कित्येक दिवसांपासून गुगलवर मेक मनी कि अर्न मनी ऑनलाईन अशा अॅड येत आहेत. त्यातील काही अॅड खुद्द गुगल देत आहे असे दाखवले जात आहे. जाहीरातीच्या चित्रात कोणी एक परप्रांतातील सुंदर (आंटी) बाला आपल्या हातात डॉलरमध्ये अमाऊंट दर्शवलेला चेक दाखवत एक मंद स्मित करत आहे असे दाखवले जातेय. (तिच्या चेहर्यावर जाऊ नका म्हणजे झालं ;) )
तर त्या जाहीरातीनुसार तुंम्ही घरबसल्या नेटवर कमाई करु शकता आणि तिही डॉलरमध्ये!
त्यासाठी तुंम्हाला आठवड्याचे फक्त काही तासच नेटवर अॅड ब्राऊसिंगचे काम करायचे असते ज्याचे तुंम्हाला महीन्याचे अंदाजे ६,००० ते ८,००० डॉलर मिळतात. म्हणजे इंडियन करंन्सीमध्ये बघाल तर जवळजवळ २७०,००० ते ३६०,०००.
अगदी हवेत उडाल्यासारख वाटल ना! मलासुद्धा असंच वाटल होत. घरच्याघरी फक्त नेट ब्राऊसिंग आणि अॅड वर इतके पैसे भेटतात म्हणून मी टुनूटुनू उड्या मारतच त्या जाहीरातीचा फॉर्म भरायला घेतला तोच त्यात मला अमुक अमुक (डॉलर) अमाऊंट पे करा. असे सांगण्यात आले आणि तिथेच आमच्या मनात पाल चुकाकली! ही अॅड खरीच आहे का? म्हणून मग त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी मी जरासं गुगलून बघितल.
अनेक वेळा मला,
ह्म्म.. अं... ही स्कीम चांगली आहे, मला एवढे पैसे मिळाले, मी आता खूप खुश आहे, मला आता रोजरोज बॉसची कटकट ऐकायची गरजच नाही, जुने काम करायची गरजच नाही, मी काम सोडून दिले, मी बॉसला सोडून दिले, मी घर सोडून दिले वगैरे वगैरे भंजाळलेले प्रतिसाद मिळाले. पण काही वेळानंतरच्या कथ्थक प्रयत्नांनंतर मात्र युट्युब वर मला याची सत्यता सांगणारा व्हिडीओ भेटलाच. हा पहा= व्हिडीओ मधील अक्षरं पिसाळलेलं कुत्रं माग लागलेलं असल्यासारखे धावत असले तरी तुंम्ही ते न धावता पाऊज करुन वाचू शकता ." :)
यानंतर सर्च इंजिनमधून कही लोकांची यावरची मते सुद्धा भेटली. अर्थात ती सत्यच होती कारण लेखनात तशी उग्रता दिसत होती, काहींचे रागावलेले, दु:खी झालेले, रडकुंडीला आलेले प्रतिसाद त्यात होते.पण त्यातल्या त्यात मला पटलेला आणि चांगली माहीती सांगणारा हा एक प्रतिसाद=>
Look, to all those who get sucked into this scam: Common sense should tell you that
(1) nobody pays even a cent to be hired for a job - online, offline, at-home, or anywhere else. That should be your first red flag.
(2) nobody with a job where the income depends on how many links can be posted (as is claimed by the scammers) will announce it to the whole world to bring in competitors. That should be the second red flag.
(3) The official Google website makes no mention of such jobs. That is a third red flag.
If indeed Google is not either directly or indirectly involved in or benefitting from this scam, why can't a spokesperson from Google go on television or their official website to denounce the scam? If they do that, they will go a long way to enhance the very integrity of not just Google but CAPITALISM itself !!
अवांतर= हे एवढं गुर्हाळ गाळण्याचा एकच हेतू आहे- कोणत्याही असल्या स्किमला बळी पडू नका. अगोदर पुर्ण माहीती घ्या, सत्यता तपासा आणि नंतरच काळजीपुर्वक पुढचे पाऊल टाका.
