही माहीती आहे की प्रत्येकाला आपल्याला हवं तेच करायला मिळते असे नाही. पण त्यातही स्त्रियांना करायला लागणार्‍या तडजोडीचे प्रमाण खूपच जास्त आहे.

३.....
४.

आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय.

मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये.

५०-जी ... तुम्ही माझीच वाक्ये तुमच्या प्रतिसादात कॉपी-पेस्ट केली आहेत. आणि त्यावर तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?

>>५०-जी ... तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?>>
+१

प्रतिसादावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे ते खरचं कळत नाहिये.
थोडे विस्कटून सांगाल का.

५० फक्त's picture

19 Mar 2012 - 8:50 am | ५० फक्त

१. मी तर म्हणतो, निदान मुलींना परवानगी मागावी लागते म्हणजे एक पर्याय उपलब्ध तरी आहे, एक जर - तर चं स्टेटमेंट तरी आहे, पण मुलांना हा पर्यायच नाही, शिक्षण झालं की लगेच किंवा ते अर्धवट सोडुन सुद्धा संसाराची, मग तो कुणाचाही असो, कारण रुढार्थानं लग्न झाल्याशिवाय स्वताचा संसार नसतो, मग वडिलांने जे काही निर्माण करुन ठेवलं आहे, मग ती मुलं असोत किंवा कर्ज याची जबाबदारी घ्यावीच लागते, हा अन्याय नाही का ? एखादी गोष्ट करायची किंवा करायची नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं हा अन्यायच ना ? मुलीनं नोकरी नाही केली तर घरकाम करेल अन लग्न करुन जाईल तिच्या घरी हा राजमार्ग आहे, पण मुलाला हा / किंवा असा कोणताही पर्याय उपलब्धच नाही असं का ?

२. मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. - मग सासरच्या घरात जी काही मोठी पदं असतात ती एकतर वय वाढल्यानं मिळतात किंवा घरातल्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्यानं मिळतात, उगा लग्न करुन सासरी आलात की त्या घरातलं सगळ्यात महत्वाचं पद, अधिकाराचं पद, निर्णय घेणारं पद मला लगेच मिळावं हा अट्टाहास कशासाठी ? आणि कराव्या लागल्या यासाठी तडजोडी तर काय हरकत आहे ? मागच्याच आठवड्यातले उदाहरण, सासु नोकरी करु देत नाही म्हणुन सुनेने आयब्रो करण्याच्या निमित्ताने तिचा खुन केला, केली तडजोड खुन करुन तुरुंगात जाण्याच?, आता तुरुंगातुन नोकरी करायला जाउ देत नाहीत म्हणुन जेलरचा खुन करणार ?

मा. पिलियन रायडर यांचे 'माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. ' हे मत, विमे म्हणतात तसं ' ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे , जसं की माजलेली विवाहसंस्था वगैरे ' की याबाबत काही अनुभव आहे, हे समजले म्हणजे त्यावर पुढे चर्चा करता येईल. याबाबत विमेंशी सहमत.

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2012 - 9:02 pm | पिलीयन रायडर

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.
+१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)

हे वाक्य बर्‍याचदा वाचलय म्हणुन...
ह्याच ताईनी मागे एकदा "ईंजिनिअर" मुलींबद्दल पण मत व्यक्त केले होते.. आता तेव्हा आमच्या सारख्या "पुरुष्प्रधान" मेकॅनिकल मध्ये काम करणार्या मुलींनी मत मांडले होते तेव्हा नाही कुणि आमचे प्रोफाईल ग्रुहित धरले...

उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. किचेन ह्यांना जास्त जाणीव हवी...आणि बोलण्याचे तारतम्य सुद्धा.... (दुवा: ताईंची शब्दकमले: मुर्खपणा..स्टुपिडिटि...)

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे.

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे.

अग काय हे किचन तै ?
मी सुद्धा एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता आहे ,मागे ही तु एकदा असच म्हणाली होती एका धाग्यावर की, म्याकेनिकल फिल्ड मधल्या मुलीना "अप्रन " घालायची लाज वाटते,हाताला ऑइल ,ग्रीस,बर , लागुन हात खराब होउ नयेत म्हनुन मुली फार काळजी घेतात वैगेरे वैगेर .....
मला एक कळत नाही ति एक स्त्री असौन नेहमी विरोधी पार्टीची च का साइड घेते ? तुला मुलाचीच बाजु नेहमी योग्य वाट्ते
अग जशी परिस्थिती तसे प्रत्येकाचे वेगवेगळॅ अनुभव असतात ,समस्त स्त्री - पुरुषाना एकाच पारड्यात कस तोलणार?
केवळ मुलगा आहे म्हणुण तो आपल्या आइ-वडिलाची म्हातरपणाची काठी आहे अन तो शेवट्पर्यन्त साम्भाळेल याची काहीच शाश्वती नाही ,उलट एका घरात राहुन सुद्धा म्हातार्या आइच्या सुष्रुसेसाठी कामवाली बाइ ठॅवलेली मी रोज पाहते आहे ,त्या उलट वडील नाहित अन तीनही बहिणी आहेत म्हणूण नोकरी करणार्या ,अन घर साम्भाळ्नार्या मुलीही मी रोज पाहते

" स्त्री - पुरुष समानता वैगेरे वैगेर कोणत्या मापद्ण्डाने तोलन्याची मुळात गरजच काय ?
प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळ अण अनुभव वेगवेगळॅ जगण्याची धड्पड वेगवेगळि ,
इथे समाजातल्या काही वर्गाला दोन वेळ्च्या जेवणाची भ्रान्त पड्ली आहे ,असे वर्गातले स्त्री - पुरुष कसलाही भेदभाव अथवा समानता न ठॅवता कम्बर कसुन काम करतात हे रोज पाहतोच की आपण :)

" एकुणच काय प्रत्येकाचे जगण्याचे निकष हे ज्या त्या कुटुम्बाच्या (आर्थिक्,सामाजिक,भावनिक)परिस्थीतीवर अवलम्बुन असतात स्त्री-पुरुष समानतेवर अथवा भिन्नतेवर नाही :)
अजुन काय बोलणार या मुद्द्यावर? असो........

मी जेव्हा तपासणी अभियंता म्हणून काम करत होते तेव्हा मुलांनी मला खरच खूप मदत केली.जेव्हा जड जोब वरच्या मजल्यावर न्यायचे असायचे तेव्हा मुल मला मदत करायची.मीही त्यांना .आमचे सगळ्यांचेच कपडे ग्रीस आणि धूळ वगैरेनी भरलेले असायचे.हात धुवायला आमच्या कंपनीत रीन साबण वापरायचे.पण कोणाची तक्रार नव्हती.ती सुरु झाली ती दुसरी एक मुलगी आल्यावर.याव उचलणार नाही, त्याला हात लावणार नाही,रीन्ने हात धुणार नाही,तुझा जोब तू ने कि वर मी का तुला मदत करू? वगैरे सुरु झाल,मी फक्त टेबलवर पी सी बी तपासणार अस सुरु झाल..साहजिकच जी मुल तिला मदत करत होती त्यांनी तिला मदत करण्यात फार उत्साह दाखवला नाही.तिने वारीस्थांकडे जाऊन फक्त टेबलवर काम करण्याची परवानगी मागितली.ती तिला मिळाली हि.कारण ती मुलगी होती.

पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच.निदान आपले वडील, किवा भाऊ, नवरा, दीर यांच्या बरोबर पण स्वतःला कम्पेअर कर. माझी खात्री आहे त्यानंतर तूला जाणीव होईल कि पुरुषाचा जन्म सोपा नाही. मी आधी बोलल्याप्रमाणे निदान एकदा तरी पुरुषाच्या चपलेत पाय घालून बघा.जेवढ वाटत तेवढ सोप नाहीये.

मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रियांचीच बाजू घेतली पाहिजे ..ये बात कूच हजम नही हुई.आणि जेव्हा दिसतंय कि पुरुषांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय, अशा अडचणी ज्या माझ्यावर आल्या तर मी किवा आपल्यापैकी अनेक स्त्रिया त्यांना तोंड देण्याऐवजी तोंड फिरवून निघून जाईल, तेव्हा मी स्त्रियांचीच बाजू घेईल अशी अपेक्षा का?

पियुशा's picture

19 Mar 2012 - 4:43 pm | पियुशा

पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच.
अस्स असेल तर मग मी त्या मुलापेक्षा नक्कीच १०० % आउट पूट देत असेल निश्चित
एक सान्गते आमच्याकडे १०० % इन्स्पेक्शन आहे नो एक्स्क्युज , तरीही मुल जॉब चेक करण्यात जो आळशीपणा दाखव्तात तो मी रोजच पाहते आहे भलेही तो माझा मित्र का असेना :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

18 Mar 2012 - 10:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे

बाकीचे मुद्दे राहूदेत, त्यावर बरीच चर्चा झाली आहे. या तुमच्या मौलिक मतावर अजून जाणून घेणे आवडेल. एक धागाच काढा ना तुम्ही.

स्वगत :- टोकाची मते मांडून आपण आपलीच गोची करतो हे लोकांच्या का लक्षात येत नाही ??

शिल्पा ब's picture

18 Mar 2012 - 10:59 pm | शिल्पा ब

हे कसं चुक ते तुम्ही का नाही पटवुन देत? प्रतिवाद तुम्ही करताय म्हणुन विचारलं.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Mar 2012 - 12:06 am | विश्वनाथ मेहेंदळे

यात प्रतिवाद कुठे दिसला तुम्हाला ?? मुळात प्रतिवाद करायला त्यांनी "वाद" कुठे केलाय. मुद्दे मांडलेच नाहीत या बाबतीत. ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे. अशा प्रत्येक blanket स्टेटमेंटचा प्रतिवाद करायला वेळ/शक्ती/कुवत/इच्छा/हौस नाही माझ्याकडे. त्यांना त्यांचे मुद्दे सप्रमाण मांडू देत, मग बोलू ...

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2012 - 12:32 pm | पिलीयन रायडर

एवढं माझ्या मताला मौलीक वगैरे म्हणल्य बद्दल धन्यवाद...
कसय ना काका/दादा... (मला तुमचे वय माहीत नाही)
मुलगी जन्मली की पहिला विचार काय असतो... आता हिच्या लग्नाचे पैसे??
मुलगी वयात आली की दाखवण्याचे कार्यक्रम्..त्यात मुलीला नकाराचा दुय्यम अधिकार... तिला बघितलं जाणार ते रंग्-रुप ह्या वरुन.. तिने नोकरी करायची की नाहि हे पण मुलगा ठरवणार.. तिला घरकाम आलं पाहिजे ( काही ठिकाणी चालुन दाखव..सुइत दोरा ओवुन दाखव..हे प्रकार पण होतात).. काळ्या मुलीम्ची तर वाट लागते ह्या प्रकारात.. सतत नकार पचवुन ह्या मुली निराश झालेल्या असतात...
आप्ल्याकडे सर्व साधारणपणे लग्न मुलीकडचे करुन देतात.. वर पुन्हा हुंडा (लाखात), सोनं (तोळे -किलोत), जमल्यास फ्लॅट, गाडी वगैरे मुली कडचे मुलाला देतात... किमान लग्न तरी लावुन देतातच.. त्यात मग मान्-पान आलंच.. मान हा वरपक्षाला असतो.. ते जे म्हणतील ते आणि तसं होतं..
लग्ना नंतर पण भरपुर काही नाटकं असतात्..पहिला सण.. बाळांतपण.. सगळं काही मुलीचा बाप करतो..प्रत्येक वेळेस आहेर... कधी कधी पैशाची मागणी सुरुच रहाते.. त्यातुन मग मारहाण्..जाळुन टाकणे.. दुसरे लग्न लावण्याची धमकी...
सासुरवास..
मुलगी लग्न करते..आपलं घर -नाव सगळं मागे सोडते.. बापचा पैसा सासरी आणते.. "म्हातार पणाची काठी आणि वंशाचा दिवा" बनु शकत नाही.. म्हण्जे माहेरी तिचा काय "फायदा"?? उलट आई-वडिल जन्माची मानहानी आणि खर्च ह्या एका लग्नात पहातात..
आता मला सांगा काय चुकीचं लिहिला मी?? हे सगळे प्रकार नसते तर झाल्या असत्या मुली नकोशा??
आता असं म्हणु नका की मुलींनिच हिम्मत दाखवली पाहिजे नाही तर काही होउ शकत नाही...
ज्या मुली शिकतात्..ज्यांच्या घरात वर सांगितलेली परिस्थिती नसते त्या मुलिंच्या बाबतीत हे होतंच नाही हो... त्या होउ देतच नाहित..
पण एखाद्या खेड्यातल्या बिहार्,राजस्थान मधल्या मुलीला फार अवघड आहे हे चक्र मोडणं...

अणि हो.. एका मोठ्या प्रतिसादातिल वाक्ये चिवडुन चिवडुन एका ओळीला पकडुन प्रतिसाद देण्या पेक्षा तुमचा स्वतःच म्हणण काय हे ह्या सगळ्या विषयावर हे जाणुन घ्यायला आवडेल.. या धाग्यावर कुठे दिले असल्यास लिंक द्यावी...

कसय ना काका/दादा...

ते आजोबा आहेत.

(मला तुमचे वय माहीत नाही)

वय काही का असेना! ;-)

बाकी पर्ल, पिलीयन राईडर, मनीषा इत्यांदींचे चांगला प्रतिवाद केल्याबद्दल अभिनंदन. (पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!) ;-)

बाकी चालू द्या.

(पालथा टँकर)

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2012 - 12:48 pm | पिलीयन रायडर

(पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!)

म्हणुन तर नुकताच एका घड्याला रामराम ठोकलाय..!!!

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2012 - 8:57 pm | पिलीयन रायडर

(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)

असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना?
आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.

