कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
6 Mar 2012 - 3:48 am
गाभा: 

गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत. एकदम पोनी घालण्याइतके ते मोठे नाहीत पण शर्टच्या कॉलरच्या खाली गेलेले आहेत. ते तसेच अजून कंटाळा येईपर्यंत ठेवण्याची इच्छा आहे.

मी माझ्या डोक्याच्या केसांना अगदी दररोज तेल लावत नाही. आठवड्यातून दोनदा लावतो. एखादे दिवशी किंवा ते केस धुतल्यानंतर कोरडे दिसतात.

आता माझा प्रश्न:

असे कोरडे दिसणारे केस केवळ ओले दिसण्याकरता काय उपाय करावा?
जेल वैगेरे वापरून केस ओले दिसतात पण ते कडक होतात. केस मऊ, उडते ठेवून ओले दिसण्यासाठी काही क्रिम आहे काय? असल्यास ते क्रिम कोणत्या ब्रांडचे आहे? आणि हो, केस ओले म्हणजे तेल लावल्यासारखा चिपचिपा परिणाम अपेक्षीत नाही.

केस कर्तन करणार्‍या माझ्या कारागीराने मला 'Livon' नावाचे क्रिम घेण्यास सांगितले. ते क्रिम नसून एक लिक्वीड होते. त्याचा उपयोग केस धुतल्यानंतर गुंता न होता विंचरण्यासाठी होतो. थोडावेळ केस ओले दिसतात पण नंतर कोरडे होतातच.

माझ्या काही मित्रांनी केस दररोज धुवावेत, त्यांना दही लावावे, उष्ण टॉवेलची वाफ द्यावी, पाणी मारावे, हार्डनिंग जेल लावावे असले उपाय सांगितलेले आहेत. त्यात एकदोन जणांनी कोणतेसे क्रिमही वापरलेले आहे पण त्यांना नक्की नाव आठवत नाही.

आंतरजालावर तपासले असता त्याने पोमेड वैगेरे सांगितले आहे. ते अंतरराष्ट्रीय उत्पादने आहेत. मला भारतातली काही उत्पादने सांगितलेतर बरे होईल.

Bryletyne नावाचे पांढरे क्रिम मी मागे हौस म्हणून वापरले होते. त्याचा नक्की कोणता परिणाम होतो त्याबाबत मी अनभिज्ञ आहे.

जाणकार बंधू, माता भगीनींनी केस ओले दिसण्याचा उपाय सांगितल्यास माझ्या व्यक्तिमत्वात चांगला बदल दिसण्याची शक्यता आहे.

उपाययोजकांना आधीच धन्यवाद.

प्रतिक्रिया

जवळ पाण्याचा स्प्रे ठेवायचा :) अन वाळ्ले केस कि मार पाणी ..वाळ्ले केस कि मार पाणी असा तडाखा लावायचा ;)
अस केल्याने सर्दी होइल ;) अन मग केस कापण्याची सुबुद्धी देखील होइल :bigsmile:

मयुरपिंपळे's picture

6 Mar 2012 - 11:43 am | मयुरपिंपळे

जबरी ;)

चिम् चिम् मामा's picture

7 Mar 2012 - 6:20 pm | चिम् चिम् मामा

लै
झाक....!

मराठमोळा's picture

6 Mar 2012 - 9:03 am | मराठमोळा

कॉलेजात असताना माझ्या एका मित्राला डोक्यावरचे केस ओले ठेवून यायची सवय होती, अगदी कडाक्याच्या थंडीतही. मग ते ओले केस स्टाईल मारत मानेला झटके देत मुलींवर लाईन मारायला त्याला आवडे.
या सवयीने एकदा त्याला ऐन परीक्षेत, सर्दी, फ्ल्यु, न्युमोनिआ, सायनस सारखे रोग एकानंतर एक झाले टक्कल करावे लागले, बरेच दिवस डोक्यावर केसही उगवले नाहीत. वर्ष वाया गेले ते वेगळे.

सर्‍या एका मित्राला क्रीम, जेल वापरण्याची सवय होती. लग्नाआधीच त्याचे जवळपास सर्व केस गळाले, मुली त्याला पसंत करेनात. मग शेवटी कृत्रीम केस शस्त्रक्रिया कवरून लावुन घ्यावे लागले.

आणखी एका मैत्रिणीला रोज या ना त्या प्रकारचे शांपू वापरायची सवय होती. तिचे केस ईतके कडक झाले की कात्रीची धारच जात असे केशकर्तनानंतर आणि आजतागायत कोंड्याचा त्रास आहे.

याव्यतिरिक्त, बाजारात बरेच शांपू, क्रीम, जेल, थेरेपी, वॅक्स, हेअर स्ट्रेटनिंग, कलर वगैरे प्रकार उपलब्ध आहेत. शेवटी बरेच लोक विग वापरण्याला प्राधान्य देतात असेही दिसून आले आहे.
ईतर जाणकार प्रकाश टाकतीलच.