अर्थात, या बाबी समजणारे सर्व मिपाकर हे तसे सुज्ञ आहेतच.
प्रतिक्रिया
2 Mar 2012 - 5:47 am | मराठमोळा
पैशाच्या मोहापायी चांगले सूज्ञ लोक सुद्धा बळी पडतात असे दिसून आले आहे आणि आजही चालूच आहे. हा मोह आवरणे बर्याच लोकांना कठीण जाते.
म्हणूनच मल्टी लेवल मार्केटींग सारख्या प्रकाराला देखील रोज हजारो लोक बळी पडतात आणि पैसे गमावून बसतात. फसवण्याचे असे बरेच प्रकार आहेत.
ईंटननेटवर कुठल्याही साइटीवर कशावरही क्लिक करण्यामुळे
मोबाईलवर पैसे जिंकल्याचा समस येणे, ई मेल येणे.
घरच्या पत्त्यावर पत्र येणे, प्रसंगी फोनदेखील येतात.
या मतलबी जगात कुणी कुणाला फुकटचा रुपया देखील देत नाही हे ध्यानात ठेवले म्हणजे झाले.
आता उघडपणे कायद्याच्या चौकटीत राहून चोर्या करणार्या बँक, टेलीकॉम, बिल्डर, सर्विस ईंडस्ट्री यांना निर्बंध कधी लागणार देव जाणे.
2 Mar 2012 - 6:09 am | पाषाणभेद
तेथे बरेच जण आयटी मध्ये नोकरी करणारे असल्याने त्यांना या गोष्टी माहीती आहेतच पण जे बिगर आयटी मध्ये असतील किंवा इंटरनेटशी संबंधीत नसतील त्यांच्यासाठी महत्वपुर्ण लेख आहे.
संबंधीतांनी इंटरनेटवर असल्या भुलथापांना बळी न पडता इंटरनेटचा योग्य उपयोग करावा.
2 Mar 2012 - 9:18 am | उदय के'सागर
+१ सहमत....
इंटरनेटशि सतत निगडित वा आयटी मधे असणारे अश्या 'ऑफर्स' बद्दल सतर्क व खरं काय ते जाणुन असतातच, पण जे निगडित नसतात त्यांची खरच फसवणुक होते... माझ्या मित्रांनाहि काहि असे अनुभव आले...
१. एका मित्राला 'घाणा' मधे नोकरी ची संधी 'इ-मेल' द्वारे आली होति... खुप छान 'पॅकेज' आणि बाकि 'रीवॉर्ड्स' ऑफर केले होते...तो खुपच खुश होता... मग त्यांनि 'सेक्युरीटी डिपॉझीट' म्हणुन काहि पैसे मागितले होते (काहि पैसे म्हणजे २-३ लाख) ... माझा मित्र चक्कं जमवा जमव करत होता २-३ लाखाची ... आणि त्या पैशांच्या मदती साठी त्याने मला फोन केला तेव्हा मग मी सगळा खरा प्रकार त्याला समजावुन सांगितला (ईंटरनेट वर त्या कंपनीच्या नावाने - अगदी त्याला आलेल्या फोन नंबर च्या मदतीने खुप काहि 'कंम्प्लेंटस' त्याला दाखवुन दिल्या)... हे सगळं पाहुन तो पुरता हादरुन गेला होता...
२. एका मैत्रीणिला असंच 'टेक-महिंद्रा' चा ई-मेल अला होता... ती 'एम.बी.ए-फायनांस' आणि त्यात रीसेशन म्हणुन जॉब मिळत नाहि म्हणुन वैतागलेली... त्यात असाच फेक ई-मेल तिला अला.. मलाहि वाटलं कि 'टेक-महिंद्रा म्हणजे काहि भानगड नसावी... त्यांनि हि असाच डि.डी मागवला होता...८-१० हजाराचा ... शिवाय मुळातच तो इ_मेल काहितरी "HR_TechMahindra@gmail.com" अश्या काहिश्या आयडिचा... अता एवढी मोठ्ठी कंपनी आणि त्यांचं स्वतःचा मेल-सर्व्हर नसणारे का.. :) पण जसं पा.भे. म्हणाले... हे नॉन-आयटी वा ईंटरनेट शि संबधीत नसलेल्यांना समजणं कठीण जातं... आणि त्यांची नेमकी फसगत होते...