अगदी बरोबर, माझ्या शाळेत ह्या काळात "कबड्डी " खेळणार्या मुली होत्या तशाच ४ दिवसा पैकी २ दिवस सुट्टीची परवानगी असणार्‍या सुद्धा.. त्यांची केवळ ह्या त्रासासाठी ट्रीटमेंट घेत होत्या, पण पुढे त्यांना नोकरीत प्रवास करवा लागायचा तेव्हा रडकुंडीला यायच्या बिचार्या... दर महिन्याला हिच कहाणी... माझी एक बहीण ह्या दिवसात गडाबडा लोळायची म्हणे..
आणि बसमधील भयंकर अनुभवा नंतर मी एका मोठ्या कॉलेजला प्रवेश घ्ययचाय नाही म्हणजे प्रवास टळेल ह्या विचारापर्यंत आले होते..

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2012 - 8:50 pm | पिलीयन रायडर

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.

बर मग?? ह्याला असमानता म्हणायचं की नाही?? तुमच्या लक्षात येतंय का, इथेच सगळी सुरवात झालीये? म्हणजे कसय ना ताई... बस मधली जागा ह्या पेक्षा ह्या मुद्द्यवर जास्त बोलायला हव होतत तुम्ही... तुमची जहाल आणि विस्त्रुत मतं आवडली असती वाचायला...

२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.

अभ्यास वाढवा... तुमचं जर हे मत असेल की याही बाबतीत मुला-मुलिंना समान निकष आहेत तर कमाल आहे.. तेही ग्रामीण भागात? इथे शहरात माझी कामवाली बाई १० वीत मुलीच लग्न लावुन देते का तर डोक्याला ताप नको आणि मुलाला मात्र परवडत नसुन इंग्लिश मिडियम मध्ये घालते.. तर तुम्ही काय सांगताय... ती पोरगी पण पुढे धुणि-भांडी करणार.. आणि हो, ग्रामीण भाग म्हणजे फक्त गुरं हाकायला जातात का लोक?? मग सरपंच इ खुप पैसा असणार्‍या घरी स्त्रिया एक्दम खुप शिकत असतील ना? त्यांची काही १६-१८व्या वर्षी लग्न होत नसतील.. आणि नोकरी पण करत असतील त्या... (राजकारणा बद्दल तर बोलुच नका.. कारण कुणाच्या हातात 'खरी' सत्त असते हे सगळ्यांना माहित आहे.

३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.

समजा घरात परिस्थिति वाईट आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे... कुणाला शिकवतात हो?? आणि मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा संबध काय?? एखद्या मुलीला नुसतंच शिकायच असेल तर? लग्न नको असेल तर..सौदा घाट्यात का??

४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.

भले शाब्बास... वर तर लिहिलय की मुलीला चांगल्या नवर्‍याच्या अपेक्षेने शिक्वायच.. तिला "हे काही तुझं घर नाहि" , " लग्ना नंतर आई-वडिल मुलीच्या घरच पाणी पण पित नाहीत" असले फलतु विचार शिकवायचे.. आणि मग म्हणायच की 'तु थोडिच आमचा आधार होणारेस"... ।याच..असल्याच गलिच्छ मानसिकतेतुन मुलिंना गर्भात मारतात, त्यांना शिकु देत नाहीत, संपत्तीमध्ये वाटाही देत नाहीत, इकडे सासरी काडिचीही सत्ता नाही..दिलेला हुंडा -सोनं पहायला पण मिळत नाही..
काहो, जर मुलीला शिकवलं आणि समानतेने वागवलं तर त्या आई वडिलांना सांभाळ्णार नाहीत??? तुम्ही स्वतःच लग्न थांबवुन भावाच शिक्षण करणार्‍या बहीणी पाहिल्या नाहिएत?? (मी पाहिल्यात..) मला बहीणच आहे.. भाउ नाही.. मग अता आमच्या आइ-वडिलांच काय?? हे असले दरिद्री विचार माझ्या आई वडीलांनी केले असते तर जन्मलो असतो का आम्हि? नाही तर ढिग भर बहीणी नंतर एक "वंशाचा दिवा" उगवला असता आमच्याही घरात... आज माझ्या आई -वडीलानी मला शिकवलं आणि मुलगी म्हणुन बिनकामचे विचार माझ्या डोक्यात भरले नाहीत, म्हणुन मी त्यांनी अपेक्षा न ठेवता पण मी त्यांना सांभाळान्याच्या पुर्ण तयारीत आहे..

५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.

तर मग नाहिये का बायकां मध्ये "गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान"??? ताई, शिकुच दिलं नाही तर येणार कुठुन? नोकरी करुच दिली नाही तर पोझिशन मिळणार कुठुन? आपल्या घरासठी खुप तडजोड करतात बायका... नोकरी मध्ये आधी घराला प्राधान्य देतात..कारण मुख्य हे असतं की " सामान्यतः" नवरा हे करत नाहि ....

मी आधीही तुम्हला दिलेल्या प्रतिसादात लिहिलं होतं, परत लिहिते...
पुरुषांना दु:ख नाहीत, ते जवाबदारी पार पाडत नाहीत, ते स्तियांवर फक्त अन्याय करतात असं नाहीये..
पण त्यांच्या दःखापेक्षा "बाई म्हणुन असणारी दःख" खुप जास्त आणि खुप मोठी आहेत...
तुम्ही 'स्टुपिडीटी' अशा उथळ शब्दात त्याची वासलात लावलीत... नक्कीच परिस्थिति अशी नाहीये..
मुलगा "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" तरी असतो.. त्या स्वर्था साठी तरी तो जन्मला येतो...मुलगी जन्मायच्या आधी पासुन्च "ओझं" असते.. तिलाही आवडेल ना "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" बनायला..पण ती संधी सुद्धा मिळत नाही... देउन बघा.. सोनं असतात मुली...
(एका ८० वर्षाच्या खेड्यातल्या आजोबांनी माझ्या बाबांना विचारलं होतं की तुम्हला किती मुलं?.. बाबा म्हणाले "दोन मुली".. मी "मुलीच? मुलगा नाहि????" ह्या वाक्याची तयारी ठेवली होती...तर आजोबा म्हणाले "सुखी आहात... मुलगीच प्रेमानी सांभाळते... तिला माया असते ना" )

आणि हो.. एवढ्या मोठ्या प्रतिसादा नंतर सुद्धा " स्त्री-पुरुष समानता " हा मुर्खपणा आहे असं आपलं मत आहे की नाही हे नीटस कळालं नाहि... म्हणजे भ्रुणहत्या, बलत्कार, हूंडाबळि असं काही नाहिचे का?? की त्यलाही पॅरेलल पुरुषांचे त्रास सांगणार अता?

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2012 - 9:20 pm | पिलीयन रायडर

बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.