ताज्या आवळ्याचे सरबत रोज करुन प्यायल्याने बर्‍याच लोकांना (केस व बुद्धी दोघात) पॉजिटीव फरक पडल्याचे दिसून आले आहे.

आदिजोशी's picture

6 Mar 2012 - 10:52 am | आदिजोशी

ड्रिप इरिगेशन सारखे केसांसाठी काही सापडते का बघा. केस सदैव ओले राहतील, जास्त पाणीही वाया जाणार नाही. त्या पाण्यात शँपू टाकून ठेवल्यास केस आपोआप स्वच्छही होत राहतील. ह्यासोबत वॉटर रिसायकलींग आणि वॉटर हार्वेस्टींगची सुवीधा वापरल्यास वारंवार पाणीही भरावे लागणार नाही. साला हाय काय अन् नाय काय.

आत्मशून्य's picture

6 Mar 2012 - 11:18 am | आत्मशून्य

लिवीऑन अथवा व्हिनेगर ने केस फक्त बाउन्सी होतात, पण बरेचदा जास्तच कोरडे वाटु लागतात. बेल्क्रीम अथवा जेलने केस नंतर (इफेक्ट ओसरल्यावर ) राठ होतात हे खरय. पण बेल्क्रीमचा तुम्हाला नक्किच फायदा होइल याची खात्री आहे. पण याच्या वापराची एक ट्रीक आहे. रात्री झोपण्यापुर्वी चांदीच्या पेल्यातुन पाणी वगैरे पिउन झाल्यावरच बेल्क्रीम (अँटीडॅंड्रफ २४hrs हीरव्या ट्युब बॉक्स्मधे मिळते ते) केसांना भरपुर चोपडा, इतकं की केस एकदम चिपकु चिपकु झाले पाहीजेत. सकाळी कोणत्याही सौम्य शँपुने धुआ. योर हेअर्स विल रॉक लाइक अ सुपर्स्टार... लोकं फिरुन फिरुन बघतील तुमच्या केसांकडे. जणू शाहेद कपुरच.

अथवा आपला गावाकडचा उपाय, थोडेसे एरंडेल घ्या त्यात पाणी मिसळा एकजीव झालय असं वाटल्यावर केसांना लावा यात प्रॉब्लेम इतकाच आहे की एरंडेल किंचीत जरी जास्त झाले तर त्याचा भयानक वास येतोच पण सोबतच तुम्ही केसांमुळे कमालीचे विनोदी ध्यानही वाटाल :)

आणी अगदीच निर्धोक उपाय म्हणजे बजाज आल्मड्रॉप हेअर ऑइल. बदामाच्या वासाची अ‍ॅलर्जी नसेल शँपुनंतर तर बिंधास्त वापरा माझा व अनेकांचा अनुभव चांगला आहे :)

अजुन एक ऐकीव किस्सा सांगतो. शाहरुख खान जेव्हां स्ट्रगलर होता व जेल वगैरे वापरणे फार महाग होते तेव्हां ओडीशनला जाण्यापुर्वी त्याच्या झिंज्यांना वेट लुक देण्यासाठी तो पाणी व कॅम्लीनचा डिंक वापरायचा असे त्याने नमुद केले आहे.

सुहास..'s picture

6 Mar 2012 - 11:25 am | सुहास..

विजुभाऊंना विचारा ;)

विजुभाऊ's picture

6 Mar 2012 - 2:53 pm | विजुभाऊ

प्रेषक सुहास.. Tue, 06/03/2012 - 11:25.
विजुभाऊंना विचारा

अरे सुहाशा.
मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. थोडा॑सा फरक होता.
केस ओले दिसण्यासाठी काय करावे या ऐवजी केस दिसण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडला होता.
सुदैवाने आता उत्तर मिळाले आहे

अरे सुहाशा.
मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता. थोडा॑सा फरक होता.
केस ओले दिसण्यासाठी काय करावे या ऐवजी केस दिसण्यासाठी काय करावे असा प्रश्न पडला होता.
सुदैवाने आता उत्तर मिळाले आहे >>>

नेमके काय उत्तर मिळाले ?

पाभे सगळ्यात प्रभावी ईलाज विजुभाऊंनी दिला आहे ,

ना रहेगा बास ना बजेगी....

परिकथेतील राजकुमार's picture

6 Mar 2012 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार

पाभे, हा प्रश्न एका ओळीत आमच्या डाण्रावांच्या खवमध्ये विचारला असतात तर तुम्हाला ह्या विषयातले अ पासून ज्ञ पर्यंतचे सर्व ज्ञान प्राप्त झाले असते.

इतकी वर्षे मिपावरती राहून तुम्ही कोरडेच राहीलात बघा. ;)

आदिजोशी's picture

6 Mar 2012 - 11:29 am | आदिजोशी

कॉलींग डान्राव
कॉलींग डान्राव
कॉलींग डान्राव

साला झुल्फांचा विषय आणि डान्राव नाहीत. ये हो नै सक्ता.