मी तर आयटी आणी इंटरनेट शी संबधीत असलेल्या बर्याच जणांना हि ह्यात अडकलेलं पाहिलंय... मुळातच मुद्दा हा आहे कि तुम्हि आयटी आणी इंटरनेट शी संबधीत असाल/ नसाल... पण , जेव्हाहि कोणि तुम्हाला पैसे मागत असतो किंवा अगदी पैसे ऑफर करत असतो... अश्या दोन्ही वेळी तुम्हि खुप सतर्क असणे गरजेचे असते....
2 Mar 2012 - 6:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अहो मज्जा म्हणजे इ मेल च्या प्रोटोकॉल मध्ये sender हा input parameter आहे.
मी कुठल्याही इ मेल पत्त्यावरून मेल पाठवू शकतो तुम्हाला, माझ्याकडे त्याचा प्रोग्राम या क्षणाला तयार आहे. पाठवू? ;-)
त्यामुळे उद्या खरोखर टेक महिंद्रा च्या पत्त्यावरून मेल आला तरी तो खरा असेल असे सांगता येणार नाही. अशा वेळेला रिप्लाय च्या बटनावर क्लिक करावे आणि मग टु मध्ये कुणाचा पत्ता आहे तो बघावा. तो नीट असेल तर बरे.
हो ना. आणि मी वर लिहिलेले तर आयटीतिलही अनेकांना माहित नसते. म्हणून तर जनहितार्थ जारी केले.
2 Mar 2012 - 7:07 am | चौकटराजा
१) प्रदर्शनाला गेले आहात . कोणता तरी सर्व्हे फॉर्म भरून दिला. आपली निवड झाली आहे. जोडप्याने अमुक हॉटेलात पार्टीला या.
२) डेटा एन्ट्रीचे काम. डिपॉझित भरा.
३)मल्टी लेव्हल मार्केटिंग ( आत्महत्या केलेले लोक माहिती आहेत)
४) एकावर एक फ्री ( किंमत पावणे दोन पट असते)
५)२६ जानेवारी १५ ऑगस्टच्या मॉलमधील ओफर्स ( कंपन्यातर्फे बक्वास माल या इव्हेंट साठी खास तयार केला जातो. उदा, दिटर्जंट.
६) वर्तमान पत्रातील ऑफर्स विशेषता: ज्यात ९९०० चा मोबाईल २२०० ला मिळतो.
७) पावसाळ्यातील साड्यांचे सेल १५५० ची ४०० ला , ३५०० ची पैठणी ८५० ला वगैरे .
2 Mar 2012 - 7:28 am | पाषाणभेद
>>>>६) वर्तमान पत्रातील ऑफर्स विशेषता: ज्यात ९९०० चा मोबाईल २२०० ला मिळतो.
याबाबतीत मतभेद किंवा कुणाचा चांगला अनुभव असू शकतो.
माझ्या माहितीतल्या तिन चार जणांनी असले मोबाईल घेतले अन ते चांगले चालतदेखील आहेत. ब्रांडेड मोबाईल च्या तुलनेत त्यात बर्याचशा सोईसुविधा जास्त व सरस आहेत.
(इतरांनीदेखील याबाबतीत (टॅबलेट, लॅपटॉप किंवा मोबाईल) आपले अनुभव सांगा.)