ह्या साठी स्पेशल प्रतिसाद...
म्हणजे एकंदरीत काय... मुलगी जन्मु द्यायची नाही... जन्मलीच तर मुलींना जास्त शिकवायचे नाही... परत "हे घर तुझे नाही" असं बिंबवायच... मुलगा हाच आमचा आधार असं मानायच... तिचं लग्न करताना "नोकरी करणार नाही" अशा अटी मुलीच्या वतीने स्वतःच मान्य करायच्या... हुंडा-सोनं द्यायचं आणि "हाच तुझा संपत्तीतील वाटा" असं म्हणायचं.. तिकडे नवर्याकडे तर आनंदी-आनंद... नोकरी नाही.. सत्ता नाही... स्वतःचा असा पैसा नाहिच हातात तर कुठुन म्हणायचं भावाला "५०-५०" % खर्च करते??????? आणि अशा घरात जेव्हा मुली ५०|% वाटा मागतात तेव्हा शक्यतो सासरचा दबाव असतो...
आता..ज्या घरात मुली शिकतात... तुमच्या-आमच्या सारख्या.... का हो..तुम्ही नाही करणार भावाला मदत खर्चात?? मी तर नक्कीच केली असती.. (मला भाउच नाहीये..त्यामुळे सगळाच मी करते)
आणि अता त्या मुली ज्या नोकरी करत असुन मदत करत नाहीत पण वाटा मागतात... असं तर बरीच मुलं पण करतात.. आई-वडिलांकडे बघतही नाहीत आणि वाटा मिळावा म्हणून भांडत बसतात.. परत एकदा.. हा "व्यक्तीसापेक्ष" मुद्दा आहे.. "लिंगसापेक्ष" नाही....

प्रतिसादांचि शंभरी गाठेल एवढं मटेरिअल आहे तुमच्याकडे.एखादा धागा का नाहि काढत?

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2012 - 11:57 am | पिलीयन रायडर

१०० काय हो १००० गाठेल एवढं मटेरिअल आहे माझ्यकडे.. पण असो...
प्रत्येक ठिकाणीच चांगली /वाईट कशी का असेना पण प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न करणारे लोक असतात.. आम्ही group discussion मध्ये हाच फंडा वापरायचो.. सर्वांच साधारणपणे जे मत असेल त्याच्या अगदी विरुद्ध मत द्ययचो.. त्यामुळे १ Vs सगळे अशी स्थिती व्हायची आणि निवड पक्की... पण तिथे आम्हला खुप अभ्यास करुन मत द्यावे लागयचे कारण त्याला फाडुन खाणारे १० लोक समोर असायचे..
तुमचंही हेच चाललं आहे..पण फक्त उथळ पणे वर वर विचार करुन... अन्यथा " स्टुपिडिटी" असले शब्द निघाले नसते.. माझ्या एवढ्या मोठ्या प्रतिसादाला तुमची एवढी एक्च ओळ?? तुमचा अभास कळला... हूंडाबळी, भ्रुण्हत्या असल्या गंभीर विषयांना मारलेली टांग सांगुन जाते काय ते...
बस मधील जागा, म्हातार पणाची काठी असल्या मुद्द्यां पलीकडे काही असेल बोलण्यासरखं तर ऐकायला आवडेल अन्यथा राहु द्या... तशीही मला तुमच्या कडुन फार अपेक्षा नाही...
इथे भर्पुर मुली सक्षम पणे आपले मत मांडत आहेत... तुमच्या सारख्या एकीचे विचार तेही एकांगी... सहज ओलांडुन पुढे जाता येइल...
माझ्या मते मी तुम्हाला माझा भर्पुर वेळ आणि संधी दिली होती... पण तुमच्या कडे मुद्द्द्लात "मटेरिअल " नाही हे लक्षात आल्याने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही...
धन्यवाद...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Mar 2012 - 12:19 am | विश्वनाथ मेहेंदळे

.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

19 Mar 2012 - 12:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

किचेन ताई, मस्त प्रतिसाद आहे. यातले काही मुद्दे आधी असे अधोरेखित झाले नव्हते (माझ्यापुरते बोलत आहे).

शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

लाख रु की बात कही है !!!

मी कराटे खेळायचे

point noted.... आजपासून मस्करी बंद.. ए सगळ्यांनी नोंद घ्या रे ;-)

(मी वेगळ्याच प्रतिसादाला उत्तर देत आहे. पण माझा प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी येत आहे. तांत्रिक मंडळाने लक्ष द्यावे.)

किचेनताई,

तुमची एकूणच सगळी मतं पाहता तुम्हाला अभ्यास वाढवण्याची गरज आहे असं सांगावसं वाटत आहे. आपण आपल्या भोवतीची(च फक्त), चार (सोयीस्कर) उदाहरणं पहायची. त्यावरून काहितरी निष्कर्ष काढायचा. असा एकूण प्रकार वाटतो.
त्यामागे ओपन माइंड ठेवून चर्चा करण्याची बिलकूल तयारी दिसत नाहिये. (तसे नसते तर बलात्कार, हुंडाबळी, स्त्रीला घराबाहेर पडताना वाटणारी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षितता याबद्दल तुम्ही मौन पाळले नसते.)
आणि तुमच्याकडे रोजचे वर्तमानपत्र अजिबात येत नसावे असा अंदाज आहे :-)

रात्री बेरात्री कामावरून परततानाचा बस, लोकल, ट्रेन ने प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे का?. इतकच काय कंपनीच्याही कॅबने प्रवास करणं सुरक्षित राहिलं आहे का.
आणि जीव गेला तरच फक्त त्रास होतो असं नाहिये हो. येता-जाता सार्वजनिक ठिकाणी (संधी मिळताच) स्त्रीला (कमेंट पास करणे, लगट करणे, ..............इत्यादी) अनेक प्रकारचे त्रास (केवळ स्त्री असल्याने) सहन करावे लागतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे.

>>१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.>>
बसं. संपल?? तुमच्या लेखी एवढीच सिविअ‍ॅरिटी आहे या गोष्टीची. हे इतक साधं, सरळ, सोपं नाहिये.
जाऊ दे परत रिपिट नाही करत.
http://www.misalpav.com/node/20997#comment-380517
हे वाचा. आणि या प्रश्नांची उत्तर द्या अशी विनंती आहे.
१)स्त्री आणि पुरूष दोघांना समाजात समान (सारखचं) स्थान असेल, तर ज्यांना असे वाटते त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येचे रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करावे आणि का लोकांना मुली नकोशा झाल्या आहेत ती कारणे स्पष्ट करावीत आणि त्यावर काय उपाय करता येतील सुचवावेत.
२)अगदी भ्रूणहत्या तर लांब राहिली, मुलगी झाली की ज्यांना मुलगी झाली आहे ते माता-पिता, बाळाचे आजी-आजोबा, नातेवाईक यासगळ्यांच्या मनात काय भावना येते?, पहिली प्रतिक्रिया काय असते?, ते खूष होतात का दु:ख्खी होतात?. जर समान स्थान असतं तर का वाईट वाटलं असतं लोकांना.
[याला अपवाद असतात. नाही असं मी म्हणत नाही. पण %चा विचार करा.]
मुलगी झाली की लोकांना वाईट का वाटतं? किंवा का वाईट वाटत असेल याचा विचार करा. याचाही रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करा ना. काय कारण आहेत? ती दूर करणं आवश्यक आहे की नाही.