मयुरपिंपळे's picture

6 Mar 2012 - 11:48 am | मयुरपिंपळे

नारीयल तेल सर्वात चांगले ! डो़क शांत राह्ते आणि केस पण गळत नाहीत. ;)

हिमानी नवरत्न लाल तेल किंवा हरिद्वारचे "चीता तैल" वापरुन पहा.. चीता तैल तर एकदम अक्सीर आहे.. केस ओलेही दिसतीलसे वाटते त्याच्या गुणांची यादी पाहून.

सत्य युगात, भगवान शंकरांना देखील हाच प्रश्न पडला होता. त्यानीही मि.पा. वर एक धागा काढला होता. आपल्या मि.पा. मित्रांना विचारुन बरेच उपाय करुन पाहीले. पण काहीही फायदा झाला नाही.

एका मि.पा. कट्यावर ते वैतागुन बसले होते तेव्हा मी त्यांची आस्थेने चौकशी केल्यावर त्यांचा एकदम बांधच फुटला.

मला म्हणाले " मी काय काय म्हणुन केले नाही पण काही उपयोगच होत नाही. केस गळायला लागले, पांढरे व्हायला लागले पण ओले काही दिसत नाहीत. मित्रा सांग मी काय करु? काय करु?" असं म्हणत त्यांनी जवळच्या एका दगडावर डोके आपटायला सुरुवात केली.

म्हणालो "दुनिया गेली तेल लावत ऐकणार असाल तरच एक सल्ला देतो. एकदम जालीम उपाय. पण गुण १००%नक्की येणार."

एकदम इमोशनल होत ते म्हणाले "सांग ना राव कशाला भाव खातोस? एकतर डोक खाजवुन खाजवुन टक्कल पडायची पाळी आली. पार्वती पण येता जाता मला कुत्सीत पणे टोमणे मारायला लागली आहे."

मी म्हणालो "एकच सांगतो गंगा डोक्यावर धारण करा दुसरा काहीच उपाय नाही. एकदम परमनंट सोल्युशन."

त्यांनी मला""थॅक्यु" म्हणुन सोमरसाचा एक कमंडलु भेट दीला.

आपले सल्याचे पैसे वसुल झाले त्यामुळे हा सल्ला तुम्हाला एकदम फुकट. (धंदेमे बेईमानी नही बाप)

वपाडाव's picture

6 Mar 2012 - 3:31 pm | वपाडाव

मी म्हणालो "एकच सांगतो गंगा डोक्यावर धारण करा दुसरा काहीच उपाय नाही. एकदम परमनंट सोल्युशन."

लै आदळु आदळु हसलो राव...

अविनाशकुलकर्णी's picture

6 Mar 2012 - 3:01 pm | अविनाशकुलकर्णी

केस रंगवा..उपयोग होतो

मी-सौरभ's picture

6 Mar 2012 - 4:39 pm | मी-सौरभ

रोज डोक्यावरच्या केसांना आंघोळ झाल्यावर थोडं तेल लावा फक्त ते करण्याआधी केस पूर्ण कोरडे करुन घ्या. :)

>>रोज डोक्यावरच्या केसांना आंघोळ झाल्यावर थोडं तेल लावा

प्रतिसाद किती स्पेसिफिक असावा याचे उत्तम उदाहरण !!

>> गेल्या सहा महिन्यांपासून मी माझे डोक्याचे केस थोडे मोठे राखलेले आहेत.
असा स्पेसिफिक प्रश्न विचारला असेल तर स्पेसिफिक उत्तर मिळणारच ! :)

बटाटा चिवडा's picture

7 Mar 2012 - 8:28 am | बटाटा चिवडा

श्री बटुकनाथ चिवड़ेश्वर यांना साकडे घालून रुपये ५०१ /- फ़क्त चा धनादेश आणि शाल व श्रीफळ यांचे छायाचित्र बटुकनाथचिवड़ेश्वरप्रसन्न@जीमेल.कॉम या संकेतस्थळावर श्रीं च्या चरणी अर्पण करावे..
लगेचच प्रत्यय येईल व आपल्या केसांना हवे ते रूप मिळेल..!!!

ता. क. :- बटुकनाथांवर जबरदस्त श्रद्धा असेल तरच प्रत्यय येतो..... न आल्यास, धनादेश परत केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

चिम् चिम् मामा's picture

7 Mar 2012 - 6:26 pm | चिम् चिम् मामा

केस वाढवुन देव आनंद होण्यापेक्षा, बुद्धी वाढवुन विवेकानंद व्हा...!

असे विचार करा की...तुम्हचे केस ओलेच आहेत... म्हणजे तुम्ह्चे केस अपोआप ओले होतिल....

म्हणुनच...म्हणतो...मनी वसे ते चित्ती दिसे