2 Mar 2012 - 9:02 am | पिंगू
एमएलएम आणि तत्सम योजनांना बळी पडणारी हजारो माणसे आहेत आणि त्यामागे झटपट पैसा हाच उद्देश आहे. त्यामुळे वर्तमानपत्रे किंवा इंटरनेट यावर कितीही बातम्या आल्या तरी ह्या असल्या गोष्टी चालू राहणारच. त्यामुळे लोभाला आवर घाला असा डायरेक्ट सल्ला कितीजणांना रुचेल?
- पिंगू
2 Mar 2012 - 9:22 am | चौकटराजा
खरे तर सल्ला मागितल्या शिवाय देऊ नये व देताना रुचेल पचेल चा विचार करू नये .
2 Mar 2012 - 7:47 pm | अन्नू
सध्या टीव्हीवर देखील एक गेम शो पहायला मिळतोय. तुंम्ही तो नक्कीच पाहीला असेल बघा. त्यामध्ये एका सिनेतारकाचा अर्धवट चेहरा दाखवून तो कोण आहे ते दोन मिनिटांच्या आत ओळखुन दाखवायच असतं. त्याचा चेहरा अशा प्रकारे झाकलेला असतो की तो कोण आहे ते आपल्याला लगेच कळते. पण जे कोणी तेथे फोन करतात ते मात्र मुर्खासारखे काहीही उत्तर देत असतात. मग आपण लगेच आपल्या अकलेचे गुणगाण गात त्यांना गाढव म्हणत फोन उचलून ते उत्तर सांगायला धावतो आणि पुढच्या क्षणी आपणच गाढव होऊन बसतो!
कारण आपला फोन विनाविलंब उचलून वेटींगवर ठेवला जातो आणि प्रत्येक मिनिटाचे पाच ते सहा रुपये या हिशेबाने आपले बॅलन्स गटकवले जाते. आपण वाट पाहतो पण शेवटपर्यंत आपला फोन स्टुडिओत जात नाही. असे का??
एक माहीती म्हणून सांगतो की तेथे फोन करणारे हे दुसरेतिसरे कोणी नसून स्टुडिओतलेच महाभाग असतात. पब्लिकने आपल्याला भरभरुन फोन करावेत यासाठी केलेला तो एक स्टंटच असतो.
त्यामुळे चुकूनसुद्धा अशा शोच्या ठिकाणी फोन करु नका. :)
3 Mar 2012 - 2:50 pm | चौकटराजा
मालिक राव, म्या कसा काय इसारलो हा परकार हितं टाकाया ? लई धनेवाद का काय म्हंतात ना अक्षी त्येच !
2 Mar 2012 - 9:04 pm | सर्वसाक्षी
सगळ्यांना सगळ समजत असत पण तरीही लोक फसतात कारण मोह, हव्यास. कुणी आपल्याला फुकट विनासायास भरभरुन देईल यावर विश्वास ठेवतात कारण हव्यास. जेव्हा आपल्याला कुणी बाजारभावापेक्षा कमी दरात काही देतय वा बाजार पेक्षा अधिक व्याज गुंतवणुकीवर देतय तर त्यात फायदा त्याचा आहे, आपला नाही हे का समजत नाही? एखाद्याला व्यवसाय करायचाय तर १८ ट्क्क्यांनी बँकेचे कर्ज घ्यायचे सोडुन तो आपल्याला आपल्या गुंतवणुकीवर १००टक्के का देइल हा विचार हव्यासापायी मनात येत नाही आणि आला तरी मोह त्यावर मात करतो. हजारो कोटींचा उद्योग करणार्या कंपन्या ७-८००० अनामत का मागतील हा साधा विचार येऊ नये? पण गरजवंताला अक्कल नसते आणि मग फसगत होते.
आयटी तज्ञ वा अनभिज्ञ असा फरक इथे नाही. घरबसल्या कॉम्प्युटर चा कळफलक बडवुन महिना लाखो मिळत असते तर लोक तडफडत काही हजारांसाठी घराबाहेर पडले असते का? असा विचार लोभामुळे लोप पावतो. तेव्हा जगातल्या सर्व फसवणुक तंत्रांचा अभ्यास करण्यापेक्षा सारासार विचार करायला शिकणे अधिक बरे.