>>२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती>>
या विषयावर माझा जास्त अभ्यास नाहिये. म्हणून तूर्तास मुद्दा बाजूला ठेवत आहे.

>>३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.)
परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.>>
असं सरसकट विधानं करणं चुकीचं आहे.

>>४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.>>
असं काही नाहिये. जर घरातील करता माणूस हरपला तर पहिली जबाबदारी त्याच्या वैवाहिक सहचर्‍यावर येऊन पडते. आणि आई आणि वडिल दोघही निर्वतले आणि मुलं लहान असतील तर सर्वात मोठ्या अपत्यावर (मग मुलगा असो किंवा मुलगी) घरची जबाबदारी येऊन पडते. तेव्हा त्याला/तिला अकाली मोठं होऊन घर आणि भावंड सांभाळावं लागतं. मुलींनीही हे केलेलं नक्कीच पाहिलं आहे.

>>५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.>>
हे अगदी मान्य आहे.

पण हेही तितकच खरं आहे की,
लग्नानंतर करियर करताना स्त्रियांना अनेक अडथळे येतात आणि मग नाइलाजाने काही वेळा करियरला दुय्यम स्थान द्यावे लागते. (यामध्ये स्त्रियांची दोन्हीकडून मानसिक ओढाताण होत असते. करियरला दुय्यम स्थान दिले तरी आणि नाही दिले तरी.)
१) नवरा आणि बायको वेगळ्या ठिकाणी(शहरात/देशात) नोकरी करत असतील तर लग्नानंतर मुलींना आपली कष्टाने मिळवलेली, रूळलेली, जम बसवलेली, स्वत: प्रयत्न करून मेहनत घेऊन स्वतःचे काही स्थान निर्माण केलेली नोकरी सोडून दुसर्‍या जागी जावे लागते. तिथे परत (नोकरी मिळवण्यासाठी, तिथे जम बसविण्यासाठी) शून्यातून प्रयत्न करावे लागतात. स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन. कारण अशा वेळी नवीन नोकरी धरताना काही वेळा (नवीन ठिकाणी आधीपेक्षा कमी पगार मिळणे, कमी पद मिळणे, सिनिअ‍ॅरिटी नसणे(प्रमोशनसाठी वगैरे), नव्या पॉलिटिक्सचा सामना करणे, तिथे नवा जम बसवणे,) काही तडजोडी कराव्या लागतात.

२)लग्नानंतर जर नवरा घरकामात पुरेसा हातभार लावत नसेल तर परत शारिरिक आणि मानसिक ओढाताण. आणि ओव्हर एक्जर्शन.

३)मुलं झाल्यावर तर मग काय कथा सांगावी.
(प्रेग्नन्सी आणि डिलीव्हरी या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी त्यामुळे येणार्‍या मर्यादांमुळे पण करियरला ब्रेक लागतो. मुलं दोघांच म्हणून जन्माला येणार असलं तरी करियर फक्त आईच बाजूला रहातं. पण हे तूर्तास बाजूला ठेवू.)
मुलं लहान असताना त्याच्या संगोपनासाठी बर्‍याच आयांना करियरमधून ब्रेक घ्यावा लागतो. ह्यामुळे करियरमध्ये गॅप पडते, करियर पुन्हा सुरू करताना परत बॅक टू स्क्वेअर वन. पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी तिच स्ट्रगल, तिथे स्थान मिळवण्यासाठी स्ट्रगल. यामुळे करियरमध्ये तडजोड करावी लागते.

बर हे करताना पॅरलली मुलांच करणं, घर सांभाळणं. (यामध्येही नवर्‍याचा सहभाग असेल तर ठीक नाहितर अजून लोड) मुलांचं दुखणं-खुपणं, आजारपणं, यासाठी रजा घ्या. सणावारासाठी रजा घ्या नाहितर स्वतःची लिमिट्स स्ट्रेच करून ऑफिसमधून आल्यावर हे सगळं करा. मुलांचा होमवर्क घ्या. आल्यागेल्याच बघा. हे सगळ आलं. साधी कामवाली आली नाही तरी त्रेधा-तिरपीट उडते कारण घरी आल्यावर वेळ आणि एनर्जी कमी असते. हे सगळ सांभाळून (घरीच द्यायला वेळ नाही तर) ऑफिसमध्ये द्यायला एक्ट्रॉ टाईम कोठून द्यायचा मग काय तडजोड आलीचं ना.

>>प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.>>
मुलांच्या आई-वडिलांना निदान म्हातारपणीची काठी तरी आहे.आणि मुलीच्या किंवा फक्त मुली असणार्‍या आई-वडिलांच्या म्हातारपणीच्या काठीबाबत तुमचं काय मतं आहे. त्यांना कोणती काठी. त्यांनी पण मुलींना जपलं, वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. मग आता त्यांनी म्हातारपणीची काठी म्हणून कोणाकडे पहाव?

>>बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.>>
प्रत्येक दांपत्याला एक तरी मुलगा असतोच. ह्या गृहितकाला धरून तुमचं सर्व बोलणं चालू आहे/असतं. कमाल आहे तुमची. फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांना तुमच्या मते कोणी आधार द्यावा.

>>मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.>>
तुमच्या मते फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांची सेवा कोणी करावी? खर्च कोणी करावा? हे सगळ करू शकणार्‍या आणि करू इच्छिणार्‍या मुलींच्या नवर्‍यांचा याला किती सपोर्ट असतो?

>>त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.>>
जी अपत्य सेवेच्या वेळेस येत नाही आणि फक्त वाटणीच्या वेळेस येतात त्या अपत्यांचा निषेध. असं वागणं चूकच आहे. (मग तो मुलगा असो वा मुलगी)
मी तरी खूपशी उदाहरणं पाहिली आहेत ज्यामध्ये बहिणींनी आपल्या वाट्याची मालमत्ता स्वखुशीने भावांच्या नावावर केली आहेत.

>>बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो.>>
१)मासिक धर्माचं कौतुक कोणालाच नसतं. झालाच तर त्रास असतो. आणि तो प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होतो. तुम्ही खूप त्रास अनुभवला नसेल तर चांगलचं आहे. पण त्यावरून उगाच टिपण्णी करू नये. काही काही जणींना त्या दिवशी ऑफिसला/शाळेला सुट्टी घेण्यावाचून पर्याय नसतो, प्रचंड विकनेस येतो, काहिंना एक क्षण उभं रहाताही येत नाही हे पाहिलं आहे.
२)शिवाय बसमध्ये मुलींना त्रास देणे, छेडछाड, लगट करणे हे प्रकारही सर्रास चालू असतात ना.
३)आणि बसमध्ये प्रेग्नंट स्त्रिया, लेकुरवाळ्या स्त्रिया असतातच ना. ज्यांना बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे.
हेही मान्य आहे कि अपंग/वृद्ध, स्त्री/पुरूषांनाही बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे.

आणि जितक्या सहजपणे तुम्ही एखाद्या वृद्ध आजोबांना तुम्ही एक माणूस म्हणून समजून घेता आणि ते वृद्ध असल्याने जे प्रोब्लेम आहेत ते समजून घेता. तसेच स्त्रीलाही ती एक स्त्री आहे म्हणून फेस करावे लागणारे प्रोब्लेम समजून घेतले पाहिजेत.

>>शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.>>
एक माणूस म्हणूनच जो सगळ्यात बेसिक अधिकार आहे जन्म घेण्याचा. तोच मिळत नाहिये, तर बाकीच्या अधिकारांची काय कथा.

>>स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.>>
माझी तुम्हाला विनंती आहे की असं असेल तर कृपया मला काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत.
http://www.misalpav.com/node/20997#comment-380517

बाकीच्या मुद्द्यांवर 'पिलीयन रायडर' शी सहमत असल्याने तेच मुद्दे रिपीट करत नाहिये.

टिवटिव's picture

16 Mar 2012 - 2:55 pm | टिवटिव

प्रकाटाआ

इरसाल's picture

13 Mar 2012 - 1:25 pm | इरसाल

मला कधी कधी सौशय येतो....तो .....
किचेन, पुप आणि पि. बद्दल.

मी दु आयडी नाहीये.आणि मी एक स्त्री आहे.

शिल्पा ब's picture

13 Mar 2012 - 10:55 pm | शिल्पा ब

<<मी दु आयडी नाहीये.आणि मी एक स्त्री आहे.

हे असं सागावं लागतंय याचा अर्थ काय?

सांजसंध्या's picture

13 Mar 2012 - 1:44 pm | सांजसंध्या

लेख आवडला.

म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?

माहीत नाही . पण असं नसावं. त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..

म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?

म्हणजे काय? तुम्ही लिटरेचर वाचत नाही का?

त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..

ह्या ह्या ह्या... फारच मागासलेले विचार ब्वॉ तुमचे. ही १७६० सालची व्याख्या झाली. आजची स्त्री पुरुष समानतेची व्याख्या अशी नाही.

जगाच/समाजाच माहीत नाही. पण समानतेच्या उपदेशाचे डोस इतरांना पाजण्या पेक्षा ह्या चांगल्या कामाची सुरवात स्वतःच्या घरापासुनच करावी.
ह्याच संस्कारांच केवळ बाळकडू आई बाबांनी आम्हा बहिण भावंडाना पाजल नाही तर स्वतःच्या आचरणातुन आम्हाला ते दाखवून दिल. तेच संस्कार आता पुढच्या पीढीत उतरवण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो.
जर प्रत्यकाने अशी सुरवात आपल्या घरापासुन केली तर लगेच नाही पण पुढल्या एक दोन तपांत आपल्याला या अश्या चर्चांची आणि त्यातुन उद्भवणार्‍या विवादांची गरज भासु नये.

धन्या's picture

13 Mar 2012 - 3:34 pm | धन्या

अगदी अगदी.

पेदाड या शब्दाप्रमाणे पेदाडी हा शब्द जेंव्हा मराठी भाषेत येईल त्यावेळेस समानता आली असे मानायला हरकत नसावी.
बाकी हल्ली बर्‍याच ठिकाणी फुंक्यांसोबत फुंकीण्या एकेकट्याही दिसतात. त्यामुळे ही समानता फार दूर नाही असे वाटते

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2012 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

इजुभौ तुम्हाला पेताड म्हणायचे आहे का ?

सोत्रि's picture

13 Mar 2012 - 5:21 pm | सोत्रि

पराशेठ,

विजूभाऊ की भावनाओंको समझो! :D

- (पेदाड) सोकाजी

प्रभाकर पेठकर's picture

13 Mar 2012 - 3:32 pm | प्रभाकर पेठकर

पुरुषापुरूषांमध्ये तरी कुठे समानता आहे?
शारीरिक, मानसिक, भावनिक दुर्बल पुरूषावरही इतरांकडून (त्यात सबल स्त्रियाही आल्याच) दडपशाहीचा अवलंब होतोच. स्वतः विचार करू न शकणारे पुरुषही कधी एकाच्या तर कधी दुसर्‍याच्या विचारांचे 'गुलाम' असतात.
स्त्री-पुरुष असमानता किंवा समानता अन्याय्य नसावी.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Mar 2012 - 11:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरुषांनी पुरूषप्रधान संस्कृतीची तक्रार करणं हे मला पाकीस्तानने स्वतःला दहशतवादपिडीत संबोधण्यासारखं वाटतं.

(हे ह.च घ्या)

निव्वळ अज्ञानजनक प्रतिसाद.

कालच जोरु का गुलाम चित्रपट बघितला...

कवितानागेश's picture

13 Mar 2012 - 3:47 pm | कवितानागेश

...पेट्लेले दिसतंय परत! :)

इरसाल's picture

16 Mar 2012 - 11:31 am | इरसाल

वरती २/४ जणांच्या हातात.......सॉरी प्रतिसादात रॉकेलचे ड्रम पाहिले.........

अन्नू's picture

13 Mar 2012 - 4:11 pm | अन्नू

खालील प्रश्नांची थोडक्यातच उत्तरे घ्या

१> स्त्री पुरूष समानता म्हणजे काय त्याची व्याख्या द्या:-
"स्त्रीची उंची जर साडेपाच फूट असेल तर पुरुषाची उंची सुद्धा साडेपाचच असणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय!"
किंवा
"स्त्रीची उंची पुरुषाच्या उंचीएवढी वाढणे म्हणजेच स्त्री-पुरुष समानता होय."
२> स्त्री-पुरूष समानतेसाठी काही उपाययोजना:-
<१> स्त्रीला रोज कॉम्लॅन बॉर्नविटा यांसारख्या वस्तू चघळायला देणे
<२> आणि सगळ्यांच स्त्रीयांना उंच टाचांचे सॅन्डल्स वापरायला देणे.

आता हे स्त्रीयांनी करावयचे काही जालीम उपाय:-
<३> पुरूषांच्या उंचीवर आळा घालणे, त्यासाठी त्यांना बॉर्नविटा म्हणून शिळ्या नाचणीच्या भाकर्‍या कुटून देणे
<४> दुध म्हणून त्यांना चुन्याची निवळी देणे.
<५> एका वेळेत किमान ५०० बैठका त्यांना रोज काढायला लावणे.

काही महिन्यांतच स्त्री-पुरुष समानता नक्कीच प्रस्थापित होईल! ;)
(रेफरन्स:- ताईचा सल्ला साभार!)

<परा मोड ऑन> वांझोटी चर्चा वाचण्यापेक्षा ,आज जरा लवकरच कावेरीचा रस्ता धरावा हेच बरे <परा मोड ऑफ >

सोका, ल्येका,
पुन्यांदा होळी पेटविलीस का? पब्लिक काय बोंबा मारायला येका पायावर तयार आसतंय म्हना.