2 Mar 2012 - 11:22 pm | एक
अॅज अ फ्री लंच
हे तत्त्व लक्षात ठेवलं तर अश्या बर्याच स्कॅम पासून वाचणं शक्य आहे.
3 Mar 2012 - 1:26 am | मराठे
मला काही दिवसांपूर्वीच एक अगदी अस्सल वाटेल असं ईमेल आलं होतं, की "तुमचा अमुक अमुक रकमेचा टॅक्स रिफन्ड आहे तो लवकरात लवकर क्लीअर करण्यासाठी इथे क्लिक करा". अर्थात ती रक्कम अव्वाच्या सव्वा होती. पण इमेलची भाषा, जिथून आलं होतं तो इमेल अकाउंट सगळं अगदी जेन्युईन होतं.
अश्या प्रकारच्या (फिशिंग) इमेलला अनवधानानी कोणीही बळी पडू शकतो. विषेशतः जी लोकं नुकतीच संगणक वापरायला लागली आहेत (आजी-आजोबा किंवा टीनएजर्स) ती मंडळी सहज यांच्या जाळ्यात अडकू शकतात.
3 Mar 2012 - 6:54 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद...चंगली महिती दिलित. आभार आपले.
3 Mar 2012 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार
आपल्याला तर गूगल पंधरा सतरा हजार नाही, पण कमीत कमी एक चार आकडी रक्कम विनासायास मिळवून देते बॉ. :) आणि त्यासाठी गूगलकडे कुठलेही डिपॉझिट जमा करायची गरज नाही. पे-पाल वर तुमचे अकाउंट आणि पॅन कार्ड असले की झाले. मराठी आंतरजालावरती देखील असे काही लोक आहेत ज्यांनी आपले ब्लॉग्ज इंग्रजी मध्ये देखील बनवले आहेत आणि ते गूगलच्या अॅडसेन्स द्वारे पैसे मिळवत असतातच. लवकरच फेसबुक देखील अशी योजना घेऊन येत आहे. अर्थात फेसबुकवरती आधी पैशाचा मोबदला मिळणार नसून तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळणार आहेत, जे तुम्ही गेम्स मध्ये वापरु शकता. बेटा व्हर्जनच्या काही एक वापरानंतर मात्र फेसबुक सरळ पैशात मोबदला चालू करण्याची शक्यता आहे.
पैसे न गुंतवता देखील ऑनलाईन सर्व्हे मध्ये भाग घेउन अथवा वेबसाइटसला भेटी देऊन आपण घरबसल्या पैसे कमावू शकतोच.
https://www.incrasebux.com/index.php
http://minuteworkers.com/index.php
ह्या वेबसाइट्सना अवश्य भेटी द्या, आणि निट माहिती वाचून पुढे स्वतः निर्णय घ्या. अर्थात ह्या वेबसाइटसवरती देखील बर्याच दिडशहाण्या भारतीयांनी (खरेतर एशियन म्हणायला हवे) बॉटस वापरून वेडे चाळे केल्याने आता इथले बरेचसे सर्व्हे हे एशियन कंट्रीजसाठी खुले नसतात. पण लक ट्राय करून बघायला हरकत नाही. दिवसाला२ डॉलर मिळाले तरी अर्ध्या महिन्याचा बाटलीचा खर्च निघून जातो. ;)
*उपरोक्त वेबसाइटस आणि प्रतिसादक ह्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. तसेच ह्या माहिती द्वारे कुठेही गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. तरी देखील हा प्रतिसाद अयोग्य वाटल्यास उडवून लावावा.
3 Mar 2012 - 8:45 pm | निवेदिता-ताई
पावसाळ्यातील साड्यांचे सेल १५५० ची ४०० ला , ३५०० ची पैठणी ८५० ला वगैरे ......
खरेच हे विचार करण्यासारखे आहे.....:)