मला काई स्वतःचे इच्यार न्हाईत. दत्तगुरुंनी २४ गुरु केले तसं मीबी माज्या गाडवाला गुरु क्येलं हाय. तर सांगायचं म्हनजी दरसाल महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत. मंग कंटाळून म्या माज्या गुरु म्हाराजांना इनंती क्येली. आदुगर त्ये बोलायला तयारच नव्हते. त्वांडात कायतरी काडं चगळीत व्हते. त्यात त्यांची उकेरड्यात लोळाया जायाची येळ झालेली. म्या लईच पिच्छा पुरवला त्येंचा. तवा सद्गुरु गाडव म्हाराज म्हनाले,
' नीट आईक रं शिष्या भा*. पुन्यांदा इच्चारु नगंस. सगळे सद्गुन आन् दुर्गुन पुरुष आनि स्त्रियांमदे समान आसत्यात. ज्या घरांमदी बाया नमतं घ्येत्यात तितं पुरुष माजलेले असत्यात. मंग 'बळी त्यो कान पिळी' म्हनून बाया मुकाट सहन करत्यात. दुसरीकडं ज्या घरात बाया माजलेल्या असत्यात तितं 'दुभत्या गाईच्या लाथाबी गोड' आसं म्हनून पुरुष आन त्यांच्या घरातले पडती बाजू घ्येत्यात. बायांना संधी मिळंल तितं त्या पुरुषाच्या धनावर डल्ला मारत्यात आन पुरुषांना संधी मिळंल तितं त्ये बायांच्या डबोल्यावर हात मारत्यात. येळ आली, की दोगंबी शोषण करत्यात, अन्याव करत्यात, येकमेकांची आन मुलाबाळांची फरपट करत्यात, कचाकचा भांडत्यात, कायद्याचं हिस्कं दाखिवत्यात. परत्येक घरात 'डॉमिनेटिंग फॅक्टर' कोन हाय, ह्ये महत्त्वाचं. (आमचं गुरुम्हाराज रद्दीतलं विंग्रजी प्येपर चगळीत आसल्यानं सायबाची भाषा येकदम फर्डी बोलत्यात)
'म्हाराज! मग खरी समानता कशी येनार?' मी भाबडेपनानं इच्यारलं.
'आईक मग. स्त्री आन् पुरुषाचं स्वतंत्र आस्तित्व कुटपर्यंत? तर जोवर दोगं येकमेकांच्या रक्तामासापासून नवा जीव पैदा करत न्हाईत तोपर्यंतच. येकदा का प्वार झालं का मग पुडचं आयुष्य दोगानाबी 'एक आत्मा एक शरीर' म्हनून घालवावं लागतं. खरी मुक्ती त्यातच आसतीय. ज्यांना स्वतःचं प्वार नसंल त्यानी समाजातल्या निराधार बालकाला आधार द्यावा, पन ह्यो मंत्र इसरु नये. ह्ये ज्यांना समजत न्हाई त्ये जनमभर आसंच खुनशी वागत राहत्यात. म्हनून दोगानीबी येकमेकांना समजून घ्यावं. कमी पडंल तितं हात द्यावा. जोडीदार खुश-पोरं खुश की आपनबी खुश असावं. आमा गाडवांपासून काई शिका. 'लाथाळ्या' बी आमच्याच आनि 'गाडवी प्रेम' बी आमचंच.

छोटा डॉन's picture

13 Mar 2012 - 4:30 pm | छोटा डॉन

_/\_
लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या गुरुंपर्यंत हे लोटांगण पोहचवा.

- छोटा डॉन

लोटांगण हो योगप्रभु, तुमच्या गुरुंपर्यंत हे लोटांगण पोहचवा.

असेच म्हणतो. :)

काथ्याकूट होणार तिथे योप्र लिहीणार

हॅट्स ऑफ !! मान गये.

श्रावण मोडक's picture

13 Mar 2012 - 5:26 pm | श्रावण मोडक

गाढव व्हा, या जगात कुंभारांची कमी नाही. :)

सोत्रि's picture

13 Mar 2012 - 5:27 pm | सोत्रि

फुकाची चर्चा सोडून एक नंबरचा प्रतिसाद!
योगप्रभू म्हणजे शब्दप्रभू. आमचाही दंडवत स्विकारावा!

- (योग'प्रभू' भक्त) सोकाजी

सुहास झेले's picture

13 Mar 2012 - 6:12 pm | सुहास झेले

....

पटतयं,,,,,किति वेळ चावुन चोथा झलेला विषय चघळात बसायचा....

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2012 - 6:35 pm | पिलीयन रायडर

सोयिस्कर ठिकाणीच प्रतिसाद द्यायचा असं ठरवलय वाटतं...

प्रकाश घाटपांडे's picture

13 Mar 2012 - 7:35 pm | प्रकाश घाटपांडे

महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत

हॅहॅ ! स्त्री- पुरुष समानता ऐवजी मानव मादी -नर समानता असा शब्दप्रयोग केला तर ल्वॉक काय म्हंतीन?
समान म्हनायच्या ऐवजी यकमेकांना पूरक अस म्हनल तर काय बिघडतय!

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2012 - 11:36 pm | अत्रुप्त आत्मा

@'एक आत्मा एक शरीर' लाख लाख दंडवत ---^---

योगप्रभू तुंम्हाला व तुमच्या खास गुरुला ;-)

भिकापाटील's picture

15 Mar 2012 - 10:51 pm | भिकापाटील

कहर पुणेरी पाट्यांचा
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली , म्हणून तो हॉटेल शोधत होता.तेवढ्यात त्याला पाटी दिसली.

त्यावर लिहिलं होतं , ' जेवणाची उत्तमसोय '
जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .
एकावर लिहिलं होतं ' शाकाहारी '
तर दुसर्याववर ' मांसाहारी '
तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये आणखी दोन हॉल होते.
डावीकडे पाटी होती , ' भारतीय बैठक '
तर उजवीकडे , ' डायनिंग टेबल '
तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.एकावर पाटी होती 'रोख' तर दुसर्याावर 'उधार'
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.

वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली. तोअचंबीत झाला . त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला ,
'फुकट्या , मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे. हॉटेल नाही

सुमीत भातखंडे's picture

31 May 2012 - 2:53 pm | सुमीत भातखंडे

एकदम पटेश...टाळ्या!!!

केवळ स्‍त्री आहे या कारणामुळे आणि चार बटणं दाबता येतात, इकडे तिकडे जाऊन असतात म्हणून स्‍त्रीमुक्तीचा आपल्याकडेच ठेका आहे असं मानणार्‍या, सावित्रीबाई, आनंदीबाईंसारख्‍या ग्राऊंड लेव्हलवर काम करणार्‍या साध्‍वींची नावं स्वत: अंगाला काहीही लाऊन न घेता घेणार्‍या आणि तथाकथित स्‍त्रीमुक्तीच्या कार्याने त्यांच्या निरर्थक अस्तित्वाला झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार्‍या स्‍त्रियांची जमात जोपर्यंत फोफावत राहिल, तोपर्यंत ज्या स्‍त्रीयांना खरोखर मुक्ततेची आवश्‍यकता आहे त्यांच्याबाबत काडीचाही बदल होणार नाही. या असल्या शोभेच्या आणि स्वत:भोवतीच फिरणार्‍या बेगडी बाहुल्यांमुळेच 'स्‍त्रीमुक्ती' या शब्दाचाच ज्यांना खरी गरज आहे त्या स्‍त्रीयांना आणि स्‍त्रीयांना चार सुखाचे दिवस पाहू देऊ इच्छिणार्‍या लोकांना धसका बसला आहे. यामुळं या विदुषींनी जुलूम सहन करणार्‍या स्‍त्रीयांवर थोडे उपकार करावेत आणि स्वत:साठी दुसरी एखादी हॉबी शोधावी.

आजही सिंधूताई सपकाळ समाजात आहेत - त्या बेगडी बाहूल्यांनी स्वत: ची कुवत ओळखावी आणि पब्लिकचा वेळ नासवू नये.

नितिन थत्ते's picture

13 Mar 2012 - 5:54 pm | नितिन थत्ते

हा प्रतिसाद वाचून मिपावर आल्याचं सार्थक झालं.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Mar 2012 - 5:56 pm | बिपिन कार्यकर्ते

यकु! माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्‍या किंवा या विषयाशी संबंधित बोलणार्‍या / लिहिणार्‍या बेगडी स्त्रिया भेटलेल्या नाहीयेत. कधीच नाही. त्यातल्या काहींची मतं टोकाची वाटू शकतात / असतीलही. पण त्या बेगडी निशितच नव्हत्या. मूळात त्या स्वतः कोणत्या तरी परिघात स्वतःचं स्थान आधी निर्माण करून मग स्त्रीमुक्तीच्या वाटेला गेलेल्या आहेत. त्यामुळे असावं कदाचित. पण माझं सुदैवच. तुम्ही म्हणता तशा असतीलही / असतीलच.

मात्र, दांभिक स्त्रियाच काय पुरूषही चिक्कार भेटले आहेत.

@ नितीन थत्ते: बोलावं असा सुस्पष्‍ट अर्थ प्रतिसादातून दिसत नसल्याने काही उत्तर देत नाही. माझा प्रतिसाद वाचून मिपावर आल्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं असेल तर धन्यवाद.

@ बिका:

यकु! माझ्या सुदैवाने मला आजपर्यंत तरी स्त्रीमुक्तीच्या क्षेत्रात काम करणार्‍या किंवा या विषयाशी संबंधित बोलणार्‍या / लिहिणार्‍या बेगडी स्त्रिया भेटलेल्या नाहीयेत. कधीच नाही.

चांगली गोष्‍ट आहे बिका. तुम्ही बाजू घेऊन बोलताय म्हणून इथेच बोलतो. पहिल्यांदा तर इथे अंतर्जालावर सदासर्वकाळ स्‍त्रीमुक्ती, स्‍त्री-पुरुष समानता वगैरे पालुपदाचा निरर्थक जप करणार्‍या स्‍त्रीया माझ्‍या पहाण्‍यात आहेत. बरं करेनात का, पण त्या इकडच्या तिकडच्या, स्वत:चा इगो सुखावणार्‍या गोष्‍टींसह तेवढंच करतात ही तक्रार आहे. बरं यांना नेमकी कुठल्या स्‍त्रीयांची मुक्ती करायची आहे हे पक्कं नाही. रात्रीचा 1-1, 2-2 वाजेपर्यंत क्लबमध्‍ये बसणार्‍या (अर्थात करण्‍यासारखं काहीच नसल्याने कालहरणासाठी तिथे जाणार्‍या, स्त्रीयांनी पत्ते खेळावेत की नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाही. मला माझ्‍या आजीने पत्त्यांमधले काही डाव शिकवले आहेत ) स्‍त्रीयांची मुक्ती की आजही हुंडा, निरक्षरता, अज्ञान, शोषण यांना बळी पडणार्‍या स्‍त्रीयांची मुक्ती? तिथे या नसतात. म्हणून या बेगडी बाहुल्या आहेत. आणखीही मुद्दे आहेत, पण त्याबद्दल बोलण्‍याची काहीच कारण नाही म्हणून आवरते घेतो.

त्यातल्या काहींची मतं टोकाची वाटू शकतात / असतीलही. पण त्या बेगडी निशितच नव्हत्या. मूळात त्या स्वतः कोणत्या तरी परिघात स्वतःचं स्थान आधी निर्माण करून मग स्त्रीमुक्तीच्या वाटेला गेलेल्या आहेत. त्यामुळे असावं कदाचित.

स्वत:ची मतं टोकाची आहेत ती व्य‍क्तीगत बाब आहे. टोकाची मतं असणं स्‍त्री किंवा स्‍त्री मुक्तीवाद, स्‍त्रीपुरुष समानतावादी असण्‍याचा प्राधिकार नाही.
स्वत:चं स्‍थान निर्माण केलं आहे - चांगली गोष्‍ट आहे. ती गोष्‍ट प्रॅक्टीकली इतर गरज असलेल्या स्‍त्रीयांसोबत शेअर केलीय का? तसा प्रयत्न आहे? की नुसतेच बाजार उठवणारे, नित्याचा बौद्धीक मैथुन करवणारे टाइमपास लेख पाडले आहेत?

पण माझं सुदैवच. तुम्ही म्हणता तशा असतीलही / असतीलच.

मला जे वाटतं ते मी लिहितो. ते तसंच आहे हे ठणकावण्‍याचा अट्‍टहास नाही.

मात्र, दांभिक स्त्रियाच काय पुरूषही चिक्कार भेटले आहेत.

यावर ज्यांच्यासोबत व्हायला हवी त्यांच्यासोबत पुरेशी चर्चा झाली आहे.
तुम्हाला किंवा त्यांना आणखी एकदा हवी असेल तर तसा चर्चाप्रस्ताव टाकून जाहीरपणे करायला तयार आहे.
माझ्यासमोर जशा गोष्‍टी येत गेल्या आणि मी जी थट्टा केली अगदी त्याच रुपात तो चर्चाप्रस्ताव मी लिहीन.
लोकांची मतं घेऊ.. ती दांभिकता आहे की आणखी काय ते तिथे ठरवू.
संबंधितांची परवानगी घ्‍या आणि कळवा.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2012 - 1:18 am | अत्रुप्त आत्मा

प्र.का.टा.आ.

अविनाशकुलकर्णी's picture

13 Mar 2012 - 6:41 pm | अविनाशकुलकर्णी

समता असे काही असेल

परिकथेतील राजकुमार's picture

13 Mar 2012 - 6:55 pm | परिकथेतील राजकुमार

योगप्रभुला आपल्याकडून येक लार्ज नेक्स्ट टैमाला !

'एक आँख मारु तो रस्ता रुक जाय' चा फॅन...
परा